केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. ही चाळ विकत घेणार्‍या तुळजाभवानी डेव्हलपर्सने गणेशोत्सवासाठी स्वेच्छेने देऊ केलेली १५ हजार चौरस फूट जागा या चाळीच्या जागेची पूर्वी मालकी असलेल्या हाजी इस्माईल ट्रस्टने मदरसा आणि मशीद बांधण्यासाठी परत मागितली आहे.
या जागेचा गणेशोत्सवासाठी वापर करण्यास विरोध करत या ट्रस्टने न्यायालयात दावा दाखल केला आहे. तुळजाभवानी
डेव्हलपर्सने काही दिवसांपूर्वी केशवजी नाईकांच्या चाळीची स्थावर मालमत्ता धर्मादाय आयुक्‍तांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात सर्वाधिक बोली लावून विकत घेतली. ही मालमत्ता या जागेची मालकी असलेल्या हाजी इस्माईल ट्रस्टकडून विकत घेण्यात आली. केशवजी नाईकांच्या चाळीला गौरवशाली इतिहास आहे. ``हा इतिहास जपला गेला पाहिजे आणि त्यासाठी गणेशोत्सव मंडळास विकासकाने जागा दिली पाहिजे.''हा आदेश लिलावाच्या प्रसंगी धर्मादाय आयुक्‍तांनी दिला होता, अशी माहिती तुळजाभवानी डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संदेश यंदे यांनी दिली.
धर्मादाय आयुक्‍तांच्या आदेशानुसार तुळजाभवानी डेव्हलपर्सने गणेशोत्सव मंडळाला १५ हजार चौरस फूट जागा देऊ केली; परंतु हाजी इस्माईल ट्रस्टने त्यास विरोध केला. न्यायालयात दावा दाखल करून ही जागा या ट्रस्टने स्वत:साठी मागितली. ट्रस्टला तिथे मशीद व मदरसा उभारायचा आहे, असे श्री. यंदे सांगतात. ``तुळजाभवानी डेव्हलपर्सच्या वतीने अँड्. वर्षा पालव या न्यायालयात बाजू
मांडत आहेत. गणेशोत्सवाच्या स्थापनेसंबंधीचे पुरावे त्यांनी छायाचित्रांसहित न्यायालयात सादर केले आहेत'', असेही श्री. यंदे यांनी सांगितले.
लोकमान्य टिळकांनी हिंदुजागृतीचे स्फुल्लिंग सर्वप्रथम चेतवले ती केशवजी नाईक चाळ हा इतिहासातील महत्त्वाचा ठेवा आहे. जर मुसलमानांच्या शंभर वर्षांच्या मशिदीची जोपासना पुरातत्व खाते करते. तर मग ही इतिहासकालीन वास्तू का जोपासली जाऊ शकत नाही ? हिंदूंनो, केशवजी नाईक चाळीचा ऐतिहासिक वारसा जतन करावा, यासाठी सरकारकडे आग्रह धरा !

Comments

केशव

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।
सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति॥

-- आजानुकर्ण

चांगले नाही

हे नक्कीच चांगले नाही. आपल्याकडे ऐतिहासीक वारसा जतन करण्याचे कायदे कसे आहेत आणि ते कसे आमलात आणले जातात याबद्दल माहीती नाही. पण त्यासंदर्भात याचा न्यायालयात उहापोह होणे महत्वाचे वाटते.

बाकी ही बातमी प्रमुख वर्तमानपत्रात आली नसली तरी आश्चर्य वाटायला नको पण सामना, ऑर्गनाझर, विवेक आदींनी या बद्दल लिहीले आहे का, ह्याची माहीती करून घ्यायला आवडेल.

धन्यवाद.

अवांतर: मुंबईतला पहीला सार्वजनीक गणेशोत्सव म्हणून या चाळीची माहीती असलेले हे संकेतस्थळ मिळाले.

ईश्वर

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

फरक

आपण दिलेल्या चित्रफितीतून देव एकच आहे वगैरे समजते तेच "केशवं प्रतिगच्छती" मुळे ही.

पण या घटनेचा संबंध हा सुरवातीस ऐतिहासीक वारसा म्हणून होता. टाइम्स ऑफ इंडीयातील वृत्तातील खालील भाग पहा:

...While acknowledging that it was a historic building, the charity commissioner has allowed the sale on condition that the developers set aside 15,000 square feet and build a community hall for the Ganeshotsav tradition to continue....

इतके स्पष्ट लिहीलेले असताना जर कोणी त्याविरूद्ध धर्म मधे आणून तेढ तयार करत असेल तर ते अयोग्य आहे. त्यातही विचार करा की हेच जर उलटे झाले असते, म्हणजे हिंदूंनी असला काही चावटपणा केला असता तर आपण इतर कुठल्याही धर्मीयांना "अल्ला तेरो नाम ..." असला उपदेश करायला जाऊ का आणि ते ऐकतील का? जेंव्हा आपण बहुसंख्य आहेत म्हणून हिंदूंना "टेकन फॉर ग्रँटेड" करतो तेंव्हा आपण न कळत सामाजीक तेढ वाढवतो. त्या पेक्षा जे काय कायद्याने आहे ते सर्व धर्मीयांना मानायला लावणे यात चू़क तर नाहीच पण सामाजीक स्वास्थ्याची बीजे असतात असे म्हणावेसे वाटते.

अवांतर: आमच्या अमेरीकन गावातील कुठलीसे छोटे ग्रंथालय. त्याला "ऐतिहासीक वास्तूचा दर्जा" हा स्थानीक हिस्टॉरीकल कमिशनने दिला होता. त्यावर छपरावर सोलर पॅनेल बसवायचे आहे तरी पण त्याला कुरकुर...का कारण ती ऐतिहासीक इमारत आहे त्यामुळे तिचे दिसणे कुठेच बदलता कामा नये... हाच प्रकार बाजूच्या बॉस्टन मधे सत्ताकेंद्र असलेल्या बिकन हिल वर अजून मिणमिणते दिवे आणि तीच घरे (आतून बदलली तरी).. तीच गोष्ट आजूबाजूंच्या गावातील खाजगी घरासंदर्भात - जर कधी कोणी मोठी व्यक्ती राहीली असली तर त्याचे नाव आणि वर्ष लिहून बाहेरून (खाजगी असले तरी) घर तसेच दिसणार.

आपण मात्र काहीच इतिहास जपायला तयार नाही. आपल्याला माहीत असेलच की जे इतिहास जपत नाहीत ते इतिहास तयार करत नाहीत फक्त कालांतराने त्यांच्या पुढील पिढ्या त्यांच्याच पुर्वजांच्या त्याच चुका परत करतात.

मान्य

विकासराव,
आपले सर्व मुद्दे मान्य आहेत. माझा रोख एकच अजेंडा ठेउन एकाच प्रकारचे लेख लिहीण्यावर होता. अशाने एखादे वेळेस खरी समस्या असेल तरी त्याकडे दुर्लक्ष होण्याचा संभव असतो.

----
"काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच." -- मास्तर, सामना चित्रपटात.

मानताय तर

अच्छा ऍटलास्ट खरी 'समश्या' आहे असे मानतातय तर...?

आपला
गुंडोपंत

ऐतिहासिक वास्तुचे खरेच प्रेम का?

हे ऐतिहासिक वास्तुचे खरेच प्रेम आहे कि मस्जिदिला विरोध करण्या साठी जनक्षोभाचे हत्यार? किती आणि काय काय जतन करणार? असा व्यावहारिक प्रश्न उद्भवत नाही का? पण असा प्रश्न उपस्थित केला कि मुस्लिम अनुनय म्हणायला मोकळे. गडांचे जतन करणे पुरातत्व खात्याला अत्यंत कठीण जाते. तिथे का नाही आग्रह धरीत. मुंबईतल्या जागेला भाव आहे ना?
वर्तमान समस्या अधिक महत्वाच्या नाहीत काय?
प्रकाश घाटपांडे

संपूर्ण सहमत

गडांचे जतन करणे पुरातत्व खात्याला अत्यंत कठीण जाते. तिथे का नाही आग्रह धरीत. मुंबईतल्या जागेला भाव आहे ना?

मुस्लिमांचा अनुनय करण्याचा भाग नाही पण प्रत्येक लेख एका अजेंड्याने लिहिला जातोय ते कधीही अयोग्य आहे. दुसरी गोष्ट, ही जागा कोणी बळजबरीने हिसकावून घेतलेली नाही. विकत घेतलेल्या जागेवर कायदेशीररीत्या काय करावे हा त्या मालकाचा प्रश्न आहे आणि त्याला विरोध करणारेही कायदेशीररीत्याच त्याचा पाठपुरावा करत आहेत. आणि त्याही पुढची गोष्ट ही की सदर लेखक निदान माझ्या विश्वासाला पात्र नाही. सदर चाळीबद्दल इतके प्रेम असेल तर राजांचे गड तर आपले होते ना, राजांनी स्वतः अनेक क्षेत्रांचा जीर्णोद्धार केला.... त्यातील अनेक देवस्थाने, गड, किल्ले, लेणी यांची पडझड झाली आहे. त्यांच्यावर प्रेम दाखवा. तिथे येऊन दगडांवर आपली नावे कोरणार्‍या, गडांचे दगड फोडून आपल्या घरांच्या भिंतींना लावणार्‍या महाभागांना रोखा. त्यातले ९०% हिंदू असावेत अशी कल्पना आहे.

असहमत

सर्वप्रथम प्रस्तुत लेखकाचे केवळ हिंदू-मुस्लीम विषयावरील लिखाण हे मला पण पटले नव्हते आणि पटत नाही. म्हणूनच त्यांना मी देखील आधीच्या चर्चेत त्यांना "आपण जे आल्यापासून लिहीत आहात त्याचा झाला तर तोटाच होईल,कुणालाच फायदा होणार नाही, याचा कुठेतरी आपण विचार करावा असे वाटते," असे म्हणून समजवण्याचा प्रयत्न केला होता. आजही मला त्यांचे इतर लिखाण पटलेले नाही. या विषयावर मी जरी लिहीले असते तरी माझा प्रामाणिक टोन हा हिंदू-मुस्लीम असा नसता याची खात्री असावी. कारण हे मुद्दे धर्मापपेक्षा कायद्यासमोर सर्व समान म्हणून असावेत असे वाटते. आज मी अमेरिकेत अल्पसंख्याक आहे म्हणून माझे कुठेले लाड चालू दिले जातात? तेच सर्वत्र असावे असे वाटते. म्हणून जर त्यांचे (तांब्यांचे) आणि कुणाचेही लेखन वाचताना, विशेष करून चर्चात्मक लेखन वाचताना, "दूध का दूध और पानी का पानी" अर्थात नीर-क्षीर नजरेने वाचावे असे वाटते.

आता केवळ हा लेख/चर्चा त्याच लेखकाची आहे म्हणून त्या चर्चेतील मुद्दा न मानणे ह्याने आपल्यासारख्या व्यक्ती हा अल्पसंख्य-बहुसंख्य अशा विषारी चष्म्यातून भारतीयाला वेगवेगळ्या दृष्टीतून पहाता असा गैरसमज होवू शकतो आणि म्हणूनच जसे मी त्यांना म्हणालो तेच आपल्यालाही (थोडेसे बदलून) म्हणावेसे वाटते की," अशा प्रतिवादाने झालाच तर तोटा होईल,कुणालाच फायदा होणार नाही, याचा कुठेतरी आपण विचार करावा असे वाटते."

माझा विरोध मश्जिदीला नाही तर न्यायाला विरोध करण्याला आहे. वर सांगीतल्याप्रमाणे, "...While acknowledging that it was a historic building, the charity commissioner has allowed the sale on condition that the developers set aside 15,000 square feet and build a community hall for the Ganeshotsav tradition to continue...." असा वृतांत आहे, जर तो केवळ धर्माच्या नावावर अल्पसंख्य पाळणार नसले आणि त्याला केवळ आपल्यासारखे तांब्यांचे बाकीचे लिहीणे पटले नाही म्हणून वाद घालणार असले तर आपण कायदा-न्याय व्यवस्था पण मानत नाही आहात आणि गरज नसलेली फूट पण तयार करताहात असे वाटते.

गडांचे जतन करणे पुरातत्व खात्याला अत्यंत कठीण जाते. तिथे का नाही आग्रह धरीत.

हे असले लिहीणे म्हणजे समाजवादी पद्धतीने विषयांतर करण्यासारखे आहे. येथे पुरातत्व खात्याने काही करायचा प्रश्न नाही आहे तर ज्या डेव्हलपर ने जागा डेव्हलप करायला घेतली आहे त्याने ती जागा सार्वजनी़क गणेशोत्सवाला देयची आहे. ती देयला तो बिल्डर/डेव्हलपर तयार आहे. तेंव्हा उगाच, आंब्यांची तुलना पेरूशी (मूळ वाक्प्रचारः comparing apple to orrange) करून आपण वाचकांची दिशाभूल करत आहात असे नाही का वाटत?

हा प्रश्न केवळ उपक्रमावर एका चर्चेत काय लिहीतो आणि कसे लिहीतो या संबंधातील नाही तर व्यावहारीक जगाशी संबंधीत पण आहे. आज पर्यंत एकाचे लांगूलचालन करून आधीच्या पिढीने त्याला प्रतिक्रीयात देणार्‍या शक्ती तयार करायला मदत केली आता ह्या क्रिया-प्रतिक्रीयेच्या खेळात आपण समाज, देश आणि कायद्याचे राज्य म्हणून समानता पाळणे विसरत आहोत आणि त्याचा विचार व्हावा असे वाटते.

फक्त एकच गोष्ट, ज्या बाबतीत मी साशंक आहे: या चर्चेसाठी पण लेखकाने काही संदर्भ दिलेला नाही आणि जेंव्हा, "बाकी ही बातमी प्रमुख वर्तमानपत्रात आली नसली तरी आश्चर्य वाटायला नको पण सामना, ऑर्गनाझर, विवेक आदींनी या बद्दल लिहीले आहे का, ह्याची माहीती करून घ्यायला आवडेल," असे म्हणले तेंव्हा आणि बाकीपण त्यांच्याकडून काही उत्तर मिळालेले नाही. म्हणून लेखकाने हिंदू देवतांप्रमाणे "आकाशवाणी" करून अंतर्धान न पावता या चर्चेत हिंदू ॠषीमुनींनी ज्या प्रमाणे उपनिषदे तयार करताना प्रश्नोत्तरांच्या रुपाने भाग घेतला, तसा किमान स्वतः चालू केलेल्या चर्चेत सातत्याने भाग घेतला तर त्यांच्या लेखनाला आणि तळमळीला नैतिक आधार मिळेल असे वाटते.

अमेरिकेत अल्पसंख्यांकांचे लाड

आज मी अमेरिकेत अल्पसंख्याक आहे म्हणून माझे कुठेले लाड चालू दिले जातात?

अमेरिका ज्यांना अल्पसंख्यांक गणते त्यांचे बरेच ठीकाणी व्यवस्थित लाड चालतात हा माझा स्वानुभव आहे. राहीली गोष्ट भारतीय अमेरिकेत अल्पसंख्यांक गणले जातात का? तर सध्यातरी ते अदृश्य वर्गात गणले जात असावेत असे वाटते आणि अजून ५० वर्षांनी ही परिस्थिती बदलेल अशी आशा वाटते.

असो, विषयांतराबद्दल क्षमस्व!

गडांचे जतन करणे पुरातत्व खात्याला अत्यंत कठीण जाते. तिथे का नाही आग्रह धरीत.

हे असले लिहीणे म्हणजे समाजवादी पद्धतीने विषयांतर करण्यासारखे आहे. येथे पुरातत्व खात्याने काही करायचा प्रश्न नाही आहे तर ज्या डेव्हलपर ने जागा डेव्हलप करायला घेतली आहे त्याने ती जागा सार्वजनी़क गणेशोत्सवाला देयची आहे.

वरील विधान घाटपांड्यांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणून आले असले तरी माझे मत लिहिते. ज्याप्रमाणे पुरातत्त्व खाते काही करावे किंवा न करावे पाहते त्याच प्रमाणे येथे डेवलपर, वकिल, न्यायालय ते पाहण्यास समर्थ असावेत. प्रश्न उद्भवतो तो लेखकाच्या आवाहनाचा.

तर मग ही इतिहासकालीन वास्तू का जोपासली जाऊ शकत नाही ? हिंदूंनो, केशवजी नाईक चाळीचा ऐतिहासिक वारसा जतन करावा, यासाठी सरकारकडे आग्रह धरा !

हे आवाहन सरसकट सर्वांना असते(मुसलमान आणि ख्रिश्चनांतही खुला दृष्टीकोण ठेवणारे अनेक पाहिले आहेत), केवळ न्यायाच्या अंमलबजावणीत केलेली नसती उठाठेव म्हणून आले असते तर गैर नसते परंतु लेखकाचा पूर्वसूर पाहता येथे शंकेस जागा आहे. जर या प्रसंगात लोकांनी पडून दबाव आणण्याचे आवाहन होत आहे तर इतर पुरातन ऐतिहासिक गोष्टींना का नसावे?

लेखकाचे आवाहन

वरील विधान घाटपांड्यांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद म्हणून आले असले तरी माझे मत लिहिते. ज्याप्रमाणे पुरातत्त्व खाते काही करावे किंवा न करावे पाहते त्याच प्रमाणे येथे डेवलपर, वकिल, न्यायालय ते पाहण्यास समर्थ असावेत. प्रश्न उद्भवतो तो लेखकाच्या आवाहनाचा.

लेखकाच्या आवाहनाची भाषा ही मला पण न पटणारीच आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. म्हणूनच मी आधीच्या प्रतिसादात म्हणले होते की, "या विषयावर मी जरी लिहीले असते तरी माझा प्रामाणिक टोन हा हिंदू-मुस्लीम असा नसता याची खात्री असावी. कारण हे मुद्दे धर्मापपेक्षा कायद्यासमोर सर्व समान म्हणून असावेत असे वाटते." तेंव्हा त्याबाबतीत उपक्रमाच्या"बहुसंख्यांचे" एकमतच आहे असे वाटते :)

माझे असहमतीचे कारण हे प्रकाशरावांचे, "ऐतिहासिक वास्तुचे खरेच प्रेम का?" ह्या संदर्भात आणि गडांचे जतन करणे हा विषय यांचे जे मिश्रण केले ते होते आणि ते उगाच दिशाभूल करणारे वाटले. शिवाय हा मुद्दा सार्वजनीक गणेशोत्सवासंदर्भात आणि ऐतिहासि़क जतन करण्या संदर्भात असल्याने तो केवळ डेव्हलपर आणि न्यायाधिश यांच्यापुरता मर्यादीत नाही असे म्हणावेसे वाटते, विशेषतः जेंव्हा त्याला विरोध होतो तेंव्हा. बर्‍याचदा जसे म्हणले जाते की देशात इतकी गरीबी असताना, आपल्याला अवकाशसंशोधनाची गरज काय? चंद्रयानाची गरज काय? अणूशक्तीची गरज काय? वगैरे तसाच हा प्रकार वाटला.

परंतु लेखकाचा पूर्वसूर पाहता येथे शंकेस जागा आहे.
अर्थातच जागा आहे! त्याबाबत दुमत नक्कीच नाही. पण असले आकरस्ताळी विचार जर कुणाच्या डोक्यात येऊ नये असे वाटत असेल तर आपल्या (म्हणजे सर्वांच्या) विधानातून आणि विचारातून सर्वांना समान लेखलेले दिसणे आणि तशी चांगल्यासाठी सवय लावंणे महत्वाचे वाटते.

अवांतरः अमेरिकेत जे अल्पसंख्यांकांचे लाड दिसतात ते कायद्याचा बडगा दाखवण्याची वेळ आली अथवा त्यांच्या सुरक्षेचा/अस्तित्वाच्या प्रश्न होतो तेंव्हा होत नाहीत. त्यात गोरा, काळा, नेटीव्ह, आणि कुठलाही धर्मीय समानच धरला जातो. त्यामुळे उगाच कोणी जास्त आगाऊपणा आणि आगखाऊपणा करताना दिसत नाही. उदाहरणे बरीच देता येतील पण जाता जाता दोनच सांगतो: ९/११ नंतर ज्या प्रकारे अतिरेक करून गोंटामो बे क्युबा मधे अल्पसंख्यांकांना अडकवले गेले आहे ते पाहीले तर ते स्प्रूहणीय नाही हे कळतेच पण त्यात लाड नसणे हे समजते. गेल्या दशकात (मला वाटते १९९५ मधे) ओक्लाहोमा सिटीमधे टिमोटी मॅग्वे ह्या गोर्‍या धर्मांध - अतिरेकी विचारसरणीच्या माणसाने बाँब उडवले अनेक निष्पाप मारले गेले. सर्व प्रथम हे मुसलमानाचे काम समजून एक इराणी का सिरीयन माणूस जो आपल्या घरी आईसाठी व्हीडिओ केबल्स (तत्सम) घेउन जात होता त्याला लंडनमधे अतिरेकी म्हणून (त्या केबल्समुळे )अटक करून परत आणले - तमाशा केला - नाकावर आपटल्यावर माफी मागून सोडलेच आणि टिमोटी मॅग्वेला नंतर लिथल इंजेक्शन् देऊन देहदंड ही दिला. थोडक्यात कायद्यासमोर सर्व समान. कॉल स्पेड अ स्पेड - बी इट हिंदू ऑर मुस्लीम ऑर एनीवन एल्स, बट नॉट सिलेक्टीव्हली...

नवीन विषय

बर्‍याचदा जसे म्हणले जाते की देशात इतकी गरीबी असताना, आपल्याला अवकाशसंशोधनाची गरज काय? चंद्रयानाची गरज काय? अणूशक्तीची गरज काय? वगैरे तसाच हा प्रकार वाटला.

हा एक नवीन विषय होउ शकतो. कारण नेहरुंच्या काळा पासून हा विषय वादग्रस्त आहे. गरिबी हटल्याशिवाय हा विषय घऊ नये हे मत व्यवहार्य नाही. पण आज भारतातील दारिद्र्य व विषमता पाहिली की आपले जगणेच अपराधीपणाचे वाटायला लागते. विषमता ही असणारच आहे. पण किती असावी? याचे तारतम्य बाळगताना विवेकाची भंबेरी उडते.
प्रकाश घाटपांडे

सहमत !!!!

सर्वप्रथम प्रस्तुत लेखकाचे केवळ हिंदू-मुस्लीम विषयावरील लिखाण हे मला पण पटले नव्हते आणि पटत नाही.

त्यामुळेच अशा चर्चेत आम्ही आमचा सहभाग टाळला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहो काय सर?

अहो काय सर?
मग कोणत्या विषयावर लिहायचे बरं?
दौलताबादचा किल्ला कश्यामुळे पडला यावर?
का शिवाजीचा जन्म कसा चुकीचा होता व्हायलाच नको होता यावर?

आपला
गुंडोपंत

मुस्लीमांच्या विरोधात किती खरडणार ?

पंत, आपण सुचवलेले दोन्हीही विषय चांगले आहेत. त्यावर चर्चा करण्यास वाव आहे.
असो, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी वादग्रस्त आहेत.
तिथे आपण हिंदु ,मुस्लीम करत बसतो. खरे तर इतिहासात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदल होतांना प्रत्येकाने इथे आपली अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मग ती मशीद असेल किंवा मंदीर, पुस्तके किंवा शिलालेख, तेव्हा ते उकरुन मला नाही वाटत काही सामाजिक बदल होऊ शकतील. फार तर इतिहासाची पुनर्मांडणी होण्यास मदत होईल.....पण अशा चर्चेने हे प्रचाराचे व्यासपीठ होऊ नये असे वाटले म्हणुन तसे लिहिले........!!! बाकी चर्चा सुंदर चालू आहे ,इतरांप्रमाणे लिहिण्यापेक्षा आम्हाला ते वाचण्यात अधिक रस आहे !!

पंताचा स्नेही.....!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

हा भाग मान्य!

चर्चेने हे प्रचाराचे व्यासपीठ होऊ नये असे वाटले म्हणुन तसे लिहिले'

हे अगदी मान्य!

(अवांतरः प्रतिसाद ३ शब्दातच दिला हो! समजला नाही तर कळवा, पाठवतो मग!)

समस्या वर्तमानच आहे

ही समस्या वर्तमानच आहे असा माझा समज आहे.
अजून मशीद तयार झाली नाहीये... समस्येचा भूतकाळ व्हायला....
अजून त्यामूळे 'इस्लाम खतरेमे' जायचाय हो...

आपला
गुंडोपंत

अरे चोरांनो

अरे चोरांनो,
इतके मदरसे कमी म्हनून आता इथे पण बांधता काय.
जा की तिकडेच पाकिस्तानात नाय तर हफ्घानिस्तानात जावून र्‍हावा मग.

हां! भाइजान जाते हुवे वो इटलीच्या राजिंदरा कोबी घेवून जा बर्का!
लई कामाला येईल तुमाले तो वकील म्हनून्!

आपला
गुंडोपंत

तांबेसाहेब

केशवजी नाईक चाळीचा ऐतिहासिक वारसा जतन करावा, यासाठी सरकारकडे आग्रह धरा !

आहो पण कसा धरायचा हा आग्रह? असा कधीही कुठेही धरायला तो काय कासोटा आहे का?

आग्रह धरायचा म्हणजे काय करायचे हे तर दिलेच नाही?

आम्ही उगाच चार्ज झालो ना?

आपला
गुंडोपंत

जाउ द्या

जाउ द्या तांबे साहेब!
त्याच त्याच लिखाणाचा नि विषयाचा आम्हालाही कंटाळा आला आता...
तुमच्या अशा लेखनाने पार निराशा येते आम्हाला...

काही तरी वेगळे चांगले लिहा बरं. आमचे बिरुटेसरही वैतागले आहेत आता.

आपला
विषयातला तोच तो पणा पाहून निराश झालेला
गुंडोपंत

बरे दिसतेय् सगळे,

बरेच दिवस झाले बघतोय, तुमच्या गप्पा, तुमचे विषय आणि एकन्दर वातावरण बरे दिसतेय् म्हणून मैदानात उतरायचा विचार करतोय्. या चर्चेत उशिरा आल्याने सहभाग घेत नाहीये कारण असाही कढीला एक ऊत येऊन गेल्यासारखे दिसते.

पुढे बघुया,

आपलाच,
कुम्पणस्थ

 
^ वर