साहित्य व साहित्यिक
मारिच १
माझे एक जवळचे मित्र संतोष शिंत्रे यांची ' साप्ताहिक सकाळ' कथास्पर्धा २००३ मधिल पारितोषिकपात्र कथा 'मारिच' इथे त्यांच्या संमतीने देत आहे.
एका हलवायाचे दुकान
व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यात तफावत असणे यात काही नवीन नाही. जो पेशा तसे वर्तन अशी अपेक्षा करणे म्हणजे एखाद्या सुरेल गवयाने पोटात जबरदस्त कळ आली तरी सुरेलपणानेच ओरडावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे.
दिवाकरांच्या नाट्यछटा
'तेवढेच ज्ञानप्रकाशात' या मी इथे टंकलेल्या दिवाकरांच्या नाट्यछटेच्या निमित्ताने नाट्यछटा या वाचकांना फारशा परिचित नसलेल्या साहित्यप्रकाराविषयी काही लिहावे असे वाटले म्हणूनः
संदीप खरे आणि सुरेश भट
माझा एक दर्दी मित्र संदीप खरेच्या 'आयुष्यावर बोलू काही' ला जाऊन आला. आणि त्याने तो कार्यक्रम बघण्याची आणि सुरेश भटांशी तुलना करण्याची मला विनंती केली. अजून मी काही 'आयुष्यावर बोलू काही' पाहीला नाही.
तेवढेच 'ज्ञानप्रकाशां'त
प्रसिद्ध नाट्यछटाकार कै. शंकर काशिनाथ गर्गे उर्फ 'दिवाकर' यांच्या काही निवडक नाट्यछटा इथे देण्याचा मानस आहे . त्यात पहिल्यांदा....
सुरेश भट- एक दमदार झंझावात!
सुरेश भट- मराठी गझलेचा सशक्त आवाज! भटांनी मराठी गझलेच्या बालपणातच तिला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंय की पाहतांना मान आदराने नम्र होते.
भटांचा रंग आणि मराठी गझलेविषयी तुम्हाला काय वाटते?
श्रद्धांजली..
'तुंबाडचे खोत', 'गारंबीचा बापू', 'रथचक्र', यांसरख्या एकापेक्षा एक सरस कादंबर्या लिहिणारे मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार श्री ना पेंडसे यांचं आज सकाळी निधन झालं!
त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो!
मराठी साहित्य
मराठी साहित्याविषयी जिव्हाळा असणाऱ्या समस्त उपक्रमींचे या समुदायात स्वागत आहे.
मराठी साहित्यातील आवडलेले लेख, कविता, निवडक वेचे, समीक्षा किंवा इतर कुठल्याही साहित्यप्रकाराविषयी आपण येथे लिहू शकता, अथवा चर्चा करु शकता.