राष्ट्रीय सुट्या

भारताची राज्यघटना समान न्यायाच्या तत्वावर अधारलेली आहे असे रोज कुठे ना कुठे वाचायला, ऐकायला मिळत असते. त्याबरोबरच त्याच घटनेच्या आधाराने दररोज कुठे ना कुठे विषमतेने व्यवहार होतात. जात-पात मानू नका असे शाळेत शिकवायचे अन त्याच शाळेतल्या कार्यालयाने संस्कारक्षम कोवळ्या बालकांना त्यांच्या जाती विचारायच्या, जातीची प्रमाणपत्रे मागयाची/द्यायची असला भन्नाट प्रकार चाललेला असतो. जे जात मानत नाहीत त्यांना "अजात" या नव्या जातीखाली टाकण्याचे काम सुद्धा आपल्य घटनेतल्या त्रुटीनेच झाल्याचे सिद्धा झाले आहे. असो.

तर आजचा माझा मुद्दा जरा हटके आहे. मंडल, आरक्षणे वगैरे पेक्षा कदाचित हा मुद्दा कमी महत्वाचा मानला जाऊ शकतो. तो आहे शासनाच्या अधिकृत सुट्यांचा. केंद्र शासनाच्या एका संकेतस्थळावरच्या २००७ च्या सुट्यांचे हे विवरण:

धर्म - सुट्या (दिवस) - लोकसंख्येचे प्रमाण - सुट्यांचे प्रमाण
हिंदू - २ (दसरा, दिवाळी) - ८०.५% - २०% पेक्षा थोडे कमी
मुसलमान - ४ (बकरी ईद, मुहर्रम, पैगंबर जयंती, ईद-उल-फित्र) - १३.५% - ३०%
ख्रिस्ती - १ नाताळ - २.५% - १०% ला थोडे कमी
शिख - १ गुरुनानक जयंती - २% - १०% ला थोडे कमी
जैन - १ महावीर जयंती - ०.५% - १०% ला थोडे कमी
बौद्ध - १ बुद्ध पौर्णिमा - १.५% - १०% ला थोडे कमी
राष्ट्रीय सण - ३ (प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन) १००% - २०% पेक्षा थोडे कमी
एकून सुट्या - १३
टीप -
१. संकेतस्थळावर असलेल्या अमेरिकन सुट्यांना विचारात घेतलेले नाही
२. लोकसंख्येचे प्रमाण तसेच सुट्यांचे प्रमाण हे साधारण प्रमाण आहे. तंतोतंत नाही.

एकतर अधिच शासकीय कामे पटापट न झाल्याने जनतेला त्रास होत असतो. अन त्यात अशा अनेक सुट्यांची भर पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी सामान्यांची अवस्था होत असते. बहुतांशा धार्मिक सुट्या ह्या जनतेला धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी असतात. पण बहुंताश सुट्यांना बहुतांश जनता त्या-त्या दिवशीच्या धार्मिक उत्सवात सहभागी नसते. किती लोक नानक जयंती दिवशी गुरुद्वार्‍यात जातात? अन जे त्या दिवशी जातात ते इतर शीख-सणांना सुद्धा जातात. मग एकाच सणाला सुटी का?

जर धार्मिक/उत्सवांना सणांना सुट्या द्यायच्या आहेत तर मग त्या लोकसंख्येच्या आधारावर का नको? लोकशाहीत सगळे काही लोकसंख्येच्या बळावर असते मग सुट्याच का नको? दोन-तीन करोड लोकांच्या समुहासाठी सुटी द्यायची तर मग वर्षात किमान १०० सुट्या आणखी द्याव्या लागतील. आषाढी एकादशीला तीन-चार कोटी लोक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात ती सुद्धा त्यात आली. शक्य आहेत का १०० सुट्या? नाही ना. मग आमच्या मागण्या ऐका...

उपाय/मागण्या:
१. राष्ट्रीय सणांव्यतिरिक्त जास्तीत जास्त २-३ सार्वजनिक सुट्या ठेऊन बाकी सगळ्या सुट्या बंद कराव्यात.
२. ज्या २-३ सार्वजनिक सुट्या ठेवल्या जातील त्यात बहुतांश जनता साजरी करते अशाच उत्सव/सणांना सुट्या असाव्यात. असे सण म्हणजे दसरा व दिवाळी.
३. इतर धर्मियांच्या भावनांचा अदर ठेवण्यासाठी आणखी काही उपाय योजना कराव्यात. जसे, दिवाळी दिवशी न्यू यार्क शहरात पार्किंग फुकट होती. वगैरे.

Comments

सुट्टी

सुट्टी हा चाकरमान्यांपासून ते मोठ्या मोठ्या व्यक्तींपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय. रोजचं धकाधकीचं जीवन, कष्ट यातून बाहेर पसून वर्षातील काहि दिवस वेगळे घालवता यावेत व त्याच बरोबर चाकोरीबद्ध जीवनात बदल म्हणूनच आराम घडावा हा हेतू. आपल्याकडे आणि जगात बर्‍याच ठिकाणी ज्या दिवशी सुट्ट्या द्यायचं ठरतं तो शक्यतो धार्मिक सण, राष्ट्रीय सण, एखाद्या आदर्श व्यक्तीमत्वाचा / घटनेचा स्मरणदिन या स्वरुपात असतो.
आपण म्हटल्याप्रमाणे हे सुट्ट्यांचे प्रमाण आपणास विषम वाटते. परुंतु ही समानता देखील सापेक्ष आहे, परिस्थिती, प्रांत, भाषा, सण हे सगळं आपल्याकडे काहि अंतरावर बदलताना दिसतं. गावची जत्रा हा राष्ट्रीय सुट्टीचा विषय नसला तरी ग्रामपंचायतीसाठी हा वर्षातील महत्वाचा सुट्टीचा दिवस.
मग सुट्ट्या ठरवायच्या कशा. आता यावर अनेक उपाय सुचवले जातात. त्यातील पुढिल ३ आपण सुचवले आहेत. व स्पष्ट सांगायचं तर ते मला आवडलेले नाहीत :)
१. राष्ट्रीय सणांव्यतिरिक्त जास्तीत जास्त २-३ सार्वजनिक सुट्या ठेऊन बाकी सगळ्या सुट्या बंद कराव्यात.
२. ज्या २-३ सार्वजनिक सुट्या ठेवल्या जातील त्यात बहुतांश जनता साजरी करते अशाच उत्सव/सणांना सुट्या असाव्यात. असे सण म्हणजे दसरा व दिवाळी.

वर सांगितल्याप्रमाणे वर्षातून काहि सुट्ट्या मिळणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठी गरजेचे असते. २-३ सुट्ट्या त्याही बहुसंख्यंच्या हे मान्य होणं लोकशाहीत न्याय्य दिसत नाही. आणि वर्षात केवळ २-३ सुट्ट्या :((( अज्याबात पसंत नाही ;)

३. इतर धर्मियांच्या भावनांचा अदर ठेवण्यासाठी आणखी काही उपाय योजना कराव्यात. जसे, दिवाळी दिवशी न्यू यार्क शहरात पार्किंग फुकट होती. वगैरे.

हा उपाय आवडला आणि प्रत्येक सणासाठी उपयोगात आणत येऊ शकतो.

माझा प्रस्तावः
सरकारने केवळ २ राष्ट्रीय सुट्ट्या जाहिर कराव्यात व प्रत्येक व्यक्तीस उरलेल्या ८ सुट्ट्या लवचिक ठेवाव्यात. (म्हणजे एखाद्या यादितील कोणत्याही ८ सुट्ट्या तो घेऊ शकतो). यामुळे होणारे फायदे असे:
१) कार्यालये केवळ दोन दिवस बंद राहतील
२) प्रत्येकाला आपल्याला आनंद देणार्‍या दिवशी सुट्टी मिळेल
३) कचेरीतील कामे सुरु असल्याने अनेक जण सुट्टीच्या दिवशी देखील कामे उरकू शकतील.

हिच कल्पना पुढे वाढवून "लवचिक रविवार" / "लवचिक सप्ताहांत" राबवल्यास वर्षातील ३६३ (दोने राष्ट्रीय सुट्ट्या वगळून) दिवस कामही होत राहील व सुट्ट्याही मिळतील

-ऋषिकेश

ऋषिकेश शी सहमत

सहमत आहे. फक्त महाराष्ट्र दिन १ मे ही पण महाराष्ट्रात विचारात घ्यावी लागेल. पोलिस खात्यात या सरकारी सुट्ट्या मिळत नाही. त्या आपापसात सांभाळल्या जातात. खात्यातील मिनिस्टरी स्टाफ ला (कारकून) ला मिळत असत. पोलिसांना मिळणे हे संबंधित युनिट वर ते अवलंबून असते. (कार्यपद्धतीमुळे) तसेही प्रतिमहा २० रु हा स्पेशल ड्युटी अलाउन्स मिळतो ज्यामुळे तुम्ही शासनाशी २४ तास बांधील असता. तशा इतर शासकीय कर्मचा-यांपेक्शा पोलिसांना किरकोळ रजा पुर्वी २० आता १२ झाल्या आहेत. ( त्या तुम्हाला हव्या तेव्हा कधीच मिळत नाहित हा भाग निराळा) घरातील किरकोळ कामे ही ड्युटीवरच केली जात. फक्त हेडक्वार्टर सोडताना बाहेरगावी जायला सुटी लागे. काय आज सुटी नाही का? या प्रश्नाने मला कित्येक वर्ष भंडावून सोडले होते.
प्रकाश घाटपांडे

लवचिक सुट्या

ऋषिकेश,

तुझा लवचिक सुट्यांचा पर्याय आवडला. चर्चा प्रस्ताव मांडताना माझ्या पण ते डोक्यात होते पण मांडायचे विसरलो. तू व्यवस्थित मांडल्याबद्दल आभार!

आपला,
(सहमत) भास्कर
आम्ही येथे वसतो.

सुट्ट्या कमी झाल्या पाहिजेत, पण......!

कार्यालयातील सुट्ट्या कमी झाल्या पाहिजेत हे खरे आहे.त्यामुळे कार्यालयातील शासकीय,अशासकीय कामाची गती वाढेल आणि आठवड्याच्या कामाचा आढावा घेऊन कार्यालयीन कामात पारदर्शकता येऊन विकासाचा वेग वाढेल,जनसामान्यांचे प्रश्न सुटतील. आणि २०२० मधे भारतीयांनी खूप-खूप प्रगती केलेली असेल. रविवार सोडून कोणत्याच सुट्ट्या देऊ नये. फक्त, १ जानेवारीला सुटी दिली पाहिजे, थर्टी फस्ट साजरा करुन लोकांना उठायला उशीर होतो, तितका एक दिवस ठीक आहे. !!!
पण, अधिक कामाने माणूस यंत्र होईल. त्यात विकृती येईल आणि असंख्य प्रश्नही त्या निमित्ताने निर्माण होतील.
पण,
भास्करराव,
हे झाले सामाजिक विचार. पण, जीथे नुसते काम-काम आणि फक्त कामच आहे. त्या लोकांचाही आपण विचार केला पाहिजे. वयक्तिक आयुष्याच्या रंगमंचावर त्याला अनेक सोंगे करावी लागतात. तेव्हा त्यालाही वेळ द्यावा लागतो. लग्न, मुलांच्या शाळेला भेटी, वयोवृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात भेटायला जाणे, घरी असतील तर दवाखान्यात घेऊन जाणे, घर बांधणे, विकत घेणे, पैशाची जमवाजमव करणे, बायकोला हौशीने फिरायला घेऊन जाणे,गणगोत,कोर्टबाजी, भाऊबंदकी, शेती-वादावादी, बॉसचा त्रास, मित्राची फसवेगिरी, इतर लफडी, बारवर दोनतीन पेग रिचवणे,कर्ज करणे, फेडणे. .....या आणि इतर गोष्टीसांठी एका रविवारच्या सुटीत अनेक गोष्टींचे नियोजन होऊ शकत नाही. त्याला वेळ कमी मिळेल... म्हणुन ही सर्व कामे, धार्मिक सुट्ट्यांना जोडून होतात, असे आमचे मत आहे. तेव्हा त्यात कपात करु नये असे वाटते !

कपात नव्हे लवचिक सुट्या

हो, कपात वैयक्तिक सुट्यांत नको. पण त्यांना ऋषिकेश म्हणतो तसे लवचिक केल्यास सर्वांनाच फायदा होईल. मला ईद वा ख्रिसमसच्या सुटी ऐवजी आषाढीला सुटी मिळाली तर जीवनात एकदा तरी वारीचा आनंद (भक्त नव्हे, उत्सुकता म्हणून) घेता येईल.

आपला,
(तटस्थ) भास्कर
आम्ही येथे वसतो.

अयोग्य तुलना..

भास्करराव,

आपण सुट्ट्यांची यादी घेतली आहे ती अमेरिकेतील भारतीय वकिलातीची आणि लोकसंखेचे प्रमाण घेतले आहे ते भारताचे. मला वाटते ही तुलनाच अयोग्य आहे. भारतात केवळ दोन हिंदू सणांच्या सुट्ट्या आहेत हे पटत नाही. किमानपक्षी महाशिवरात्री, जन्माष्टमी, गणेशचतुर्थी, पोंगल, ओणम इ. भारतात मिळणार्‍या राज्यवार सुट्ट्या आपण लक्षातच घेतल्या नाहीत. त्या घेतल्यात तर आपली टक्केवारी नक्कीच बदलेल.

असो, मूळ मुद्दा भारतात मिळणार्‍या भरपूर सुट्ट्यांचा! त्याबाबतीत वर हृषिकेष यांनी सुचवलेली लवचिक सुट्ट्यांची योजना मनाला पटते.

(कामसू) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

का बरे ?

मला वाटते ही तुलनाच अयोग्य आहे.
--- का बरे. अमेरिकेत आल्यामुळे भारतीय हिंदूंचे हक्क कमी होऊन मुसलमानांचे वाढतात की काय? येथे चार मुस्लीम सणांना वकिलात बंद ठेवणे अयोग्य वाटते.

तुम्ही म्हणता तसे मी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर सुट्या शोधल्या. पण सापडल्या नाहीत. ह्या सुप्रिम कोर्टाच्या सुट्या पहा. तेथे सुद्धा मुस्लीम सुट्या ह्या लोकसंख्येच्या प्रमाणात जास्तच आहेत.

येथे काही संकेतस्थळांची यादी आहे पण कुठेही सुट्या ठळकपणे दिसत नाहीत. सवड काढून बघतो एकदा.

आपला,
(भारतीय) भास्कर
आम्ही येथे वसतो.

आहे ते छान आहे!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================
अहो सुट्ट्या कमी करण्याच्या अप्रिय मुद्याला कशाला हात घालता? त्याऐवजी जे काही कामाचे तास सद्यस्थितीत आहे तेच राहू द्यावेत.मात्र त्या कामाच्या तासांत निव्वळ कामच कसे होईल हे पाहावे. त्यासाठी जरूर प्रयत्न व्हायला हवा. अशा तर्‍हेने काटेकोरपणे हे कामाचे तास पाळले तर कामे वेळच्या वेळी होतील आणि सुट्ट्या जास्त आहेत म्हणून कुणी ओरडणार नाही.
आपल्याकडे 'देंगे,दिलायेंगे' असल्या प्रकारची दफ्तर दिरंगाई असते. तिचे उच्चाटन केल्यास बराच चांगला फरक पडेल.

सुट्ट्या, कशाला महत्व आणि झी टिव्ही

भास्कर रावांचा मुद्दा एक-दोन वर्षांपूर्वी कॉन्स्युलेटच्या कामासाठी त्यांची वेबसाईट पहाताना लक्षात आला होता. तेंव्हाही तो कुठल्याही अर्थाने चूक वाटला. एक तर वर हृषिकेश यांनी म्हणल्याप्रमाणे अमेरिकेत भारतीय कॉन्स्युलेटने धार्मिक सुट्ट्यांसाठी चॉईस द्यायला हवा. धार्मिक सुट्ट्या देताना पण समानता येणे गरजेचे आहे. विचार करा की आज अमेरिकेत वर सांगीतलेल्यापैकी कुठल्याही सुट्ट्या मुस्लीमधर्मियांना मिळतात का? तसे म्हणाल तर अमेरिकेत एक ख्रिसमस सोडलात तर धार्मिक सुट्टीपण दिली जात नाही. भारतीय सुट्ट्यांमधे पण (देशभरच्या सुट्ट्या, राज्यांच्या नाही) दिवाळी हा सण धार्मिक म्हणण्यापेक्षा सांस्कृतिकच जास्त वाटतो आणि तेच विशेष करून बंगाल सोडल्यास दसर्‍याबद्दल... थोडक्यात उगाच एकाला जास्त महत्व देणे योग्य वाटत नाही - या संदर्भात मुस्लीम धर्मीय सुट्ट्यांना सार्वजनीक करण्यास(म्हणजे अमेरिकेत भारतीय वकीलातीत काम करणार्‍या सर्वधर्मियांस). एखाद्या मराठी कर्मचार्‍याच्या घरी जर गणपती असला तर जसा तो/ती सरळ सुट्टी घेऊ शकते. एखाद्या मुस्लीम अमेरिकनला जशी त्याच्या कामातून सणा/"हॉलीडे"साठी अमेरिकन एम्प्लॉयर सुट्टी देतो (अगदी आपल्याला / हिंदूंना पण "हॉलीडे" असल्यास सुट्टी घेता येते) तसेच सगळ्यात चांगले "धार्मिक सुट्ट्यांसंदर्भात - असे वाटते. आता असे म्हणणे म्हणजे "मुसलमानांच्या विरोधात" आहे असे कुणाला म्हणायचे असेल तर ते जरा अतीच होईल...

आता थोडे विषयांतर पण त्यातून ज्या "मानसिकते"बद्दल भास्करराव बोलत आहेत तोच विषयः

झी टिव्ही अमेरिकेत संध्याकाळी ६:३० (इस्टर्न टाईम) हिंदी बातम्यात शेवटी हवामान अंदाज जगभरच्या महत्वाच्या शहरांबद्दल दाखवण्यात येतो. कुठली असतील ही शहरे? - न्यू यॉर्क, लंडन, पॅरीस, इस्लामाबाद आणि कराची. - पहीली तीन नक्कीच ठिक आहेत. अगदी इस्लामाबाद पण राजधानी म्हणून ठीक आहे, पण जे चॅनल विशेष करून भारतीयच पहातात, जे चॅनल हे भारतीय आहे त्यांना दिल्ली चे हवामान सांगता येत नाही? - मुंबई, कलकत्ता, चन्नई विसराच, बंगलोरचा अर्थातच संबंध नाही...त्यावर न्युयॉर्क-वॉशिंग्टनच्या काही लोकांनी तक्रार केली. तर झी टिव्हीने काय करावे? - हवामान अंदाज सांगणेच बंद केले.

अमेरिकेच्या मते

अमेरिकन जनतेच्या मते भारत आणि हिंदुधर्म अस्तित्वात नाहीत. अमेरिकेत असताना तीन महिन्यांच्या काळात फक्त दोनदा भारतातली बातमी वाचायला मिळाली. एक बातमी एका हुंडाबळीची होती आणि एक हर्षद मेहताने नरसिंहरावांना एका सूटकेसमधून एक कोटी रुपये दिले त्या वेळची. हिमालय इतका उंच आहे तर तो तुमच्या मुंबईतून नक्की दिसत असला पाहिजे अशी खात्री एका अमेरिकन शाळाशिक्षकांनी माझापाशी व्यक्त केली होती. तेव्हा अमेरिकेतल्या झी टीव्हीला दिल्ली माहीत नसल्यास आश्चर्य नाही.--वाचक्‍नवी

सुट्ट्या

ज्या सुट्टीच्या काळात देशातली किंवा राज्यातली बहुसंख्य जनता उत्साह साजरा करते त्याच सुट्ट्या असाव्यात. आणि त्या जवळजवळ तशाच आहेत. दसरा बंगालमध्ये, दिवाळी तामिळनाडू, पंजाब आणि केरळ सोडून सर्वत्र; मकरसंक्रात महाराष्ट्र आणि दक्षिणी भारत, वैशाखी पंजाब; गणेश चतुर्थी, अनंत चतुर्दशी, आषाढी/कार्तिकी एकादशी आणि शिव जयंती महाराष्ट्र; महाशिवरात्र, रामनवमी, जन्माष्टमी, नारळी पोर्णिमा, ईद, नाताळ आणि इतर जन्मोत्सव भारतभर . त्यामुळे सुट्ट्य़ा धार्मिक आहेत हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही. --वाचक्‍नवी

सुट्ट्या

भारताने बौद्धपौर्णिमेच्या दिवशी पोखरण येथे अणुचाचणी केली, त्यावेळी "सरकारी सुट्टीच्या दिवशी सरकारने अणुचाचणी कशी काय केली?" असा विनोद सांगितला जाई.

खाजगीकरणाच्या रेट्यात अनेकवेळा सरकारी सुट्ट्यांचा वेगळा विचार मांडला जातो. जसे पोष्टखात्याला रविवारी सुट्टी का? कारण ते एक सेवा पुरवणारे खाते आहे. हे खाते तर २४*७ पध्द्तीने चालवावे.

सरकारी कार्यपद्धतीत एवढी गुंतागत असणार की सरसकट नियम करणे अवघड. त्याचा नमुना म्हणजे, सहाव्या वेतन आयोगाच्या कार्यकक्षेत सरकारी सुट्ट्या कमी करण्याचा व कार्यकालीन आठवडा ६ दिवसांचा करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीत या प्रस्तावावर प्रतिसाद मागण्यात आले. अनेक शासकीय कर्मचारी संघटनांचे प्रतिसाद भारतीय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ते सारांश रूपाने.

अखिल भारतीय मध्यवर्ती कौन्सिल (?) कामगार संघटना: कर्मचार्‍यांमध्ये इतर धर्मीयांच्या धार्मिक भावनांची जाणीव उत्पन्न व्हावी म्हणून सर्व धार्मिक सुट्ट्या अजिबात रद्द करू नयेत. इ....( धार्मिक सहिष्णुता फक्त सुट्ट्यानी साध्य होत असेल तर हा उपाय खाजगी आस्थापनांमध्ये देखील सुरू करावा )

दोन संघटनांच्या मते धार्मिक सुट्ट्या रद्द कर्‍याव्यात व त्या ऐवजी नैमित्तिक रजा वाढवाव्यात आणि त्या नैमित्तिक रजा तीन वर्षांपर्यंत वापरण्याची मुभा द्यावी. १मे व २३ जानेवारी (नेताजी सुभाषचंद्रांचा जन्मदिन) राष्ट्रीय सण म्हणून गणले जावेत.

लवचिक सुट्ट्यांची योजनाही एका कर्मचारीसंघाने केली आहे.

सरकारी प्रशासकीय कार्यालयांना ५ दिवसांचा आठवडा आहे, इतर कार्यालयांना ६ दिवसांचाच आठवडा आहे. रेल्वे इंजिन चालकांना आठवड्यातील सुट्टी म्हणून निश्चित असा दिवस नसतो. रेल्वे इंजिन चालकांच्या मतानुसार ६ दिवसांचाच आठवडा.असावा व नैमित्तिक रजा वाढवाव्यात.

तर एका संघटनेने ५ दिवसांचा आठवडा केल्याने उर्जा बचत होते हे सिद्ध झाले असल्याचा दावा केला आहे. तर सांख्यिकी विभागाने ५ दिवसांचा आठवडा केल्याने कर्मचार्‍यांची efficiency (? मराठी शब्दासाठी आहे. गैरसमज नसावा ) वाढल्याचा निष्कर्ष काढला आहे.

तर कानपूरच्या एका निवृत्त कर्मचारी संघानेतर प्रमुख सणाला लागून लगेचच्या दिवशीपण सुट्टी द्यावी, त्याने कर्मचारी आनंदाने सुट्टी साजरी करतील व प्रसन्न मनाने कामावर येतील अशी गोड मागणी केली आहे.

तुम्ही म्हणता तसे मी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर सुट्या शोधल्या. पण सापडल्या नाहीत.

या गुंतागुंती मध्ये कोणती यादी द्यावी हे ठरवणे सुद्धा अवघड आहे. पण "कॅलेंडर" दुवा निवडल्यास, तेथे सरकारी दिनदर्शिकेवर सुट्ट्या दिसतात.

बाकी नुकतीच घडलेली घटना. या वर्षी १ जाने. २००७ ला "बकरी ईद" निमित्त बँकांना सुट्टी होती. तर २१ डिसेंबरला "बकरी ईद" पुन्हा आली. आता एकाच निमित्तासाठी एका वर्षात दोनवेळा सुट्टी कशी मिळ्णार? तरी २१ डिसेंबरला "बकरी ईद" निमित्त सुट्टी जाहिर केली.

आपण कितीही तार्किक दृष्ट्या सुट्ट्यांबाबत विचार करत राहिलो तरी नियमाला अपवाद राहणार

असे होणारच!

बाकी नुकतीच घडलेली घटना. या वर्षी १ जाने. २००७ ला "बकरी ईद" निमित्त बँकांना सुट्टी होती. तर २१ डिसेंबरला "बकरी ईद" पुन्हा आली. आता एकाच निमित्तासाठी एका वर्षात दोनवेळा सुट्टी कशी मिळ्णार? तरीसुद्धा २१ डिसेंबरला "बकरी ईद" निमित्त सुट्टी जाहीर केली. मुसलमानी वर्ष चांद्रवर्ष असते. त्यात २९.५*१२=३५४ दिवस असतात. त्यामुळे एका इंग्रजी वर्षात एखादा मुसलमानी सण दोनदा येऊ शकतो. बंगालमध्ये आणि दिल्‍लीत दसर्‍याची सुट्टी दोन दिवस असते, त्यातला एक दिवस रविवार आला तर एक कमी होते. तसेच हेही.--वाचक्‍नवी

 
^ वर