2014 ...पंतप्रधान पद आणि भाजप
आजच्या घडीला नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे अतिशय योग्य उमेदवार आहेत ,हे 1000% सत्य आहे.परंतु काहीवेळा सत्य आणि परिस्थितीनुरूप वास्तव यात फरक असतो. आज शिवसेनेने पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वि एनडीए च्या सर्व घटकपक्षांना विश्वासात घ्या असे आवाहन केले आहे. भाजपचे पक्ष पातळी वरील विस्कळीत संघटन आणि सुसूत्रतेचा अभाव , कर्नाटकातील खेळखंडोबा आणि मोदींच्या नावाला असलेला नितीशकुमारचा विरोध यासारख्या बाबी विचारात घेता 2014 च्या निवडणुकीत नक्की काय होईल,याबाबत शंकेची पाल चुकचुकते. त्यातच कॉंग्रेस नितीशकुमारचा वापर प्यादया प्रमाणे करून तिसर्या आघाडीचे पिल्लू काढील ,आणि बाहेरून पाठिंबा देवून आपले नेहमीचे त्रिशंकु राजकारण खेळू पाहिल ,यात संशय नाही.
यास्तव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी भाजपने कुशलतापूर्वक व्यूहरचना करून पक्षपातळीवरील गोंधळ निस्तारणे गरजेचे आहे. आधीच मोदींचे नाव पुढे केल्याने इतर इच्छुकांच्या गोटात नाराजी /अस्वस्थता असू शकते. यास्तव माझ्या मते सुषमा स्वराज यांचे नाव प्रधानमंत्री पदासाठी निश्चित केल्यास बरेच प्रश्न सुटतील.मोदी यांना केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाचे खाते देवून मोदींच्या सल्ल्यानुसार त्यांच्या गुजरात मॉडेल वर आधारित राज्यकारभार केल्यास मोदीप्रेमींना जे अपेक्षित आहे,तसा भारत घडू शकतो. त्याचप्रमाणे भविष्यकाळात विरोध मावळल्यास मोदी प्रधानमंत्री बनू शकतात .पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतांच्या आणि सीट्स च्या बेरजेच्या राजकरणात बाजी मारण्यासाठी सुषमा स्वराज उपयोगी पडू शकतील , कारण त्यांच्या नावावर सर्वमान्यता होण्याची जास्त शक्यता वाटते .
मंदार कात्रे
25 एप्रिल 2013
Comments
एकूण परिस्थिती
तुमचे 1000 टक्केवाले विधान ऐकूण हसू आवरत नाही.
परिस्थितीनुरूप वास्तव आणि सत्य वेगळे असते (कधीकधी) हे ही असेच अगाध..
असो बाकी सुषमा स्वराज यांना पंतप्रधानपद देऊन मोदींच्या मॉडेलवर सरकार चालवण्याचा आपण प्रस्ताव (?) ठेवता आहात. कोणते हे मोदी मॉडेल ते तरी कळू द्या. गुजरात बाबतीत म्हणाल तर गुजरात मॉडेल च्या यशस्वीतेची जी चर्चा आहे ती बहूतांश राज ठाकरी आणि फेसबूकी आहे. बाकी मोदींचे आकर्षण हे फक्त छोटे सरदार म्हणूनच आणि पर्यायाने भविष्यात घातक ठऱणारेच आहे. अर्थात सध्याचे सरकार नालायक असल्याचे तुम्ही जे गृहित धऱले आहे ते खरे मानले तरी पुढची सत्ता तुम्ही ज्यांच्या पदरात (तुमच्या कल्पनेत का होईना) पाडता आहेत त्यांच्या लायकीची लक्तरेही दिसत आहेतच..
एकूण परिस्थिती उद्वीग्न करणारी आहे हे मात्र निर्विवाद..
त्यात पून्हा तुमच्या या अशा लेखनाची भर.
भाजपचा पंतप्रधान येणं अशक्य वाटतं
२०१४च्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना निर्विवाद बहुमत मिळणं अशक्य वाटतं. निवडणुकी नंतर आणखी कोणी त्याना सामील होऊन किंवा बाहेरून पाठिंबा देणं कठीण वाटतं. कारण मित्रपक्ष सोडले तर इतर कोणालाही "जातीय" शक्तींबरोबर हातमिळवणी केल्याची बदनामी नको असेल. त्यामुळे भाजपाचं सरकार आणि पंतप्रधान येणं कठीण दिसतं.
अवघड
अवघड आहे सगळच. प्रत्येकाला पंतप्रधान कोण याची पडली आहे. देश कुठे जातो आहे याची नाही. मला मायावती किंवा राहूल झालेले बरे वाटतात. निदान एकदा त्यांना होऊन पाहू देत. असे ही त्या पदाची सध्या काही किंमत उरली नाहीये की सन्मान. देशाचा पंतप्रधान हा देशाच सन्माननीय/आदर्श नेता असतो याची गरज आता कोणालाच वाटत नाही. निवडणूका हा व्यवस्थापनाचा खेळ झाला आहे. सर्वसामान्य माणूस आता काहीच आशा राहिलेल्या नाहीत.
मोदी व्हायला हवेत
२०१४ मधे पंतप्रधान मोदी व्हायला हवेत. कारण, त्यांनी जसा गुजरात राज्याचा विकास केला आहे तसाच देशाचा विकास ते करु शकतील.
जर कोणाला चांस द्यायचा असेल, तो फिर मोदी हि सही.