जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

'टूडीवर्ल्ड'च्या अद्भुत दुनियेत!

आपल्यातील अगाध परंतु मर्यादित बुद्धीमत्तेच्या कुवतीनुसार आपण लांबी, रुंदी व उंची या त्रिमिती (व काळ ही चौथी मिती) विश्वात राहणारे प्राणी आहोत याची आपल्याला कल्पना आहे. परंतु विज्ञान कथालेखक मात्र अनेक वेळा बहुमिती विश्वात आपल्याला नेतात व तेथील चक्रावून सोडणाऱ्या गोष्टीतून आपले मनोरंजन करत असतात. त्यांच्या मते त्या बहुमिती विश्वातील माणसं आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असतात. मेंदूला थोडे जास्त ताण दिल्यास विज्ञान कथालेखक वर्णन करत असलेल्या बहुमिती विश्वाची आपण कल्पना करू शकतो व त्यात राहणाऱ्या सूपरइंटेलिजेंट प्राण्यांच्या जीवनाचा वेध घेऊ शकतो.

राज्य - हक्क - विकास आणि देश

सध्या नितिश कुमारांचा मुद्दा - "बिहारला विषेश दर्जा हा बिहारचा हक्कच आहे" चर्चेत आहे. या मुद्यामागे असलेले राजकारण सर्वचजण जाणतात. पण हि एक धोक्याची घंटा वाटते आहे. भारतातले प्रादेशिक पक्ष, प्रत्येक राज्याच्या मागण्या आणि त्यासाठीचे होणारे केंद्र सरकार बरोबरचे सौदे जर असेच सुरु राहिले तर आपली देश हि संकल्पना लवकरच बदलत जाईल असे वाटते. या विषयाला धरुन अनेक प्रश्न समोर येतात. ते तसे जुनेच आहेत. पण सध्याच्या वातावरणाला जास्त अस्थिर बनवणारे आहेत. तुम्हाला काय वाटते?

बिहारला असा विषेश दर्जा द्यावा का?
असे केल्यास अशी कोणती राज्य आहेत ज्यांना असा दर्जा देणे जास्त गरजेचे आहे?

जैसे सूर्याचे न चलता चालणे

जैसे सूर्याचे न चलता चालणे
भगवद्गीतेतील चौथा अध्याय "ज्ञान, कर्म, संन्यास,योग" यातील श्लोक क्र.१७ आणि क्र.१८ पुढीलप्रमाणे:
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं,बोद्धव्यं च विकर्मण:।
अकर्मणश्च बोद्धव्यं, गहना कर्मणो गति:।१७।
कर्मण्यकर्म य: पश्येदकर्मणि च कर्म य:।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्त: कृत्स्नकर्मकृत् ।१८।
या श्लोकांचा अन्वयार्थ:----
कर्मण: अपि बोद्धव्यम्।....कर्माचे स्वरूपसुद्धा समजून घेतले पाहिजे.
च विकर्मण: बोद्धव्यम्।....आणि विकर्म म्हणजे काय तेही जाणून घ्यायला हवे.

असिम त्रिवेदी

असिम त्रिवेदीला अटक झाल्यानंतर माध्यमांमधे बराच धुरळा उडाला. इतके दिवस असिम त्रिवेदी हा प्राणी कोण आहे हे बर्‍याच जणांना (मला तरी) माहितही नव्हते. माध्यमांमधुन नाव झळकू लागल्यावर कुतुहलाने ह्याची चित्रे शोधली. संविधानावर लघवी करणारा कसाब किंवा विधानसभेचे केलेले शौचकुप वगैरे चित्रे फारंच सुमार वाटली. त्यामधे ना कसला विनोद होता ना चित्रकारी. अर्थातच सुमार चित्रे काढतो म्हणून कुणाला अटक करू नये. ह्याला अटक झाली आणि त्यामुळे अर्थातच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी वगैरे ओघाने आलेच.

उपभोक्ता ग्राहकासाठी पर्यायांची गरज

आपल्यासमोरील अडचणीमधून सुसंगतपणे आणि विचारपूर्वक मार्ग काढण्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा सर्व सुबुद्ध भारतीय नागरिकांनी किरकोळ विक्री क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रवेश देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे असे मला वाटते. भारत सरकारने काही दिवसांपूर्वी, अखेरीस, मोठी राजकीय जोखीम अंगावर घेऊन, या बहुराष्ट्रीय कंपन्यांना किरकोळ विक्री क्षेत्रात त्यांचे मताधिक्य राहील किंवा 51% समभाग त्यांच्या हातात राहतील अशा नवीन कंपन्यांची स्थापना करून या क्षेत्रात प्रवेश देण्याचे मान्य केले आहे.

ओझोन दिनाच्या निमित्ताने

ओझोन दिनाच्या निमित्ताने..

एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4

अजंठा येथील गुंफा क्रमांक 9 ही आपण आधी बघितलेल्या 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच एक चैत्य गृह आहे. आयताकृती आकाराची असलेली ही गुंफा मात्र बर्‍याच लहान आकाराची आहे. ही गुंफा 22 फूट 9 इंच रूंद, 45 फूट खोल आणि 23 फूट 2 इंच उंच आहे.

माहिती

'जीवन रसायन चिकित्सा शास्त्र अर्थात बाराक्षार चिकित्सा पद्धती'
लेखक - डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले
संस्थापक - श्रीकृष्ण होमियो फार्मसी, पुणे.

हे पुस्तक पुण्याव्यतिरिक्त इतर शहरांत कुठे उपलब्ध आहे का?
असल्यास, संबंधित दुकानांचा पत्ता मिळू शकेल का?

लेखनविषय: दुवे:

ईदका चाँद आणि ब्ल्यू मून

या दोन्ही प्रकारच्या चंद्राचे उदाहरण साधारणपणे 'दुर्मिळ' या एकाच अर्थाने दिले जाते. एकादा माणूस सहसा भेटेनासा झाला तर त्याला उद्देशून "तुम तो भाई अब ईदका चाँद हो गये हो!" असे म्हंटले जाते आणि क्वचित कधी तरी घडणार्‍या घटनेला 'वन्स इन ए ब्ल्यू मून' असे म्हणतात. या दोन्ही प्रकारचे चंद्रदर्शन थोडे दुर्लभ असले तरी त्या अगदी वेगळ्या आणि परस्पराविरुध्द प्रकारच्या घटना असतात. ईदचा चंद्र दिसलाच तर तो अत्यंत फिकट रेघेसारखा दिसतो तर ब्ल्यू मून हा पौर्णिमेचा चंद्रमा चांगला गरगरीत आणि पूर्ण वर्तुळाकृतीच्या रूपात असतो.

वॉटर किट वापरून कार चालवणारा पाकिस्तानचा "रमर पिल्ले"!

पाला पाचोळा, जडी - बुटी सारख्या वनस्पतीजन्य वस्तूंचा वापर करून जगातील कुठल्याही प्रकारचा असाध्य रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो याबद्दल तुम्ही चुकून जरी असहमती दर्शवली तरी या भानगडीत मी का पडलो असे तुम्हाला वाटू लागेल व तसले विधान केल्याबद्दल पश्चात्तापाची वेळ तुमच्यावर येईल. परंतु केवळ रोगोपचारच नव्हे तर आपल्या महान देशाची इंधन समस्यासुद्धा वनस्पती इंधनाच्या अभूतपूर्व शोधातून चुटकीसरशी सुटू शकते यावर 1990च्या दशकात अनेकानी विश्वास ठेवला होता व या वनस्पती इंधनाचा महान संशोधक, केवळ हायस्कूलपर्यंत शिक्षण झालेला, रमर पिल्ले हा तमिळ युवक होता हे अनेकांच्या आठवणीत असेल.

 
^ वर