मराठी संस्थळांचा इतिहास.

येत्या दिवाळीत एका दिवाळी अंकातील लिखाण जालावर प्रसिध्द झालेले असेच घेतले जाणार आहे. या दिवाळी अंकात वर मथळ्यात दिल्या प्रमाणे मराठी संस्थळाचा इतिहास यावर साधारण हजार शब्दांचा लेख प्रसिध्द करायचा आहे. माझा जालाशी संबंध केवळ चार वर्षांचांच असल्यामुळे माझ्याकडची माहीती अपूर्ण आहे. सदस्यांना नम्र विनंती अशी की त्यांनी या धाग्यात मराठी संस्थळांबद्दल अधिक माहीती द्यावी. काही कारणामुळे किंवा वैयक्तीक मर्यादेमुळे धाग्यावर लिहीणे शक्य नसेल तर व्यनी करावा .धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम चर्चाप्रस्ताव

या चर्चाप्रस्तावातून थोडीफार माहिती मिळावी.

पास

अनुभव फक्त दीड वर्षांचा.

धागा पास.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अनुभव फक्त ३ वर्षांचा .. पास!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

माजा

माजा बी ३ वर्सच हाय. धागा पास, मी नापास. :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

मी पण

जेमतेम ३ वर्ष. नापास :-)

रिसू/सर्किट

सर्किट, रिकामा सुतार, नरेंद्र गोळे यांनी इतिहासात असे प्रयत्न केल्याचे आठवते.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

रिसू/सर्किट

रिसू/सर्किट

मराठी इतिहासात एक वदंता आहे की शिवाजीमहाराजांनी जयसिंगाबरोबर झालेल्या तहात दोन नावांनी ओळखला जाणारा एकच किल्ला मोघलांच्या हवाली केले होते. ;-)

असो. मराठी संकेतस्थळांवर वर्षानुवर्षे काढलेल्या काही ज्येष्ठ सदस्यांच्या मुलाखती घ्याव्यात. खूप डेटा* मिळेल.

* विद्याताई आणि आत्ता गं बया! यांची कास सोडून डेटा हा शब्द पुन्हा वापरात काढला आहे. ;-)

विकिचा दुवा

मराठी संकेतस्थळाचा इतिहासाठी मराठी विकिपीडियाचा हा दुवा मला नेहमीच उपयोगाचा ठरला आहे.
आपल्यालाही त्या दुव्याचा उपयोग करुन चांगला लेख लिहिता येईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे
[मराठी विकिपीडिया सदस्य]

यक

विकीपिडिया आहे की धोबीघाट?

हॅहॅहॅ

याबरोबर कुठली भांडणे, कुणी, कधी, कुठल्या आयडी ने केली, मग त्यांना विरोधी गटाने कुठल्या आयडीने कुठले उत्तर दिले हे सर्व संदर्भांमध्ये द्यायला हवे होते असे वाटते. याखेरीज काळानुसार बनलेले गट, त्याचे विभाजन यांचा एक जंगी तक्तादेखील यायला हवा. :)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

:)

वेळ काढून लेखाची नीट मांडणी करावी म्हणतो. कसे असावे बरे त्याचे स्वरुप ?

-दिलीप बिरुटे
[मराठी विकि सदस्य]

इतिहास

इतिहास हा जेते लिहितात असे म्हटले जाते. इथला इतिहास कोणा मायबोलीकराने लिहिलेला दिसतो. ;-)

मराठी संस्थळे

मराठी संस्थळे म्हणजे काय? मराठी भाषेसंबंधीची संस्थळे का मराठी भाषेत लिहिलेली संस्थळे. तसे बघता अनुवादाची सुविधा वापरली तर कोणतेही संस्थळ मराठी संस्थळ बनवता येते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

माझी व्याख्या

>>>मराठी संस्थळे म्हणजे काय?
मराठी संस्थळे म्हणजे अशा लोकांचा समुह जो मराठी भाषेतून लिहिण्याची सोय असलेल्या संस्थळावर विचारांचे आदान-प्रदान करतो.

>>>मराठी भाषेसंबंधीची संस्थळे का मराठी भाषेत लिहिलेली संस्थळे
मराठी भाषेत लिहिणे आणि वाचली जाणारी.

-दिलेप बिरुटे

पास

अनुभव फक्त ३ वर्ष.
म्हणुन पास.

घन्यवाद.

सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार . आणखी जास्त माहीतीची वाट बघत आहे.

ओंकार जोशी

ओंकार जोशी यांच्या गमभनवरून काही लिहायचे तर मागच्या वर्षी पुण्याच्या एका वृत्तपत्रात (सकाळ? - पुरवणी होती असे आठवते) एक लेख त्यांच्यावर आला होता, असे आठवते. दुर्दैवाने ही माहिती माझ्याकडे आत्ता नाही - पण पुण्यातील उपक्रमी सदस्यांकडे असू शकेल.

 
^ वर