‘मराठी मंडळी’वर लेखन करण्यासाठी निमंत्रण

» सुचना: ही जाहिरातबाजी नाही तर एक निमंत्रण-पत्रिका आहे, लोकांना माहिती व्हावी यासाठी हा खटाटोप.


mm_logo.png
केवळ काही महिन्यांपूर्वीच खास मराठी ब्लॉगर्सच्या आग्रहास्तव चालू करण्यात आलेले 'मराठी मंडळी' हे संकेतस्थळ अगदी थोड्या कालावधीतच आंतरजालावर लोकप्रिय झाले. सुंदर, विलोभनीय व साजेसा लेआउट, विविध विषयांशी अनुसरून लेखकांनी लिहिलेले अविशिष्ट लेख, तांत्रिक अडचणी मांडण्याकरता व त्यांचे निरसन होण्याकरता सर्वांसाठी बनवले गेलेले [चर्चासत्र], चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे 'मराठी मंडळी' ला आंतरजालावर मोठा वाचकवर्ग लाभला.

काही दिवसांपासून प्रशासक मंडळातील काही सदस्यांना असे वाटत होते की सर्वसामान्य वाचकांना देखील 'मराठी मंडळी'वर लेखक म्हणून सदस्यता घेता यावी व त्यांना त्यांचे लेखन प्रदर्शित करता येण्याची सुविधा उपलब्ध असावी. सर्वांशी चर्चा-विनिमय करुन ही सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सकारात्मकपणे होकार मिळाला. ह्याच निर्णयाची लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने हा लेख लिहिला आहे. आंतरजालावरील सर्वांना 'मराठी मंडळी' लेखन करण्यास निमंत्रित करीत आहे.

आपल्याला जर मराठी मंडळीवर लेखन करण्याची इच्छा असेल आणि म्हणूनच 'मराठी मंडळी'वर लेखक होण्यासाठी नोंदणी सुविधा उपलब्ध व्हावी, असे वाटत असेल, तर [ह्या मुळ लेखावर] प्रतिसाद नोंदवून आपले अनमोल मत कळवावे. आपल्यासारख्याच इतर वाचकांच्या प्रतिसादांवर विचार-विनिमय करुन ही सुविधा दिनांक १ जानेवारी, २०११ पासून उपलब्ध करुन देण्यात येईल!

» धन्यवाद!

Comments

शुभेच्छा!

चांगला उपक्रम आहे. संकेतस्थळावर काम करण्याजोगं अद्याप थोडं फार बाकी दिसतं, ते अवश्य पूर्ण करावे. बाकी वेळ होईल की नाही ते सांगता येत नाही. झालाच तर चक्कर मारेनच.

शुभेच्छा

चांगला उपक्रम! शुभेच्छा.

शुभेच्छा

चांगला उपक्रम आहे. शुभेच्छा.

छान उपक्रम

छान उपक्रम, शुभेच्छा.

पण त्याचे स्वरूप अजून साधे करता येईल का? किंवा उपक्रमच्या सवयीमुळे आपल्या संकेत स्थळावर एकदम गर्दी झाल्यासारखे वाटते.

धन्यवाद


स्वरूप अजून साधे करता येईल का?

याबद्दल मी तेथील प्रशासक मंडळाला कळवले आहे. सूचनेबद्दल आभार.

उत्तम

उत्तम. धन्यवाद.

मला आवडेल

धन्यवाद

ब्लॉगर्स?

चर्चासत्रावरील नोंदणीकृत सदस्यांचे ब्लॉग्ज् [मराठी मंडळी ब्लॉगर्स] वर जोडण्यासाठी असलेली सुविधा या व इतर अनेक सुविधांमुळे

आपण वर दिलेल्या ब्लॉगर्ससाठीच्या दुव्यावर गेलो असता असा संदेश मिळाला:
शोधार्थी काही सापडले नाही!

याचा अर्थ कोणत्याच ब्लॉगरने आपल्या संकेतस्थळाशी जोडणी केलेली नाही की काही तांत्रिक अडचण आहे हे कळले नाही.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

दुरुस्ती

हं, तांत्रिक अडचणींमुळे ते पोर्टल दिसले नसावे. माफ करा, तो दुवा असा आहे: http://www.marathimandali.com/bloggers/index.php

आत्ताच काही क्षणांपूर्वी या दुव्याचा मी स्क्रीनशॉट काढला, खाली चिकटवला आहे:

screenshot
टीप: स्क्रीनशॉट स्पष्ट दिसण्यासाठी त्यावर क्लिक करा.

---


याचा अर्थ कोणत्याच ब्लॉगरने आपल्या संकेतस्थळाशी जोडणी केलेली नाही[...]

असं असतं तर मी तिथे स्वतः संपादक/लेखक झालोच नसतो. FYI, तेथे बर्‍याच ब्लॉग्जच्या फीड्स जोडलेल्या आहेत. :)

उपक्रमवरील इच्छुकांना आवाहन

अद्ययावत: व्यनिंद्वारे आपण आपले विरोप पत्ते (इमेल-अॅड्रेसेस) मला पाठवले तरी चालतील. मराठी मंडळीकडून लवकरच आपल्याशी संपर्क साधण्यात येईल.

आता फक्त ७२

आता काही लेख दिसत आहेत, पण तरीही काहीतरी तांत्रिक अडचण असावी.

एकुण लेख: २८२८ पैकी ५५ – ७२ लेख

एकूण २८२८ पैकी फक्त पहिले ७२ लेख (दि. १७ डिसें. पर्यंतचे) दिसत आहेत. त्यापुढे 'पुढे' या दुव्यावर निव्वळ कोरी पाने दिसत आहेत.

अजून एक निरीक्षणः 'चर्चासत्र' विभागात लोकांच्या ब्लॉगविषयक प्रश्नांचा भरणा आहे. अलीकडील प्रश्नांना उत्तर देण्यात फारशी तत्परता दिसत नाही आहे.
तात्पर्य: संकेतस्थळाचे व्यवस्थापन फारसे उत्साही नसावे असे वाटते.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

राहुन, जोडुन वगैरे

मराठी मंडळीच्या मुखपृष्ठावरील माहित, राहुन, जोडुन, मिळवुन, लिहु, शकु असले शब्द वाचल्यावर तिथे आपण काही लिहू शकू असे वाटत नाही.--वाचक्नवी

अद्ययावत | सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.


सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जसे की या प्रस्तुत निमंत्रणपर लेखात आश्वासन दिले गेले होते, त्यानुसार आता कोणीही वाचक "मराठी मंडळी" वर नोंदणी करुन आपले लेख संस्थळावर लिहू शकतो.
सदस्य-नोंदणी साठी खालील दुव्यावर जावे.

http://www.marathimandali.com/wp-login.php?action=register

पुढील माहीती (प्रवेश करण्यासाठीचा संकेत शब्द व दुवा) नोंदणी केलेल्या इमेलद्वारे कळवली जाईल.

इतर काही शंका/अडचणी असतील, तर त्या येथे आपण विचारू शकता.

धन्यवाद.

 
^ वर