श्रद्धांजली..

'तुंबाडचे खोत', 'गारंबीचा बापू', 'रथचक्र', यांसरख्या एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या लिहिणारे मराठीतले ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार श्री ना पेंडसे यांचं आज सकाळी निधन झालं!

त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो!

आमच्या कोकणच्या मातीतला एक चांगला लेखक हरवला!

शिरुभाऊंना माझी विनम्र आदरांजली!

--तात्या अभ्यंकर देवगडकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

श्रध्दांजली

श्री . ना. पेंडसे यांच्या निधनाने मराठी साहित्याची फार मोठी हानी झाली आहे. केवळ साहित्याची नव्हे तर आमच्यासारख्या सर्व कोकणप्रेमींच्या भावविश्वाची हानी झाली आहे.

कोकणाचं इतक समर्पक वर्णन करणारा लेखक होणे नाही. आज बापू पोरका झाला, राधेचं सर्वस्व गेलं, गारंबी , तुंबाड शोककळेत बुडाली.

श्रीनां ना आमची भावपूर्ण श्रध्दांजली.

आपला,
(खिन्न) धोंडोपंत

भावपूर्ण श्रध्दांजली

श्री.नां ना भावपूर्ण श्रद्धांजली.

(शोकमग्न) शैलेश

श्रद्धांजली

श्रीनांच्या समर्थ लेखणीस आमची भावपूर्ण श्रद्धांजली... मंदार

 
^ वर