क्लोंडायक गोल्ड रश - भाग २
रॉबर्ट हेंडरसन, कॅनडातील 'नोवा स्कॉशिया' परगण्यातला एक धाडसी युवक. सहा फुट उंच, निळ्या डोळ्यांचा, निधड्या छातीचा. त्याचे वडील बिग आयलंडवरील दिपगृहाच्या देखभालीचं काम करीत. वडीलांच्या कामात काडीचाही रस नसलेल्या हेंडरसनला नेहमीच भूमिगत सोनं दडल्याची स्वप्न पडत असत, नव्हे तशी स्वप्न तो रंगवत बसलेला असायचा. तसा तो पोटापाण्यासाठी फुटकळ उद्योग करायचा पण मनात नेहमीच हे भूमिगत सोनं धुंडाळून काढायची सुप्त इच्छा दडलेली होती. शेवटी वयाच्या चौदाव्या वर्षी त्याने रहातं घर सोडलं आणि सोन्याच्या शोधार्थ न्युझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका असे अनेक प्रांत पालथे घातले.
क्लोंडायक गोल्ड रश - भाग १
इसवी सन १५०० च्या आसपास युरोपात सत्ता काबीज केल्यावर रशियनांनी अतिपुर्वेला सैबेरियाच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. सैबेरिया काबीज करून पुढे अमेरिका खंडात प्रवेश करायाचा त्यांचा इरादा होता. सैबेरियाच्या दिशेने प्रवास करता करता आशिया खंडाच्या पॅसिफीक किनार्यावर त्यांचं लक्ष गेलं. यातूनच सैबेरिया व उत्तर अमेरिका जोडण्याची कल्पना तत्कालीन रशियन राज्यकर्ता 'पिटर द ग्रेट' याच्या डोक्यात आली. या कल्पनेला कितपत मूर्त स्वरूप देता येईल याची शाहनिशा करण्याकरीता त्याने रशियन नेवीतील डॅनिश ऑफिसर Vitus Bering (१) याला मोहीमेवर रवाना केलं.
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
बागलाण दुर्गभ्रमंती: भाग ३ - मुल्हेर -मोरागड
--------------------------
लेखात ८० पेक्षा जास्त फोटू असल्याने ते सगळे मी येथे टाकू शकलो नाही. ( सवडीने टाकेन )
छायाचित्रांसह येथे वाचता येईल.
-------------------
कुतूहल हि खरच अजब चीज आहे. त्याच कुतूहलापोटी कुठे जाऊन काय बघायला किंवा अनुभवयाला मिळेल याची शाश्वती नाही. कुठेतरी डोंगररांगात माणसाचा थांगपत्ता नसलेल्या ठिकाणी जाऊन काही अदभुत अश्या गोष्टी आपण पाहतो. तेव्हा त्या गोष्टी आपल्या डोळ्यांमध्ये आणि मनामध्ये साठवून ठेवण्यापलीकडे आपल्या हाती काहीच उरत नाही.
भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 3/3)
भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3)
भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 2/3)
डॉ. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई ह्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची संपूर्ण सामग्री महाजालावर उपलब्ध करून दिली आहे. ज्ञानकोशकारांचे ह्यापेक्षा उचित स्मारक करता येणार नाही. प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार.
http://ketkardnyankosh.com
खालील दुव्यावर ज्ञानकोशाच्या रचनेचा इतिहास सांगणारे डॉ. केतकरांचे पुस्तक उपलब्ध आहे.
http://oudl.osmania.ac.in/handle/OUDL/244
गाडगीळ समीती अहवाल
हा लेख मी मागच्याच धाग्यात सर्वेच्या नंतर प्रकाशित केला पण त्याकडे वाचकांचे फारसे लक्श गेले नाही. सहाजीकच आहे, कारण वाचकांना हे कसे कळणार कि नवीन प्रतिसाद म्हणजे सम्पूर्ण लेख आहे? त्यांना वाटले असेल कि सर्वे वरच चर्चा पुढे चालू आहे. म्हणून तो लेख परत जसाच्या तसा नवीन धाग्यात प्रकाशित करत आहे.
पश्चिम घाटात पर्यावरण संरक्षण
एक लेख लिहीणे आहे. पण तो "लिहीण्यात" असे पर्यंत आधी एक लहानसा सर्वे. पश्चिम घाटात पर्यावरण संरक्षणा करता काही सूचना आहेत. यातील कोणकोणत्या तुम्हाला मान्य आहेत किंवा नाहीत याचा सर्वे.
१: कोयना, भाटघर, मुळशी, इत्यादी प्रकल्पातून वीज निर्मिती ताबडतोब पूर्ण बंद करावी
२: पश्चिम घाटात असलेल्या सर्व औष्णिक प्रकल्पातून पण वीज निर्मिती ताबडतोब पूर्ण बंद करावी
३: कोणतेही नवीन विद्युत प्रकल्प - जल, औष्णिक - अर्थातच पूर्ण बंदी
४: कोयना, भाटघर, मुळशी, पानशेत, वरसगाव, खडकवासला, इत्यादी धरणे पाडून टाकावीत
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
पाठदुखी, दाखवायचा फोटो आणि तिकोना पॉइंट
( Tikona Point)
शनिवार, रविवार ची चाहूल शुक्रवारी लागली की लगेच फोनाफोनी करून ट्रेक चे प्लान होतात. त्यातले किती प्रत्यक्षात येतात हा वादाचा मुद्दा, पण तरी काहीतरी सबळ कारण निर्माण करून, असे झाले म्हणून जमले नाही असे म्हणता येते.
गुरुवारीच गूगल नकाशे वरून शोधून काढत खांडस मार्गे भीमाशंकर चा ट्रेक ठरवला. शुक्रवार संध्याकाळ उजाडली तरी ट्रेक चे काही नक्की होईना. मग थोडी हापिसातल्या फोन चे बिल वाढवल्यानंतर प्लान ठरला. लगेच आई ला फोन करून गुळाच्या पोळ्या बनवायला सांगितले.
2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप
आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते.
वसईच्या घंटेचा शोध
वसईचा किल्ला (Vasai Fort)
आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.