सुरेश भट- एक दमदार झंझावात!

सुरेश भट- मराठी गझलेचा सशक्त आवाज! भटांनी मराठी गझलेच्या बालपणातच तिला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंय की पाहतांना मान आदराने नम्र होते.
भटांचा रंग आणि मराठी गझलेविषयी तुम्हाला काय वाटते?

Comments

दु:खाच्या वाटेवर..

दु:खाच्या वाटेवर गाव तुझे लागले,
थबकले न पाय जरी पण हृदय मात्र थांबले!
वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली,
अन माझी पायपीट डोळ्यातून सांडली!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल
अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल

मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल!!

भटसाहेबांना आपला सलाम...

तात्या.

सलाम

सुरेशजींच्या कवितांमधला जो नाद आहे तो मुग्ध करून टाकतो. उदाहरणासाठी 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' वाचावे.
या बरोबरच त्यांच्या कविता आणि गझला समाजाच्या विविध अंगांना स्पर्श करून जातात. मराठी, महाराष्ट्र, स्वातंत्र्य, शृंगार, विरह, (नव रसांपैकी बरेच) अशा सर्व क्षेत्रात त्यांची समज आणि अनुभव दांडगा आहे. एकलेपणा त्यांच्या बर्‍याच गझलांतून दिसून येतो.

मला आवडलेले काही शेर(नीट आठवत नाहीयेत पामराला. वृत्तात जर चूक असेल तर माझी असेल.)

'कोणास जुमानत नाही कोणास विचारत नाही.
हे हृदय दिवाने माझे माझेही ऐकत नाही'

'काय जे समजायचे ते अता समजून गेलो
मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो'

रसिकांनी त्यांना आवडलेले शेर इथे लिहीले तर सर्वांना ते ज्ञात होतील.

अभिजित

दानत(?)

मला वाटते या गझलेचे शिर्षक 'दानत' आहे आणि ही झंझावात (की सप्तरंगची) पहिली गझल आहे. चु.भु.द्या.घ्या.

कोणास जुमानत नाही कोणास विचारत नाही.
हे हृदय दिवाने माझे माझेही ऐकत नाही

तू विसर अता की तेव्हा मी प्रेम तुझ्यावर केले
मज आज जुन्या जखमांचे काहीही वाटत नाही

ही तुझी विवशता आहे, ही माझीही मजबुरी
जे तुजला वाटत आहे ते मजला वाटत नाही

उंबरठा चित्रपटातील एक गीत

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजून ही चांद रात आहे

कळे ना मी पाहते कुणाला
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे

सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे

उगीच स्वप्नांत सावल्यांची
कशास केलीस आजर्वे तू
दिलेस का प्रेम तू कुणाला
तुझ्याच जे अंतरात आहे

गीतकार सुरेश भटांचं एक सुरेल गीत उंबरठा या चित्रपटातील.

पल्लवी

एक शेर

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी!

-सुरेश भट

इतुकेच सत्य मला...

इतुकेच सत्य मला मरताना कळले होते
मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते.
भटांना कमरेतून लवून कुर्निसात!
सन्जोप राव

आकाश उजळले होते!

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरूया
(पाऊल कधी वार्‍याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी तीच कहाणी..
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की, जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वार्‍यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सुरेश भट

चुंबिलास....

चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का?

ओठ

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?

आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?

हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले...
एक पानही माझे चाळलेस का तेव्हा?

बोलली मिठी माझी- 'दे प्रकाश थोडासा!'
तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा?

कालच्या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलायाचे पाळलेस का तेव्हा?

चुंबिलास तू माझा शब्दशब्द एकांती
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?

सुरेश भट

मनाप्रमाणे

मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते |
कुठेतरी मी उभाच होतो, कुठेतरी दैव नेत होते |
अत्यंत सुंदर ओळी.

आणि एक

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

रंग माझा वेगळा

रंग माझा वेगळा पुस्तकाचे मुखपृष्ठ या ओळींनी सजले आहे. रंग माझा वेगळा या गझलेतील आहेत् या ओळी.

रंग माझा वेगळा

रंगुनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा
गुंतुनी गुंत्यात सार्‍या पाय माझा मोकळा

पेटत्या वस्तीत ही चर्चा अशी नाही बरी
हा निखारा वेगळा अन् तो निखारा वेगळा

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

दोन दुरुस्त्या

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा बदनाम झंझावात मी!

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते
मरणाने सुटका केली, जगण्याने छळले होते.

आकाश उजळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते

सुरेश भट(एल्गार)

कळते रे!

कळते मज सारे कळते रे!
मन माझे तरीही चळते रे!

राखत आले सखया आजवर
विचारले नसण्याचे अंतर
शब्द तुला भेटतील नंतर
आयुष्य न मागे वळते रे!

कळते मज तू अवखळ वारा
कळते मज तू रिमझिम धारा ...
कधी दूरचा पहाटवारा
तव रूप कसेही छळते रे!

कळते रे हे तुझेच अंगण
जिथे फुलांची नाजूक पखरण
थकले रे, आले तरीही पण
का दार तुझे अडखळते रे!

सुरेश भट

आनंद वाटतो!

काव्य या साहित्यप्रकाराला जरी उपक्रमवर बंदी असली आणि त्याकरता वेगळा विभाग नसला तरी मराठीतील एका दिग्गज गझलकाराला येथे अनेकांनी मानाचा मुजरा केला आहे याचा मनापासून आनंद वाटतो.

अद्याप कोणतीही प्रशासकीय अधिसूचना न येता ही चर्चा इथे सुखाने नांदते आहे , हेही नसे थोडके!

आपला,
(आंब्याफणसातला, मण्यार-फुरश्यातला!) तात्या देवगडकर.

जनतेचे कवी

सुरेश भट यांनी एल्गारच्या शेवटी बाराखडी दिली आहे. सर्वसामान्य जनतेला गझल कळावी अन् केवळ अवघड वाटते म्हणून् नवकवींनी गझललेखन टाळू नये यासाठीची तळमळ तिथे दिसून येते. मराठी, महाराष्ट्र् हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय. सत्तेवर बसलेल्या भोंदू अन् भ्रष्ट पुढार्‍यांमुळे जनतेची झालेली परवड बघून ते व्यथित होतात. आणि आप्ल्या शैलीत त्याचा खरपूस समाचार घेतात. वाचा 'मुख्यमंत्री'. बहुतेक सप्तरंग मध्ये आहे ही गझल(हजल). किंवा उषःकाल होता होता. कोण्या स्वघोषित टीकाकारांपेक्षा जनता ही सर्वोच्च न्यायाधिश आहे असे त्यांचे मत आहे. म्हणून त्यांनी कोणत्याची पुरस्कारा-सत्काराची अपेक्षा न ठेवता आपले काव्यसंग्रह जनतेपुढे ठेवले.

मुख्यमंत्री

सत्तेवर बसलेल्या भोंदू अन् भ्रष्ट पुढार्‍यांमुळे जनतेची झालेली परवड बघून ते व्यथित होतात. आणि आप्ल्या शैलीत त्याचा खरपूस समाचार घेतात. वाचा 'मुख्यमंत्री'. बहुतेक सप्तरंग मध्ये आहे ही गझल(हजल).

येतात मुख्यमंत्री जातात मुख्यमंत्री
मिळतात सर्व अंती मसणात मुख्यमंत्री

पुर्ण गझल शब्दश: आता आठवत नाही. नंतर कधीतरी!

भटसाहेबांचे अजून काही खास शेर!

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुठे आत शिरायासाठी

काय आगीत कधी आग जळाली होती
लोक नेतील मला खोल पुरायासाठी

हा असा चंद्र

हा असा चंद्र.. अशी रात फिरायासाठी
तूच नाहीस इथे हात धरायासाठी

चेहरातो न इथे ही न फुलांची वस्ती!
राहिले कोण अत सांग झुरायासाठी

कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी

आडवी एक तिथे भिंत मनाची आली
दार होतेच कुठे आत शिरायासाठी?

नेहमीचेच जुने घाव कशाला मोजू?
ये गडे उभा जन्म चिरायासाठी!

काय आगीत कधी आग जळाली होती
लोक नेतील मला खोल पुरायासाठी!

सुरेश भट (एल्गार)

एक आवडती गझल

तशी तर मला दादांची प्रत्येक गझल आवडते, पण सध्यापुरती ही एक घ्या.
गणेश एस्.एम्.

पुण्याई

चंद्र राहिला नाही भाबड्या चकोरांचा
चांदण्यावरी ताबा आजकल चोरांचा

लागले न झाडांना दोनचार शिंतोडे
नाचही सुरू झाला जंगलात मोरांचा

मी अजुनही येथे श्वास घेतला नाही
(दे सुगंध थोडासा कालच्या फुलोरांचा!)

मांडले कुणी येथे आज ताट सोन्याचे?
आठवे न रामाला द्रोण रानबोरांचा!

मी तुझा क्षणासाठी हात घेतला हाती...
कायदा कसा पाळू मी तुझ्या बिलोरांचा?

राहिली जगी माझी एवढीच पुण्याई-
मी सोयरा न झालो त्या हरामखोरांचा!

सुरेश भट

संच्

काल मी झंझावात संग्रह खरेदी केला. आता मी अभिमानाने सांगतो की सुरेश भटांचे पाचही काव्यसंग्रह् माझ्यापाशी आहेत. अर्थात त्याम्च्या अप्रकाशित रचनांचा अजून् एक संग्रह होता दुकानात. पण तो आरामात् घेइन आधी झंझावात वाचतो.

एकदा असाच एका पुस्तक प्रदर्शनात भटकत होतो. सप्तरंग हाती घेतलं आणि पहिलीच गझल वाचली.

"कोणास जुमानत नाही कोणास विचारत नाही.
हे हृदय दिवाने माझे माझेही ऐकत नाही"

पहिल्या शेरातच मी घायाळ झालो आणि तत्क्षणी सुरु झालेला माझा सुरेशध्यास आजतागायत चालू आहे. या माणसाने मराठीसाठी खूप् कष्ट घेतले आहेत्. निदान् आपण त्यांना वाचून तरी मानवंदना देऊ.

आपला..
गझलघायाळ अभि.

कवि ग्रेस्

नमस्कार्,
या सन्केत्स्हलावर् नविनच् आलो आहे.
आहे का कवि ग्रेस् वर् कहितरि बोल्नारे? बरयाच्र दिवसानन्तर् चान्गले विशय वाचायला मिळाले आहेत्. ट्न्कलेखन् करताना फार् त्रास् होतो आहे पन् हळूहळू शिकेन् अनि मग् आप्ल्याशि सुसन्वाद् साधिन्.
महेश्

आसवांनी मी मला भिजवू कशाला

आसवांनी मी मला भिजवू कशाला
एव्हढेसे दुःख मी सजवु कशाला?......

लागले वणवे इथे दाही दिशांना?......
एक माझी आग मी उजवु कशाला?......

मी उन्हाचा सोबती घामेजलेला?......
चंद्रमा प्राणात मी रुजवु कशाला?.......

रात्र वैर्‍याची पहारा सक्त माझा?......
जागणारे शब्द मी निजवु कशाला?......

............सुरेश भट...............

"अनामिका"

 
^ वर