साहित्य व साहित्यिक
गौरी देशपांडे ते गौरी कर्वे
(मराठी लिखाण आणि लैंगिकता या लेखातील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.)
डॉ. आनंद यादव यांनी माफी मागितली
डॉ आनंद यादव यांनी संतसुर्य तुकाराम या लिहिलेल्या कादंबरीतील तथाकथित बदनामीकारक मजकूरा बाबत त्यांनी तुकारामांच्या चरणी लीन होउन माफी मागितली.
पुस्तक ओळख - पश्चिमप्रभा
जवळजवळ दर भारतभेटीत काही ना काही पुस्तकं विकत घ्यायचा प्रयत्न असतो. तिथे गेल्यावर वेळ थोडा असतो, त्यामुळे जायच्या आधीच काही पुस्तकांची यादी तयार करून सुसज्जच जावे लागते. तीन - चार महिन्यांपूर्वी असाच योग आला.
माझ्या संग्रहातील पुस्तके - ३
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे.
मराठीचे शिलेदार
मराठीचे शिलेदार
श्री. निनाद यांनी हा एक चर्चेचा / माहिती गोळा करावयाचा लेख उपक्रमवर लिहला होता. तेव्हापासून हा विचार मनात घोळत होता कीं य़ा यादीतील मान्यवर कोण असावेत ?
अनुप्रास
अनुप्रास
शाळेत असतांना जा कविता आपल्याला आवडावयाच्या त्यातील काही उदाहरणे
१] देवी दयावती दवडसि दासाची दु :खदुर्दशा दूर
पापाते पळवितसे परमपवित्रे तुझा पय:पूर !
मोरोपंत
२] कुरुकटकासि पहाता,
पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"
"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच...
११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली... "
ऍन जोन्सच्या "काबूल इन विण्टर" ह्या पुस्तकाची ही सुरवात आपल्या मनाची जी पकड घेते ती शेवटपर्यंत सुटत नाही.