मराठी संकेत स्थळ

मित्र हो,
विश्वजालाचे तंत्रज्ञान मराठीत वापरण्यासाठी माझ्या सारख्या नवख्याला अनेक अडचणी येतात. आपण येथे चर्चा करून माझ्या सारख्या अनेक जणांना मदत करु शकता. चला तर मग सुरु करू. मी काही प्रस्ताव लिहितो आहे. शक्य झाल्यास सर्किट रावांना विनंती की त्यांनी योग्य मार्गदर्शन करावे आणि या चर्चाचे व्यवस्थापन करावे.

१. संकेतस्थळ तयार करण्याची पुर्व तयारी काय असते?
२. मराठीमध्ये संकेतस्थळ करण्यासाठी काय करावे?
३. आपल्याला ड्रुपलची मदत मराठी मध्ये लिहिता येईल का? जेणे करून त्याचा फायदा सगळ्यांना होईल...

असे काही प्रस्ताव सुचल्यास येथे भर घालावी हि नम्र विनंती...

लेखनविषय: दुवे:

Comments

ड्रुपल चे मराठी भाषांतर

नमस्कार,

मी ड्रुपलचे मराठी भाषांतर केले होते आणि ड्रुपल वर चढवले आहे. मात्र ते भाषांतराच्या सुचीत दिसत नाही. कुणाला हवे असल्यास संपर्क साधावा.

ड्रुपल ची मदत लिहीण्यास मी सहभागी होण्यास तयार आहे.

मराठीत किंवा कुठल्याही भाषेत संकेतस्थळ तयार करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या संकेतस्थळाची मुख्य कल्पना. ती जर एकमेव किंवा कल्पक असेल तर बाकी आदाने सहज गोळा होतील.

मी गेल्या काही दिवसांत मराठीतून संकेतस्थळ या विषयावर वाचतोय. माझ्या क्षमतेप्रमाणे याही विषयात मदत करू शकेन.

नीलकांत

सुरू करू

नीलकांत,
येथे चर्चा करूयात मग की, ड्रुपल वापरून संकेतस्थळ कसे तयार करावे...

मी पण ऐकत् आहे.

नील,

शक्य झाल्यास एक स्वतंत्र लेख् लिहून. मराठी संकेतस्थळ कसे सुरु करावे याची माहिती द्यावी. :)

त्याने पण!

१. संकेतस्थळ तयार करण्याची पुर्व तयारी काय असते?
२. मराठीमध्ये संकेतस्थळ करण्यासाठी काय करावे?

मी गेल्या काही दिवसांत मराठीतून संकेतस्थळ या विषयावर वाचतोय. माझ्या क्षमतेप्रमाणे याही विषयात मदत करू शकेन.

मी गेल्या काही दिवसांत मराठीतून संकेतस्थळ या विषयावर वाचतोय. माझ्या क्षमतेप्रमाणे याही विषयात मदत करू शकेन.

हे संकेतस्थळ ज्याने सुरू केले त्यानेदेखील मराठी संकेतस्थळ निर्माण करण्याच्या या चर्चेत सहभागी व्हावे! ;)

काय उपक्रमशेठ, कशी वाटते कल्पना? ;)

आपला,
(कल्पक!) तात्या.

धन्यवाद

मिलिंद उर्फ सर्किट,
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद. आपल्या मदतीच्या आणि लेखाच्या प्रतिक्षेत...

^ वर