अविश्वसनीय!

नुकताच मला एक ई-मेल आला आहे. त्यांत असे म्हंटले आहे की येत्या २७ ऑगस्टला आकाशांत मंगळ नुसत्या डोळ्यांनी (दुर्बिणीशिवाय) पौर्णिमेच्या चंद्राएवढा दिसणार आहे. त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ३४.६५ दशलक्ष मैल असेल. रात्री साडेबाराला आकाशांत दोन चन्द्र असल्यासारखे दिसेल. मंगळ पुन्हा पृथ्वीच्या इतका जवळ २२८७साली येईल. आज हयात असलेले कोणीही त्यावेळी ही घटना पहायला जिवंत नसतील.

मला हे सर्व अविश्वसनीय वाटते.

सदर ई-मेल मला माझ्या एका मित्राकडून् आलेला आहे. चौकशी करता त्याला तो त्याच्या इंग्लंडमधल्या एका मित्राकडून आला आहे व त्याने तो माझ्याप्रमाणेच इतर मित्रांनाही पाठवला आहे. आपल्यापैकी कुणाला असा ई-मेल आला आहे का?

लेखनविषय: दुवे:

Comments

अविश्वास योग्य

याबद्दल आणखी चर्चा असलेला दुवा.

तुमचा अविश्वास योग्यच आहे.

आकाशातील (नेहमीच्या) ज्योतींपैकी चंद्राएवढे कोनात्मक आकारमान (अँग्युलर साइझ) फक्त सूर्यच प्राप्त करू शकतो. (अर्थात एखादा धूमकेतूसुद्धा खूप मोठा दिसू शकतो - पण ती वेगळी बाब आहे, हे सहज लक्षात यावे.)

वर्षभर जुनी खबर ;-)

अगदी हाच दुवा देणार होते. :)

सदर गोष्ट २७ ऑ.२००७ला घडणार होती असे वाटते. वर्षभराने तेच इमेल पुन्हा फिरवणे म्हणजे फारच गंमतशीर!

अविश्वासचे कारण.

दुव्याबद्दल धन्यवाद. मला सदर गोष्ट अविश्वसनीय वाटण्याचे एक कारण म्हणजे ई-मेल मध्ये दिलेले अंतर. त्या विशिष्ट वेळी मंगळ पृथ्वीपासून ३४.६५ दशलक्ष मैलांवर म्हणजे ३.४७ कोटी मैलांवर असेल असे म्हंटले आहे. सूर्य व पृथ्वी यांतील अंतर सुमारे ९.५० कोटी मैल आहे. पृथ्वी व मंगळ यांतील अंतर पृथ्वी व सूर्य यांतील अंतरापेक्षा क्मी असू शकेल का?
खरोखरच ही घटना घडली तर पृथ्वी, सूर्य व मंगळ यांच्या मधे असल्यामुळे व सूर्यापेक्षा मंगळाला जवळ असल्यामुळे मंगळावरून खग्रास सूर्यग्रहण दिसेल असे वाटते.

पृथ्वी-मंगळ अंतर

पृथ्वी-मंगळ अंतर हे वर्षात कमीजास्त होत असते. मंगळ आणि सूर्य एका घरात (किंवा जवळपास) असतात तेव्हा मंगळ-पृथ्वी अंतर हे सूर्य-पृथ्वी अंतरापेक्षा अधिक असते. (म्हणजे ऑगस्ट २००८ मध्ये पृथ्वीपासून मंगळ सूर्यापेक्षा अधिक अंतरावर आहे.) मंगळ सूर्याच्या घरापासून ६ घरे दूर असला (उदा : सूर्य मेषात, आणि मंगळ कन्येत) तेव्हा पृथ्वी-मंगळ अंतर हे पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा अर्धे असते. पण आकडे माहिती असल्याशिवाय बाह्यग्रह-पृथ्वी अंतर >=?< पृथ्वी-सूर्य अंतर, असे ढोबळ निष्कर्ष काढता येत नाहीत. (बाह्य ग्रह म्हणजे मंगळ, गुरू, शनि...[बुध, शुक्र सोडून बाकी सर्व]) उदा : पृथ्वी-गुरू हे अंतर पृथ्वी-सूर्य अंतरापेक्षा नेहमीच अधिक असते - वर्षातून कधीही.

खग्रास बद्दल शरद् कोर्डे यंचा निष्कर्ष योग्यच आहे. (म्हणजे हा निष्कर्ष : ईमेल ठीक असती तर मंगळावरून पृथ्वीमुळे कधीतरी खग्रास सूर्यग्रहण दिसण्याची शक्यता* होती. आणि ईमेल ठीक नाही. मंगळावरून पृथ्वीमुळे होणारे सूर्यग्रहण कंकणाकृती असते. जसे पृथ्वीवर बुध/शुक्र यांच्यामुळे होणारे सूर्यग्रहण कंकणाकृती असते, तसे. सूर्यापुढे शुक्र/बुध यांचा ठिपका इतका लहान असतो, की "कंकण" शब्द चित्रदर्शी राहात नाही. म्हणून अशा युतीला "कंकणाकृती सूर्यग्रहण" म्हणायची पद्धत नाही. केवळ चंद्रामुळे झालेल्या अशा प्रकारच्या ग्रहणाला चित्रदर्शी शब्द म्हणून "कंकणाकृती" म्हणण्याची रूढी आहे.)
*"शक्यता"च का? शाश्वती का नाही? ग्रहण होण्यासाठी दोन ज्योती एका घरात आलेल्या पुरत नाही. राहू/केतूही त्याच घरात असावे लागतात. म्हणूनच प्रत्येक अमावास्येला पृथ्वीवर चंद्रामुळे सुर्यग्रहण होत नाही.

बापरे

पौर्णिमेच्या चंद्राएवढा????
भलताच पावरबाज होणार म्हणजे तो!
आणि नासा ला वगैरे त्यांचे रॉकेटस सोडायला हा चांगला दिवस आहे मग! ;)))
आपला
गुंडोपंत

 
^ वर