व्हॅलेंटाईन डे : बोला, तुम्हाला काय हवे आहे ?

पाद्री व्हॅलेंटाइन खरेच `पॉवरबाज' आहे काय ?

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात `टाइन डे' म्हणून साजरा केला जातो. भारतातही हा दिवस तरुण-तरुणी मोङ्ग्या प्रमाणात साजरा करतात. प्रेमाच्या नावाखाली पाश्चात्त्यांनी मांडलेला हा बाजार आहे. या `व्हॅलेंटाईन'वर `दैनिक सामना'च्या १३ फेब्रुवारी रोजीच्या अंकात अग्रलेखातून कोरडे ओडले आहेत. या लेखाचा काही भाग आम्ही आमच्या वाचकांसाठी जसाच्या तसा प्रसिद्ध करत आहोत. रोममधील `पाद्री व्हॅलेंटाइन' कि काय याचा जन्मदिन कि मरणदिन हा सध्या आपल्याकडील लोकांचा जीवन-मरणाचा प्रश्‍न बनून राहिला आहे. १४ फेब्रुवारीला रोममधील पाद्र्याच्या नावाने प्रेम दिवस साजरा केले जातो व हे `फॅड' अलीकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. १४ फेब्रुवारीस आपल्याकडील नवजवान पोरापोरींना प्रेमाचे जे आचके-गचके लागतात ते वर्षभरातील इतर दिवशी कोठे आटतात ? जणू काही १४ फेब्रुवारीस व्हॅलेंटाइनच्या प्रेमाचा गुलाबी फुगा फुगवला नाही व फोडला नाही, तर त्या पाद्र्याचा आत्मा अतृप्‍त राहून हिंदुस्थानच्या भूमीवर भटकत राहील व आपल्या देशातील प्रेमाचे नामोनिशाण नष्ट होईल. शिवसेनेने प्रेमाला कधीच विरोध केलेला नाही. प्रेम हा एक संुदर शब्द आहे. प्रेमाने जग जिंकता येते, असे म्हणतात; मग त्याच प्रेमाने आम्हाला आतापर्यंत कश्मीर का जिंकता आले नाही ? म्हणजे काश्मीर हे कागदोपत्री हिंदुस्थानच्या नकाशावर असेलही; पण तेथे गेली कित्येक वर्षे ज्या फुटीरवादी प्रवृत्ती हिंसेचा आगडोंब उसळवीत आहेत, त्या नराधमांना हा रोमचा `व्हॅलेंटाइन' सुबुद्धी का बरे देत नाही ?

अधिक माहिती : http://www.sanatan.org/marathi/dainik/visheshank/valentine/valentine.htm...

गणेश

Comments

शुभेच्छा!

व्हॅलेंटाइन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! जो जे वांछिल तो ते लाहो आणि जी जो वांछिल ती तो लाहो ;)

चालू द्यात.

<<<जगातील फक्त एकच पाश्चात्य गायक आपल्या संस्कृतीत बसतो आणि तो म्हणजे मायकेल जॅक्सन. कारण त्याने शिवउद्योगसेनेला देणगी दिली होती.
इंग्रजी ही असुरांची भाषा वगैरे>>>
एकूण ही चर्चा वाचूना ज्ञानात बरीच भर पडली. त्यामुळे चालू द्यात!
राधिका

अवांतर- इथे प्रतिसाद लिहायच्या खिडकीवर नेहमीचे चौकोन का दिसत नाही आहेत?

 
^ वर