महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?
सर्व घटना पाहता दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे.

Comments

नमस्कार

उपक्रमावर चर्चाविषय सुरु करताना १-२ वाक्यांत लिहिण्यापेक्षा आपले म्हणणे सविस्तर लिहिलेत तर सर्वांना चर्चाप्रस्ताव कळून येईल. याचबरोबर आपल्याला नेमकी कशाविषयी चर्चा हवी आहे हे सांगितलेत तर त्याचाही फायदा सदस्यांना होईल. तेव्हा-

ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?
सर्व घटना पाहता दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे.

ही वाक्ये विशद करून नेमके काय म्हणायचे आहे आणि चर्चा कशी अपेक्षित आहे ते सांगावे.

चर्चाप्रस्ताव

दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर का नाही मानला गेला याच एका विषयावर चर्चा अपेक्षित आहे.

ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

दुर्योधनाने एका देशाचे राज्य कर्णाला दान दिले म्हणुन त्यापेक्षा जास्त दान करण्याचा त्याचा स्वभाव बनला,
या व अशा सर्व घटना पाहता दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे.
कारण दुर्योधनाचे कुळ पुढील प्रमाणे आहे.
१)मनु>
२)पुरुरवा>
३)नहुष>
४)यायती>
५)यदु>
६)पुरु>
७)जनमेजय>
८)अह्याती>
९)देवतिथी>
१०)दुष्यन्त>
११)भरत>
१२)हस्ति>
१३)अजमीठ>
१४)कुरु>
१५)विदुरथ>
१६)अनश्वन>
१७)परीक्षित>
१८)भीमसेन>
१९)परीक्शवस>
२०)शन्तनु>
२१)विचित्रवीर्य>
२२)ध्रतराष्ट>
२३)दुर्योधन>.......
....................... आता बोला.

कळले नाही.

या व अशा सर्व घटना पाहता दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे.
कारण दुर्योधनाचे कुळ पुढील प्रमाणे आहे.

कर्णाला राज्य दान करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्या घटनांमध्ये दुर्योधनाचा दानशूरपणा दिसतो?

दुर्योधन दानवीर असण्याचा आणि दुर्योधनाच्या कुळाचा आपापसातील संबंध कळला नाही. अधिक विस्तार करावा.

संबंध

दानशूरपणा व कुळाचा आपापसातील संबंध खुप जवळचा आहे.

कसा?

दानशूरपणा व कुळाचा आपापसातील संबंध जवळचा कसा ते समजावून सांगा ना. उत्सुकता वाटली. दानशूरपणा हा जनुकीय संबंध वगैरे तर नाही?

१००% सहमत

ज्याचा ८ वा पूर्वज अह्याती आहे , त्याहून दानशूर कोण बरे असणार ?

वरील प्रतिसाद ज्याचा १३ वा पूर्वज अजमीठ आहे , त्याहून दानशूर कोण बरे असणार ? असा सुद्धा वाचू शकता .

दुर्योधन

दुर्योधनाचे कुळ देऊन काय उपयोग. आपला प्रस्ताव कशावर आहे कुळावर का त्याच्या दानशुरते बद्दल.

http://rashtravrat.blogspot.com

१ - २३ : शक्यता

१-२३ मधे एकही नाव रिपीट झाले नाही आहे. वाह.

पण नाव रिपीट होणार नाही याची शक्यता कशी काढाल ?

म्हणजे तुमचे नाव व तुम्हच्या जेनेरेशनच्या २३ व्या बालकाचे नाव सेम नसेल याची शक्यता कीती ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

कर्णाचे पैतृक कुल

पारंपरिक कथेत सांगतात तितपत बघता कर्णाच्या पैतृक कुळाची लांबी फार तोकडी आहे.

०) अदिति (ही आई, बाप कोण?, म्हणून ओळ क्रमांक ० आहे)>
१) सूर्य >
२) कर्ण

दुर्योधनाच्या बाबतीत यादीची लांबी २३ ओळी आहे, हे श्री. समतादर्शन यांनी वर दाखवलेच आहे. जर पैतृक कुळाच्या यादीच्या लांबीचा आणि दानशूरपणाचा आपापसातील संबंध खूप जवळचा असेल, संबंध व्यक्त नसून थेट असेल, तर
दुर्योधनाची दानशूरता : कर्णाची दानशूरता
~= २३:२
~= साडेअकरा पट
कर्णाच्या यादीतल्या अदितीलाही धरले तर २३:३ ~= फक्त ७.६७पट दानशूर

- - -

तसे बघायला गेले तर कर्णाला पहिले दान दिले ते सूर्याने आणि कुंतीने. (दिव्य कवचकुंडले आणि जीव यांची किंमत कदाचित अंगदेशापेक्षा अधिक असावी.) तेव्हापासून त्या दोहोंपेक्षा अधिक दान द्यायची स्पर्धा कर्णाने लावली असेल.

- - -

श्री. समतादर्शन यांनी हे सगळे थोडे हलकेच घ्यावे. दुर्योधनाच्या दानशूरतेबद्दल फारशा कथा सांगितल्या जात नाहीत. आवडत्या चाकराला अंगदेशासारख्या जहागिरी देण्याची त्या काळात सम्राटांची पद्धतही असू शकेल. पण जर श्री. समतादर्शन यांना दुर्योधनाच्या दानशूरपणाबद्दलच्या अप्रसिद्ध आख्यायिका माहीत असतील, तर त्यांनी त्या येथे जरूर द्याव्या. वाचकांना त्याअनुषंगाने नवी माहिती मिळेल, आणि कदाचित महाभारतकथेकडे बघायची नवी दृष्टीसुद्धा मिळेल.

उपक्रमावर त्यांचे स्वागत आहे. खेळीमेळीने विनोद पचवत त्यांनी माहिती देत जावे, ही विनंती.

२३:२ :-(

२३:२

कर्णाच्या पैतृक कुळाची लांबी लहान आहे हे खरेच पण "२" हा कर्णावर अन्याय झाला. त्याचे पैतृक कुळ थोडे अधिक वाढवू.

१. ब्रह्मदेव
२. मरिची (ब्रह्माचा पुत्र किंवा मानसपुत्र)
३. कश्यप (याची बायको अदिती)
४. सूर्य
५. कर्ण

आवडत्या चाकराला अंगदेशासारख्या जहागिरी देण्याची त्या काळात सम्राटांची पद्धतही असू शकेल.

आवडत्या चाकराला नाही. :-) कर्णाचे वडिल कुरुंचे नोकर होते पण कर्ण नसावा. दुर्योधनाने इतके उदार होण्याचे कारण सोपे होते. अर्जुनाला च्यालेंज करू शकेल असा कर्ण आहे हे स्पर्धेत स्पष्ट झाले. अर्जुनाच्या तोडीचा वीर कौरवांकडे नव्हता, तो त्यांना हवा होता. अंगदेश दिल्याने कर्ण मिंधा झाला. दुर्योधनासोबत राहिला. यात दान कसले? हे तर चांगले राजकारण आहे. :-) चांगली देव-घेव आहे.

श्री. समतादर्शन यांना दुर्योधनाच्या दानशूरपणाबद्दलच्या अप्रसिद्ध आख्यायिका माहीत असतील, तर त्यांनी त्या येथे जरूर द्याव्या. वाचकांना त्याअनुषंगाने नवी माहिती मिळेल, आणि कदाचित महाभारतकथेकडे बघायची नवी दृष्टीसुद्धा मिळेल.

उपक्रमावर त्यांचे स्वागत आहे. खेळीमेळीने विनोद पचवत त्यांनी माहिती देत जावे, ही विनंती.

सहमत आहे.

ब्रह्मदेव नॉट फेअर

तर मग ब्रह्मदेव हा दुर्योधनाच्या वंशाच्या सुरुवातीला पण यायलाच पायजेल.

आणि ठराविक कालमर्यादा घेतली तर प्रत्येक
थोरल्या मुलाच्या->थोरल्या मुलाच्या->->->->->थोरल्या मुलाची पितर-संख्या
ही अधिक आणि
धाकट्या मुलाच्या->धाकट्या मुलाच्या->->धाकट्या मुलाची पितरसंख्या
ही कमी येईल.
मग राजाच्या थोरल्या मुलांनी अधिक दानशूर होऊन राज्य धाकट्या भावाला दान केलेच पाहिजे. (बहिणीला दान केले तरी चालेल. त्यापेक्षा राजघराण्याबाहेरील कोणाला दान करावे.) दानशूर असूनही थोरल्या वंशजानेच राज्य करायचे म्हणजे दोघांवर एकदम अन्याव व्हतो - थोरल्याच्या दानशूरपणावर मर्यादा येते, आणि धाकट्याच्या राज्यभोगांवर मर्यादा येते.

- - -
माझ्या वरील प्रतिसादासाठी शुद्धिपत्र : "... संबंध व्यक्त नसून..." ऐवजी "...संबंध व्यस्त नसून..." असे वाचावे.

मान्य ;-)

तर मग ब्रह्मदेव हा दुर्योधनाच्या वंशाच्या सुरुवातीला पण यायलाच पायजेल.

मान्य. (ब्रह्मदेव, मरिची, कश्यप,विवस्वान[म्हणजेच सूर्य] आणि त्यानंतर [वैवस्वत] मनु अशी दुर्योधनाची वंशवेल*) मी जरा कर्णाबद्दल बायस दाखवत होते. ;-) २ म्हणजे अगदीच कसेसे वाटले. :-D.

* आता या हिशेबाने कर्ण, दुर्योधनाचा नेमका कोण लागतो ते मला कुणीतरी सांगावे. ;-) पण निदान कर्णाचे कुळ आणि दुर्योधनाचे कुळ सारखेच असल्याने दानशूरतेच्या बाबतीत दोघे कमीअधिक नसावेत असा अंदाज. ;-)

नवीन वर्ष

नवीन वर्षाच्या येशुपासुन सुरु झालेल्या इसवी सन २०११ मध्ये आपले सर्वाचे हार्दीक अभिवादन.

ब्रह्मदेव, मरिची, कश्यप,विवस्वान[म्हणजेच सूर्य] आणि त्यानंतर [वैवस्वत] मनु अशी दुर्योधनाची वंशवेल जरी असली तरी
विवस्वान[म्हणजेच सूर्य] , कश्यप, मरिची , ब्रह्मदेव आणि या सर्वाचा कर्ता करविता परमात्मा (देव) हे काही दुर्योधनाचे पुर्वज होऊ शकत नाहीत.

माणसापासुन सुरुवात करा ऊगाच स्वर्गलोक व पाताळलोक या भानगडीत पडु नका.

आता या हिशेबाने कर्ण, दुर्योधनाचा नेमका कोण लागतो हे समजलेच असेल.

प्रत्येक जण स्वताची एक कालगणना करीत असतो. काल येशुपासुन सुरु झालेले इसवी सन २०११ सुरु झाले.

कधीतरी हिजरी, पारशी, शालिवाहन, शिव, युगाब्ध सुरु होईल म्हणुन स्वर्गलोक व पाताळलोक हे मानवलोकापासुन वेगळे आहे.

कर्ण, दुर्योधनाचा नेमका कोणीही लागत नाही तो एक भिकारी आहे.

स्वागत

प्रस्ताव आणि चर्चा वाचून मजा वाटली.
आधुनिकोत्तर का काय म्हणतात ते हेच का? की हे आधुनिकोत्तरोत्तर म्हणायचे?
आपले स्वागत.
अवांतरः एका दुर्लक्शित सभासदाची आठवण झाली.

प्रमोद

भिकारी ?

हे कशावरून ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

कशावरून भिकारी

सर्वाना धक्का देऊन महाभारतातील सर्वात मोठा दानवीर ह्या चर्चेवर सतत लक्ष ठेवावे.

स्वागत

श्री. धनन्जय चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपले स्वागत आहे.

असंबद्ध विचार

प्रस्तुत चर्चा प्रस्ताव म्हणजे एका कवीने (व्यास) आपल्या काव्यात गुंफलेल्या काही असंबद्ध व एकमेकाशी संबध सुद्धा नसलेल्या घटना व गोष्टींचा परस्पर संबंध कसा आहे हे दाखविण्याचा एक केविलवाणा प्रयत्न वाटतो आहे.
1.कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?

कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव त्याच्या आई-वडीलांनी ज्या प्रकारे व पद्धतीने वाढवले ती पद्धत, आजुबाजूचे वातावरण, त्याला मिळालेले शिक्षण, मित्र आणि त्याचे जन्मजात जनुकगुण यामुळे बनतो असे मला वाटते. कर्ण एका मच्छीमाराच्या घरी (चु.भू.द्या घ्या) वाढला. दुर्योधन त्याचा मित्र असला तरी त्याला बालपणीचा मित्र म्हणता येणार नाही.एका प्रचलित कथेप्रमाणे धनुर्विद्येतले आपले कौशल्य दाखवल्यावर केवळ हीन कुलातील म्हणून जेंव्हा त्याचा धिक्कार केला गेला व त्याला पारितोषिक नाकारण्यात आले त्या वेळी सात्विक संताप व एक उत्तम राजकीय खेळी म्हणून दुर्योधनाने त्याला आपलेसे केले. यामुळे कर्णाचा स्वभाव दानशूर होण्यात दुर्योधनाचा काही हात भार असेल असे वाटत नाही.
2. दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे.
कारण दुर्योधनाचे कुळ पुढील प्रमाणे आहे
.
सध्या पृथ्वीतलावर असलेले सर्व मानव हे दीड पावणेदोन लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत असलेली एक स्त्री व 90000 वर्षापूर्वी आफ्रिकेत हो ऊने गेलेला एक पुरुष या दोघांचे वंशज़ आहेत. या गोष्टीचा प्रस्तुत चर्चा विषयाशी संबंध एवढाच की प्रत्येक माणसाच्या कुलाची लांबी सर्व साधारणपणे तेवढीच असणार. दुर्योधनाच्या कुलाच्या लांब यादीमुळे त्यात दानशूरपणा हा गुण येऊ शकतो हा निष्कर्ष अगाध आहे.
3. समतादर्शन आपले उपक्रमवर स्वागत. आपल्याकडून जास्त विचारबद्ध व सतर्क लेखांची अपेक्षा करतो.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत आहे

पुर्ण पणे

अभिनन्दन

चन्द्रशेखर आपल्या अमुल्य माहीतीच्या प्रतिसादाबद्दल आपले अभिनन्दन.

अभिनंदन

माझ्या प्रतिसादाबद्दल अभिनंदनाची अपेक्षा नसून मी उपस्थित केलेल्या मुद्यांबद्दल आपला खुलासा अपेक्षित आहे. उपक्रमची हीच प्रथा आहे. आपल्याला जर येथे उपस्थित झालेल्या मुद्यांचे खंडन करता येत नसले तर तसे मान्य करावे
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

जरी..

जरी असे मानले की दु.धनाने कर्णाला दान दिल्यामुळे कर्ण दानशूर बन्ला आणी म्हणून दु.धन मोठा दानशूर तर खालील वाक्ये तितकीच खरे आहेत.

१. शहाजहान ताजमहालपेक्षा जास्त सुन्दर.
२. दादाजी / जिजाबाई शिवाजींपेक्षा जास्त शूरवीर.

अजुनबरीच्....

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

महाराज

महाराज ही चर्चा सुन्दरता अथवा शुरवीरते विषयी नाही, दानवीर विषयी आहे.

जागे व्हा............येत आहेत..............

अरेरे ..

अहो स.दर्शन , महाराजांबद्दल चर्चा नाही आहे, दानशूराबद्दल आहे. :)

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

इंडक्शन आणि ओरीएंटेशन

ऐतिहासिक आणि नावडता विषय असला तरी ह्या चर्चेला आलेल्या प्रतिसादांच्या संख्येने मला असे वाटले की, चर्चा महत्वाची असणार. पण भ्रमनिरास झाला. -
१. चर्चाकार काय साध्य करण्यास येथे आला आहे तेच कळाले नाही. "सर्व घटना पाहता दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे." ह्या उद्गाराला "होय, अगदी खरे आहे" असे उत्तर दिले की, ही चर्चा संपते व चर्चाकार समाधानाने तृप्त होइल असे वाटते.
२. वरील शक्यता नसल्यास, चर्चाकाराने प्रतिसाद देणा-यांकडून नक्की कशाविषयी चर्चा करावी हे नमुद करावे. सुरुवातीला प्रियालीने त्यांना तसे विचारताच त्यांनी एक भलीमोठी लिस्ट देऊन इतरांना द्न्यानचकीत करण्याचा प्रयत्न केला.- पुन्हा एकदा प्रश्न पडला की, ह्याचा त्या चर्चशी काय संबंध आहे? चर्चा करायची आहे की नाही?

आंतर्जालावरील समुहांवर असे हौशी चर्चाकार येतच राहणार आहे, तरीही त्यांना इंडक्शन आणि ओरीएंटेशन व्हावे ह्यासाठी काही नियमावली असल्यास ती त्यांना पॉइंट करावी.

मुद्दा बरोबर

चर्चेला आलेल्या प्रतिसादांच्या संख्येने मला असे वाटले की, चर्चा महत्वाची असणार. पण भ्रमनिरास झाला.
चालायचेच...! :)

आंतर्जालावरील समुहांवर असे हौशी चर्चाकार येतच राहणार आहे, तरीही त्यांना इंडक्शन आणि ओरीएंटेशन व्हावे ह्यासाठी काही नियमावली असल्यास ती त्यांना पॉइंट करावी.
अशा उद्बोधन करणा-या नियमाची गरज नसावी असे मला वाटते. इथेच काही हौशी उपक्रमी उपक्रमवर अशा प्रथा आहेत, उपक्रमवर असे लेखन असावे, उपक्रमवर असं असं आहे, (उपक्रमच्या धोरणात नसले तरी ) असे म्हणून मार्गदर्शन करतच असतात. त्यामुळे आपला मुद्दा बरोबर जरी असला तरी त्याची गरज वाटत नाही.

-दिलीप बिरुटे
[उपक्रमी]

कदाचित

सुरुवातीला प्रियालीने त्यांना तसे विचारताच त्यांनी एक भलीमोठी लिस्ट देऊन इतरांना द्न्यानचकीत करण्याचा प्रयत्न केला.- पुन्हा एकदा प्रश्न पडला की, ह्याचा त्या चर्चशी काय संबंध आहे? चर्चा करायची आहे की नाही?

नुकतेच आणखीही काही सदस्यांबद्दल असे प्रश्न मला पडले होते. समतादर्शन यांचा हा उपक्रमावरील पहिलाच प्रयत्न असल्याने कदाचित ते नव्याने इतिहास-पुराणांचा अभ्यास वगैरे करायला लागले असावेत म्हणून आपल्याकडील माहिती गरज नसताना किंवा अवांतर असतानाही देत सुटले असावेत असे मानण्यास जागा आहे. ;-)

चांगला चर्चा प्रस्ताव

चर्चाप्रस्ताव आवडला. फापटपसा-यापेक्षा एक-दोन वाक्यात आपलं म्हणने गोंधळ वाढविण्या-या लेखनापेक्षा बरा हा आपला हेतू असावा, म्हणून आपला चर्चाप्रस्ताव मला आवडला. 'दुर्योधन' हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे ' हे तुम्ही ग्रहित धरले आहे. आता ते उपक्रमी वाचकांनी 'महाभारत' किंवा अन्य ग्रंथाच्या संदर्भाने दुर्योधन दानशुर आहे किंवा नाही हे सिद्ध करावे अशी अपेक्षा आहे, असावी. दुर्दैवाने अजून मूळ विषय सोडून चाललेली चर्चा पाहता फारशी माहिती आलेली नाही. असो, आपला महाभारतातील सांगोवांगी गोष्टींपेक्षा फार परिचय नाही म्हणून चर्चाप्रस्तावला केवळ नमस्कार करतो.

महाभारतातील चार-दोन पात्रांच्या ऐकीव माहितीवरुन माझे अंदाजे मत असे की, महाभारतातील दानवीर म्हणून कर्णच भारीच पडेल.

-दिलीप बिरुटे

चुकीची अपेक्षा

आता ते उपक्रमी वाचकांनी 'महाभारत' किंवा अन्य ग्रंथाच्या संदर्भाने दुर्योधन दानशुर आहे किंवा नाही हे सिद्ध करावे अशी अपेक्षा आहे, असावी.

चुकीची अपेक्षा आहे. उद्या पु. ना. ओकांच्या ग्रंथसंपदेच्या संदर्भाने ताजमहाल हा तेजोमहाल आहे किंवा नाही हे सिद्ध करावे अशी अपेक्षा व्यक्त होईल. परवा आणखी दत्तगुरू हे कसे सर्वश्रेष्ठ गुरू हे श्री. शरद उपाध्ये ह्यांच्या कुठल्याश्या वाहिनीवरील भंपक गप्पांच्या संदर्भाने सिद्ध करा अशी मागणी होईल. त्यामुळे असो.

दुर्दैवाने अजून मूळ विषय सोडून चाललेली चर्चा पाहता फारशी माहिती आलेली नाही.

चर्चा मूळ विषय सोडूनच व्हायला हवी असा हा विषय आहे. असो. असो. ह्यानिमित्ताने आजकालचे प्राध्यापक (म्हणजे समुदाय) हल्ली स्वतंत्रपणे वाचू, लिहू, विचार करू शकत आहेत व उपक्रमी होत आहेत असे दिसते आहे. हेही नसे थोडके. प्राध्यापकांना (म्हणजे समुदाय) हार्दिक शुभेच्छा.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उदा चूकीचे .

>>चुकीची अपेक्षा आहे. उद्या पु. ना. ओकांच्या ग्रंथसंपदेच्या संदर्भाने ताजमहाल हा तेजोमहाल आहे किंवा नाही हे सिद्ध करावे अशी अपेक्षा व्यक्त >>होईल. परवा आणखी दत्तगुरू हे कसे सर्वश्रेष्ठ गुरू हे श्री. शरद उपाध्ये ह्यांच्या कुठल्याश्या वाहिनीवरील भंपक गप्पांच्या संदर्भाने सिद्ध करा अशी >>मागणी होईल

चुकीची अपेक्षा आहे हे मान्य आहे पण "पु. ना. ओकांच्या ग्रंथसंपदेच्या संदर्भाने ताजमहाल हा तेजोमहाल आहे किंवा नाही" हे सिद्ध करावे लागेल ..
-->मग त्यात नाही असेच सिद्ध होते.

दत्तगुरू हे कसे सर्वश्रेष्ठ गुरू हे श्री. शरद उपाध्ये ह्यांच्या कुठल्याश्या वाहिनीवरील भंपक गप्पांच्या संदर्भाने सिद्ध करा..
-->ते नाहीत हे सिद्ध करा.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

भीष्म

भीष्म...स्वतःचे असे म्हणून दान करण्याजोगे जे काही होते ते त्यांनी दान केलेच, शरपंजरी पडण्याचे रहस्य देखील.

मुळात दुर्योधनाने जे राज्य दिले ते त्याचे नव्हतेच( थांबा..लगेच तलवार काढू नका..) तो राजा नव्हता..राजा त्याचे वडील होते. भरसभेत क्याबीनेट ची मंजुरी न मिळवता तो राज्य दान करू शकत नाही, त्यामुळे ते म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर दानशूर होण्यापैकी आहे...

आता बोला.

भीष्माचा दानशूरपणा

भीष्माच्या दानशूरपणा बद्दल काही शब्दच नाहीत फक्त कुळाचा तपास नसल्याने उभे आयुष्य अक्षरशा वाया गेले.

राजा शन्तनूने राजा भरत सारखा निर्णय घेतला असता तर भीष्माच्या दानशूरपणा आत्ताच्या जगात सुध्दा सर्वाधिक झाला असता पण त्या **पिसाट बापामुळे (शन्तनू) पोराचे (भीष्माचे) आयुष्य वाया गेले.

आजही प्रत्येक मुलगा आपल्या बापात शन्तनूची छबी पाहुन भीष्माच्या वाया गेलेल्या आयुष्याचा बदला घेत आहे.
काही जणाची तर माझ्या बापाला काहीही कळत नाही असे म्हणण्यापर्यत मजल गेली आहे.

बाळानो झाले गेले विसरुन जा असे म्हणयला स्वर्गालोकातून कोणी दे़व अवतार घेऊन येईल काय? दे़वाना अवतार घेऊन येण्यास आत्ता खुप मोठा चान्स आहे. महाभारत, रामायण किवा त्या आधीच्या काळात अवताराची गरज नव्हती, अवताराची खरी गरज आत्ता आहे .

दुर्योधनाचा दानशूरपणा

प्रथम प्रियाली साठी..
कर्णाला राज्य दान करण्याव्यतिरिक्त इतर कोणत्या घटनांमध्ये दुर्योधनाचा दानशूरपणा दिसतो? __(प्रियाली )

१) कर्णाच्या पहील्या बायकोच्या भावाला दरबारात नोकरी देऊन दुर्योधनाने त्याचे आयुष्य उभे केले.
२) दुर्योधनाने स्वताच्या बायकोची एक मैत्रिण सुध्द्दा त्याची होत असतानाही कर्णाला पहीली बायको असूनही दान केली, कर्णानेही ती मुर्खासारखी स्विकारली.
आणखीही भरपूर घटना आहेत, कोणाला माहीत असतील तर त्या सर्वाना माहीत करण्याचे दान करावे. फालतू चर्चेत वेळ घालवू नये ही चर्चा खुप मोठी आहे.

दुर्योधन दानवीर असण्याचा आणि दुर्योधनाच्या कुळाचा आपापसातील संबंध कळला नाही. अधिक विस्तार करावा. __ (प्रियाली )
१) परमपरेने मिळालेली आपल्या बाप दादाची ईस्टेट थोडी जरी दान केली तरी ती सर्वश्रेष्ठ ठरते.
२) स्वकमाईची त्यापेक्षा कमी श्रेष्ठ.
३) वरील दोन्ही प्रमाणे मिळालेली ईस्टेट दान करणारा भिकार्‍या सारखा नाही काय?
म्हणून दुर्योधनाचे कुळाचा संबंध या चर्चेत घ्यावा लागला.

कर्णाचे वडील

कर्णाचे वडील आधीपासूनच सूत म्हणून कामाला होते. कदाचित योग्य वेळी कर्ण आणि शोण दोघांनाही दुर्योधनाच्या हस्तक्षेपाशिवाय किमान सारथ्याचीतरी नोकरी मिळाली असती. सारथी म्हणूनसुद्धा आनंदात जगलेच असते ते(कदाचित राजा म्हणून जे जगले त्यापेक्षा).

दुर्योधनाची कर्णाला जी मदत केली तेवढी कृष्णशिष्टाईला आला होता तेव्हा आपल्या भाऊबंदाना केली असती, बापदादाच्या इस्टेटीतली थोडी इस्टेट दान म्हणून जरी दिली असती तर युद्ध टळले असते.

ह्या प्रश्नांवर इतर सदस्यांची उत्तरे अपेक्षित नसतील तर व्यनीचा वापर करावा.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

संदर्भ कुठे मिळाले?

कर्णाच्या बायकोबद्दल वरील संदर्भ महाभारताच्या नेमक्या कोणत्या पर्वांमध्ये येतात ते कळेल काय? दुसरी बायको स्वीकारण्यामध्ये मूर्खासारखे काय आहे बरे?

१) परमपरेने मिळालेली आपल्या बाप दादाची ईस्टेट थोडी जरी दान केली तरी ती सर्वश्रेष्ठ ठरते.
२) स्वकमाईची त्यापेक्षा कमी श्रेष्ठ.

असे कोण म्हणते? कुठे नमूद केले आहे?

३) वरील दोन्ही प्रमाणे मिळालेली ईस्टेट दान करणारा भिकार्‍या सारखा नाही काय?

याचा वरील १. आणि २. या विधानांशी काय संबंध आहे?

ऐवजी

कोण कोण म्हणत आहे की, कर्णाला दोन बायका नव्हत्या/होत्या. प्रतिसाद पाठवा म्हणजे प्रियालीस कळेल.
आपण सर्वजण वाचकच याचा संदर्भ आहेत.

बाकी
दुसरी बायको स्वीकारण्यामध्ये मूर्खासारखे काय आहे बरे?
मनूने घालून दिलेल्या ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चारही समाजरचनेत बसत नाही म्हणून.

३) वरील दोन्ही प्रमाणे मिळालेली ईस्टेट दान करणारा भिकार्‍या सारखा नाही काय?

ऐवजी

३) वरील दोन्ही प्रमाणे मिळालेली ईस्टेट एखाद्याने दान केल्यावर त्याच दानावर कमवलेली ईस्टेट परत दान करणारा भिकार्‍या सारखा नाही काय?

असे म्हणायचे आहे, तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न्न करावा.

मनू?

दुसरी बायको स्वीकारू नये असे मनूने कोठे लिहिले आहे बरे?

नितिन थत्ते

काही नेटिकेट्स

माझी समतादर्शन यांना नम्र विनंती आहे की त्यांनी प्रतिसाद देणार्‍या इतर उपक्रमींचा आपल्या प्रतिसादातून एकवचनी उल्लेख करू नये. आदरार्थी बहुवचन वापरल्यास ते योग्य दिसेल.
अन्यथा आपले लेख व प्रतिसाद यांच्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता दिसते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

तुम्ही सांगा

कोण कोण म्हणत आहे की, कर्णाला दोन बायका नव्हत्या/होत्या. प्रतिसाद पाठवा म्हणजे प्रियालीस कळेल.
आपण सर्वजण वाचकच याचा संदर्भ आहेत.

इथे लोकांची परीक्षा घेण्यापेक्षा तुम्हीच संदर्भ द्या. विधाने तुम्ही करत आहात तेव्हा उत्तर देणे तुमची जवाबदारी आहे. प्रश्न कर्णाला दोन किंवा चार बायका होत्या का असा नाही. कर्णाची दुसरी बायको दुर्योधनाला मिळणार होती पण त्याने ती कर्णाला दिली म्हणून स्वीकारणारा कर्ण मूर्ख आहे असे महाभारतात कोणत्या पर्वात येते असा प्रश्न आहे. आपणा कळवलेत तर मला महाभारतात शोधता येईल असे वाटते.

मनूने घालून दिलेल्या ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चारही समाजरचनेत बसत नाही म्हणून.

असे मनूने कुठे आणि कधी सांगितले?

वरील दोन्ही प्रमाणे मिळालेली ईस्टेट एखाद्याने दान केल्यावर त्याच दानावर कमवलेली ईस्टेट परत दान करणारा भिकार्‍या सारखा नाही काय?

कसे? सामान्यतः भिकारी असे करतात का? हे कोणाचे तत्वज्ञान आहे? उलट, दानात मिळालेली वस्तू पुन्हा दुसर्‍याला देण्याची दानत असणारा मनुष्य श्रेष्ठ नाही काय?

दोन नीचांतील कमी नीच कोण?

प्रस्तुत चर्चा विषय हा महाभारतामध्ये खरंतर - "दोन नीचांतील कमी नीच कोण?" असा लिहिल्यास त्याचा अर्थ फारसा बदलणार नाही. भारतकारांनी कर्ण आणि दुर्योधनाला अनेक ठिकाणी नीच, अहंकारी, मत्सरी व दांभिक असंच दाखवलेलं आहे. यौवराज्याभिषेकाआधी युधिष्ठिर अधिक प्रसिद्ध होतो आहे हे बघून दुर्योधनालाही लोकमत बदलावेसे वाटू लागले - त्यानादात त्याने हस्तिनापुरांत रथासमोर अचानक आलेल्या याचक स्त्रिला सुवर्ण मोहरांची थैली सर्वांसमोर दिल्याचा एकमात्र उल्लेख आहे. पण हे दान सत्पात्री (नि:स्वार्थी) दान नव्हते उलट दांभिकच होते. कर्णाला अंगराज्य दान देऊन मिंधा करून घेण्यातही केलेलं राजकारण हे उघडच आहे.

कर्णाच्या दानाचा उल्लेखही शांतिपर्वाच्या अलिकडे आलेला आहे. त्याआधी त्याने दान दिले असा व्यासांनी अर्धाही श्लोक खर्चला नाही आहे. अर्वाचीन नाटककारांनी व कादंबरीकारांनी कर्णाला जो काही लौकिक मिळवून दिला आहे त्यामुळेच काय तो दानवीर कर्ण अशी उपाधी त्याला लाभली आहे. पण त्याला महाभारतात आधार नाही. देवेन्द्राला कर्णाने दिलेल्या कवच-कुंडलांच्या दानाचा जो काही उदो केला जातो (स्वतःच्या इष्टदेवाने - सूर्याने केलेल्या सुचनेला अनुसरून) तो म्हणजे सरळ सरळ व्यापार आहे. एक हाथसे लो - एक हाथसे दो. स्वतःच्या दीर्घकालापासून असलेल्या अर्जुनावरील द्वेषामुळे व त्याच्या वधासाठी जी अमोघ शक्ती त्याने बदल्यात इन्द्राकडून मागून घेतली तसे ते दान, दान न राहता सरळ व्यवहार ठरले. हा व्यवहार निश्चितंच सहज झाला नव्हता - कवच-कुंडलां ऐवजी मी तुला स्त्रिया, धन, भूमी दान देऊ का असा विकल्पही कर्णाने इन्द्राला दिला होता.

कुन्तीला जे काही दान दिलं गेलं त्यातही विकल्प होताच की, अर्जुनाला सोडून इतरांना सोडून देण्याचा. भीमाला त्याने युद्धांत प्राणदान दिल्याचा जो कर्णाचा गौरव केला जातो त्या आधी भीमानेही त्याचा धनुर्युद्धांत अनेकदा पराभव केल्याचं वर्णन आहे. भीमानेही ह्या तथाकथीत दानवीराला अर्जुनाच्या प्रतिज्ञेखातर सोडून दिलं होतं. बरं! कुन्तीला वचन देताना त्याने हा विचार का बरं नाही केला होता की दुर्योधनाला आपण एकदा नाही तर अनेकदा पांडववधाचं वचन देऊन बसलो आहोत, तसंच अनेकदा तशी प्रतिज्ञाही करून् बसलो आहोत. असं परस्पर विरोधी दान कसं काय देऊ शकला तो? ज्याच्या पराक्रमावर विसंबून मित्र दुर्योधनाने शंख फुंकला होता त्याच्यावर केलेला हा विश्वासघात नव्हे काय?

जर प्रश्न हाच असेल की महाभारतांत खरा दानवीर कोण होता / होते? तर .... भीष्म हेच दानवीर व त्यागमूर्ती ठरतील ... पितृप्रेमाखातर राज्याधिकार सोडला आणि आजीवन त्याच सिंहासनाचे सेवकत्व पत्कारलं - सत्यवतीच्या पित्याच्या शंकेखातर आजीवन ब्रह्मचारी राहीन अशी घोर प्रतिज्ञा केली. कौरवांच्या बाजूने लढूनदेखील दोन्हीं बाजूंस सदैव आदरणीय राहिले.

मस्त प्रतिसाद...पण..

ढोंगीबाबा, (च्यायला, काय एकेक आयडी घेतलेले आहेत) आपला प्रतिसाद पटण्यासारखा असला तरी भिष्म काही दानवीर वाटण्यासारखा नाही. माझ्यापूरते कारण असे की, आपल्या कवचकुंडलांमुळे आपले प्राण जाणार आहेत. आपल्या कवचकुंडलांच्या अभावी आपण युद्ध हरणार आहोत. आपलं तेज,सौंदर्य नष्ट होणार आहेत, हे माहित असूनही कवचकुंडले दान करणारा ,राज्य सोडणार्‍या, सेवकत्त्व पत्त्करणा-यापेक्षा मोठा नाही का ?

-दिलीप बिरुटे
(अंदाजपंचे)

दुर्योधनच महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..

दुर्योधनाने कामापुरते व कारणापुरतेच दान केले त्याप्रमाणे आपणही सर्वजण कामापुरते व कारणापुरतेच माहीतीच्या दानाचेच कार्य करीत आहोत म्हणजे आपण सर्वजण जगातील सर्वात मोठे दानवीर आहोत... सत्ययुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि आता कलीयुगात दान सर्वश्रेष्ट आहे.

ढोंगीबाबाचा प्रतिसादाचे आम्ही स्वागत करतो.

:(

या पकाऊला हाकला रे कुणीतरी!

कोणीतरी लागतो हो!

नाटक सिनेमात कॉमिक रिलिफ द्यायला नेहमी एक कॅरॅक्टर असते बघा. तसेच उपक्रमवर कोणीतरी कॉमिक रिलिफ द्यायला येतेच पूर्वी ठठपा होते आत हे आले आहेत. एनजॉय! रागावू नका.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+/-

सहमत.

आणि असहमत. ठणठणपाळ आक्रस्ताळे असले तरी खूपच जेन्युइन होते.

यांची ठणठणपाळांएवढी लेव्हल नाही.

नितिन थत्ते

हाहाहाहा!

दुर्योधनाने कामापुरते व कारणापुरतेच दान केले त्याप्रमाणे आपणही सर्वजण कामापुरते व कारणापुरतेच माहीतीच्या दानाचेच कार्य करीत आहोत म्हणजे आपण सर्वजण जगातील सर्वात मोठे दानवीर आहोत... सत्ययुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि आता कलीयुगात दान सर्वश्रेष्ट आहे.

काहीही! उगीचच हास्यास्पद बडबड

माती

इथेच तर आपण माती खातो .
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

दुर्योधनच महाभारतातील सर्वात मोठा दानवीर... पुढे चालू

सत्ययुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि आता कलीयुगात दान सर्वश्रेष्ट साधन आहे.

दुर्योधनाने कामापुरते व कारणापुरतेच दान केले त्याप्रमाणे आपणही सर्वजण कामापुरते व कारणापुरतेच माहीतीच्या दानाचेच कार्य करीत आहोत म्हणजे आपण सर्वजण जगातील सर्वात मोठे दानवीर आहोत.

महाभारतात कर्ण, भीष्म, विदूर, द्रोण, गान्दारी, क्रष्ण व इतरही मोठे दानवीर आहेत.

प्रेषक चंद्रशेखर हे कर्णाचे प्रतिनिधीत्व करतात.
प्रेषक आजूनकोणमी हे भीष्माचे प्रतिनिधीत्व करतात.
प्रेषक अभिजित हे दुर्योधनाचे प्रतिनिधीत्व करतात.
प्रेषक ढोंगीबाबा हे कर्णाच्या स्वभावावर टिका करुन भीष्माचे प्रतिनिधीत्व करतात.
प्रेषक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे भीष्माच्या कार्यावर खुष नसून कर्णाचे प्रतिनिधीत्व करतात.
प्रेषक पुष्कर श्रीकांत जोशी हे दुर्योधनाचे प्रतिनिधीत्व करतात.
प्रेषक रणजित चितळे हे कर्णाचे प्रतिनिधीत्व करतात.

प्रेषक धक्का , धनंजय, प्रमोद सहस्रबुद्धे , धम्मकलाडू , नितिन थत्ते, रिकामटेकडा आणि प्रेषक प्रियाली हे पण कोणाचे तरी प्रतिनिधीत्व करतील.

कुळाने काही कोणी दानवीर होत नाही हे ज्याचे मत आहे त्याने दुर्योधनाच्या पुढील कार्यावर नजर टाकावी.

१) दुर्योधनाने एका देशाचे राज्य कर्णाला दान दिले .

२) कर्णाच्या पहील्या बायकोच्या भावाला दरबारात नोकरी देऊन दुर्योधनाने त्याचे आयुष्य उभे करण्याचे दुर्योधनाने दान केले.

३) स्वताच्या बायकोची एक मैत्रिण त्याची होत असतानाही कर्णाला पहीली बायको असूनही ती मैत्रिण दुर्योधनाने दान केली.

४) ज्याची राजभवनाच्या पायर्‍या चढण्याची लायकी नाही त्या पान्डवाना राजाश्रयाचे दान दुर्योधनाने केले.

५) त्याच पान्डवानी हळू हळू पाय पसरुण राज्यात वाटणीचा हिस्सा मागितला तो ही खान्डववनाचे दान दुर्योधनाने केले.

६) जुगारात सर्व काही मिळाले असताना ते सर्वच्या सर्व परत करण्याचे दान दुर्योधनाने केले.

७) हे सर्व झाले असताना पुन्हा एक चान्स म्हणून पान्डवा सोबत जुगार खेळण्याच्या समझदारपणाचे दान दुर्योधनाने केले.

८) आत्ता या दुसर्‍या डावात हरल्यावर जी शिक्षा होती ती पान्डवानी पुर्ण केली आहे असे म्हणणार्‍याला जीवनदान दुर्योधनाने दिले.

९) आपले कोणीच खरे मानीत नाही या सत्यासाठी पान्डवा सोबत युध्द करण्याचे दानच दुर्योधनाने केले.

१०) दुर्योधनाने हस्तिनापुरांत रथासमोर अचानक आलेल्या याचक स्त्रिला सुवर्ण मोहरांची थैली सर्वांसमोर दान दिल्याचा उल्लेख आहे.

११) शेवटी सत्यासाठी व पुर्वज्याचे कुळ राखण्यासाठी लढाई करुण प्राणाचे दान दुर्योधनाने केले.

वरील मुद्यावरुन महाभारतात दुर्योधन सर्वात मोठे दानवीर होता व जगात आपण सर्वात मोठे दानवीर आहोत असे समजून या चर्चेचा शेवट करूया.
म्हणून सत्ययुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि आता कलीयुगात दान सर्वश्रेष्ट साधन आहे. हे वाक्यच आपल्या सर्वाना दान आहे.

आवरा!!

आवरा रे कुणीतरी सदस्याला. :-(

असे व्यक्तिगत टिकेचे (प्रतिनिधित्व करणे) आक्षेपार्ह लेखन ;-) उपक्रमावर चालतेच कसे?

बरे झाले की समतादर्शन यांनी दाऊद इब्राहिमच भारतातील सर्वात मोठा दानवीर अशी चर्चा नाही टाकली. लोकांनी मतप्रदर्शन केले असते आणि समतादर्शन यांनी

दाऊदचे आंतरजालावरील प्रतिनिधी कोण याची खबर संपूर्ण जगाला दिली असती.

रागवू नका

आम्हीच स्वताला आवरले आहे, नाही तर तुम्ही कशाचीही माहीती मागितली असती व चर्चा फालतू वाढली असती.

कलीयुगात जरी दाऊद भारतातील सर्वात मोठा दानवीर मानला तरी त्याचे कुळ मनू पासून कोणाला माहीत नसल्याने तो काही दुर्योधना सारखा दानवीर होऊ शकत नाही. दाऊदच काय पण बिल गेटस, मित्तल, आम्बानी वगैरे कोणीच दानवीर होऊ शकत नाही या जगात प्रत्येकाच्या कुळात काही ना काही अडचणी आहेत.

चर्चा हसत खेळत घ्या, रागवू नका. माझा उद्देश फक्त कुळ व दानशूरता यातील घनिष्टता किती आहे हा होता व तो सफल झाला.
प्रतिक्रियेबद्द्ल मनपुर्वक धन्यवाद.

 
^ वर