़ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली आसेल काय?

ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली होति काय ?या विषया वर काहि माहिती / मार्ग दर्शन करावे.
आस्तिक आणि नास्तिक सर्वानि सहभाग घ्यावा हि नम्र विनन्ति.............

सस्नेह निमन्त्रण..............

Comments

आस्तिक आणि नास्तिक

आस्तिक आणि नास्तिक यांचा खास उल्लेख समजला नाही.
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, पाठीवर मांडे भाजले, रेड्याच्या तोंडून वेद म्हणवले इ. चमत्कार ऐकले आहेत.
प्रत्यक्ष पाहिले नाहीत. प्रत्यक्ष पाहणारे कोणी जिवंत असेल असे वाटत नाही.
(भवानीमातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली त्याबद्दलही असेच म्हणता येईल.)
तसे घडले असणे शक्य आहे. नाही असे नाही. पण कदाचित तसे घडलेही नसावे.
माझ्या पाहण्यात अजूनतरी कोणताही प्रासंगिक चमत्कार (स्टेजवरची/ रस्त्यावरची जादू सोडून) घडलेला नाही.
त्यामुळे बुद्धी म्हणते 'तसे' चमत्कार घडले नसण्याची शक्यता अधिक आहे.
म्हणून मी नास्तिक ठरतो काय?

पण वयाच्या केवळ आठराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका लिहून समाधिस्त व्हावे हाच चमत्कार आहे याची खात्री आहे.
जसे, मुस्लिम राजसत्ता देशात सर्वत्र पसरली असता, तिला टक्कर देऊन शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर राजा झाले हाही एक चमत्कारच आहे.
अशा प्रकाराने माझा चमत्कारावर विश्वास आहे.
म्हणून मी आस्तिक ठरतो काय?

असे ऐकले आहे की ...........

पण वयाच्या केवळ आठराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका लिहून समाधिस्त व्हावे हाच चमत्कार आहे याची खात्री आहे.
जसे, मुस्लिम राजसत्ता देशात सर्वत्र पसरली असता, तिला टक्कर देऊन शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर राजा झाले हाही एक चमत्कारच आहे.
अशा प्रकाराने माझा चमत्कारावर विश्वास आहे.

ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असे ऐकले आहे की भावार्थदीपिकेच्या लिखाणाचे बरेचसे काम विट्टलपंतांनी (ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी) करून ठेवले होते. शिवाजी राजांच्या अगोदर शहाजीराजांनी स्वराज्यस्थापनेचा प्रयत्न केला होता पण तो असफल झाला होता असे म्हणतात. पण त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवाजी महाराजांना नक्कीच झाला असणार. अर्थात् त्यामुळे ज्ञानेश्वर व शिवाजी महाराज यांच्या कार्याचे महत्त्व कमी होत नाही.

.... काय शोध लावता ?

ज्ञानेश्वरांच्या बाबतीत असे ऐकले आहे की भावार्थदीपिकेच्या लिखाणाचे बरेचसे काम विट्टलपंतांनी (ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी) करून ठेवले होते.

कुणाकडून चांगदेवांकडून ? आम्हालाही त्यांच्या दर्शनाचा लाभ घडवून दिला तर आम्ही आपले आभारी होऊ.

शहाजीराजे आणि शिवाजीमहाराज यांचे उदाहरण पटण्यासारखे आहे.

पण ज्ञानेश्वरीचे बरेचसे लिखाण(???) विठ्ठलपंतांनी केले होते म्हणजे ....?
आपले म्हणणे म्हणजे ज्ञानेश्वरी ‘‘ज्ञानेश्वरी’’ नाही.. ? ज्ञानेश्वरी पूर्णपणे ज्ञानेश्वरांची नाही ?
हा तर मग ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली की नाही या पेक्षा मोठा वादाचा मुद्दा ठरेल.

ज्ञानेश्वरांनी सुमारे नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. त्यातल्या किती ओव्या वा संकल्पना विठ्ठलपंतांच्या या बद्दल जरा माहिती दिली तर बरे होईल म्हणजे आपल्या साहित्यसंशोधनासाठी ज्ञानपीठ मिळण्यासाठी आम्ही आपल्या वतीने अर्ज करू.

माफी मागण्याचा प्रश्नच नाही !

पुरावा द्या अथवा माफी मागा.

मी दावा केलेला नाही. काय "ऐकले" ते लिहिले आहे. ज्याच्याकडून ऐकले तो माझ्याइतका "इहवादी शंकासुर" नाही. तथापि "पुरावा" आहे का याची आता मलाही उत्सुकता आहे. जी माहिती मिळेल ती 'उपक्रम'वर टाकीनच.

प्रश्न आहे ...

मी दावा केलेला नाही. काय "ऐकले" ते लिहिले आहे. ज्याच्याकडून ऐकले तो माझ्याइतका "इहवादी शंकासुर" नाही. तथापि "पुरावा" आहे का याची आता मलाही उत्सुकता आहे. जी माहिती मिळेल ती 'उपक्रम'वर टाकीनच

वा छान !

आपल्या ऐकण्यावर आपले नियंत्रण असू शकत नाही हे मान्य (हा ब्रह्मदेवाचा दोष वा गुण, काहीही म्हणा), पण आपले आपल्या बोलण्या/लिहिण्यावर मात्र नियंत्रण असू शकते ना ? कुणीतरी काही तरी बोलतो आणि त्याची चिकित्सा न करता, ते खरे की खोटे याबद्दल काहीच माहिती नसताना आपण जाहीरपणे, चार लोकांमध्ये आपले (ऐकीव) मत मांडता याला काय म्हणावे ?

जर आपण स्वतः संशोधन केले असते व प्रामाणिकपणे पुराव्यांच्या साहाय्याने बौद्धिक पातळीवर ते मांडले असते तर लोकशाहीच्या तत्त्वांनुसार आम्ही आपल्या मतस्वातंत्र्याचा आदरच केला असता किंवा दुसर्‍या कुणाचे पटलेले संशोधन आपण आपल्या पद्धतीने पुराव्यासह (त्याचे नाव घेता/ न घेता) मांडले असते तरी आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. या बाबतीत बौद्धिक पातळीवरच आम्ही आपल्याशी चर्चा केली असती . पण आपण तर तसे काही केलेले दिसत नाही.

ज्ञानेश्वरमहाराज म्हणजे कुणी दर दोन वर्षांनी पक्ष बदलणारे नेते नाहीत वा एखादा हिंदी चित्रपटसृष्टीतील नटही नाही ज्यांच्याबद्दल उथळपणे कुणी तरी काही बोलावे आणि कुणी तरी काही ऐकावे.
ज्ञानेश्वरमहाराजांना महाराष्ट्रातील भाविक लोक देवाखालोखाल नाही तर देवच मानतात. आपण मानावे वा न मानावे हा आपला प्रश्न आहे. त्यांच्यावरील लोकांची श्रद्धा ही काही राजकीय नेते वा नटनट्या या विषयीच्या भावनेसारखी नाही.
नुसती विद्वत्ता वा लौकिक मोठेपण म्हणून कुणी एखाद्याला देवाच्या जागी बसवित नाहीत आणि बसवले तरी अशांचे देवत्व काही काळापुरतेचअसते.
लोक ज्ञानेश्वरमहाराजांना क्षमा, शांती, करूणा, पावित्र्य या दैवी संपत्तीने विभूषित संतविभूतीच्या रुपात पाहतात.
लोकांना ही अमूर्त तत्त्वे नुसती सांगून समजत नाहीत. त्यांच्या पुढे काही तरी आदर्श ठेवावा लागतो.
अशा विभूतींवरील लोकांची श्रद्धा म्हणजे या तत्त्वांवरीलच श्रद्धा होय. त्यांच्यावरील श्रद्धा उडणे म्हणजे या तत्त्वांवरील श्रद्धा उडण्यासारखेच आहे.
कुणी यावर व्यक्तीपूजा म्हणून आक्षेप घेतील. पण व्यक्तीपूजा आणि विभूतीपूजा यांतील अंतर लक्षात घेतले पाहिजे. निव्वळ पैसा, अधिकार, लौकिक यश, सत्ता यांमुळे मोठे झालेल्यांचे व्यक्तीमाहात्म्य याला व्यक्तीपूजा म्हणता येईल, पण सत्य, स्वार्थत्याग,पावित्र्य, समाजाच्या उद्धाराची तळमळ या गुणांमुळे मानवतेच्या पातळीवर श्रेष्ठत्व पावलेल्या महापुरुषांचा आदर्श ही व्यक्तीपूजा होऊ शकत नाही, ती विभूतीपूजाच होय.

या बाबतीत श्रद्धा गेली की सर्वच गेले. बरे, सामाजिक नीतिमत्ता वाढण्याच्या दृष्टीने अशा पूज्य विभूतींवरील लोकांची श्रद्धा आवश्यकच आहे हे आपणही मान्यच कराल. अशा महापुरुषांवरील श्रद्धेने जर समाजाची नैतिक पातळी वाढत असेल तर त्यांच्यावरील श्रद्धा ही श्रेयस्करच म्हटली पाहिजे. ( जर अशी कुणा व्यक्तीवर श्रद्धा नकोच असे अपले मत असेल तर मीही त्याच्याशी सहमत आहे, पण मग आत्तापर्यंत होऊन गेलेल्या सर्वच महापुरुषांना हा नियम लावला पाहिजे.)

आपण वैयक्तिकदृष्टया कोणते आदर्श मानावयाचे हा आपला प्रश्न आहे. आपली मते फक्त आपल्यापुरतीच राहत असतील तर मग कुणालाच त्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. जो पर्यंत आपण कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही अनैतिक कृत्य करत नाही तोपर्यंत कायदाही आपल्या अशा गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही. लोक मानतात त्यांना आपण आंधळेपणाने मानावे असेही मी म्हणत नाही. पण का मानतात याचाही विचार केला पाहिजे. आपल्याला वेगळे मत असण्याचा अधिकार आहे , पण सर्वसामान्य समाज ज्यांना विभूतीस्वरूप मानतो, अशा महापुरुषांविषयी तो वापरताना आपली बाजू बौद्धिकदृष्टया आपण पुराव्यासह पूर्णपणे मांडली पाहिजे.
आपण सामाजिक क्षेत्रात जर एखादे वादग्रस्त विधान करत असाल- मग ते आपले असो वा दुसर्‍याचे- तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावरच येते. तिथे नुसते 'ऐकले ते लिहिले' असे म्हणून हात झटकू नयेत. दुसर्‍याने 'सांगितले ते ऐकले आणि ते मी लिहिले' , म्हणजे हे माझे मत नाही असे आपण म्हणाल पण आधी दुसर्‍याचे का हो होईना, वादग्रस्त मत मांडून नंतर माहिती मिळविण्यापेक्षा
आधी स्वतःच या बाबतीत माहिती मिळवून मगच आपले निश्चित मत मांडावे. 'ऐकीव' मत मांडून निर्माण झालेले वाद हे फक्त करमणुकीपुरतेच मर्यादीत राहिले तरी ठीक, पण हा वाद तशा प्रकारचा नाही. काहीही ठोस पुरावा नसताना समाजाचा बुद्धीभ्रम करून लोकांची श्रद्धा नाहीशी करण्या प्रयत्न केवळ बुद्धीहीनतेचाच नव्हे तर हीन बुद्धीचाही म्हटला पाहिजे.

राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराविषयी आपल्यालाही बरीच 'ऐकीव' माहिती असेल, तीही अशीच 'ऐकले ते लिहिले' पद्धतीने इथे उपक्रमावर जाहीरपणे, नांव घेऊन मांडून दाखवावी. आत्ता जसे धैर्य दाखविले तसे या बाबतीतही धैर्य दाखविले तर आम्ही आपले कौतुकच करू.

अस्संय होय

आपण सामाजिक क्षेत्रात जर एखादे वादग्रस्त विधान करत असाल- मग ते आपले असो वा दुसर्‍याचे- तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावरच येते.

अस्संय होय .. बरं झालं सांगितलंत मग एक उदाहरण घेऊयात

अशा महापुरुषांवरील श्रद्धेने जर समाजाची नैतिक पातळी वाढत असेल तर त्यांच्यावरील श्रद्धा ही श्रेयस्करच म्हटली पाहिजे

१. आपल्यामते महापुरुष कोणाला म्हणावे?
२. महापुरुषांवरील श्रद्धेने जर समाजाची नैतिक पातळी वाढते याचा अभ्यास करून ते सिद्ध झाले आहे काय? असा अभ्यास कोणी केला आहे? नसेल तर ते सिद्ध करायची जबाबदारी लेखकावर म्हणजे तुमच्यावर येणार का?

कोण रे तो/ती म्हणत होता/होती ही चर्चा ज्ञानेश्वरांवर नाहि म्हणून ;)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

धीर धरा

ज्ञानेश्वरमहाराज म्हणजे कुणी दर दोन वर्षांनी पक्ष बदलणारे नेते नाहीत वा एखादा हिंदी चित्रपटसृष्टीतील नटही नाही ज्यांच्याबद्दल उथळपणे कुणी तरी काही बोलावे आणि कुणी तरी काही ऐकावे.

अहो, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे शंका उपस्थित करण्याचं आणि त्या मांडण्याचं. त्याचा नट-नटी असण्याचा काय संबंध? नट नट्याही माणसेच असतात. त्यांच्याविषयी तरी उथळ का बोला? मला वाटतं तुम्ही नटनट्यांबद्दल असे म्हणायला नको होते. तरी सर्वांची माफी मागावी.

या बाबतीत श्रद्धा गेली की सर्वच गेले. बरे, सामाजिक नीतिमत्ता वाढण्याच्या दृष्टीने अशा पूज्य विभूतींवरील लोकांची श्रद्धा आवश्यकच आहे हे आपणही मान्यच कराल. अशा महापुरुषांवरील श्रद्धेने जर समाजाची नैतिक पातळी वाढत असेल तर त्यांच्यावरील श्रद्धा ही श्रेयस्करच म्हटली पाहिजे.

काहीतरी बोलू नका. माझी पूर्वी सचिनवर श्रद्धा होती. आता ढोणीवर आहे. श्रद्धा बदलू शकते. श्रद्धा बदलली पाहिजे. नाहीतर मनुष्य कोता होतो आणि दुसर्‍याकडून भलत्यासलत्या अपेक्षा करू लागतो.

शरदकाकांनी मित्राला विचारतो असे सांगितल्यावरही आपण इतका मोठा अपमानास्पद प्रतिसाद लिहिलात तो लाजिरवाणा आहे. शरदकाका इथे बरेच महिने आहेत. त्यांनी उत्तम लेखन केलेले आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग व्यक्तिला असे लिहिलेले पाहून आश्चर्य वाटले. ते ही कोणी लिहावे तर इथे चार दिवस न आलेल्यांनी. काही लोकांना धीर नसतो हे आधीही पाहिले आहे. शरदकाकांसारख्या ज्येष्ठ व्यक्तिवर असे आरोप केले आहेत त्याचा मी निषेध करतो.

राजकीय नेत्यांच्या भ्रष्टाचाराविषयी आपल्यालाही बरीच 'ऐकीव' माहिती असेल, तीही अशीच 'ऐकले ते लिहिले' पद्धतीने इथे उपक्रमावर जाहीरपणे, नांव घेऊन मांडून दाखवावी. आत्ता जसे धैर्य दाखविले तसे या बाबतीतही धैर्य दाखविले तर आम्ही आपले कौतुकच करू.

काहीही बोलता की शेटजी! अहो, इथे लोक आपल्या स्वतःच्या नावाने लिहित नाहीत तिथे राजकीय नेत्यांचा भ्रष्टाचार कुठून काढलात मध्येच. वडाची साल पिंपळाला आणि कौतुक करणारे कोण आपण?

संत ज्ञानेश्वर पतपेढीचे संचालक?
ज्ञानेश्वरमहाराज वारकरी संघटनेचे प्रमुख?
ज्ञानदेव सहकारी संघटनेचे अधिकारी?

आपल्या कौतुकावर लोकांची पोटं चालतात असे वाटते काय? ही कौतुकाची भाषा पाहून करमणूक झाली. आपल्या कौतुकाने इथे कोणाला काडीचा फरक पडतो असे मलातरी वाटत नाही.

- राजीव.

सनातन धर्माचा विजय असो.

सहमत

शरदकाकांनी मित्राला विचारतो असे सांगितल्यावरही आपण इतका मोठा अपमानास्पद प्रतिसाद लिहिलात तो लाजिरवाणा आहे. शरदकाका इथे बरेच महिने आहेत. त्यांनी उत्तम लेखन केलेले आहे. त्यांच्यासारख्या बुजुर्ग व्यक्तिला असे लिहिलेले पाहून आश्चर्य वाटले. ते ही कोणी लिहावे तर इथे चार दिवस न आलेल्यांनी. काही लोकांना धीर नसतो हे आधीही पाहिले आहे. शरदकाकांसारख्या ज्येष्ठ व्यक्तिवर असे आरोप केले आहेत त्याचा मी निषेध करतो.

श्री. विली वोन्का यांच्याशी १००% सहमत
शरदरावांची माफी मागावी ह्या सुचवणीला अनुमोदन

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

+१

सहमत.

मध्यंतर....

दुरिताचे तिमिर जावो॥
.
.
.
.

(उदास) उपमन्यू

ज्ञानेश्वर

ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहीली ते ज्ञानेश्वर. ती नक्की कुणी लिहिली ही बाब (त्याच्या लेखी, किरकोळ शैक्षणिक उत्सुकता सोडल्यास) गौण आहे. ज्ञानेश्वरीची महत्ता ज्ञानेश्वरांनीच लिहील्या-न-लिहिल्याने किंवा भिंत चालवली असल्या-नसण्याने उणी होत नसावी.

आस्तिक आणि नास्तिक

आपणास शब्दान्चे खेल चान्गले जमतात

मला? छे हो!

कसचं... कसचं...! ;)
पण तुम्हाला काही चमत्कार पाहून माहित असतील अथवा तुम्ही स्वतःच काही केले असतील तर त्याबद्दल जरूर लिहावे.
जिज्ञासा आहे. ('अथा तो चमत्कारजिज्ञासा...')
शिवाय आपण करत असाल तर प्रत्यक्ष पहायला येण्याची इच्छा आहे.
मी काही चमत्कार करू शकत नाही याचे वाईट वाटते. कसे करता येतात? हे शिकायला आवडेल.
मलाच काय? कुणालाही आवडेल.
काय करता येईल त्याच्या बर्‍याच शक्यता आहेत. हम्म्!

पण मूळ प्रश्नाला उत्तर मिळाले नाही - आस्तिक आणि नास्तिक असा खास उल्लेख कशासाठी?
या प्रश्नाला बगल देऊ नका.
"The truth is out there but not outside X-files!" ;) (c)2008 , विसुनाना All rights reserved.

प्रकाटाआ

----

मुळ प्रश्न

मुळ प्रश्न आस्तिक आणि नास्तिक हा नसुन,
ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली आसेल काय? हा आहे तरी आपण या विषयि ञानात भर घालावी.

हो, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हे सत्य असावे.

ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हे सत्यच असावे. ज्ञानेश्वर का तुम्ही आम्हीही भिंत चालवू शकतो. आमच्या शेजारी बांधकाम सुरू आहे. बरेच अशिक्षित-अर्धशिक्षित मेक्सिकन वर्कर्स रोज "ड्राय वॉल्स" (शब्दशः भाषंतरः सुक्या भिंती) गाडीत घालून चालवत आणि नंतर डोक्यावरून वाहून या स्थळी घेऊन येतात. तेव्हा भिंत चालवण्यासाठी ज्ञानेश्वर असण्याची गरज नाही. - ह. घ्या.

डिस्क्लेमरः अशा भाकडकथांनी ज्ञानेश्वरांच्या कार्याला रेतीच्या कणाएवढीही क्षिती पोहचत नाही परंतु कार्य विसरून चमत्कारांवर विश्वास ठेवणार्‍यांचे जीवन सार्थकी लागो.

ज्ञानेश्वर का तुम्ही आम्हीही भिंत चालवू शकतो. (मुक्ताफळे )

ज्ञानेश्वर का तुम्ही आम्हीही भिंत चालवू शकतो.

बरेच अशिक्षित-अर्धशिक्षित मेक्सिकन वर्कर्स रोज "ड्राय वॉल्स" (शब्दशः भाषंतरः सुक्या भिंती) गाडीत घालून चालवत आणि नंतर डोक्यावरून वाहून या स्थळी घेऊन येतात. तेव्हा भिंत चालवण्यासाठी ज्ञानेश्वर असण्याची गरज नाही. आपले हे विचार वाचुन जिवन धन्य झाले.
आपण अशिक्षित-अर्धशिक्षित मेक्सिकन वर्कर्स
यान्चि तुलना ज्ञानेश्वरा बरोबर करुन (किवा ज्ञानेश्वराचि तुलना अशिक्षित-अर्धशिक्षित मेक्सिकन वर्कर्स बरोबर केलि काय , तसा कुठे फरक पडतो नाहि का?) खरोखर या वर्गाचा मान वाढवला आहे.

व्यक्तिगत रोखाचा मजकूर संपादित.

कदाचित चालवली असेलही.

मध्यंतरी ज्ञानेश्वरी वाचत होतो.. त्यात ज्ञानेश्वर महाराजानी असे लिहीले आहे की,(नक्की शब्द ओवीचे लक्षात नाहीत पण बघू शोधून मिळते का नेटावर) 'परमेश्वराशी एकरूप व्हावे म्हणजे त्याने निर्मिलेल्या सृष्टीशी आपोआपच तादात्म्य पावतो, हे तादत्म्य कसे असते? तर त्यामुळे मुंगीचेही मनोगत जाणता येते.' असो हे खरे का खोटे हे अनुभव नसल्याने माहीत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहीले आहे म्हणजे खरे असावे. त्यामुळेच भिंत चालवणे हे खरे वाटून जाते.

मिसळ मुंग्या आणि तादात्म्य.

परंतु मिसळपावात मुंग्या झालेल्या चटकन दिसतात, आणि मग दुसरा पदार्थ ऑर्डर करावा लागतो.

आवश्यक नाही. सृष्टीशी तादात्म्या पावले असाल तर मिसळीतल्या मुंग्या मिसळखाणार्‍याला त्रास देत नाहीत. आणि परत प्रत्येकाची निवड एखाद्याला तिखटजाळ तर्री पण आवडते आणि एखाद्याला गोड मिसळ(मिसळीला मुंग्या आल्या म्हणजे मिसळ गोड असली पाहीजे) पण पचत नाही...
तस्मात ज्ञानेश्वरा महाराजांचा मार्ग अवलंबावा सृष्टी तादात्म्य पावावे म्हणजे मिसळीतल्या मुंग्या दूर होतील आणि दुसरे पदार्थ ऑर्डर करावे लागणार नाहीत.

(गूढ शक्तीधारी)
सर्कीट मिराशी

मिसळपावात मुंग्या

खरोखरच आपले हे विचार जर ञानेश्वरानी वाचले आसते तर त्यान्च्या हि डोक्यातही मुंग्या आल्यावाचुन राहिले नसते.

कदाचित ञानेश्वराचा सृष्टीशी तादात्म्य पावण्याचा आभ्यास आपणा पेक्शा तसा कमिच म्हनावा लागेल. नाही तर त्यानि मुंग्या सकट ति मिसळ खाल्लि आसति. जाऊद्यात ना शेवटि वयाने आणि बुद्धिने ते नक्किच आपना सगळयापेक्शा लहान होते आसेच म्हनावे लागेल नाहि का?
आणि मिसळ पाव या सारख्या गुढ विषयाचा अभ्यास करायचा सोडुन ञानेश्वरानि आपले आयुष्य सृष्टीशी तादात्म्य साधन्यात घालवले हा काय आपला दोष आहे का? तरी ञानेश्वराहि पुढे जाऊन आपण आपलि लिला दाखवलित त्या बद्द्ल आपणास येथुनच लाखो प्रणाम . ( ते हि कदाचित आपणास कमी वाटतिल.)

निरागस शंका

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सचिन खुटवड यांनी प्रश्न विचारला आहे:
"ज्ञानेश्वरांनी खरेच भिंत चालवली असेल काय?"
त्यांनी हा प्रश्न नम्रपणे विचारला आहे. त्यांची ही प्रामाणिक शंका आहे. त्यांना उपक्रम सदस्यांच्या सुस्पष्ट उत्तराची अपेक्षा आहे,असे मला त्यांच्या लेखनावरून प्रतीत होते(जाणवते).
१ ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली.
२ ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली नाही.
या दोन विधांनांतील एक विधान निश्चितपणे सत्य आहे.तुम्हांला या दोन विधानांतील कोणते विधान सत्य वाटते ते तुम्ही सांगावे,आपल्या उत्तराच्या समर्थनार्थ काही स्पष्टीकरण द्यावे अशी त्यांची अपेक्षा आहे, असे मला वाटते.
माझे उत्तरः
*ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली नाही. असामान्य व्यक्तींविषयी अशा चमत्कारिक गोष्टी पसरविल्या जातात.जनसामान्यांना असे चमत्कार आवडतात. चमत्कार हा संत महात्म्यांच्या चरित्राचा अविभाज्य भाग मानला जातो. चमत्काराविना ते पूर्ण होत नाही.चमत्कार म्हणजे निसर्ग नियमाचे उल्लंघन. ते कोणीही करू शकत नाही.
*कोणतीही अचेतन वस्तू बाह्य बलाशिवाय आपल्या जागेवरून हालू शकत नाही हा निसर्गाचा नियम आहे.वैज्ञानिकांनी तो शोधून काढला आहे. आपला नित्याचा अनुभवही तसाच आहे. सर्व चराचर सृष्टी निसर्ग नियमांनुसारच चालते.त्या नियमांचे उल्लंघन कोणीही करू शकत नाही.
म्हणून ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली नाही असे माझे मत आहे.

तात्त्विक विरोध, प्रात्यक्षिक सहमती

चर्चा हलकीफुलकी असली तरी माझे पुढील मत गंभीर आहे.

कोणतीही अचेतन वस्तू बाह्य बलाशिवाय आपल्या जागेवरून हालू शकत नाही हा निसर्गाचा नियम आहे. वैज्ञानिकांनी तो शोधून काढला आहे.

"अचेतन" आणि "बाह्य बल" या तत्त्विक कल्पना फारच धूसर आहेत - त्यांच्या व्याख्या इतरेतराश्रयाच्या आहेत (इंग्रजी : डेफिनिशन बाय सर्क्युलर रीझनिंग)
"अचेतन" = बाह्य बलाशिवाय हलू न शकणारे पिंड
"बाह्य बल" = अचेतन पिंडाला हलवण्यासाठी आवश्यक शक्ती

वरील उद्धृत वाक्य निसर्गाचा नियम नाही, तर एक तत्त्वज्ञानातले गृहीतक आहे. ते वैज्ञानिकांनी शोधून काढलेले नाही, तर गेली हजारो वर्षे ते गृहीतक अधिकाधिक मर्यादित करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक करत आहेत. या गृहीतकाची कुठल्याही वैज्ञानिक शाखेसाठी तार्किक गरज नाही. सामान्य आयुष्यात घाईघाईने (पूर्ण विचार करण्यास वेळ नसता) निर्णय घ्यायचे असतील तर चेतन/अचेतन असे पिंडांचे वर्गीकरण आपण वापरतो. ही सवय असल्यामुळे काही वैज्ञानिक घाईघाईत व्यावसायिक बोलण्यातसुद्धा चेतन/अचेतन पिंडांचा उल्लेख करतात. त्यामुळे काही तो वैज्ञानिक शोध होत नाही.
- - -

अर्थात, हे विवेचन भिंत चालवण्याच्या प्रश्नाच्या मानाने खूपच मूलभूत आहे. पण विचार करावा : "भिंत चालवणे" हे काव्यात्मक असू शकते. (चेतन/अचेतन साठी काही निकष असले तर) कथेतली ही भिंत चेतन आहे की अचेतन?

भिंत चालवल्याची कथा एखादा कीर्तनकार मोठ्या रसाळपणे सांगतो. (हे छानच - याबद्दल मला वाईट वाटत नाही.) म्हणून ही कथा लोकसाहित्यात टिकली आहे, हरकत नाही, असे इतपत माझे मत आहे. हे उत्तर समर्पक आहे, की अवांतर हे चर्चाकाराने मला सांगावे.

पुढे चर्चाकाराने तपशील जर दिलेत, की "भिंत चालवणे" ही काव्यात्मक गोष्ट नाही, अमुक भिंत आधी इथे होती पण नंतर तिथे होती, वगैरे, वगैरे, तर तसा विचार करता येईल.

- - -
प्रात्यक्षिक सहमती :

यनावाला यांचा प्रात्यक्षिक रोख चमत्काराच्या गप्पांनी लोकांना लुबाडणार्‍या लोकांच्या विरुद्ध असावा, असे मला वाटते. लोकांनी स्वतःला कोणी लुबाडणार नाही असे वर्तन करावे, अशा प्रकारचे शिक्षण समाजात दिले जावे, याबाबत यनावाला यांच्या गर्भित अर्थाशी मी सहमत आहे.

चमत्कार

वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेसारख्या ग्रंथावर निरूपणात्मक ग्रंथ लिहीणे आणि सातशे वर्षांनंतर्ही त्या ग्रंथाची लोकप्रियता* तितकीच रहाणे हा माझ्या मते सर्वात मोठा चमत्कार आहे. हे केल्यानंतर भिंत, इमारत किंवा इतर कुठलीही वस्तू चालवली किंवा नाही याला काहीही महत्व उरत नाही.

*ज्ञानेश्वरीच्या प्रचंड यशातच तिच्या अपयशाच्या कक्षा सामावलेल्या आहेत. -- पुलं (गाळीव इतिहास)
----

प्रश्नाला बगल

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजेन्द्र यांचा प्रतिसाद:
"वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेसारख्या ग्रंथावर निरूपणात्मक ग्रंथ लिहीणे आणि सातशे वर्षांनंतर्ही त्या ग्रंथाची लोकप्रियता* तितकीच रहाणे हा माझ्या मते सर्वात मोठा चमत्कार आहे. हे केल्यानंतर भिंत, इमारत किंवा इतर कुठलीही वस्तू चालवली किंवा नाही याला काहीही महत्व उरत नाही."
हे शत प्रतिशत (१००%) मान्य आहे. माझेही मत असेच आहे.
पण श्री.खुटवड यांच्या शंकेचे हे उत्तर नव्हे. प्रतिसादात इतर आनुषंगिक गोष्टी अवश्य लिहाव्या पण मूळ विषयाला बगल देऊ नये.

असहमत

प्रतिसादात इतर आनुषंगिक गोष्टी अवश्य लिहाव्या पण मूळ विषयाला बगल देऊ नये.

माझ्या मते कुठल्याही चर्चेत हो किंवा नाही अशी दोनच उत्तरे दिल्यास त्या चर्चेमधून फारसे निष्पन्न होणार नाही. आणि असे करायचे असल्यास चर्चेऐवजी कौल घ्यावा. माझ्या मते हा प्रश्न महत्वाचा नाही आणि हे मत मांडणे म्हणजे बगल देणे होत नाही असे मला वाटते. प्रियालीने म्हटल्याप्रमाणे तरीही याच्यावर ज्यांना चर्चा करायची असेल त्यांना शुभेच्छा!

----

विपर्यास

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"माझ्या मते कुठल्याही चर्चेत हो किंवा नाही अशी दोनच उत्तरे दिल्यास त्या चर्चेमधून फारसे निष्पन्न होणार नाही."..राजेन्द्र.
हे मान्यच आहे. पण 'हो /नाही" एवढेच उत्तर द्यावे असे मी म्हटलेलेच नाही. मूळ शंका पाहा::ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली हे सत्य असेल काय?" या प्रश्नाचे तुमचे वैयक्तिक उत्तर(हो/नाही/सांगता येत नाही या पैकी ) देणे इष्ट नव्हे काय? प्रश्न कर्त्याची ती अपेक्षा आहे.बाकी विवरण स्पष्टीकरण ,विवेचन अवश्य करावे.त्यायोगे चर्चा पुढे जाते.

एक आठवण

थोडे विषयाला धरून थोडे अवांतरः

कदाचीत मी येथे आधीपण लिहीले असेल... आळंदीला एकदा गेलो असताना तेथे एक दगडी भिंत (कमी रूंदी असलेला चौथराच होता). त्यावर ज्ञानेश्वर भावंडे आणि वाघावर बसलेला चांगदेव वगैरेच्या मुर्ती पाहील्याचे पुसटसे आठवते. पण तेंव्हा स्थानीकांनी सांगितल्यप्रमाणे, त्या भिंतीच्या आत ज्ञानेश्वरांनी चालवलेली भिंत होती - किमान तशी लोकांची श्रद्धा होती. परीणामी ती भिंत अनेकजण तुकडा प्रसाद म्हणून खायला अथवा पूजेला घेऊन जायचे!

असो. बाकी वर प्रियालीने म्हणलेल्या: अशा भाकडकथांनी ज्ञानेश्वरांच्या कार्याला रेतीच्या कणाएवढीही क्षिती पोहचत नाही परंतु कार्य विसरून चमत्कारांवर विश्वास ठेवणार्‍यांचे जीवन सार्थकी लागो. या वाक्याशी सहमत.

अतिअवांतरः गुगल इमेजेस वर या भिंतीचा फोटो मिळतोय का म्हणून शोधत होतो. "ज्ञानेश्वर आणि वॉल" असे शब्द देऊन शोधायला लागलो तर दुसर्‍या का तिसर्‍या पानावर अचानक "जो लिबरमनचा" फोटो आला! एकदम गुढ वाटले :-)

अरे वा!

बर्‍याच काळाने पुन्हा ज्ञानेश्वरांवर चर्चा होतेय ;) :)

(भविष्यातील प्रतिक्रियांचा वेध घेण्याची आंतरीक शक्ती असलेला)ऋषिकेश

नाही

बर्‍याच काळाने पुन्हा ज्ञानेश्वरांवर चर्चा होतेय

नाही. चर्चा चमत्कारावर होते आहे. इथे ज्ञानेश्वरांऐवजी चांगदेवाने भिंत चालवली असती तर चर्चा चांगदेवावर झाली असती.

+ १

इथे ज्ञानेश्वरांऐवजी चांगदेवाने भिंत चालवली असती तर चर्चा चांगदेवावर झाली असती.

सहमत आहे.

----

:)

ज्ञानेश्वरांच्या वेळी मराठी संकेतस्थळे नव्हती म्हणूनच ते भिंत चालवू शकले का?

----

कुठून भिंत चालवली

असे वाटले असेल त्या ज्ञानेश्वरांना. :))

आता .. पुरे

ज्ञानेश्वरमहाराजांनंतर सातशे वर्षांनी योगीराज टगोजींनी ‘भिंत’ चालवून दाखविलेली असल्याने आता ही चर्चा बंद करण्यात यावी आणि अशी भिंत चालविता येते की नाही या बाबतीत निश्चित उत्तर मिळाल्याने या वादावर पडदा टाकण्यात यावा.
ज्ञानेश्वरमहाराजांच्या काळी छायाचित्रणाचा शोध लागलेला नसल्याने गेली सातशे वर्षे या विषयावर महाराष्ट्रात वादविवाद होत होते.
आता योगीराज टगोजींच्या भिंत चालविण्याच्या प्रात्यक्षिकाचे छायाचित्रण करण्यात यावे म्हणजे पुढची सातशे वर्षे तरी महाराष्ट्रात हा वाद पुन्हा निघायला नको.

(आपला.. कुणीच नसलेला) उपमन्यू

आपल्याला कारण.. !

ती कशातही मोडो अगर कशातही न मोडो, आपल्याला त्याच्याशी काय करायचे आहे ?
आपल्याला वाद घालायला निमित्त मिळाल्याशी कारण !

ही चर्चा भाषा, पर्यावरण, प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे, वैश्विक जाळे आणि राजकारण या सदरांत कशी मोडते हे कळले नाही. (विशेषतः राजकारण.)

का बरे ?
आपण चर्चाप्रस्ताव आणि त्याचे सदर, चर्चाप्रस्ताव आणि त्याचे प्रतिसाद यांचा संबंध कधीपासून मानायला लागलात ?

(आपल.. कुणीतरी) उपमन्यू

»

ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव

ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव ह्या दोन वेगळ्या व्यक्ती होत्या असे डॉ आंबेडकरांचे मत होते, असे वाचले होते (नक्की कुठे आणि कधी ते आठवत नाही).

हे जर खरे असेल आणि खरोखरच भिंतही चालवली गेली असेल ("भिंत" हा शब्द नव्हे!), तर ती नक्की कोणी? ज्ञानेश्वरांनी की ज्ञानदेवांनी?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ञानेश्वर

'ञानेश्वर' म्हणजे कोण हे कळल्यास प्रतिसाद देणे सोपे जाईल असे वाटते.
उत्साहाच्या भरात उपक्रमींची प्रतिसाद देताना काहीतरी गफलत झालेली दिसते.

 
^ वर