स्वातंत्र्य

आज स्वातंत्र्यदिन पण खरच आम्हि स्वतंत्र आहोत काय? आमच्या स्वातंत्र्यसैनिकांना हेच स्वातंत्र्य अभिप्रेत होतं का? सर्वसमावेशकता कुठे गेली? स्वातंत्र्य आहे पण मुठभर लोकांसाठि. विकास जोतपर्यंत सर्वांपर्यत पोहचत नाहि तोपर्यंत स्वातंत्र्य हे अपर्ण स्वप्न आहे. उरफाटेस्तोर आम्हि महासत्ता आहोत अस ओरडून कुणी महासत्ता होत नसतं, त्यासाठि हवा मनगटात जोर आणि ह्रदयात भारत. प्रतिकिया जाणून घ्यायला आवडेल

लेखनविषय: दुवे:

Comments

हा लेख् वाचा

टाईम्स ऑफ इंडिया मधल्या एका लेखाचा दुवा देत आहे. लेख वाचनीय आहे. आपल्याला वाटणारी निराशा कमी हो ऊ शकेल

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

धन्यवाद

धन्यवाद चन्द्रशेखरजी दुव्याबद्दल येणारा काळ चांगलाच असेल

मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,

आज सकाळ मध्ये आता बस्सं...freedom हवंच :) या बद्दल वाचकांना कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला हवेय 'स्वातंत्र्य'? असा विचार करावयास लावणारा प्रश्न विचारला. हे वाचून वाचकांच्या असंख्य प्रतिक्रिया आल्या .त्या वाचावयास पाहिजेत. visit http://72.78.249.107/esakal/20100812/4729459394379485399.htm . त्यातील ९०% च्या वर वाचकांनी भ्रष्ट्राचार,आणि भ्रष्ट्र राजकारणी नेत्या पासून देशाला स्वातंत्र्य हवे असे स्पष्ट सांगितले आहे. मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे, मला आता भारतापासूनच स्वतंत्र हवे आहे. महाराष्ट्राचा एक वेगळा देश तयार करा, आणि आम्हाला गांधी घराणे, उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर घाणी पासून स्वातंत्र्य द्या. ,"लाज वाटते मी भारतीय असल्याची!!!" , मला वाटत कि नक्षलवादी हे चांगले आहेत मग त्यांच्याच हातात सत्ता द्या ह्या राजकारणी लोकांपासून तरी सुटका होईल.त्याला हाच एक पर्याय आहे. इंग्रज बरे होते असे वाटते... येथे पर्यंत सामान्य जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. ह्या उद्रेकाचे रुपांतर क्रांतीत कधी होवू शकते हे सांगण्या साठी कोण्या ज्योतिष्याची गरज नाही. फक्त एक ठिणगी पडण्याचा अवकाश आहे.
चला, तर मग करू या सुरूवात 'स्वातंत्र्या'साठी !
मेरा अज़्म इतना बलंद है कि पराये शोलों का डर नही मुझे ख़ौफ़ आतिशे-गुल से है कही ये चमन को जला न दे । आज भारताला परकीय देशातील दहाषदवाद्या पासून धोका नाही, नक्षलवाद्या पासून तर नाहीच नाही. तर देशातील व्हाईट कॉलर अंतर्गत दहशतवाद्यान पासून खरा धोका आहे.. १) भ्रष्ट्र , प्रांतवादी, जातीय, बेईमान राजकारणी.२) भ्रष्ट्र मुजोर नोकरशाही ३) अप्रामाणिक व्यावसाईक कट प्रक्टिस करणारे डॉक्टर्स.न्याय खरेदी-विक्री करणारे वकील,अशील, न्यायधीश. ४)काळाबाजार करणारे उद्योगपती,व्यापारी,भूखंड माफिया ठेकेदार ५)भेसळ सम्राट, ६)शिक्षण ,सहकार सम्राट नेते,आणि अखेर IPL चा आणि COMMON WEALTH चा बझार मांडणारे नेते. अतिरेकी मानवतावादी या अंतर्गत दुश्मना पासून देशाला खरा धोका आहे. पाकीस्थान उगीच भारतावर दहाषदवादी हल्ले करून बदनाम होत आहे. पाक ने जर भारतातील भ्रष्ट्र नेत्यांशी, भ्रष्ट्र नोकरश्याही शी, व्यापारयान शी , INDIA मधील उच्चपदस्थांशी हातमिळवणी केली तर कांही दिवसातच दिल्ही वर पाकचा झेंडा फडकेल इतके हे नालायक देशद्रोही आहेत. ( पाक जनतेला मराठी नव्हे राजकारण्यांना समजत नाही म्हणून हे मी उघड लिहिले आहे.)
जुने निजामकालीन लोक सांगत निजाम रस्त्याने जात होता तर सोन्याच्या अशरफिया जनते वर उधळत जात होता. मशिदीच नव्हे तर हिंदू मंदिरांच्या देगभाली साठी शेकडो एकर जमिनी दान देत होता. आता तुमचे नेते सत्यनारायणाच्या दर्शनाला आले तरी यजमाना समोरच देवा समोर चार-आठाणे टाकण्यासाठी हात पसरतात. आणि जमिनी दान देण्या ऐवजी शासकीय,अशासकीय भूखंड स्वतः हाडपतात. आणि हे आजच्या भूखंड प्रेमी नेत्या कडे पाहिल्यावर सत्य वाटते.
आज १५ आगस्ट २६ जानेवारीला झेंडावंदन एक निर्जीवी यांत्रिक समारंभ झाला आहे. एक दीवस आधी पासून देशभक्ती पर हिंदी गाणी, सिनेमे क्रिकेटच्या खेळाडू हिंदी हिरोईन च्या देश प्रेमाच्या फालतू गप्पा, २४ तास बडविल्या जातात. देशप्रेमाचा कृत्रिम माहोल तय्यार केला जातो. पंतप्रधान कमांडोज च्या गराड्यात झेंडा फडकावतात, निर्जीवपणे भाषण देत भ्रष्ट्राचारा विरुद्ध घोषणा करतात (पण एकाही पंतप्रधानाची भ्रष्ट्राचारा विरुद्ध लढायची हिम्मत झाली नाही .) जय हिंद म्हणतात, जनतेला साद देण्यास सांगतात, पण लोक त्यास उस्फुर्त प्रतिसाद देत नाही. सत्तेत कोणताही पक्ष असो,गेल्या ६२ वर्षात हेच नाटक परत परत दाखवल्या जाते. दुसऱ्या दिवशी परत जनतेचा जीवनसंघर्ष सुरु. कारण या स्वातंत्र्यात जनतेला कांहीच महत्व नाही. पैसा, जात, धर्म यावरच भारतीय भ्रष्ट्र लोकशाहीचा डोलारा उभा आहे. म्हणून यांच्या पासून स्वतंत्रता हवी आहे. तरच गर्वाने मेरा भारत महान!! म्हणता येईल नाही तर हे भ्रष्ट्र लोक देश कधीच विकून टाकतील.हे तुम्हा आम्हाला समजणार देखील नाही.
Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

स्वार्थ

राग समजू शकतो पण या गोष्टि दुर करणं एका रात्रीत शक्य नाहि त्यासाठि आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे, मी आणि माझं हि मानसिकता बदलावी लागेल.मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का? देशाला खरा धोका राजकारणी किंवा नोकरशाहि यांच्यापासुन नाहि तर या मध्यमवर्गी स्वार्थी लोकापासुनच आहे.

चोर सोडून सन्याशाला फाशी...

देशाला खरा धोका राजकारणी आणि नोकरशाहीपासून नसून स्वार्थी मध्यमवर्गापासून आहे, याइतके विनोदी वाक्य ऐकले नव्हते. अशा विधानांचा राग येण्यापेक्षा आता कीव येऊ लागली आहे.

मध्यमवर्गाला शिव्या देण्याचे काय कारण? सगळे मध्यमवर्गीय मतदान न करता सहलीला जातात असे म्हणायचे का तुम्हाला? देशाच्या राजकारणात आणि निर्णय प्रक्रियेत या वर्गाला गेली कित्येक दशके स्थान नाही. झोपडपट्ट्यांत पैसे वाटून निवडणुका जिंकणारे, हावरटपणाने जमिनी घशात घालणारे, गुंडांच्या फौजा बाळगणारे, सात पिढ्यांसाठी मालमत्ता जमवणारे राजकारणी आणि त्यांना साथ देणारे लाचखोर नोकरदार बाबू यांनी देशाची लावलेली वाट आपल्याला दिसत नाही आणि धोका कुणापासून तर म्हणे मध्यमवर्गी स्वार्थी लोकांपासून.

राजकारणी आणि नोकरशाहीच्याच बेफिकीरीमुळे हजारो शेतकर्‍यांच्या आत्महत्या डोळ्यासमोर घडत आहेत आणि महागाईचे चटके सगळ्यांना सहन करावे लागत आहेत. या राजकारणानेच समाज एकसंध होण्यापेक्षा जाती जातींमध्ये भांडणे लागली आहेत.

मध्यमवर्गाला एकांगी विचारसरणीतून शिव्या देत बसणे ही कुमार केतकर श्टाईल आहे. सबळ पुरावे असतील तर ठाम मत मांडणे उत्तम अन्यथा दुसर्‍याची निव्वळ नक्कल करण्यात काय अर्थ?

माफि

मध्यमवर्गाची अलिप्तता याबद्दल मला बोलायचं होत भावनेच्या भरात जास्त बोललो असल्यास माफि असावी देशाच्या सध्याच्या परिस्थितीला वरील सर्वच घटक कमी अधिक प्रमाणात कारणीभूत आहेत. पण लोकांची मानसिकता हा प्रश्न कुणीच नाकारु शकत नाहि, देशात माझ्यासारखा मध्यमवर्ग मोठ्या संख्येने आहे त्यामुळे त्याने प्रभावी भूमिका बजावावी असेच मला वाटते कुणी दुखावलं असल्यास क्षमस्व

मुद्दे अमान्य

>> राग समजू शकतो
जर तुम्हाला राग समजू शकतो तर मुद्दे मान्य हवेत, जर मुद्दे मान्य नसतील तर राग समजणार नाही,

>> या गोष्टि दुर करणं एका रात्रीत शक्य नाहि त्यासाठि आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे
ज्यांची मानसिकता बदललेली आहे असे बरेचसे भारतीय आहेत, पण ते आपल्या निवासीच राहतात असे नाही.

>> मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का
मतदान कमी होण्याची बरीचशी करणे आहेत,
१) माणूस कामानिमित्त आपले निवास सोडून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
पोस्टाने वगेरे मत पाठीवीने, त्यासाठी करायला लागणारे प्रयत्न तुलनेने क्लिष्ट आहेत (माझ्या मते ते मुद्दामून तसेच ठेवले गेलेले आहेत.)
२) मत वाया जाने
३) लोक कोणताच उमेदवार लायन न समजणे.
४) गुंड लोकांची भीती.
५) मतदान करताना "कोणालाच मत नाही" ह्याचे बटन उपलब्ध करून दिले पाहिजे.
(नाही कि कोणता फॉर्म भरायला लावला पाहिजे, त्यामुळे सामान्य माणूस तसे करायला कचरतो.)

जर इंटरनेट वर (घर बसल्या) मत देण्याची सोय किव्वा भारतातून कोणत्याही मतदान केंद्रातून तुमचे मत देण्याची सोय केली तर मग बघा काय होईल ते.
(माझ्या मते जे बाहेर पडले आहेत त्यांनी भारताचा विचार करून योग्य मत देणे हे जास्त संयुक्तिक आहे कारण तसे मत देण्यामागे कोणतेच त्यांचे स्वार्थ नसते, पण एका स्थानिक माणसाच्या बाबतीती हा फरक पडू शकतो , त्याचे एखादे काम करून देण्याच्या आमिषाने किव्वा थोडे फार पैसे देऊन टायचे मत विकत घेता येऊ शकते. परदेशी स्थायिक , किव्वा दुसरीकडे गेलेल्या माणसाचे मत विकत घेणे किव्वा त्याला काही लालूच दाखविणे तुलनेने अवघड )

>> देशाला खरा धोका राजकारणी किंवा नोकरशाहि यांच्यापासुन नाहि तर या मध्यमवर्गी स्वार्थी लोकापासुनच आहे.
देशाला आज अंतर्गत, बाह्य, नैसर्गिक असे बरेचसे धोके आहेत.(बाह्य, नैसर्गिक बद्दल सध्या जाऊ द्या,)

सर्व साधारण जनतेला कल सोपे पर्याय निवडण्याकडे असतो.
देशहित शाबूत ठेऊन तसे पर्याय उपलब्ध करून देणे हे राजकारण्यांच्या हाथी असते आणि ते कार्यान्वित करणे नोकरशाहीच्या हाथी असते. असे पर्याय नसतील तर जनता भरकटते.
मध्यमवर्गी लोक काहीप्रमाणात (स्वताच्या धंद्यात वगेरे) स्वार्थी असतात पण देशभक्ती पणाला लावता येन्याइत्पत त्यांची मजल सहसा कधीच जात नाही. ते आपले चिरीमिरी देऊन सात-बारा पास करणे, कागद पत्र वगेरे लवकर करून घेणे, शे पन्नास देऊन वाहतूक पोलिसाकडून स्वताला सोडवून घेणे. त्यांच्या हे असे करण्यामागे सुद्धा त्यांचे झालेले तसे मत हा राजकारण्यांचा प्रभाव असतो.
इतके असून सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे आणि लोकांना आदर्श घालून देणे हे राजकारण्यांचे कर्तव्य आहे. पण जिथे कुंपणच शेत खाते तेव्हा शेत कुठे जाणार.
मुळातच देशहिताचे किव्वा देशविघातक निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत मध्यमवर्गी माणूस येतच नाही. त्यामुळे हा मुद्दा पटत नाही.

अवांतर : CWG मध्ये सुरुवातीले दाखविल्या पेक्षा १५ पट पैसा लागत आहे. ह्यात मध्यमवर्गी माणसाचे नियंत्रण आहे काय ?

काळ्या फिती लावुन काय होणार आहे?

काळ्या फिती लावुन काय होणार आहे? हे वाचा-

आप सबको स्वतंत्रता दिवस की शुभकामनाये देणे से पेहेले............

मै यह लेख विशेशतः हिंदी में इसलिए लिखना चाहता हु की इसको मै अपने सभी मित्रों को भेज सकूँ और वे सब इसे पढ़ सके |

आज सुबह सबह मुझे मेरे एक मित्र ने स्वातंत्र्य दिन की शुभकामनाये भेजी |
स्वतंत्रता दिवस मुझे अच्छा नहीं लगता क्योंकि स्वातंत्र्य दिन की बात से मुझे हमेशा याद आता है की पहेले कभी हमारे हाथोंमे हथकडिया भी थी |
और उससे भी जादा दुःख इस बात से होता है की जिसके कारण हमे हथकडिया मिली वे कारण आज भी जीवित है |

सेकड़ो साल पेहेले कहीसे कुछ लोग आये और देखते ही देखते इस पहाड़ जैसे देश पर उन्होंने कब्ज़ा कर लिया |
इतनी दूर से आकर भी क्यों वे मुट्ठी भर लोग इस महान देश पर भारी पड़े ?
क्यों वे लोग ऐसा करने की जुर्रत कर सके ?
और क्यों वे ऐसा करने में सफल हुए ?
उन्होंने जुर्रत की और वे ऐसा करने में सफल भी हुए, क्योकि उन्हें भारत की एक विशेष कमजोरी का पता था, की भारत के लोग धर्मं और जाती के नाम पे अलग हो सकते है |
वे जानते थे की ये सब लोगोंकी सोच अलग है, इनमे फुंट डालना मामूलीसी बात है |
उन्होंने एक नया हथियार अपनाया, अलग करो और मार दो, और इसके इस्तेमाल में वे सफल हो गए |
हमारे पूर्वज अगर एक साथ मुकाबला करते तो इतिहास कुछ और होता, लेकिन उनसे ये नहीं हो सका. वे अलग अलग होकर लढे, हारे गए और मारे गए |

आज अंग्रेज लोग जाने के ६० साल बाद वही सारे सवाल में फिरसे दोहोराना चाहता हूँ |
क्योकि जो स्थिति अंग्रेज आने से पहेले इस देश में थी वही स्थिति आज भी है, और धीरे धीरे बद से बत्तर होती जा रही है |
तब भी लोग धर्म जाती के नाम से अलग अलग थे. आज भी अलग अलग नजर आते है |
आज भी कुछ चुनिन्दा लोग मराठी, मुस्लमान, बिहार, कन्नड़, ऐसा भेदभाव हमारे अन्दर जगाके हम लोगोंको अलग करना चाहते है |
आप अच्छी तरह से जानते है इन लोगोंको, ये लोग उन अन्ग्रेजोंसे भी जादा ताकतवर, और चालाक है |
पेहेले तो उन अन्ग्रेजोंको जान से मार देना देशभक्ति कहेलाती थी पर आज इनकी तरफ आँख उठाकर भी देखना देशद्रोह केहेलाता है |
ये चुनिन्दा लोग ऐसा क्यों कर सकते है, क्यों वे ऐसा करने में हमेशा सफल होते है ?
वही सवाल, और वही जवाब. हम आज भी एक नहीं है |

कोई भी आपने भारत देश में आताहै तो उसे कही कन्नड, कही सिन्धी, कही मराठी, तो कही मुसलमान, दिखाई देता है, लेकिन उसे कही भी ऐसा आदमी नहीं दीखता जो सिर्फ और सिर्फ एक भारतीय ही है |
हमारे भारत देश में बहोत सी जाती और धर्मं है, हमे उनपे गर्व है. हमारा भारत देश एक ऐसे शरीर की भांति है, जिसके ये सारे अंग है |
ये सारे अंग जब मिलजुलकर एक दुसरे के साथ काम करेंगे तभी वह एक शरीर स्वस्थ्य केहेलायेंगा. अग हम सब लोग साथ में रहेंगे तोही हमारा भारत देश खुशहाल रहेगा और तरक्की की तरफ़ा आगे बढेगा |
वरना हमारी हालत एक ऐसे रोगी जैसे होगी जिसके सारे अंग ठीक से कम नहीं करते. हम लोग लाचारों की भांति किसी दुसरे के देश के हाथ का शिकार बनेंगे या और हमारे हाथ में फिरसे हथकडिया होंगी |
सेकड़ो साल पहेल यहांके एक राजा संभाजी को रात में एक वचन सुनाये दिए की "हे राजन, सो मत, इस रत में तेरा बैरी छुपा है" |
लेकिन आज तो सब जगह से गूंज सुनाई दे रही है की "हे भारत की जनता, आज दिन और रात सारे बैरी के है, इनसे चालकता से बर्ताव कर, इनके मायाजाल में न फंस"
वरना ये तुजे छोटे छोटे लालच दिखाकर तुजसे तेरा ये भारत देश छीन लेंगे. और तेरी आगे आनेवाली नस्लोको को गुलाम बनायेंगे |

ये अंदर के राक्षस क्या कम है, जो उधर ऊपर से चीन, पाकिस्तान जैसे खुले और अमेरिका जैसे छुपे शत्रु भी हमे कांट खाने के लिए उतावले है |
हमने तो कश्मीर को लघबघ गवाया ही है, लेकिन जो बचा हुआ भारत है अगर हम उसे नहीं संभाल सकते तो हमारे पुर्वाजोंके आत्मा को कभी शांति नहीं मिलेगी |

इस आज़ादी के दिन के अवसर पर हे भारत के जनावासियो मै आप लोगोंसे आवाहन करता हूँ की |
किसीको भी स्वतंत्रता दिवस की शुभकामनाये देने से पहेले अपने आप से यह बात तै कर ले |
१) मै एक सच्चा भारतीय हूँ. उसके बाद ही में मराठा, मुसलमान या जो कोई भी हूँ |
२) राज्यों की सीमा या फिर उनसे जुड़े मुद्दों की वजह से मै अपने बिच में कोई तकरार नहीं पनपने दूंगा |
३) मेरे किसी भी कम के लिए मैंने लालच या फिर रिश्वत का सहारा नहीं लूँगा |
४) जहा जहा पर संभव हो वहा पर मै अपनी राष्ट्रीय भाषा का ही प्रयोग करूँगा |
५) जितना हो सके मै भ्रष्टाचार को रोखने में सहयोग दूंगा |
६) मेरी आनेवाली पीढ़ी को भी में एक भारतीय होने की शिक्षा दूंगा. और उसमे एक सच्चे नागरिक का बिज बोने की कोशिश करूँगा |

मुझे पूरा विश्वास है की आप ऐसा करेंगे |
आप ऊपर दी गयी सभी बातोंका ठीक से गौर करेंगे और भविष्य में भारत को एक महासत्ता, खुशहाल, स्वस्थ देश बनायेंगे |

अगर आप इनमे से एक भी नहीं कर सकते तो समझिये आप भारत देश को खायी की तरफ धकेल रहे है |
फिर आप को कोई भी हक़ नहीं बनता किसीको स्वतंत्रता दिवस की शुभकामनाये देने का |

आप सबको स्वतंत्रता दिवस की शुभकामनाये |

जय हिंद जय भारत |

चोप्य् पस्ते

हल्ली एका लेखावर प्रतिसाद म्हणून आपला दुसरा लेख चिकटवायची पद्धत आलेली दिसते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

थत्ते काका, आम्ही लहान माणसं,

थत्ते काका, आम्ही लहान माणसं,
भावना समजून घ्या आमच्या. हवतर मार्गदर्शन करा.

पण माझे विचार, ठणठणीत लेखन पद्धत

मजकूर संपादित.

एकाच विषयावरील अनेक लेख एकत्र करण्याची उपक्रमाची पद्धत आहे. सदस्यांनी याबाबत संपादक मंडळाकडे विचारणा करावी. मूळ लेखातील अनावश्यक व विषयांतरीत प्रतिसाद संपादित केले जातील याची सर्वांनी नोंद घ्यावी. - संपादक मंडळ.

उपक्रम

उपक्रमरावांनीच या गोष्टीसाठी वेगळ्या धाग्याची गरज नाही असे वाटून हे केले असेल. त्यांच्याशिवाय हा अधिकार कोणालाही नाही. काळजी नसावी.

आणि संस्थळ त्यांचे आहे तेव्हा हे त्यांनी का केले हे तुम्ही विचारू शकता पण ते उत्तर द्यायला बांधील आहेत असे नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर