गौरी देशपांडे ते गौरी कर्वे

(मराठी लिखाण आणि लैंगिकता या लेखातील प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.)

मी बहुधा १२-१३ वर्षांचा असताना गौरी देशपांडे ह्यांनी अरेबियन नाइटसचा १०-१२ खंडांत केलेला अनुवाद (एक हजार रात्री आणि एक रात्र) मी वाचला. त्यापूर्वीदेखील मी अरेबियन नाइट्स वाचले होते. पण ते बाळबोध, सॅनिटाइझ्ड आणि फारच संक्षिप्त होते. पुरुषाच्या लिंगासाठी अनेक समानार्थी शब्द ह्या खंडांमुळे कळले. गौरी देशपांडेंच्या ह्या अनुवादात दिलेल्या तळटिपा तर अतिशय समृद्ध. त्याकाळचीच आणखी एक आठवण. 'लावली थंड उटी वाळ्याची. सखीच्या कुचकलशाची' ह्या ओळींचा अर्थ सांगताना आपण ह्या जगाचे रहस्य उलगडतो आहोत असे माझ्याहून मोठ्या चुलत भावाला झाले होते. हनुमानाचे घर्मबिंदू सुसरीच्या पोटात जातात काय.. ती गर्भवती राहाते काय... गर्भधारणेबाबत, समागमाबाबत अगदी विरोधाभासी, विसंगत अशा थेयऱ्या त्या काळी आम्हाला नकळत पढवल्या जात होत्या. असो.

जवळपास ह्याच वयाची असताना गौरी कर्वे काय करायची? तर तिला रेडियो सिलोन ऐकायची आवड होती. एक दोन वर्षांपूर्वी गौरी कर्वेंनी आपल्या रजनी देशपांडे ह्या मैत्रिणीला लिहिलेले पत्र मला वाचायला मिळाले. मेरा जूता है जापानी हे गाणे बिनाकात पहिले आल्यावर त्यांना जो आनंद झाला तो ह्या पत्रात आपल्या मैत्रिणीसोबत 'शेअर' केला आहे. हे रोचक पत्र खास उपक्रमासाठी देत आहे.

[ रजनी देशपांडे म्हणजे आर्य संगीत प्रसारक मंडळीचे एक अध्वर्यू दत्तोपंत देशपांडे ह्यांच्या कन्या. लग्नानंतरच्या कवयित्री संगीता जोशी. संगीताबाईंचे चिरंजीव आणि माझे मित्र श्री. राजेंद्र जोशी ह्यांच्यामुळे हे पत्र उपलब्ध होऊ शकले.]

Comments

दस्तावेज

माझ्या आवडत्या लेखिकेचा इतका जुना दस्तावेज येथे दिल्याबद्दल अनेक आभार. नवथर वयातील निरागसपणाचे प्रतिबिंब या छोट्याशा पत्रात पडल्याचे मला जाणवले.

मराठी साहित्य आणि लैंगिकतेच्या विमर्शात गौरीबाईंच्या साहित्याचा उल्लेख येणे अटळ आहे. मी लिहू शकलो तर माझ्या प्रस्तुत लेखाच्या पुढील काही टप्प्यांत त्यांचा उल्लेख यावा अशी मला आशा वाटते.

पेपर

गौरी कर्वेला मराठीचा पेपर अवघड गेला म्हणजे अवघडच दिसतोय.
पत्र इथे दाखवल्याबद्दल आभार. एकदम मजा वाटली.

हेच म्हणतो..

निर्मला गोष्ट लिहून काढली आहे...बापरे!

१२-१३ वर्षांची असताना?

पत्र इथे दाखवल्याबद्दल आभार. एकदम मजा वाटली.

असेच

पत्र इथे दाखवल्याबद्दल आभार. एकदम मजा वाटली.

अशीच मजा वाटली :)!!

ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

धन्यवाद

निर्मला गोष्ट लिहून काढली आहे...बापरे!

१२-१३ वर्षांची असताना?

पत्र इथे दाखवल्याबद्दल आभार. एकदम मजा वाटली.

असेच म्हणतो. पत्र इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

सहमत!!!

एवढा जुना कागद जपून ठेवणारी मैत्रिण पण खरोखर ग्रेटच. मजा वाटली.

बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद

गौरी देशपांड्यांबद्दल वाचले असले तरी गौरी कर्व्यांबद्दल काहीच माहित् नव्हते. हे पत्र म्हणजे जुना खजिना वाटला. :-)

आजानुरावांनी उपक्रमावर दिलेले कर्वे कुटुंबाचे चित्र येथे आहे.

अभिजित यादव
कर्‍हाड

छायाचित्रांविषयी

गौरीची आपण वापरत असलेली सर्व छायाचित्रे आप्ण कोठुन मिळवलीत.?? ती सर्व छायाचित्रे जर माझ्या Google Picasa album मधुन घेतली असतील तर त्याआधी आपण मला एक निरोप पाठवणे गरजेचे होते. मीही ही सर्व छायाचित्रे ’मिळुन सा-यजणीं’ची परवानगी घेऊन upload केलेली आहेत. परवानगी नसताना व न विचारता आपण ही छायाचित्रे घेतली असतील तर तुम्ही काढुन टाकावीत.

तसं नसेल तर प्रश्न मिटला.

U may write me on amityadav8@gmail.com. Thank You.!

आपल्या Flickr account मध्ये ही सदर छायाचित्रे आहेत. त्याबद्दलही आपण लिहावे. गंमत म्हणजे ती आपण चक्क तुमच्या copyright मध्ये upload केलेली आहेत.!!

सॉरी

या चित्रांची मालकी कोणाची आहे याबाबत मला कल्पना नव्हती. तसे मी प्रतिसादात लिहिले होते.

सध्या फ्लिकर खात्याला ऍक्सेस नसल्याने मला तातडीने चित्रे काढता येणार नाहीत. २४ तासाच्या आत काढून टाकतो.

धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर