व्हॅलेंटाईन डे : बोला, तुम्हाला काय हवे आहे ?

पाद्री व्हॅलेंटाइन खरेच `पॉवरबाज' आहे काय ?

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात `टाइन डे' म्हणून साजरा केला जातो. भारतातही हा दिवस तरुण-तरुणी मोङ्ग्या प्रमाणात साजरा करतात. प्रेमाच्या नावाखाली पाश्चात्त्यांनी मांडलेला हा बाजार आहे. या `व्हॅलेंटाईन'वर `दैनिक सामना'च्या १३ फेब्रुवारी रोजीच्या अंकात अग्रलेखातून कोरडे ओडले आहेत. या लेखाचा काही भाग आम्ही आमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रसिद्ध करत आहोत. रोममधील `पाद्री व्हॅलेंटाइन' कि काय याचा जन्मदिन कि मरणदिन हा सध्या आपल्याकडील लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न बनून राहिला आहे. १४ फेब्रुवारीला रोममधील पाद्र्याच्या नावाने प्रेम दिवस साजरा केले जातो व हे `फॅड' अलीकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. १४ फेब्रुवारीस आपल्याकडील नवजवान पोरापोरींना प्रेमाचे जे आचके-गचके लागतात ते वर्षभरातील इतर दिवशी कोठे आटतात ? जणू काही १४ फेब्रुवारीस व्हॅलेंटाइनच्या प्रेमाचा गुलाबी फुगा फुगवला नाही व फोडला नाही, तर त्या पाद्र्याचा आत्मा अतृप्‍त राहून हिंदुस्थानच्या भूमीवर भटकत राहील व आपल्या देशातील प्रेमाचे नामोनिशाण नष्ट होईल. शिवसेनेने प्रेमाला कधीच विरोध केलेला नाही. प्रेम हा एक संुदर शब्द आहे. प्रेमाने जग जिंकता येते, असे म्हणतात; मग त्याच प्रेमाने आम्हाला आतापर्यंत कश्मीर का जिंकता आले नाही ? म्हणजे काश्मीर हे कागदोपत्री हिंदुस्थानच्या नकाशावर असेलही; पण तेथे गेली कित्येक वर्षे ज्या फुटीरवादी प्रवृत्ती हिंसेचा आगडोंब उसळवीत आहेत, त्या नराधमांना हा रोमचा `व्हॅलेंटाइन' सुबुद्धी का बरे देत नाही ?

अधिक माहिती : http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/valentine/valentine.htm...

गणेश

Comments

जाहिरात (?)

हे असे लेख सनातन दैनिकाची जाहिरात करण्याच्या हेतूने येत आहेत का? नसल्यास अशा लेखांचा हेतू काय हे लेखक स्पष्ट करेल का?

एक चांगला उपाय म्हणून तुम्ही कृपया सनातन दैनिकाच्या संकेतस्थळावर प्रतिसादांची सोय करा.

मुद्दे

हिंदू मुस्लिम दंगली
दहशतवाद
काश्मिर पंडींतांवर अन्याय
व्हॅलेंटाइन डे
परत काश्मिर

काही नाही, ठेसनं मोजित होतो. तुमचं चालू द्या.
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

बाय द वे

या वर्षी किती दुकानं फोडायचा बेत आहे?

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

भयाण विनोदी

गणेशराव,
आजच्या काळात इतके निखळ विनोदी साहित्य क्वचितच वाचायला मिळते. याबद्दल अनेक धन्यवाद. याचा एक नमुना..

`मन व्यापून टाकणारी एखादी कल्पना मनात आल्यावर तिचा अतिरेक झाल्यास मनोविकार जडू शकतो', असे फ्रॉईड या प्रसिद्ध मनोवैज्ञानिकाने सांगितले आहे. याचाच परिपाक या `डे'च्या निमित्ताने देशात दिसून येत आहे. `व्हॅलेंटाईन डे'मुळे होणार्‍या दुष्परिणामांमुळे तरुण पिढीचे अध:पतन होत असून, ही देशापुढील एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे.

या निमित्ताने फ्रॉईडकाकांची विकेट काढली. काय बोलावे? हहपुवा इतकेच म्हणू शकतो. :))))

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

तांबेसाहेब आणि इतर "सनातनी" लोकहो

>> प्रेमाच्या नावाखाली पाश्चात्त्यांनी मांडलेला हा बाजार आहे.

या न्यायाने धर्माच्या नावाने मांडलेला तुमचा बाजार आहे.

>> रोममधील `पाद्री व्हॅलेंटाइन' कि काय याचा जन्मदिन कि मरणदिन हा सध्या आपल्याकडील लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न बनून राहिला आहे.
असे होय ? आम्हाला वाटले की गरीबी, भूक, निरक्षरता वगैरे वगैरे जीवन-मरणाचे प्रश्न आहेत. ऐकावे ते नवलच.

>>१४ फेब्रुवारीस आपल्याकडील नवजवान पोरापोरींना प्रेमाचे जे आचके-गचके लागतात ते वर्षभरातील इतर दिवशी कोठे आटतात ?

रोज कुठे आपण जन्माष्टमी साजरी करतो ? किंवा ईद ? किंवा नाताळ ? किंवा स्वातंत्र्यदिन ? हे सर्व "आचके" म्हणायचे की गचके ?

>> प्रेमाने जग जिंकता येते, असे म्हणतात; मग त्याच प्रेमाने आम्हाला आतापर्यंत कश्मीर का जिंकता आले नाही ?

काय राव , आज सकाळी सकाळीच ?

चला चर्चा दुरुस्त करू

१. तुम्ही वॅलेंटाईन साजरा करता का?

२. करत असल्यास साजरा करण्याचे आवडते ठिकाण कोणते?

३. न करत असल्यास अशा कोणत्या एखाद्या रोमँटीक परंतु खर्‍या (म्हणजे स्वप्नातल्या जागी नको, माहिती खरी हवी म्हणजे माहितीपूर्ण ठरेल आणि उपक्रमावर राहील) ठीकाणी तुम्हाला तो साजरा करायला आवडेल? (स्थळ, रेस्टॉरंट, ठीकाण सुचवा.)

४. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भेटी आवडतात... (कृपया, ग्लेनफिडिश सोडून पुढे..) त्यानिमित्ताने काय भेटी द्याव्या हे कळेल.

या व्यतिरिक्त ही चर्चा दुरूस्त करण्यास कोणाला चांगली कारणे मिळाली तर भर घालावी.

पिंपळाच्या पारंब्या

बघून आश्चर्य वाटले, पण मग लक्षात आले की पिंपळाला वडाची साल लावता-लावता कोणाच्यातरी प्रयत्नांना यश आले आहे.

कुठल्यातरी एका सणाचा आणि कुठल्याशा दुसर्‍या वादात शांतीचा अशा प्रकारचा संबंध लागतो, तर.

जर गणपती सुबुद्धी देतो, आणि विघ्ने दूर करतो तर गणेशचतुर्थीनंतर लगेच आमच्या चुलतचुलतकाकांना दुर्बुद्धी होऊन त्यांनी कोर्टाची नोटीस पाठवायचे विघ्न कसे आणले?

माझे स्पष्ट मत हे की काही असो, पुढच्या वर्षीदेखील आमच्या घरी गणपती बसणार! मग चुलतचुलतकाकांना दुर्बुद्धी झाली, त्यांनी भाऊबंदकीची विघ्ने आणली त्याची आम्हाला काही तमा नाही.

पुलं

... एका विनोदी लेखात म्हणतात तसे "दोन महिने झाले तरी पावसाचा पत्ता नाही. हवामान खात्याचे अधिकारी काय करत आहेत ??"

आपली संस्कृती

जगातील फक्त एकच पाश्चात्य गायक आपल्या संस्कृतीत बसतो आणि तो म्हणजे मायकेल जॅक्सन. कारण त्याने शिवउद्योगसेनेला देणगी दिली होती. जय महाराष्ट्र!
हा त्याचा नाच बघा बरं! या गाण्यात आपली संस्कृती जरा जास्तच खुलुन दिसतीय नाही? :)

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

स्वातंत्र्य

तांबे साहेब,

मी हिंदू असल्यामुळे स्वतःचे आणि इतरांचे व्यक्तिस्वातंत्र्य मानतो. व्हॅलेंटाईन डे साजरा करावा का करू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला चुकीच्या पद्धतीने विरोध करणारे हिंदू धर्मीयात आणि हिंदूत्वात "तालीबानी प्रवृत्ती" ज्या नपेक्षा आपल्याला परक्या आहेत त्या कदाचीत त्यांच्या नकळत आणत आहेत असे वाटते.

आपण जे आल्यापासून लिहीत आहात त्याचा झाला तर तोटाच होईल,कुणालाच फायदा होणार नाही, याचा कुठेतरी आपण विचार करावा असे वाटते. आज आपण आपली संस्कृती १००% सनातनी पद्धतीने जगत आहात असे म्हणायचे आहे का? माफ करा पण आपल्या लिहाण्यात इतिहास अथवा स्वाभिमान कमी आणि द्वेष जास्त असे आढळत आहे. सनातनी आहात म्हणून गीताईतले १२ व्या अध्यायातील श्लोक सांगतो:

कोणाचा न करी द्वेष, दया मैत्री वसे मनी
मी माझे न म्हणे सोशी, सुख दु:ख क्षमा बळे
सदा संतुष्ट जो योगी, संयमी दृढ निश्चयी
अर्पी मज मनोबुद्धी भक्त तो आवडे मज || वगैरे...

मी काही नेभळटपणे वागा असे म्हणत नाही आहे, पण उगाच द्वेष पसरत जाऊ नका. हे हिंदूत्ववादाच्या बाजूने सतत लिहीत असल्याने, पण कधीही द्वेष करत नसल्याने तेव्हढे नैतीकबळ असावे असे वाटत असल्याने लिहीत आहे.

आणि हो, मला व्हॅलेंटाईन डे चे काही पडलेले नाही. याचा अर्थ मी त्याचा द्वेष ही करत नाही की त्यात कोणी अतिउत्साह दाखवावा असे पण म्हणत नाही. खरे म्हणाल तर तसे येथील (अमेरिकेतील) अनेक गोर्‍यांनापण त्याचे काही वाटत नाही. कुठलाही क्षण आणि सण कोणीही आनंदात आणि कुणालाच कमी न लेखता, संयम न सोडता साजरा केला तर काही बिघडत नाही असे वाटते आणि म्हणून तसे जगतो. पण पण तो वेगळा मुद्दा आहे.

दुरुस्त चर्चा

१. तुम्ही वॅलेंटाईन साजरा करता का?
बहुतेक नाही, पण तारीख लक्षात आल्यास त्यानिमित्त काही करतो.

२. करत असल्यास साजरा करण्याचे आवडते ठीकाण कोणते?
जेव्हा करतो तेव्हा बहुधा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये. विसरल्यास आणि शेवटच्या क्षणी आठवण झाल्यास, घरीच - शब्दाने किंवा फोनने, किंवा स्वयंपाकाने.

३. न करत असल्यास अशा कोणत्या एखाद्या रोमँटीक परंतु खर्‍या (म्हणजे स्वप्नातल्या जागी नको, माहिती खरी हवी म्हणजे माहितीपूर्ण ठरेल आणि उपक्रमावर राहील) ठीकाणी तुम्हाला तो साजरा करायला आवडेल? (स्थळ, रेस्टॉरंट, ठीकाण सुचवा.)
हं - रेस्टॉरंटच सुचते आहे :
दुवा
जाऊन आल्यावर या "डॉगवुड रेस्टॉरंट"बद्दल आणखी माहिती देईन.

४. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भेटी आवडतात... (कृपया, ग्लेनफिडिश सोडून पुढे..) त्यानिमित्ताने काय भेटी द्याव्या हे कळेल.
मी प्रत्येक वेळी या प्रश्नाच्या उत्तरात अगदी मनापासून "नको, नको" म्हणतो. पण भेट मिळाल्यानंतर खुश असतो. त्यामुळे भेट मिळण्याची सुप्त इच्छा असावी. गोडपैकी रसगुल्ले, किंवा चॉकलेट (गडद रंगाचे, कोकोची टक्केवारी ६५-७५%च्या दरम्यान, त्यात दाणे बदाम मनुका वगैरे मुळीच नकोत). म्हणे "सुप्त" इच्छा. फुले शक्यतोवर नकोत - ती दोन दिवसांनी मलूल झाल्यावर मनही उदास होते.

माझी उत्तरे

प्रश्नांच्या उत्तरांबद्दल धनंजय तुमची आभारी आहे.

१. तुम्ही वॅलेंटाईन साजरा करता का?

आम्हीतरी करतो बॉ! साजरा करायला एक सण अधिक मिळाला तर कोणाला नको असतो.

२. करत असल्यास साजरा करण्याचे आवडते ठीकाण कोणते?

कोणत्यातरी हिलस्टेशनवर किंवा समुद्रकिनारी साजरा करायला आवडला असता पण आता मात्र रेस्टॉरंटातच होतो. त्यात चांगली इटालियन रेस्टॉरंट्स आवडतात.

ऑलिव गार्डनपासून पुढे सुरू....

४. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भेटी आवडतात...

फुले मलाही फारशी पसंत नाहीत पण वॅलेंटाईन्स डे ला चालतात. सर्वात प्रिय भेट म्हणजे परफ्युम... आवडती व्यक्ती सतत जवळ असल्याचा भास होतो.

जानेवारी ते व्हॅलेंटाईन डे

जगातील सर्वांच्या वाढदिवसाचा आलेख काढला, तर नोव्हेंबर तिसर्‍या आठवड्यात सर्वाधिक लोक जन्मतात का ?

जगातील नसावे कदाचीत अमेरिकेचे असावे. असे म्हणतात की मे-जूने २००२ च्या दरम्यान अमेरिकेतील बाळंतपणे वाढली होती. कारण ९/११ नंतर अनेकजण "इमोशनल शॉ़क" मधे होते.

बाकी आत्ताआत्ताच ऐकल्याप्रमाणे नोव्हेंबरची भानगड माहीत नसली तरी, जानेवारी ते व्हॅलेंटाईन डे हा काळ अमेरिकेतील "डिव्होर्सेस" साठीचा उत्तम काळ धरला जातो. डिसेंबर उलटून गेलेला असल्याने ऑप्शन शेअर्सचे उत्पन्न तसेच बाकी उत्पन्न हे गेल्यावर्षीच्या टॅक्समधे पती अथवा पत्नीबरोबर डीडक्षनसाठी लावता येऊन कमीत कमी टॅक्स सरकारदरबारी जमा करावा लागतो!

हा हा हा

मदन आणि रती हे हिंदू धर्मातले संत व्हॅलेंटाईन. त्यांच्या नावाने कुठला सण नसतो का ?

हा हा हा :))))
(मदन चतुर्दशी अथवा रतीद्वीतीया आदी सणांच्या प्रतिक्षेत :) ) ऋषिकेश

मदन-कामदेवाचा सण

मदन आणि रती हे हिंदू धर्मातले संत व्हॅलेंटाईन. त्यांच्या नावाने कुठला सण नसतो का ?

असं कसं? भारतात सण-वारांची काही कमी आहे का? सरस्वतीप्रमाणेच कामदेवाची पूजा वसंत पंचमीच्या दिवशी केली जाते. योगायोगाची गोष्ट म्हणता येईल की वसंताचे आगमन आणि वसंत पंचमी व व्हॅलेंटाईन्स डे हे कसे जुळून येतात. या दिवशी आपले जोडीदार निवडण्याची प्रथा उत्तर भारतात होती/आहे असे ऐकून आहे. चू. भू. दे. घे.

होळीलाही कामदेवाची पूजा केली जाते.

असो, फेब्रुवारी ११ ला वसंत पंचमी होऊन गेली.

अवांतरः या मदनालाच त्याचा तो प्रसिद्ध धनुष्यबाण घेऊन सर्व मुसलमानांवर शरसंधान कर म्हणून सांगायला हवे, पण मग सगळे मुसलमान हिंदूंच्या प्रेमात पडले तर मग कसं व्हायचं बॉ आपल्या हिंदू धर्माचं?

संत व्हॅलेंटाईन


मदन आणि रती हे हिंदू धर्मातले संत व्हॅलेंटाईन

.
+१
प्रकाश घाटपांडे

म्हणुनच बालदीन १४ नोव्हेंबर ला का?

हा योगायोग आहे. का नेहरू घराणं आणि व्हॅलेंन्टाईन यांचं एक कुटील कारस्थान आहे ?
(ह्. घ्या.)

हो करायचे!

मोतीलालजी व्हॅलेंटाईन्स डे जोरात सेलेब्रेट करायचे, असे दिसते !

म्हणूनच काश्मिर अजून फक्त कागदोपात्री भारतात आहे. हिंदूंनो जागे व्हा मोतीलाल नेहरूंचा निषेध करा!
- सनातन लॉजीक

खरेच आहे!

स्रोत :
शीर्षक : सीझनॅलिती ऑफ कॉयटस अँड बर्थ
लेखक : जे. रिचर्ड उडरी, नेओमी एम मॉरिस
मासिक : डेमॉग्रॅफी
खंड : ४था, पृष्ठे ६७३-६७९

सप्टेंबर-शेवट ते डिसेंबर मध्ये (नोव्हेंबरमध्ये साधारण शेवटच्या दोन आठवड्यांत शिखर) न्यू यॉर्क शहरात अपेक्षेपेक्षा अधिक मुले जन्मतात. यात संभोगसंख्येतील वार्षिक फरकही दिलेले आहेत. पण त्याचे शिखर (जून-जुलै मध्ये) हे अपेक्षेप्रमाणे फेब्रुवारीत नाही. त्यामुळे वर्षातील वेगवेगळ्या ऋतूंत प्रति-शत-संभोगी प्रत्यक्ष फलधारणेची टक्केवारी बदलत असावी (फेब्रुवारीत फलधारणा अधिक प्रमाणात होत असावी, जून-जुलैमध्ये कमी प्रमाणात) असा निष्कर्ष ते काढतात.

भारतातील जन्मांच्या बाबतीत कोसंबी आणि राघवाचारी यांनी, वेगवेगळ्या ऋतूंत त्यांचे प्रमाण कमी अधिक होते, असे दाखवणारे आकडे १९५१ मध्ये प्रसिद्ध केले आहेत, असे वरील लेखातच सांगितले आहे. आणि जाता जाता हेदेखील, की हे अमेरिकेपेक्षा वेगळे आहे. परंतु भारतात जन्मांच्या आकड्यांतल्या वार्षिक भरती-ओहोटीच्या वेळा कुठल्या ते नेमके सांगितलेले नाही.

अजून थोडा सामना...

सामनाचा कालचा (१२ फेब्रुवारीचा) अग्रलेख "प्रेमी युगुलांनी जायचे तरी कुठे?" हा अग्रलेख वाचल्यावर काय वाटले?

त्यातील काही वाक्ये:

...वर्षापुर्वी मालाड येथे "लव्हर्स पार्क" चा उपक्रम साकार करण्याचे एका संस्थेने ठरवले होते. प्रेमी युगुलांची कुचंबणा दूर करणे हाही समाजकार्याचा एक भाग आहे असे समजून या साठी ठोस उपाययोजना वा प्रकल्प आखणे जरूरीचे आहे....निव्वळ व्हॅलेंटाईन डे साजरे करून खर्‍या प्रेमाची किंमत कळणार नाही. तो प्रेमाचा बाजार असतो. सोनी-महीवाल, लैला-मजनू, हिर-रांझा, शिरी-फरहाद, सलीम-अनारकली, बाजीराव-मस्तानी, रोमिओ-ज्युलिएट या सारख्यांच्या प्रेमाची ताकद आजच्या प्रेमी युगुलात नसेलही.तरीही "प्रेम हे प्रेम असतं - तुमचं आमचं सेम असतं" असं कवी मंगेश पाडगावकर जेंव्हा वास्तवाचाच्या पातळीवर समजावतात तेंव्हा एकच गोष्ट लक्षात येते की, प्रेमाला इतर कोणत्याही गोष्टीच्या मर्यादा नसतात. जात-पात, देश, धर्म,पंथ यांच्या पलीकडची ती भावना असते....

म्हणजे थोडक्यात सामन्याला आणि शिवसेनाला जो "प्रॉब्लेम" आहे तो केवळ व्हॅलेंटाईन डेच्या बाजारीकरणावर आहे त्याचा ते संस्कृतीशी संबंध लावताना दिसत नाहीत - निदान त्यांच्याच अग्रलेखातील वरील ओळी वाचल्यावर असे वाटले.

यावरून आठवले...

कोणे एके काळी अमेरिकेत मी एका भारतीय सीइओच्या हाताखाली काम करायचो.

थँक्सगिव्हींग आला की दोन दिवस सुट्ट्या - तर म्हणणार ये की कामाला - आपला थोडाच सण आहे?
दिवाळी असली तरी म्हणणार - ये की कामाला - (साजरी करायला) हा थोडाच भारत आहे? ;)

हा हा हा!

आपला थोडाच सण आहे? ... हा थोडाच भारत आहे?

हा हा हा

शिवधर्म आणि सनातन धर्म

यांत नेमका फरक कोणता बरं?

देवा गणेशांनाच माहिती. ;-)

हा हा

मस्त!

(सनातनधर्मी) शिवश्री आजानुकर्ण पुणेकर

-- आजानुकर्ण

शिवधर्मी-सनातनधर्मी

शिवधर्मावर कधी टिका-टिप्पणी केली असल्यास समस्त शिवधर्मीयांनी कृपया माफ करावे.

त्याहीपेक्षा वरच्या पायर्‍यांवर (का खालच्या?) कोणी आहे याची कल्पना म्या पामराला नव्हती.

सनातन.ऑर्गवरून साभार!

धमाल

हे फारच विनोदी संकेतस्थळ आहे असे दिसते. :)
यावरून शिरीष कणेकरांचा अनुभव आठवला. त्यांच्या आईला भूक लागली असे म्हटल्यावर ती सात्विक भाषेत, "आत्ताच खाल्लस ना मेल्या, आता हाडं खा माझी" असे उत्तर देत असे. :)
----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

माता

'माता' मध्ये 'तम' मधील दोन्ही अक्षरे आहेत मग ते अधिक तमोगुणी व्हायला हवे ना? आंधळा हिंदू द्वेष जेवढा धोक्याचा आहे तेवढ्याच या असल्या हास्यास्पद थिअर्‍या (?) धोक्याच्या आहेत.

अवाक

होणे म्हणजे काय असते, याचा अनुभव आला. यापूर्वी टेक्ससमधील ही बातमी वाचून एकदा ऊर्ध्व लागायाची पाळी आली होती :)

बाकी mummy या पाच अक्षरांतून ५८% आणि आई या दोन अक्षरांतून ११% कसे काढावेत, याचा उलगडा होऊ शकेल काय? ११ टक्क्यांचा मेळ बसण्यासाठी किमान नऊ अक्षरे लागतील ना? की 'सब घोडे बारा टक्के' या म्हणीतला एखादा टक्का राखून ठेवला आहे ? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
(http://marathisahitya.blogspot.com)

आणखी एक चर्चा प्रस्ताव..

उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणार्‍या मुसलमान भुतांनी हिंदूंवर केलेले अत्याचार विसरल्यानेच मराठी माणूस व्हॅलेंटाईन साजरा करण्याता मागे पडतो ,असे मत अच्युत गोडबोल्यांनी नोंदवल्यास तो महात्म्याचा पराभव ठरतो का? ह्यावर एक जोरदार चर्चा करावी!

संदर्भ : उपक्रम 'नवे लेखन' पृष्ठ http://mr.upakram.org/node/1029...

-कोलबेर

हा हा!

उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणार्‍या मुसलमान भुतांनी हिंदूंवर केलेले अत्याचार विसरल्यानेच मराठी माणूस व्हॅलेंटाईन साजरा करण्याता मागे पडतो ,असे मत अच्युत गोडबोल्यांनी नोंदवल्यास तो महात्म्याचा पराभव ठरतो का? ह्यावर एक जोरदार चर्चा करावी!

मस्त!

हे वाचताना अजून एक उघड्या डोळ्याने स्वप्न पाहीलेले आठवले की जेंव्हा "तो" व्हॅलेंटाईन डे निमित्त "तिला" काही फुले वगैरे देत नाही तेंव्हा "ती" त्याला भूत, पिशाच्च, वगैरे म्हणते. जर त्याने वाद घातला तर "खवीस" म्हणते. तीचे हे सर्व भाव पाहून त्याला ती हडळ, जखीण वाटते आणि फारच छळायला लागली तर "कैदाशीण" वाटते.

तळटीपः हा माझा वैयक्तिक अनुभव नाही! :-)

व्हॅलेंटाईन डे हा एक मूर्खपणा

भारतात साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे हा एक मूर्खपणा आहे. १ रुपयाचे गुलाबाचे घाणेरडे फूल प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून २० रुपयाला. शुभेच्छा पत्र ५० रुपयांपासून पुढे. साखरेच्या पाकाप्रमाणे लागणारी चॉकलेटे ५० रुपयांपासून पुढे.
व्हॅलेंटाईन डेच्या नावाखाली होणार्‍या पार्ट्यांमध्ये बाहेर ७० रुपयाला मिळणारी बीअर (खरी किंमत ३० रुपये) चक्क २०० रुपये पिंट. बाहेर ८० रुपयाला मिळणारा सिग्नेचर चा पेग पार्टीमध्ये ३०० रुपयाला.

किती ही पैशाची उधळपट्टी?

मराठी माणसा जागा हो. घामकमाईचे पैसे असे उधळू नकोस. बाजार कोसळला आहे शेअर्स खरेदी कर.

१. तुम्ही वॅलेंटाईन साजरा करता का?
नाही. (पण अपोझिट पार्टी पैसे भरण्यास तयार असेल तर ना नाही)

२. करत असल्यास साजरा करण्याचे आवडते ठीकाण कोणते?
स्वतःच्या खिशातून पैसे खर्च होत नसल्यास कुठेही आवडेल.

३. न करत असल्यास अशा कोणत्या एखाद्या रोमँटीक परंतु खर्‍या (म्हणजे स्वप्नातल्या जागी नको, माहिती खरी हवी म्हणजे माहितीपूर्ण ठरेल आणि उपक्रमावर राहील) ठीकाणी तुम्हाला तो साजरा करायला आवडेल? (स्थळ, रेस्टॉरंट, ठीकाण सुचवा.)
वरीलप्रमाणे

४. तुम्हाला कोणत्या प्रकारच्या भेटी आवडतात... (कृपया, ग्लेनफिडिश सोडून पुढे..) त्यानिमित्ताने काय भेटी द्याव्या हे कळेल.

पुस्तके. (शक्यतो इंग्रजी. Ayn Rand ची सोडून कोणतीही.)

बाय द वे वरील चर्चेवरून आठवले, व्हॅलेंटाईन डे पेक्षा नवरात्रौत्सवानंतर होणार्‍या गर्भपातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

-- आजानुकर्ण

एक नवे सौंदर्यवाचक विधान

(पण अपोझिट पार्टी पैसे भरण्यास तयार असेल तर ना नाही)

आजानुकर्ण यांच्या नव्या क्रॉनिकल् चे शीर्षक : वॅलेंटाईन्स डे : मी आणि माझा शत्रुपक्ष : ( काही ठळक गनीम )

मार्केट इकॉनॉमी ऑफ लव्ह

तेच तर मी पण सांगतोय ना. आमची मार्केट इकॉनॉमी व लोकांच्या मूर्खपणावर संपूर्ण श्रद्धा आहे. त्यात मनसेने व्हॅलेंटाईन डे ला पाठिंबाही दिला आहे. पण आम्ही मात्र घरीच बसणार आहोत. आवडत्या स्त्रीसोबत मिसळपाव खात खात ;) आणि "या गोजीरवाण्या घरात" ही मालिका बघत बघत. काय त्या बिचार्‍या शेखरवर आपत्ती येत आहेत. कसे होणार दीक्षाचे.

-- आजानुकर्ण

चतुर

चतुर आहात.

भैया म्हणू नका. इथे लोक हाणतील आम्हाला .

-- आजानुकर्ण

ह्याच्यासाठी

व्हॅलेंटाईन डे पेक्षा नवरात्रौत्सवानंतर होणार्‍या गर्भपातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

ह्याच्यासाठी (म्हणजे हे थांबवण्यासाठी) आपले संस्कृतीरक्षक काय करत आहेत बरे?

आपला
(शंकेखोर) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

नवरात्रौत्सव

नवरात्रौत्सव हा संस्कृतिरक्षकच साजरे करत असल्याने त्यावर बंदी येणार नाही. व्हॅलेंटाईन डे चा वापर राजकीय कारणासाठी करता आला की वाद बंद होईल.

आजानुकर्ण

अर्थ

भारतातही हा दिवस तरुण-तरुणी मोङ्ग्या (मोडक्या?) प्रमाणात साजरा करतात.

चर्चेतील वरील विधानाच अर्थ आपला प्रतिसाद वाचल्यावर लागला :)

भेट आणि स्वस्त

भेट आणि स्वस्त यामध्ये काही रुपयांचा फरक आहे. :)

(पुणेकर) आजानुकर्ण

नवे खूळ

आता हे नवे खूळ पहा. ऐकावे ते नवलच.

-- आजानुकर्ण

सॅड

Singles Awareness Day (SAD)

खरे म्हणाल तर मला (राजकारणाची आवड असल्यामुळे असेल कदाचीत पण...) SAD म्हणल्यावर शिरोमणी अकाली दल डोळ्यासमोर येते...

काय गंमत आहे!

सर्व प्रथम सर्कीट महाशयांशी सहमत.

पण आत्ता एक मजेदार निरिक्षण केले. गणेशरावांनी येथे आल्यापासून् ३ मूळ लेख लिहीले +एक स्वतःच्याच लेखाचा खुलासा:

हिंदूंनो...६८ प्रतिसाद (त्यांचे धरून) ११००+ वाचने (निदान ४००-५०० तरी युनिक धरायला हरकत नसावी)

वरील लेखाचा खुलासा : १८ प्रतिसाद + ३३४ वाचने (निदान १५० तरी युनिक असावीत)

व्हॅलेंटाईन डे... एका दिवसात ३५ प्रतिसाद + ३३० वाचने (निदान १००-१५० तरी युनिक धरावीत)

आणि मधे एक चांगला/माहीतीपूर्ण लेखः

घटनेने दिलेला मतदानासंदर्भात नागरीकांना हक्क (४९ वे कलम).. - ४ प्रतिसाद + ११४ वाचने (७०-८० युनिक वाचने समजूया)

या वरून मी काय शिकलो?: एखादे माहीतीपूर्ण लिखाण इतरांनी वाचावेसे वाटत असल्यास त्याला काहीतरी सनसनाटी मथळा देणे आवश्यक समजावे!

विश्लेषण

विश्लेषण आवडले. तुम्हीपण आजकाल शोधयंत्र संशोधनावर काम करता आहात का? किंवा किमान तुमच्या डाव्या खांद्यावर तीळ तरी नसावा अशी खात्री झाली आहे. :)
(कृपया ह.घ्या.)

राजकारण म्हणलं की हे आलंच

अहो, राजकारण म्हणलं की हे आलंच.
पुण्यात नाही का? सत्तेसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप सहमत झाले. कॉंग्रेस सुद्धा एकटे पडले ना... मराठीचा झेंडा त्यावेळी अजित पवारांकडे होता. आत्ता झेंडा घेणारा त्यावेळी कलमाडीच्या (अमराठी) मांडीवरच जाउन बसला होता. इथले काही उपक्रमी ते मुद्दाम विसरतात. राज (अभिमन्यु) च्या आंधळ्या प्रेमापोटी आपण धृतराष्ट्रच झालो हे मान्य नाही करत. त्या तिकडे भैय्यांच्या राज्यात सुद्धा युती कॉंग्रेस सोबत पण सत्ता भाजपच्या मदतीने मिळवली होती ना मायावतीने.

राजकारण म्हणले की सोयिस्कर सहमती येतातच. आश्वासने येतातच. आता हेच उदाहरण पहा ना. हि चर्चा ६ प्रतिसादांवरच खुंटली. ती सुद्धा तुमच्या समुदायातली. इथल्या एका आश्वासना पोटी आम्ही आज सुद्धा वाट पाहतो आहोत चर्चा पुढे जाण्याची.

त्यामुळे हे असे राजकिय विषय आले की अशी सहमती होणारच. मग ते चर्चे मध्ये दिलेले आश्वासन असो कि कार्य बाहुल्याचे कारण. आम्ही समजुन घेतो. :))





वादा निभाया

अहो तुम्ही वादा विषयांतराचा करता. तिथे कुठे तांब्या वापरता. तुमचा प्रतिसाद वाचुन आम्ही अमेरिके बद्दल अभ्यास सुरू करावा म्हणतो. अजुन गेलेलो नाही ना. आमचे मत होते की अमेरिकेत सुद्धा घाईची लागली की कागदच वापरतात युरोपा प्रमाणे, पण तांब्या वापरतात हे नवीनच कळले. अथवा तुम्ही अपवादा (अरेच्या वादा आलाच की परत) करिता वापरत असाल.





चर्चा

मस्त चर्चा होते आहे.. संत व्हॅलेंटाईन.. ते तांब्या.. कागद. सँडपेपर.. काहीही..

पाद्री व्हॅलेंटाइन खरेच `पॉवरबाज' आहे काय ? ह्याचे उत्तर मिळाले असावे..

बर्फ आहे की....

"...कश्मिरी लोक काय वापरतात ? नाही, तिथेही थंडी असते.. इथल्यासारखे गरम पाणी नळाला नसावे.. मग ?...."

जाता जाता एक् बर्फाचा खडा घेवून् जात असतील्.

बर्फ

जाता जाता एक् बर्फाचा खडा घेवून् जात असतील्

हा हा हा.. बाय द वे आमच्या चांद्रखाणीपासच्या हिमालयन ट्रेकला खरच बर्फ वापरला होता ;) :प्

-(बर्फाचा वेगवेगळे उपयोग जाणणारा )ऋषिकेश

धन्य!

अरे अरे.. आता आयुष्यात कधी 'बर्फाचा गोळा' खायची वेळ आली तर अगदी जीवावर येणार :)

आम्हाला काय हवे?

व्हॅलेंटाईन डे : बोला, तुम्हाला काय हवे आहे ?

आम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य हवे आहे. आमच्या व्यक्तिगत जीवनात सांस्कृतिक पोलिसांची (ज्यांचे स्वतःचे व्यक्तिगत जीवन असांस्कृतिकतेने बरबटलेले आहे) लुडबूड नको आहे.

आपला
(सुस्पष्ट) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~
"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही"

सर्वस्पर्शी लेख

तांबेनी आपला लेख सर्व विषयांत गोवला आहे. त्याचे प्रत्यंतर त्याला मिळालेल्या प्रतिसादांवरून लक्षात येईल. (कोडे: विषय व मुद्दे जोड्या लावा आणि कोणता विषय बाकी आहे हे शोधा?)

वैज्ञानिक: गणेशरावांच्या आचक्या गचक्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करायला हवे.

धर्मः मदन आणि रती हे हिंदू धर्मातले संत व्हॅलेंटाईन. त्यांच्या नावाने कुठला सण नसतो का ?

भाषा: ... एका विनोदी लेखात म्हणतात तसे "दोन महिने झाले तरी पावसाचा पत्ता नाही. हवामान खात्याचे अधिकारी काय करत आहेत ??"

वैद्यकशास्त्र: जगातील नसावे कदाचीत अमेरिकेचे असावे. असे म्हणतात की मे-जूने २००२ च्या दरम्यान अमेरिकेतील बाळंतपणे वाढली होती. कारण ९/११ नंतर अनेकजण "इमोशनल शॉ़क" मधे होते.

इतिहास:भारतातील जन्मांच्या बाबतीत कोसंबी आणि राघवाचारी यांनी, वेगवेगळ्या ऋतूंत त्यांचे प्रमाण कमी अधिक होते, असे दाखवणारे आकडे १९५१ मध्ये प्रसिद्ध केले आहेत

तत्त्वज्ञान: शिवसेनेने प्रेमाला कधीच विरोध केलेला नाही.

शिक्षण: सोनी-महीवाल, लैला-मजनू, हिर-रांझा, शिरी-फरहाद, सलीम-अनारकली, बाजीराव-मस्तानी

संस्कृती: हा त्याचा नाच बघा बरं! या गाण्यात आपली संस्कृती जरा जास्तच खुलुन दिसतीय नाही? :)

आंतरराष्ट्रीय: म्हणूनच काश्मिर अजून फक्त कागदोपात्री भारतात आहे. हिंदूंनो जागे व्हा मोतीलाल नेहरूंचा निषेध करा!

अनुभव: तळटीपः हा माझा वैयक्तिक अनुभव नाही! :-)

बातमी: सामनाचा कालचा (१२ फेब्रुवारीचा) अग्रलेख

माहिती: प्रेमाला इतर कोणत्याही गोष्टीच्या मर्यादा नसतात. जात-पात, देश, धर्म,पंथ यांच्या पलीकडची ती भावना असते....

विचार: उघड्या डोळ्यांनी स्वप्ने पाहणार्‍या मुसलमान भुतांनी हिंदूंवर केलेले अत्याचार विसरल्यानेच मराठी माणूस व्हॅलेंटाईन साजरा करण्याता मागे पडतो ,असे मत अच्युत गोडबोल्यांनी नोंदवल्यास तो महात्म्याचा पराभव ठरतो का? ह्यावर एक जोरदार चर्चा करावी!

 
^ वर