उपक्रम
इतर संकेत स्थळांसंबंधी चर्चा चालू असताना. 'उपक्रम' या संस्थळाबाबत चर्चा साहजिक ठरते.
या चर्चासंस्थळावरचा माझा सहभ्राग बराच कमी (काळानुसार) आहे. त्यामुळे हे इतिहासाबाबत फारसे माहित नाही. इतर संस्थळांकडे माझे फारसे लक्ष नसल्याने त्यांच्या मानसिक वाढीबद्दल काही लिहिता येणार नाही. या संस्थळाबद्दल थोडे लिहून चर्चेच्या मुद्यांकडे येतो.
'उपक्रमा'ला चर्चा-संस्थळ असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. लेखांपेक्षा चर्चा अधिक होते. चर्चा बरीच टोकदार होते. काहीजण त्यात जखमी होत असावेत. वादात कधी तोल सुटत असतील. हे सर्व असून काही लेखक आणि काही विचार टिकून राहतात. इतर ठिकाणांपेक्षा (माझ्या तुटपुंज्या अनुभवातून लिहितो आहे.) इथे निश्चित वेगळे आहे. हे वेगळेपण लेखांपेक्षा प्रतिसादांच्या दर्जात जास्त आहे. शुद्धलेखन आणि माहिती यांची अचूकता येथे जास्त चांगली तपासली जाते. माहितीचा परिघ खूप मोठा आहे. यातली अजून एक विशेषता म्हणजे विवेकवादी लेखनाची चलती आहे.
उपक्रमचे स्वतःचे लेखनविषयक मार्गदर्शनातून त्याची वरील ओळख कळत नाही. लेखन माहिती पूर्ण असावे (ललित नसावे), पूर्वप्रकाशित नसावे, आचारसंहितेचा भंग करू नये असे काहीसे त्यातले स्वरूप आहे. प्रत्यक्षात यात बरीच शिथिलता आहे. (ती असावी.) केवळ या मार्गदर्शनातून उपक्रमला हे स्वरूप आले नाही हे मला तरी स्पष्ट वाटते. हे स्वरूप कसे आले याबद्दल मला नेहमी उत्सुकता होती म्हणून हा चर्चेचा प्रस्ताव.
१. उपक्रमच्या स्वरूपा बद्दल कारणे कुठली (आणि कुठल्या क्रमवारीने). (मला सुचलेली)
अ) लेखन विषय मार्गदर्शन ब) लेख/प्रतिसाद संपादन करणारे संपादक (मंडळ) क) बीजसदस्यांचा सहभाग. ड)उपक्रमचे प्रथमदर्शनी स्वरूप आकर्षक नसणे. इ) सदस्यांच्या सहभागावरचे नियंत्रण. (अवांतरः वसुलीयांच्या सहभागावरील नियंत्रणाच्या गूढामुळे मी संभ्रमात आहे.)
२. विवेकवादी लेखनाच्या चलतीचे कारण काय असावे?
चर्चा धारदार असणे. आणि वरील अ/ब/क/इ कारणे.
३. उपक्रमातील भरती गळती मुळे होणारे प्रश्न हे किती साधक बाधक आहेत? (यात स्वखुशीने येणार्या जाणार्यां बद्दल लिहिले आहे.)
पहिल्यांदा गळती घेतली तर कित्येक चांगले लेखक काही लेखांसाठी येतात मग दिसत नाही.
भरतीमुळे प्रतिसादांची गर्दी होते. अशा वेळी टोकदार चर्चेची धार कमी होऊ शकते. यामुळे संस्थळाचे स्वरूप घसरू शकते.
भरतीतही गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रणाली बदलायला हवी (संक्षिप्त प्रतिसाद बघता येणे) असे वाटते का?
प्रमोद
Comments
प्रस्तावाशी सहमत
सहमत आहे.
_____
डोन्ट आस्क डोन्ट टेल
धन्यवाद
निरीक्षण आणि विश्लेषण पटले.
सहमत आहे.
योग्य विश्लेषण!
इतर स्थळांवरही कार्यरत असणार्या उपक्रमींना काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.
माझे मत
उपक्रमाचे प्रथमदर्शनीस्वरूप काहींच्या मते आकर्षक नसले तरी अनेकांना ते आवडते (यूजेबिलिटीचे कारण असावे). पण पुढच्या आवृत्तीत बदल होतील असे वाटते. चांगले लेखक टिकवायला हवेत ह्याबाबत सहमत आहे. पण त्यासाठी कुणी प्रयत्न करायला हवे? उपक्रम ही काही संस्था नाही. इथे संपादक असले तरी जबाबदारींचे वाटप केलेले नाही असे वाटते.
१. माझ्यामते, त्यामुळे येत्या काळात उपक्रमाचे व्यवस्थापन करण्यासाठी इथल्या माननीय सदस्यांनी पुढे यायला हवे. ह्यात तांत्रिक बाबींबाबत मदतही आली.
२. लेखन (प्रतिसाद नव्हे) प्रमाणलेखनाच्या नियमानुसार (शुद्धलेखन हा शब्द मुद्दाम टाळला आहे) आहे किंवा नाही हे बघायला हवे. नंतरच ते लिखाण प्रकाशित व्हायला हवे.
३. माझ्यामते अर्वाच्य शिव्या आणि धमक्या सोडल्यास प्रतिबंध नको.
४. उपक्रमावर ललित लेखन प्रकाशित करता येत नाही. त्यामुळे ललित लेखनासाठी एखादे वेगळे संकेतस्थळ झाल्यास उत्तमच.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चांगले लेखक
चांगले लेखक टिकवायला हवेत ह्याबाबत सहमत आहे. पण त्यासाठी कुणी प्रयत्न करायला हवे?
अर्थात वाचकांनी तो देखिल योग्य प्रतिसाद देऊन.
हे एक दुष्टचक्र वा सुष्टचक्र असावे. म्हणजे चांगले जमत गेले तर अधिक चांगले येतात. आणि चांगले गळले की गळत जातात. कुठेतरी क्रिटिकल मास असावे (म्हणजे अमुक संख्येने चांगले. वा अमुक संख्येने वाईट) असे वाटते. यातील महत्वाचा कार्यभार बीजसदस्यांनी उचलावा. (उचलत असतील.)
या चर्चाप्रस्तावाचा हेतू उपक्रम व्यवस्थापनावर लिहिणे हा नाही. तर असे (उपक्रमाचे रूप) का घडले हे जाणून घ्यायची इच्छा आहे. पूर्वीच्या लेखांचे आकडे (प्रतिमास किती) लेखांच्या प्रतिसादांचे वाचनाचे सरासरी आकडे कदाचित यासाठीची दिशा दाखवतील. पण तेवढे पुरेसे नाही.
तुमच्या मतांबद्दल सहमती आहे.
प्रमोद
हम्म!
उपक्रमाला चर्चा-संस्थळ म्हटल्याने थोडा खेद वाटला पण आपल्याला इतिहास माहित नसावा हे साहजिक आहे. उपक्रमाची बांधणी हे चर्चा संकेतस्थळ व्हावे म्हणून झाली नसावी (अर्थात ते होऊ नये असेही नाही.) परंतु प्रथमपासून उपक्रमावर लेख कमी येतात आणि याचे कारण असे की येणारा लेख योग्य माहितीच्या आधारे आणि संदर्भांसकट लिहावा अशी वाचकांची अपेक्षा असते. असे करण्यास सदस्यांना उपलब्ध वेळाची कमतरता असेल तर लेख लिहिण्यास त्यांना वेळ लागणे शक्य आहे. परंतु, मला असे वाटते की गेल्या वर्षीपर्यंत उपक्रमावर अनेक लेख येत असत. आता त्यांची संख्या का रोडावली या विषयी अनेक अटकळी आहेत, त्यात सदस्यांना वेळ नसणे.. यापासून काही व्यक्तींमुळे नाराजी वाटून संकेतस्थळांवर लिहिणे बंद केले जाणे इथपर्यंत अनेक मुद्दे मांडता येतील. एखाद्या ठिकाणी लिहिणे किंवा न लिहिणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.
विशेषतः दिवाळी अंकात अनेक नेहमीच्या सदस्यांनी लेख दिले नाहीत आणि लेख देणार्या काही सदस्यांना उपक्रमी ओळखतच नाहीत हे पाहून आश्चर्य वाटले होते खरे पण असो. असे व्हायचेच. माणसाने उज्ज्वल भविष्याकडे बघावे.
असो, विवेकवादी लेखांची चलती वगैरे वाचून मजा वाटली.
बाकी, उपक्रमाच्या व्यवस्थापनावर चर्चा का बरे सुरु आहे? सुधारणांसाठी पुन्हा विचारले आहे का मालकांनी?
शंका
शक्यता नाकारता येत नाही परंतु तुमच्याकडे काही आकडे आहेत काय? उपक्रमचे लेख 'सॉर्ट बाय डेट' क्रमाने लावता आले नाहीत. त्यामुळे २००७, २००८, २००९ आणि २०१० या चार नोव्हेंबरांत प्रसिद्ध लेखांची संख्या मोजणे अवघड वाटू लागले. संपादकांना विनंती की त्यांनी तारखेनुसार इतरती भाजणी ही सुविधा दुरुस्त करावी. (आयते आकडेच शोधून दिले तर अधिकच चांगले.)
गुणात्मक घट झाल्याचा दावाही मला पटत नाही. येथे पूर्वी खूपच फालतू लेखनही झालेले दिसते. पण या मुद्यावरील वैयक्तिक मत सिद्ध करणे अवघड/अशक्य आहे असे मला वाटते.
कोलबेरराव बर्याच दिवसात दिसले नाहीत. उपक्रमवरील काही तर्कहीन लोकांचा त्यांना कंटाळा आला असावा ;)
उत्तर
नाही पर मेरे पास मां है च्या धर्तीवर माझ्याकडे पहिल्या दिवसापासून उपक्रमाचे सदस्यत्व आहे म्हणून फक्त निरीक्षण लिहिले. तेही मला वाटते टाइपचे.
गुणात्मक लेखनाबद्दल मी काही म्हटलेले नाही. संकेतस्थळ निर्माण झाल्यावर त्यावर सदस्य येणे, टिआरपी वाढणे, नवे विषय पुढे येणे, लोक टिकणे असे होण्यास काही अवधी जावा लागतो असे वाटते. लेखनाचा दर्जा सुधारण्यासही वेळ लागणे शक्य आहे परंतु गुणात्मक लेखन ही काही विशिष्ट सदस्यांची मक्तेदारी नाही, त्यासाठी येथे असलेल्या सदस्यांनाही उद्युक्त किंवा प्रोत्साहित करता येईल. ते न करता जर 'अमुक सदस्य लिहितो म्हणून मी संन्यास घेतो' अशी मानसिकता उपयोगी नाही असे वाटते.
हाहाहाहा! दिल बहलाने को गालिब खयाल अच्छा है.
चांगले लेख
चांगले माहितीपूर्ण लेख लिहिण्यासाठी वेळ नक्कीच लागतो. मला वाटते की वेळेची कमतरता (कामाचा वाढलेला व्याप) हाच मुख्य मुद्दा आहे. माहितीपुर्ण लेख म्हणजे एखादा ललितलेख नक्कीच नाही कि जो काही मुद्दे डोक्यात घेऊन कल्पना फुलवत लिहिला जावा.
दुसरा मुद्दा म्हणजे त्याच त्याच विषयांवरचे चर्चेचे गुर्हाळ हा सुद्धा आहे. लिहायची इच्छा असुन सुद्धा वितंडवादाच्या भीतीने लेख लिहिले जात नाहीत असे वाटते. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
उपायः
उपक्रमावर लेखमाला लिहायचे उपक्रम राबवायला हरकत नाही. नुसते चर्चा करण्यापेक्षा एखादा उपक्रम राबवणे जास्त चांगले पडेल. छायाचित्रांचा असा उपक्रम चांगला सुरु होता. पण काही लोकांच्या नाहक वात्रट टिकांमुळे अनेक चांगले सदस्य लिहायचे कमी झाले. कोलबेरने चांगले छायाचित्र सहीत लेख लिहिले आहेत. सध्या सक्रिय नसण्याचे कारण माहित नाही.
असो, चांगले लेख वाचायला मिळाले तर चांगलेच आहे :)
सहमत
सहमत. आणि बहुधा मराठीत तर जास्तच वेळ लागत असावा.
सहमत. तिमाहीत किमान १ लेख हा उपक्रम राबविण्याबाबत काय वाटते?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
चांगला उपक्रम आहे.
चांगला उपक्रम आहे. खरतर लिहायचे ठरवले तर कितीतरी माहिती अशी आहे जी मराठीमध्ये लिहिल्यास अनेकांना फायदा होईल. संशोधनात्मक लेख लिहिल्यास अनेकांना आनंद होईल आणि वांगले वाचक/अभ्यासू लोक यांना प्रोत्साहन मिळेल. अर्थात सुरुवात होणे गरजेचे आहे.
मला वाटते की चांगले लेखन जोमाने झाल्यास नसत्या चर्चा आपोआपच मागे पडतील. त्यावर नुसतेच प्रतिसाद पाडण्यात अर्थ नाही. अलिकडे चंद्रशेखर यांचे लेखा चांगले असायचे. पण मानापमान्याचा नादात या लेखांचा ओघ कमी झालेला पाहून वाईट वाटले. त्याच प्रमाणे उपक्रमावर अनेक जेष्ठ सदस्या आहेत. त्यांचे अनुभवपर लेख सुद्धा जास्त माहितीचे ठरतील. पण त्यासाठी त्यांनी स्वतःची ठाम मते थोडी बाजूला ठेवून माहितीची देवाणघेवाण हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. शरदकाकांचे छायाचित्रणावरचे लेख हे एक् उत्तम उदाहरण आहे.
असो, आपण चांगले लेख लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करु शकतो. उपक्रमाची ओळख वेगळी आहे. माहितीची देवाणघेवाण हा इथला मुख्य हेतु आहे. इतर गरजांसाठी इतर संकेतस्थळे आहेतच. सदस्यांनी सुद्धा थोडी प्रगल्भता दाखवणे अपेक्षीत आहे.
योग्य
योग्य निरीक्षण. बिल्ला नं. ४८ असल्याने सुरूवातीपासून जे बरेच बदल झाले आहेत ते बघायला मिळाले. त्यावरून सुरूवातीचे उपक्रम ते हेच का असे कधीकधी वाटते. दुर्दैवाने आधीचे मुखपृष्ठही आता गायब आहे त्यामुळे बरेच वाचनीय लेख सध्या शोधण्यास दुर्मिळ आहेत. उदा. धनंजय यांच्या लेखमाला, प्रियाली यांचे इतिहासावरील लेख, राधिका यांचे संस्कृत साहित्यावरील लेख, निनाद यांच्यासह इतरांचीही अनेक उत्तम चित्रपटपरीक्षणे. सुरूवातीच्या काळात बरेचदा एका आठवड्यात पाच ते दहा चांगले लेख वाचायला मिळत असत. तेव्हा धुळवड होत नसे असे नाही पण ती झाल्यास तिला विरोध करणारे बरेच सदस्य होते.
नंतरच्या काळात परिस्थिती बदलली. निरीक्षणात म्हटल्याप्रमाणे विवेकवादी लेखनाची चलती होऊ लागली. हळूहळू त्याला अंधश्रद्धा निर्मूलनाचे स्वरूप येऊ लागले. इथे एक मूलभूत गोची निदर्शनास आली. उपक्रमाच्या धोरणातील विषयांमध्ये भविष्यासारखे विषयही आहेत. त्यात रस असणारी मंडळी त्यावर लेखन करीत आणि मग विवेकवादी वि. श्रद्धाळू असे कलगीतुरे होत. नंतरनंतर यांचे गट बनले आणि जिथे दिसेल तिथे एकमेकांचे स्कोअर सेटल करणे हाच मुख्य अजेंडा बनला. इथे खरेतर उपक्रमाच्या धोरणाची परत पहाणी आवश्यक होती. जर उपक्रम विवेकवादी आहे तर भविष्यासारखे विषय काढून टाकावेत. पण तसे केल्यास कलगी तुरे बंद होतील आणि टिआरपी कमी होईल.
स्कोअर सेटलिंग फक्त या विषयापुरते मर्यादित नव्हते. इतर संकेतस्थळांची धुणी इथे धुणे हा प्रकार बराच जुना आहे. खरेतर हा प्रकार उपक्रमाच्या धोरणात बसत नाही पण सध्या उपक्रमाचे धोरण म्हणजे पूर्वी इथर ही संकल्पना होती तसे झाले आहे. स्कोअर सेटलिंग सर्वव्यापी झाल्यामुळे बरेच सक्रिय सदस्य सध्या इतरत्र लेखन करतात. या वर्षीचा दिवाळी अंक पाहिल्यास याची कल्पना यावी. यातील काही लेखक सदस्यांना कधीही उपक्रमावर पाहिलेले नाही. अशा परिस्थितीत याला उपक्रमाचा दिवाळी अंक का म्हणावे हा रोचक प्रश्न आहे. पण त्याहून विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे सक्रिय सदस्यांनी लेखन न करणे का ठरवले असावे? अर्थात हा विचार कुणी करायचा?
सध्या उपक्रमावर एक चांगला लेख/चर्चा असेल तर तीन चार विवेकवादी चर्चा, दोन-तीन इतर संकेतस्थळांची धुणी धुणारे किंवा स्कोअर सेटलिंग लेख असे प्रमाण असते. तिथे वाट्टेल तसे प्रतिसाद दिले जातात. फार ओरडा केला तर संपादन होते अन्यथा नाही. उपक्रमपंतांनी वारंवार सांगूनही इतर संकेतस्थळांबद्दल चर्चा इथे कशा होऊ शकतात हा मिलियन डॉलर प्रश्न आहे. जर धिंगाणा घालणे, वाट्टेल तसे शिवराळ मूर्तिभंजन याच गोष्टींसाठी उपक्रमाचा वापर होत असेल तर किमान 'जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!' हे वाक्य काढून टाकावे असे वाटते.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
माझे मत
एखादा लेख/धागा वाचणे आणि त्यावर प्रतिसाद देणे बंधनकारक नसते ना. आणि धोबीघाटावर प्रत्येकाने (धोबी आणि गाढवे दोन्ही) जायलाच हवे असेही नाही. ज्यांना आपले परिटघडीचे आंतरजालीय आयुष्य विस्कटायचे नाही त्यांनी तिकडे ढुंकूनही बघू नये असे मला वाटते.
ओके. आधी म्हटल्याप्रमाणए उपक्रमावर सर्व सक्रिय सदस्यांनी माहितीपूर्ण लेखन करावे.
ह्या सक्रिय सदस्यांची नावे मिळाल्यास उत्तम. दिवाळी अंकात अनेक लेखकांच्या मीटस्पेसमधील नावाने लेखन प्रकाशित झाले असावे. दिवाळी अंकाला केवळ सदस्यांपुरतेच मर्यादित करू नये असे माझे मत आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धोबीघाट
मान्य पण मग उपक्रमाचा धोबीघाट करायचा असेल तर उगीच माहितीपूर्ण लेखन असणारे संस्थळ असा आव आणू नये, सरळ धोबीघाटच करावा. पण बहुधा असे केल्यास जमत नसावे कारण फक्त धोबीघाट असणारी संस्थळे काही काळाने बंद पडतात असे दिसून आले आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या इतर संस्थळांवर धोबीघाट झाला तर चालेल का?
यांची नावे आपल्याला माहीत नसतील यावर विश्वास बसणे कठीण आहे. मुळात सदस्यांचेच पुरेसे लेख आले तर बाहेर जाण्याची गरज पडत नसावी.
बाय द वे, आपले मत = उपक्रमाचे अधिकृत धोरण असे असेल तर कृपया तसे स्पष्ट करावे. त्यामुळे बर्याच गोष्टी सोप्या होतील.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
असो.
माहितीपूर्ण लेखन करीतही कुणाला धुतले जाऊ शकते. आणि चर्चा म्हटले की कधीकधी धोबीघाट होणारच, कोलाहल घडणारच.
तुम्ही बर्याच गोष्टी उगाच कठीण करून ठेवता हो. उपक्रमावर अनेक जण आपली मते मांडत असतात. मी एक उपक्रमप्रेमी म्हणून आपले म्हणणे मांडले आहे, मांडत असतो.
संकेतस्थळ चालविणारा म्हणजे सेवादाता आणि सदस्य म्हणजे ग्राहक ह्या भूमिकेतून उपक्रमाकडे बघायला हवे का? आणि म्हणूनच उपक्रमप्रेमींनी पुढाकार घेऊन उपक्रमाचे संवर्द्धन करायला हवे असे मला वाटते. उदाहरणार्थ, दिवाळी अंकासाठी जसे काही सदस्य नियमितपणे मदत करतात तसे इतर सदस्यही उपक्रमाच्या कामासाठी का पुढे येत नाहीत?
असो. टीका करणे सोपे आहे हे नेहमीचे वाक्य अशावेळी आठवते.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हे
ते वेगळे आणि फक्त धुण्यासाठी चर्चाप्रस्ताव मांडणे वेगळे. उदा. आत्ताचाच मानसिक वाढीवरचा चर्चाप्रस्ताव.
हेच इतर संस्थळांबाबतही म्हणता येईल.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
उपक्रमाचा दिवाळी अंक
दिवाळी अंकाला केवळ सदस्यांपर्यंत मर्यादित करू नये वगैरे ठीक हो पण नेहमीचे लेखक लिहित नाहीत आणि बाहेरच्यांना धरून बांधून आणावे लागते असे वाटले. लेख या सदरात नानावटींचे दोन लेख म्हणजे "प्रियाली भयकथा दिवाळी अंक" याप्रमाणे "नानावटी विवेकवादी दिवाळी अंक" असेही पुढल्या वर्षी अंकाचे नामांतर करता येईल. असो.
बाकी,
उमा पत्की
प्राची देशपांडे
आशिष महाबळ
जाई जोशी
विशाल कुलकर्णी
दीपक पट्टणशेट्टी
महेंद्र भावसार
वैभव कुलकर्णी
यांची उपक्रमी नावे आणि कारकिर्द कळेल काय? आम्हा पामरांवर उपकार होतील की ही खास विवेकवादी फौज आहे?
दिवाळी अंक
दिवाळी अंकाला नेहमीच्या लेखकांनी लेख दिले नाहित कारण उपक्रमावर विवेकवादी लेखनाची चलती आहे असे तुमचे आर्ग्युमेंट आहे काय?
असे लिहिले तर नाही
मी फक्त दिवाळी अंकाला लेख आले नाहीत एवढेच लिहिले आहे, आपल्याला तसे वाटले असल्यास नाइलाज आहे.
असहमत
भविष्यकथनाचे समर्थन करणारा कोणताही लेख किंवा चप्र गेल्या वर्षभरात त्या समुदायात प्रसिद्ध झालेला नाही*. तो समुदाय काढून न टाकण्यामागे टीआरपीची काळजी हे कारण नसून उलट, "आम्ही कोणत्याही विषयाची माहितीप्रद चर्चा करण्यास तयार आहोत" ही संस्थळाची भूमिका त्यामागे असावी असे वाटते.
* समर्थन करणारे शेवटचे लेखन
हे आहे.
भूमिका
संस्थळाची भूमिका काय आहे याबद्दल मलाही उत्सुकता आहे.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
विवेकवादी लेखन
आरागॉर्न यांचे निरीक्षण योग्यच आहे.
याचबरोबर चित्रा यांचे विविध विषयांवरील लेख, विकास यांचे पर्यावरणावरील लेख, कोलबेर यांची छायाचित्रे, यनावालांच्या तर्कक्रिडा, चित्तरंजन यांचे भाषाविषयक लेख, शरद यांचे पौराणिक कथांवरील लेख असे लेखांचे स्वरुप असे.
नंतर काही मान्यवरांनी विवेकवादाची झूल पांघरली. ;-) अशा झूली पांघरल्या की अचानक श्रेष्ठत्वाची भावना मनात येते की काय कोणजाणे पण मग सिलेक्टीव रिडींग करणे, विवेकवादी असे लेबल लावलेल्यांच्या पाठी डोळे बंद करून थोपटणे*, आपल्या सोकॉल्ड विवेकवादी कंपूमध्ये जॉईन होऊ न पाहणार्यांना त्रास देणे, स्कोर सेटलिंग करणे, आपला मुद्दाच बरोबर असे दाखवण्यासाठी कीस पाडत राहणे** वगैरे विवेकवादी कार्यवाह्या*** सुरु झाल्याने उपक्रम फक्त चर्चेच्या जिलब्या पाडण्या इतपत मर्यादित झाले. अनेक लोकांचा उपक्रमातील इंटरेस्ट निघून गेला असण्याचीही शक्यता आहे. निदान मला तरी हल्ली इथे काही नवे लिहिण्याचा कंटाळा येतो.
* वसुलिंचा या चर्चेतील उल्लेख.
**कीस पाडण्यावरून आठवले की पूर्वी उपक्रमपंत आपल्या स्वतःच्या संकेतस्थळावर हजर असत तेव्हा ते उपक्रम हे साधन आहे साध्य नाही वगैरे सांगत. त्यावेळी लोक कीस पाडत राहण्यापेक्षा स्वत्ंत्र लेख लिहून आपले मुद्दे मांडत. परंतु नंतर कीस पाडत राहणे आणि आपल्याकडे वेळ आहे म्हणून इतरांच्या वेळेचा अपव्यय करत राहणे भूषणावह मानले जाऊ लागले. अशावेळी राष्ट्राची समृद्धी वगैरे लक्षात घेतली जात नाही. ;-) आता उपक्रमाचे ब्रीदवाक्य बदलण्याची गरज आहे असे मलाही वाटते. "कीस बाई कीस दोडका कीस"असे करावे.
*** इतर संकेतस्थळांवर वाह्यात टीका हा ही विवेकवादी अजेंडा असल्यास कल्पना नाही.
?
'विवेकवादाची झूल', 'सिलेक्टीव रिडींग', 'विवेकवादी असे लेबल', 'सोकॉल्ड विवेकवादी कंपू' या शब्दप्रयोगांना माझा आक्षेप आहे कारण ते आरोप माझ्यावरही केलेले असू शकतात. अन्यथा कृपया अप्रामाणिक/नकली विवेकवाद्यांची नावे सांगा.
विवेकवादी नसलेल्यांची टिंगल करण्यात काय चूक आहे?
'कीस पाडणे' म्हणजे काय? एकमत होईपर्यंत चर्चा संपूच कशी शकते?
आक्षेप
यांना आरोप नाही आक्षेप समजा. सिलेक्टिव रिडींग कोण करते हे आधीच्या चर्चेत लिहिले आहे. आपण आपल्याला लावून घेऊ नये कारण आपण ज्या नावाने आलात त्याच नावाने वावरता असे दिसते किंवा आपण इतिहासात ज्या प्रकारचे लेख टाकत होता ते सोडून घूमजाव केले आहे* असेही दिसत नाही.
टिंगल किती मर्यादेपर्यंत करावी हे ठरवणे आवश्यक आहे आणि पूर्वी तशा मर्यादा होत्या. टिंगल काय दोन्ही बाजूंनी होते आणि ती तशी झाली की फक्त वैयक्तिक स्कोर सेटलिंग उरते. मी विवेकवादाची झूल पांघरली तर मला टिंगल करण्याचे लायसन्स मिळाले अशी धारणा मला चुकीची वाटते. अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे.
मुद्दे घेऊन संदर्भाने प्रतिसाद तिरपे जात असतील तर ठीक पण मुद्दे नसताना हमरीतुमरीवर येणारे प्रतिसाद संपादित होताना दिसले असतीलच. उपक्रम हे साधन आहे साध्य नाही या वक्तव्याचा उल्लेख यासाठीच केला आहे. आजही ५० वर प्रतिसाद गेले की फक्त शिमगाच सुरु असतो. ज्याला यना म्हणतात की विवेकवादी लेखांचे वाचन येथे मोठ्या प्रमाणात होते. असो. "मोडेन पण वाकणार नाही" हा बाणा दाखवणारे एकमतावर येणे कठिण वाटते.
* हे यनांसाठी नाही.
असहमत
ह्या सगळ्यांच्या कोणत्या लेखावर विवेकवाद्यांनी हल्ला केला आहे ते कृपया कळेल का?
विवेकवाद म्हणजे काहीतरी वाईट असे गृहित धरुन वरील प्रतिसाद लिहिला आहे. वर उल्लेखलेल्या लोकांच्या लेखांबरोबरच इथे, नाडी, सनातन प्रभात, राष्ट्रव्रत, होमिओपथी असले लेखही येतात/यायचे. ज्यात मांडलेले विषय हे विवेकाला, तर्काला बासनात गुंडाळणारे असतात. अशावेळेस उपक्रमावर विवेकवादी लेखकांची संख्या इतर स्थळांच्या तुलनेने जास्त असल्याने 'फ्रिक्शन' हे होणारच. इथे जे कोणी असे तथाकथीत विवेकवादी आहेत त्यांनी अश्या विषयांवरच वाद घातलेला दिसतो. इतर सकस लेखनावर धुरळा उडलेला माझ्या तरी पहाण्यात नाही. अगदी नुकतेच उदाहरण म्हणजे "भारतीय एकस्व कायद्याची ओळख: भाग १" हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद.
ह्यामधे वर उल्लेखलेले
दिसते आहे का?
माझे मत
सहमत. अतिशय उत्तम रित्या आणि थोडक्यात आपण विचार मांडले आहेत. धन्यवाद.
अ) लेखन विषय मार्गदर्शन ब) लेख/प्रतिसाद संपादन करणारे संपादक (मंडळ) क) बीजसदस्यांचा सहभाग. ड)उपक्रमचे प्रथमदर्शनी स्वरूप आकर्षक नसणे. इ) सदस्यांच्या सहभागावरचे नियंत्रण.
मी स्वतः खालील कारणासाठी उपक्रमचे सभासदत्व घेतले.
१. उपक्रमचे प्रथमदर्शनी स्वरूप "लौकिकार्थाने" आकर्षक नसणे. माझासाठी तेच आकर्षण आहे(निदान इथे)
२. मला भावणाऱ्या मुद्द्यांवर बऱ्यापैकी तार्किक आणि माहितीपूर्ण लेखन.
३. येथील सभासदांची माहितीची व्याप्ती आणि समजावून सांगण्याचे कौशल्य.
४. काहींची तार्किक खुमखुमी.
हे विधान लिहिताना किवा विचार करताना उपक्रमची बरोबरी बाकी समांतर अशा संस्थालांबरोबर साहजिकपणे होते, अन्यथा इथे विवेकवादी लेखन चालते हे विधान आयसोलेशन मध्ये करता येणार नाही. किमान विवेकवादाची व्याख्या करावी लागेल ;)
संपादक मंडळ त्याची योग्य काळजी घेत आहेत असे माझे मत आहे.(नियमाचे अपवाद सोडून :))
तिमाहीत १ लेख
उपक्रमप्रेमींनी उपक्रमावर अधिकाधिक माहितीपूर्ण लेखन करायला हवे. प्रत्येक सक्रिय सदस्याने (कुठल्याही टोपणनावाने) दर तिमाहीत किमान एक माहितीपूर्ण लेख दिल्यास कसे?
तसेच अधिकाधिक विवेकवादी लेखन उपक्रमावर होते आहे ही माझ्यामते चांगलीच गोष्ट आहे.वितंडवादात न पडण्याचा पर्याय हा प्रत्येक लेखकाकडे, सदस्याकडे असतो. ज्या वितंडवादात पडायची इच्छा आहे किंवा पडणे झेपते त्याच वितंडवादात पडावे असे माझे मत आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
साईड-बाय-साईड एखादा विषय
साईड-बाय-साईड एखादा विषय निवडून त्यावर निबंध (मराठीत - पेपर) लिहीण्यास सदस्यांना सुचवावे. दर महीन्याला वेगळा विषय व आगामी महीन्याचा विषय आगावू दिल्यास, सदस्यांना अभ्यास करुन निबंध लिहीता येतील.
इतर नेहमीच्या पद्धतीचे लेखन चालूच रहावे; त्याने काही सद्स्यांची शक्ती खर्च पडणे आवश्यक असते, ते होते.
वितण्डा
ज्या वितंडवादात पडायची इच्छा आहे किंवा पडणे झेपते त्याच वितंडवादात पडावे असे माझे मत आहे.
वितंडवाद शब्द आज आपण नाहक युक्तिवाद या अर्थाने वापरतो. पण त्याचा मूळ अर्थ जो (श्रुती स्मृती) शब्दप्रामाण्य नाकारतो वा चार्वाक/लोकायत वादी. लोकांनी एकदा शब्द प्रामाण्य नाकारले की त्यांच्याशी वाद घालायला पूर्वी मुद्देच उरत नसत. त्यामुळे तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही कारण तू वितंडवादी आहेस. पुढे हेच नाव नाहक (गोलाकार, किंवा तोच तोच) युक्तिवादासाठी वापरू लागले आहे.
कदाचित आजच्या विवेकवादी आक्षेपांमुळे पुढे त्याही (विवेकवादी) शब्दाची तीच स्थिती होईल. :)
प्रमोद
प्रतिसादलेखन
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
विविध विषयांवरील माहितीपूर्ण असे उच्चस्तरीय (उच्च दर्जाचे) लेख हे या संकेत स्थळाचे वैशिष्ट्य आहेच पण त्याचे खरे बलस्थान मूळ लेखाला धरून केलेले अभ्यासपूर्ण प्रतिसादलेखन आहे हे श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांचे निरीक्षण अगदी पटण्यासारखे आहे.तुलना करू नये, पण अन्य संस्थळांवरील दीड ओळीचे उडते प्रतिसाद बरेचदा निरर्थक वाटतात.
या संस्थळावर विवेकवादी लेखनाची चलती आहे असे श्री.प्रमोदजी म्हणतात तेही खरे आहे. विवेकवादी लेखनावर कांही सदस्य आक्षेप घेतात ,त्यांना असे लेख आवडत नाहीत असे असले तरी विवेकवादी लेख वाचणार्या वाचकांची संख्या मोठी आहे असे दिसते.
विवेकवादाचे अतिक्रमण
आता अतिक्रमण विवेकवादाचे आहे कि विवेकवाद्यांचे हे कस काय ठरवणार बुवा! अविवेक आहे म्हणुनच विवेकवादाला एवढ मह्त्व दिल जातय. असो
प्रकाश घाटपांडे
गेले ते दिन गेले
चर्चा वाचली. अनेक मुद्दे विचार करण्यालायक आहेत. काही प्रतिसादांतून 'गेले ते दिन गेले' असा सूर लागतो आहे, ज्याच्याशी पूर्ण असहमत आहे. गेल्या महिन्याभरात उपक्रमावर (काही अपवाद वगळता) अनेक चांगले लेख-चर्चा वाचायला मिळाल्या आहेत. तुलनेने उपक्रमावर पुर्वी येणार्या लेखांपेक्षा नवे लेख अधिक ससंदर्भ व काटेकोर वाटतात. माझ्या मते हे प्रगतीचे लक्षण आहे.
_____
डोन्ट क्रिटिसाइज व्हॉट यु डोन्ट अंडरस्टँड
गेले
अनेकदा आपण जुने झालो आहोत या भावनेने गेले ते दिन गेले असा सुरु येतो :)
माझे मत गेले ते दिन गेले असे नाही.
सहमत. पण याच सोबत एक विषय अनेक संकेतस्थळावर टाकून गंमत पाहणे हा सुद्धा एक प्रकार वाढतो आहे.
सहमत आहे
सहमत आहे.
वाचने
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रियाली म्हणतातः
"....५० वर प्रतिसाद गेले की फक्त शिमगाच सुरु असतो. ज्याला यना म्हणतात की विवेकवादी लेखांचे वाचन येथे मोठ्या प्रमाणात होते. "
तर तसे नाही.माझ्या प्रतिसादात लिहिले आहे:
"विवेकवादी लेख वाचणार्या वाचकांची संख्या मोठी आहे असे दिसते."
ज्या लेखाची वाचने १०००+ झाली त्या लेखाला मोठी वाचकसंख्या लाभली असे मला वाटते. माझा हा समज चुकीचा असू शकेल.
चुकीचा नाही पण... (अवांतर प्रतिसाद)
हा समज चुकीचा नाही पण अतिशयोक्तीपूर्ण असू शकतो. याचे कारण लेखाचे वाचन + प्रतिसादांचे वाचन मिळून हजार वाचने झाली असे ते असते.
उदा. आपला लेख आणि त्यावर आलेले प्रतिसाद हे १० लोक वाचतात तेव्हा लेखाची एकूण वाचने ११ दिसतात. त्यानंतर एकाने प्रतिसाद दिला आणि तुम्ही आणि इतर ९ जणांनी तो वाचला तर +११ वाचने. म्हणजे एका प्रतिसादानंतर २२ वाचने. त्यातही माझ्यासारखे महाभाग असतात ज्यांना एकावेळेस पूर्ण प्रतिसाद देण्याची कला/ वेळ नसतो. ते थोड्यावेळाने येऊन प्रतिसाद संपादित करतात. काही संपादक असतात, त्या बिचार्यांना ;-) प्रत्येक वेळेस कुणी काय लिहिले हे पाहावे लागते. काही रिकामटेकडे* असतात त्यांना लेखांवर टिचक्या मारल्याशिवाय करमत नाही त्यासर्वांच्या टिचक्या वाचनांत जमा होतात.
ही एक कविता बघा. तिची ३४३१ वाचने झाली आहेत. याचा अर्थ ती कविता लोकांना आवडली असा होत असेल तर कठिण आहे. :-)
बाकी काही नसले तरी यना माझे सर्व प्रतिसाद वाचतात हे कळून चुकले आहे. ;-)
* रिकामटेकडे म्हणजे सदस्य रिकामटेकडे नाहीत. काहीजणांना (विशेषतः पुरुषांना**) टिव्हीची चॅनेल्स टकाटक बदलायची सवय असते. तशीच लेखांवर टिचक्या मारायचीही असते. त्यावेळेस ते फारसे वाचन करतातच असे नाही. उगीच चाळा.
** सर्व पुरुषांची माफी मागते. ;-)
श्री. घासकडवींचे पटण्यासारखे विश्लेषण
मूळ लेखाचे वाचन आणि प्रतिसादांचे वाचन यांचा हिशोब लावायचा प्रयत्न मागे श्री. घासकडवी यांनी केला होता (दुवा : उपक्रमाचे वाचक किती). यातील गृहीत आकड्यांमध्ये थोडे कमीअधिक असू शकते. म्हणून वाचकसंख्येच्या अंदाजात बरेच कमीजास्त होऊ शकते. पण प्राथमिक अंदाजाची पद्धत म्हणून ठीक वाटते.
ओक्के
घासकडवींच्या दुव्याबद्दल धन्यवाद. त्यानुसार,
यनांच्या लेखावर टिचक्या = १०७*२९+६०= ३१६३ (प्रत्यक्षात २०२२) असा फरक दिसला.