आवाहन !
मी मराठी, मी महाराष्ट्रीयन, मी लेखन, मी कवी, मी मराठीचा उद्धार कर्ता पण मी भारतीय कुठे आहे ?
मराठी महाजालाच्या जगाच्यात आजकाल मराठी अव्यक्त नाही आहे, शेकडो ब्लाग, काही संकेतस्थळे व माहीतीच्या जगात मराठीची उपस्थिती ही सर्वानाच माहीत आहे मराठीवर्ड-मनोगत-मायबोली-माझे-शब्द-उपक्रम ईत्यादी, पण मला सर्वत्र मराठी लोकचं भेटले पण मला भारतीय मराठी कुठेच भेटला नाही काय कारण असावे ?
भारतीय मराठी हा नवीन शब्द आहे ना ? मला ही नवीन आहे काय करावे !
पण मला नाही भेटला हा मानुस (मनुष्य) का ? हाच प्रश्न मला त्रास देत आहे.
काही दिवसापासुन म्हणजेच ह्म्म एक वर्षाच्या आसपास मी मराठी महाजालावर मी विविध नावाने वावरत आहे तसेच काही ईतर भाषेतील संकेतस्थळे देखील मी पाहात आहे पण मला मराठी व ईतर भाषेच्या संकेतस्थळावर काही गोष्टी अढळल्या त्या मला विस्मयीत करण्यास पुर्ण होत्या.
जेवढे लेखन सामाजिक गोष्टीसाठी हिंदी भाषेमध्ये होते, बंगाली भाषेमध्ये होते तेवढी सामाजिक जाण मला मराठी ई-साहित्यामध्ये भेटली नाही.
एकजण तरी मला सांगा मागील वर्षामध्ये (२००६-२००७) देशामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या पण एके जागी , एका संकेतस्थळावर , एका ब्लाग वर तुम्हाला काही खबर लागली ? नाही ना ? मग ठीक आहे ! काही ह्या बातम्या तुम्हाला माहीत आहेत का ? प्लीज मला ही सांगा. मला माहीत आहे तुम्हाला त्या बातम्या त्या खबर माहीत आहेत पण तुम्ही किती जागी प्रतिसाद दिले ते सांगा, काही हरकत नाही तुम्हाला त्या बातम्या माहीत नसल्यातर मी येथे त्यातील काही निवडक बातम्या येथे देत आहे वाचा विचार करा व मगच लिहा.... मला माहीत आहे शक्यतो येथे एकाद दुसराच प्रतिसाद येणार आहे मी गेली दोन महीने ह्यावरच प्रयोग करीत आहे ! ह्याचा अनुभग आहे मला !
बातम्या ज्या प्रत्येक भारतीयास विचार करावयास लावतील अश्या पण खेद आहे मला मराठीतील एका ही मानवाच्या लेखाची अथवा प्रतिसादाची माहीती कुठेच भेटली नाही:
१. निठारीकांण्ड
२. पोलीओ ची हार
३. आतंकवाद
४. सुचना अधिकार ( १. उपक्रम व २. माझे शब्द येथे एक लेख मिळाला होता)
५. नक्षलवाद
६. भाषीय विवाद
७. शेतकरांच्या आत्महत्या
८. राजकारण
९. विजेची अडचणी
१०.पोलीसांचा नाकर्तेपणा वर
११.राजकारणावर
१२.फिल्मी राजकारण (मराठीमध्ये देखील असावे)
१३.ईतर
१३ हा आकडा अशुभ मानतात पण काय करु !
जर तुम्ही ह्या विषयी कुठेही लिहले असेल (लेख, प्रतिसाद, कविता, गझल काहीही) तर त्याचा पता येथे लिहावा ही अपेक्षाच नाही तर विनंतीच आहे.
कृपा करुन येथे जरुर लिहा तुचे दुवे द्या, व माझा समज... गैरसमज दुर करा ! प्लीज करा !
Comments
समज
श्री. बाबा त्रिकाल,
आपले म्हणणे पटले. या संकेतस्थळावर मी गेले दोन-तीन दिवस येत होतो परंतु नाविन्यपूर्ण असे काहीच मिळाले नाही. चित्रपटाची परीक्षणे, कोणताही निर्णय न देणार्या जुन्या चर्चा, संकेतस्थळावर टीका एवढेच या संकेतस्थळाचे स्थान दिसून आले.
येथे कविता आणि ललित लेखाला वाव नाही म्हणताना
१. चुपकेचुपकेचे केवळ संवाद - याला परीक्षण का म्हणावे?
२. साहिरच्या गाण्यांची यादी
३. बंबईकु सलाम - लेखक त्याला कविता म्हणत नाही म्हणून येथील व्यवस्थापनाने ते मान्य केलेले दिसते. धन्य वाटले.
४. ऐच्छिक अपत्यहीनता
५. उपद्रवी सदस्यांना कसे हाताळावे? - ही बहुचर्चित चर्चा आणि तिचे प्रतिसाद.
६. अरे! आपल्याला संस्कृती आहे की नाही ही नाट्यछटा.
ही केवळ पहिल्या पानावरील यादी आहे. मराठी साहित्य हलके फुलके राखल्याने आपण मोठे साहित्यिक होतो अशी बर्याच विद्वान विदुषींचा ग्रह असतो तो मला येथेही जाणवला.
या संकेतस्थळाच्या चालकांनी त्याचा खुलासा करावा, एकाच प्रकारची अनेक संकेतस्थळे जसे मायबोली, मनोगत, माझे शब्द, उपक्रम आणि भविष्यात येणारी अनेक, सुरु करुन लोकांना नेमके काय मिळवायचे असते याची कल्पना येत नाही.
वेगळे लिहीण्याला येथे प्रोत्साहन दिसले नाही, उलट काही टुकार लेखांना भरभरून प्रतिसाद दिसले.
गेल्या काही दिवसांत येथे चकरा मारून निराशा झाली.
- राजीव.
मला संकेतस्थळे काय करित आहे
मला संकेतस्थळे काय करित आहेत अथवा काय करतील ह्याच्याशी काहीच देणे घेणे नाही , मला फक्त ईतकीच् माहीती हवी आहे की मी भारतीय ह्या नात्याने महाजालावर वावर करण्या-या मराठी मानसाने येथे काय केले (महाजालावर).
Orkut वर देखील मला काहीच माहीति मिळाली नाही ह्याचेच जास्त दुखः आहे, माफ करा पण कविता, लेख, कथा हेच सर्वस्व नाही असे मला वाटते !
बाबा त्रिकाल !
हम्म!
मला तरी येथे असे प्रोत्साहन दिसले. काही काळजीपूर्वक आणि माहितीपूर्ण प्रतिसादांचे लेखात केलेले रुपांतर किंवा सदस्य संख्या ५०० च्या घरात (त्यातील खोटे किती कोणास ठाऊक?) असताना एखाद्या लेखाला आलेले १०+ प्रतिसाद ही प्रोत्साहनाचीच पावती वाटते. टुकार काय वाटते हे मात्र ज्याने त्याने ठरवावे.
राजीवराव,
मराठी साहित्य हलके फुलके राखल्याने आपण मोठे साहित्यिक होतो अशी बर्याच विद्वान विदुषींचा ग्रह असतो
हे वाक्य फारसे समजले नाही. असो! खुलासा नाही केलात तरी चालेल! ;)
एकाच प्रकारची अनेक संकेतस्थळे जसे मायबोली, मनोगत, माझे शब्द, उपक्रम आणि भविष्यात येणारी अनेक, सुरु करुन लोकांना नेमके काय मिळवायचे असते याची कल्पना येत नाही.
काय सांगताय? अहो मीदेखील माझे नवे संकेतस्थळ 'मिसळपाव डॉट कॉम' सुरू करण्याच्या विचारात आहे!!
च्यामारी करावं की करू नये? मेंबरं मिळतील की नाही? बाय द वे माझ्या संकेतस्थळाबद्दल काही दोष काढता येतात का हे पाहण्याकरता राजीवराव८२ दोन चार फेर्या तरी नक्कीच मारतील! ;) ------- (स्वगत!)
सुरु करुन लोकांना नेमके काय मिळवायचे असते याची कल्पना येत नाही.
आपणही एखादं संकेतस्थळ सुरू करून बघावं म्हणजे आपल्यालाही कल्पना येऊ शकेल असं मला विनम्रतापूर्वक वाटतं! ;)
माझा कोणाला दुखावण्याचा हेतू नाही परंतु गेल्या काही दिवसांत येथे चकरा मारून निराशा झाली.
काही दिवस येथे चकरा न मारता ब्रेक घेऊन बघा, असंही आपल्याला विनम्रतापूर्वक सांगावंसं वाटतं! ;)
आपला विनम्र,
तात्या.
काय राजीव साहेब,कोणत्या वर्गात आहात ?
राजीव साहेब,
संकेतस्थळावर लेखन कसे असावे,त्याचा दर्जा कसा असावा.हे निच्छीत होईल तेव्हा होईल पण आज तरी मराठी माणसांच्या विचारांच्या आदान प्रदान साठी हे आणि काही संकेतस्थळे नक्कीच उत्तम आहेत. या ठिकाणी मोठा साहित्यिक कोण आहेत हे माहीत नाही. पण हलके फुलके लिहीणारे काही दर्जेदार साहित्यिक येथे नक्कीच आहेत.
राजीव साहेब, ब-याचदा काय होते.५वी चा मुलगा १० वी चा अभ्यासक्रम असा पाहीजे असे म्हणतो.तेव्हा तो काही फार हुशार असतो असे मानन्याचे काही कारण नाही. मी आपल्याला विनंती करतो की,आपणही एक चांगले संकेतस्थळ निर्माण करावे.एखादा लेख लिहावा. तो लेख दर्जेदार असो वा नसो मी तुमच्या लेखनाला आपण मराठीतुन अभिव्यक्त होत आहात. म्हणुन् माझ्याबरोबर् इतरही अनेक जेव्हा प्रतिसाद देतील.तेव्हा मात्र तुम्हाला कोणी टुकार म्हटले तर वाइट वाटुन धेऊ नका,म्हणजे झाले.(माझा आपल्याला दुखावण्याचा हेतु नाही.)
आपला
मराठी संकेतस्थळांवर प्रेम करणारा.
इथे पहा
१. हे पहा. इथे कदाचित् तुम्हाला अपेक्षित असलेले मिळेल.
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4927.html?1177426045
इथे बरीच सद्यस्थितीबद्दल चर्चा चालू दिसते. तुम्हाला ह्व्या त्या दर्जाची आहे का नाही हे तुम्हालाच ठरवावे लागेल.
२. आणि इथे नुसती चर्चा करण्यापेक्षा ज्यानी प्रत्यक्ष काही केले आहे त्यांचे अनुभव आहेत. विशेषत: आशा -एक नवीन दिशा" हा अनुभव वाचण्यासारखा आहे. या अनुभवात तुम्हाला जे अपेक्षित आहे (महाजालावर मराठी माणसाने काहितरी विधायक करणे) ते आले आहे असे वाटते.
३. इथेही पहा..."एक पणती, माझीही !"
आता एक प्रश्न तुम्हाला. स्पष्ट बोलतो राग मानू नका.
जेन्व्हा तुम्हाला वाटले कुणी काहिच केले नाही तर मग तुम्ही काय केले ? तुम्हाला कुणी अडवले होते?
का तुम्ही फक्त दु:ख केले, दुसरे कुणीच काही का करत नाही याचे?
माझे मत
नमस्कार बाबा त्रिकाल,
आपले लिखाण मी माझे शब्द या संकेतस्थळावर सुध्दा वाचले आहे.आणि त्यावरून आपल्याला भारतीय समाजाविषयी खरोखरच तळमळ आहे याची खात्री पटली.
मी हिंदी, बंगाली भाषांमधील उपक्रमसारखी संकेतस्थळे वाचायला गेलेलो नाही (खरं सांगायचं तर मला बंगाली अजिबात येत नाही आणि हिंदी सुध्दा बॉलिवूडमधील चित्रपट बघून थोडीफार येते). तेव्हा मराठी आणि इतर भाषांमधील संकेतस्थळे यामधील तुलना मला करता येणार नाही. आपण उल्लेख केलेले निठारी कांड इत्यादी विषय महत्वाचे आहेत यात शंकाच नाही. पण मला वाटते की प्रत्येक माणूस उपक्रमसारख्या संकेतस्थळावर वेगवेगळ्या उद्देशांनी येत असतो.माझा स्वतःचा उपक्रम, मनोगत सारख्या संकेतस्थळांवर यायचा उद्देश म्हणजे मायबोली मराठीतून इतरांशी संवाद साधणे, मनोरंजन आणि जितके जमेल तितके विविध विषयांवर विचाराचे आदानप्रदान करणे एवढाच आहे. जे रोजच्या जीवनात बघायला मिळते (किंबहुना बघावे लागते) अशाच विषयांवर अशा संकेतस्थळांवर चर्चा होऊ लागली तर खरं सांगायचं तर ते कंटाळवाणे आणि नीरस होईल असे माझे वैयक्तिक मत आहे. अशा गोष्टींवर चर्चा नको असे मी नक्कीच म्हणत नाही पण संकेतस्थळावर मराठी भाषेतील इतर हलक्या फुलक्या गोष्टी असल्या तर त्यात वाईट काय आहे?
मला असे वाटते की प्रत्येक व्यक्तीला एखाद्या विषयात रस असतो आणि आपल्या आवडीच्या (किंवा आपल्याला माहिती असलेल्या) विषयावर प्रत्येक व्यक्ती प्रतिसाद देत असते. आणि असे सर्व लोक उपक्रम सारख्या संकेतस्थळाला परिपूर्ण बनवतात. समाजाला जसे सर्व प्रकारचे लोक आवश्यक आहेत तसेच उपक्रमसारख्या संकेतस्थळाला देखील! एक उदाहरण द्यायचे झाले तर चंद्रशेखर वेंकट रामन हे त्यांच्या वेळचे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि रामानुजम हे गणितज्ञ होते.त्यांच्या काळातच भारताचा स्वातंत्रलढा चालू होता.पण रामन-रामानुजम यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. (चु.भू.दे.घे) पण म्हणून आपण त्यांना दोष देतो का? नाही ना? कारण तो त्यांचा पिंडच नव्हता. तसेच सावरकरांनी रामन परिणामाचा शोध लावला नाही म्हणून आपण सावरकरांना दोष देत नाही. समाजाला टिळक-सावरकर जसे आवश्यक होते तसेच रामन-रामानुजम सुध्दा! त्याचप्रमाणे उपक्रमसारख्या संकेतस्थळाला तुमच्यासारखे सामाजिक विषयांवर लिहिणारे आवश्यक आहेत तसेच हलकेफुलके लिखाण करणारे सुध्दा. नाहीतर हे संकेतस्थळ सर्व लोकांना आकर्षित करणार नाही असे मला वाटते. आणि म्हणूनच सामाजिक विषयांवर न लिहिणारे कमी महत्वाचे आहेत असे नक्कीच नाही.
राजीव, आपल्या भावना तीव्र आहेत हे समजू शकतो.पण कोणताही लेख टुकार आहे की नाही याचा मापदंड कोणता?तो एखाद्याला आवडला नाही हा की तो समजला नाही हा?मी तात्यांच्या लेखनशैलीचा मोठा चाहता आहे. पण ते शास्त्रीय संगीतावर लिहितात त्यातले मला काहीही कळत नाही कारण विविध राग आणि शास्त्रीय संगीतातील इतर गोष्टींची थोडीही माहिती मला नाही.पण मला कळत नाही म्हणून तात्यांचे शास्त्रीय संगीतावरील लेख टुकार होतात का?
आपल्या दर्जेदार लेखनाची वाट बघत आहे.
---विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर)
टूकार
<<आपल्या दर्जेदार लेखनाची वाट बघत आहे.
ह्ये म्हनजी हाटेलात जाऊन जेवन अजाबात आवडल न्हाइ म्हनून मालकाला 'कोंबडी जमली नाय रं बाबा' असं सांगितल्यावर.. मालकानं वर आपल्यालाच....
..."आपल्या फक्कड कोंबडीची वाट बघत आहे" अस म्हंटल्यावानीच झालं की!
तिच्यामारी आमी पब्लिक हाये.. आनि पब्लिकच ठरिवनार काय लिवल्यालं टूकार आनि काय लिवल्याल दर्जेदार.. तवर तुमच आनि मोनिकाचं चालू द्या..
क्लिंटनराव,
माझा स्वतःचा उपक्रम, मनोगत सारख्या संकेतस्थळांवर यायचा उद्देश म्हणजे मायबोली मराठीतून इतरांशी संवाद साधणे, मनोरंजन आणि जितके जमेल तितके विविध विषयांवर विचाराचे आदानप्रदान करणे एवढाच आहे.
जे रोजच्या जीवनात बघायला मिळते (किंबहुना बघावे लागते) अशाच विषयांवर अशा संकेतस्थळांवर चर्चा होऊ लागली तर खरं सांगायचं तर ते कंटाळवाणे आणि नीरस होईल असे माझे वैयक्तिक मत आहे.
सहमत आहे!
मी तात्यांच्या लेखनशैलीचा मोठा चाहता आहे. पण ते शास्त्रीय संगीतावर लिहितात त्यातले मला काहीही कळत नाही कारण विविध राग आणि शास्त्रीय संगीतातील इतर गोष्टींची थोडीही माहिती मला नाही.पण मला कळत नाही म्हणून तात्यांचे शास्त्रीय संगीतावरील लेख टुकार होतात का?
क्लिंटनराव, आपण माझ्या लेखनशैलीचे चाहते आहात हे वाचून आनंद वाटला आणि त्याकरता व्यक्तिशः मी आपला आभारी आहे.
आपला,
तात्या.
(सालसचा पूर्वीचा प्रियकर! ;)
विविध संकेतस्थळे यायला हवीत.
नमस्कार,
"समाजाला जसे सर्व प्रकारचे लोक आवश्यक आहेत तसेच उपक्रमसारख्या संकेतस्थळाला देखील! "
पटले!
विल्यम जेफरसन क्लिंटन (मोनिकाचा पूर्वीचा प्रियकर),
आपण छान प्रतिसाद दिला आहे.
मात्र त्रिकाल बाबा यांच्या म्हणण्या नुसार, अजून विविध संकेतस्थळे यायला हवीत. हे पण खरे आहे. स्पेशलायझेशन चा प्रयत्न (विद्वत्तापुर्ण लिखाण/लेख/अभ्यास) उपक्रम ने करुन पहिला आहे. (पण आमच्या सारख्यांनी मनोगताला पर्याय म्हणून त्याकडे पाहीले - याचा अर्थ अशी गरज पण आहेच!) विविध संकेतस्थळे आणि त्याचे सदस्य वाढणे, हे फार वेगात घडेल. युनिकोड ने ही क्रांति घडवली आहे.
मराठीचा प्रवाह पुढे मार्ग नक्किच काढेल.
मागणी वाढेल तसा पुरवठा वाढेलच!
(अपेक्षा आहे, मरठी शु.चि. 'सगळी' कडे असेल आणी असे लिखाण वाचावे लागणार नाही )
टूकार
<<आपल्या दर्जेदार लेखनाची वाट बघत आहे.
ह्ये म्हनजी हाटेलात जाऊन जेवन अजाबात आवडल न्हाइ म्हनून मालकाला 'कोंबडी जमली नाय रं बाबा' असं सांगितल्यावर.. मालकानं वर आपल्यालाच....
..."आपल्या फक्कड कोंबडीची वाट बघत आहे" अस म्हंटल्यावानीच झालं की!
तिच्यामारी आमी पब्लिक हाये.. आनि पब्लिकच ठरिवनार काय लिवल्यालं टूकार आनि काय लिवल्याल दर्जेदार.. तवर तुमच आनि मोनिकाचं चालू द्या..
माहितीपूर्न
खालील इषयांमंदी माहीती द्येनारं ह्ये आव्हान आवडलं
भाषा
अर्थकारण
वाणिज्य
व्यवस्थापन
गणित
तंत्रज्ञान
विज्ञान
वैद्यकशास्त्र
इतिहास
तत्त्वज्ञान
धर्म
शिक्षण
संस्कृती
कला क्रीडा
गीतसंगीत
चित्रपट
प्रतिशब्द
प्रवास
माझी उत्तरे..
पण मला सर्वत्र मराठी लोकचं भेटले पण मला भारतीय मराठी कुठेच भेटला नाही काय कारण असावे ?
काय माहीत नाही बुवा!
पण मला नाही भेटला हा मानुस (मनुष्य) का ? हाच प्रश्न मला त्रास देत आहे.
आपल्याला होणार्या त्रासाबद्दल खरंच खूप सहानुभुती वाटते! ;)
पण खेद आहे मला मराठीतील एका ही मानवाच्या लेखाची अथवा प्रतिसादाची माहीती कुठेच भेटली नाही:
आपण स्वतः दिलेल्या १३ कलमी यादीबद्दल कुठे काही लिहिले आहे का? दुवा अवश्य द्यावा. आपण जर दिलेल्या यादीबद्दल लिहीत असाल/लिहिले असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण म्हणून इतरांनीही सदर १३ कलमी यादीवर लिहावे असं मला तरी वाटत नाही. संकेतस्थळांवर कुणी काय लिहावे अन् काय लिहू नये हा प्रत्येक व्यक्तिचा वैयक्तिक प्रश्न आहे असं मला वाटतं.
जर तुम्ही ह्या विषयी कुठेही लिहले असेल (लेख, प्रतिसाद, कविता, गझल काहीही) तर त्याचा पता येथे लिहावा ही अपेक्षाच नाही तर विनंतीच आहे.
आपल्या विनंतीला मान देऊन येथे पत्ता लिहायला मला नक्कीच आनंद वाटला असता, परंतु मी सदर १३ कलमी यादीतल्या मुद्द्यांवर कुठेही काहीही लिहिलेले नाही!
एकजण तरी मला सांगा मागील वर्षामध्ये (२००६-२००७) देशामध्ये काही महत्त्वाच्या घटना घडल्या पण एके जागी , एका संकेतस्थळावर , एका ब्लाग वर तुम्हाला काही खबर लागली ?
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर वर्तमानपत्र व दूरदर्शनवरील बातम्या यामुळे मला २००६ - २००७ मधील देशात घडलेल्या महत्वच्या घटनांबदल सर्व खबर लागली. मराठी संकेतस्थळांवर मी केवळ टाईमपास आणि विरंगुळा याकरता येतो.
नाही ना ? मग ठीक आहे ! काही ह्या बातम्या तुम्हाला माहीत आहेत का ?
हो, सर्व बातम्या माहीत आहेत!
पण तुम्ही किती जागी प्रतिसाद दिले ते सांगा,
एकाही जागी नाही!
बातम्या ज्या प्रत्येक भारतीयास विचार करावयास लावतील अश्या पण खेद आहे मला मराठीतील एका ही मानवाच्या लेखाची अथवा प्रतिसादाची माहीती कुठेच भेटली नाही:
आपण रोजची वर्तमानपत्रे वाचत नाही वाटतं? अहो देशात घडलेल्या प्रत्येक महत्वाच्या बातमीवर सर्व मराठी वृत्तपत्रात अगदी भरभरून माहिती आणि लेख येत असतात. आपल्याला वर्तमानपत्रांतून मराठी माणसांचे संबंधित विषयावरील लेख आणि विचार अगदी विपूल आणि यथेच्छ वाचावयास मिळतील असे वाटते!
आपण मराठी संकेतस्थळांबद्दल जर आपण बोलत असाल तर मी वर म्हटल्याप्रमाणे तिथे कुणी कशावर लिहावं आणि कशावर लिहू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाही का?!
आपला,
(मराठी संकेतस्थळांवर केवळ विरंगुळा आणि टाईमपास करता येणारा!) तात्या.
ते कहीही म्हणोत!
मिलिंदराव आणि तात्या,
'ते' काहीही म्हणोत! आपण करायचा तो टाईम पास करतोच ना!? ;)
मग कशाला ही काळजी?
वर म्हणल्या प्रमाणे - मागणी वाढेल तसा पुरवठा वाढेलच!
हा हा हा!!!
आपला
(निश्चिंत)गुंडोपंत
छे हो!
'ते' काहीही म्हणोत! आपण करायचा तो टाईम पास करतोच ना!? ;)
मग कशाला ही काळजी?
छे हो गुंड्याभाऊ! अहो आम्ही कुठे काळजी करतोय! आम्ही तर मराठी संकेतस्थळं ऊर न बडवता मस्तपैकी एन्जॉय करतो! ;)
तात्या.
धन्यवाद!
आमच्या तात्यांशी मैत्रीचे कारण ह्यात स्पष्ट होईलच :-)
धन्यवाद मिलिंदराव. आपण मला मित्र मानता हे वाचून खूप आनंद वाटला!
असो, वैयक्तिक लेखनाकरता यापुढे खरडवही किंवा व्य नि चा उपयोग करू! नाहीतर उपक्रमकाका ओरडतील! ;)
तात्या.
जुलैमध्ये येशील तेव्हा न विसरता स्कॉचची बाटली घेऊन ये रे! ;)
मान्य!
"आणि बरेचदा ह्या ऊर बडवणार्यांपेक्षा आम्हाला टाईमपास करणारे स्वतःशी अधिक प्रामाणिक असतात, असा अनुभव येतो."
हे खरंय हो एकदम मान्य!
आपला
(टाईमपास)गुंडोपंत
दोन दुवे
१. संयुक्त राष्ट्रसंघाचा दहशतवाद रोधक अहवाल
२. सुमधुर भाषिणी