श्री. ना. पेंडसे

श्रीपाद नारायण पेंडसे अर्थात श्री. ना. पेंडसे. रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत ह्या पुस्तकांनी घरोघरी नावजले गेलेले ख्यातनाम मराठी लेखक, कादंबरीकार.

पूर्ण नाव
श्रीपाद नारायण पेंडसे
जन्म
जानेवारी ५, १९१३
मुर्डी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू
मार्च २३, २००७
मुंबई, महाराष्ट्र, भारत
पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशन गौरव, जनस्थान पुरस्कार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान पुरस्कार
अपत्ये
पुत्र: अनिरुद्ध पेंडसे
कन्या: नंदा काटदरे, सरोज दीक्षित

वरील माहितीचा स्रोत - विकिपिडिया
(ह्या माहिती व्यतिरिक्त विकिपिडियावर मला आणखी माहिती सापडली नाही.)
आपल्या प्रतिसादांनी हे सदर अधिक माहितीपूर्ण आणि रोचक होईल अशी आशा बाळगतो.

Comments

आवडेल!

पण त्यातील भाषेसारखी भाषा जर आम्ही ललित लेखनासाठी विख्यात अशा संकेतस्थळावर वापरली, तर आमचे लेखन तेथील प्रशासक रद्द करतील, अशी भीती वाटते.

आम्हीही हेच म्हणतो, परंतु यावर आम्हाला उपक्रमरावांचं म्हणणं काय आहे हे वाचायला आवडेल!

आपला,
(प्रतिक्षेत!) तात्या.

संत तात्याबा वापरतात!

बजाजी नव्हे, बजापा!

सकाळी उठून रोज १०८ वेळा हे सुभाषित म्हणा.)

हो, तो जप मी रोजच करतो! ;)

त्यामुळे तशी भाषा नारळीकरांनी वापरली असेल, तरच येथे तिचा स्वीकार होईल. (असे माझे मत)

आपणही जयंतशेठचा फ्यॅन आहे. खूप मोठा माणूस!

पण ललित लेखनासाठी जे स्थळ उपलब्ध आहे (त्याला हल्ली आम्ही मैत्रीपार्क असे म्हणतो),

मस्त! ;)

तेथे बजाजीच्या काही कृत्यांचे वर्णन पेंडशांच्या भाषेत करता येणार नाही, हे मात्र निश्चित.

खरं आहे रे बाबा! आमचा कोकणी बजापा उपक्रमाला, मनोगताला झेपायचा नाही! ;)

बाय द वे, बजाजी नव्हे, बजापा असं नांव आहे.

आपला,
तात्या खोत, देवगड.

संत तात्याबा वापरतात!

माहिती हवी .

श्रीं. ना. यांनी कोकणी व्यक्तीरेंखा बद्दल जे काही चित्रण केले आहे.त्याच्या बद्दल कोणी काही सांगू शकेल का?कारण त्यांच्या लेखनात येणारी माणसं जरा फटकळ ,एकलकोंडे,जरा हटके, आहेत असं का ?

महिन्याभराची रजा काढा!

कारण त्यांच्या लेखनात येणारी माणसं जरा फटकळ ,एकलकोंडे,जरा हटके, आहेत असं का ?

बिरुटेसाहेब, महिन्याभराची रजा काढा अन् चला आमच्या गावी राहायला. कोकणातल्या महिन्याभराच्या मुक्कामातदेखील खूप काही शिकायला मिळेल, पाहायला मिळेल!

जरा फटकळ ,एकलकोंडे,जरा हटके, आहेत असं का ?

अहो मातीचा गुण! दुसरं काय! ;)

आपला,
(हळवा!) तात्या.

संत तात्याबा वापरतात!

असे वाचले आहे की

पेंडश्यांना तंबाखूचे व्यसन होते. हे खरे आहे का? वाचीव माहितीनुसार त्यांना भेटायला येणार्‍या लोकांशी बोलतानाही ते तंबाखूचा बार भरून बोलायचे आणि त्यामुळे ऐकणार्‍याला ते काय बोलताहेत हे कळायला खास कळा/कला जोपासावी लागे.

प्रतिसाद पेडसे

मला वाटत आपण खुपच् चर्वाचरवण केली

श्रीं. ना . पेन्द्से

श्री ना म्हनजेच शिरुभाउ
आमच्या मुडी गावचे

 
^ वर