शरद ऋतूतील नवी पालवी

या वर्षी आम्ही घराच्या अंगणात ब्रॅडफोर्ड पेअर ही झाडे लावली. या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे झाड पांढर्‍या शुभ्र फुलांनी भरून जाते आणि नंतर त्याला पालवी फुटते. उन्हाळ्यात फुलांचा बहर ओसरलेला असतो आणि शिशिर आणि हिवाळ्याच्या ऋतूत झाडाची पाने गळून पडतात. या झाडांचा वसंतातील एक फोटो येथे लावला आहे.

आम्ही उन्हाळ्यात, जुलैच्या महिन्यात झाड लावले तेव्हा त्याला फुले नव्हती. ऑगस्टमध्ये अचानक सर्व पाने सुकून गेली आणि बहुधा झाड मरते आहे असे आम्हाला वाटू लागले. पानगळती सप्टेंबरच्या मध्यावर सुरु होते तेव्हा ऑगस्टमध्ये झालेली पानगळती नैसर्गिक वाटली नाही. हे झाड जिथून विकत घेतलं तिथून परत करावं असं ठरलं होतं परंतु ते पुन्हा खणून काढून परत करायला वेळ झाला नाही.

अचानक सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला या झाडाला नवी पालवी आली आणि आठवड्याभरापूर्वी नवी फुलेही. हा प्रकार का आणि कशामुळे घडला असावा यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का? फुलांचे फोटो चटकन काढायला मला वेळ झाला नाही त्यामुळे खालील फोटोतील फुले थोडीशी सुकली आहेत. तरी फोटोत फुले आणि त्यामागील पालवी दिसून यावी.

DSC01999

ब्रॅडफोर्ड पेअर या झाडाबद्दल येथे वाचता येईल.

हे असे का झाले असावे?

Comments

मस्त !!!

ब्रॅडफोर्ड पीअर झाडांची पांढरी शुभ्र फुले सुंदर दिसतात. आपल्याकडील गुलमोहरासारखेच त्याचे वैशिष्टे दिसते.

अचानक सप्टेंबर महिन्याच्या शेवटाला या झाडाला नवी पालवी आली आणि आठवड्याभरापूर्वी नवी फुलेही. हा प्रकार का आणि कशामुळे घडला असावा यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का?

सांगता येणार नाही.

अवांतर : वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद,हेमंत,शिशिर अशा ऋतूंच्या उल्लेखामुळे पालवी कधी येते आणि फुले कधी येतात यात आमचा जरा गोंधळ होत आहे. त्याच्याऐवजी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे लिहिले असते तर समजणे सोपे गेले असते. अर्थात वेगवेगळ्या देशातील वेगवेगळे ऋतू म्हणुन कदाचित तसे असावे. (चुभुदेघे)

शरद ऋतू

वसंत, ग्रीष्म,वर्षा, शरद,हेमंत,शिशिर अशा ऋतूंच्या उल्लेखामुळे पालवी कधी येते आणि फुले कधी येतात यात आमचा जरा गोंधळ होत आहे.

आता सुरु आहे तो शरद ऋतू असे मीही स्पष्ट करून घेतले. बाकी लेखात कोठेही ग्रीष्म, वर्षा असे ऋतू वापरलेले नाहीत. ;-) वसंत म्हणजे स्प्रिंग. शिशिर हिवाळ्यात येतो.

अमेरिकेत चार ऋतू असतात. साधारणतः

मार्च ते जून - स्प्रिंग किंवा वसंत
जून ते सप्टेंबर - समर किंवा उन्हाळा
सप्टेंबर ते डिसेंबर - फॉल किंवा पानगळ
डिसेंबर ते मार्च - विंटर किंवा हिवाळा

शरद् ऋतु म्हणजे इंग्रजीत ऑटम

शरद ऋतु म्हणजे इंग्रजीत ऑटम.हा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान असतो. ह्या ऋतून अनेक झाडांना पालवी असते. तुमच्या त्या झाडाला असू शकेल. इथे काही निरीक्षणे आहेत.
तुम्ही दिलेला दुवा ब्रॅडफोर्ड पेअरचा नव्हता.--वाचक्‍नवी

दुवा याच झाडाचा आहे.

ह्या ऋतून अनेक झाडांना पालवी असते. तुमच्या त्या झाडाला असू शकेल. इथे काही निरीक्षणे आहेत. तुम्ही दिलेला दुवा ब्रॅडफोर्ड पेअरचा नव्हता.

हे म्हणजे कोकणातल्या माणसाला "तुला आंब्याचे झाड ठाऊक नाही रे!!" असे म्हणण्यासारखे झाले. :-) ह. घ्या.

मी दिलेला दुवा ब्रॅडफोर्ड फ्लावरींग पेअरचाच आहे आणि त्याला फॉलमध्ये पालवी येत नाही. अधिक दुवा येथे बघावा. दुकानातून झाड घेताना त्याबरोबर आलेली लेबल्स आणि माहितीही वाचलेली आहे. तेव्हा हे कोणतेही वेगळे झाड नाही. तसेच अशी झाडे आमच्या गावातही भरपूर आहेत. आम्ही झाडं विकत घेतली तेव्हा आमच्या शेजार्‍यांनीही विकत घेतली होती. एकूण १२-१५ झाडे आम्ही त्यावेळेस लावली. त्यापैकी फक्त एकाच झाडाला नव्याने पालवी फुटून फुले आली. बाकीची झाडे अजूनही बर्‍यापैकी हिरवी आहेत.

गावात अन्य ब्रॅडफोर्ड पेअरला फुले आलेली नाहीत*. पानगळ होऊन नवी पालवी आलेली नाही. अद्याप इतर सर्व झाडे बहुतांश हिरव्या पानांची आहेत.

झाड जगले नाही तर वर्षभरात परत करता येते म्हणून त्याचा टॅग जपून ठेवला होता. हा त्याचा फोटो (घाईत काढल्याने जरा हलला आहे त्याबद्दल क्षमस्व!) यावरून झाड कोणतेही वेगळे नाही हे कळेल.

DSC02007

* अन्य म्हणजे येताजाता माझ्या नजरेस जी पडतात ती. संख्या शेकड्याच्या वर असावी.

कार्तिक आंबा

कोंकणातल्या लोकांना माहीत आहे की नाही हे माहीत नाही पण, देशावरच्या आंब्याच्या झाडांना कधीकधी कार्तिकात फळ येते. ही कैरी विक्रीसाठी बाजारातसुद्धा येते. कार्तिकात फळ म्हणजे शरद ऋतूत पालवी आणि मोहोर. तुमच्या ब्रॅडफ़ोर्डचे तसेच काहीसे असावे.---वाचक्‍नवी

कार्तिक ब्रॅडफोर्ड

देशावरच्या आंब्याच्या झाडांना कधीकधी कार्तिकात फळ येते. ही कैरी विक्रीसाठी बाजारातसुद्धा येते.

पाहिलेली आणि चाखलेली आहे. फारशी चव नसते. आंब्यांच्या अनेक जाती प्रजाती आहेत. विविध आकारांचे, चवीचे आंबेसुद्धा मिळतात परंतु हापूस म्हटले की तो विशिष्ट मोसमातच येतो. याचप्रमाणे पांढरी ब्रॅडफोर्ड पेअरही विशिष्ट जात आहे आणि तिला फॉलमध्ये नवी पालवी येत असल्याचे, किंबहुना वर्षातून दोनदा पालवी येत असल्याचे ऐकलेले नाही.

तुमच्या ब्रॅडफ़ोर्डचे तसेच काहीसे असावे

असावे असे ढोबळ उत्तर नको असून असे का आहे त्यामागील शास्त्रीय मिमांसा हवी आहे. सर्व झाडे आणि टॅग्ज एकसारखे असताना हे एकमेव झाड वेगळे कसे? अशी वेगळी जात आढळते का हेच जाणून घ्यायचे आहे.

तसे काही शोधून सापडले नाही.

देखणी नाजूक फुले

तुमच्या प्रश्नाचे उत्तर माहित नाहि पण ही फुले असतात मात्र देखणी आणि नाजूक :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सजावटी झाड सुंदर आहे.

वसंतात फुललेल्या झाडांचा फोटो आवडला. (या फुलांना सुवास असतो का? झाड चंदनबटव्याच्या जातकुळीतले वाटले.)
प्रश्नाचे उत्तर माहित नाही.


एकूण १२-१५ झाडे आम्ही त्यावेळेस लावली. त्यापैकी फक्त एकाच झाडाला नव्याने पालवी फुटून फुले आली.

यावरून "शरदातील पालवी" नावाची भयकथा मला स्पष्ट दिसते आहे. जरा झाडाखाली दहा फूट खोल खणून पहा. ;)

सुवास

वसंतात फुललेल्या झाडांचा फोटो आवडला. (या फुलांना सुवास असतो का? झाड चंदनबटव्याच्या जातकुळीतले वाटले.)

सुवास असतो असे वाचून आहे. पूर्वी ही झाडे माझ्या अंगणात नसल्याने फार जवळ जाऊन सुवास घेतलेला नाही.

अमेरिकेतील काही सदस्यांना याविषयी माहिती असण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंगणात किंवा आसपास ही झाडे असल्यास असा प्रकार त्यांनी पाहिला आहे का हे देखील जाणून घेता येईल.

अवांतरः

यावरून "शरदातील पालवी" नावाची भयकथा मला स्पष्ट दिसते आहे. जरा झाडाखाली दहा फूट खोल खणून पहा. ;)

चांगली कल्पना आहे. ;-) मौकाभी है और दस्तुरभी|

हे उत्तर असू शकते -

तुमच्या प्रश्नासारखाच हा प्रश्न दिसतोय -
तिथेच दिलेले उत्तर पहा. (तेही गुळमुळीत दिसतेय.:( )
आस्क ऍन एक्सपर्ट गार्डनर!

धन्यवाद

उत्तर गुळमुळीत असले तरी यावरून असे कधीतरी होते असे नजरेस पडले.

तसे आमच्याकडे हरिकेन येत नाहीत आणि भर् उन्हाळ्यात थंडीही पडली नव्हती. ;-) वेगळ्या मातीचा प्रताप असावा का काय असेच वाटू लागले आहे.

भाजी

चंदनबटवा हे एका भाजीचे नाव आहे ना? चू. भू. द्या. घ्या.

-सौरभ.

खते/संप्रेरके

असे का व्हावे याचा अंदाज नाही. काही झाडांना दोनदा फुलोरा येतो पण इथे तसा प्रकार नाही. एकाच झाडाच्या बाबतीत ते घडले आहे.

दहा फुट खणण्याचा प्रस्ताव योग्य आहे:) ..तेथे काही खते किंवा रासायनिक संप्रेरके घातली गेली होती का? एखादे वेळी त्यामुळे झाडाच्या नैसर्गिक चक्रात अचानक पानगळ आली असेल आणि त्यामुळे फुलोरा..अथवा अचानक फुलोरा आणि मग पानगळ.. पण असे होउनही पुढे हिवाळा लगेच न आल्याने झाडाने पाने पुन्हा तयार केली असतील. संप्रेरके अथवा वेगळ्याच कुठल्या खतामुळे झाडाला दोनदा फुलोर्‍याची संधी आपोआप मिळाली असेल. हा आपला माझा अंदाज.. तसे नसेल तर तर वेगळा तर्क लढवावा लागेल :)

(संप्रेरके-वेगळीच काही रसायने यामुळे असे होण्याची शक्यता हाच एक अंदाज आणि त्यावरचा हा इमला :) )
--लिखाळ.

ग्रेट!!

तेथे काही खते किंवा रासायनिक संप्रेरके घातली गेली होती का? एखादे वेळी त्यामुळे झाडाच्या नैसर्गिक चक्रात अचानक पानगळ आली असेल आणि त्यामुळे फुलोरा..अथवा अचानक फुलोरा आणि मग पानगळ.. पण असे होउनही पुढे हिवाळा लगेच न आल्याने झाडाने पाने पुन्हा तयार केली असतील. संप्रेरके अथवा वेगळ्याच कुठल्या खतामुळे झाडाला दोनदा फुलोर्‍याची संधी आपोआप मिळाली असेल. हा आपला माझा अंदाज..

माझा प्राथमिक अंदाज हाच होता. कारण, या सर्व झाडांपैकी आमचीच झाडे आम्ही तीन प्रकारची वेगळी माती वापरून लावली होती. हे पहिले झाड बर्‍यापैकी उन्हाळ्यात लावले पण बाकीची नंतर जरा थंडी पडल्यावर. वेगळी माती वापरून झाडे लावली असता ती या मातीला सरावण्यास थोडा वेळ घेतात असे पाहिले आहे. परंतु, असे निश्चित होते का हेच जाणून घ्यायचे आहे.

 
^ वर