वाट्टेल ते...

वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.

Comments

सहमत.

प्रत्यक्षात येणं कितीही अवघड असल,तरी तुमच्या स्वप्नाचा ध्यास सोडु नका.करावीशी वाटेल ती प्रत्येक गोष्ट करुन पाहा.जिथे जावंसं वाटेल तिथे जा.हवं तसं जगा.हवं ते लिहा. आयुष्य एकदाच मिळतं.आणि संधीही एकदाच मिळते !
तर पेर्ते व्हा.माफ करा लिहीते व्हा.वाचक व्हा.कुणाच्या ही लेखनाची मनमोकळी दाद व्हा !
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

काहीतरी

काही ही न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिलेलं बरं, पण काहीतरिच लिहिण्यापेक्षा काही ही न लिहिलेलं उत्तम!

'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.

:-)

१००% सहमत म्हणून काहीही लिहीत नाही. ;-)

सहमत

नो न्यूज इज गुड न्यूज. :)

पटल

आपलं म्हणण पटल.

पटल/पटलं

पटल हा शब्द येथे अभिप्रेत नाही असे वाटते. या शब्दाचा अर्थ पडदा या शब्दास जवळचा आहे. उदा. नेत्रपटल
"आपलं म्हणणं पडदा" या वाक्यास तसा काहीच अर्थ नाही.

मात्र येथे आपण "पटलं" या शब्दाचा वापर केला तर अर्थ स्पष्ट होतो.

"पटलं" का?

धन्यवाद

मराठी लिहिण्याची सवय करतो आहे.

-राजीव.

राजीवराव,

(मजकूर संपादित)

मराठी लिहिण्याची सवय करतो आहे.

आपल्याप्रमाणेच इतरही काही मंडळी, ज्यांच्याकरता संगणकाचा वापर, आंतरजालाचा वापर, मराठी टंकलेखन या सारख्या गोष्टीं नेहमीच्या सरावाच्या नाहीत/नसू शकतात, ती मंडळीही मराठी टंकलेखनाची सवय करत असतील असे वाटते!

आणि तसे करतांना त्यांच्या हातून साधना कोळीण ऐवजी, साधना कोळीन असे टंकीत होऊ शकते!

-- तात्या अभ्यंकर.

तात्या आम्ही आपले आभारी आहोत.

आपल्याप्रमाणेच इतरही काही मंडळी, ज्यांच्याकरता संगणकाचा वापर, आंतरजालाचा वापर, मराठी टंकलेखन या सारख्या गोष्टीं नेहमीच्या सरावाच्या नाहीत/नसू शकतात, ती मंडळीही मराठी टंकलेखनाची सवय करत असतील असे वाटते!

आणि तसे करतांना त्यांच्या हातून साधना कोळीण ऐवजी, साधना कोळीन असे टंकीत होऊ शकते!

तात्या,
मला व माझ्या सारख्या नवलेखकांना आपण समजुन घेतलंय, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

उपमुख्यमंत्री!

तात्या,
मला व माझ्या सारख्या नवलेखकांना आपण समजुन घेतलंय, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.

बास काय बिरुटेसाहेब? अहो कमालच करताय आपण! त्यात आभार कसले? ! ;)

आम्ही आमच्या माणसांना नेहमीच सांभाळून घेतो! ;)

आणि अहो आम्ही तर आपल्याला उपक्रमाचा उपमुख्यमंत्री करण्याच्या विचारात आहोत..!!! आहात कुठे?.......;)

आपला,
तात्या पवार!

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

कोणाचं

राजीव,
तुम्हाला कोणाचं म्हणणं पटलं?

पल्लवी

^ वर