एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे.

सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. यात भारतातील विविध प्रांतांची भौगोलिक, ऐतिहासिक, पर्यटनविषयक, सांस्कृतीक ( आहर , पोशाख, राहणीमान, सण, उत्सव इ.) , व्यावसायिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, साहित्यिक इ. बाबींबद्दलच्या माहितीचा प्रामुख्याने समावेश असेल. उपलब्ध होणारी माहिती त्या त्या भाषेत अनुवादित करण्याचे काम सदस्य करतील अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे लेखांमधील त्रुटी दूर करणे, बदल करणे, माहितीचे नियोजन आणि मांडणी अशी स्र्व कामे ही सर्व सदस्यांना करता येतील. गमभनमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व लिप्यांचा ( देवनागरी, गुजराती, गुरुमुखी, बांगला, मल्याळम, तेलुगु, कन्नड, उर्दू) वापर याकामी या संकेतस्थळावर करता येईल.

या संकेतस्थळाबद्दल आपली मते, सुचवण्या, समीक्षा, कल्पना आणि आपला सहभाग यातून संकेतस्थळाचा विकास आणि वृद्धी व्हाही याकरता हा लेखनप्रपंच.

दीपावलीच्या सर्वांना अनेकोत्तम शुभेच्छा.
Logo

- ॐकार जोशी

Comments

अभिनंदन

ओंकार,
एजीओजीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
एजीओजीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
एजीओजीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.
एजीओजीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

अभिनंदन आणि शुभेच्छा!

नमस्कार ओंकार,

आपल्या या कदाचीत "एकमेव" (युनीक या अर्थाने) प्रकल्पाचे अभिनंदन आणि त्यासाठी शुभेच्छा!

विकास

अभिनंदन

अभिनंदन.. यातला "ओजी" कळलं कोण ते ;).. पण एजी कोण आहे?
दोघा 'एजीओजी'चं मनःपुर्वक अभिनंदन! आणि मनापासून शुभेच्छा!!!!

ऋषिकेश

तेच म्हणतो

दोघांना सुद्धा शुभेच्छा! दिवाळीच्या मुहुर्तावर चांगलाच धुमधडका केलात!

आपला,
(आमच्या एजी चा ओजी) भास्कर

आहे तितुके जतन करावे, आणिक मिळवावे,
महाराष्ट्र राज्यची करावे जिकडे तिकडे ॥

मनोगती

तुम्ही उपक्रमी च्या ऐवजी सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे असे लिहीले आहे.चुकून लिहीले का ?
आपला
कॉ.विकि

छिद्रान्वेशी

:)) ... चुकुनच झाले असणार.

 
^ वर