लेख गायब!!!

उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?? विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे? मनोगतावर प्रतिसाद व्यवस्थापक वाचून मग दुसर्‍या दिवशी प्रकाशित करतात.. आणि इथे उपक्रम मध्येच रंगात आलेला एखादा लेख उडवून टाकतात. असं का???

Comments

तात्यांच्या भाषेत...

तर तात्यांच्या भाषेत "और ये लगा सिक्सर!"

-गुंड्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

हेच!

अजबच आहे?

हेच म्हणतोय हा गुंड्या!
"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

तुमच्या भाषेत??

गुंडोपंत
हे तात्यांच्या भाषेत झालं... आता तुमच्या भाषेत काय???
पल्लवी

हे हे हे

हा हा हा सही है!!!

पल्लवी

कमी तेलाचे पराठे,

मनोगतावर प्रतिसाद व्यवस्थापक वाचून मग दुसर्‍या दिवशी प्रकाशित करतात..

हो, खरं आहे. व्यवस्थापकांनी वाचून प्रकाशित केलेले 'कमे तेलाचे पराठे' आणि 'दह्यातली कार्ली' हे दोन लेख मी वाचले. छान आहेत.

आम्ही मध्येच केव्हातरी हळूच तिकडेही जातो बरं का! काय करणार? सालं आपलं पहिलं प्रेम आहे ना ते! ;)

आपला,
(पहिल्या प्रेमाला कधीही न विसरणारा!) तात्या.

बहिणाबाई चौधरी गमभन वापरत नव्हत्या!

काय

तात्या काय चाल्लय काय?

बहिणाबाई चौधरी गमभन वापरत नव्हत्या!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

ही बघ..;)

ही बघ अजून एक नवीन सही, ;)

आपला,
(सह्या गोळा करणारा!) तात्या.

संत तात्याबांनी शरद पवारांना वापरायला सांगितले! ;)!

हे पण

हे तर एकदम झकास!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

काहीतरीच काय ! बरोबर आहे.

उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे???? अजबच आहे?
त्यांना प्रॉब्लेम नाही हो.लेख वाचणा-याची येथे काळजी घेतली जाते असे वाटते.नाही तर, काही तरी काटछाट करायची आहे मग कोणाला कापायचे.माफ करा,कोणता लेख हटवायचा मग असं होत असावं.म्हणजे उपसंपादकाचे बारीक(सुक्ष्म)लक्ष आहे.हे दाखविण्याचा प्रयत्न असावा.पण काही म्हणा माझी आवड अन त्यांची आवड सेम दिसते बरं का ! मला जे वाचायचे नाही,किंवा कंटाळा येतो.ते लेख नक्की उडवल्या जातात.(कोणीही गैरसमज करून घेऊ नये ही नम्र विनंती.)

आवांतर/व्यक्तिगत 'ऑप्टिमिष्टिक'

आवांतर
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हा कसला 'ऑप्टिमिष्टिक' माणूस आहे हो!

उ.राव हा प्रतिसाद अतिव्यक्तिगत असेल तर काढून टाका. हो उगाच तुमच्या कार्यात अडथळा नको!

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

दोनो जवानी की मस्ती में चूर..

ही चर्चा मी इथे लिहिलेल्या आणि अल्पावधीतच यमसदनास पोचलेल्या वरील लेखाला अनुषंगून आहे असे गृहित धरतो. काही अपरिहार्य कारणास्तव हा लेख इथे नाही. (तो ज्या लेखाचे विडंबन म्हणून लिहिला होता, तो लेख अद्याप इथे आहे, पण हे असे का हे मला विचारु नका - 'अहो, समाजात डावेउजवे असायचेच!') हे असले काहीतरी होणार याचा अंदाज आल्यामुळे की काय, हा लेख माझ्या अनुदिनीवर बाकी सुरक्षित आहे!
सन्जोप राव

असं का?

पल्लवीताई,

उपक्रमावर लेख का गायब होत आहेत??

उपक्रमरावांनी तयार केलेल्या धोरणांत बसत नसावे म्हणून {?} (हे उत्तर नाही बहुधा प्रश्नच आहे तेव्हा फारसे जमेस घेऊ नये.)

विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे?

आपण या चर्चेचा लेखनप्रकार जो मिळेल तो घातलेला दिसतो आहे. त्यात मला विडंबन हा प्रकार सापडला नाही. उद्या एखाद्या लेखकाची अश्लील साहित्य टाकायला आडकाठी नसेल तेव्हाही आपण उपक्रमाला काय प्रॉब्लेम असा प्रश्न विचाराल का? तेव्हा फक्त येथे विडंबन असू दे, असे का?

अजबच आहे? मनोगतावर प्रतिसाद व्यवस्थापक वाचून मग दुसर्‍या दिवशी प्रकाशित करतात..

हे मनोगतच आहे किंवा मनोगताप्रमाणेच चालावे असे अनेकांना वाटते. असे का?

इथे उपक्रम मध्येच रंगात आलेला एखादा लेख उडवून टाकतात. असे का???

आणि हे विचारायला प्रत्येकजण उठून 'हा लेख का गेला' 'तो लेख का गेला' अशी जाहिर चर्चा टाकतो. असे का? कोणी किंवा जे लेख उडवले गेले त्यांचे लेखक उपक्रमरावांना व्य्. नि. पाठवून शंकानिरसन करून घेतात का? घेत असल्यास तसे सांगणारे प्रतिसाद "का गेला" छाप चर्चेत दिसत नाहीत म्हणून विचारावेसे वाटले.

(संभ्रमात) प्रियाली.

सरळ आहे

उपक्रमावर लेख का गायब होत आहेत?

ते लेख उपक्रमाच्या धोरणात बसणारे नसतात म्हणून. साधे, सरळ उत्तर आहे. पुन्हा पुन्हा अश्या आशयाचे चर्चाविषय का येत आहेत? या प्रश्नाचेही सरळ उत्तर लोकांना ते गायब लेख उपक्रमावरच वाचावेसे वाटत आहेत असे सुचते आहे.
एकूणएक वाचक व संस्थचालक, संपादक यांचे सगळ्याच बाबतीत पटेल हे अशक्यच आहेत. तेव्हा आपल्याला मिळतील तिथे, आवडतील ते लेख वाचावेत. निष्फळ चर्चा करण्यापेक्षा अनेकानेक मराठी संस्थळे निर्माण व्हावीत म्हणून मदत करावी असे माझे मत आहे.

सहमत.

निष्फळ चर्चा करण्यापेक्षा अनेकानेक मराठी संस्थळे निर्माण व्हावीत म्हणून मदत करावी असे माझे मत आहे.

१०० टक्के सहमत.हेच म्हणतो मी.

"संस्थळ" हा शब्द आवडला

मृदुलाताई,
आपण योजिलेला/निर्मिलेला "संस्थळ" हा शब्द आवडला.
त्याचा संस्कृत परंपरेप्रमाणे अर्थ बर्‍याच गोष्टी समाविष्ट असलेले स्थळ किंवा सामूहिक स्थळ असा काहीतरी लावता येऊ शकेल असे वाटते. तज्ज्ञांनी आणखी सांगावे.
संकेतस्थळ हा जुना व रूढ झालेला शब्द मला स्वतःला आवडत नाही. कारण त्यात नको असलेल्या अर्थछटा आलेल्या आहेत व आंतरजालावरचे स्थळ असा स्पष्ट निर्देश नाही. शिवाय तो शब्द आधीच वेगळ्या ("रांदेवू"ला प्रतिशब्द) अर्थानेही प्रचलित होता.
तसा या नव्या शब्दातही आंतरजालाचा स्पष्ट निर्देश नाही पण हा शब्द नवा आहे (असे वाटते!) त्यामुळे चिकटवावा तो अर्थ त्याला चिकटेल.

- दिगम्भा

मला चे कौतुक वाटते!

लेखनविषयक उद्दिष्टे

माहितीप्रधान लेख, चर्चा आणि समुदाय असे उपक्रमचे स्वरूप टिकून राहण्यासाठी उपक्रमच्या या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत नसलेले लेखन अप्रकाशित करण्यात येते. संपादन मंडळातील सदस्य आपापल्या कामाचा व्याप सांभाळून संपादनात सहकार्य करत असतात त्यामुळे वेळेच्या उपलब्धतेनुसार संपादनाचा अवधी कमी जास्त होऊ शकतो या वास्तवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

लेखनविषयक मार्गदर्शन इथे पाहता येईल. आता लेखनविषयक अपेक्षा स्पष्ट असल्यामुळे सर्वांनी त्या अपेक्षांशी सुसंगत असे लेखन करावे ही विनंती आहे.

विशिष्ट उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली असल्याने सर्व सदस्यांच्या या संकेतस्थळाकडून असणार्‍या सर्व साहित्यविषयक इच्छा-अपेक्षा पूर्ण होणे अशक्य आहे याची आम्हाला जाणीव आहे. या वास्तवाला अनुसरून सर्व सदस्यांनीही माहितीप्रधान लेखन, चर्चा आणि उपक्रमांसाठी या संकेतस्थळाचा उपयोग करावा ही विनंती.

सहमत आहे..

संपादन मंडळातील सदस्य आपापल्या कामाचा व्याप सांभाळून संपादनात सहकार्य करत असतात त्यामुळे वेळेच्या उपलब्धतेनुसार संपादनाचा अवधी कमी जास्त होऊ शकतो या वास्तवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

सहमत आहे. वास्तवाची जाणीवही आम्हाला आहे. नव्हे, ती तशी ठेवणे जरुरीचे आहे असेही आम्ही मानतो!

अवांतर-

बाय द वे, तसे आम्ही बर्‍याचदा ऑनलाईन असतो, त्यामुळे आम्हीही संपादन मंडळावर काम करायला तयार आहोत!

वीस रुपये रोजी अन् दोन टाईम चा द्या! काय? जमवून टाकू त्यात! ;)

आपला,
(रोजंदारीवरील कामगार!) तात्या.

मिसळपाव डॉट कॉमच्या संपादक मंडळात प्रवेशभरती सुरू आहे. इच्छुकांनी संत तात्याबांकडे अर्ज करावेत! ;)

शंका

उपक्रम यांना,
नमस्कार.

आपले लेखनविषय मार्गदर्शन वाचले. त्यामध्ये हे वाक्य आहे-

"...या संकेतस्थळाचे स्वरूप टिकून राहण्यासाठी इतर लेखनप्रकार जसे की स्वरचित कविता, ललित स्वरूपाचे लेखन इ. इथे होणे अपेक्षित नाही. "

याबद्दल मला अशा शंका आहेत-

१. "स्वरचित कविता" चालणार नाहीत म्हणजे इतरांच्या कविता चालतील का?
२. आपल्या दृष्टीने सगळ्याच कविता किंवा ललित लेखन माहितीपूर्ण नसते का? ते तुम्ही कसे ठरवता?

शंकानिरसन होईल ही अपेक्षा.

धन्यवाद.
(उपक्रमावर नवीन)मेघदूत.

हे बरे!

माहितीप्रधान लेख, चर्चा आणि समुदाय असे उपक्रमाचे स्वरूप टिकून राहण्यासाठी उपक्रमच्या या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत नसलेले लेखन अप्रकाशित करण्यात येते.

हे मान्य आहे. पण मग

मदर्स डे
मेरे मन ये बता दे तू...
चुपके चुपके चल री पुरवैय्या
'स्वप्नसुंदरी' हजार किलोची...
आजचे माहितीपूर्ण लेखन
अनधिकृत स्मशानभूमी?

या लेखनात लेखनविषयक अपेक्षा स्पष्ट पणे कशा काय प्रतीत होतात बरे?
संपादन मंडळातील सदस्य आपापल्या कामाचा व्याप सांभाळून संपादनात सहकार्य करत असतात त्यामुळे वेळेच्या उपलब्धतेनुसार संपादनाचा अवधी कमी जास्त होऊ शकतो या वास्तवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.

हे असेल तर आधी आलेला लेख आधी जायला हवा. तसे न होता हे सगळे लेखन जसे आहे तसेच ठेवून,
काही विशिष्ट लेख त्वरेने अप्रकाशित का केले जातात हे जाणणे पण माहितीपूर्ण राहील असे वाटते.

आपला
(निरागसपणे जाणून घेणारा)
गुंडोपंत

"मराठी संकेतस्थळांवरील संपादन/व्यवस्थापन पारदर्शक असावे ह्याचे वरूण समर्थन करतो, त्याचे मी समर्थन करतो!"

बरं झालं खूलासा झाला.

नमस्कार,
उपक्रम चा खूलासा या निमित्ताने बरा आला.मला या निमित्ताने आपले लक्ष एका गोष्टीकडे वळवायचे आहे,ते हे की,हल्ली काही विद्वान मंडळी माहिती देत आहेत.पण इतकी भरमसाठ देत आहेत की,एकदा माहिती पूर्ण लेखन टाकले (बैलांना वैरण टाकल्याप्रमाणे)आणि मग किती तो रवंथ.सारांश :- २०० शब्द,३०० शब्द अशी मर्यादा नाही का टाकता येणार.कधी कधी इतकी माहिती पूरवील्या जाते की ही कशाची माहिती आहे, असा प्रश्न पडतो.अर्थात सर्वच तसे नाहीत.बघा होत असेल तर..?नाहीच जमलं तरी, येथे आम्ही गूण्यागोविंदाने नांदतो आहोतच.


आपला
ध्येय धोरणांचा आदर करणारा
उपक्रमी.

वैरण

एकदा माहिती पूर्ण लेखन टाकले (बैलांना वैरण टाकल्याप्रमाणे)आणि मग किती तो रवंथ.

बैलांसमोर गाडाभर वैरण टाकली तरी अपचन होऊ न देता खायची किती हे त्यांना कळत असावे.

 
^ वर