ओळखा पाहू

Comments

अरे वा

मजा वाटली. आवडले चित्र.

सगळे जण नाही माहीती पण नेहमीचे बरेचसे ओळखले.

न ओळखलेले बहुतेक तुम्ही मंडळींनी चर्चा केले सध्या काय वाचतायवाले लेखक असतील ;-)

ओळखीचे वाटलेले काही

[??? = डाउटफुल!]
चार्ली चॅप्लिन
पेले
ब्रूस ली
ऍल्बर्ट आइन्स्टाइन
अब्राहम लिंकन
डॉ. सन् यत् सेन(???)
व्लादिमिर पुतिन???
माइक टायसन
ऍलेक्झान्डर ग्रॅहॅम बेल(???)
शेक्सपिअर
कार्ल मार्क्स
ऍडॉल्फ हिटलर
लेनिन(???)
राणी एलिजाबेथ
सॉक्रेटिस
.
..
...
....
.....

उदा

आईनस्टाईनच्या बाजूला उभी असलेली लहान मुलगी कोण?


आम्हाला येथे भेट द्या.

शर्ली टेंपल

का? मला तरी वाटली ती

ऍन फ्रॅक?

ऍन फ्रॅक????

फ्रँक एवढी लहान?

फ्रँकचे वय १४च्या आसपास असावे.
ही बालवाडीतली वाटते.
एवढ्या लहान वयातील जगप्रसिद्ध व्यक्ती माहिती नाही.


आम्हाला येथे भेट द्या.

लादेनमामा

लादेन मामा दिसत आहेत मागे.
डाव्या रांगेत हिटलर, सद्दाम वगैरे.


आम्हाला येथे भेट द्या.

हे

हेन्री फोर्ड,
माओ
म. तेरेसा
सद्दाम हुसेन
चार्ली चॅप्लीन
एल्वीस

पुतीन(?)
टायसन(?)
(उंटावर) अराफात

आपला
गुंडोपंत

आणखी

मायकल जॉर्डन
म्. गांधी
यासिर अराफात्
जॉर्जबाबा बुश
मदर तेरेसा
.
..
...
....
.....

प्रयत्न

सॉक्रेटिस, लेनिन, पेले, हिटलर, बिथोवेन, चार्ली, क्लिंटन, सद्दाम, टायसन (की अली?), व्हिक्टोरिया, ली, आईनस्टाईन, मुसोलिनी, टॉलस्टॉय, एल्वीस, शेक्स्पिअर, चंगेझखान, चर्चिल, नेपोलिअन्, लिंकन, सनयत सेन, हो चि मिन्ह, गांधीजी, आराफत, मर्लोन ब्रान्डो, बुश, चार्ल्स, कॅस्ट्रो

आणी इतर..

आणखी

गेट्स, मन्रो, मंडेला, सीझर, ..

बुश आणि ओसामा

बुश दुर्बिणीतून ओसामाला शोधतोय आणि तो तर त्याच्या डोक्यावरच आहे :)

बुश

बुश साहेबांनी ओसामाला 'मिसअंडरएस्टिमेट' केलेले दिसत आहे ;)


आम्हाला येथे भेट द्या.

अबतक ३७

चित्र मस्त आहे. काही शोधले बाकीचे नंतर

 1. भ्राताश्री ब्रुस ली,
 2. चंगीझखान,
 3. आईनस्टाईन,
 4. चार्ली चॅप्लीन,
 5. राणी एलिझाबेथ,
 6. ऑड्री हेपबर्न,
 7. मोझेस,
 8. लेनीन,
 9. लिंकन,
 10. माओ,
 11. हिटलर,
 12. सद्दाम,
 13. यासेर अराफत,
 14. एल्वीस प्रीसली,
 15. बुश,
 16. गांधीजी,
 17. स्टॅलीन,
 18. माईक टायसन,
 19. अटिला द हुन,
 20. सॉक्रेटिस,
 21. ऍरिस्टोटल,
 22. मरलीन मन्रो,
 23. मायकेल जॉर्डन,
 24. फीडल कॅस्ट्रो,
 25. कार्ल मार्क्स,
 26. पेले,
 27. मदर तेरेसा,
 28. गुरु रविंद्रनाथ टागोर, (?)
 29. क्लिंटन,
 30. सन मिंग मिंग(किंवा तत्सम नावाचा सर्वात उंच बास्केटबॉलपटू),
 31. मंडेला,
 32. शर्ली टेंपल,
 33. पाब्लो पिकासो (?),
 34. प्रिन्स चार्ल्स
 35. मार्लन ब्रँडो
 36. पोल पॉट
 37. ज्युलिअस सिजर

छान

चित्र छानच आहे. ग्रूपफोटूमधे खाली नावे असतात तशी काही गंमत करता आली तर नावे आणि चेहेरा यांची संगती घालणे सोपे होइल.
(जे चेहेरे डाउट्फुल आहेत त्याबाबत. उदा. डाव्या वरच्या कोपर्‍यात पेलेच्यावरचा बसलेला माणूस कोण्? इ.).
एक शंका : हे चित्र कुणी, कधी काढले?

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कल्पना इल्ला

काही कल्पना नाही. एक उपक्रमी सदस्य अभिजित यांनी पाठवलेल्या विरोपात होते. पण मस्तच चित्र आहे. पुस्तकावर बसलेला आईनस्टाईन वगैरे.


आम्हाला येथे भेट द्या.

थोडा सुगावा

सर्वशक्तीमान गूगलदेवाला साकडे घातले. चित्र कुणाचे आहे हे अजून कळाले नाही. पण एका फोरमवर असेच लोक ओळखाओळखी करताना दिसले. आणि यात ओळीनुसार बरीच नावे आहेत. इथे पहावे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

+१

मस्तच!
पण साकडे घालताना कोणती आरती म्हटली? गूगलबाबाला फोटोचा नैवेद्य चालत नाही. टायपावे लागते ना!


आम्हाला येथे भेट द्या.

मिलियन डॉलर क्वेश्चन

गूगलबाबा आरती नेमकी नसेल तर प्रसन्न होत नाही :)
आधी फेमस पीपल पेंटीग देउन पाहिले, इल्ला. मग त्यात सेलेब्रिटी वगैरे मसाला घालून पाहिले तरी नाही. मग आयडिया केली. बुश, क्लिंटन, आइनस्टाइन, गांधी असा सर्च दिला. यात नसते आले तर नावे वाढवणार होतो. इतक्या लोकांत समान गोष्टी असणे अवघडच, लगेच मिळाला :)
अर्थात चित्रकार अजून शोधायचा आहे. बघू यात.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

सही

डॉली मेंढी देखिल आहे. एल्विस आणि ब्रुसली मात्र एखाद्या चित्रपटाच्या पोस्टरवरील पोजमध्ये न काढता नैसर्गिक काढले असते तर अजुन चित्र अजुन छान झाले असते.

आणखी

ल्युसिआनो पवरोट्टी

गांधीं शिवाय स्वातंत्रोत्तर भारतातील कोणी ही नाही ?
अरेरे

गांधींचा पोषाख

गांधींचा पोषाख/रंगसंगतीमुळे पण वेगळाच वाटला. दलाई लामा दिसले तरी नाहीत. त्यांचा पोषाख आणि गांधीजी असे मिश्रण वाटले.

बाकी जास्त करून ज्यांना पाश्चिमात्य जगतात (सु/कु)प्रसिद्धी अथवा पाश्चिमात्य प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे अशाच सगळ्यांना यात घेतले आहे.

मदर् तेरेसा

मदर तेरेसा है ना.

अभिजित...

अरेरे!

अरेरे! आपले शिवाजी महाराज कुठे दिसत नाहीत.

हो पण

शिवाजी महाराज वा गांधी व्यतिरिक्त अन्य कोणी भारतीय दिसत नाहीत. कदाचित ज्याने चित्र बनवले त्याच्या ज्ञानाप्रमाणे त्याने बनवले असे वाटते. पण कलाकार एकदम भारी दिसतो आहे.

मानले बुवा

परीवश, गुंडोपंत तसेच प्रियाली ताई,

मानले बुवा तुम्हाला. आमचा आकडा साताच्या पुढे गेलाच नव्हता. मग तुम्हा लोकांनी मदत केली न ओळखायला यायला लागले पटापट.

 
^ वर