कुणीतरी बॉम्ब डिटेक्टर बनवा रे!

गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट होताहेत. अनेक सर्वसामान्य माणसं प्राणाला मुकताहेत.

या माणसांना आपल्या आजूबाजूला बॉम्ब ठेवलाय असा अगोदर पत्ता लागला तर किती बरं होईल! जीवित हानी टळेल. शिवाय दहशतवाद्यांचं मनोबल खच्ची होईल.

एका ठराविक त्रिज्ज्येच्या परिसरात बॉम्ब असेल तर ते दर्शवणारं मोबाईलसारखं, सर्वसामान्य माणसाला परवडेल व खिशात बाळगता येईल असं एखादं उपकरण असायला हवं. ज्यावेळी त्याला आपण सुरक्षित आहोत की नाही हे पहायचं असेल त्यावेळी त्याला ते आपल्याकडील उपकरणावरील एक बटण दाबून पाहता यायला हवं. त्यात आणखीही काही सोयी व सुधारणा करता येतील.

आपल्याकडे बुद्धिमान शास्त्रज्ञांची व तंत्रज्ञांची कमतरता नाही. त्यांना असं उपकरण तयार करणं अशक्य आहे असं वाटत नाही.

जपान्यांच्या लक्षांत येण्यापूर्वी आपण ही गोष्ट साध्य करावयास हवी.

आपल्याला काय वाटतं?

लेखनविषय: दुवे:

Comments

हरितक्रांती

आपल्याकडे बुद्धिमान शास्त्रज्ञांची व तंत्रज्ञांची कमतरता नाही. हे खरे आहे. म्हणूनच असे बाँब तयार होत आहेत. नाण्याच्या दोन बाजू असतात. एकिकडे बॉम्ब डिटेक्टर बनेल आणि एकिकडे त्याची चेष्टाकरुन स्फोट सुद्धा होतील.
जे चाललयं ते ठिक चाललं आहे. लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आणि मग लोकांची स्वतःची. कशाला उगाच शास्त्रज्ञांचा आणि तंत्रज्ञानांचा वेळ आणि आपलाच पैसा बाँबसाठी वाया घालवा? आम्ही शांतताप्रिय भारताचे शांत नागरिक आहोत. आम्हाला अमेरिकाच देईल एखादे उपकरण. त्यासाठी हवातर भारतातल्या लोकशाहीची जपणूक करणार्‍या राजकारण्यांना एखादा करार अमेरिके सोबत करायला लावू. नाहितर असं करुयात का? आपण सगळ्या हिंदूंना सांगू की सगळेजण घरी बसुन राहा. म्हणजे बाँबस्फोट झाले तरी ते सुरक्षीत राहतील. अथवा असे बिझेनेस मॉडेल तयार करु की घरा बाहेर पडायचीच गरज नाही. घरी बसुन काम, घरीच आराम, घरबसल्या ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन पेमेंट, बाहेर जायचीच गरज नाही. मग बॉंब फोडणार कोणासाठी? घरच्यांची सोबत सुद्धा होईल आणि हायटेक लाईफ सुद्धा.
नाहितर असे करु, कि या अतिरेक्यांच्या सगळ्या मागण्या एकदाच्या मान्य करुन टाकू. कुठं उगाच रोज रोज स्फोट स्फोट खेळत बसायंच? शेवटी त्यांना हरित क्रांती करायचीच आहे ती होऊन जाऊदेत एकदाची. आपल्याला काय? धर्म थोडाच महत्वाचा आहे? आपण हिंदू लोकं थोडेच धर्मांध आहोत? काय फरक पडेल? दाढी वाढवावी लागेल ना? आणि वेळेवर नमाज पढावे लागेल? तेवढीच शिस्त लागेल भारतीयांना. आरक्षणाचे गळू सुद्धा बरे होईल? शेवटी धर्माने काय फरक पडतो? आपण मनुष्य प्राणी आहोत. हे धर्म वगैरे सारं एक वेष्टण आहे. आपलं हिंदूंच ते जरा जास्त जुनं झालं आहे. त्यामुळे ते बदलण गरजेचं आहे. जगात मुस्लिम राष्ट्रांकडे सुद्धा पैसा आहेच ना? तो भारतात सुद्धा वाहायला लागेल मग. दाऊद सुद्धा शांत होईल. ठाकरे, तोगडिया, मोदी यांचा त्रास सुद्धा कमी होईल. सगळा भारत कसा नैसर्गिक हिरव्या रंगात न्हाउन निघाला असेल. हि हरितक्रांती करुयात. ती सर्वात सोपी आहे आणि जे लोक त्याचा पाठपुरावा करत आहे ते ही आनंदी होउन जातील? म्हणजे भारतात सर्वदुर शांतता पसरेल. हा हरितक्रांतीचा सत्याग्रह आपण केलाच पाहिजे. हेच तर आपल्या दिवंगत नेत्यांनी शिकवलं आहे. रक्तपाताने भले होणार नाही याला इतिहास साक्षीदार आहे. मग आपण चर्चा करुन हि हरितक्रांती घडवुन आणु. वाटल्यास मध्यस्थ म्हणुन ख्रिश्चन स्त्रिला सन्मान देउ. ती नक्की तयार होईल. त्यागाची साक्षात जीवंत मुर्ती आहे. हे बॉम्ब डिटेक्टर बनवा रे! वगैरे सगळे पोरखेळ आहेत. त्याने काहीच होणार नाही.

मेरा भारत महान.
अल्ला इश्वर तेरो नाम!!
सब को सन्मती दे रमजान!!





रोग आणि इलाज

वर चाणक्यांनी लिहीलेल्या भावनांशी सहमत...

बाँबस्फोटाचा रोग एक आहे आणि त्यावरील डिटेक्टर हा इलाज समजणे म्हणजे १८० अंशाचा फरक वाटला...

या संदर्भात एक गोष्ट राहून राहून वाटते - अमेरिकेत ९/११/२००१ ला अतिरेक्यांनी गोंधळ घातला. पण त्या नंतर त्या देशातील राजकारण्यांनी आणि सामान्य जनतेने जे काही चांगले वाईट केले असेल पण स्वतःच्या भूमीवर किमान पक्षी अजूनपर्यंत एकही बाँबस्फोट होऊन दिला नाही... ह्याचा अर्थ अमेरिका कायम अभेद्यच राहील का? तसे त्यांचे राज्यकर्ते देखील म्हणत नाहीत कारण तसे लक्ष सर्वत्र ठेवणे जमू शकणार नाही. पण पोलीसांची मोडस ऑपरंडी आणि त्यात राजकारण्यांनी ढवळाढवळ न करणे हे एक कारण आहे आणि स्वतःच्या देशाबद्दल सार्थ अभिमान आणि स्वतःला मोठे ठेवण्याची इर्षा आहे...

"बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो" असे म्हणताना साने गुरूजींना पण भारताने सामर्थ्यवान असावे असेच वाटले होते...

माईन्ड् डिटेक्टर

भुकंप हा देखील एक भुगर्भातील अशांततेचा उद्रेक् आहे. भुकंप प्रवण क्षेत्रे सांगता येतात पण कुठे व कधी भुकंप होईल हे सांगता येत नाही. निसर्गाच्या अवकृपेचा फटका असंख्य निरपराध लोकांना बसतो. आपण 'अवकृपा 'म्हणतो पण तो निसर्गाचा 'अविष्कार ' आहे. बॉम्ब स्फोटाचे तसेच आहे. जनमानसातील विकारांचा तो उद्रेक आहे. पण या वाक्यावरुन हे बॉम्ब स्फोटाचे समर्थन आहे असा अन्वयार्थ काढणारे विद्वान आहेत.
मानवी बॉम्ब कसे डिटेक्ट करणार? असंतोषापुढे जगातील कुठलीही सुरक्षा यंत्रणा फिकी आहे. समाज मनाचे आकलन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. भाषिक, प्रांतिय, धार्मिक, पंथिय , जातिय इ. अस्मिता या समाजविघटनाची प्रक्रिया चालु करतात. मनाच्या स्फोटकांचा साठा कुठ्ला डिटेक्टर शोधणार? आत्मशोध चालुच असावा लागतो.
प्रकाश घाटपांडे

मी एक डिटेक्टर

माझ्या मते आपण प्रत्येक जण एक बाँब डिटेक्टर आहोत. प्रत्येक नागरीकाने आपण जिथे वावरत आहोत, जिथे राहतो, जिथे फिरतो तिथे दक्ष राहिले तर वेगळ्या डिटेक्टरची गरजच नाहि. भारतीय शहरातील समाज (अपरिहार्ततेने असेल) पण मुर्दाड झाला आहे. शेजारी कोण राहतं हेही आजकाल काहिंना माहित नसतं. बसस्टॉपवर बाजुच्या व्यक्तीकडे पाहुन काहि संशयास्पद वाटलं तर मंडळि फक्त त्याच्यापासून दूर राहतील.
"कशाला उगाच नसत्या भानगडीत पडा" असा विचार करताना असे कोणाला वाटत नाहि की भानगडित न पडल्याने जी भानगड होते आहे तीच भानगड उद्या इतर कोणी नसत्या भानगडीत न पडल्याने आपल्याबरोबर होऊ शकते.

सतत, पोलिस, यंत्रणा, सरकार यावार ताशेरे ओढताना, आपण जे काहि करू शकतो ते तरी करतोय का याचाही विचारा करावा या मताचा मी आहे (हे कोणालाही उद्देशून नसून एक मत आहे. आणि याचा अर्थ या यंत्रणांनी काम टाळावे असा मुळीच नाहि)

जर भारतातले १०० कोटी बॉम्ब डिटेक्टर जागृत राहिले तर इतर डिटेक्टरची गरजच काय?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

पुर्ण सहमत

पुर्णपणे सहमत. १०० कोटी डिटेक्टरना या पेक्षा आरक्षणासारखे महत्वाचे आहेत. जो तो मी, माझा धर्म/समाज/पंथ या चाकोरी बाहेर पडायचा विचारच करत नाही. सगळे उठुन सरकारच्या माथी मारायचे आणि सरकार बनवताना मात्र निष्क्रिय राहचे या मानसिकतेचे काय करायचे?





+१

अगदी

कम्युनिष्ट देशात आई-मुलावर, मुलगा-बापावर पाळत ठेवुन सरकारला माहीती द्यायचा. [पुर्व जर्मनीत असे घडले आहे]

अवांतर - मधे अरब अमेरिकन कॉमेडियन्स वर एक फिल्म पाहीली होती. त्यात एका मुसलमान विनोदवीराने छान कॉमेंट् केली. विमानात चढताना माझी बिनमुच्छी लांब दाढी बघुन सगळे जण माझ्यावर पाळत ठेवत. पण शेवटी विमान सुखरुप उतरल्यावर ते सगळे पाळत ठेवणारे हसतमुखाने अच्छा - बाय करत जायचे :-)

संशोधन चालू आहे

आत्ताच "याहू"वर एक बातमी वाचनांत आली आहे. त्याप्रमाणे दूरवरच्या बाँबचे अस्तित्व आधीच लक्षांत यावे म्हणून तीन प्रकारच्या उपकरणांसाठी मुंबईंत (मला वाटतं आय् आय् टी च्या मदतीने) संशोधन चालू आहे. एकामुळे उत्सर्जक स्फोटकांचे अस्तित्व समजेल. दुसरे बाँब असल्यास त्याच्या बरोबर Resonate (मराठी प्रतिशब्द माहीत नाही) करेल व तिसरे ५० मीटर दूरवर असलेल्या बाँबच्या धोक्याचा इशारा देईल.

अधिक माहितीसाठी "याहू" वरील आजच्या तारखेची तपशीलवार बातमी पहावी.

 
^ वर