सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना

या वर्षी दुसर्‍यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे. या यज्ञ कालावधित वेगवेगळ्या ठिकाणी सर्व सहभागी लोकांनी मिळून कमित कमी दहा लाख सूर्यनमस्कार करायचे असा या यज्ञाचा निर्धार आहे. दररोज केवळ सात-आठ मिनिटे देऊन सुद्धा आपण सूर्यनमस्काराच्या माध्यमातून निरोगी राहू शकतो याची जाणीव लोकांना व्हावी तसेच व्यायामाची, योगासनांची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू. आम्ही गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी झालो होतो. त्यासाठी आम्ही या संकेतस्थळावरुन चलतचित्रफित उतरवून घेतली होती व त्यासोबतच आम्ही सूर्यनमस्कार करत असू. यज्ञाच्या २१ दिवसाच्या कालावधित सूर्यनमस्काराची जी सवय लागली ती अद्याप अखंडपणे चालू आहे. अगदी भारतभेटीला गेल्यावर तिथे सुद्धा नातेवाईकांसमवेत आम्ही सूर्यनमस्कार करत असू.

या उपक्रमात या संस्थेव्यतिरिक्त अनेक स्थानिक संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मंदिरे, वगैरे सुद्धा सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी तर एका राज्याने तर इतर काही शहरांनी या यज्ञा दरम्यान योग-दिन जाहीर केला होता. आपल्या संस्कृतीचा असा जागतीक प्रसार होताना पाहुन मनाला आनंद तर होतोच शिवाय त्यामुळे इतरांचेही कल्याण होते आहे हे पाहून आत्मिक समाधानही मिळते.

आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा फायदा का करुन घेत नाही?

Comments

डेमो आवडले...

डेमो आवडले

मराठीत डेमो

आम्ही हे पाहून करतो. दोन्हीचे स्त्रोत एकच आहेत असे वाटते.

रावबहाद्दूर्

प्र के अत्रे ( बहुतेक) यांच्या सुर्य नमस्कार नाटकात रावबहाद्दूर् हे एक पात्र अतिसुर्यनमस्कार प्रेमी असतं . " अहो सुर्यनमस्कार घाला !डोळ्याच्या खाचा झाल्या तरी त्यातून बुबुळं उगवतील!"
( लहानपणी सोवळ्याची चड्डि घालून बारा सुर्यनमस्कार घालणारा )
प्रकाश घाटपांडे

पंत प्रतिनिधी

"साष्टांग नमस्कार" हे त्या नाटकाचे नाव होते. ते नाटक औंध संस्थानाचे राजे "पंत प्रतिनिधी " यांच्यावर काढले होते. त्यांनी अत्र्यांबरोबर बसून हे नाटक खो खो हसत बघितल्याचे वाचले होते.

विषयांतरः मला वाटते की ह्याच औंधच्या राजाने स्वतःच्या संस्थानात त्याकाळात शक्य असलेली पण कदाचीत मर्यादीत अर्थाने लोकशाही स्वातंत्र्यपूर्वकाळात आमलात आणली होती. त्यांनीच अनेक गरजू/गरीब पण ज्यांच्यात चमक आहे अशांना विशेष मदत केली होती. त्यातील एक म्हणजे - लक्ष्मणराव किर्लोस्कर (किर्लोस्कर वाडी) आणि दुसरे आठवणारे उदाहरण म्हणजे ग.दि.माडगूळकर.

भास्कराय् नम्

सूर्यनमस्काराचा व्यायाम हा सर्वांग सूंदर व्यायाम आहे. आमच्या नागपूर मध्ये प्रत्येक रविवारी १२ नमस्कार आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने शवासन करण्याची मजा वेगळीच होती.

योगासने, विपश्यना आणि ध्यानधारणा या मार्गाने जग वैश्विक व्हायला हरकत नसावी.

शवासन परिक्षा

प्रत्येक रविवारी १२ नमस्कार आणि त्यानंतर खर्‍या अर्थाने शवासन करण्याची मजा वेगळीच होती.

प्रथम सर्व शवासन परिक्षार्थींनी एक मैदानात वा मोठ्या हॉल मध्ये "शवासनात " जावे. त्यानंतर परिक्षकांनी स्वत:ला पिंज-यात कोंडून एक जिवंत वाघ मोकळा सोडावा. वाघ प्रत्येक शवासनार्थी कडे जाईल् . हुंगुन पाहिल. शव आहे असे समजून पुढे जाईल . तो पास. जर असे झाले नाही तर तो नापास.
(परिक्षक)
प्रकाश घाटपांडे

अखंडता

यज्ञाच्या २१ दिवसाच्या कालावधित सूर्यनमस्काराची जी सवय लागली ती अद्याप अखंडपणे चालू आहे.

हे महत्त्वाचे! माझे आजोबा रोज पहाटे १२ तरी नमस्कार घालीत असत. मीही घालत असे, पण ती सवय नाही ठेवली, ते चुकलेच आहे :-( आता परत सुरू करीन म्हणते!

सुरेख व्हीडीओज्

आणि स्वतःच्या शरीराच्या हेळसांडीबद्दल अंतर्मुख (खरे सांगायचे तर लाजिरवाणे ) करणारे सुद्धा :-)

धन्यवाद केंडेसाहेब. स्कीइंगमधून जगलो वाचलो तर सूर्यनमस्कार घालेन म्हणतो ! ;-)

लय भारी

स्कीइंगमधून जगलो वाचलो तर सूर्यनमस्कार घालेन म्हणतो ! ;-)
--- हा हा हा.
पण स्कीईंग मध्ये एवढा दम नाही की हमखास एखाद्याला ईश्वरभेट घडवून यावी. त्यासाठी रग्बी, मारामारी वगैरे जरा जास्त जंगली खेळ शोधावे लागतील. आणखी एक आहे... न चुकता दररोज पुण्यात ४ तास गाडी चालवा... तुमचा नंबर हमखास लागेल... :))

आपला,
(पुण्यनगरीकर) भास्कर
आम्ही येथे वसतो.

तेच तर म्हणतो

"हमखास" एखाद्याला ईश्वरभेट घडवून यावी
--- अपवादाने येऊ शकते... तेही जर तुम्ही खूप अग्रेसिव/एक्सट्रीम स्कीईंग करत असाल तर!

अवांतर - आम्हाला नाही बॉ शब्दभांडारात नवीन प्रतिशब्द टाकता येत. पण मराठी म्हणने सोडवत नाही हो.

आपला,
(मराठी) भास्कर
आम्ही येथे वसतो.

प्रात्यक्षिक.

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
प्रात्यक्षिकामध्ये जी स्त्री आहे ती पोट(५ वी स्थिती) टेकवतेय. जे योग्य नाहीये. त्याठिकाणी फक्त गुढगे आणि नंतर छाती टेकवायची असते.
अशा तर्‍हेचे चुकीचे प्रात्यक्षिक दाखवणे योग्य नव्हे. त्या प्रात्यक्षिकामधील पुरुष मात्र व्यवस्थित हालचाली करतोय.
खरे तर दोघांच्या हालचालींमध्ये एक समान लय(सिंक्रोनायझेशन) असायला हवी आहे ती दूर्दैवाने दिसत नाहीये.

डेमोचा वापर

भास्कर राव,

डेमो क्लिपस् चा वापर फक्त सूर्यनमस्कार बरोबर घालतो आहोत ना ते पहायला आहे... नाही तर तीच क्लिप परत परत् लावून एका दिवसात मिलीयन सूर्यनमस्कार घातले म्हणून जाहीर कराल :-) (उगाच पी जे सुचला म्हणून...ह. घ्या.)

हा हा हा

नाही तर तीच क्लिप परत परत् लावून एका दिवसात मिलीयन सूर्यनमस्कार घातले म्हणून जाहीर कराल :-)
---बाकी मस्त कल्पना आहे.

आपला,
(मिलीयन सुर्यनमस्कार करू इच्छिनारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

मप्र सरकार चे आव्हान

शनिवारी (विवेकानन्द जयन्ती रोजी) मध्यप्रदेश सरकार ने सर्वानी सूर्यनमस्कार घालावेत म्हणून एक प्रकल्प केला होता, त्या मधे शासनाचे सर्व मंत्री, ऑफिसर, शाळकरी मुले, ह्या सर्वांनी सकाळी ९ वाजता सूर्यनमस्कार घातला, एकूण जवळ-जवळ एक कोटी लोकांनी एकाच वेळी सूर्यनमस्कार घातले (हा गिनिज रिकॉर्ड तर नाही न!) आणि नेहमी प्रमाणे कांग्रेस नी "भाजपा हिन्दू संस्कृति का राजनीतिकरण कर रही है, सूर्य नमस्कार आदि करवाकर ढोंग कर रही है.." आदी ची रेटी लावली...
सुरेश चिपळूणकर
http://sureshchiplunkar.blogspot.com

सूर्यनमस्कारात राजकारण

सूर्यनमस्कारा सारखे चांगले उपक्रम केवळ खाजगी संस्थानीच राबवायचे असतात काय? सरकारनेही अशा जबाबदार्‍या स्विकारायला हव्यात. अशा चांगल्या सवयी जनतेला लावण्यासाठी राजकारण करावे लागले तरी खुश्शाल करावे असे आमचे मत आहे.

आपला,
(सूर्य नमस्कार नियमीतपणे घालणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

शेप अप...

सरकारनेही अशा जबाबदार्‍या स्विकारायला हव्यात.
थोडे अवांतर - पण तरी संबंधीत :)

सिटी ऑफ समरव्हीलने टफ्टस युनिव्हर्सिटबरोबर कोलॅबरेशन मधे "शेप अप समरव्हील" असा कार्यक्रम् चालू केला होता. अर्थातच अमेरिकन स्टाईल मधे बाहेरील अनुदान मिळवून. त्यात लहानमुलांचे आणि मोठ्यांचे स्थूलत्व/जाडपणा (? - ओबेसिटी) कमी करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले. काही अगदी सोपे - म्हणजे समरव्हीलपुरते सर्टीफिकेशन तयार करून जी रेस्टॉरंट्स योग्य प्रमाणात खायला देतील (उगाच अति नाही..) त्यांना "शेपअप" चे पार्टनर्स केले. शाळेत फ्रेंच फ्राईज काढून (पैसे जास्त लागले तरी) भाज्या आणि फळे वाढवली. ऍक्टीव्हीटीज वाढवल्या, काही स्पर्धा, बाइकपाथ, चालायचे मॅपस (कुठून कुठपर्यंत चाललात तर किती चालणे होते याचा अंदाज देण्यासाठी), इत्यादी ज्यातून लोकशिक्षण वाढले आणि स्वास्थ्यासाठी लोकं जागृक झाले. चाईल्डहूड ओबेसिटी (जो अमेरिकेत जास्त प्रकार आहे असे वाटते) तो पण कमी झाल्याचे लक्षात आले.

--------------
Napoleon Bonaparte - "History is the version of past events that people have decided to agree upon."

शेक हँड

अशा प्रकल्पांना समाजाभिमुख करण्यासाठी भारतात तरी शासन व समाज यात एनजीओ नावाचा इंटरफेस लागतो. ते स्वाभाविक पण आहे. भारतात अर्थसंकल्पात अशा प्रकल्पांसाठी वरुन रुपया सुटला कि तळागाळात पोहोचे पर्यंत त्याचे १७ पैसे होतात. असे राजीव गांधी म्हणत. ही तफावत दुर करण्यासाठी एखादा सुर्य जन्मावा लागेल. अशा सुर्याला मात्र
( "सुर्य नमस्कार" न घालता " साष्टांग नमस्कार" घालणार )
प्रकाश घाटपांडे

 
^ वर