उपक्रमचे वाचक किती?

गेल्या सुमारे पंधरा दिवसांच्या (जाने २९ ते फेब १३) उपक्रम वरील लेखनाकडे बघितले असता अनेक लेख, चर्चा यांची वाचने साधारण ५० ते ९०० पर्यंत गेलेली दिसतात. पण एवढे वाचक आहेत का? काही लेखांना, चर्चांना भरमसाठ वाचने दिसतात, तर काहींना अगदी कमी दिसतात. असेही दिसून येते की काही लेखांना, विशेषत: चर्चांना प्रतिसाद देखील अधिक मिळतो. हे लोकप्रियतेचे द्योतक आहे का?
थोडा विचार केल्यावर असे लक्षात येते, की प्रतिसाद व वाचने यांच्यात संबंध आहे - कारण नवीन प्रतिसाद दिसला की अनेक वाचक त्या लेखाचे पान पुन्हा उघडतात. तो संबंध काय व त्यावरून खरोखरच्या वाचकांच्या संख्येची व त्यांच्या वाचनाच्या सवयीची कल्पना येते का, याचा हा आकडेवारीसकट व एका सोप्या मॉडेलनुसार मागोवा...

वाचने व प्रतिसाद यांचा संबंध खालीलप्रमाणे आहे. आलेखात य अक्षावर प्रत्येक लेख/चर्चेची वाचनांची संख्या आहे. क्ष अक्ष प्रतिसादांची संख्या दर्शवतो. प्रत्येक बिंदू हा एक विशिष्ट लेख/चर्चा दर्शवतो.

याचा अर्थ लावण्यासाठी आपण दोन प्रकारचे वाचक गृहित धरू. एक म्हणजे लेख (अथवा चर्चा) एकदाच वाचणारे - वरवरचे वाचक. दुसरे म्हणजे लेख एकदा वाचून न थांबणारे - प्रत्येक नवीन प्रतिसाद उघडून बघणारे - सखोल वाचक. त्यात आणखी एक सोपं गहितक घेऊ - प्रतिसाद हे पुरेशा कमी वारंवारतेने येतात. प्रत्येक नवीन प्रतिसाद वाचायला सखोल वाचकाला वेळ मिळतो. अर्थात प्रत्यक्षात चित्र यापेक्षा थोडं वेगळं असेल, पण या मॉडेलने आपल्याला काही ठोकताळ्याचे आकडे मिळतील.

या रेषेचा चढ २९.३२ आहे. म्हणजे प्रत्येक प्रतिसादाबरोबर सुमारे २९ वाचने वाढतात. याचा अर्थ २९ सखोल वाचक.
रेषेचा य अक्षाला आंतरछेद ८९.२५ आहे. म्हणजे ० प्रतिसाद असताना सुमारे ८९ वाचने होतात. यात २९ सखोल वाचक आलेच. म्हणजे उरलेले ६० वरवरचे वाचक...

यापेक्षा वेगळी गृहितकं घेतली तर आकडे थोडे वेगळे येतील पण फार नाही... बहुधा ते आकडे जास्त येतील, कारण बरेच वारंवार वाचणारे देखील प्रत्येक प्रतिसाद उघडत नसावेत. त्यामुळे सखोलांऐवजी 'मध्यम सखोल' वाचक आहेत असे धरले तर त्यांची संख्या २९ पेक्षा जास्त - ६० च्या आसपास येईल. हा केवळ अंदाज आहे.
(या आलेखामध्ये "मुतालिक" चर्चा घेतलेली नाही, कारण ती आउटलायर आहे... तिला ५० प्रतिक्रिया सुमारे दीड दिवसात आल्यामुळे आपले दुसरे गहितक लागू होत नाही. तिने रेषेचाच चढ बदलू नये यासाठी वगळले आहे. या रेषेच्या गणितापेक्षा तिचा खूपच कमी वाचने -८७५- झाली आहेत. रेषेप्रमाणे ती सुमारे १५०० असायला हवी. पण हे आपल्या चित्राशी सुसंगत आहे.)
दुसरं एक असं दिसतं की प्रतिसाद बहुतांशी १० पेक्षा कमी, किंवा २० पेक्षा अधिक आहेत. २० पेक्षा अधिक असलेल्या बहुतेक चर्चा अगर चित्रावरच्या चर्चा आहेत. हे ध्रुवीय चित्र कदाचित अपुऱ्या डेट्यापायी आले असेल, पण शक्यता कमी वाटते. चर्चांना जास्त प्रतिसाद मिळतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.

Comments

संबंध

एक् शंका.
मी ५ प्रतिसाद झाले असताना पान उघडले तर ते एकच वाचन धरले जात असावे. आणि प्रत्येक प्रतिसादानंतर उघडले तर ५ वेळा वाचन धरले जात असावे. हे लेख प्रकाशित होणे आणि मी उपक्रमावर येणे यातल्या अंतरावर अवलंबून असेल.

म्हणजे मुतालिक धागा मी तीन वेळा उघडला आहे. पहिल्यांदा उघडला त्यापूर्वीच १०-१२ प्रतिसाद आले होते. तेव्हा ते १०-१२ प्रतिसाद एकदम वाचले ते एकच वाचन धरले जात असावे.

म्हणजे वाचने आणि प्रतिसाद यांचा अशा प्रकारचा संबंध वाजवी रीतीने शोधता येईल असे वाटत नाही.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मॉडेलच्या मर्यादा

मी ५ प्रतिसाद झाले असताना पान उघडले तर ते एकच वाचन धरले जात असावे. आणि प्रत्येक प्रतिसादानंतर उघडले तर ५ वेळा वाचन धरले जात असावे.

हे बरोबरच आहे.

याचाच अर्थ माझं मॉडेल जास्त सोपं आहे. ते वाचकांची संख्या आहे त्यापेक्षा कमी दाखवतं. विशेषत: मुतालिकसारख्या चर्चेला तर ते फारच अपुरं पडतं. पण सुमारे १० पर्यंत प्रतिसादांसाठी ते तितकंसं चुकीचं नसावं. पण खरे वाचक हे 'सखोल' पेक्षा 'मध्यम सखोल' जातीचे असावे हे पटतं.

उत्तम

उपक्रमाचे साधारण ५०-१०० नेहमीचे वाचक असावेत असा माझा ठोकताळा होता. तुमचा ग्राफ आणि मॉडेल (आदमासे) पटण्यासारखे आहे. क्ष आणि य यांचा संबंध सकृद्दर्शनी इतका एकरेषीय असावा याबद्दल आश्चर्य वाटले.

मस्त!

@नितिन थत्ते - तुमचे म्हणणे बरोबर आहे. एक गुणक आहे ज्याचा गुणाकार येथे केला पाहिजे. २९*'क्ष' - हा 'क्ष' कसा मापावा याबद्दल सहज कल्पना येत नाही.

एकरेषीय संबंध

मी माझ्या दोन लेखांची वाचने व प्रतिसाद तपासली. ते आकडे असे आहेत.

सोमनाथ मंदिर वाचने 1163 प्रतिसाद 33

धर्मग्रंथ कोणी लिहिले? भाग 1 1360 वाचने 55 प्रतिसाद

या उदाहरणावरून तरी वाचने व प्रतिसाद याचा आलेख एकरेषीय असेल असे वाटत नाही. कदाचित 10 प्रतिसादापर्यंत तो एकरेषीय असावा.
प्रतिसादांची संख्या जास्त असली तर आलेख फ्लॅट होईल असे वाटते.

चन्द्रशेखर

असे नव्हे

कुठल्याही एका लेखाच्या प्रतिसादांचे/वचनांचे गतिमान संबंध (डायनॅमिक्स, खरे तर कायनेटिक्स) बघायला पाहिजे. म्हणजे सोमनाथ लेखातच १ प्रतिसाद असताना किती वाचने, २ प्रतिसाद असताना किती वाचने... ३३ प्रतिसाद असताना किती वाचने असे. ते प्रत्येकी एकरेषीय असेल, अशी माझी कल्पना आहे.

बहुप्रतिसाद मर्यादा

या आलेखाप्रमाणे
वाचने = प्रतिसाद *२९ + ६०
सोमनाथ मंदिर = ३३*२९ + ६० = १०३० (प्रत्यक्षात ११६३)
धर्मग्रंथ भाग १ = ५५ * २९ + ६० = १६६५ (प्रत्यक्षात १३६०)

हे सर्वसाधारण सूत्र आहे त्यामुळे सोमनाथ मंदिरच्या वाचनांची संख्या १५% मध्ये आहे हे नोंदण्याजोगं आहे.

प्रतिसादांची संख्या जास्त असली तर आलेख फ्लॅट होईल असे वाटते.

जेव्हा एखाद्या लेखाला खूप प्रतिसाद खूप वेगाने येतात तेव्हा प्रत्यक्ष वाचने कमी होतात - याचे कारण म्हणजे आपला सखोल वाचकही दोन तीन प्रतिक्रिया एकदम वाचतो. तेव्हा आपल्या म्हणण्याप्रमाणे आलेख कमी चढाचा होईल हे निश्चित. पण त्यात प्रतिसादांचा वेग वाढल्यावर तो आणखी सपाट होतो - मुतालिकची ५० प्रतिक्रियांना 'फक्त' ८७५ वाचने होती.

त्याहीपलिकडे जाऊन विशिष्ट लेखांचे विषय, त्यांच्या मथळ्याची आकर्षकता इ. कारणांमुळे या सूत्रापासून फारकत दिसेलच.

पण एक सर्व साधारण निष्कर्ष काढता येईल की प्रतिसाद कमी वा जास्त - उपक्रम वर सखोल वाचकांचा एक वर्ग आहे जो हटकून जवळपास सगळे वाचतो.

सोमनाथ मंदिरावरून

यावरून पुन्हा रिग्रेशन पळवले. यात चर्चा*प्रतिसाद असे एक इंटरऍक्टिव वेरिअबल घातले. समीकरण पुढीलप्रमाणे:

वाचने = १७८.५२ + १८.९५*प्रतिसाद - ९८.९३*चर्चा + १३.७१*(चर्चा*प्रतिसाद) - ७.५८*लेखमाला

म्हणजे 'सोमनाथ मंदिर' जे चर्चाप्रस्तावात होते त्यामुळे प्रत्येक प्रतिसादामागे वाचनांची संख्या ३२ने वाढते. या समीकरणावरून सोमनाथ मंदिराच्या वाचनांची संख्या ११५८ येते.

धर्मग्रंथ भाग १ माझ्या विदात काही कारणाने नव्हता. पण तो चर्चेचा प्रस्ताव होता असे गृहीत धरल्यास वाचनांची संख्या साधारण १८७१ पाशी येते.

रोचक

रोचक. सखोल व निमसखोल वाचकांची तुम्ही दिलेली संख्या एकंदर योग्यच वाटते आहे. उपक्रमाचे गूगल ऍनलिटिक्सवर खाते असावे. तिथलाही डेटा मिळवून अधिक अचूक व व्यापक निष्कर्ष काढता येतील.

ह्या लेखाच्या निमित्ताने उपक्रमाची उद्दिष्ट्ये पातळ न करता वाचकांची व प्रतिसादांची संख्या कशी वाढवता ह्यावरही चर्चा व्हायला हवी असे वाटते. प्रत्येकाला आपले मत मांडता येईल किंवा मांडावेसे वाटेल असे लेखन झाल्यास वाचने व प्रतिसाद वाढतील. ह्याबाबतीत एखादे छोटेखानी स्टाइल गाइड लेखकांना उपलब्ध करून द्यायला हवे. आणि हे एखाद्या चर्चेच्या माध्यमातून करता येईल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगली सूचना

ह्या लेखाच्या निमित्ताने उपक्रमाची उद्दिष्ट्ये पातळ न करता वाचकांची व प्रतिसादांची संख्या कशी वाढवता ह्यावरही चर्चा व्हायला हवी असे वाटते. प्रत्येकाला आपले मत मांडता येईल किंवा मांडावेसे वाटेल असे लेखन झाल्यास वाचने व प्रतिसाद वाढतील. ह्याबाबतीत एखादे छोटेखानी स्टाइल गाइड लेखकांना उपलब्ध करून द्यायला हवे. आणि हे एखाद्या चर्चेच्या माध्यमातून करता येईल.

चांगली सूचना. सहमत आहे.

आकडेवारी चांगली.

उपक्रमावर आल्यावर मला हजर सदस्य एक किंवा पाच दिसत असले तरी, पाहुण्यांची संख्या दिडशेच्या वर दिसत असते. मला त्याचा खूप आनंद होतो. [ते आपले लेखन वाचतात असे मी समजतो] तिरप्या प्रतिसादांमुळे वाचन संख्या वाढते असा माझा एक ढोबळ् अंदाज आहे.

-दिलीप बिरुटे

सही संपादित केलेली आहे.

उपक्रमाचे वाचक

उपक्रमाचे वाचक २००+ च्या घरात असावेत. उपक्रमाचे नियमित सदस्य जे लेख आणि प्रतिक्रिया वाचण्यासाठी आणि कधी कधी वेळ जात नाही म्हणून माऊस क्लिक करण्याचा चाळा करताना ;-) वाचनसंख्या वाढवतात त्यांची संख्या ३० ते ४० च्या घरात असावी.

(अंदाजपंचे) प्रियाली

वाचन

वाचन आणि हिट्स यांचा संबंध आहे का? हिट्सचा अनुवाद वाचन असा तर केलेला नाही?

छान आलेख

आलेख आवडला. उपक्रमाचे नेहमी लिहीणारे सदस्य साधारण ३०-४० असावेत असा माझा अंदाज होता, या रेषेचा चढ याच्याशी जुळतो.

एक निरीक्षण

आतापर्यंतची आंकडेवारी -
या लेखाचे वाचन (हिट्स) १३७
प्रतिसाद (हा धरून ) १२
गुणोत्तर ११.४

अभिनव आणि रोचक

राजेश, रोचक विश्लेषण आणि अभिनव प्रयोग. मी स्वतःच आत्ता बसल्या बसल्या एक रिग्रेशन पळवले. त्यात चर्चा/लेख, लेखमाला/स्वतंत्र लेख असे डमी बनविले. मी एकूण ६१ लेख-चर्चांचा विदा गोळा केला. मला आलेले समीकरण खालीलप्रमाणे:

वाचने = १३३.६८ + २३.१२*प्रतिसाद + २७.६८*चर्चा - २.७४*लेखमाला

माझा अंदाज होता की लेखमाला असल्यास कमी वाचने होतात पण जरी दिशा बरोबर ठरली तरी परिणाम फारसा मोठा नाही. चर्चांमुळे मात्र वाचनांची संख्या वाढते. (चर्चाप्रस्तावाची लेखापेक्षा साधारणतः २८ वाचने अधिक होतात.) सुरूवातीला विषय (इतिहास, विज्ञान वगैरे) साठीही विदा गोळा करण्याचा प्रयत्न केला पण कंटाळलो.

अवांतर: आजकाल फ्रिकॉनॉमिक्स/ सुपरफ्रिकॉनॉमिक्स असे काही वाचन चालले आहे का?

माझे निरिक्षण

उपपक्रमावर नियमीत लिखाण करणारे सदस्य कमी असले तरी उपक्रमाला फार मोठा वाचकवर्ग आहे असे माझे निरिक्षण आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अलेक्सा

याची काही मदत होते का पहा: http://www.alexa.com/siteinfo/mr.upakram.org/node/1150
(प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहे.प्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहेप्रतिसाद मराठीतच आहे.)

भरपूर वाचक

मी प्रतिक्रिया किंवा लेख क्वचितच लिहितो. माझ्यासारखे अनेक जणही असतील, नव्हे आहेतच हे माझ्या ओळखीच्या काहीजणांमुळे मला माहित आहे. असे कित्येक लोक असतील. त्यामुळे उपक्रमची वाचकसंख्या भरपूर आहे, हे नक्की.
बाकी चर्चेतील गणिती भाग डोक्यावरून गेला.

+१

+१

परिणाम किती?

उपक्रमावर येणारा वाचक/चाळक हा संख्येपेक्षा विषयाच्या व्याप्ती व मर्यादा याकडे अधिक लक्ष देत असावा. उपक्रम या संकेतस्थळाची स्वतःची अशी एक प्रकृती आहे. त्याला मानवेल असाच लिहिणारा व त्याच अपेक्षेने वाचणारा वर्ग इथे आहे.
हिटस ची संख्या व वाचकांची संख्या ही वेगळी आहे. मराठी मासिकाच्या बाबतीत वर्गणीदार व वाचक यांची संख्या वेगळी असते
उपक्रम चे मराठीसंकेतस्थळात एक वेगळे स्थान आहे हे मात्र नक्की
प्रकाश घाटपांडे

वाचक वर्ग

डीडी म्हणतात त्याप्रमाणे,
मी लेख तर नाहीच आणि प्रतिसाद कधी कधी देते. पण नवे लेखन अन् त्यांचे प्रतिसाद यांच वाचन नेहमी करते. फक्त वाचनचा आनंद घेणार्‍यांची संख्या बरीच आहे. त्यामुळे उपक्रमचा वाचक वर्ग भरपूर असावा हे नक्की.

 
^ वर