विज्ञान

शरद ऋतूतील नवी पालवी

या वर्षी आम्ही घराच्या अंगणात ब्रॅडफोर्ड पेअर ही झाडे लावली. या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे झाड पांढर्‍या शुभ्र फुलांनी भरून जाते आणि नंतर त्याला पालवी फुटते.

किटक नाश

बरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती.

कुणीतरी बॉम्ब डिटेक्टर बनवा रे!

गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट होताहेत. अनेक सर्वसामान्य माणसं प्राणाला मुकताहेत.

या माणसांना आपल्या आजूबाजूला बॉम्ब ठेवलाय असा अगोदर पत्ता लागला तर किती बरं होईल! जीवित हानी टळेल. शिवाय दहशतवाद्यांचं मनोबल खच्ची होईल.

बिग बॅग प्रयोगावर सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी

लार्ज हॅड्रॉन कोलायडर (Large Hadron Collider, LHC), बिग बँग यंत्र या नावाने प्रसिद्ध असलेल्या या वैज्ञानिक प्रयोगाने संपूर्ण जगाचे लक्ष बर्‍यावाइट कारणांनी वेधून घेतले आहे.

दुसरे जाळे - वेब २.०: अशील-सेवक कार्यप्रणाली (क्लायन्ट्-सर्वर् सिस्टम्)

या लेखमालेच्या मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे दोन संगणक परस्परांशी 'इलेक्ट्रॉनिकली' संवाद साधायला लागल्यानंतर, अशी अनेक स्थानिक संवादजाळी एकमेकांना जोडली गेल्यानंतर सद्य स्थितीतले आंतरजाल अस्तित्त्वात आले.

सृजनशीलता - तंत्र व मंत्र

प्रस्तावना:

भाषा आणि परिभाषा

'विज्ञान, अज्ञान आणि अंतर्ज्ञान' या विषयावर एक लेख मी उपक्रमावर दिला होता. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. विशेषतः प्रियाली आणि धनंजय यांच्यात झालेल्या संवादातून त्यात मोलाची भर पडली.

अविश्वसनीय!

नुकताच मला एक ई-मेल आला आहे. त्यांत असे म्हंटले आहे की येत्या २७ ऑगस्टला आकाशांत मंगळ नुसत्या डोळ्यांनी (दुर्बिणीशिवाय) पौर्णिमेच्या चंद्राएवढा दिसणार आहे. त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ३४.६५ दशलक्ष मैल असेल.

सगळेच अनिश्चित! पुंजभौतिकीने वास्तवच संपवले का? - २/२ (फाइनमन यांचे लिखाण)

भाग १ मधली शेवटची वाक्ये : ...म्हणूनच सिद्धांतातल्या कुठल्या-कुठल्या कल्पना थेट तपासल्या जाऊ शकत नाहीत, त्यांच्याबद्दल तशी माहिती असावी. पण तशा सर्व कल्पनांचे उच्चाटन करणे आवश्यक नाही.

 
^ वर