लेखनविषयक मार्गदर्शन

भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे.

प्राधान्याने माहितीप्रधान लेख, चर्चा आणि सध्या असलेल्या (आणि भविष्यात येणाऱ्या) समुदायांच्या अंतर्गत होणारे लेखन असे या संकेतस्थळाचे स्वरूप टिकून राहण्यासाठी इतर लेखनप्रकार जसे की स्वरचित कविता, ललित स्वरूपाचे लेखन इ. इथे होणे अपेक्षित नाही. आपल्याकडून ह्या उद्दिष्टांना सुसंगत असेच लेखन होईल याची काळजी प्रत्येक सदस्याने घेणे अपेक्षित आहे.

या संकेतस्थळावर लेखन करताना, कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखनाच्या सर्वमान्य शिष्टाचाराचे पालन करणे अपेक्षित आहे. लेख , चर्चा आणि प्रतिसाद याद्वारे होणारे लिखाण सार्वजनिक स्वरूपाचे राहील याची काळजी प्रत्येक सदस्याने घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्याला अनुसरून प्रत्येक सदस्याने पुढील गोष्टी टाळणे अपेक्षित आहे,

  • सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे किंवा आक्षेपार्ह लेखन.
  • व्यक्तिगत रोख असणारे किंवा व्यक्तिगत पातळीवर जाणारे कोणतेही लेखन.
  • परस्परांविषयी किंवा इतर सदस्यांना उद्देशून व्यक्तिगत स्वरूपाचे लेखन. (यासाठी आवश्यकतेनुसार खरडवही किंवा व्यक्तिगत निरोपाची सुविधा वापरणे शक्य आहे. )
  • या संकेतस्थळाच्या अपेक्षित स्वरूपाशी सुसंगत नसलेले लेखन.
  • लेखाच्या किंवा चर्चेच्या विषयाशी संबंधित नसलेले आणि कोणतीही अतिरिक्त माहिती न देणारे प्रतिसाद.

इतर माध्यमांतून किंवा इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झालेले साहित्य उपक्रमवर जसेच्या तसे प्रकाशित करता येणार नाही याची नोंद घ्यावी.

वरील संकेतांचे जाणीवपूर्वक पालन करावे तसेच आपल्या पाहण्यात आलेले आक्षेपार्ह लेख, प्रतिसाद, व्यनि, खरडवहीतील नोंदी यांची माहिती व्यनिने कळवावी ही विनंती. सूचना देऊनही जाणीवपूर्वक वरील संकेतांचे उल्लंघन करणार्‍या सदस्यांवर काही बंधने आणावी लागणे आवश्यक होऊ शकते अशी वेळ येऊ न देण्यासाठी सर्व सदस्यांनी कृपया सहकार्य करावे.

इथे प्रकाशित होणार्‍या लेखनाचे आवश्यकतेनुसार संपादन करण्यासाठी आणि सदस्यांना संपादनात मदत करण्यासाठी संपादन मंडळाची निर्मिती केली आहे. संपादन मंडळात जाळ्यावर वावरण्याचा अनुभव असलेल्या सदस्यांचा समावेश आहे. कोणत्याही लेखनात आवश्यकतेनुसार कोणतेही बदल करण्याचे अधिकार संपादन मंडळातील सदस्यांना आहेत.

विशिष्ट उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली असल्याने सर्व सदस्यांच्या या संकेतस्थळाकडून असणार्‍या सर्व इच्छा-अपेक्षा पूर्ण होणे अशक्य आहे याची आम्हाला जाणीव आहे. या वास्तवाला अनुसरून सर्व सदस्यांनीही माहितीप्रधान लेखन, चर्चा आणि उपक्रमांसाठी या संकेतस्थळाचा उपयोग करावा ही विनंती.

 
^ वर