शिक्षण
सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना
या वर्षी दुसर्यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे.
आजी - आजोबांच्या वस्तु - ६ (चरखा)
सुप्परमॅन सुप्परमॅऽन .. सुप्परमॅऽऽन.. सुप्परमॅन!
राष्ट्रीय सुट्या
भारताची राज्यघटना समान न्यायाच्या तत्वावर अधारलेली आहे असे रोज कुठे ना कुठे वाचायला, ऐकायला मिळत असते. त्याबरोबरच त्याच घटनेच्या आधाराने दररोज कुठे ना कुठे विषमतेने व्यवहार होतात.
आजी - आजोबांच्या वस्तु - ४ (टाईपरायटर)
काल मी दादाच्या खोलीत बसून कॉम्प्युटरवर मस्तपैकी गेम्स खेळत बसलो होतो. आबा कधी मागे येऊन उभे राहिले कळलंच नाही. माझ्या ३ लेवल्स पार झाल्यावर मी मागे वळून पाहिलं तर आबा अगदी चष्मा लावून स्क्रीनकडे कौतुकाने पाहत होते.
लोकमित्र मंडळ
श्री. धनंजय यांचा लेख वाचून`प्रकर्षाने वाटले की हा लेख अनेकांच्या वाचनात यायला हवा. तेव्हा एक कल्पना तरळली. आता विचारान्ती ती अव्यवहार्य असावी असे वाटते. पण इथे मांडण्यात प्रत्यवाय नसावा.
गृहीतके :
आजी-आजोबांच्या वस्तु - ३ (मोजमापे)
आजी आजोबा आले तेव्हापासुन घरात माझा वेळ मस्त जातो. आधी फक्त टिव्ही बघ, नाहीतर गेम्स, नाहीतर क्रिकेट काहिच नाही नाही तर दादाला त्रास दे आणि तो ही नसला तर अभ्यास यात सगळा वेळ जायचा. आजी आजोबा आले आणि माझं टाईमटेबल बदलूनच गेलं.
सैन्यातून आलेले नागरिक
आजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केलेले व अजूनही करतच असतो.
पल में तोला पल में माशा आणि सत्यनारायणाचा प्रसाद.
सत्यनारायणाच्या प्रसादासाठी सवामण रवा अणि सवा बाराशेर तूप लागले यावरून बर्याच अटकळी मांडण्यात आल्या. शेर आणि मण या परिमाणांत ज्यांनी कधीही काहीही मोजलेले नाही ते तिथेच गारद झाले. ;-) यावरून खालील विषयाची आठवण झाली.
आजी-आजोबांच्या वस्तु - २ (बंब)
मी एकदम खुष होतो. माझे आजी आजोबा गावावरुन येणार होते. त्यांना आणायला बाबा स्टेशनवर गेले होते. मला गावाला जायला फार फार आवडते. तिथे एक गोठा आहे. तिथे बर्याच गायी-म्हशी आहेत. एकदा मी आजीला सांगितलं होतं की आम्ही मुलाला 'गाय' म्हणतो.
आजी-आजोबांच्या वस्तु - १ (जातं)
काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय?