उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मानवातील गुप्त शक्ति............
सचिन खुटवड
November 26, 2008 - 6:25 am
मानवातील गुप्त शक्ति............
मानवात खरेच गुप्त् शाक्ति आसतात का?
उ. दा. -
१) समोरिल् व्यक्ति च्या मनातिल विचार् ओळ्खने.
२) समोरिल् व्यक्ति चे आजार दुर करने.
३) समोरिल व्यक्ति ला येनार्या सन्कटाचि जानिव करुन देणे , ईत्यादि.
क्रुपया या विशयि काहि मार्गद्श्र्न् करावे.
तसेच आपणास या सन्बधि काहि अनुभव आले आसतिल तर जरुर कळवा.
दुवे:
Comments
क्रमशः ?
की भाग २? आणि हा प्रश्न विचारणे म्हणजे अवांतर तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरे अतिंद्रीय शक्ती असणार्यांनी ती वापरून द्यावीत ही विनंती.
साठ्ये : नमस्कार; आकाशवाणी पुणे (फ) केंद्रावर आपले स्वागत आहे. श्रद्धा वि. अंधश्रद्धा वि. इतर उरलेले अशा सामन्याच्या दुसर्या दिवसाचे धावते समालोचन. ह्या सामन्याचे विशेष म्हणजे इथे सगळेच फलंदाज आहेत, चेंडू टाकायला कुणी तयारच नाही. चौफेर फलंदाजी आणि इतर फलंदाजांना रन आउट, एलबीडब्ल्यू किंवा ह्यांडल द बाल अशा कुठल्याही तर्हेने बाद करणे ही या सामन्यांची दोन वैशिष्ट्ये म्हणता येतील. तुम्हाला काय वाटते, कुलकर्णी?
कुलकर्णी : अं अं अं...झ्याकफिरदुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र् (कुलकर्णी नेहेमी नाजुक वेळेस तपकिरीचा बार भरतात!)
साठ्ये : असो. तर कुलकर्णींच्या ह्या विशेष कॉमेंटनंतर सामन्याकडे वळू या. सकाळच्या या कोवळ्या उन्हात सर्व फलंदाज ब्याटी हातात घेऊन तयार. मला आठवतय, १९६७ साली चंदू बोर्डे खेळत असताना असेच कोवळे उन पडले होते. तुम्हाला आठवतय का कुलकर्णी?
कुलकर्णी : झ्याकफिरदुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्
साठ्ये : हो, मलाही तसेच वाटते.
मध्येच प्रक्षेपण थांबते.
"असा उदास का दिसतो आहेस, रामय्या?"
"काय करू, पावसाळा तोंडावर आला, पण घराचे छप्पर अजून तयार नाही"
रामय्याची वेळ तुमच्यावर येऊ देवू नका. वापरा लक्ष्मी सिमेंट.
साठ्ये : श्रद्धा संघाचे पहिले फलंदाज ब्याट हातात घेतायत, घुमवतायत, तिच्या वजनाचा अंदाज घेतायत...
----
रामय्या
अहो ती जाहिरात अशी होती.
"अरे, कसला विचार करतोस रामय्या?"
"घर आणि गोठ्याला कुठलं छप्पर वापरावं तेच कळत नाही बघ."
"अरे चारमिनार छाप ऍसबेसटॉसचे पत्रे विकत घेऊन ये. माझ्या आजोबांनी घराला बसवलेले पत्रे अजूनही शाबूत आहेत."
"अरे खरंच की, मीही चारमिनारच विकत घेऊन येतो."
चारमिनार!, जगातील सर्वाधिक विक्री असलेलं ऍसबेसटॉस सिमेंट उत्पादन!
आपला,
(रामय्या) आजानुकर्ण
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
प्रेरणा
धन्यवाद. ती जाहिरात वर्षानुवर्षे ऐकल्यामुळे आमच्या मेंदूत कोरली गेली आहे. पण जशीच्या तशी वापरली तर ती उचलेगिरी होते म्हणून तिच्यात (आमच्या अतिंद्रीय प्रतिभेचा(!) मसाला घालून) बदल केला आहे.
----
माझ्यातल्या गुप्त शक्तींचे मला आलेले अनुभव
- मी एक अतींद्रिय शक्ती मिळालेला मानव आहे. मला दुसर्यांच्या मनातले विचार ओळखता येतात. मला दिव्य साक्षात्कार होतात. माझ्या शीराभोवती एक गूढ वलय आहे (जे मला आरशात दिसते.) मी फुंकर न मारता केवळ एकाग्र चित्त करून मेणबत्ती विझवू शकतो.
असे इतरही अनुभव मला येतात. फक्त ते इतरांना कळत नाहीत. म्हणून गुप्त आहेत.
- वरील क्र. १ च्या उत्तराप्रमाणे मनात विचार येऊन एखाद्याला मानसिक आजार झाला असेल तर समुपदेशनाने बरा करू शकतो. तरीही रुग्ण बरा नाही झाला तर झाडू, काठी इत्यादी साधने वापरून खात्रीने बरा करतो.
- "बाबारे, असाच वरील क्र. १ च्या उत्तराप्रमाणे विचार करत राहिलास तर तुझा भविष्यकाळ अंधःकारमय होईल. या वर्षात महत्त्वाच्या परीक्षा देणार असशील तर बाकीचे सर्व विचार बाजूला ठेव आणि अभ्यास कर. नाहीतर शिक्षणाच्या शेवटच्या पायरीला गोता खाशील! जास्त पुढे गेल्यास ठाण्यात रहावे लागेल" अशा प्रकारे मी समोरच्या व्यक्तीला संकटांची पूर्वसूचना देऊ इच्छितो. अर्थात त्या व्यक्तीला ला हवी असेल तरच!
सहमत
विसुनानांशी १००% सहमत!
जास्त...
गुप्त शक्ती आहे का नाही ते माहीत नाही, पण "गुप्त शक्तीवर" जास्त भरवसा ठेवला तर वास्तवातील "शक्ती गुप्त" होऊ शकते असे मात्र नक्कीच वाटते :-)
गुप्त शक्ती आहे का नाही ते माहीत नाही
जी गोश्ट आपणास माहिति नाहि ती जानुन घ्या. मग तुमचा भरवसा बसेल.
गुप्त शक्ती वापरून सांगतो की ...
याच गुप्त शक्ती वापरून सांगतो की सदर लेखकाचा पुढील लेख "मानवातील गुप्त शक्ति" यासारख्या / याच विषयावर असेल
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
कृती
भिंतीवरील पालीची शेपटी पकडून् ठेवा. पाल शेपटी त्यागुन पुढे गेली की शेपटी जमिनिवर पडू द्या.अंगावरील सर्व कपडे काढून शेपटी ज्याप्रमाणे वळवळते त्या तालावर सतत उड्या मारा. शेपटी पूर्ण निश्चल झाली की उड्या थांबवुन ती शेपटी एका चिनी मातीच्या बशीत घ्या. घरा बाहेर अंगणात लाकडे पेटवुन त्यावर ही शेपटी ठेवा. शेपटी जळून त्याची पूर्ण राख झाली की ती राख बशीत गोळा करा. ह्या राखेत थोडे गंगाजल टाकुन ही राख काजळ लावल्याप्रमाणे डोळ्याला लावा. हमखास गुप्तशक्ती प्राप्त होतात.
हा प्रयोग करुन झाल्यावर स्वतः अनुभव घेउन खात्री झाल्यावरच पुढचे प्रस्ताव टाका ही विनंती. कोणीही अश्रद्ध तुमच्या वाटेला जाणार नाही ग्यारंटी.
(गुप्त शक्तिमान) कोलबेर
कपडे ?
कपडे कधी घालायचे? का ही शक्ती कपडे नसतानाच प्राप्त होते?
खरंय तुमचं कपड्यांसारख्या ऐहिक गोष्टीत मन गुंतल्यावर कशी मिळणार गुप्तशक्ती!
ऋषिकेश
कपडे
उड्या मारुन झाल्या की कधीही घालू शकता. तुमच्या आवडीवर अवलंबुन आहे.
धन्यवाद!
मौलिक माहितीबद्दल धन्यवाद! :)
चला पाली शोधायला गेले पाहिजे. आम्ही घरात पाली जगु देत नाहि, त्यामूले आजपर्यंत गुप्त शक्तींची चणचण होती.. तरीच काहि लोकांना पाली व इतर किटक उपकारक वाटतात.. का हे आज कळाले ;)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
माहित नाही पण..........
ह्या "गुप्त शक्तीं" च्या नादी लागलेला माणुस् त्याच्या कडे मुळातच असलेल्या "सुप्त शक्ती " गमावतो असं वाटतं.
त्यापेक्षा बाबा मनोबा ह्यांचे सुविचार लक्षात् घेउन् काम कर वत्सा, तुझं कल्याण् होइल.
" जागव् तुझं आत्म भान
ओळख् तुझं स्व-रूप.....
कर कठोर् मेहनत् अन् हो यशस्वी
"
"उठ् वेड्या ....
तोड बेड्या"
जन सामान्यांचे मन
"सुप्त शक्ती "
तुमच्या लेखि सुप्त शक्ति कशाला म्हणावे.
क्रुपया यादि स्वरुपात सन्गावे.
विज्ञान आणि चमत्कार लेखक. अद्वयानंद गळतगे.पाने ६६५किं४००रु
प्रिय सचिन,
तु उपस्थित केलेले अनेक दुवे वाचले. तुझ्या या व अशा विचारणांचे समाधान कारक व वैज्ञानिक उत्तर वरील पुस्तकातून होईल अशी खात्री वाटते. या विषयी तुला अधिक माहिती हवी असेल तर माझ्याशी ९८८१९०१०४९ या वर संपर्क करू शकतोस.