केवळ् स्त्रित्वाचा अपमान

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

आपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

मग हे काय?

त्यांची बाजू समजून घेण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही हे अधिकच क्लेशकारक आहे.
एकलव्यांनी व इतरांनीही तसे केले आहे. त्याला शिल्पांनी काय प्रतिसाद दिला तो मला दिवा घेऊन शोधुनही सापडत नाहीये! तेव्हा चमत्कृती निर्माण करणे याव्यतिरीक्त काही दुसरा हेतु दिसत नाही असे खेदाने म्हणावेसे वाटते!

राहता राहिले तात्यांचे प्रतिसाद. यावर काय आगपाखड करता? त्यांना काही प्रतिसाद दिला का कधी? काही बाजू सांगितली का?
सगळा एकतर्फी सुधारणेचा मारा. असं कसं चालेल? काही उत्तरे द्याल की नाही? लमाणांनी ही विचारले - आम्ही या सुधारणेत सहभागी होतो - काय उत्तर दिले? किती संपर्काचे पत्ते दिले? मग हळूहळू चेष्टाझाली तर काय करणार? उगाच काहीतरी जगावेगळे काम केले आहे असा आव आणायचा नि मग "कोणी माझे ऐकतच नाही, बाई मी नाही खेळत जा!" असे म्हणून आपली बाहुली घेऊन निघुन जायचे असेच आहे हे वर्तन.
जगात "कंदिलाचे चित्र हातात देवून आता अंधार दुर होईल" असे म्हणणारे खुप पडले आहेत.
पण एखादाच तात्या घरोघरी जाऊन जाऊन रक्ताच्या नसलेल्या बहिणींसाठी भाउबीज गोळा करतो हे पण लक्षात ठेवले तर बरे.

आपला
भडकलेला
गुंडोपंत

आपला
गुंडोपंत

योग्यायोग्य

गुंडोपंत, असा तोल सोडू नये.

राहता राहिले तात्यांचे प्रतिसाद. यावर काय आगपाखड करता?

टिंगलटवाळी आणि शेवटी अपमानित करण्याचा प्रयत्न प्रतिसादातील लेखनावरून दाखवून देणे याला कोणत्या शब्दकोशात आगपाखड म्हणतात?

असं कसं चालेल? काही उत्तरे द्याल की नाही? लमाणांनी ही विचारले - आम्ही या सुधारणेत सहभागी होतो - काय उत्तर दिले? किती संपर्काचे पत्ते दिले? मग हळूहळू चेष्टाझाली तर काय करणार?

लेखावर आलेल्या प्रतिसादांना प्रतिसाद दिला नाही तर अश्या लेखकांची चेष्टा करणे योग्य आहे असे तुमचे मत आहे का?

उगाच काहीतरी जगावेगळे काम केले आहे असा आव आणायचा नि मग "कोणी माझे ऐकतच नाही, बाई मी नाही खेळत जा!" असे म्हणून आपली बाहुली घेऊन निघुन जायचे असेच आहे हे वर्तन.

हे व्यक्तिगत पातळीवर जाणारी टिप्पणी अनावश्यक आणि आक्षेपार्ह आहे.

पण एखादाच तात्या घरोघरी जाऊन जाऊन रक्ताच्या नसलेल्या बहिणींसाठी भाउबीज गोळा करतो हे पण लक्षात ठेवले तर बरे.

एखादे सत्कार्य केल्याने इतरत्र इतरांची टिंगल, अपमान करण्याचा अधिकार येतो असे तुम्हाला म्हणायचे आहे का?

वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेऊन योग्य आणि अयोग्य काय हे पाहण्याची समज असावी अशी अपेक्षा आहे.

आपला
(सूचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

एकावर घुम्मा दहा राज.

आरे भाय,शिल्पाताइच्या लेखावर लिहायचा सोडून् तु काहुन् त्या तात्याबाचं नाव घेऊन राहिला,तसं त सगळ्यांनीच लिव्हल् ना भाऊ.त्या बाइसाहेब कायच बोलत नाय,अन तु काहुन् मनावर् घेउन राह्यला.

भलतच

वैयक्तिक हितसंबंध बाजूला ठेऊन योग्य आणि अयोग्य काय हे पाहण्याची समज असावी अशी अपेक्षा आहे.

अहो भलतच काय हितसंबंध बाजूला ठेवले तर खाली काय राहील कपाळ्?

चालायचच!

"कोणी माझे ऐकतच नाही, बाई मी नाही खेळत जा!" असे म्हणून आपली बाहुली घेऊन निघुन जायचे असेच आहे हे वर्तन.

There is a hidden child in every Adult असे कुणी तरी म्हट्ले आहे (विद्वानच असणार तो)
अवांतर- आठवलं नाही की असं म्हणाव लागतं
प्रकाश घाटपांडे

न समजण्यासारखा

त्यांची बाजू समजून घेण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही हे अधिकच क्लेशकारक आहे.
सर्वांनी केला. अपवादाने देखील या चर्चेतील एकही प्रतिसाद शिल्पाताईंची बाजू न समजता लिहिलेला आहे असे मला वाटत नाही.

त्यांच्या प्रत्येक लेखातील फक्त दारुबंदी या शब्दाला लक्ष्य करून प्रतिसाद दिले गेले.
हे विधान टिकणारे नाही. त्यांचे लेख आणि सगळ्यांचे प्रतिसाद आजही उपक्रमावर आहेत.

टिंगलटवाळी करणारे प्रतिसाद आले हे मान्य आहे. त्याचा अतिरेक टाळायला हवा हे ही समर्थनीय आहे.

  • शिल्पाताईंना प्रतिसाद देणे काही ना काही कारणाने शक्य नाही हे वास्तव्य उपक्रमींना बदलता येणार नाही... शिल्पाताईंना जे रुचेल, पटेल आणि योग्य वाटेल तेच त्या करणार.
  • त्याचबरोबर प्रतिसादही वेगवेगळ्या शैलीत येणार. आक्षेपार्ह वाटले तर जरूर बोट दाखवावे. पण शब्द कोणते, भावना काय, याच्या तारतम्याचे स्वतःचे आराखडेही लेखकाने वाचकांवर थोपवू नयेत.

स्त्रित्वाचा अपमान असे म्हणून, सरसकट उथळपणाचा आरोप करून आणि त्याहीपुढे एकतर्फी लिखाण सोडून जाणे हे मला न समजण्यासारखे आहे.

वासुदेव - जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे हे मान्य करतो. पण माझी भूमिका काय इतकेच मी सांगू शकतो. इतर पक्षांकडून काही सुटलेले धागे असतील तर ते जुळले तरच वस्त्र विणले जाणार.

(विद्यार्थी) एकलव्य

टिकणारे

एकलव्यराव, तुमचे प्रतिसाद हे नेहमीच प्रगल्भ आणि संतुलित असतात, तसाच हा देखील.

त्यांच्या प्रत्येक लेखातील फक्त दारुबंदी या शब्दाला लक्ष्य करून प्रतिसाद दिले गेले.
हे विधान टिकणारे नाही. त्यांचे लेख आणि सगळ्यांचे प्रतिसाद आजही उपक्रमावर आहेत.

ह्यासाठी हे पाहा. यातून निष्कर्ष काढण्यास तुम्ही (म्हणजे तुम्ही आणि इतर सर्व सदस्य) समर्थ आहातच. ही माहिती उदाहरणासाठी दिली आहे. कोणत्याही विशिष्ट व्यक्तिविशेषाला लक्ष्य करण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. पण जे मला अयोग्य वाटते ते व्यक्त करावे इतकाच उद्देश आहे.

http://mr.upakram.org/node/454 वाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...
http://mr.upakram.org/node/457 शारुबाईचा बचतगट - आं? पुन्हा दारुबंदी?? ;) शिल्पाताई, लेख जसा वाचू लागलो तसे शारुबाईंनी दारुबंदी आणि गुत्तेबंदी केल्याचे उल्लेख कुठे दिसेनात. त्यामुळे अंमळ अस्वस्थ व्ह्यायला लागलो तेवढ्यात वरील ओळ वाचली आणि बरे वाटले! ;) असो! पुढचा दारुबंदी आणि गुत्ताबंदीचे उल्लेख असलेला लेख कधी टाकताय? वाट पाहात आहे!
http://mr.upakram.org/node/486 स्टीव्हियाचा यशस्वी - ...आणि मुख्य म्हणजे प्रथमच शिल्पाताईंच्या लेखात कुठेही दारुचे गुत्ते बंद पाडल्याचा उल्लेख नाही हे पाहून जरा चुकल्याचुकल्यासारखे वाटले!
http://mr.upakram.org/node/497 पारंपरिक बियाण्यांच्या प्रसारासाठी - कुठल्या गावात किती दारुचे गुत्ते बंद पाडले हे न सांगणारा लागोपाठ दुसरा लेख. अभिनंदन! :)
http://mr.upakram.org/node/509 अखंड हरिनाम सप्ताहाने डांगरेघर व्यसनमुक्त - मी दारुबंदी विषयक आपल्या एखाद्या नवीन लेखाची मी वाटच पाहात होतो, तेवढ्यात आपला लेख आलाच! मध्यंतरीचे आपले लागोपाठ दोन लेख दारुबंदीवरचे नव्हते त्यामुळे खूपच सुनंसुनं वाटत होतं! ..... दारुबंदीवरील पुढील लेखाला मनःपूर्वक शुभेच्छा..

http://mr.upakram.org/node/516 निर्मलग्राम किकवारी बहुतेक सर्वच प्रतिसाद
http://mr.upakram.org/node/519 .... आणि कोकणातील श्रावणगाव बनले आदर्शगाव ! - सदर लेखात श्रावण गावात दारुबंदी झाल्याचा, तसेच बायकांनी आणि लहान मुलांनी मिळून दारुचे गुत्ते वगैरे बंद पाडल्याचा उल्लेख नाही तरीही गावाला पुरस्कार मिळाला हे पाहून आश्चर्य वाटले!

http://mr.upakram.org/node/521 ... मग त्यांनीच बनवला रस्ता ! - आता जरा दोनचार दिवस तरी ब्रेक घ्या बुवा!

आपला
(सोदाहरण) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

माफ करा

त्यांच्या प्रत्येक लेखातील फक्त दारुबंदी या शब्दाला लक्ष्य करून प्रतिसाद दिले गेले.

याचा रोख कोणा एकावर नसून शिल्पाताईंच्या लेखांना आलेल्या सर्वच प्रतिसादांना जातो.

हे विधान टिकणारे नाही. त्यांचे लेख आणि सगळ्यांचे प्रतिसाद आजही उपक्रमावर आहेत.

या वाक्यातील 'सगळ्यांचे' हा शब्द महत्त्वाचा वाटतो.

या सर्व लेखांना चांगले-वाईट दोन्ही प्रतिसाद आहेत तरीही प्रत्येक लेखाच्या शेवट 'केवळ स्त्रीत्वाचा अपमान' हे वाक्य आढळेल.

येथील सर्व सहृदय सदस्य http://mr.upakram.org/node/519#comment-7476 आणि http://mr.upakram.org/node/521#comment-7530, http://mr.upakram.org/node/521#comment-7541 अशावेळी नेमके कुठे गायब असतात कळत नाही? (उपहासाबद्दल क्षमा असावी) परंतु वेळ निघून गेल्यावर वाद घालण्यापेक्षा वेळ होती तेव्हा पुढाकार घेतला असता तर बरे झाले असते.

१० पैकी ८ व्यक्ती विषयाशी सुसंगत प्रतिसाद देत असतील तर त्यांच्यावरही उथळपणाचे आरोप प्रगल्भ वाटत नाहीत. वाईटाची बाजू न घेणे उत्तम परंतु एखादा चूक आहे हे दाखवण्यासाठी चुकीचा आधार घेणे वाईट.

अर्थ

याचा रोख कोणा एकावर नसून शिल्पाताईंच्या लेखांना आलेल्या सर्वच प्रतिसादांना जातो.

सगळे प्रतिसाद असे होते असे मी म्हटलेले नाही. तसा अर्थ ध्वनित होत असेल तर कृपया तो माझ्या शब्दरचनेचा दोष समजावा.

परंतु वेळ निघून गेल्यावर वाद घालण्यापेक्षा वेळ होती तेव्हा पुढाकार घेतला असता तर बरे झाले असते.

कुणी तरी आक्षेप घेतल्यानंतरच आपल्या लेखनात बदल करावा, कोणी बोलत नाही तोपर्यंत चालते हे योग्य आहे का? स्वतःहूनच अशी 'वेळ' येऊ न देण्यासाठी प्रयत्न करता येणार नाहीत का?

१० पैकी ८ व्यक्ती विषयाशी सुसंगत प्रतिसाद देत असतील तर त्यांच्यावरही उथळपणाचे आरोप प्रगल्भ वाटत नाहीत.

प्रगल्भपणाची सर्वांकडून अपेक्षा आहे.

हा प्रतिसाद प्रतिवाद करण्यासाठी दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.

आपला
(अनासक्त) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

एकजूट

कुणी तरी आक्षेप घेतल्यानंतरच आपल्या लेखनात बदल करावा, कोणी बोलत नाही तोपर्यंत चालते हे योग्य आहे का?

अजीबात योग्य नाही. जर एखादी गोष्ट आपल्या आवडीची नसेल तर दुर्लक्ष करणे उत्तम परंतु असे कोणी करत नसेल आणि कुरापती काढत असेल तर त्याला एकजूटीने समज दिली (किंवा समजावले) तर येथील बहुसंख्य लोकांना हे पसंत नाही असे प्रतीत होते. याचा फायदा असा की येथील प्रशासनालाही लोकांची अशा गोष्टींना साथ नाही हे समजून उगीच लोकांवर निर्बंध घालण्याची गरज भासत नाही.

प्रगल्भपणाची सर्वांकडून अपेक्षा आहे.

आहेच पण सर्वचजण कुठे एका मुशीतून येतात? :(

हा प्रतिसाद प्रतिवाद करण्यासाठी दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.

आधी थोडा माझा गैरसमज झाला असे वाटते (खरडवहीत) परंतु आता नोंद घेतली.

ही घ्या आकडेवारी.

नमस्कार,
आपण आपल्या दिलेल्या उदाहरणावरून आम्ही सर्वच प्रतिसादांचा शोध घेतला.(शेवटचा चर्चेचा लेख या अभ्यासक्रमात घेतलेला नाही.)
शिल्पाताईंचे एकूण लेख, १० .
दि.२१/०६/०७ ते ०८/०७/०७ एकूण १८ दिवसात (चर्चेचा सोडून) १८ दिवसात दहा लेख.
एकूण प्रतिसाद ९३.
तात्यांचे प्रतिसाद.१४.पैकी ७ लेखांचे प्रतिसाद उत्तम. ३ मनोरंजक.४ समिश्र. सरासरी ५० % चांगले /५०%मनोरंजक.
तरी राहिलेले ७९ प्रतिसादांचा अभ्यास केला तर लक्षात येते की, ४८ प्रतिसाद हे विषयांतर आहे.३१ विषय हे लेखकाचे अभिनंदन,आणि मते, मतांतरे व्यक्त करणारे आहेत.

निष्कर्ष :- कोणी एक व्यक्ती मुद्दामहून या लेखांची टवाळी करतो. हे विधान संपूर्णपणे चूक आहे.

आमच्याकडून हा अभ्यास विषय संपला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त!

वास्तवीक या चर्चेत आता मी सहभागी राहात नाही आहे कारण आकाशवाणी एकदाच करायची असते, माझ्यापुरती ती करून झाली होती! शिवाय ज्यांनी ही चर्चा चालू केली त्या तर चर्चेत भाग् घेत नाहीत (हा तर लेख नाही आहे!) आणि आपण सर्व विषय चघळतो की काय असे वाटते. पण आपला "संशोधन" बघून मस्त म्हणावेसे वाटले म्हणून तेव्हढेच म्हणतो आणि थांबतो.

शेले-पागोटे.

खरे तर या विषयीची चर्चा केव्हाच संपली आहे.मुळ चर्चा प्रस्ताव असलेल्या लेखकाने जरी सहभाग नोंदवला नसला तरी,त्यांचीही बाजू ग्रहित धरुन याची चर्चा झाली आहे.पण आपल्या चर्चेचा रोख मुद्दामहुन कोणाकडे तरी बोट दाखवणे आहे, असे वाटते.खरे तर त्याची गरज नाही.इथे जे नियमित लेखन करतात,आणि काही लेखक,वाचकांना इथे काही शेले-पागोट्यांचे प्रतिसाद येतात हेही माहित आहे.पण मुद्दामहून तसे केले जाते,असे निदर्शनास आणून तसे वर्तन करणा-यांवर कार्यवाही करावी,असे म्हणने न शोभनारे आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता ही चर्चा बंद करा!

ज्या व्यक्तीने ही चर्चा सुरु केली ती व्यक्ति तर आपले नाव रद्द करून इथून निघून गेलेय. चर्चेतल्या एकाही प्रतिक्रियेवर प्रतिसाद देण्याची नैतिक जबाबदारी न स्वीकारताच इथून त्या निघून गेलेत. तेव्हा आता कोणत्याही प्रकारे ही चर्चा पुढे सुरु ठेवण्यात काय हंशील आहे?
त्याऐवजी आपली शक्ती आणि वेळ दुसर्‍या कोणत्याही विषयावर खर्च करावी ही विनंती!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

चर्चा व सार

त्याऐवजी आपली शक्ती आणि वेळ दुसर्‍या कोणत्याही विषयावर खर्च करावी ही विनंती!

आपली विनंती नि:संशय योग्य आहे. पण असा टोकाचा निर्णय घेण्यामागे काय कारण आहे हे समजणे उपक्रम आणि कोणत्याही संकेतस्थळाच्या सदस्यांसाठी आवश्यक आहे. कोणत्याही लेखनाला केवळ टवाळकीच्या उद्देशाने लक्ष्य केले जात असेल आणि आपण फक्त वाद टाळण्याच्या उद्देशाने असेच दुर्लक्ष करणार असू तर या चुकीच्या पद्धतीचा पायंडा पडू शकतो.

शिल्पाताईंचे आजवरचे लेख पाहिले तर त्यांच्या चांगल्या उद्देशाबद्दल खात्री पटते. अश्या सदस्यांनी केवळ काही लोकांच्या 'गमतीच्या शौका'चे भक्ष्य होऊन आपले लेखन थांबवले तर ते हिताचे नाही.

आपला
(हिताहितचिंतक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

हे सार?

यात थोडे ऍड करा...

शिल्पाताई वार्ताहर आहेत असे वाटते. त्यांच्याबरोबर झाले हे योग्य नाही. त्यांचा उद्देशही चांगला असावा पण त्यांच्यासारखे 'पराचा कावळा करणारे' वार्ताहर आपल्या देशाला लाभले तर ते स्वास्थकारक नाही. आपण कोणाच्या हितासाठी हे काम करतो हे त्यांना कळत नाही असं वाटतं. त्राग्याने निघून जाण्यापेक्षा तक्रार करण्याचा मार्ग त्यांनी चोखाळायला हवा होता.

चूक झालीच आणि ती दोन्ही पार्टींची झाली हेच सार आहे. धडा प्रत्येकाने घ्यायचा. टिंगलटवाळी करणार्‍यांनीही ती माफक करावी आणि टिंगलटवाळी झाली म्हणून कांगावाही माफक करावा.

-राजीव.

----
आता मी मोठा झालो. टिंगलटवाळी करणे कमी केले आहे.

आत्महत्या/राजीनामा/निरोप

चर्चेमध्ये सगळे मुदद्दे चघळून झाले असल्याने त्यावर पुन्हा भाष्य करू इच्छित नाही परंतू त्या अनुशंगाने इथल्या आत्महत्या/राजीनामा/निरोप ह्याविशयी उपक्रम रावांची धोरणे त्यांनी शक्य असल्यास स्पष्ट करावीत असे वाटते.

एखाद्या सदस्याला इथुन निरोप घ्यायचा असल्यास सदर व्यक्तिच्या तश्या विनंतीला मान देउन इथले व्यवस्थापन सदर खाते रद्द का करत नाही? असे झाल्यास बरेच वाद विवाद टळतील असे वाटते.

इतकेच नव्हे तर 'स्वत्।चे खाते रद्द करा' अशी एक कळच निर्माण करुन व्यवस्थापना वरचा हा अतिरिक्त भार देखिल टाळता येइल आणि उगीचच जातो जातो म्हणत थांबणार्‍यांचा पोकळपणा देखिल उघड होईल.

दारुबंदी

शिल्पाताई तुमी जोपत्तुर पुन्नांदी लिवायला सुरूवात करत न्हाई तोपत्तुर आमी दारुच्या थेंबालाबी शिवनार न्हाई!!

स्त्रीत्वाची थट्टा

विनायकभाऊ न्यायाची बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद.
शिल्पा व पंकज

अखेर बाईंनी प्रतिसाद दिला. बाईंचे नाव खरेच शिल्पा दातार जोशी आहे की टिंब टिंब टिंब? त्यांच्या स्त्रीत्वाचा अपमान झाला की त्यांच्या लेखातील स्त्रियांचा?
माझा असंपादित प्रतिसाद शिल्पाताईंच्या खरडवहीत वाचता येईल.विनायक
त्यांची खरडवही कोरी आहे.
डेव्हिल्स ऎडव्होकेटमधे डेव्हिल कोण?
शिल्पाबाईची अनुदिनी सर्वांसाठी खुली आहे के फक्त सभासदांसाठी? मलातरी तिथे जाता आले नाही.
मी उपक्रमवर अजून नवीन आहे, त्यामुळे मला जरा जास्तच शंका येतात.--वाचक्‍नवी

मजकूर संपादित. प्रतिसादातील अनावश्यक वाटणारा भाग काढून टाकला आहे.

वाचन्कवी बाई

वाचन्कवी बाई ( बाई, बुवा की... कोण जाणे शंका येते हो आम्हाला)

बाईंचे नाव खरेच शिल्पा दातार जोशी आहे की टिंब टिंब टिंब? मी उपक्रमवर अजून नवीन आहे, त्यामुळे मला जरा जास्तच शंका येतात

अहो बाई/बुवा/...
आपण नवीन आहात म्हणजे उपक्रमवर नुकतेच जन्माला आलात तर ! मग तीन टिंब ( ते तीन टिंब नसून पाच टिंब आहेत.) हे शिल्पा दातार जोशींचेच खाते आहे. हे कसे ओळखलेत. आता तर तुमच्या विषयी आणि नावाविषयी मलाही शंका यायला लागलीये.

मला जरा जास्तच शंका येतात
असो ते राहूदेत, आपल्याला येणाऱ्या शंकांचे नेमके स्वरुप काय बरे? म्हणजे दीर्घ, लघु वगैरे वगैरे.

असो. शंका निरसन झाले की सविस्तर सांगा बाई/बुवा/ ?

जर तीन टिंब हे शिल्पा दातार जोशींचेच खाते आहे. हे कसे ओळखलेत. आता तर तुमच्या विषयी आणि नावाविषयी मलाही शंका यायला लागलीये.

उपक्रमराव, उपक्रमावर शंका उपस्थित करणाऱ्यांचे शंका निरसन आपणही करत जावे अधून मधून

शिल्पाचा खंदा पाठिराखा आणि साता जन्माचा सोबती
पंकज जोशी

मजकूर संपादित. प्रतिसादातील अनावश्यक वाटणारा भाग काढून टाकला आहे.

तुझ्या बाजूने लढायला मी आता उतरतोय

शिल्पा,

अरेच्चा ! तु मलाही चर्चेत सामिल करुन घेतलेस? खरे तर मी तटस्थ रहाणार होतो, आता तु माझे सहकार्य गृहित धरलेच आहे तर हरकत नाही. तुझ्या बाजूने लढायला मी आता उतरतोय. शेवटी सात जन्माची साथ आहे आपली.

तुझा पाठीराखा, साता जन्माचा जोडीदार आणि समर्थक
पंकज (शिल्पा दातार) जोशी

अरे वा!

अरे वा... नवीन घडामोडी,
वा मस्त एंट्री! (फक्त शो संपल्यावर घेतली असे वाटतंय!)
;)

आपला
गुंडोपंत
(महाराष्ट्र टाईम्स ची खबर नि त्यातले 'आमच्याशी असणारे साम्य' पाहुन गुंडोपंत चकित आहेत!!!!)
गुंड्या ही व्यक्ती नाही वृत्ती आहे. निंदकाला फक्त शेजारीच नाही तर अगदी आग्रहाने पेइंग गेस्ट बनवण्याचा बाणा म्हणजे गुंड्या.

उपसंपादक किंवा संपादक वृत्ती

अरेच्चा आधीचा "हा हा हा' प्रतिसाद बदलला वाटतं.

मजकूर संपादित.

व्यक्ति नसून वृत्ती असलेले गुंडोपंत,

आपला प्रतिसाद लै भारी हाये राव ! एकदम आवडला बघा !

( आमचा म.टा.चा प्रयोग आपल्यापर्यंत पोचला म्हणायचा. वाचून आनंद वाटला. काय करणार आपलं नाव वाचल्यानंतरच सुचली ही आयडीया आम्हाला.)

शिल्पाचा खंदा पाठिराखा आणि साता जन्माचा सोबती
पंकज जोशी

सरळमार्ग जोपासणं पंकज जोशींना आवडतं. पंकज जोशी म्हणजे कुठलीही बनावट वृत्ती नसून एक सरळमार्गी अति- सामान्य व्यक्ति आहे. )

मजकूर संपादित. व्यक्तिगत हेवेदावे व्यक्त करण्यासाठी कृपया प्रतिसादांचा वापर करू नये. - उपसंपादक.

व्हा ...हा...हा...हा...

आपण् सगळेजण् अतीशय् हुशार् आणि बुद्धिमान् आहात् यात् काहि वाद्च् नाहि, परन्तु खेद् असा वाटतो कि चर्चा कर ण्या साठि बरेच् चान्गले विष् य् या जगात् आहेत्. अशा ठिकाणि "टिन्न्गल् टवाळि करणारि शहाण्यान्चि सभा नको" , जरा मोठे व्हा ...हा...हा...हा...

 
^ वर