जर ......... तर मतदान दिवशी पिकनिक साजरि करण्यास काय हरकत आहे ?

विजू भाऊंच्या ह्या प्रतिसादावरून सुचलेले हे लेखन
http://mr.upakram.org/node/2741#comment-44212

इथे विजू भाऊंनी एक विधान केलेले आहे कि,
>> मतदानादिवशी पिकनिक साजरि करणारांना राजकिय नेत्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे का?

ह्यांचा आक्षेप कदाचित असा असेल कि सर्वसाधारण माणूस मतदानादिवशी पिकनिक साजरि करायला जातो. जो जातो त्यास राजकीय नेत्यांना काहीही बोलण्याचा अधिकार रहात नाही. ह्याच्याशी पूर्ण पणे सहमिती दर्शविल्यानंतर मात्र खालील विचार मनात आले,

मागल्या निवडणुकीत जवळपास ६० % मतदान झालेले होते. म्हणजे काय उरलेले ४० % लोक पिकनिक साजरि करायला गेलेली होती काय ?
ह्याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल.

मग काय करणे होती कमी मतदान होण्याची ?
१) माणूस कामानिमित्त आपले निवास सोडून दुसरीकडे जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बरीचशी पुरुष मंडळी रोटी कमाविण्यासाठी आपापल्या गावातून दुसर्या गावात ( तात्पुरते परदेशी ) गेलेली असतात, तिथे/तिथून त्यांना मतदान करण्याची सोय उपलब्ध नसते. म्हणून त्यांचे मत वाया जाते.
पोस्टाने वगेरे मत पाठीवीने, त्यासाठी करायला लागणारे प्रयत्न क्लिष्ट आहेत (माझ्या मते ते मुद्दामून तसेच ठेवले गेलेले आहेत.)
२) बर्याचदा अशिक्षित माणसाला मतदानाची प्रक्रिया नीट न समजल्यामुळे त्याचे मत वाया जाने.
३) लोक कोणताच उमेदवार लायन न समजणे. व त्यामुळे मतदानच न करणे
४) गुंड लोकांची भीती. काही ठिकाणी गुंड लोक धाक दाखूवन लोकांना मतदानापासून परावृत्त करतात.
पोलीस यंत्रणा/ तिथले स्थानिक राजकारणी हे आपापल्या फायद्याचे गणित करून गप्पा राहतात.
५) मतदान करताना "कोणालाच मत नाही" ह्याचे बटन उपलब्ध नसणे. जेणे करून गुप्त पद्धतीने तरी लोकं आपले म्हणणे त्यातून व्यक्त करू शकतील.
(नाही कि कोणता फॉर्म भरायला लावला पाहिजे, ते करणे जगजाहीर होत असल्यामुळे सामान्य माणूस तसे करायला कचरतो.)

ह्यासाठी एक उपाय सुचत आहे कि इंटरनेटवर(घर बसल्या) मत देण्याची सोय किव्वा भारतातून कोणत्याही मतदान केंद्रातून तुमचे मत देण्याची सोय करावी.
जे बाहेर पडले आहेत त्यांनी संपूर्ण भारताचा विचार करून योग्य मत देणे हे जास्त संयुक्तिक आहे कारण तसे मत देण्यामागे कोणतेच त्यांचे स्वार्थ नसते, पण एका स्थानिक माणसाच्या बाबतीती हा फरक पडू शकतो , त्याचे एखादे काम करून देण्याच्या आमिषाने किव्वा थोडे फार पैसे देऊन टायचे मत विकत घेता/देता येऊ शकते. परदेशी स्थायिक अथवा दुसरीकडे गेलेल्या माणसाचे मत विकत घेणे किव्वा त्याला काही लालूच दाखविणे, धाक दाखविणे तुलनेने अवघड.

इंटरनेटवर मत देण्याची सोय किव्वा भारतातून कोणत्याही मतदान केंद्रातून तुमचे मत देण्याची सोय झाली तर मतदान दिवशी पिकनिक साजरि करण्यास काय हरकत आहे ?
पिकनिक साजरि करण्यास गेलेले कुटुंब जवळपास एखादे केंद्र व एखादे सायबर कॅफे गाठून अर्ध्या तासात आपले मेल वगेरे चेक करून मतदान पण करेल.
(उलटपक्षी जर अशी सोय झाली तर कंपनी कामगारांना अर्धा दिवस सुट्टी देण्याऐवजी फार-फार तर एक तासाची सुट्टी देईल. कामाच्या जागेवरच एखादा संगणक उपलब्ध करून मतदान होऊ शकेल. software मधील मंडळी तर बसल्या बसल्या मतदान करू शकतील.)
योग्य काळजी घेऊन जर बँकांचे हजारो करोडोचे व्यवहार इंटरनेटवर होऊ शकतात, तर इंटरनेटवर मत देण्याची सोय करणे नक्कीच अशक्य नाही.

मग खुशाल जाऊद्या एखाद्या कुटुंबाला हवे तिथे पिकनिक साजरि करायला.
उलट निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर निदान चांगले विचार तरी डोक्यात येतील आणि योग्य मतदान होईल त्यातून.

लेखनविषय: दुवे:

Comments

मामू संगणक की भी वाट लगा देंगे मामू.

आम्हाला मतदान कमीच झालेले पाहिजे आहे. तुमच्या मध्यम वर्गीयांना विचारतो कोण. तुमच्या मध्यम वर्गीयांच्या मतान मुळे फार फरक आम्हाला पडत नाही. एक दीवस मतदान करून बाकी ५ वर्ष तुम्ही आमच्या मागे भूभू करत सुटाल हे काय आम्हाला माहित नाही का? आणि संगणकावरून मतदान केल्यावर घोळ होणार नाही का? आम्ही जेथे मतदान केंद्रे ताब्यात घेवून बोगस मतदानाने निवडून येतो , तेथे संगणकात घोळ घालणे अधिक सोप्पे आहे. एक तंत्रज्ञ पकडला की सोप्पे झाले बोगस मतदान. उगीच ती प्रत्येक मतदानकेंद्रा वर गुंडांची फोज बाळगून बदनामी झेलण्या पेक्षा एक मध्यम वर्गीय संगणक गुंड सांभाळणे ही व्हाईट कॉलर गुंडगिरी आम्हाला चांगली आहे. आम्ही जनतेच्या लोकशाहीची जेथे वाट लगादी मामू संगणक की भी वाट लगा देंगे मामू.

मतदान यंत्रे

मतदान यंत्रांबाबत इथे चर्चा झाली आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

मतदान यंत्रांना स्थळ आणि काळ याची बंधने असतात.

चर्चा मी वाचली,
पण मला मतदान यंत्र या बाबत चर्चा अपेक्षित नाही.
ह्याला स्थळ आणि काळ याची जी बंधने असतात ती बरीच मंडळी पाळू शकत नाहीत.
त्यासाठीच तर मला संगणकावर इंटरनेटवरून मतदान व्हावेसे वाटते.
त्याबाबत चर्चा अपेक्षित आहे मला.

दहशत

प्रत्यक्ष मतदानकेंद्रातसुद्धा दबाव आणण्याचे प्रयत्न होतात. (वास्तविक, विशिष्ट अंतरापर्यंत चिन्हे न दाखविणे, उमेदवाराच्या वाहनातून मतदारांची वाहतूक न करणे, इ. मार्गांनी आश्वस्त वातावरण करण्याचे प्रयत्न होतात.) घरून मतदान झाले तर दडपशाहीने मते मिळविणे अधिक सोपे होईल, परवलीचे शब्द मतदारांकडून विकत घेण्याचे प्रयत्न होतील. (पूर्वी मतदारांना एक-एक तिकीट मिळे, ते आवडत्या उमेदवाराच्या पेटीत टाकण्याची पद्धत होती. तिकिटे विकत घेतली जात म्हणून शिक्का मारण्याची पद्धत सुरू झाली.)

फार पुर्वि नव्हे, एखाद शतका अगोदर,

फार पुर्वि नव्हे, एखाद शतका अगोदर, 'एखादे यंत्र त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन हवेत उचलून घेऊन जाऊ शकणार नाही' असेहि शास्त्रज्ञ मानीत असत.
शेवटि, इच्छा तेथे मार्ग.
(न्यूटन चा तिसरा नियम ते अवकाशात झेपावणारे प्रक्षेपणास्त्र ह्यातील प्रवास मनुष्याने आपल्या दुर्दम्य इच्छा शक्तीनेच केला आहे.)

अवांतर : नुकतेच फेसबुक वर होत असलेले कांड आपल्याला माहीतच असेल. पण म्हणून काय फेसबुक बंद झाले का ?
इंटरनेटवरील सुरक्षा आणि त्यातील भेद हा एक न संपणारा गेम आहे, कारण त्याच्या दोन्ही बाजूला मनुष्याचीच बुद्धिमत्ता आहे.

असहमत

"मतदानकेंद्रापेक्षा 'अधिक' सुरक्षित वाटणारे वातावरण लोकांच्या घरामध्ये असते" असा तुमचा दावा आहे काय? ते तसे बनविण्यासाठी तुमच्याकडे 'मार्ग' आहे काय? परवलीचा शब्द 'चोरणे' या विषयी मी टिप्पणीच केलेली नाही. भीती दाखवून/दारू किंवा पैसे देऊन परवलीचा शब्द बळकावण्यावर काय 'मार्ग' आहे?

फार पुर्वि नव्हे, एखाद शतका अगोदर, 'एखादे यंत्र त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन हवेत उचलून घेऊन जाऊ शकणार नाही' असेहि शास्त्रज्ञ मानीत असत.
शेवटि, इच्छा तेथे मार्ग.
(न्यूटन चा तिसरा नियम ते अवकाशात झेपावणारे प्रक्षेपणास्त्र ह्यातील प्रवास मनुष्याने आपल्या दुर्दम्य इच्छा शक्तीनेच केला आहे.)

तुम्ही 'दुर्दम्य इच्छाशक्ति' वापरून भारताचे एकदाचे भले करून टाका ना!

अवांतरः मिसळपाव या संस्थळावर नितिन थत्ते यांनी नोंदविलेच आहे की तुमचा मुखवटा आता गळून पडला आहे. आतातरी 'गांधीवादी' हे टोपणनाव बदला की!

ह्म्म्म्म्

>> मतदानकेंद्रापेक्षा 'अधिक' सुरक्षित वाटणारे वातावरण लोकांच्या घरामध्ये असते" असा तुमचा दावा आहे काय?
जी मंडळी आपापले स्थानिक सोडून गेलेली आहेत त्यांच्यासाठी तरी नक्कीच सुरक्षित वातावरण असेल अशी अपेक्षा.
जरी काही बिहार मंडळी बिहार सोडून मुंबईला आलेली असतील तरी बिहार मधून इथे येऊन सर्व मुंबई धुंडाळून त्यांना भीती दाखवून मतदान करायला लावणे हे कैक पतीने अवघड आहे. राहिली गोष्ट स्थानिक लोकांची. काही विचारांती जर खरच असे वाटत असेल कि इंटरनेट च्या माध्यमातून बोगस मतदान होऊ शकेल तर ठराविक मतदान केंद्रे ठेवण्याच्या ऐवजी शेकडो सायबर कॅफे मध्ये अशी योजना करता येऊ शकेल. तिथे एकाच पोलीस किवा निवडणूक अधिकारि निरीक्षणास पुरेसा.

>> भीती दाखवून/दारू किंवा पैसे देऊन परवलीचा शब्द बळकावण्यावर काय 'मार्ग' आहे?
भीती दाखवून म्हणाल तर माझ्या पाठीश कोणी बंदूक दाखविली तर मी मतच काय सारी संपत्ती सुद्धा द्यायला तयार होईल.
दारू किवा पैसे याला न भूलण्यासाठी माणसाची नैतीकताच हवी.
आणि तसे कोणी कोणाला भीती दाखवू नये व आमिष दाखवू नये ह्यासाठी योग्य सरकार निवडणे हेच आपले कर्तव्य. ते सरकार निवडण्यासाठीच तर जास्ती जास्त मतदान व्हावे असे वाटते. म्हणूनच तर हा उहापोह करत आहे.

>> तुम्ही 'दुर्दम्य इच्छाशक्ति' वापरून भारताचे एकदाचे भले करून टाका ना!
माझ्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ति आहे हे मान्य केल्याबद्दल धन्यवाद. मी प्रयत्न तर नक्कीच करणार आहे. आपल्या सारख्या बांधवांचे सहकार्य मिळो हि इच्छा.

बाकी तुमच्या अवांतर मुद्द्याबद्दल काय बोलू ?
अजून काही मुद्दे आतील तर जरूर मांडा. आपले स्वागत आहे.
धर्माच्या बाबतीत (कधीकधी) मी भावनाशील होतो हे मान्य, तिथे थत्ते काकानि हे नोंदविले आहे. भावना नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

बाकी आपण मिसळपाव संकेत स्थळ देखील पाहत असता हे वाचून बरे वाटले.

तसे नाही

जी मंडळी आपापले स्थानिक सोडून गेलेली आहेत त्यांच्यासाठी तरी नक्कीच सुरक्षित वातावरण असेल अशी अपेक्षा.

ज्यांना दडपशाहीने निवडणुकीचे आयोजन करण्याची इच्छा असेल ते स्वतःच्या अड्ड्यावरच 'स्वेच्छेने' पिकनिक आयोजित करण्याची सक्ति सर्व मतदारांवर करतील. फुकटात प्यार्टी करता आली तर अनेक मतदारांचे मन कलुषित (बायस) होऊ शकेल. असा परिणाम ओसरून जावा म्हणून ४८ तास आधी सर्व प्रचार बंद करण्याची सक्ति असते.

बिहार मधून इथे येऊन सर्व मुंबई धुंडाळून त्यांना भीती दाखवून मतदान करायला लावणे हे कैक पतीने अवघड आहे

बरोबर! सध्याच्या व्यवस्थेत तसेच आहे. उलट, तुमच्या योजनेत या सार्‍यांना आठवडाभर आधीपासून पकडून बिहारमध्ये सक्तीच्या पिकनिकसाठी घेऊन गेले तर?

तिथे एकाच पोलीस किवा निवडणूक अधिकारि निरीक्षणास पुरेसा.

ते कमीच पडतात ना!

भीती दाखवून म्हणाल तर माझ्या पाठीश कोणी बंदूक दाखविली तर मी मतच काय सारी संपत्ती सुद्धा द्यायला तयार होईल.
दारू किवा पैसे याला न भूलण्यासाठी माणसाची नैतीकताच हवी.

बाकी सर्व परिस्थिती समान असताना घरापेक्षा मतदानकेंद्रामध्ये अधिक सुरक्षित वातावरण असते की नाही? मतदानाचा हक्क निगोशिएबल (स्वेच्छेने/भीतीने) होऊ नये म्हणून तसे आवश्यक आहे.

मी प्रयत्न तर नक्कीच करणार आहे.

कसा?

माणसाची इच्छा शक्ती यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे...

बाकी तुमचे मुद्दे रास्त आहेत, पण मी ह्यावर नक्की विचार करून पुन्हा उत्तर देईल.
माझी खात्री आहे कि ती उत्तरे आपल्याला नक्कीच पटतील.
माणसाची प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची इच्छा शक्ती यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे.

आपणास विनंती कि अजुन काहि मुद्दे आपल्याला विचार करावयाचे वाटत असतील तर नक्की पुन्हा-पुन्हा लिहावे.

>> कसा?
आम्हि काही युवक मिळून एक शैक्षणिक संस्था चालवितो, त्यातून जवळ जवळ दरवर्षी ५०० विद्याथ्यांना मोफत वह्या, पुस्तके, जमल्यास गणवेश आणि जमेल तशी फी देत असतो.
अधून मधून एखास दुसर्या स्वयंसेवी संस्थेमध्ये मोर्चा, फुटपाथ बांधणी, अनु-प्रकल्प विरोध (ह्यात खूप मतभेद आहेत, पण करतो), कचरा वर्गीकरण, आदी मध्ये जमेल तसे सहकार्य करतो. तसेच मी पूर्णपणे निर्व्यसनी व फक्त शाकाहारच करत असल्याने अधून मधून दारू / व्यसन / मांसाहार(ह्यात सुद्धा मतभेद आहेत, पण करतो) बंदी ह्यात भाग घेऊन प्रबोधन घेतो.

सुट्टी

मला वाटते, मतदानाच्या दिवशी सुट्टी देण्याऐवजी मतदान केंद्रे २४ तास उघडी ठेवावीत. म्हणजे सोयीच्या वेळी मतदान करता येईल. पोष्टाने मत पाठवणे तितके अवघड नाही. प्रयत्न करून पहा.

 
^ वर