का, कसे आणि अनियत जग

का, कसे आणि अनियतजग
का’ या प्रश्नातच कसे’चे रूप दडले असते. त्यामुळे कार्य-कारण संबध हा मिथ्या असतो. असे काहीसे प्रतिपादन धनंजय यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियेतून प्रतीत होत असे. त्यानंतर यावरचा रसेलचा एक दीर्घ निबंध त्यांनी भाषांतरीत केला. हे सगळे वाचल्यावर त्यासंबंधी अधिक वाचायची ओढ लागली होती. भाषांतरीत लेखाच्या शेवटी रसेलचे नियत जगाविषयीचे प्रतिपादन वाचले. थोडासा शोध घेतला तर पॉपरचे द ओपन युनिवर्स ऎन ऑर्ग्युमेंट फ़ॉर इंडिटर्मिनिज्म नावाचे पुस्तक आहे हे कळले. वाचनालयात मिळाले सुद्धा.

कारण यात ते कार्याच्या आधी घडून गेले असले पाहिजे ही अट लक्षात घेता ज्याला टाईम डिपेंडंट इक्वेशन असते अशा गुरुत्वाकर्षण वा तत्सम भौतिक बलांना कारण म्हणणे पटण्यासारखे नाही असे रसेलने दाखवून दिले होते. वैज्ञांनिक जगतात कार्यकारणास जसे महत्व नाही आहे तसेच ते तत्वज्ञानक्षेत्रातही असायला नको. तत्वज्ञानक्षेत्रातून कारण संकल्पनेची हकालपट्टी झाली पाहिजे. पूर्वी घडलेली घटनेवरून जसे आताची घटना सांगता येते तसेच आताच्या घटनेवरून पूर्वीची घटना सांगता येते. हे दोन्ही एकमेकांशी समीकरणांनी बद्ध आहेत. याचाच पुढचा भाग म्हणजे सगळे जग हे नियत आहे. म्हणजे आताची स्थिती तुम्हाला पूर्णपणे समजली आणि सर्व सृष्टीनियम तुम्हाला माहित असेल तर तुम्ही भूत आणि भविष्य तंतोतंत सांगू शकाल. रसेलच्या निबंधाचा शेवट अशा ‘नियत’ जगात होतो.
रसेलचा निबंध 1912 सालचा म्हणजे त्यावेळी क्वांटम भौतिकी परिचित नसणार. क्वांटम भौतिकीत केवळ शक्यता सांगता येतात निश्चिती सांगणे हे चूक आहे असे प्रतिपादन आहे. अशा शक्यतांच्या जगात नियतजग राहू शकत नाही हा भाग रसेलच्या परिचयाचा त्यावेळी नसावा. रसेल त्यानंतर बरेच जगला. क्वांटम भौतिकीवर त्याचा विचार वाचला नाही. फाईनमनच्या पुस्तकात एका पॉजिटिविस्ट विदुषीने घेतलेले क्वांटमचे आक्षेप वाचनात आले होते. ते कदाचित रसेलच्या परंपरेत असावेत. तेचे म्हणणे असे होते की आज माहित नाही म्हणून अशा शक्याशक्यतेच्या विज्ञानाचा तुम्ही आधार घेत आहात.
आइंस्टाईनचे म्हणणे बरेचदा असे होते देव सोंग़ट्या खेळत नाही असे त्याचे याबाबतीतचे वाक्य प्रसिद्ध आहे. पॉपर यावर काय म्हणतो म्हणून उत्सुकता वाढली होती.
पॉपरचे हे पुस्तक 1955-56चे आहे. एकंदर पाच प्रकरणे आणि तीन परिशिष्टे मिळून हे पुस्तक बनले आहे. नियतवाद (http://en.wikipedia.org/wiki/Determinism) म्हणजे एखाद्या चित्रपटासारखे जग. म्हणजे कितीदा पहा कुठूनही पुढे पहा त्यातील जग हे अपरवर्तनीय असते. म्हणजे वेळेनुसार चित्रपटातील जग बदलत असते पण त्यातील क्रमवारी थोडीसुद्धा बदलू शकत नाही. अनेक नियतवादी तत्ववेत्ते होऊन गेले त्यात रसेल आणि आइंस्टाईन ही आपल्या परिचयातली नावे. हा तीन मुख्य प्रकाराने असू शकतो. धार्मिक, वैज्ञानिक आणि मेटॆफिजिकल (तत्वमिमांसात्मक).

काही धार्मिक परिभाषेत देव हा सर्वज्ञ आहे. म्हणजेच तो भूतभविष्य जाणतो याचाच अर्थ जग नियत आहे असा होतो. भविष्यवेत्यांबाबत असेच म्हणता येईल. वैज्ञानिक नियतवाद हा विज्ञानाच्या नियम आणि परिस्थितीतून येतो. म्हणजे सृष्टीचे नियम माहित असतील आणि परिस्थिती माहित असेल तर सर्व जग पुढे कसे चालेल हे माहित करता येईल. आज आपल्याला या दोन्ही गोष्टी माहित नाहीत म्हणून नाहीतर जग पुढे कसे चालेल याची एखादी संगणकीय प्रणाली करता येईल. ज्यामुळे जगात पूर्वी काय घडले आणि काय घडणार हे निश्चित सांगता येईल. मेटॆफिजिकल नियत जगात माणूस नियम शोधू व त्यानुसार करावयाची आकडेमोड करू शकला नाही तरी हे जग नियत आहे. कारण सर्व जग हे नियमबद्ध रितीने चालते असे म्हटले आहे.

पॉपरचे पुस्तकातील मुख्य भाग वैज्ञानिक नियतवादा विरुद्ध आहे. त्याचे म्हणणे की जगाचे भविष्य तंतोतंत सांगण्यासाठी जगाचे स्वरुप तंतोतंत माहित असणे हे गरजेचे आहे. आणि हेच अशक्य आहे. त्याला पॉपरने हा मुद्दा मोठ्या विस्ताराने मांडला आहे. आजचे जग तंतोतंतरितीने माहित नसते. ज्याला माहित असते तोच या जगाचा भाग असल्याने त्याची माहितीही त्याला माहित असणे गरजेचे आहे. आणि यात वर्तुळाकार वाद तयार होतो. याशिवाय कित्येक विज्ञाने ही शक्यतांवर अवलंबीत आहेत त्यांचाही त्यात अडसर आहेच.
मेटॆफिजिकल नियतवाद मात्र असा सहज टाळता येण्यासारखा नाही. पॉपरने यात आइंस्टाईनची साक्ष काढली आहे. आइंस्टाईन हा जरी सुरुवातीला या पक्षाचा होता तरी तो सरतेशेवटी नव्हता. आइंस्टाईनच्या साधारण सापेक्षतावादात हे जग चतुर्थमितीतले एक बॉक्ससारहे आहे. एखाद्या चित्रपटासारखे ते नियत आहे. त्याविरुद्ध पॉपर म्हणतो जर जग असे हे पक्के नियत असेल तर भूत भ्रविष्य हे सुपरफ्लुअस आहे. या जगात वेळेनुसार आपण जर का यातून जात असू तर त्या त्या वेळी हे जग बदलत असते जे याविरुद्ध आहे. जर हे जग नियत असेल तर नाणे उडवण्याच्या यंत्रातील 50-50 टक्के येणारे निकाल हे कसे सिद्ध करणार? या आणि अशाच प्रकारच्या यंत्रातील शक्यतांची गणिते बरोबर येतात याचाच अर्थ जग नियत असू शकत नाही.
पॉपरचे वरील म्हणणे मला पटले नाही. पण त्यात विचार करण्यासारखे भरपूर सापडेल. परिशिष्टामधे तीन प्रकारांची विश्वेअसतात. एकात अचेतन वस्तु आहेत दुसर्याणत मानसिक जग आहे तिसरे जग हे मनुष्याने केलेल्या वैचारिक साहित्याबद्दलचे आहे. ज्यात पुस्तके, मूल्ये, संकल्पना, थियरी अशा अनेक गोष्टी येतात. पहिले जग नियत असेल तरी दुसर्या् व तिसर्या. जगाबद्दल आपण असेच बोलू शकू का?

मी करून दिलेला परिचय अगदी त्रोटक आहे. कदाचित पॉपरचे म्हणणे नीट मांडले गेले नसेल. मूळ पुस्तक मात्र वाचण्यासारखे आहे.

प्रमोद

Comments

जमेल तेव्हा वाचले पाहिजे

जमेल तेव्हा वाचले पाहिजे हे पुस्तक.

पूर्वी घडलेली घटनेवरून जसे आताची घटना सांगता येते तसेच आताच्या घटनेवरून पूर्वीची घटना सांगता येते. हे दोन्ही एकमेकांशी समीकरणांनी बद्ध आहेत.

दोन काळांतली विश्वाची स्थिती तंतोतंत माहिती असली, असे समजा. आदल्या स्थितीवरून जर पुढली स्थिती सांगता येते तर पुढल्या स्थितीवरून आदली स्थिती सांगता येते, असे रसेल म्हणतो, खरे. मात्र समीकरणांनी बद्धच आहे, असे तो म्हणत नाही. बद्ध असेल किंवा नसेल.

याचाच पुढचा भाग म्हणजे सगळे जग हे नियत आहे. म्हणजे आताची स्थिती तुम्हाला पूर्णपणे समजली आणि सर्व सृष्टीनियम तुम्हाला माहित असेल तर तुम्ही भूत आणि भविष्य तंतोतंत सांगू शकाल. रसेलच्या निबंधाचा शेवट अशा ‘नियत’ जगात होतो.

रसेलच्या निबंधात असे काहीही प्रतिपादन केलेले नाही. हे नमूद करावेसे वाटते.
"नियतता" या संकल्पनेच्या अतिशय मर्यादित गणिती व्याख्येला अर्थ आहे, सामान्य वापरात असलेली संकल्पना निरर्थक आहे, असे प्रतिपादन रसेल करतो.

या जगात वेळेनुसार आपण जर का यातून जात असू तर त्या त्या वेळी हे जग बदलत असते जे याविरुद्ध आहे. जर हे जग नियत असेल तर नाणे उडवण्याच्या यंत्रातील 50-50 टक्के येणारे निकाल हे कसे सिद्ध करणार? या आणि अशाच प्रकारच्या यंत्रातील शक्यतांची गणिते बरोबर येतात याचाच अर्थ जग नियत असू शकत नाही.

"घटने"ची व्याख्या ढोबळ केली तरच "संभवनीयता" शब्दाला अर्थ असतो. एक तर नाणे उडवणे हे क्वांटम मेकॅनिक्सच्या सूक्ष्मतेत जात नाही. अगदी साध्या न्यूटनच्या समीकरणांनी भाकिते करता येतात. प्रत्येक वेळेला अगदी तिसर्‍या-चवथ्या दशांकापर्यंत टॉर्क देणारे यंत्र बनवणे सहज शक्य आहे, आणि त्यातून उडवलेले नाणे नेहमी एकाच प्रकारे पडेल.
"कमीअधिक बल वापरून पूर्वस्थिती निश्चित न केलेले नाणे" अशा ढोबळ व्याखेने "नाणे उडवणे" म्हटले, तरच निकाल ५०-५० येईल.

त्याच प्रमाणे व्यक्तीची "उपक्रम सदस्य" अशी ढोबळ व्याख्या केली तर भारताबाहेर:भारतात अशी ३०%:७०% संभवनीयता येईल. त्यातही "धनंजय-आयडी-असलेले-उपक्रम-सदस्य" अशी नेमकी व्याख्या केली तर १००%:०% अशी संभवनीयता दिसेल.

आता पुंजभौतिकीची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. प्रत्येक मूल-कण दुसर्‍या प्रत्येक मूलकणाशी समसमान असतो, असे मानण्यास जागा आहे. त्यामुळे प्रत्येक कण (इतिहास सारखा असला तर) नळकांडीतून बाहेर पडल्यावर पटलावर त्याच ठिकाणी जायला पाहिजे. मात्र जात नाही. त्याचे स्पष्टीकरण असे : कण समसमान असेल, पण कणाचा इतिहास समसमान कुठे असतो? इतिहास नळकांडीतून जाण्यापुरता (म्हणजे "खूपच") समसमान असतो. अभ्यास करण्याइतका समसमान. भाकिते करण्याची इच्छा होण्याइतपत समसमान. पण तरी "खूपच" म्हणजे "पूर्णपणे" नव्हे.

(येथे क्वांटम एंटँगलमेंटचा विचार घ्यावा. एंटँगल झालेल्या कणांचा आदिकालापासूनचा इतिहास जोडलेला असतो, म्हणून त्यांचे भविष्यही पुरते जोडलेले असते.)

वेगळी गोष्ट

"घटने"ची व्याख्या ढोबळ केली तरच "संभवनीयता" शब्दाला अर्थ असतो. एक तर नाणे उडवणे हे क्वांटम मेकॅनिक्सच्या सूक्ष्मतेत जात नाही. अगदी साध्या न्यूटनच्या समीकरणांनी भाकिते करता येतात. प्रत्येक वेळेला अगदी तिसर्‍या-चवथ्या दशांकापर्यंत टॉर्क देणारे यंत्र बनवणे सहज शक्य आहे, आणि त्यातून उडवलेले नाणे नेहमी एकाच प्रकारे पडेल.
"कमीअधिक बल वापरून पूर्वस्थिती निश्चित न केलेले नाणे" अशा ढोबळ व्याखेने "नाणे उडवणे" म्हटले, तरच निकाल ५०-५० येईल.

मज्जातंतूंमध्ये पुंजयामिकीची सूक्ष्मता कार्यरत असल्यामुळे मेंदूचे निर्णय 'खर्‍या' स्वयंप्रज्ञेने होतात असा रॉजर पेनरोजचा अभ्युपगम आहे. (अर्थात, ह्यूम च्या फाट्यानुसार, त्या 'स्वयंप्रज्ञेला'सुद्धा 'फ्री विल' असे संबोधिता येणारच नाही.)

आता पुंजभौतिकीची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. प्रत्येक मूल-कण दुसर्‍या प्रत्येक मूलकणाशी समसमान असतो, असे मानण्यास जागा आहे. त्यामुळे प्रत्येक कण (इतिहास सारखा असला तर) नळकांडीतून बाहेर पडल्यावर पटलावर त्याच ठिकाणी जायला पाहिजे. मात्र जात नाही. त्याचे स्पष्टीकरण असे : कण समसमान असेल, पण कणाचा इतिहास समसमान कुठे असतो? इतिहास नळकांडीतून जाण्यापुरता (म्हणजे "खूपच") समसमान असतो. अभ्यास करण्याइतका समसमान. भाकिते करण्याची इच्छा होण्याइतपत समसमान. पण तरी "खूपच" म्हणजे "पूर्णपणे" नव्हे.

पुंजभौतिकीचे प्रायोगिक निष्कर्ष वरील वर्णनाच्या विपरीत असल्याचे प्रतिपादन रॉजर पेनरोजने केले आहे. त्याने दिलेले उदाहरण काहीसे असे आहे:
समजा आपल्याकडे एक पेटी आहे. तिच्यात अगणित चेंडू आहेत. त्या पेटीतून एकएक चेंडू निवडले आणि त्यांचे रंग बघितले तर असा अनुभव मिळतो की ५०-५०% शक्यतेने निळे किंवा लाल चेंडू मिळतात. मी डोळे मिटून एक चेंडू निवडला, त्या पेटीपासून दूर गेलो आणि डोळे उघडले, तेव्हा मला समजले की चेंडू निळा आहे.
"तो चेंडू आधीपासूनच निळा होता" असे तुमचे प्रतिपादन आहे असे मला वाटते. पुंजभौतिकीचा निष्कर्ष असा आहे की डोळे उघडेपर्यंत त्या चेंडूला रंगच नव्हता; तोवर त्याचा रंग निळा असण्याची शक्यता ५०-५०% होती आणि डोळे उघडल्यानंतर ती १००-०% झाली. तसा निष्कर्ष काढण्यासाठी 'स्पूकी ऍक्शन ऍट डिस्टन्स' (एंटँगलमेंट) गृहीत धरावी लागते.

या ठिकाणी दृष्टांत काळजीपूर्वक दिले पाहिजेत

मज्जातंतूंचा मुद्दा पेनरोझचा असला (तो कितीका कल्पनारम्य असेना), पॉपरचे उदाहरण नाणेफेक करणार्‍या यंत्राचे आहे.

शिवाय तर्कविषयक शब्दही काळजीपूर्वक वापरले पाहिजेत :

पुंजभौतिकीचा निष्कर्ष असा आहे की डोळे उघडेपर्यंत त्या चेंडूला रंगच नव्हता

येथे "निष्कर्ष" शब्दाचा अर्थ "युक्तिवादात अंतिम सिद्धता झालेले विधान" असा घ्यायचा आहे काय? ("अमुक नाही" अशा प्रकारचा निष्कर्ष कुठल्या युक्तिवादाने करता येईल? "अमुक असू शकत नाही, कारण त्या ठिकाणी आणि काळात अमुक-पेक्षा-वेगळे असे काही आहे" असा एक युक्तिवाद असू शकतो. मात्र तसा कुठला युक्तिवाद पुंजभौतिकीचा नाही.) की असे म्हणायचे आहे : ज्या स्थितीत रंग बघायचाच नाही, त्या स्थितीत रंगाबद्दल पृच्छा नि:संदर्भ आहे. हे वाक्य खूपच वेगळे आहे.

चेंडूंच्या उदाहरणात चेंडू म्हणजे अतिसूक्ष्म कण आहेत, की सामान्य (अनेक ग्रॅममध्ये तोलण्यासारखी) पिंडे आहेत? मला असे वाटते, की मुद्दाम "चेंडू" म्हणून येथे संभवनीयतेचे सार्वत्रिक गणित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

म्हणून सार्वत्रिक गणिताबद्दल बोलूया. अनुभवतून जे दिसले, त्याला संभवनीयता म्हणत नाहीत. पेटीतून एक-एक असे ९९९ चेंडू निवडले, प्रत्येकाचा रंग बघितला, ४९९ चेंडू लाल असले, ५०० चेंडू निळे असले, समजा. बघितलेल्या चेंडूंचे "प्रमाण" (प्रोपोर्शन) असते ५००/९९९. न-बघितलेल्या चेंडूंची मात्र संभवनीयता (प्रॉबॅबिलिटी) असते. बघितलेल्या चेंडूंच्या प्रमाणावरून आपण न बघितलेल्या चेंडूंच्या संभवनीयतेचा आदमासे अंदाज करू शकतो - हे खरे. आपल्या उदाहरणात संभवनीयताकदाचित तंतोतंत ५०% असेल. ५००/९९९ = ~५०.०५% आणि ५०% हे दोन आकडे समसमान नाहीत. या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे लक्षात ठेवले नाही, तर ते दोन आकडे वेगळे दिसताच अंतर्गत विरोध असल्याचा आभास होईल. तसा आभास होऊ देता कामा नये.

वरील उदाहरणात चेंडू उचलून दूर न्यायची गरज नाही (दूर नेला तरी चालतो). जोवर रंग बघितलेला नाही तोवर चेंडूच्या रंगाची काहीतरी संभवनीयता असते. रंग बघितल्यावर संभवनीयतेचे गणित नि:संदर्भ होते. फक्त प्रमाणाचे गणित केले जाऊ शकते.

समजा पेटीत अगणित नव्हेत तर ठीक दोनच चेंडू असले, असे समजा. पैकी एक लाल, एक निळा असला, तर काय परिस्थिती होते? एक चेंडू बघितला की दुसर्‍या चेंडूच्या रंगाची निश्चिती होते. हा प्रकार माझ्या अनुभवातला आहे. विजेच्या चालणार्‍या उपकरणाकडे जाणार्‍या दोन वायरपैकी एक लाईव्ह म्हणून टेस्टरने तपासली तर दुसरी न्यूट्रल आहे, हे न तपासता लगेच कळते. हा अनुभव आपणापैकी खूप जणांना आलाच असेल. एन्टँगलमेंट-गुंतणे हे मर्यादित संख्येच्या पिंडांचेच होऊ शकते. अगणित चेंडूंचे नव्हे.

सहमत (पण)

येथे "निष्कर्ष" शब्दाचा अर्थ "युक्तिवादात अंतिम सिद्धता झालेले विधान" असा घ्यायचा आहे काय?

होय!

चेंडूंच्या उदाहरणात चेंडू म्हणजे अतिसूक्ष्म कण आहेत, की सामान्य (अनेक ग्रॅममध्ये तोलण्यासारखी) पिंडे आहेत? मला असे वाटते, की मुद्दाम "चेंडू" म्हणून येथे संभवनीयतेचे सार्वत्रिक गणित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

नाही. पुंजभौतिकीचे नियम पाळणार्‍या सूक्ष्म वस्तूंसाठीच हा दावा आहे. सामान्य पिंडांविषयीचा अनुभव वेगळा आहे हे मान्य आहे. (सामान्य आणि सूक्ष्म यांच्यात ठाम भेदरेषा नाही याविषयी पेनरोजने काळजी व्यक्त केली आहे.)

जोवर रंग बघितलेला नाही तोवर चेंडूच्या रंगाची काहीतरी संभवनीयता असते.

समजा पेटीत अगणित नव्हेत तर ठीक दोनच चेंडू असले, असे समजा. पैकी एक लाल, एक निळा असला, तर काय परिस्थिती होते? एक चेंडू बघितला की दुसर्‍या चेंडूच्या रंगाची निश्चिती होते. हा प्रकार माझ्या अनुभवातला आहे. विजेच्या चालणार्‍या उपकरणाकडे जाणार्‍या दोन वायरपैकी एक लाईव्ह म्हणून टेस्टरने तपासली तर दुसरी न्यूट्रल आहे, हे न तपासता लगेच कळते. हा अनुभव आपणापैकी खूप जणांना आलाच असेल.

असे कसे? पेटीमध्येच असणार्‍या चेंडूना स्वतःचा असा रंग असतोच! केवळ निवड प्रक्रियेतील अज्ञानामुळेच यदृच्छा भासते. सूक्ष्म वस्तूंच्या बाबतीत मात्र, निरीक्षण होत नाही तोवर 'खरी' यदृच्छा असते. (दूर नेल्यामुळे केवळ असे अतिरिक्त निरीक्षण प्राप्त होते की 'दूरवरील' चेंडूसुद्धा, 'बघितल्यावर रंगप्राप्ति' या गुणधर्माचे पालन, 'त्वरित' करतो. प्रवास करण्यासाठी, स्पूकी ऍक्शन ऍट डिस्टन्सला मुळीच वेळ लागत नाही.)

पेनरोज

पुंजभौतिकीचे नियम पाळणार्‍या सूक्ष्म वस्तूंसाठीच हा दावा आहे. सामान्य पिंडांविषयीचा अनुभव वेगळा आहे हे मान्य आहे. (सामान्य आणि सूक्ष्म यांच्यात ठाम भेदरेषा नाही याविषयी पेनरोजने काळजी व्यक्त केली आहे.)

मी पेनरोज यांचे पुस्तक वाचलेले नाही. ते करस्पाँडन्स प्रिन्सिपलचा उल्लेख करतात का?

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

होय असे वाटते

असेल, असेल

असे कसे? पेटीमध्येच असणार्‍या चेंडूना स्वतःचा असा रंग असतोच!

असेल, असेल. "लाकुम् दिनुकुम्". असेल किंवा नसेल याबद्दल माझे काहीच मत नाही. तुम्ही म्हणता तर असेल बुवा. "अमुक चेंडू" असा कुठला चेंडू आहे? मी तर पेटीत डोळे बंद करून हात घातला, तर सगळे चेंडू एकसारखेच भासले. त्यांच्यापैकी कुठल्या चेंडूचा रंग निळा आहे असे तुम्ही म्हणता? आता तुम्ही म्हणालात की "खरखरीत असलेल्या एकाच चेंडूचा रंग निळा आहे" तर काही सांगण्यासारखे सांगितलेत. "कुठल्यातरी एका चेंडूचा रंग निळा आहे (मात्र आता सांगणार नाही)" असे तुमचे म्हणणे असेल, तर त्यात मला सांगण्यासारखे काय आहे, हे कळले नाही. नाहीतर केवळ शब्द-ध्वनी झाला.

असे दिसते की हा व्याख्येचा परिणाम आहे. ते असे :

केवळ निवड प्रक्रियेतील अज्ञानामुळेच यदृच्छा भासते.

होय. असे असू शकेल. मात्र हे अज्ञान "व्याख्येच्या ढोबळपणा"मुळे चिरंतन आरोपित झालेले असते. जर पेटीत खरोखर माझ्या दृष्टीने व्यक्तित्व (इन्डिव्हिज्युऍलिटी) असलेले चेंडू असतील, तर त्यांची ओळख पटणारे चिह्न प्रत्येक चेंडूवर असेल. अशा परिस्थितीत "संभवनीयता" हे गणितच निरर्थक आहे. याबद्दल असा विचार करा :

एका पिशवीत १ केळे, १ सफरचंद, १ संत्रे, १ मोसंबे असे घातले. त्यात बेरीज, भागाकार वगैरे गणिते करून प्रमाणे, संभवनीयता, वगैरे गणिते करता येतात.

(अ) "१ केळे + १ पेरू+ १ संत्रे + १ मोसंबे = ???" गणित बंद पडते.

व्याख्या ढोबळ केली आणि "सिट्रस फळ" असे ढोबळ एकक केले तर गणित एक पायरी पुढे जाते.
(आ) "१ केळे + १ पेरू+ १ सिट्रस फळ + १ सिट्रस फळ = "१ केळे + १ पेरू+ २ सिट्रस फळ = ???"
यात सिट्रस फळ मोसंबे असेल किंवा नसेल याबद्दल आपण तात्पुरते उदासीन असतो.

आणखी ढोबळ व्याख्या केल्यास
(इ) "१ केळे + १ गोल फळ + १ गोल फळ + १ गोल फळ = "१ केळे + ३ गोल फळ = ???"
यात गोल फळ मोसंबे असेल किंवा नसेल याबद्दल आपण तात्पुरते उदासीन असतो.

आणखी ढोबळ व्याख्या केल्यास
(ई) "१ फळ + १ फळ + १ फळ + १ फळ = ४ फळे"
यात सिट्रस फळ मोसंबे असेल किंवा नसेल याबद्दल आपण तात्पुरते उदासीन असतो.

आता आपल्याला "मोसंबे असण्याची संभवनीयता" हवी असेल तर काय करायचे? भागाकारात न्यूमरेटर = मोसंब्यांची संख्या" तर डिनॉमिनेटर मध्ये मोसंबे असेल किंवा नसेल त्या एककांची संख्या असते. व्याख्या "अ" सारखी सूक्ष्म व्याख्या असली तर भागाकार करताच येत नाही - डिनॉमिनेटरमधील बेरीज करण्यातच आडते.
व्याख्या "आ" मध्येही गणित आडते. मात्र "सिट्रस फळांपैकी मोसंबे असण्याची संभवनीयता काय?" हे गणित करता येते.
व्याख्या "ई" मध्ये "फळांपैकी मोसंबे असण्याची संभवनीयता काय", "फळांपैकी सिट्रस फळ असण्याची संभवनीयता काय", "फळांपैकी गोल फळ असण्याची संभवनीयता काय?" ही सर्व गणिते करता येतात. मात्र गणिते करण्यापूर्वी "डिनॉमिनेटर मध्ये बेरीज करण्यालायक समसमान एकके आहेत" अशी व्याख्या करावीच लागते. व्याख्या केली म्हणून काही व्याख्याच निष्कर्ष होत नाही "पेरू आणि संत्र्याची अंततोगत्वा बेरीज होते!"

सूक्ष्म वस्तूंच्या बाबतीत मात्र, निरीक्षण होत नाही तोवर 'खरी' यदृच्छा असते.

"खोटी" यदृच्छा आणि "खरी" यदृच्छा ओळखण्यासाठी काय करावे? पेनरोझ ला "सूक्ष्म" आणि "महत्" यांतील फरक न-कळणे पचायला जड जाते, हे चांगलेच. जर "खरी" आणि "खोटी" यदृच्छा वेगवेगळी सांगणारा प्रयोग असता, तर काम सोपे झाले असते. एक-एक आकाराच्या वस्तू घ्यायच्या. प्रयोग करायचा. "खरी" यदृच्छा सुरू झाली, की म्हणायचे "युरेका! मिळाली सूक्ष्मतेची सीमा!" मात्र असे कुठलेच मोजमाप नाही. म्हणून "खरी" विरुद्ध "खोटी" यदृच्छा अशी कुठली संकल्पना मानायची गरज नाही.

चिरंतन नाही

चेंडूंच्या बाबतीत डोळे उघडून किंवा निळ्या चेंडूला खरखरीत करून ओळख पटविणे शक्य आहे. म्हणून त्या यदृच्छेला निरीक्षकाच्या अपंगत्वामुळे आलेली अशी, 'खोटी यदृच्छा' असे आपण म्हणू शकतो. ती चिरंतन नाही, असे नाणे फेकणार्‍या यंत्रामुळे दिसते. पुंजभौतिकीमध्ये मात्र हिडन लोकल वेरिएबल नसतात. त्यामुळे, त्या यदृच्छेला कणांच्या गुणधर्मामुळे (गुणधर्माच्या अभावामुळे) येणारी अशी, 'खरी यदृच्छा' म्हणता येईल.

रसेलचा निबंध

रसेलच्या निबंधात असे काहीही प्रतिपादन केलेले नाही. हे नमूद करावेसे वाटते.
"नियतता" या संकल्पनेच्या अतिशय मर्यादित गणिती व्याख्येला अर्थ आहे, सामान्य वापरात असलेली संकल्पना निरर्थक आहे, असे प्रतिपादन रसेल करतो.

आताच लेखातील भाग परत वाचला. तुमचे म्हणणे बरोबर आहे. रसेलच्या निबंधात शेवटी नियतवादावर बरेच लिहिले आहे. त्यातील काही उतारे त्याचे वाटावे असे वाटतात पण आता परत वाचल्यावर ते पूर्वपक्ष म्हणून मांडणी केल्यासारखे आहेत हे कळले. (आठवले.)

लेखाच्या शेवटी पूर्ण निर्धारिततेवर रसेल असे म्हणतो:
स्वतंत्र निर्धारणशक्ती विरुद्ध पूर्णनिर्धारितता यांच्यातील विरोध मुख्यतः मृगजळ आहे. परंतु उर्वारित अंशापुरता हा कूटप्रश्न सोडवण्यासाठी सध्या असमर्थता आहे.

हे जग समीकरणाने बद्ध आहे असे रसेलचे प्रतिपादन नाही हे मान्य. पण त्याच्या उदाहरणावरून तसेच वाटते.

प्रमोद

श्रॉडिंजर

श्रॉडिंजरच्या मांजराचे मराठीकरण कुठे वाचायला मिळेल का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

हम्म

परिचयावरून पुस्तक रोचक वाटते. वाचण्याच्या यादीत टाकले आहे.

विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. यात स्ट्रिंग थिअरीचा समावेश केला तर चित्र आणखी वेगळे होते. गेल्या दोन वर्षात समोर आलेल्या होरावा यांच्या गुरूत्वाकर्षाच्या संकल्पनेने आइनस्टाइअनच्या चतुर्थमिती विश्वाची संकल्पना बदलली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार स्थल काल लोरेन्झ इनव्हेरियन्सप्रमाणे वागत नसून स्थल एका एककाने बदलले तर काल त्याच्या पटीच्या घनाने बदलतो. अर्थात ही संकल्पना अजूनपर्यंत सर्वमान्य नाही. पण आइन्स्टाइनची संकल्पनाही पूर्ण बरोबर आहे असे म्हणता येत नाही कारण पुंजभौतिकी आणि गुरूत्वाकर्षण यांचे जमत नाही.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

गोंधळ

रिकामटेकडा यांनी डोळ्यावर पट्टी बांधून एक चेंडू उचलला आणि हातात धरून ते लांब चालले होते. तेव्हा धनंजयनी चेंडू 'पाहिला'. रिकामटेकडा यांनी अजून चेंडू पाहिला नाही त्यामुळे त्यांच्या विश्वात चेंडूला अजून रंग नाही - रंगाची संभवनीयता आहे. मग रिकामटेकडा यांच्या विश्वात चेंडूला दोन्ही रंग आहेत -बोथ क्वांटम स्टेटस्- असे म्हणायचे का?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

चीटिंग

अशी चीटिंग नाही चालणार! 'बघणे' ही निष्क्रीय (पॅसिव) घटना नाही. त्यासाठी चेंडूवर प्रकाश टाकावा लागतो. त्यामुळे चेंडूला समजते की "आपल्याला कोणीतरी बघायला आले आहेत". चेंडूला कोणीही 'बघितले' की यदृच्छा कार्यान्वित होऊन त्याला एक ठाम रंग प्राप्त होतो.

कसे?

अग्रीड. (खरे तर पहाण्यासाठी त्यावर प्रकाश टाकावा लागतोच असे नाही. त्यामुळे धनंजयने चेंडू पाहिला हे चेंडूला कळण्याची गरज नाही).
पण रिकामटेकडा मात्र अजून दोन्ही क्वांटम स्टेट्स आहेत असेच समजतोय ना...

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

वेगळा मुद्दा

धनंजय यांनी चेंडू बघितला की त्याला एक ठाम रंग प्राप्त होतो. त्यानंतर मी चेंडू बघेपर्यंत त्या चेंडूचा रंग निळा असण्याची माझ्या लेखीची संभाव्यता 'चिरंतन' नियमांप्रमाणे, नाण्यासारखी ५०-५०% असते तर धनंजय यांच्यासाठी १००-०% असते. मुद्दा असा आहे की कोणी एकानेही चेंडूकडे बघितले की संभाव्यतेचा प्रकार बदलतो.

कशाचा गोंधळ

नाही. माझा गोंधळ संभाव्यतेबाबत नाही. रंग दोन्ही क्वांटम स्टेट्समध्ये अस्तित्वात असण्याबाबत आहे. हा गोंधळ मांजराच्या जिवंत असण्याच्या आणि नसण्याच्या 'कोपनहेगन इंटरप्रिटेशन'बाबत आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

प्रयोगांचा निष्कर्ष

"निरीक्षण होईपर्यंत चेंडूला एक विशिष्ट रंग (हिडन लोकल वेरिएबल) असूच शकत नाही" असा प्रायोगिक निष्कर्ष आहे.

कोपनहेगन

कोपनहेगन इंटरप्रिटेशनप्रमाणे रिकामटेकडा आणि धनंजय यांची वेव्ह फंक्शन वेगवेगळी आहेत कारण त्यांच्याकडे असलेली माहिती वेगवेगळी आहे.

Wigner puts his friend in with the cat. The external observer believes the system is in the state (|\text{dead}\rangle + |\text{alive}\rangle)/\sqrt 2. His friend however is convinced that cat is alive, i.e. for him, the cat is in the state |\text{alive}\rangle. How can Wigner and his friend see different wave functions?

The Copenhagen Interpretation: Wigner's friend highlights the subjective nature of probability. Each observer (Wigner and his friend) has different information and therefore different wave functions. The distinction between the "objective" nature of reality and the subjective nature of probability has led to a great deal of controversy. Cf. Bayesian versus Frequentist interpretations of probability.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास -http://rbk137.blogspot.com प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

अगदी अगदी

अगदी अगदी.

या चर्चेशी अतिशय सुसंगत मुद्दा उपस्थित केलेला आहे.

"सब्जेक्टिव्ह नेचर ऑफ प्रॉबॅबिलिटी" ऐवजी "व्हेरीयस डेफिनिशन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी" सयुक्तिक वाटते.

"प्रॉबॅबिलिटी"ची व्याख्या योग्य केली, म्हणजे "सँपल स्पेस" काय आहे, वगैरे, याची व्याख्या केली तर "सब्जेक्टिव्ह" शब्द काढून टाकता येतो. तुम्ही दिलेल्या दुव्यावरती - अनेक जगतांची खानेसुमारी वेगळी करणे" वगैरे उदाहरणे दिलेली आहेत. यात सँपल स्पेसेस व्याख्येत वेगळ्या आहेत. सँपल स्पेसेस वेगळ्या असल्या तर संभवनीयता वेगवेगळी येईल.

("वेव्ह फंक्शने वेगळी आहेत" याचा अर्थही "संभवनीयतेच्या गणितासाठी सँपल स्पेसच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत" असा घेता येतो.)

फरक

"सब्जेक्टिव्ह नेचर ऑफ प्रॉबॅबिलिटी" ऐवजी "व्हेरीयस डेफिनिशन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी" सयुक्तिक वाटते.

दोन्हीतील फरक कळला नाही. प्रत्येकासाठी वेगवेगळे म्हणजे सब्जेक्टिव्ह होत नाही का?
सब्जेक्टीव्हचा डिक्शनरीतील एक अर्थ असा आहे.
pertaining to or characteristic of an individual; personal; individual: a subjective evaluation.

इथे क्यारेक्टरिस्टिक म्हणजे तुमच्याकडे असलेली माहिती धरता येईल. त्याप्रमाणे प्रोबॅबिलिटी/वेव्ह फंक्शन बदलते आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

येथे पॅरॅलॅक्सचे उदाहरण

असे नव्हे. येथे (क्लासिकल) पॅरॅलॅक्सचे उदाहरण देता येईल.

(चांदोबा, चांदोबा भागलास का?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का?
निंबोणीचे झाड करवंदी -
मामाचा वाडा चिरेबंदी.
)

बागेतल्या पारावर असलेल्या कवीचे विधान :
चंद्र आणि "मी" यांच्या मध्ये निंबोणीचे झाड आहे.

चिरेबंदी वाड्याच्या खिडकीतल्या मामाचे विधान :
चंद्र आणि "मी" यांच्या मध्ये कुठलेच व्यवधान नाही.

मामाच्या डोळ्यांना आणि कवीच्या डोळ्यांना दृश्य वेगळे दिसते. निरीक्षक वेगळे आहेत, तसे दृश्य वेगळे आहे, हे खरे. या विधानांत "मी" शब्द असल्यामुळे विधाने व्यक्तिनिष्ठ आहेत काय? थोडाच फरक करून विधाने वस्तुनिष्ठ असल्याचे जाणवते.
"बागेतल्या झोपाळ्यावरच्या (कवी किंवा कवीचा मामा कोणीही असो) निरीक्षकाच्या आणि चंद्राच्या मध्ये निंबोणीचे झाड आहे."
"वाड्याच्या खिडकीतल्या (कवी किंवा कवीचा मामा कोणीही असो) निरीक्षकाच्या आणि चंद्राच्या मध्ये निंबोणीचे झाड आहे."
अशा प्रकारे विधाने केली, तर ती वस्तुनिष्ठ आहेत, हे अधिक स्पष्ट होते.

किंवा असे म्हणू शकतो :
"आड" ही भौमितिक संकल्पना मोजमाप पूर्ण करण्यासाठी पुरेशी नाही. बहुतेक वेळी ती संदर्भाविना वापरली जाते, तेव्हा "निरीक्षकाच्या स्थानापासून" असे अध्याहृत असते. "निरीक्षकाचे स्थान" याची नोंद केली, तर "आड"चे निरीक्षण कोणीही करण्याइतपत पुरेशी माहिती मिळते. त्यानुसार केलेली निरीक्षणे जुळतात. म्हणजे संकल्पना वस्तुनिष्ठ आहे/केवळ वाक्य छोटे करण्यासाठी ती विधाने "व्यक्तिनिष्ठ" शब्दांत मांडली जातात.

- - -

विगिन्स आणि विगिन्सचा मित्र यांच्या परिस्थितीचे पुरेसे वर्णन केले आहे. (कदाचित तपशील अधिक लागतील. पण तपशील काय ती कल्पना वाचक करू शकतो, असा लेखकाचा अनुभव आसावा. लेखन करण्यास अतिरेकी विलंब लागू नये म्हणून ते तपशील दिलेले नसावेत. सारंशाने प्रयोगाचे वर्णन करण्याबाबत लेखकाशी मी सहमत आहे.) विगिन्स आणि त्याच्या मित्राच्या परिस्थितीत कोणी का असेना, त्यांच्या परिस्थितीमधून मोजमापे केली जाऊ शकतात. आणि निरीक्षण त्या परिस्थितीत अनुक्रमे नेमके तसेच होईल. (विगिन्सच्या परिस्थितीत/ बागेतल्या झोपाळ्यावरून, विगिन्ससारखे/कवीसारखे होईल. मित्राच्या/मामाच्या परिस्थितीत मित्रासारखे/मामासारखे होईल.)

pertaining to or characteristic of an individual; personal; individual: a subjective evaluation.
इथे क्यारेक्टरिस्टिक म्हणजे तुमच्याकडे असलेली माहिती धरता येईल.

शक्य आहे. पण ती माहिती परिस्थितिजन्य असल्यास त्या परिस्थितीतल्या कोणत्याही निरीक्षकाची तीच माहिती आहे असे धरावे.

विचार करा : प्रकाशचित्रे काढताना, ग्रहा-तार्‍यांचे अंतर गणिताने काढताना वगैरे तुम्ही "पॅरॅलॅक्स" संकल्पना वापरता. त्यास तुम्ही वस्तुनिष्ठ नसलेली व्यक्तिनिष्ठता मानता का?

अगदी मान्य

सहमत आहे. सब्जेक्टीव्ह याचा व्यक्तिनिष्ठ असा (कदाचित व्यवहाराच्य जगामध्ये अधिक प्रचलित असणारा) अर्थ अपेक्षित नव्हता. धनंजय आणि रिकामटेकडा यांच्या जागी दोन यंत्रमानव असले तरी फरक पडणार नाही*. कदाचित सापेक्ष हा शब्द अधिक योग्य ठरेल.

*हे वाक्य कॉन्शसनेस कॉलेप्सच्या काँटेक्स्टमध्ये कितपत तग धरेल याविषयी शंका वाटते आहे.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

वोईच तो!

सब्जेक्टिवपणा हा ऑकॅमच्या वस्तर्‍याच्या विरुद्ध आहे.

नसावा

नसावा. पण तो वेगळा मुद्दा आहे (खाली बघा). "सब्जेक्टिव्ह" संकल्पनेऐवजीसुद्धा श्री. आरागॉर्न यांनी उद्धृत केलेले विधान लिहिता येते असे मला वाटते.

(परिस्थितिनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, या दोन संकल्पनांची गफलत न झाली तर बरे.)

नाहीतर कोणी म्हणेल "पॅरॅलॅक्स" ही संकल्पना नको कारण त्यात परिस्थितिनिष्ठ निरीक्षणांतला फरक असतो.

- - -
वेगळा मुद्दा :
वस्तुनिष्ठ निरीक्षणे ही अनेकांना सारखी असतात, अनेक-संवादांत तशा निरीक्षणांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते.
ऑकमच्या वस्तर्‍याचा संबंध काय, ते माहीत नाही. समजावून सांगाल काय?

वेगळा मुद्दा

"म्हातारीने डोळे झाकले तरी सूर्य उगवतो" या विधानाला सापेक्षता म्हणता येईल. पुंजयामिकीमध्ये मात्र, "डोळे झाकले तर घटना घडत नाही" असे 'निरीक्षण' (नल ऑब्जर्वेशन) शक्य असते.
ऑकॅमचा संबंध असा की सब्जेक्टिव विधानांमध्ये, विशेषतः सॉलिप्सिस्ट विधानांमध्ये, 'ऍज इफ' या मूलभूत नियमाकडे दुर्लक्ष करून, अतिरिक्त, निरुपयोगी गृहीतके स्वीकारली जातात.

मुळीच नाही

त्यानंतर मी चेंडू बघेपर्यंत त्या चेंडूचा रंग निळा असण्याची माझ्या लेखीची संभाव्यता 'चिरंतन' नियमांप्रमाणे, नाण्यासारखी ५०-५०% असते तर धनंजय यांच्यासाठी १००-०% असते. (???)

सगळे मुसळ केरात? निरीक्षणापूर्वी माझ्यासाठी संभवनीयता ५०-५०% अशीच असते. माझ्यासाठी संभवनीयता (संभाव्यता) १००-०% असते असे तुम्हाला कुठे दिसले?

होय "धनंजय आयडीचा उपक्रम-सदस्य" उदाहरणात १००-० संभवनीयता आहे, असे माझे प्रतिपादन आहे. मात्र त्या उदाहरणात "घटना"ची व्याख्याच चालू आहे. निरीक्षण अजून व्हायचेच आहे. म्हणून "संभवनीयता" संकल्पनेला अर्थ आहे. (संभवनीयतेबद्दल अंदाज करण्यासाठी पुन्हा-पुन्हा निरीक्षण करता येईल खरे.)

तिथे मुद्दा "ढोबळ विरुद्ध सूक्ष्म" व्याख्यांबद्दल आहे.

तसे नाही

निरीक्षणापूर्वी माझ्यासाठी संभवनीयता ५०-५०% अशीच असते. माझ्यासाठी संभवनीयता (संभाव्यता) १००-०% असते असे तुम्हाला कुठे दिसले?

(रिकामटेकड्याने) निरीक्षण करण्यापूर्वी, (धनंजय यांनी निरीक्षण केल्यानंतर,) धनंजय यांच्यासाठी संभवनीयता (संभाव्यता) १००-०% असते.

हंऽ

(धनंजय यांनी निरीक्षण केल्यानंतर,) धनंजय यांच्यासाठी संभवनीयता (संभाव्यता) १००-०% असते.

मात्र मी म्हणतो की धनंजयने निरीक्षण केल्यानंतर धनंजयसाठी "संभवनीयता" अशी काही संकल्पनाच नसते. त्यामुळे वरील वाक्यखंड वापरता येत नाही.
रिकामटेकडा यांनी अजून निरीक्षण करणे बाकी आहे - आणि धनंजयशी त्यांची माहितीची देवाणघेवाण होत नाही, त्यांच्यासाठीच "संभवनीयता" ही कल्पना लागू आहे.

ह्म्म...

रिकामटेकड्याने निरीक्षण करण्याअगोदर त्याच्यासाठी त्या दोन चेंडूंचा रंग जाणण्यासाठीची संभवनीयता ५०-५०% असेल. येथे धनंजय यांनी पूर्वनिरीक्षण केलेले असो वा नसो, त्याचा कसलाही संबंध लागू होत नाही. आणि समजा त्यांना निरीक्षणानंतर जरी चेंडूचा रंग माहित झाला (आपसूकच त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी तो बघितलेला असणार!) तरीदेखील धनंजय यांचे निरीक्षण झाल्यानंतर ते त्यांनी रंग ओळखलेला चेंडू पुनः पूर्वस्थितीत आणून ठेवतील, आणि त्यानंतर रिकामटेकड्याला त्यांपैकी एक चेंडू निवडून त्याच्या रंगासंबंधी संभवनीयतेबद्दल स्पष्टीकरण देण्याची संधी मिळेल. निश्चितच दोन चेंडू (पैकी एक)—दोन रंग (पैकी ५०-५०%) असे रिकामटेकड्याचे उत्तर असणे साहजिक आहे.

- -विशाल तेलंग्रे

अनियतता आणि पूंजभौतिकी

मुळात पॉपरचे उदाहरण नेहमी वापरात असलेल्या वस्तुंबद्दल होते. (नाणे उडवणारे यंत्र) त्यातूनच तो अनियततेविषयीचे अनुमान काढतो. मात्र ते पटतेच असे नाही. असे नेमके पणे काम करणारे वास्तव यंत्र जवळपास अशक्य असते. आता धनंजय म्हणतात तसे टॉर्क नियमन करणारे यंत्र बनवले तर त्याचे उत्तर एकच येईल. हे यंत्र अजून तरी कल्पनाविश्वात असावे असे वाटते.
अभियांत्रिकीत (आणि इतरही क्षेत्रात) मोजमापातील चुका (एरर), पदार्थाचे गुण काढण्यातल्या चुका (एरर) आणि काम करतानातील विविधता यामुळे एकंदर ढोबळ परिस्थिती असते. त्याचे निष्कर्ष ही ढोबळ असतात. हे निष्कर्ष तंतोतंत मिळण्याची सध्यातरी अनेक बाबतीत सूतराम शक्यता नाही. कदाचित पॉपर या मुद्याकडे लक्ष वेधत असेल.

पूंजभौतिकी मात्र एक स्वतंत्र चर्चेचा विषय ठरेल. त्याचे बहुतेक गणित हे शक्याशक्यतेवर अवलंबून असते. मांजरीचे वा चेंडूंचे उदाहरण हे काही संकल्पना समजण्यास मदत करतील आणि मजेदार वाटतील. रिकामटेकडा यांनी म्हटल्याप्रमाणे बघण्याची वास्तव क्रिया ही परिस्थितीत बदल घडवून आणू शकते. याबाबत ईपीआर पॅराडॉक्स आणि बेलचे निष्कर्ष वाचण्यासारखे आहेत. वरील बहुतेक उदाहरणात या दोन्हीचा परामर्श घेतल्यासारखे वाटले.

पू़जभौतिकी बद्दलचा धनंजय यांचा मुद्दा मला फाइनमन आणि तत्ववेत्ती यांच्या संवादाची आठवण करून देतो. (बहुतेक श्युअरली यु आर जोकिंग मधील). तो नियतवादी आइन्सटाईन यांच्या भूमिकेच्या जवळचा आहे. मी मात्र कुंपणावर उभे राहणे पसंत करतो.

प्रमोद

यंत्र बांधण्यास फारसे कठिण नसावे

मी तव्यावर थालीपीठ उलथतो तेव्हा प्रत्येक वेळेला अपेक्षित बाजू खाली आणि अपेक्षित बाजू वर, अशा रीतीने थालीपीठ पडते. थालीपिठाऐवजी नाणे उलथणारे यंत्र माझ्या हातापेक्षा थोडे सूक्ष्म-हलचालींचे हवे, हे खरे. माझ्या प्रयोगशाळेतच अर्ध्या किलोचे वजन १० मायक्रोमीटर ऍक्युरसीने हलवणारे यंत्र आहे. थोडा वेळ दिल्यास, नाणे नेमके उलथण्याइतपत सूक्ष्मतेने स्प्रिंग ओढणारे यंत्र खुद्द आमच्या प्रयोगशाळेत आम्ही बनवू शकतो, असे वाटते.

पण मी यंत्र बनवायची गरज नाही. असे यंत्र आधीच कोणीतरी बनवलेले आहे, त्याबद्दल माहिती येथे बघावी (दुवा). दुव्यावरची ही दुय्यम बातमी आहे, त्यामुळे पहिला परिच्छेद काळजीपूर्वक वाचावा.

यंत्र बनवल्याच्या निबंधाची मूळ पीडीफ येथे मिळेल.

"मोजमापे ढोबळ असतात" ही बाब तर पूर्वापारपासून माहीत आहे. पॉपर यांनी मूलगामी असे काय सांगितले आहे, याबद्दल कुतूहल वाटते.

पाकृ

अपेक्षित बाजू खाली आणि अपेक्षित बाजू वर

मोबिअस/क्लाईन थालीपीठाची पाककृती जाणण्यास मी उत्सुक आहे :D

हाहा

"अपेक्षित" शब्दाचा अर्थ संदर्भ-बद्ध असतो, ते सर्व अर्थ एकच असल्याची कल्पना केल्यामुळे मस्त फँटसी! मजा आली.

नाणे उडवायचे यंत्र

हवे ते उत्तर येणारे नाणे उडवायचे यंत्र असंभव नसले तरी कठीण आहे. लहानपणी टॉस करताना नाणे उंच उडाले नाही किंवा कडा दिसणार नाहीत एवढ्या वेगाने फिरले नाही तर आम्ही तो टॉस बाद ठरवायचो. (आणि असेच सर्वजण करत असावेत). थालिपीठ उडवायचे यंत्र थालिपीठाला अर्धेमुर्धे फिरवेल. नाणे उडवायच्या यंत्रावरील लेखात काही विशिष्ट परिस्थितीत हेड येण्याची शक्यता टेल पेक्षा वाढलेली दिसली. पण टेलची शक्यता संपत नाही. नाणे उडवायचे यंत्र बनवलेत तर एक शोधनिबंध करता येईल.

प्रमोद

पोस्ट हॉक नियम

यंत्रात छाप-काटा दोन्ही पडण्याची शक्यता मोजण्याइतपत आहे हे त्या पीडीएफमध्ये मला दिसले नाही [पहिला परिच्छेद]:

The coin is placed on a spring, the spring is released by a ratchet, and the coin flips up doing a natural spin and lands in the cup. With careful adjustment, the coin started heads up always lands heads up—one hundred percent of the time.

त्यांच्या आकृती क्रमांक ७ मधील आकडे यंत्राने नव्हे, तर हाताने उडवलेल्या नाण्याबाबत आहेत.

- - -

"बनवलेल्या यंत्राने छाप आणि काटा दोन्ही पडायची काहीतरी संभवनीयता आहे" यातून पॉपरच्या म्हणण्याला पुष्टी मिळत नाही. जर पॉपर म्हणतो की

जर हे जग नियत असेल तर नाणे उडवण्याच्या यंत्रातील 50-50 टक्के येणारे निकाल हे कसे सिद्ध करणार?

तर यंत्राने उडवलेले नाणे पडण्याची शक्यता ५०-५०% पेक्षा पुष्कळ वेगळी असली, तर पुरते. आणि यंत्राच्या प्रयोगात ती वेगळी आहे. त्याच्या या प्रमाणाला आपण बाद केले पाहिजे.

या आणि अशाच प्रकारच्या यंत्रातील शक्यतांची गणिते बरोबर येतात याचाच अर्थ जग नियत असू शकत नाही.

प्रमाण बाद करताच त्याचा हा निष्कर्ष बाद होतो.

महत्त्वाचे : वर मी पॉपरचा युक्तिवाद खोडलेला आहे. "जग नियत असते" असे म्हटलेले नाही. जग नियत असेल किंवा नसेल. "नियत" शब्दाचा अर्थ मला नीट माहीत नाही. पण पॉपरच्या या उदाहरणात त्याचे प्रायोगिक प्रमाण चुकले असल्याकारणाने त्यातून कुठलाच निष्कर्ष काढता कामा नये. समजा कोणी म्हटले :
"सफरचंदे ही संत्र्यांच्या झाडावर उगवतात, म्हणून सफरचंद हे खनिज असूच शकत नाही."
मी प्रयोग करून दाखवेन की सफरचंद हे संत्र्याच्या झाडाला उगवत नाही. युक्तिवाद चुकलेला आहे. मात्र मी युक्तिवाद खोडला म्हणून जर कोणी म्हणाले "धनंजयच्या मते सफरचंद हे खनिज आहे" तर ते योग्य नव्हे. सफरचंद खनिज आहे की नाही याबद्दल माझे कुठलेच मत मी सांगितलेले नाही. (फॉर द रेकॉर्ड : माझ्या मते सफरचंद खनिज नाही. फॉर द रेकॉर्ड : "जग नियत असते" या वाक्याचा अर्थ मला माहीत नसल्यामुळे या विधानाबद्दल माझे काहीच मत नाही.)

- - -

आता माझ्या थालीपीठ उलथण्याबाबत :

थालीपीठ/नाणे किती उंच उडवायचे ही अट पोस्ट-हॉक आहे.

थालीपीठ अर्ध्या कोलांटीने पालथले तर तुम्हाला ते नको. मी सराव करून शिकून एक पूर्ण कोलांटी पालथायला शिकलो, तर तुम्ही पुढे म्हणाल ते कमीच. मी शिकत शिकत दीड-दोन-अडीच कोलांट्या मारायला शिकेन, तुम्ही प्रत्येक वेळेला "पुरेसे नाही" असे म्हणू शकता. कदाचित कंटाळा येईस्तोवर सराव केला तरी ३ कोलांट्यांनी थालीपीठ मी जसेच्यातसे उलथू शकणार नाही. तुम्ही म्हणाल - "तर मग ३ कोलांट्यांनी थालीपीठ उलथून दाखव". ही शुद्ध गोलाकार सिद्धता आहे. "तुला जमणार नाही इतक्या कोलांट्यांनी थालीपीठ उलथवणे तुला जमणार नाही."

क्रिकेटमध्ये किंवा जुगारात नाणेफेक करताना "नियंत्रणाबाहेर असाव्यात इतक्या कोलांट्या नाण्याने घेतल्या पाहिजेत" अशी अट ठीक आहे. फलंदाजी-गोलंदाजीची निवड नियंत्रणाबाहेर असावी, हे उघड-उघड साध्य आहे. नाणे कधी नियंत्रणात असूच शकत नाही, हे सिद्ध करण्याचा हेतू नाही.

येथे मात्र "नाणे नियंत्रणाबाहेर असते" असे सिद्ध करायचे आहे. मग नाणे नियंत्रणाबाहेर जाईल इतक्या कोलांट्या नाण्याने घेतल्या पाहिजे, ही अट अग्राह्य आहे.

हां - जर अशी सिद्धता करायची असेल "५ कोलांट्यांपेक्षा अधिक नाणेफेक धनंजय या व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेर आहे [किंवा मनुष्य या प्राण्याच्या नियंत्रणाबाहेर आहे]" तर तशी अट देता येते. पण अशा अटीतून कुठला मूलभूत तात्त्विक प्रश्न सुटणार नाही.

- - -

खूप काळापर्यंतची आणि अतिशय गुंतागुंतीची भाकिते अधिक-अधिक प्रामादिक होतात, हे पूर्वापारपासून माहिती आहे. मोजमापातल्या ढोबळपणामुळे कालांतराने भाकिते अधिक-अधिक चुकत जातात. हेच म्हणत असेल, तर पॉपर नवीन काय सांगतो आहे हे कळले नाही. पॉपर असा ढिसाळपणा करणार नाही असे त्याच्या अन्य लेखनावरून वाटते. हे पुस्तक मुळात वाचायला पाहिजे.

वेड

चर्चा वाचली. अशा चर्चा वाचून लवकरच वेडा होईन.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एकदम् बरोब्बर

कुणीतरी माझ्याबरोबर आहे तर!! मी फक्त नजर फिरवत होती...वाळवंटात ओऍसिस् दिसलं! म्हणून उपप्रतिसाद देण्याची हिम्मत करतेय्.
नुसती नजर फिरवूनच् डोळे फिरले, जोर्जोरात ओरडावस वाटत होतं. आता जरा शांत वाटतय्. आता सुवर्णा, आजुबाजु न बघता गुपचुप इधरसे कल्टी मारनेका!!!

ऑफिस बंद झाल्यावर-

रात्री ऑफिस बंद झाल्यावर कोणीच पहात नसताना हा पीसी, हा कीबोर्ड किंवा हे सगळे सध्या मला दिसते आहे ते यदृच्छेने प्लाज्मात किंवा इतर कशात तरी बदलतात आणि सकाळी मी बघताच यदृच्छेने परत पूर्वी मला दिसले होते तसे होतात.
हा माझा प्रतिसाद कोणीही वाचेपर्यंत इथे 'असा' नसतोच. वाचण्यास सुरुवात करताच तो असा बनतो. - असे खरेच कळले. :)
म्हणजे पुन्हा आठवले म्हणा हवे तर...

सहमत

डासांना मारण्यासाठी कीटकनाशकाचा किंवा रुमालाचा नेम धरण्याच्या उद्देशाने मी त्यांच्याकडे बघतो तेव्हा त्यांना ते समजते आणि त्यामुळे ते माझी नजर चुकविण्याचा प्रयत्न करीत उडतात.

अगदी बरोबर

अगदी. मी पाहीपर्यंत स्त्रीचे स्तनद्वय हे मांसपेशींतली केवळ विकृती असते. मी पाहताच यदृच्छेने त्यांचे वेव्ह फंक्शन बदलून ते सुंदर, आव्हानात्मक वगैरे होतात.

मी पाहणे थांबवल्यानंतर काय होते ते माहिती नाही.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

चर्चा वाचली/मत

प्रश्न उत्तम आहेत , या सर्व विषयांशी कधीही संबंध न आल्याने ओळख होते आहे हे उत्तमच. पण अशा पद्धतीचे लेख हे एकाच कल्पनेला घेऊन लिहीता आले, चर्चाविषय मर्यादित ठेवता आले तर नवख्याला काही समजण्याची शक्यता वाढेल असे वाटते. प्रत्येक चर्चेच्या प्रतिसादात नेहमी वापरात नसलेल्या नवीन संज्ञा, नवीन कल्पना समजून घेणे हे जरा अवघड जाते आहे.

पुंजयामिकी आणि अभ्युपगम अशा शब्दांनी, आणि मधूनच आलेला ओकॅमचा वस्तरा, कोपनहेगन इंटरप्रिटेशन यासर्वामुळे ते अधिकच अवघड होते आहे.

पण ते चर्चाप्रस्तावकांनी आणि चर्चेत सक्रिय सहभागी असणार्‍या सदस्यांनी मान्य करावे किंवा या प्रश्नांची उत्तरे देत आमच्यासारख्या ढ किंवा परंपरागत अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यांमुळे मागे पडावे, असा आग्रह नाही. पण हे चर्चाविषय विस्तृत समुदायापर्यंत पोचवायचे असले (आणि ते पोचवावेत), तर, ते माहिती असलेल्या उदाहरणांनी कल्पनांसकट सुस्पष्ट करून सांगितले पाहिजेत असे मात्र म्हणेन. सगळे सोपे करावे पण ते खूपही सोपे नको, हे मान्य असले तरी मुळात देव आणि अशा संकल्पना लोकांच्या परिचयाच्या असतात. या कल्पनांबद्दल काहीच भाष्य न करता चेंडू आणि अशीच उदाहरणे दिली तर त्या संकल्पनांच्या काट्याकुट्यातून वाट काढणे अवघड जाते असे माझे मत आहे.

क्वांटम मेकॅनिक्स

थोडे सोपे करून लिहायचा हा प्रयत्न आहे.
हा विषय माझ्या वाचनातला फारसा नाही. दुसरे म्हणजे मला फारसा पटलेला नाही. पटला नाही याचे कारण माझ्या शंकांचे निराकरण झाले नाही. ते करण्याचे प्रयत्न केले पण साध्य झाले नाही.

गंमत अशी की अगदी पदार्थविज्ञानातील संशोधन करणारे माझे काही मित्र यावर फारसे बोलणार नाहीत. (त्यांच्या मते तो त्यांच्या संशोधनाचा विषय नाही.) याचा अर्थ मी असाच धरून चालतो की यावर अधिकारवाणीने लिहिणारे बरेच कमी लोक असतील. उपक्रमवर नसावेच.

मी फक्त एकच संकल्पना स्पष्ट करू इच्छितो. ती कदाचित वरील संवादात चैंडूंच्या उदाहरणाने आली असेल.

मात्र एवढे लक्षात ठेवायचे की क्वांटम मेकॅनिक्स हे खूप सूक्ष्म म्हणजे अणूहून सूक्ष्म अशा गोष्टींनाच ते लागू आहे. चेंडू, मांजर हे तेवढे सूक्ष्म केले तरच वरील संवादास अर्थ राहतो.
मूळ संकल्पना हायजनबर्गची आहे. त्यावर इतरांनी बरेच इमले चढवले आहेत.

एखादी गोष्ट आपण बघतो (योग्य पर्याय ऑब्जर्व करतो) तेव्हा त्या बघण्याच्या क्रियेत काही वास्तविक शक्ति असते. म्हणजे मी समजा एक चेंडू बघितला याचा अर्थ प्रत्यक्षात त्या चेंडूतून बाहेर पडणारे किरण बघतले असा होतो. आता हे किरण बाहेर पडल्याने त्या चेंडूवर काही परिणाम होतो का? आपण म्हणतो काहीच नाही. मात्र ते खरे नाही. त्याचेंडूतील उर्जा कमी जास्त होते, त्यातून परावर्तित होणार्‍या किरणांनी त्याची दिशा बदलू शकते. हे बदल चेंडूसाठी महत्वाचे नसतात. पण अगदी सूक्ष्म कणांसाठी ते खूप महत्वाचे असतात. असे कण मग या बघण्याच्या क्रियेने विचलीत होतात. आता आपण एकाच चेंडूची दोन मापने घेण्याचा प्रयत्न करू. उदाहरण क्रिकेट, टेनिस वा कुठल्याही चेंडूच्या खेळाचे घेता येईल. समजा असे धरले की मी बॅट/रॅकेट फिरवायचे एक यंत्र तयार करत आहे. या यंत्राला कार्यान्वीत होण्यासाठी मला चेंडू नेमका कुठे आहे हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला मध्यावर घेता येईल. सहसा मी चेंडू कडे बघतो तो सध्या कुठे आहे याचा अंदाज घेतो आणि त्याच्या वेगाचा अंदाज घेतो. त्यानुसार मला अंदाज येतो की बॅट/रॅकेट कुठे आणि किती वेगाने आणावी. याचा अर्थ मला त्या चेंडुचे एक ठिकाण आणि त्याचा त्याच वेळी असलेला वेग माहिती असावा लागतो.

हेच आपण सुक्ष्म कणाबद्दल करू शकतो का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. कारण जसे मी त्यांच्या कडे बघतो तसे ते विचलीत होतात. समजा आपण असे धरून चालू की मला त्या कणाचे स्थान (लोकेशन) आणि वेग हे मोजण्यासाठी दोनदा बघावे लागते. या विचलीत होण्याने त्याकणाकडे मी एकदाच बघू शकतो. त्यामुळे असे धरून चालू की त्या कणाचा एकतर मला वेग मोजता येईल किंवा त्याचे स्थान बघता येईल. याला प्रॅक्टीकली काहीच उपाय नाही.

हायजनबर्गने त्यात एक तर्कशास्त्राचा सिद्धांत मांडला की ज्याअर्थी नेमकी मोजमाप करता येत नाही त्याअर्थी नेमके स्थान वा वेग हे कधीच नसते. सोप्या भाषेत (पूर्वीचे वाक्य पण वैज्ञानिक नव्हते) मला जे बघता येत नाही ते नसते. (दरवेळी सोपी भाषा केली की संकल्पनेचा थोडा थोडा र्‍हास होतो.) बघितल्याबरोबर मात्र ते तसे असते. नितिन यांच्या प्रतिसादात या तत्वाचा उल्लेख आहे. ही संकल्पना समजायला कठीण आहे. त्यामुळे लोकांनी त्याचे मांजर (श्रोडींजर) वा चेंडू केले. पण मुळात हे सर्व सूक्ष्म कणांबाबत आहे याचे वास्तव विसरता कामा नये.

आता मी बघत नसताना काय काय असू शकते. आपण क्रिकेटच्या चेंडू कडे वळू तो विविध ठिकाणी, वेगवेगळ्या वेगाने व वेगवेगळ्या स्पिन मधे असू शकतो. या सर्व गोष्टी काहीशा नियबबद्ध असू शकतात. म्हणजे त्याचा स्पिन जास्त असेल तर वेग कमी असेल, वेग जास्त असेल तर तो अधिक जवळ असेल वगैरे. या नियमबद्धतेने त्याच्या काही समजा १० वेगवेगळ्यास्थिती असतील तर मी बघेस्तोपर्यंत तो चेंडू त्या दहाही स्थितीत असतो. (कधी असा तर कधी तसा या रितीने.) या दहास्थितीचे एक गणित मांडले तर त्याला वेवफंक्षन असे म्हणता येईल. माझ्या बघण्याच्या क्रियेमुळे या दहातील एकच स्थिती उरेल. (त्यानंतर तो चेंडू विचलीत होईल हे भान न विसरता.). त्यास वेवफंक्शनचे कोसळणे असे म्हटले जाते (१० तून १ होणे.)

खूपशा लोकांनी बघण्याच्या क्रियेला आकलनाशी जोडले. म्हणजे मी बघितले याचा अर्थ मी जाणले असा घेतला. अर्थात हा अर्थ चूक आहे. बघण्याच्या क्रियेत किरणे असतात ती वास्तव असतात हे भान ठेवले पाहिजे. मात्र हे भान न ठेवता बरेचदा त्याला बघणार्‍या माणसाच्या मनाशी संबंध जोडण्याची क्रिया जोडली जाते. याला मी विपर्यास म्हणीन.

हायजनबर्गने मूळ कणांचे स्थान आणि वेग (प्रत्यक्षात मुमेंटम) यातील मोजमापातील चुकांचे (एरर) एक गणित केले होते. या गणितापेक्षा सूक्ष्म मोजमाप करता येणार नाही असे ठासून सांगितले होते. याला उत्तर म्हणून आइन्स्टाईन आणि इतर दोघांनी एक प्रश्न उपस्थित केला होता ज्यात असा एक काल्पनिक प्रयोग होता (खरे पाहिले तर हायजनबर्गचा प्रयोग हा देखील काल्पनिक प्रयोग होता.) ज्यात या पेक्षा सूक्ष्म मोजमाप करता येऊ शकत होती. या प्रश्नाचे उत्तर म्हणून एन्टॅग्लमेंट ची संकल्पना आली. (ही संकल्पना अधिक जड जाणार असल्याने मी त्यावर लिहित नाही.) धनंजय आणि रिकामटेकडा यांच्या चेंडू रंग प्रयोगात या कल्पनेचा भास होतो. पण ते मांडतात तशी ती नाही. मुळात धनंजय यांनी चेंडूचा रंग बघितला तर रिकामटेकडा यांच्या हातातील चेंडूचा रंग बदलून जाईल अशी ती कल्पना आहे.

मला माहित नाही की हे सोपे केले का अधिक कठीण.

प्रमोद

प्रमोद

सहमत

मुळात धनंजय यांनी चेंडूचा रंग बघितला तर रिकामटेकडा यांच्या हातातील चेंडूचा रंग बदलून जाईल अशी ती कल्पना आहे.

माझाही दावा आहे की ती कल्पना तशीच आहे.

पटला नाही याचे कारण माझ्या शंकांचे निराकरण झाले नाही. ते करण्याचे प्रयत्न केले पण साध्य झाले नाही.

+१
---------
बाकी, प्रयोगांचा निष्कर्ष लावण्यासाठी क्वांटमव्यतिरिक्त काही पर्याय मलातरी दिसत नाही.
या परिस्थितीतही, शुद्ध कोपनहेगन प्रकारचे सब्जेक्टिव (निव्वळ सापेक्ष नव्हे) निष्कर्ष नाकारण्यासाठी मी वाट्टेल तो पर्याय स्वीकारेन. पेनरोज यांचा वन ग्रॅविटॉन निकष आणि मेनी वर्ल्ड हायपोथेसिस हे दोन पर्याय आशादायी आहेत. (डॉकिन्सबाबाने मेनी वर्ल्ड हायपोथेसिसला कौल दिलेला आहे.)

माझी तरी तशी कल्पना नाही

मुळात धनंजय यांनी चेंडूचा रंग बघितला तर रिकामटेकडा यांच्या हातातील चेंडूचा रंग बदलून जाईल अशी ती कल्पना आहे.

माझाही दावा आहे की ती कल्पना तशीच आहे.

"ती" म्हणजे कुठली कल्पना आहे असा संदर्भ देऊ शकाल काय?

छे बुवा. शब्दांच्या व्याख्या केल्याशिवाय फारच गडबड होते आहे. "बदलणे" शब्दाची प्रयोगसाध्य व्याख्या काय आहे? व्यवहारात "आधी निरीक्षण करता एक परिस्थिती होती, नंतर निरीक्षण करता वेगळी परिस्थिती होती" या दोन निरीक्षणांना एकत्र घेतल्यास "बदल" म्हणतो. रिकामटेकडा यांच्या हातातल्या चेंडूच्या बाबतीत दोन निरीक्षणे कधी झालीत? एकाच निरीक्षणाचे वर्णन केलेले आहे.

"बदल"ची दुसरी कुठली प्रयोग करण्यालायक व्याख्या वापरात आहे काय? आणि प्रयोग करून बघू शकत नाही, तर हे शब्द काय आहेत? होय-नाही-होय-नाही असे तालबद्ध ध्वनिमाधुर्य असलेली जुगलबंदी आहे :-)

एन्टॅगलमेंट

मी एन्टॅगलमेंट वर काही लिहिले नव्हते. (हायजनबर्ग ची अन्सर्टन्टी समजण्यायोग्य भाषेत मांडली असेल आणि ती समजली असेल तरच एन्टॅगलमेंट संकल्पना सांगता येते.)

रंग बदलण्याची क्रिया एन्टॅगलमेंट मधे येते. जेव्हा ते एन्टॅगल्ड स्टेट मधे असतात तेव्हा एकाचा रंग निळा तर दुसर्‍याचा लाल असतो. (हा का असतो हे फारसे महत्वाचे नाही. ते इक्विलिएब्रियम प्रिन्सिपलने आपो आप येते.) तेव्हा त्यांचे वेवफंक्शन हे लाल निळा असे असते. म्हणजे कधी अ चेंडू लाल असतो तर कधी ब चेंडू लाल असतो. पण ज्यावेळी अ लाल असतो तेंव्हा ब निळा व उलट पालट असते. हे वेवफंक्शन लक्षात घेतले तर रंगातील बदल लक्षात येतो.

आता धनंजय यांनी निळा चेंडू बघितला तर त्याचा अर्थ रिकामटेकडा हे लाल चेंडू बघतील. पण असे नघडता धनंजय यांनी निळा चेंडू बघण्याच्या क्रियेमुळे तो विचलित होऊन वेगळा रंग धारण करेल. आणि त्याच क्षणी रिकामटेक़डा ज्या उरलेल्या चेंडूशी आहेत त्या चेंडूचा रंग बदलून जाईल. (वेवफंक्शन प्रमाणे असल्याने). यात रिकामटेकडा तो चेंडू बघण्याची गरज नाही. तर वेवफंक्शन नावाच्या गणितावरचा तो विश्वास आहे.

प्रमोद

"बदलेल" शब्दाचा अर्थ समजला नाही

पण असे न घडता धनंजय यांनी निळा चेंडू बघण्याच्या क्रियेमुळे तो विचलित होऊन वेगळा रंग धारण करेल.

"वेगळा रंग धारण करेल" याचा अर्थ असा काही आहे काय : "आधी एक रंग होता आणि निरीक्षणानंतर वेगळा रंग होता?"

आणि त्याच क्षणी रिकामटेक़डा ज्या उरलेल्या चेंडूशी आहेत त्या चेंडूचा रंग बदलून जाईल.

या वाक्याचा अर्थ असा काही आहे काय : "त्या क्षणापूर्वीच्या क्षणी चेंडूचा रंग वेगळा काही होता, त्या क्षणानंतर चेंडूचा रंग वेगळा काही होईल"

"निरीक्षणानंतरचा चेंडूचा रंग अमुक आहे", या विधानाचा प्रयोगसिद्ध अर्थ मला कळतो. मात्र
"निरीक्षणाआधी चेंडूचा रंग वेगळा होता", या विधानाची कुठलीच प्रायोगिक सिद्धता मला सुचत नाही. हाइझेनबर्ग या प्रकाराला "भाषेचा दुरुपयोग" म्हणतो (त्याच्या निबंधांचा दुवा वर दिलेला आहे). हे शब्द एकापाठोपाठ एक उच्चारले म्हणून व्याकरणशुद्ध वाक्य होत असले, तरी त्या वाक्यात कुठलाच अनुभव किंवा कुठलेच ज्ञान सांगितले जात नाही.

तेव्हा त्यांचे वेवफंक्शन हे लाल निळा असे असते.... म्हणजे कधी अ चेंडू लाल असतो तर कधी ब चेंडू लाल असतो.

वेव्हफंक्शनमध्ये "प्साय" (ψ) असे एक चिह्न असते. |ψ| असे गणित केले तर त्याचा प्रायोगिक सिद्धतेसाठी अर्थ "प्रॉबॅबिलिटी=संभवनीयता" असा लावता येतो. ψचा अर्थ दोन्ही-शक्यता-एकाचवेळी असे काही मला कळत नाही. इतकेच काय |ψ|चा अर्थही मला असा कळत नाही. जड-मोठ्या वस्तूंच्या प्रयोगातसुद्धा संभवनीयता अशी काही असते. पण जड वस्तूंतही "संभवनीयता"ची व्याख्या "चेंडू लाल-निळा आहे" अशी नसते. किंवा "अमुक चेंडू कधी लाल तर कधी निळा" अशी नसते.

म्हणजे वेव्हफंक्शनवर विश्वास ठेवूनही "निरीक्षणाच्या क्षणापूर्वी चेंडूचा रंग वेगळा होता" हे विधान मला गणिताच्या मार्फत करता येत नाही. "निरीक्षणाच्या क्षणापूर्वी चेंडूच्या रंगाच्या ψची किंमत तमुक होती" असे विधान करता येते. या विधानातून "चेंडूचा रंग ढमुक होता" हा अर्थ मला कळत नाही.

आता निरीक्षणानंतर रंग निळा आहे ते ठाऊक आहे. निरीक्षणापूर्वी काय रंग होता ते ठाऊक नाही. अर्धवट ज्ञानातून "बदल झाला" (किंवा "बदल झाला नाही") असे विधान करण्यासाठी माझ्यापाशी सामग्री नाही.

नाही नाही

मी सांगितलेल्या वर्णनात रिकामटेकडा हे जो चेंडू हातात घेऊन (डोळे बंद करून) चालले आहेत, तोच चेंडू धनंजय यांनी 'पाहिला' असे म्हणायचे आहे. त्याच चेंडूचे वेव्ह फंक्शन धनंजय यांच्यासाठी एका स्टेटला कोलॅप्स झाले आहे. तर रिकामटेकडा यांनी तो अजून पाहिला नाही म्हणून त्याचे वेव्ह फंक्शन अजून (रिकामटेकडा यांच्या विश्वात?) ड्यूअल स्टेट मध्ये आणि ५०:५० संभाव्यतेचे आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मलाही

मलाही हाच प्रश्न पडला होता. वर दिलेला कोपनहेगनचा संदर्भ एकाच चेंडूच्या बाबतीत होता. चेंडू धनंजय यांनी पाहिला, रिकामटेकडा यांनी नाही. (असे मी समजतो आहे)

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

सहमत

उदाहरणाबाबत प्रमोद सहस्रबुद्धे यांचा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे.
नितिन थत्ते यांनी दिलेल्या उदाहरणात, तुम्ही दिल्याप्रमाणेच प्रश्न आहे की, कोणीही निरीक्षण केले की इतरांसाठीसुद्धा वेव फंक्शन कोलॅप्स होतो काय? माझ्या माहितीनुसार प्रायोगिक निष्कर्ष आहे की तो होतो. आपली चर्चा त्या घटनेचे केवळ स्पष्टीकरण करण्याविषयीची आहे ना? की कोलॅप्स होतच नाही अशी तुमची माहिती आहे?

चर्चा

आपली चर्चा त्या घटनेचे केवळ स्पष्टीकरण करण्याविषयीची आहे ना?
माझ्यापुरती तरी सध्या तीच आहे

की कोलॅप्स होतच नाही अशी तुमची माहिती आहे?
त्या त्या निरीक्षकापुरते कॉलॅप्स होते हे मला अधिक पटते. सर्वांसाठी युनिव्हर्सल कोलॅप्स होतो याचा पुरावा मिळाल्यास त्यावर विचार करता येईल.

--
अनुदिनी : मोझार्ट ऑफ मद्रास - http://rbk137.blogspot.com

 
^ वर