उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
समतादर्शन
January 1, 2011 - 6:30 pm
महाभारतातील सर्वात मोठा दानवीर..
या विषयावर ठामपणे उत्तर म्हणजे कर्ण असे बरेचजण म्हणतील. पण
ज्याच्यामुळे त्याचा स्वभाव तसा बनला तो दुर्योधन मोठा दानवीर नाही काय ?
सर्व घटना पाहता दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर आहे.
दुवे:
Comments
:-)
रागावले नै भौ.
आवरा नावाची फेबु कम्युनिटी आहे. तिथे एकसे एक पीजे असतात. तुमचे प्रतिसाद वाचून त्यांची आठवण येते म्हणून आवरा असे लिहिले होते. गैरसमज नसावा म्हणून स्पष्टीकरण दिले. :-)
महाभारतातील सर्वात मोठा दानवीर... (भाग-२)
महाभारतातील सर्वात मोठा दानवीरच्या पहील्या भागात दुर्योधन हा महाभारतातील सर्वात मोठा दानवीर का मानला गेला नाही या चर्चेचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे.
१) परमपरेने मिळालेली आपल्या बाप दादाची ईस्टेट थोडी जरी दान केली तरी ती सर्वश्रेष्ठ ठरते.
२) स्वकमाईची त्यापेक्षा कमी श्रेष्ठ.
३) वरील दोन्ही प्रमाणे मिळालेली ईस्टेट एखाद्याने दान केल्यावर त्याच दानावर कमवलेली ईस्टेट परत दान करणारा दानवीर होऊ शकत नाही. म्हणून दुर्योधनाच्या कुळाचा संबंध आहे.
दुर्योधनाचे कुळ पुढील प्रमाणे आहे.
०) परमपिता परमात्मा>
१)मनु>
२)पुरुरवा>
३)नहुष>
४)यायती>
५)यदु>
६)पुरु>
७)जनमेजय>
८)अह्याती>
९)देवतिथी>
१०)दुष्यन्त>
११)भरत>
१२)हस्ति>
१३)अजमीठ>
१४)कुरु>
१५)विदुरथ>
१६)अनश्वन>
१७)परीक्षित>
१८)भीमसेन>
१९)परीक्शवस>
२०)शन्तनु>
२१)विचित्रवीर्य>
२२)ध्रतराष्ट>
२३)दुर्योधन>.......
कुळाने काही कोणी दानवीर होत नाही हे ज्याचे मत आहे त्याने दुर्योधनाच्या पुढील कार्यावर नजर टाकावी.
१) दुर्योधनाने एका देशाचे राज्य कर्णाला दान दिले .
२) कर्णाच्या पहील्या बायकोच्या भावाला दरबारात नोकरी देऊन दुर्योधनाने त्याचे आयुष्य उभे करण्याचे दुर्योधनाने दान केले.
३) स्वताच्या बायकोची एक मैत्रिण त्याची होत असतानाही कर्णाला पहीली बायको असूनही ती मैत्रिण दुर्योधनाने दान केली.
४) ज्याची राजभवनाच्या पायर्या चढण्याची लायकी नाही त्या पान्डवाना राजाश्रयाचे दान दुर्योधनाने केले.
५) त्याच पान्डवानी हळू हळू पाय पसरुण राज्यात वाटणीचा हिस्सा मागितला तो ही खान्डववनाचे दान दुर्योधनाने केले.
६) जुगारात सर्व काही मिळाले असताना ते सर्वच्या सर्व परत करण्याचे दान दुर्योधनाने केले.
७) हे सर्व झाले असताना पुन्हा एक चान्स म्हणून पान्डवा सोबत जुगार खेळण्याच्या समझदारपणाचे दान दुर्योधनाने केले.
८) आत्ता या दुसर्या डावात हरल्यावर जी शिक्षा होती ती पान्डवानी पुर्ण केली आहे असे म्हणणार्याला जीवनदान दुर्योधनाने दिले.
९) आपले कोणीच खरे मानीत नाही या सत्यासाठी पान्डवा सोबत युध्द करण्याचे दानच दुर्योधनाने केले.
१०) युध्दाला येताना माद्र देशाच्या राजाला प्रत्येक मुक्कामाची सोय करुण ऊत्तम पाहूणचाराचे दानच दुर्योधनाने केले.
११) दुर्योधनाने हस्तिनापुरांत रथासमोर अचानक आलेल्या याचक स्त्रिला सुवर्ण मोहरांची थैली सर्वांसमोर दान दिल्याचा उल्लेख आहे.
१२) शेवटी सत्यासाठी व पुर्वज्याचे कुळ राखण्यासाठी लढाई करुण प्राणाचे दान दुर्योधनाने केले.
वरील मुद्यावरुन महाभारतात दुर्योधन सर्वात मोठे दानवीर होता म्हणून सत्ययुगात तप, त्रेतायुगात ज्ञान, द्वापारयुगात यज्ञ आणि आता कलीयुगात दान सर्वश्रेष्ट साधन आहे.
आणखी कोणाची काही मते असतील तर चर्चा करावी अन्यथा दुर्योधन हाच महाभारतात सर्वात मोठ्ठा दानवीर होता हे मान्य करावे.
व्याख्या
तुम्हाला माहिती असेलच की उपक्रमवर काटेकोर व्याख्या द्याव्या लागतात. तेव्हा कृपया, महाभारत या नावाने ओळखल्या जाणार्या कथांपैकी नेमक्या कोणत्या आवृत्तीची चर्चा अपेक्षित आहे ते स्पष्ट करा, अन्यथा तो इतिहास असल्याचे सिद्ध करा अन्यथा तुमचा मूळ आयडी कोणता ते उघड करा.
महाभारत
महाभारत व्यासाच्या एका शिश्याने जनमेजयला सागितले आहे..