मराठी संकेतस्थळे प्रगल्भ कशी होतील?
नुकत्याच काही संकेतस्थळांवरील काही लेख व काही चर्चा वाचल्या. (आमचे काही मित्र तिथे सहभागी होतात आणि तिथे त्यांना भावुक, हळव्या, उसासेबहाद्दर मॉबला* सामोरे जावे लागते तेव्हा मजा येते. असो.) आणि पुन्हा एकदा लेख, चर्चा आणि/किंवा त्यावरील प्रतिसाद वाचून एका गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले की, आंतरजालीय मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांचे सरासरी वय हे पंधरा-सोळा वर्षांपेक्षा जास्त नाही. वानगीदाखल खूप उदाहरणे देता येतील. ती सदस्यांनीच द्यावीत.
पण मी खोडी काढणार नाही. कारण गंभीर चर्चा व्हायला हवी आहे. हं.तर चर्चेचा विषय आहे:
मराठी संकेतस्थळे प्रगल्भ कशी होतील?
ही चर्चा करताना चर्चेच्या अनुषंगाने खालील प्रश्नांवरही चर्चा व्हावी:
१. संकेतस्थळाची मानसिक वाढ म्हणजे काय?
२. संकेतस्थळाची मानसिक वाढ कशी मोजावी?
३. संकेतस्थळाची मानसिक वाढ कशी करविता येईल?
४. टिंगल करण्याची कुवत ही मानसिक वाढ अधिक असल्याचेच लक्षण नाही काय?
५. टिंगल सहन करण्याची कुवत हीसुद्धा मानसिक वाढ अधिक असल्याचेच लक्षण नाही काय?
६. कंपू आणि मानसिक वाढ यांचा एकमेकांवर काय परिणाम होतो?
७. प्रगल्भ लोक कोणत्या विषयांवर चर्चा करतात?
८. सदस्यसंख्या आणि मानसिक वय यांचा काही परस्परसंबंध सापडतो काय?
आणखी एक मुद्दा असा की चर्चासंस्थळांवर येण्याचा कायकाय उद्देश असू शकतो?
१. माहिती घेणे
२. माहिती देणे
३. शिळोप्याच्या गप्पाटप्पा मित्रमंडळ
४. जाहिराती** करणे
५. जाहिराती** वाचणे
६. खुमखुमी
या सार्या उद्देशांचे प्रमाण काय असते? काय असायला हवे? अजून काय उद्देश असतात? काय असायला हवेत?
ही चर्चा वाचून मराठी संकेतस्थळांवरील सदस्यांचे सरासरी वय एका रात्रीत ३०-३५ वर्षे होईल असे वाटत नाही. पण कुणाची मानसिक वाढ झाल्यास उत्तमच. शिवाय चर्चेतून मराठी संकेतस्थळांच्या सद्यस्थितीची कल्पना यावी. कृपया मते मांडावीत, ही विनंती.
*ह्यावरील एक उद्धऱण:
"...the IQ of a mob is the IQ of its most stupid member divided by the number of mobsters...."
Terry Pratchett
**जाहिरात ही (नाडी, राष्ट्रव्रत) व्यावसायिकच असते असे नाही तर "मी काल अमुक रंगाची चड्डी घातली, मी तमुक पुस्तकाने भारावून गेलो,..." असे चिवचिव ट्वीटसुद्धा असू शकतात.
Comments
माझी उत्तरपत्रिका
१. संकेतस्थळाची मानसिक वाढ म्हणजे काय?
संकेसस्थळाचा आराखडा ज्यांनी मांडला त्या निर्मात्यांच्या 'मानसिक विकासाचा' त्यांनी विकसित केलेल्या संकेतस्थळाच्या 'इनपूट'च्या दर्जा ठरवतो.
'मनोगत' हे दुसर्या इयत्तेतील संकेतस्थळ मानले तर उपक्रम हे पाचव्या इयत्तेतील संकेतस्थळ म्हणता येईल. सदस्यांनी आपण 'उत्सर्जित केलेल्या शब्दांना' आपल्या 'मल-मुत्रासारखे विसर्जन करण्यासाठी' म्हणून जर संकेत स्थळ वापरत असतील तर अशी संकेत स्थळे मी 'बालवाडीतली संकेतस्थळे' म्हणायला हवीत.
चर्चेतून काहीतरी 'ठोस मुद्दे' बाहेर यायला हवेत. त्या 'ठोस मुद्द्यांचा' आराखडा शब्दबद्ध होवून त्याचे पुढील एखाद्या भरीव कामासाठी 'इनपूट' म्हणून ते रूपांतरीत व्हायला हवे. ह्या विचारमंथनातून तयार झालेले हे 'शब्दबद्ध आराखडे' जी कोणी कृतीशील व्यक्ती वा मंडळी वा संस्था असतील त्यांना त्यांच्या कार्यासाठी उपयोगी व्हायला हवेत. अन्यथा सूकलेल्या मलमूत्रानुसार (बर्याचदा तावातावाने ) व्यक्त केलेले विचार, मते वाया जाणार.
२. संकेतस्थळाची मानसिक वाढ कशी मोजावी?
..
३. संकेतस्थळाची मानसिक वाढ कशी करविता येईल?
इनपूट मधून जे प्रोसेस होणार त्यातून 'विधायक आऊटपूट' निघायला हवे. हा नियम पाळणारे संकेतस्थळ, नव्हे 'चर्चास्थळ' आकारात (डिजाईंड) निर्माण व्हायला हवे.
उपक्रम चाच विचार केला तर येथे चर्चा झाल्यानंतर कोणकोणत्या मुद्द्यावर निश्कर्श निघून सदस्य 'एकमत' झालेले आहेत? कोणकोणत्या मुद्द्यावर 'दुमत' निर्माण झालेली आहेत? हे शब्दबद्ध व्हायला हवे. ते उपक्रमाच्या मुखपृश्ठावर विशयाच्या विभागणीनूसार उपलब्ध व्ह्यायला हवे. (सध्या अखा लेख वा चर्चेचा प्रस्तावाचा दुवा असतो त्या ऐवजी केवळ मिनटस ऑफ द मिटींग सारखा) हा शब्दबद्ध आराखडा कोणाच्या तरी कामी यावा ह्या हेतूनेच तो आकारला जावा, उपलब्ध व्हावा.
४. टिंगल करण्याची कुवत ही मानसिक वाढ अधिक असल्याचेच लक्षण नाही काय?
'टिंगल-टवाळी' करायला अक्कल लागत नाही. मी स्वत: मात्र चर्चेत वा प्रतिसादांमध्ये टिंगल करतो ते समोरच्याचे लक्श विचलीत करण्यासाठी. मुर्ख 'आपली टिंगल झाली' ह्या विचाराने लगेचच 'मुख्य मुद्द्यापासून' विचलीत होतात. काहि वेळा चर्चेत वा प्रतिसादांमध्ये विरंगुळा निर्माण करण्याचाही प्रयत्न करतो. पण तरीही 'हसरी टिंगल' करणं हे स्वभावात ही असावे लागते, असेच म्हणेन.
५. टिंगल सहन करण्याची कुवत हीसुद्धा मानसिक वाढ अधिक असल्याचेच लक्षण नाही काय?
टिंगल सहन करू नये वा त्याकडे दुर्लक्श देखील करू नये. त्याऐवजी (आपली वा इतर कोणाची) टिंगल का होतेय? का केली जातेय? हे समजून घेतले पाहिजे. काही आरश्यामध्ये जशी छोटीशी रेश असते जी त्या आरश्यातील प्रतिबिंबामध्ये दोश निर्माण करते. ती बारीक रेश कोठे आहे? कशी आहे? हे ओळखता यायला पाहिजे.
६. कंपू आणि मानसिक वाढ यांचा एकमेकांवर काय परिणाम होतो?
उत्तर माहित नाही.
७. प्रगल्भ लोक कोणत्या विषयांवर चर्चा करतात?
उत्तर देवून कोणालाही दुखवणं योग्य वाटत नाही. त्या एवजी दुर्लक्श करणं, गप्प बसणं वा माफ करणं हे तीन पर्याय योग्य वाटतात.
८. सदस्यसंख्या आणि मानसिक वय यांचा काही परस्परसंबंध सापडतो काय?
उत्तर माहित नाही.
आणखी एक मुद्दा असा की चर्चासंस्थळांवर येण्याचा कायकाय उद्देश असू शकतो?
१. माहिती घेणे - होय.
२. माहिती देणे - होय. जी माहिती आपल्याकडे आहे ती द्यायला हरकत काय आहे.
३. शिळोप्याच्या गप्पाटप्पा मित्रमंडळ - आय हेट धिस
४. जाहिराती** करणे - आक्शेप नाही
५. जाहिराती** वाचणे - आक्शेप नाही
६. खुमखुमी - हो! दुसर्याची जिरवायला मलाही आवडते.
या सार्या उद्देशांचे प्रमाण काय असते? काय असायला हवे? अजून काय उद्देश असतात? काय असायला हवेत?
बापरे बाप! वर लिहीलेली उत्तरे पूरेशी आहेत असे मला वाटते.
धन्यवाद.
एक गुपित कळले
अच्छा. एक गुपित कळले तर.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उत्तम चर्चाविषय...
प्रश्न क्रमांक ९ : आपल्या मनातील खरे खरे स्वतःच्या नावाने लिहायची इच्छा / हिंमत नसल्याने डु. आयडी वापरणार्या सदस्यांची मानसिक वाढ कितपत समजावी?
प्रश्न क्रमांक १० : अशा प्रकारच्या लेखनामुळे संकेतस्थळांचे काय नफा / नुकसान झाले आहे / होत आहे?
डु. आयडीची व्याख्या साधारण अशी करता येईल : स्वतःची खरी ओळख (म्हणजे ज्या आयडीने सदस्य जालिय वावर करतो आणि स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो) लपवून एखादे दुसरेच (किंवा तिसरेच, किंवा चौथेच, किंवा पाचवेच.... -> इन्फिनिटी) सदस्यनाम घेऊन मनमोकळे बोलणारे सदस्य.
आता चर्चा होणारच आहे तर मला नेहमीच पडणारे प्रश्नही विचारून घेतो. उत्तरे मिळाली तर उत्तमच.
बिपिन कार्यकर्ते
खरी-खोटी नावे
प्रश्न क्रमांक ९ : आपल्या मनातील खरे खरे स्वतःच्या नावाने लिहायची इच्छा / हिंमत नसल्याने डु. आयडी वापरणार्या सदस्यांची मानसिक वाढ कितपत समजावी?
आंतरजालावर खऱ्या-खोट्या नावाला काही अर्थ नाही. उदाहरणार्थ, चिंतातुर जंतू ह्यांचे खरे नाव मला माहीत नाही. (सॉरी चिंतू) त्यांच्या मानसिक वाढीबद्दल आपले काय मत आहे? ही पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट अशी की काहीतरी मठ्ठस (मठ + ठस) किंवा बिनडोक किंवा सौम्य शब्दांत अतिशय निरागस लेखन करणाऱ्या खऱ्या नावांपेक्षा ही तुम्हाला वाटतात ती खोटी नावे हजारपट अधिक चांगली.
प्रश्न क्रमांक १० : अशा प्रकारच्या लेखनामुळे संकेतस्थळांचे काय नफा / नुकसान झाले आहे / होत आहे?
लिहिणारा कोण आहे पेक्षा काय लिहिले आहे ह्यावर सगळे अवलंबून आहे.
डु. आयडीची व्याख्या साधारण अशी करता येईल : स्वतःची खरी ओळख (म्हणजे ज्या आयडीने सदस्य जालिय वावर करतो आणि स्वतःची एक प्रतिमा निर्माण करतो) लपवून एखादे दुसरेच (किंवा तिसरेच, किंवा चौथेच, किंवा पाचवेच.... -> इन्फिनिटी) सदस्यनाम घेऊन मनमोकळे बोलणारे सदस्य.
सोयीस्कर व्याख्या. आधी म्हटल्याप्रमाणे आंतरजालावर खऱ्या-खोट्या नावाला काही अर्थ नाही. असो, असो. सदस्यनाम नश्वर आहे पण वसुली अमर आहेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उत्तम चर्चाविषय
मानसिक वाढीचा आणि कोणत्या नावाने लिहिले ह्याचा संबंध नसावा. आचार्य अत्रे 'केशवकुमार' नावाने झेंडुची फुले लिहायचे, दळवी 'ठणठणपाळ' नावाने लिहायचे ते काय भ्याड म्हणून काय? स्वतःच्या नावाने लिहिणार्या टाळ्याघेऊ आयडींपेक्षा 'पेननेम' वापरून परखड लिहिणारे कधीही चांगले.
माझ्या मते फायदाच होतो आहे.
उत्तम!पण आता पळ काढायचा नाही हा :) ह.घ्या.
वेळेचा अपव्यय
मध्यंतरी कोठेतरी वाचले की ऑर्कुट, फेबु वगैरे सोशल नेटवर्किंग साईट्सवर भारतीयांचा मोठ्याप्रमाणात भरणा दिसतो. मराठी चर्चासंस्थळेही सोशल नेटवर्किंगचे प्रभावी माध्यम आहे. या सर्वांमुळे देशाच्या समृद्धीला हातभार लागत नाही असे वाटते. तेव्हा चर्चासंस्थळांवर येण्याचा एक उद्देश -
वेळेचा अपव्यय करून देशाची अधोगती करणे. ;-)
सध्या इतकेच. ;-)
आँ?
म्हणजे संस्थळावर येणारे => देशाची अधोगती => म्ह्णजे येणारे सगळे आस्तिक. असे म्हणायचे आहे का तुम्हाला? ;-)
-Nile
हाहा!
निदान या संकेतस्थळावर येणारे आस्तिक आहेत असे त्यातून सिद्ध होत असेल तर माझी अजिबात ना नाही.
प्रतिसाद संपादित
प्रश्नातील पूर्वार्ध हा आक्षेपार्ह असल्याने प्रतिसादातील काही मजकूर संपादित. इतर संकेतस्थळे आणि व्यक्ती यांवर आक्षेपार्ह टीका करण्यासाठी उपक्रमाच्या मंचाचा वापर करू नये.
माइंड मॅप, ब्लॅक फ्रायडे, फोटो-प्रवासवर्णने, नातेसंबंधांचे मेलोड्रॅमॅटिक चित्रण, सोम्या-गोम्याचे पेपरात किंवा इतरत्र लेखन प्रकाशित झाल्यास शुभेच्छा-अभिनंदने, अमेरिकेतले अनुभव वगैरे वगैरे. येथे फेरफटका मारल्यास बालगणाची कल्पना यावी. मात्र येथे फेरफटका मारल्यास शिशुगणाचीही माहिती मिळेल.
_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल
उद्देश
यावरुन अजून एक दोन उद्देश प्रकाशात यायला हरकत नाही.
(तिथली द्राक्षे कशी आंबट आहेत) त्याविषयी मानसिक वाढ भरपूर झालेल्या संस्थळावर प्रगल्भ चर्चा करणे.
प्रतिसाद संपादित.
मनोरंजन
मनोरंजन हाच उद्देश आहे. लहान मुलांच्या गंमती-जंमती पाहण्यात वेळ मजेत जातो. तिकडे अघोर-तंत्र असल्या मुलांना घाबरवणार्या गोष्टीही असतात.
पटले नाही
फोटो-प्रवासवर्णन चांगल्या दर्जाचे (आणि चांगल्या चर्चांसाठी प्रेरकही) असू शकते. कदाचित, वर्णनासोबत चांगली टिपण्णीही केली की ते चांगले होत असावे.
बरोबर
अपवादांचा उल्लेख असायला हवा होता. एका उत्तम उपक्रमी छायाचित्रकारांचा सल्लाही मी क्यामेरा घेतांना विचारला होता.
_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल
पेरावे तसे उगवते
खरे म्हणजे मराठी संस्थळावर येणारा वर्ग ज्या मनसिकतेचा पुजारी आहे, तीच येथेच काय सगळया जीवनात सगळ्या ठिकाणी दिसेलच. मग ती चांगली असो वा वांगली.
प्रतिसाद
आधुनिकोत्तरवादावर चर्चा करणारे आणि न करणारे अशी प्रतवारी करायची आणि त्यातून एक सामाजिक प्रतवारी किंवा वर्गसंघर्ष सूचित करायची सुरुवात आता या धाग्यावर झालीच आहे तर मग मिशेल फूको आणि त्यानं 'मॅडनेस अॅंड सिव्हिलायझेशन' यामध्ये केलेल्या सामाजिक प्रतवारीचा अभ्यास उल्लेखावासा वाटतो. कुष्ठरोग्यांना पूर्वी सामाजिक अवहेलना सहन करावी लागत असे; पण समाजातल्या कुष्ठरोग्यांचं प्रमाण घटलं तेव्हा वेड लागलेल्या माणसांना तशा सामाजिक अवहेलनेला सामोरं जावं लागलं असं फूको म्हणतो. पाश्चिमात्य समाजात तर्काला उच्च अधिष्ठान मिळत गेलं तसं वेड लागलेल्या माणसांना वाळीत टाकलं जाण्याचं प्रमाण वाढलं असंही तो म्हणतो.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
प्रतिसाद संपादित.
विवेकवाद्यांबद्दल
पाश्चिमात्य समाजात तर्काला उच्च अधिष्ठान मिळत गेलं तसं वेड लागलेल्या माणसांना वाळीत टाकलं जाण्याचं प्रमाण वाढलं असंही तो म्हणतो.
फुकोने विवेकवादावर किंवा विवेकवाद्यांबद्दल काही लिहिले आहे का? (प्रतिसाद आवडला)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चर्चा आणि प्रतिसाद संपादित
इतर कोणत्याही संकेतस्थळांना किंवा व्यक्तिंना मानसिक वाढ खुंटलेले म्हणून हिणवणे उपक्रमाच्या धोरणांत बसत नाही याची नोंद सर्व संबंधितांनी घेऊन आपापल्या प्रतिसादांत बदल करावे. अन्यथा, हे आक्षेपार्ह शब्द वापरलेले प्रतिसाद थोड्या वेळाने अप्रकाशित केले जातील.
धन्यवाद,
संपादन मंडळ.
आधुनिकोत्तरवादावर चर्चा
आधुनिकोत्तरवादावर चर्चा करणार्यांना (म्हणजे मला स्वतःलाही आणि दस्तुरखुद्द या विवेकवादी म्हणवल्या जाणार्या संस्थळालाही) मानसिक वाढ खुंटलेले म्हणून मानले तर काय होऊ शकेल या विषयीच्या तर्काला या विवेकवादी संस्थळावर संपादित व्हावे लागलेले दिसते. यातल्या विरोधाभासाची अंमळ गंमत वाटली एवढेच (आधुनिकोत्तरवाद्यांना स्मरून) म्हणावेसे वाटते.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
:-)
:-)
अशा गंमती मराठी संकेतस्थळांचा अविभाज्य घटक आहेत असे (किंचितश्या अनुभवावरुन) वाटते.
-Nile
उत्तरोत्तर
उत्तरोत्तर.
अवांतर- कोण म्हणाले तिकडे आधुनिकोत्तर म्हणुन
प्रकाश घाटपांडे
चर्चा भरकटता कामा नये.
चर्चेचा प्रस्ताव टाकणं ही एक गोश्ट आहे व एखादी चर्चा व्यवस्थित हाताळणं ही दुसरी गोश्ट आहे. चर्चेत व्यक्त होणार्या संबधित व असंबद्धित मुद्द्यांचे काय करायचे? हे देखील हाताळणारी संकेतस्थळाची रुपरेशा(आराखडा) असेल तर किती छान होईल!
१) प्रथम पणे काही मंडळींना चर्चेचा प्रस्ताव देखील व्यवस्थित ठेवता येत नाही. त्या स्तरावर नवख्या सदस्यांची 'शीणीयर' सदस्यांकडून मदत कशी उपलब्ध करून घेता येईल, हे पाहिले पाहीजे.
२) बर्याच मंडळींना स्वतः चर्चेचा प्रस्ताव ठेवल्या नंतर ती व्यवस्थित हाताळणं जमत नाही.
दुसर्या एका 'शीणीयर' सदस्यांकडून ऍकंरींग करता येणारी यंत्रणा संकेतस्थळावर हवी. तसे होण्याने प्रतिसादकाला काय म्हणायचे आहे हे त्याचे म्हणणे ऍंकर थोडे माईल्ड करून मांडेल व त्यामुळे 'मुद्दा चूकीचा' म्हटले म्हणजे 'आपल्याला दोश दिला, विरोध केला' हे असे चर्चाप्रस्तावकाला वाटणार नाही. तसे (भाव-भावनांना हाताळणं) होण्याने नवखे (या संकेतस्थळावरील सदस्यत्वाच्या दृश्टीने) व नव्या पीढीतील (वयाने) मंडळी या संकेतस्थळावर आवर्जून येतील, येथे यायला भीणार नाहीत, बिचकणार नाहीत.
३) चर्चेची सांगता कशी करायची? हे देखील संकेतस्थळाच्या आराखड्यातून समजले पाहिजे.
थोडक्यात म्हणजे नव्या पीढीला व नव्या सदस्यांना आकर्शून घेता येईल, हे देखील पाहीले पाहीजे.
इनपूट मिळवण्याची पद्धत, सादरीकरणाची पद्धत सुधारली गेली पाहिजे.
अजून काही सुचले कि नंतर टंकेन.....
काही प्रश्न आहेत
१. मराठी संकेतस्थळे प्रगल्भ का व्हावीत? किंवा प्रगल्भ होण्याचे फायदे आणि तोटे काय?
२. संकेतस्थळ प्रगल्भ हवं का संकेतस्थळ वापरणार्या व्यक्ती आणि/किंवा आयडी?
३. प्रगल्भ याची व्याख्या काय?
चर्चाप्रस्ताव वाचून पडलेले काही प्रश्नः
४. टिंगल आणि ताशेरे यांच्यात फरक आहे काय? असल्यास, काय फरक आहे? मानसिक वाढ झालेल्या व्यक्ती आणि/किंवा आयडी ताशेरे ओढतात काय?
५. सदर चर्चा वाचून मराठी संकेतस्थळांच्या सद्यस्थितीची कल्पना येईल असे चर्चाप्रस्तावकास का वाटते?
६. सदर चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद वाचून कोणाचीही मानसिक वाढ होईल असे चर्चाप्रस्तावकास का वाटते? याला काही ठोस पुरावा आहे काय?
७. 'स्वतःपासून सुरूवात करावी' यावर सदर चर्चाप्रस्तावक आणि प्रतिसादकांचा विश्वास आहे काय?
अदिती
काही उत्तरे आहेत
म्हणजे? मोठं व्हायचं नाही का? शिकायचं नाही का? चार बुकं वाचायची नाहीत का? आहार पौष्टिक आहार नको का? बंडू चालायला लागला पाहिजे की नाही? किती दिवस लगोरी, डबा ऐसपैस आणि फुगडी खेळायची. (इतरही खेळ असतील.. म्हणा) हो, पण प्रगल्भ होणे तसे गरजेचे नाही.
दोन्ही. पण काही अ-प्रगल्भ मंडळींनीही अधूनमधून येत-जात राहावे. त्याच्याशिवाय मजा नाही.
हाहाहा. १ ला उत्तर दिले आहे आणि व्याख्येकडे चर्चाप्रस्तावात इशारा आहे. आणि माझ्यामते वेळोवेळी एखादा जो भूमिका घेतो त्यावरून ते कळते. आणि हो प्रगल्भ सदस्यांनी ह.घ्या. गृहीत धरलेले असते.
चर्चाप्रस्ताव वाचून पडलेल्या काही प्रश्नांना काही उत्तरे :
ते टिंगल किंवा ताशेरे घेणाऱ्यावर अवलंबून आहे. उत्तम मानसिक वाढ झालेले उत्तम आणि बारीक अशी टिंगल आणि ताशेरे किंवा तुम्हाला-वाटतं-ते ओढतात.
नक्कीच. कारण जो वाचून विचार करतो त्याला कल्पना येण्याची शक्यता असते.
आहे की! आता बघा. चर्चेत भाग घेणे, काही प्रश्न पडणे आणि ते विचारणे, ही एक आश्वासक सुरुवात आहे.
मी हाय मॉरल ग्राउंडवर उभा असल्याने माझातरी नक्कीच विश्वास आहे.
चला. ह्यानिमित्ताने मिलिंद पन्होची आठवण झाली. बुद्धं सरणं गच्छामि!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
:)
ढिश्क्यांव!
नागसेन म्हंजे स्लिदरिन का हो?
भ्रमनिरास
'फलाणी गोष्ट का करावी' या प्रश्नाचं लॉजिकल उत्तर 'का करू नये' असं होऊ शकतं का? अनेक गृहीतकं असतील, ती नीट विचारपूर्वक मांडली असतील, 'शून्य एकापेक्षा मोठा आहे' अशा प्रकारची चुकीची गृहीतकं नसतील, तर कदाचित 'का करू नये' हे उत्तर मान्य करता येईल. पण मोठं होण्यासाठी मोठं व्हायचं हा विरोधासाठी विरोध आहे.
तेव्हा उगाच हवेत ढिशक्यँव करण्यापेक्षा चर्चाप्रस्तावकाने सदर प्रश्नाला मुद्देसूद उत्तर द्यावे अशी मी विनंती करते.
भ्रमनिरास, साफ भ्रमनिरास! धागाप्रवर्तकाने मोठं होण्याची अपेक्षा करतानाच, "विचारवंत" प्रश्नकर्त्या आयडीला, पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देताना वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.
गंमत..
संकेतस्थळ हे फक्त माध्यम आहे- आपले म्हणणे इतरांपर्यंत पोचवण्याचे आणि व्हाईस व्हर्सा.
एखाद्या संस्थळाची 'प्रकृती' अमुकतमुक असते, त्याचा 'दर्जा' उच्च-नीच असतो किंवा त्याची मानसिक वाढ इतकीतितकी असते (बालवाडी, पहिली, पाचवी वगैरे) असे काही वाचले की गंमत वाटते. म्हणजे तुम्ही प्रवासासाठी एका एसटीत बसले आहात, आणि प्रवासभर राज्य परिवहन मंडळाच्या कार्यपद्धतीची उठाठेव करणारा शेजारी तुम्हाला लाभला आहे, असे काहीसे वाटते.
असो.
आमचे(ही) मत-
"असल्या वांझोट्या चर्चा सुरू राहतात, त्याअर्थी मराठी संकेतस्थळे नजिकच्या भविष्यकाळात तरी प्रगल्भ होणार नाहीत." ;)
यष्टी आणि मर्सेडी
इथेच चुकते. प्रवास यष्टीनेही करता येतो आणि मर्सेडीनेही. ओलोने करता येतो आणि पुजाट किंवा सोमू किंवा सुमानेही.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
गंमत
चर्चाप्रस्ताव तसाच ठेऊन प्रतिसाद संपादित केले गेलेले आहेत. ढिगाने संपादन करावे लागले आहे. म्हणजे प्रस्तावच तसा आहे, म्हणून तसे प्रतिसाद आले. हा काही प्रामाणिक चर्चाप्रस्ताव मुळातच वाटत नाही. इतर संस्थळांना हिणवण्याचा उद्देश स्पष्ट दिसतो. गंभीर चर्चा करण्याचा उद्देश खरा वाटत नाही.
या असल्या चर्चाप्रस्तावाला कसले प्रतिसाद येणार? बांस तसाच ठेऊन बांसरी उडवण्याच्या या प्रकाराची गंमत वाटते खरी. असो. चालूद्या!
अजून काही कल्पना!
एखाद्या व्यक्तीची प्रगल्भता हि त्याने द्न्यान किती व कसे कमावलेले आहे ह्यावर अवलंबून असेल तर,
संकेतस्थळाची प्रगल्भता तीची पोहच किती व्यापक व सर्वदूर, सर्वथरापर्यंत आहे ह्यावर अवलंबून असू शकेल.
सदस्यांच्या प्रगल्भता विकसित होणे-न होण्याबाबत आपण कसे बोलायचे? पण
संकेतस्थळांच्या प्रगल्भतेबाबत आपण बोलू शकतो. विशेश करून मराठी संकेतस्थळांबाबत.
मराठी संकेतस्थळांनी मराठी बातम्या देणार्या संकेतस्थळांशी हातमिळवणी केली तर....?
म्हणजे तेथील वार्ताहरांचे लेख मराठी संकेतस्थळांवर प्रसिद्ध करणे. व त्या मोबदल्यात उदा. प्रभाकर नानावटींचे लेख न्यूज चॅनलच्या दहा मिनिटांच्या एखाद्या कार्यक्रमात चित्र, चित्रफिती (यूट्यूब वरील) यांसोबत वाचून दाखविले तर असे माहितीपूर्ण लेख संकेतस्थळावर शब्दांचा ढीग होवून पडून रहाण्यापेक्शा जास्तीतजास्त लोकांपर्यंत अशा लेखाची माहिती जनते पर्यंत पोहचू शकेल. नाही का?
सध्या तरी मराठी न्यूज चॅनलवाले 'आम्ही किनई फेसबुक वर ही असतो.', 'आम्ही किनई ट्वीटर वर ही असतो.' असे अभिमानाने म्हणत असतात. वर उपाय योजले तर त्यामध्ये बदल होईल.
शेवटी परस्परावलंबन हेच प्रगल्भतेचे लक्शण आहे, होय ना?
?
>>संकेतस्थळाची प्रगल्भता तीची पोहच किती व्यापक व सर्वदूर, सर्वथरापर्यंत आहे ह्यावर अवलंबून असू शकेल.
कळले नाही.
प्रसार, लोकप्रियता यांना पोहच म्हणायचे का? लोकप्रियता वगैरेवर प्रगल्भता अवलंबून असू नये.
नितिन थत्ते
उत्तर प्रश्नचिन्हाचे
'प्रगल्भ' हा शब्द 'एक (पूर्ण) विकसिततेची स्थिती' दर्शविणारा आहे. ह्या शब्दाचा मेंदूशी, बुद्धीशी थेट संबंध नाही. ह्या शब्द गुणधर्माने 'प्रवाही' आहे. म्हणजे काळाच्या 'प्रवाह सोबत' चालणारा आहे. जी व्यक्ती, संघटना, संस्था, वैचारिक बैठक आज प्रगल्भ आहे ती भविश्यात असेलच असे नाही. कारण काळ त्याच्या मर्जीनुसार चालतो, त्याच्या नियमानुसार चालतो. काळाच्या प्रवाहाच्या सोबत प्रवास करीत प्रगल्भतेची स्थिती टिकवून ठेवणे नियमित जमत नाही, जमणार नाही. कारण तीच काळाची इच्छा असते.
उदा.:
व्यक्ती :
देवानंद हा हिरो त्याच्या उमेदीत यशस्वी होता. तो त्याच्या हिशोबाने प्रगल्भ होता. आज तो काळाच्या प्रवाहाच्या ओघात फेकला गेला आहे. आज अमिताभ प्रगल्भ आहे. तो आपल्या प्रसिद्धीचा झोत अजूनही आपल्याला हवा तसा धरून आहे. पण तोही उद्याच्या काळाच्या बदलत्या नियमांनुसार प्रगल्भ राहिल का? कि तोही एक हास्यास्पद व्यक्ती म्हणून जगणार?
'प्रगल्भता' हा शब्द गुण, कौशल्य दर्शविणारा शब्द आहे. पण गुण व कौशल्य कोणाचे?
- जी व्यक्ती, संघटना, संस्था, वैचारिक बैठक ' क्रियाशीलतेच्या पूर्ण विकसित अवस्थेत आहे त्यांची.
इंग्रजीत म्हणायचे झाले तर,
- इट इज 'अ हायेस्ट स्टेट ऑफ इफेक्टीवीटी ऍन्ड एक्झीक्यूशन ऑफ अ परसन, ग्रूप, इंस्टीट्यूट ऑर ऍन आयडीओलॉजी.'
थत्तेसाहेब,
लोकप्रियता हा निकश प्रगल्भतेसाठी कसा होईल? पण जीथे प्रगल्भता आहे तिथे तिच्या मागून लोकप्रियता येणार, नाही का?
घरमालक व भाडेकरू यांची एकाच वास्तूबाबत वेगवेगळी दृश्टी असते. होय ना? अगदी तसेच संकेतस्थळाचे मालक व संकेतस्थळाचे सदस्य ह्यांच्या दृश्टीकोनात भेद हा असणारच.
तुम्ही केवळ भाडेकरूच्या दृश्टीकोनातून ह्या संकेतस्थळरूपी घराकडे पहात आहात. मालकाचे काम संकेतस्थळ काळानुसार जास्तीत-जास्त उपयोगी बनविणे हे असू शकते. जेणे करून ते तीची पोहच व्यापक व सर्वदूर, सर्वथरापर्यंत पोहोचू शकेल. तसे करणे म्हणजेच प्रगल्भ दृश्टी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लोकांपर्यंत आपल्या संकेतस्थळावरील प्रकाशित लेख, चर्चा पोहचतील हे काम करणे मालकाच्या कार्यक्शेत्रामध्ये येते. ते कार्य तडीस नेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करण्याची मानसिकता बाळगणे ही प्रगल्भतेचे लक्शण होईल, घरमालकाच्या भुमिकेतून. मी इथे कोणत्याही संकेतस्थळाच्या मालकाबद्दल बोलत नाही आहे. मी फक्त भविश्यात मराठी संकेतस्थळे विकसिततेच्या स्तितीपर्यंत कशी काय पोहचू शकतील ह्या बाबतच बोलत आहे.
संख्या
प्रगल्भता म्हणजे येथे येणार्या सदस्यांची संख्या असे मानले तर दुसरे संस्थळ बंद असल्याच्या काळात इथे हजेरी वाढलेली दिसते. तेवढा काळ उपक्रम जास्त प्रगल्भ होते असे म्हणावे का?
[त्या काळात स्वतः प्रगल्भ असल्याचा कुठलाही दावा न करणारे सदस्य देखील हजर दिसतात]. :)
नितिन थत्ते
+२
आता उपक्रम प्रगल्भ झाल्या आहे असे म्हणता येऊ शकेल :) णेमके मुद्द्यावर बोट ठेवल्याबद्दल थत्तेचाचांचे कौतुक , गुड्डी ला गोडगोड पापा आणि आप्पांना साष्टांग नमस्कार. पत्राचे उत्तर लवकर् देणे . वाट पहात आहे.
- चि. टारझन
उत्तर थट्टेच्या भावनेतून दिले आहे का?
थत्ते, तुम्ही तुमचे उत्तर माझे उत्तर वाचून दिले आहे का? कि ते थट्टेने दिले आहे?
मी वरील प्रतिसादात म्हटले आहे कि...
'प्रगल्भता' हा शब्द गुण, कौशल्य दर्शविणारा शब्द आहे. पण गुण व कौशल्य कोणाचे?
- जी व्यक्ती, संघटना, संस्था, वैचारिक बैठक ' क्रियाशीलतेच्या पूर्ण विकसित अवस्थेत आहे त्यांची.
इंग्रजीत म्हणायचे झाले तर,
- इट इज 'अ हायेस्ट स्टेट ऑफ इफेक्टीवीटी ऍन्ड एक्झीक्यूशन ऑफ अ परसन, ग्रूप, इंस्टीट्यूट ऑर ऍन आयडीओलॉजी.'
तुमच्या उत्तरामध्ये तुम्ही कोणाच्या 'प्रगल्भतेबाबात' बोलत आहात?
फेसबुक जेंव्हा आकारले गेले ते एक विचार ध्यानात घेवून आकारले गेले असावे.
'प्रत्येक माणसाला कमीत कमी पाच मित्र जरी असले तर अशा माणसाशी आपली ओळख राखून ठेवल्यास 'ओळखी असणार्यांचे' वर्तुळ मोठे-मोठे होत जाणार'. फेसबुक 'लॉंच झाल्याच्या काळात' फेसबुक 'प्रगल्भ' होते. आज ते (वरकरणी तरी) लोकप्रिय आहे. आज त्या संकेतस्थळाचा आराखडा, सदस्यांकडून इनपूट मिळवण्याचा सांगाडा बदलून इतर हि संकेतस्थळे निर्माण होत आहेत. (उदा.मायविश्व.कॉम)
आपण येथे मराठी संकेतस्थळ प्रगल्भ कधी होणार? ह्याचा विचार करतोय म्हणजे मराठीतून लेखन, कविता, चर्चा, माहितींचे देवाणघेवाण करणार्या संकेतस्थळांची अ हायेस्ट स्टेट ऑफ इफेक्टीवीटी ऍन्ड एक्झीक्यूशन ऑफ अ परसन, ग्रूप, इंस्टीट्यूट ऑर ऍन आयडीओलॉजी पर्यंत कधी पोहचणार असा विचार मी मांडत आहे. पण तुमचं त्यावरील उत्तर अगदिच पोरकट आहे.
संकेतस्थळाच्या मालकांनी आधी एखादी आयडिऑलोजी डोळ्यासमोर ठेवून संकेतस्थळाचा आराखडा कागदावर उतरवला व तो वास्तवात आणला. तर ती एक घटना होईल. त्या घटनेपासून ठराविक काळापर्यंत ते संकेतस्थळ प्रगल्भ असेल, जर ती आयडिऑलोजी अतिउत्तम असेल.
'सदस्यांनी एखादा लेख लिहीला तर लगेचच तो संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रकाशित होणारच पण त्या सोबत जर तो जास्तीत जास्त लोकांना आवडला, असे इनपूट दिले तर तो प्रींट व इलेक्ट्रॉनिक माध्यमापर्यंत पोहचवून, त्यास प्रसिद्धी देखील देण्यात येईल.'
हि आयडिऑलोजी उद्याच्या काळात प्रगल्भ ठरू शकेल.
त्या आयडिऑलोजीवर आधारीत एखाध्या संघटनेने, संस्थेने काम केल्यास त्यांचे काम प्रगल्भ ह्या सदरात मोडेल.
त्या कामातून जे संकेतस्थळ व्यवस्थित प्रस्थापित झाले तर ते संकेतस्थळ त्या काळापूरते प्रगलभ म्हणून प्रसिद्धी होईल.
प्रसिद्ध पावलेले संकेतस्थळावर सदस्यांची संख्या आपोआप वाढणार. फेसबुक सारखेच..
पण जे काही असेल ते ठराविक कालमर्यादेपर्यंत. कारण प्रत्येक गोश्टीच्या जिवंतपणाला कालमर्यादा असतात. मग तो लेख असो, चर्चा असो, संकेतस्थळाचे नाविन्य असो.
माझ्या दृश्टीने ही चर्चा संपली.
गंमतच आहे..
काही काळापूर्वी मी असाच धागा सुरु केला होता ज्यात 'आपण संकेतस्थळांवर का येतो?' आपण येथे एकमेकांचे मित्र असतो का? असे प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा उद्देश माझ्यापुरता तरी मूलगामी विचार मंथन व्हावे, असा होता. कारण मला प्रामाणिकपणे असे वाटते, की यापुढच्या काळात हे प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. प्रत्येकजण स्वतःच्या मनाला तरी हे प्रश्न विचारणार आहेच.
गंमत म्हणजे मी धागा काढल्यानंतर एक तासाच्या आत तो उडवण्यात आला आणि विषयाशी सुसंगत लिहिण्याची सूचना मला संपादक मंडळाकडून करण्यात आली. मी संपादक मंडळाच्या निर्णयाचा आदर केला. पण आज तोच धागा अधिक व्यापक असा येथे सुरू दिसतो आहे. चर्चाही सुरू आहे.
असो, सिलेक्टिव्हिटीचे अनुभव अनेकदा आल्याने मला भेदभावाचे काही वाटत नाही. मात्र मी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तरे मिळणार असतील तर चर्चा वाचण्यास नक्कीच आवडेल. तेव्हा संपादक मंडळाने हा धागा उडवू नये, अशी विनंती.
असहमत
ही चर्चा उपक्रमाच्या धोरणांत बसत नाही. ती अप्रकाशित व्हावी असे मी आधीही सांगितले होते.
प्रगल्भता
संकेतस्थळाची मानसिक वाढ म्हणजे काय, व त्या वाढीचा दर कसा मोजावा हे दोन महत्त्वाचे प्रश्न लेखकाने उपस्थित केलेले आहेत. पण त्याआधी
असं ठामपणे लिहिल्यामुळे थोडं गोंधळायला झालं आहे. मुळात जर तुमच्याकडे इतक्या सहजपणे (मानसिक) वय मोजण्याची क्षमता असेल तर ती पद्धत सांगण्याऐवजी वाचकांना का बरं विचारावं? प्रतिसादकर्त्यांपैकी कोणाकडेच अशी खात्रीलायक पद्धत नाही. तेव्हा लेखकाने आपली पद्धत स्पष्ट केली तर बरं होईल.
बाकी मानसिक प्रगल्भता किंवा वैचारिक उंची म्हणजे काय याबाबत प्रत्येकाचे वेगळे निकष असतात. न्यूटनने म्हटलं होतं की ज्ञान वाढण्याचं एक लक्षण म्हणजे आपलं किती अज्ञान बाकी आहे याची कल्पना येणं. झुरळाला कदाचित आपण मुंगीपेक्षा मोठे आहोत यात समाधान मिळेल. ज्ञानी माणूस भोवतालचा सागर किती विशाल आहे याने थक्क होऊन जाईल. याला मी प्रगल्भता म्हणतो.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी