जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....

आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपणा हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते.

का, कसे आणि अनियत जग

का, कसे आणि अनियतजग

डॉ. खान याच्या पत्राचे प्रकाशन ते लिहिल्यानंतर ६ वर्षांनी कशासाठी?

हा माझा लेख कांहींसा जुना आहे. पण घटनेतील गांभिर्य अजूनही आहे. म्हणून इथे पोस्ट केला आहे. सुधीर काळे, जकार्ता
=====================================================
डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या पत्राच्या प्रकाशनाने भारतीय वृत्तपत्रें, नियतकालिकें व टेलीव्हिजनसारखी सर्व माध्यमें यांच्यात सध्या एकच खळबळ माजली आहे. दि. २० सप्टेंबरच्या संडे टाइम्समध्ये श्री. सायमन हेंडरसन यांचा लेख प्रकाशित झाला आहे. (पहा http://tinyurl.com/mm3ll6 हा दुवा). डॉ. खान हे एकेकाळी सर्व पाकिस्तानी जनतेच्या गळ्यातला ताईत असलेले, पाकिस्तानी अण्वस्त्राचे जनक समजले जाणारे शास्त्रज्ञ! त्यांना नीशान-इ-इम्तियाज़ हा उच्चतम पाकिस्तानी मुलकी सन्मान दोनदा व हिलाल-इ-इम्तियाज़ हा द्वितीय क्रमांकाचा मुलकी सन्मान एकदा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळालेला आहे. असे असूनही त्या देशाच्या राज्यकर्त्यांनी स्वत:ची पापे लपविण्यासाठी त्यांना बदनाम करून आज गृहकैदेत टाकले आहे. एका कोर्टाने जरी त्यांना मुक्त केले असले तरी ते आता खरोखर मुक्त झाले आहेत कीं नाहींत याबद्दल शंका घेण्यास जागा आहे.

केतकरांच्या लेखाविषयी

कुमार केतकर यांनी रविवार दिनांक ०१/०८/२०१० रोजी लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये ’टिळक आणि जीना : नुरानींच्या नजरेतून’ या नावाचा लेख लिहिला होता. ही लिंक पाहा.

जर ......... तर मतदान दिवशी पिकनिक साजरि करण्यास काय हरकत आहे ?

विजू भाऊंच्या ह्या प्रतिसादावरून सुचलेले हे लेखन
http://mr.upakram.org/node/2741#comment-44212

इथे विजू भाऊंनी एक विधान केलेले आहे कि,
>> मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का?

लेखनविषय: दुवे:

पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?

नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते.

नातवाच्या जगात (भाग २: एलेक्ट्रीक गिटार)

गावाला कितीही शांतता असली आणि मी कितीही शांतताप्रियतेचा आव आणला, तरी इथे मुला-नातवांच्या आवाजात, गोंधळात, दंग्यात जी मजा, आनंद आहे तो रमणीय प्रदेश असला तरी गावच्या एकटेपणात नाही हे नक्की. आता इथे येऊन तसे बरेच दिवस झालेत.

स्वातंत्र्य

आज स्वातंत्र्यदिन पण खरच आम्हि स्वतंत्र आहोत काय? आमच्या स्वातंत्र्यसैनिकांना हेच स्वातंत्र्य अभिप्रेत होतं का? सर्वसमावेशकता कुठे गेली?

मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,

आज सकाळ मध्ये आता बस्सं...freedom हवंच :) या बद्दल वाचकांना कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला हवेय 'स्वातंत्र्य'?

मराठी संस्थळांचा इतिहास.

येत्या दिवाळीत एका दिवाळी अंकातील लिखाण जालावर प्रसिध्द झालेले असेच घेतले जाणार आहे. या दिवाळी अंकात वर मथळ्यात दिल्या प्रमाणे मराठी संस्थळाचा इतिहास यावर साधारण हजार शब्दांचा लेख प्रसिध्द करायचा आहे.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर