मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश युनिकोड सीडीत उपलब्ध ...

सर्वांनी लक्ष द्यावे...

मराठीत प्रथमच मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीत उपलब्ध झाला आहे. तो संगणक प्रकाशनने उपलब्ध केला आहे. त्याची किंमत फार कमी म्हणजे फक्त ७५/- रू. आहे व त्यामध्ये ६०००० हून अधिक मराठी शब्दांचे अर्थ हे इंग्रजी भाषेत उपलब्ध केलेले आहेत. तो शब्दकोश युनिकोडमध्ये असल्याने त्यामध्ये मराठी शब्द शोधण्याची सोयही त्यात केलेली आहे. तसेच वाचण्यासाठी टाईप लहान-मोठा करण्याची सोयही त्यात दिलेली आहे.

अशी संधी चालून आल्यामुळे मला ती माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावीशी वाटते. आणि ती उपयुक्त अशीच आहे. जर तुम्हाला तो शब्दकोश हवा असेल तर मी त्यासाठी संगणक प्रकाशनचा नंबर देत आहे त्यांचा नंबर आहे ०२२-२७६९५६०३/ ९९८७६४२७९१/९९.

संगणक प्रकाशनने मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश विक्रीसाठी www.molesworth.esanganak.com ह्या संकेतस्थळावर ठेवला आहे. तसेच त्याची इत्थंभूत माहितीही त्यांनी दिलेली आहे. संगणक प्रकाशनने दीड वर्षात हा शब्दकोश उपलब्ध केला आहे.

Comments

अतिशय चांगली बातमी.

मोल्सवर्थ-कॅन्डीचा इंग्रजी-मराठी कोश देखील आहे. दुर्मीळ पण उपयुक्त. त्या कोशात एकेका इंग्रजी शब्दासाठी डझनावारी मराठी प्रतिशब्द मिळतात. त्या संगणक प्रकाशनाने हेही काम हाती घ्यावे. या कोशांनंतर अनेक कोश झाले पण या दोघांची सर कुणालाही आली नाही. --वाचक्‍नवी

चांगली बातमी

उत्तम माहिती. आंतरजालावर विसंबुन न राहता आता संगणकावर कायम शब्दकोश उपलब्ध राहील. किंमतही अतीशय वाजवी आहे.
मोल्सवर्थच्या साईटपेक्षा ही सीडी वापरणे अधिक सोयिस्कर आहे का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

चांगली माहिती

शब्दकोश युनिकोडमध्ये आहे हे फारच चांगले आहे. लवकरच आणखी प्रकाशक असे कोश तयार करण्यास उद्युक्त होतील ही आशा.

मोल्सवर्थ मराठी-इन्ग्रजी शब्दकोश

अतिशय उत्तम.मी अश्या शब्दकोशा च्या शोधात होतोच.बरे झाले.आता लगेच सम्पर्क साधतो.धन्यवाद.
नन्दा

चांगली बातमी

उपयुक्त माहीती. धन्यु.

हेच

उपयुक्त माहीती. धन्यु.

हेच म्हणतो...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

संकेतस्थळ् उघडत् नाहीये

वर दिलेले संकेतस्थळ कार्यालयातून उघडण्याचा प्रयत्न केला असता "ही साईट धोकादायक् असून प्रवेश प्रतिबंधित' असा मजकूर दिसला. (अर्थात इषारा धुडकावून पुढे जाण्याचा पर्याय मी कार्यालयीन संगणक असल्यामुळे स्वीकारला नाही.) अजून कोणाला असा अनुभव आला आहे का ?

शिवाय, ही सीडी तिथेच 'उतरवून घेण्याची सोय' (अर्थात पैसे भरुन्) दिली आहे का ?

होय.

होय.

संगणक प्रकाशनने मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोश विक्रीसाठी www.molesworth.esanganak.com ह्या संकेतस्थळावर ठेवला आहे. तसेच त्याची इत्थंभूत माहितीही त्यांनी दिलेली आहे. संगणक प्रकाशनने दीड वर्षात हा शब्दकोश उपलब्ध केला आहे.

वर दिलेले संकेतस्थळ कार्यालयातून उघडण्याचा प्रयत्न केला असता "ही साईट धोकादायक् असून प्रवेश प्रतिबंधित' असा मजकूर दिसला. (अर्थात इषारा धुडकावून पुढे जाण्याचा पर्याय मी कार्यालयीन संगणक असल्यामुळे स्वीकारला नाही.) अजून कोणाला असा अनुभव आला आहे का ?

शिवाय, ही सीडी तिथेच 'उतरवून घेण्याची सोय' (अर्थात पैसे भरुन्) दिली आहे का ?

मला खालीलप्रमाणे संदेश येतो.

Reported Attack Site!

This web site at www.molesworth.esanganak.com has been reported as an attack site and has been blocked based on your security preferences.

Attack sites try to install programs that steal private information, use your computer to attack others, or damage your system.

Some attack sites intentionally distribute harmful software, but many are compromised without the knowledge or permission of their owners.

--
प्रतिसाद लिहिताना 'प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.' असे लिहून आल्यामु़ळे माझी स्वाक्षरी पुनःपुनः लिहितो. धन्यवाद.

तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

अधिक माहिती

दिलेल्या क्रमांकावर एका मित्राने फोन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार साइट सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे असा संदेश येतो आहे. एक-दोन दिवसात ठीक होईल. सदर शब्दकोश सध्या दादर येथील आयडियल बुक डेपोमध्ये उपलब्ध आहे असेही त्यांनी सांगितले.

संसर्गजनक संकेतस्थळ - ईसंगणक.कॉम

ईसंगणक.कॉम ही साईट मालवेअर प्रसारित करत आहे.
गेल्या नव्वद दिवसात ५ वेळा असे संसर्ग प्रसारित झाले आहेत अशी माहिती गूगल देत आहे.
तेव्हा दक्षता घ्यावी किंवा हा धागा प्रकाशित करणार्‍या सदस्याकडे विचारणा व्हावी.

^ वर