संदीप खरे आणि सुरेश भट

माझा एक दर्दी मित्र संदीप खरेच्या 'आयुष्यावर बोलू काही' ला जाऊन आला. आणि त्याने तो कार्यक्रम बघण्याची आणि सुरेश भटांशी तुलना करण्याची मला विनंती केली. अजून मी काही 'आयुष्यावर बोलू काही' पाहीला नाही. पण जाणकारांनी आपले मत नक्की कळवावे.

दोन्ही कवीवर्यांची शक्तीस्थाने, कच्चे दुवे वगैरे वगैरे..

एक निखळ , मुद्देसूद चर्चा व्हावी.

आपला,
अभिजित

Comments

अरेरे...

सुरेश भट आणि संदीप खरे...
व्हिव्हीयन रिचर्डस आणि संजय बांगर
तंदुरी चिकन आणि उकडलेले मक्याचे कणीस
गालिब आणि समीर
गुलाम महंमद आणि भप्पी लहरी
ग्लेनफिडीच आणि पियूष
बासुंदी आणि पातळ पेज
१२०-३०० आणि व्हिक्स वेपोरब
बिकीनी आणि कानटोपी
-:)
सन्जोप राव

हहपुवा

जबरी

:)

माझ्या मते

संदीपची गाणी म्हणजे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया अन् सुरेशजींची गाणी म्हणजे दैवी स्पर्श आहे असं माझं मत आहे.
संदीपची जेवढी काही गाणी/कविता मी ऐकली त्यावरून असं वाटलं.

बरोबर

संदीपची गाणी म्हणजे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया अन् सुरेशजींची गाणी म्हणजे दैवी स्पर्श आहे असं माझं मत आहे.

यातच सर्व काही आलं ;)

संदीप खरे

मोहन पाठक
सुरेश भट दैवी वगैरे नव्हते. जिंदादिल माणूस होते.
उत्तम ग़अलकार होते.
मोहन पाठक

:)

:)

पल्लवी

सहमत !

संदीपची गाणी म्हणजे सर्वसामान्यांची प्रतिक्रिया अन् सुरेशजींची गाणी म्हणजे दैवी स्पर्श आहे असं माझं मत आहे.

यातच सर्व काही आलं ;)

१००% सहमत

नीलकांत

माझं मत!

अजून मी काही 'आयुष्यावर बोलू काही' पाहीला नाही. पण जाणकारांनी आपले मत नक्की कळवावे.

मी हा कार्यक्रम पाहिला आहे. मला हा कार्यक्रम अत्यंत आवडला. मी संदीप खरे यांचा चाहता आहे. त्याच्या गाण्यांची एक तबकडी निघाली आहे, ती माझ्या संग्रही आहे. त्यातली गाणी खूप छान असून मला फार आवडतात..

तात्या.

संदीप खरे

कोणत्याही दोन गोष्टींमध्ये तुलना करताना प्रत्येकजण आपापल्या पूर्वग्रहानुसार मत व्यक्त करेल यात वावगे काहीच नाही. पण संदीप खरेची तुलना समीर (गीतलेखानाच्या दृष्टीने) आणि भप्पी लहरी (संगीताच्या दृष्टीने) यांच्याशी करून त्याच्यावर विनाकारण अन्याय करतो आहोत असे वाटते :)
भटांच्या कविता/गझला/गाण्यांबद्दल प्रश्नच नाही पण मराठी गाण्यांपासून दूर गेलेल्या 'ब्रायन ऍडम्स' पिढीला मराठी गाण्यांची आवड पुन्हा लावण्यात संदीप खरेचा वाटा महत्त्वाचा आहे. एखाद्या नव्या मराठी अल्बमची लोक आतुरतेने वाट पाहात आहेत किंवा तरूणतरुणींच्या घोळक्यात मराठी गाण्याबद्दल किंवा गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा सुरू आहे हे चित्र तरी मराठी संगीतसृष्टीने गेल्या काही दशकात पाहिले नसावे. केवळ लोकप्रियतेच्या दृष्टीनेच नव्हे, संदीप खरेची बरीच गाणी अर्थाच्या दृष्टीने फार चांगली आहेत. शिवाय चाल आणि संगीतही. विशेषतः "नामंजूर", "आयुष्यावर बोलू काही", "मी हजार चिंतांनी", "आताशा असे हे" अशी बरीच गाणी सुरेख आहेत.

एकदा मोकळ्या मनाने (आणि कानाने) एकून पाहा :)

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो

मी जुनाट दारापरी किरकिरा बंदी
तो सताड उघड्या खिडकीपरी स्वच्छंदी
मी बिजागरीशी जीव गंजवत बसतो
तो लंघून चौकट पार निघाया बघतो

मी पायी रुतल्या काचांवरती चिडतो
तो त्याच घेऊनी नक्षी मांडून बसतो
मी डाव रडीचा खात जिंकतो अंती
तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो

मी अस्तिक मोजत पुण्याईची खोली
नवसांची ठेऊन लाच लावतो बोली
तो मुळात येतो इच्छा अर्पून सार्‍या
अन धन्यवाद देवाचे घेऊन जातो

मज अध्यात्माचा रोज नवा शृंगार
लपतो न परी चेहरा आत भेसूर
तो फक्त ओढतो शाल नभाची तरीही
त्या श्याम निळ्याच्या मोरपिसापरी दिसतो

(संदीप खरे, अल्बमचे नाव मला माहीत नाही कोणाला माहीत असल्यास सांगावे)

अगदी बरोबर

शशांक ला पूर्ण पाठिंबा. ('दोन मी ' हे गाणे नामंजूर मधले आहे. )
संदीपने एका कार्यक्रमात सादर केलेली ही नवीन कविता/गझल

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले जे मी जपाया लागलो

शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती
जरा हरवलो तेव्हाच कोठे सापडाया लागलो

ठरवले हे पाहिजे, ते पाहिजे ,तेही हवे
मागण्या ताज्यातवान्या, मी थकाया लागलो

मी सुखाला पाळले, बांधून दारी माझीया
ते सुखाने झोपले, मी गस्त द्याया लागलो

गीत माझ्या लेखणीचे इतके भिनले तिला
ती लिहाया बैसली, अन् मी सुचाया लागलो

मज् न आता थोडकी आशा कुणी की 'वा' म्हणा
आज मी माझ्याच साठी गुणगुणाया लागलो

काय हे आयुष्य माझे, काय हे जगणे तरी
मला सोडून मी सर्वा आवडाया लागलो

- संदीप.

(ही कविता ऐकून लिहिली असल्यामुळे शब्दांमध्ये फेरफार संभवतो. त्याबद्दल क्षमस्व.)

अता याचा विचार करू

व्हिव्हीयन रिचर्डस आणि संजय बांगर: विव ग्रेट् आहेच..पण इंग्लंडमध्ये बांगर चालला होता
तंदुरी चिकन आणि उकडलेले मक्याचे कणीस: चिकन् तर अल्टीमेट पण मक्याचे कणीसही चवदार असते
गालिब आणि समीर: गालिब अतुलनीय , समीरची काही गाणी तरी
....

संदीप तुला मला जे वाटतं जे दिसतं ते शब्दात मांडतो..गुरु शब्दांच्या पलीकडे पोहोचतात.

दिवस असे की कोणी माझा नाही...ही एक सहज् सुंदर रचना आहे. आणि हया पहील्या अल्बम मधल्या रचना जनतेला भावल्या. आणि मलाही. आता सुरेशजींचा झंझावात एक ना दोन उणिपुरी पाच दशके जनामनावर अधिराज्य करत राहीला. तशी तब्येत मला संदीपची वाटत नाही. थोडक्यात त्याच्या नवीन कविता मी ज्या अपेक्षा ठेवून वाचेन , ऐकेन त्या तो पूर्ण करेल की नाही याबाबत शंका आहे.

मला याचं कुणीतरी उत्तर द्या.संदीपचे हे नवे काव्यसंग्रह पहील्या 'दिवस असे की ' इतके दमदार आहेत का?

??

तुलना कशाला?

मुळात ही तुलना कशाला?
गजलसम्राट सुरेश भट ह्यांच्या विषयी काही बोलण्याइतपत माझी योग्यता नाही. मराठी गजलेला जर खर्‍या अर्थाने कुणी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली असेल तर ती गजलसम्राटांनी. गजल म्हणजे काय, ती कशी लिहावी वगैरे सर्व तांत्रिक गोष्टींपासून ते गजलेतील सौंदर्यस्थळे आपल्यापुढे उलगडून दाखवण्यासाठी अतिशय ताकदीच्या गजला आपल्यासारख्या सामान्य माणसापर्यंत पोचवण्याचे हिमालयाएवढे मोठे कार्य त्यांनी करुन ठेवलेले आहे. अशा एका उत्तूंग व्यक्तिमत्वाबरोबर एका नवोदित पण लोकप्रिय कवीची तुलना करण्याचे प्रयोजनच काय हे कळत नाही.

संदीप खरेंना अजून खूप पल्ला गाठायचाय! तेव्हा त्यांना अशा तुलनेत अडकवू नका. अर्थात सुरेश भट खूप महान होते म्हणून संदीप खर्‍यांनी कविता लिहू नये किंवा त्यांच्या कवितांचा आवाका तितका नाहीये असेही म्हणणे योग्य होणार नाही. इथे पुलंच्या एका वाक्याची उसनवारी करून असे म्हणता येईल, "सुरेश भट असतील मोठे गजलकार! म्हणून काय इतरांनी गजला लिहूच नयेत की काय"?

तेव्हा संदीप खरर्‍यांना त्यांच्या लायनीप्रमाणे जाऊ द्या. उगीच त्यांची तुलना एकदम सुरेश भटांशी करायची गल्लत करु नका!त्यामुळे कदाचित त्यांची प्रतिभा आटून जाईल. फार तर किंचित सुरेश भट असे म्हणण्यास हरकत नसावी.

प्रमोदरावांशी

सहमत. अशी तुलना योग्य नाही.

ह्म्म्म्

हेही बरोबर

अभिजित

ओहो

आरे यार, कोणाशी compare करतोय ते एकदा पाहुन घ्यावे
- विजय

 
^ वर