विचार

अतुलनीय

कारकीर्दीचा सर्वमान्य काळ संपला तरी रंगमंचावरून exit न घेण्याची उदाहरणे अनेक आहेत. बाल गंधर्व, अमूलचे वर्घीस कुरियन, दिल्ली मेट्रोचे ई श्रीधरन, सिने व नाट्य भूमी वरचे काही कलावंत, काही एकल खेळाडू, आणी राजकारणी.

विशेषज्ञांच्या भाकितांची ऐशी तैशी!

कुठल्याही दिवसाच्या कुठल्याही वृत्तपत्रावर ओझरती नजर फिरवा, राशीफलांच्या नेहमीच्या रतीबाबरोबरच कुठल्याना कुठल्यातरी विशेषज्ञांच्या भाकितांचा उल्लेख ठळक मथळ्याखाली वाचायला हमखास मिळतोच.

नवश्रीमंतांचा मंत्रघोष: ग्रीड इज गुड

श्रीमंतांच्या सामाजिक मानसिकतेचाच विचार करत असल्यास दुसऱ्या महायुद्धानंतरच्या 50- 60 च्या दशकापासून आजपर्यंतच्या काळापर्यंत त्यांच्या मानसिकतेत हळू हळू बदल होत गेला आहे, हे लक्षात येईल. स्वत:च्या हिताची काळजी, दान - देणगी - सबसिडी सबझूट, संवेदना - सहानुभूती या अविवेकीपणाची व भिकेच्या डोहाळ्याची लक्षणं, दुर्बलांसाठी हे जग नाही, पैसा हेच सर्वस्व, स्पर्धेतील यशच खरे यश,... इत्यादी गोष्टी आजकाल शिकवाव्या लागत नाहीत; त्या उपजतच आहेत की काय असे जणू वाटत आहे. यांच्या समर्थनार्थ वेगळ्या पुराव्याची गरज नाही, इतक्या त्या स्वयंसिद्ध आहेत हे, काही अपवाद वगळता, प्रत्येकाच्या मनावर बिंबवलेल्या आहेत.

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

उपभोक्ता ग्राहकासाठी पर्यायांची गरज

आपल्यासमोरील अडचणीमधून सुसंगतपणे आणि विचारपूर्वक मार्ग काढण्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा सर्व सुबुद्ध भारतीय नागरिकांनी किरकोळ विक्री क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रवेश देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे असे मला वाटते. भारत सरकारने काही दिवसांपूर्वी, अखेरीस, मोठी राजकीय जोखीम अंगावर घेऊन, या बहुराष्ट्रीय कंपन्यांना किरकोळ विक्री क्षेत्रात त्यांचे मताधिक्य राहील किंवा 51% समभाग त्यांच्या हातात राहतील अशा नवीन कंपन्यांची स्थापना करून या क्षेत्रात प्रवेश देण्याचे मान्य केले आहे.

अंगारकी चतुर्थी

कृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून तो अंगारक. एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्या दिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान. म्हणून अंगारकीची संभवनीयता सात चांद्रमासांत एकदा. म्हणजे साधारणपणे तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी चतुर्थी येते. अंगारकी पौर्णिमा तसेच अंगारकी अमावास्या येण्याची संभवनीयता तेवढीच (३ वर्षांत पाचदा) असते. अंगारकी अधिक मासात येण्याचा योग (संभव) वरच्या संभवनीयतेच्या एक तृतीयांश. म्हणजे ९ वर्षांत ५ वेळां.ती अधिक दुर्मीळ म्हणून श्रद्धाळूंना अधिक महत्त्वाची वाटते.ते म्हणतात "अधिकस्याधिकं फलम्" (कशाला काहीही जोडायचे झाले.) अधिक दुर्मीळ ते अधिक मौल्यवान म्हणायचे तर प्रत्येक दिनांक सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो.कारण तो पुन्हा कधीच येणार नसतो ! आणि ते खरेच आहे.प्रत्येक दिवस,किंबहुना प्रत्येक क्षण ,महत्त्वाचा असतोच.आला क्षण-गेला क्षण.आणि जो गेला तो गेलाच.तो पुन्हा येणे नाही. असो. आपण मंगळवारी येणार्‍या कृष्णचतुर्थीचा पुन्हा विचार करू.

नेटिझन्सचा उर्मटपणा!

संगणक (व संगणकाशी संबंधित मोबाइल फोन, इंटरनेट, लॅपटॉप, वाय फाय, नेटबँकिंग, मोबाइल बँकिंग व इतर सर्व माहिती तंत्रज्ञान सुविधा) माणसांना चांगली माणसं बनण्यासाठी मदत करतात, हे संगणक क्षेत्रातील एका तज्ञाचे विधान आहे. परंतु निदान ब्लॉगोस्फेरमधील अनुभवावरून तरी नेटवरील माणसं उदात्त, शहाणे, संवेदनशील झाले आहेत, याबद्दल शंका घ्यावीशी वाटते. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संगणक आपल्या आयुष्याला व्यापलेले आहे. संगणक निरक्षरता हद्दपार होत आहे. नेट आता प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनत आहे.

अण्णा, काय केलंत हे?

अण्णा हजारे३ ऑगस्ट २०१२ रोजी उपोषणाची सांगता करण्याचा अण्णांचा निर्णय मनाला विषण्णतेचा चटका लावून गेला. असे वाटले कीं अतीशय पूजनीय, साक्षात् त्यागमूर्ती असलेल्या ज्या व्यक्तीला सार्‍या देशाने एका उत्तुंग आसनावर (pedestal) बसविले होते त्या व्यक्तीने सार्‍या राष्ट्राचा आज जणू अवसानघातच केला. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील उपोषणानंतर तर त्यांनी मला "संभवामि युगे युगे" असे अर्जुनाला सांगणार्‍या भगवान श्रीकृष्णाची आठवण करून दिली होती. पण मुंबईच्या त्यांच्या उपोषणाकडे जनतेने केलेल्या दुर्लक्षामुळे मनात शंकेची पाल चुकचुकतच होती.

सिंधू लिपी ते ब्राह्मीची वाटचाल

स्वतंत्ररित्या जगात सर्वात प्रथम लेखनकला शोधल्याचा मान सुमेरियन संस्कृतीला जातो. (या लेखात मेसोअमेरिकन आणि चिनी लिपीचा विचार केलेला नाही.) युरेशियातील अनेक लिपी या सुमेरियन लिपीमुळे उदयाला आल्याचे मानले जाते. सुमेरियन कीलाकार लेखन (cuneiform writing) हे सर्वात आद्य समजले जाते. अर्माइक, ग्रीक, ब्राह्मी, खारोष्टी, इजिप्शियन चित्रलिपी, फोनेशियन, अरबी अशा अनेक लिपी या कीलाकारीवरून व्युत्पन्न झाल्याचे सांगितले जाते पण म्हणून या लिपी कीलाकारीची सख्खी अपत्ये आहेत अशातला भाग नाही. हे कसे ते पाहू. सुमेर संस्कृतीतून लेखनकला सर्वदूर पसरली ती दोन प्रकारे १. नीलप्रत (पुनरुत्पादन) आणि २. कल्पना विसरण (idea diffusion) च्या तत्त्वाने.

ज्यूलीचे चौघडे

साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली.

 
^ वर