केवळ् स्त्रित्वाचा अपमान

उपक्रमी मित्रांनो,
प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते. परंतु आत्तापर्यंतच्या प्रतिसादांचा रोख लक्षात घेता, त्यामुळे वादच निर्माण होऊ शकतो, असे वाटते. अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही. कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत. समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे. आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

मी माघार घेत नाही, चांगल्या गोष्टींची कदर करणारेही आहेत, ते माझे लिखाण यापुढे याठिकाणी वाचू शकता.

माझे उपक्रमावरील खाते त्यावरील् लेख् व प्रतिसादांसह बंद करावे अशी उपक्रमाच्या प्रशासकांना विनंती करते.

आपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

शिल्पाताई एक विनंती

तुम्हाला न आवडलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे अशी नम्र विनंती.

"हत्ती चालला आपुल्या गती कुत्री रस्त्याने भुंकती" या तत्त्वाचा अवलंब करुन आपण आपले लेखन उपक्रमावरही देत रहावे. उपक्रमासारख्या संकेतस्थळांसाठी आपण लिहिता असे वेगळ्या विषयावरचे लिखाण होणे आवश्यक आहे. तुमच्या वैयक्तिक अनुदिनीपेक्षा उपक्रमावर ते लिखाण जास्त लोक वाचू शकतील व त्या विषयावर/लिखाणावर ज्यांना रस आहे असे लोक मतभेद-सहमती व्यक्त करु शकतील. त्यांचे विचार मांडू शकतील.

तुमच्या लेखनाला आलेले प्रतिसाद हे स्रीत्वाचा किंवा वैयक्तिक तुमचा अपमान करणारे नसावेत. उपक्रम, मनोगत, मायबोली अशा अनेक संकेतस्थळांवर माझा नियमित वावर असतो. टिंगलटवाळी, टाईम पास करणारे प्रतिसाद सर्वच संकेतस्थळांवर येत असतात. ज्यांना वैयक्तिक तुम्हाला किंवा कोणत्याही स्त्रीला त्रास द्यायचा आहे ते तुमच्या अनुदिनीवरही असे प्रतिसाद देतील. तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर दारुबंदी सारख्या लेखांवर आलेले तथाकथित उपद्रवी प्रतिसाद हे दारुबंदी नव्हे तर देवदेवस्कीच्या नावाचा दारुबंदीसाठी होणार्‍या वापराची टिंगल करणारे होते.

तुमचे लिखाण मला वाचायला आवडते. माझ्यासारखे इतर सदस्यही येथे बरेच आहेत ज्यांना ते आवडत आहे. उपक्रमाचे सदस्य नसलेलेही अनेक वाचक उपक्रमाला पाहुणे म्हणून भेट देत असतात. आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा इतकेच सांगू शकतो.

म्हणजे??

"हत्ती चालला आपुल्या गती कुत्री रस्त्याने भुंकती" या तत्त्वाचा अवलंब करुन आपण आपले लेखन उपक्रमावरही देत रहावे.

म्हणजे इतर उपक्रमी कुत्री आहेत असा समज करून शिल्पाताईंनी इथे लिहीत रहावे असे तुला म्हणायचे आहे की काय अजानुकर्णा??

आपला,
(हाडं चघळण्यात मग्न असल्यामुळे भुंकण्याला कंटाळलेला कुत्रा!) तात्या.

सर्व नाही

म्हणजे इतर उपक्रमी कुत्री आहेत

इतर सर्व नव्हे काही उपद्रवी कुत्री आहेत असा म्हणायचं असावं ;-)

(इमानदार कुत्र्याचा अपमान न सहन करणारा..)अभिजित

हे म्हणजे जरा अतीच.

आजानूसेठ,
तुम्हाला न आवडलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करावे अशी नम्र विनंती. हे वाक्य दाद मिळविणारे होते.आणि "हत्ती चालला आपुल्या गती कुत्री रस्त्याने भुंकती"हे जरा अतीच झाल्यासारखे वाटले.

आपला
रस्त्याने चाललेला हत्ती.

भूमिका

शिल्पाताई -

कोणतेही जाहीर व्यासपीठ म्हटले की मतमतांतरे येणारच... काही मनापासूनचे आक्षेप असू शकतात तर काही केवळ हलकटपणा असू शकतो. तरीही आपली चीड सात्विक संताप न राहता विनाकारण डोक्यात घालून घेतलेली राख होऊ नये असे वाटते.

आपण जी अनेक गावकर्‍यांची उदाहरणे येथे मांडली त्यांच्या संघर्षाची तुलना करता येथील काही प्रतिसाद म्हणजे निव्वळ बुडबुड्यांचा फुका विरोध असे म्हणावे लागेल. त्याला वैतागून येथे लिखाण न करणे ही कोठेतरी त्या गावकर्‍यांशी केलेली प्रतारणा होईल असे वाटते.

सल्ला देण्याच्या हेतूने हा प्रतिसाद नाही, पण स्वतःच्या मनाला सांगायचे असते तर हेच सांगितले असते.

(प्रत्येकाच्या मनातील चांगुलपणाचा साथीदार) एकलव्य

पूर्ण गैरसमज!

शिल्पाजी आपल्या प्रतिसादावरून लक्षात येतेय की आपण गैरसमज करून घेतलाय. आपल्या लेखातील मजकुराविषयी कुणाला काय वाटावे हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असू शकतो;पण तो व्यक्त केल्याबरोबर तो स्त्रीत्वाचा अपमान आहे असा सरळसोट अर्थ आपण कसा काय काढला हे कळले नाही.
चांगल्या कामाची माहिती आपण करून देत आहात हे वादातीत आहे;पण समाजात सद्या इतकी बजबजपुरी माजलेय की अशा काही बातम्या अविश्वसनीय वाटतात हेच इथल्या प्रतिसादावरून तुमच्या लक्षात यायला हवेय.तेव्हा त्या बातम्या विश्वसनीय कशा वाटतील ह्याबद्दल विचार करण्याचे मी आपल्याला आवाहन करतो. बातमी देण्याची,शब्दबद्द करण्याची काही वेगळी पद्धती आपण ह्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून माहिती करून घ्यावीत असे मला वाटते.
इथले अथवा एकूणच महाजालावर वावरणारे सदस्य हे निव्वळ उठवळ आहेत असा काहीसा गैरसमज झाल्याचे आपल्या अभिप्रायावरून वाटते म्हणून हा प्रतिसाद आहे. आपल्या मनात तसे नसेल तर उत्तमच आहे.मात्र असल्यास कृपया असा गैरसमज काढून आपले कार्य करत राहा.
पुलंच्या वाक्यात समारोप करतो...... पुराण वाचणार्‍याने पुराण वाचतच जावे.कुणी ऐकायला आहे की नाही ह्याची परवा करू नये!
इति अलम्!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

हारतुरे म्हटले की शेलापागोटे आलेच.

शिल्पाजी,हारतुरे म्हटले की शेलापागोटे आलेच. स्त्रित्वाचा अपमान करण्याचा कोणाचा हेतू असेल असे वाटत नाही. प्रतिकूल प्रतिसादांनी निराश होऊ नये. आपल्या लेखनाला अनुकूल कौलही मिळालेला आहे हे पहावे.

आपल्या माहितीची विश्वसनीयता - त्याचे संदर्भ अथवा स्वतः घेतलेला शोध असेल तर त्याचा स्पष्ट उल्लेख केला तर - सिद्ध होईल. शिवाय येथे प्रत्यक्ष छायाचित्रेही दाखवता येतात याची नोंद घ्यावी. त्यामुळे विश्वसनीयतेबरोबरच मूळ माहितीतही भर पडून रंजकता वाढते.
विधायक कार्यांचा आढावा घ्यायला लोकांना आवडते पण तो विकास कार्याचा शासकीय अहवाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

आपले लेखन सुरू ठेवावे. त्यात वरील मुद्द्यांचा विचार केल्यास उत्तम.
ही अनावश्यक सल्लेबाजी करण्याचा माझा अधिकार नाही. पण एक वाचक म्हणून जे वाटले ते लिहिले. गैर वाटल्यास क्षमस्व!

मला वाटते

नमस्कार शिल्पा,

आपले लिखाण मी वाचतो आणि आवडते. मला ते वाचताना "goodnewsindia.com" सारख्या संकेत स्थळाची आठवण होते, कारण तेथेही भारतात चालू असलेल्या चांगल्या गोष्टींची माहीती वाचायला मिळते. आपण येथे हे लिखाण करावे असे नक्कीच वाटते, पण तरी देखील काही सुचवावेसे वाटते, यात टिका नाही, व्यक्तीगत तर नाहीच नाही, पण हे काम चांगले असल्याने सुधारणा सुचवणे हा प्रामाणीक उद्देश नक्कीच आहे. यातील काही विचार इतरांनीही इतर आणि या ठीकाणी मांडलेले आहेतच, त्यामुळे विषयाला धरून संकलन केले आहे असेही म्हणू शकता. आपण हे वाचाल आणि आपले यावरील विचार उपक्रमींसमोर मांडाल अशी आशा करतो.:

  1. आपले लेख कितीही चांगले असले तरी त्याबाबतचे पुरेसे संदर्भ नसतात - उ.दा. : आपण त्यांच्या (कार्याच्या) संपर्कात कसे आलात, काम करताना लागणारे निधी कसे गोळा केले जातात, काम सुरू करणार्‍या प्रमुख व्यक्तींची/संस्थांची नावे, जर कोणाला असे चांगले काम बघायचे असेल तर् ते कोणाला भेटून ते बघू शकतात. शेवटी या लिखाणाचा उपयोग हा एक "केस स्टडी" म्हणून इतरांना होऊन नुसते चांगले वाचन म्हणून नाही तर प्रेरणा मिळणे महत्वाचे असेल तर या सर्व गोष्टींचा उहापोह महत्वाचा आहे. म्हणूनच कुठलेही माहीतीपुर्ण लिखाण, चित्रे, वगैरे देताना संदर्भ देणे हे अतिशय महत्वाचे आहे आणि ते आपण सर्वांनीच पाळावे याचा मी पुनरुच्चार येथे ही करतो. (या आधी पण मी अशीच प्रतिक्रीया इतर चर्चेतही दिली होती . )
  2. आपण लिखाण केल्यावर ज्या काही (चांगल्या) प्रतिक्रीया येतात त्यातील प्रश्नांना उत्तरे कधी देत नसल्याचे जाणवले. जेंव्हा अशा संकेत स्थळावर लिहीलेल् जाते तेंव्हा प्रश्न विचारले की उत्तरांची अपेक्षा करणे पण चुकीचे नाही. नाहीतर लिखाण हे एकतर्फी होते आणि मग चर्चेविना असे लेख अशा इलेक्ट्रॉनीक्स समुदायांच्या मूळ संकल्पनेविरुद्ध आहेत असे वाटते.
  3. अर्थात काही "टवाळक्या" पण होतात. पण त्यात आपली अथवा त्या कार्याची निंदानालस्ती करणे हा उद्देश नसतो. आणि जरी कोणाचा असला तरी अशाकडे दुर्लक्ष करावेच लागते. कोणत्याही सामाजीक कामात विरोधआणि कुत्सितपणाला पण सामोरे जावे लागते, जे तसे जाऊनही काम करतात ते यशस्वी होतात हा जगभरचा इतिहास आहे. आपल्याला काय वाटते, आपण लेखनात मांडलेले कार्य करणार्‍यांना काय थट्टा वगैरेला सामोरे जावे लागले नसेल? पण ते त्रागा करत बसले नाहीत म्हणून तर या "सक्सेस स्टोरीज" आपण लिहू शकलात आणि आम्ही वाचू शकलो. कुठलेही चांगले काम कधीच सर्वसंमत सुरवातीपासून होत नसते. विवेकानंदानी म्हणले आहे की प्रत्येक चांगल्या कार्याला तीन गोष्टींन मधून जावे लागते: sheer indifference, severe opposition and then broad acceptance. हे त्यांना पण चुकले नव्हते तर तुम्ही आम्ही कोण?!
  4. शेवटी आपण या लेखनाला मथळा दिला आहे की हा "केवळ् स्त्रित्वाचा अपमान". मला वाटते, आपण स्त्री-पुरूष आणि इतर सामाजीक समता काही अंशी आलेल्या भारतीय जगात वावरत आहोत. त्यामुळे स्त्रीत्व वगैरेचा शस्त्रासारखा वापर करणे मला त्राग्याचे आणि म्हणून अयोग्य वाटते. शिवाय जर या लेखांचा उद्देश जर लोकशिक्षण / लोकजागृती करणे असा असेल तर त्या उद्देशावर आपण मात करत आहात असे वाटत नाही का?

असो. परत एकदा लिहीतो की यात व्यक्तीगत रोख नाही. पण आशा करतो की आपण विचार कराल तसेच यावर आपल्यास योग्य वाटेल अशी प्रतिक्रीया येथे कराल आणि येथे असेच चांगले लिखाण चालू ठेवाल.

त्रागा नको

कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत.

कृपया स्त्रीत्वाचे अस्त्र उगारु नये. वा स्त्रीत्वाचे भांडवलही करु नये. आपण गंभीरपणे लिहिलेली गोष्ट लोकांनी कूलपणे घेतली असा समज होणे स्वाभाविक असले तरी हेच लोक गांभीर्याने सुद्धा घेतात. हिच गोष्ट पुरुषाने लिहिली असती तरी याच पद्धतीने प्रतिसाद आले असते. आपण लिहित रहा. अनुभव मध्ये आपले लिखाण मी वाचत असतो. होस्टेल मध्ये नवीन आल्यावर जसे एक प्रकारचे रॅगिंग होते तसेच हे रॅगिंग आहे. तरी देखील जिव्हाळा आहे. तेव्हा हल्केच घ्या. आणि लिखाण मात्र चालू ठेवा, त्याच्यावर अन्याय कशाला?
प्रकाश घाटपांडे

प्रतिसाद

तुम्ही चांगले वाचक आहात, तेव्हा चांगल्या व टिंगल करणार्या प्रतिक्रिया यातला फरक तुम्हाला समजायला हवा.

शिल्पाताई

शिल्पाताई,

प्रतिसाद द्यायला मलाही आवड्ते.

अच्छा? आत्तापर्यंतची आपली वाटचाल पाहिली असता आपण एकाही लेखाला प्रतिसाद, उप-प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही!

अन् विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही.

हो, पण वाद केव्हा होतो? आपण तर कुठल्याही सदस्याच्या कुठल्याही प्रश्नाला, शंकेला कधी उत्तरच देत नाही. त्यानंतरही त्याचं तुमचं मतांतर होऊ शकतं आणि त्यामुळे वाद होऊ शकतो. पण त्याकरता आपण कधी एक तरी प्रतिसाद, उपप्रतिसाद देऊन पाहिलाय का? मग कदाचित 'विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही' असं आपण म्हणणं नक्कीच योग्य ठरलं असतं असं वाटतं!

'विनाकारण वाद घालून वेळ दवडायला मला आवडत नाही'

मग काय आम्हाला आवडतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? आपला वेळ काय तो मौल्यवान आणि मग काय इतर उपक्रमी 'विनाकारण वाद घालून वेळ दवडणारे!' असं आपल्याला सुचवायचं आहे का?

कारण यातील काही प्रतिसाद केवळ् स्त्रित्वाचा अपमान होईल असे आहेत.

उदाहरणार्थ??

उगाच कशाला मोठमोठे शब्द वापरताय मॅडम? साध्या टवाळकीला आपण 'स्त्रीत्वाचा अपमान' वगैरे म्हणताय याचे आश्चर्य वाटले! स्त्रीत्वाचा अपमान काय असतो, विनयभंग कशाला म्हणतात याबद्दल मी आपल्याला सांगू लागलो तर कदाचित ते लेखन एखाद्याला वैयक्तिक वाटू शकेल आणि शिवाय विषयांतरही होईल म्हणून तूर्तास त्याबद्दल काहीच लिहीत नाही. पण उपक्रमावर स्त्रीत्वाचा अपमान झाला आहे' असं जर आपल्याला वाटत असेल तर उलटपक्षी आपणच इतर 'उपक्रमींवर स्त्रीत्वाचा अपमान करणारे!' हा बिनबुडाचा आणि अपमानजनक आरोप करताहात असं मी म्हणेन!

समाजातील वेगळ्या विषयावरची माहिती द्यावी हा माझा शुध्द हेतू आहे.

आपला हेतू शुद्ध आहे किंवा कसे याच्याशी आम्हाला काहीही देणंघेणं नाही, परंतु माहिती देताना संदर्भ, दुवा, वर्तमानपत्रातील दुवा, इत्यादी माहिती आपल्या लेखासोबत कधीच नसते ही वस्तुस्थिती आहे!

आपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा,

माझ्यापुरतं बोलायचं झालं तर मला माहितीपूर्ण लेखाच्या नावाखाली उथळ लेखन आवडत नाही म्हणूनच तर मी आपल्या लेखाची बर्‍याचदा टवाळकी केली आहे! हो, केली आहे! अगदी प्रांजळपणे कबूल करतो आणि आपण जर त्यामुळे दुखावल्या गेला असाल तर आपली जाहीर क्षमाही मागतो.

पण कुठलाही संदर्भ, दुवा न देता जी माहिती 'ग्रामसुधारणेची बातमी' म्हणून दिली जाते ती माझ्यामते तरी उथळच म्हटली पाहिजे. शिल्पाताई, आपणच प्रामाणिकपणे सांगा, आपण इतक्या ग्रामसुधारणेच्या बातम्या देता, त्या मटा, लोकसत्ता, सकाळ सारख्या कुठल्या ना कुठल्या मोठ्या वर्मानपत्रातही येतच असतील की नाही! मग आपण कधी त्या वर्तमानपत्रातील संबंधित दुवा का देत नाही? दुवा नसेल तर निदान उल्लेख तरी का करत नाही? एखाद्या गावासंबंधी बातमी देताना त्या गावातील रस्ते सुधारले आहेत, दारुचा एखादा गुत्ता बंद पाडला आहे असे एखादे तरी छायाचित्र आपण कधी दिलेत का? मग असा बिनबुडाच्या, बिनपुराव्याच्या, विनासंदर्भाच्या, विनादुव्याच्या, विनाछायाचित्राच्या लेखाला आम्ही एक तर स्वप्नरंजन तरी म्हणू किंवा उथळ तरी म्हणू!

आपल्याला भारतीय समाजात चाललेले वेगळे आणि चांगले प्रयोग वाचायला आवडत नसतील तर इथून पुढे मी येथे लिहिणार् नाही.

अनेक शुभेच्छा!

--तात्या अभ्यंकर.

खेदजनक चर्चाप्रस्ताव

शिल्पाताई,

आपल्या या चर्चेला वरील सहा-सात पुरूषांनी अतिशय संतुलित शब्दांत आपल्याला प्रतिसाद दिला आहे. कृपया माझ्याकडून ती अपेक्षा ठेवू नका. हा प्रतिसाद वाचून आपल्याला राग येईल, काही इतरांनाही येईल, कदाचित काही काळानंतर त्याचा अर्थ तुम्हाला क़ळेल अशी आशा करते.

उपक्रमावर आपल्याला कोणी आमंत्रण देऊन बोलावले होते असे वाटत नाही, आपण आल्याची वर्दीही दिली नव्हती तर मग स्वतःच्या प्रत्येक लेखात 'स्त्रीत्वाचा अपमान' हा प्रतिसाद लिहून त्याप्रकारची नवी चर्चा सुरू करून उपक्रम सोडून जाण्याची दवंडी का? लोक येथे स्वखुशीने येतात, स्वखुशीने लिहितात आणि त्यांनी स्वखुशीने राहावे किंवा जावे. आपल्या ऐवजी हे लेख एखाद्या पुरुषाने टाकले असते तर त्याला आपल्यासारखीच वागणूक मिळाली नसती असे आपण खात्रीशीर रीत्या सांगू शकता का? नसेल तर स्त्रीत्वाचा अपमान झाला म्हणून डांगोरा सहानुभूती मिळवण्यासाठी नसेल असे समजते.

आपण म्हणता आपल्याला प्रतिसाद द्यायला आवडतात. असे कोणते प्रतिसाद कोणाला दिले आपण? आपल्याला दुसर्‍या लेखात बालपंचायतीबद्दल काही प्रश्न विचारले होते त्याची आपण दखलही घेतली नाही, पुढचे लेख टाकत गेला. मी ही माझ्या शब्दात 'अशा उद्दाम वर्तनाची लोकांनी टिंगलटवाळी केली तर बिघडले कोठे?' असे म्हटले तर ते गैर ठरू नये.

वर विकास यांनी लिहिलेले सर्व मुद्दे मला अत्यंत योग्य वाटले. मी त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे.

तुम्हाला जर कल्पना होती की आपल्या लेखांना योग्य प्रतिक्रिया येत नाही तर लेखांत डिस्क्लेमर का नाही टाकले. स्पष्ट शब्दांत ' हे लिखाण गंभीर स्वरूपाचे आहे. ज्यांना यांत रुची नसेल त्यांनी कृपया त्याची टिंगलटवाळी करू नये' असे का नाही लिहिले? समाजात सर्वप्रकारची माणसे भेटतात. टिंगलटवाळीने जर तुम्ही व्यथित होता तर त्याबाबत काय उपाय योजायचे हे तुम्ही पूर्वीच ठरवायला हवे होते. अपेक्षित प्रतिसाद येत नव्हते तरीही आपण उपक्रमावर सुमारे १० लेख टाकलेत आणि मनोगतावर २. येथे नाही तर तेथे तरी आपल्या लेखांची दखल कितीजणांनी घेतली याचा विचार करा. त्यावरून आपण या लोकांना अपेक्षित वैचारिक पातळीवर नेण्यास कमी पडतो आहे की काय याचाही विचार करा.

उपक्रम हे काही शिरगाव बुद्रुक गाव नाही की त्यांना शिरगाव खुर्दमधील सुधारणांची माहिती पुरवली तर ते पेटून उठतील. तुमच्या टार्गेट ऑडियन्सला काय हवे याचा तुम्ही विचार न करताच

आपल्याला केवळ उथळ लिखाण आवडत असेल तर इथून पुढे तसा स्पष्ट उल्लेख करावा, म्हणजे नविन सदस्यांना समस्या येणार नाही.

हे वाक्य टाकून मोकळ्या झालात.

स्वतःला विरोध झाला की अनेक स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाची ढाल पुढे करतात. सुजाण स्त्रिया जेव्हा असे करतात तेव्हा अतिशय खेद वाटतो.

तुम्हाला जायचे असेल तर जरूर जा. हे काही प्रत्येकाची मनधरणी करण्याचे स्थळ आहे असे मला वाटत नाही परंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल.

सहमत...

आपल्याला दुसर्‍या लेखात बालपंचायतीबद्दल काही प्रश्न विचारले होते त्याची आपण दखलही घेतली नाही, पुढचे लेख टाकत गेला. मी ही माझ्या शब्दात 'अशा उद्दाम वर्तनाची लोकांनी टिंगलटवाळी केली तर बिघडले कोठे?' असे म्हटले तर ते गैर ठरू नये.

त्यावरून आपण या लोकांना या वैचारिक पातळीवर नेण्यास कमी पडतो आहे की काय याचाही विचार करा.

स्वतःला विरोध झाला की अनेक स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाची ढाल पुढे करतात.

प्रियालीशी सहमत आहे!

तात्या.

सहमती!

प्रियालीताईंचे मुद्दे योग्यच आहेत.

मला पण असेच वाटते.
शिल्पाताई तुम्ही या सगळ्यांनाच प्रतिसाद तर द्यावाच
पण आधीच्या प्रश्नांनाही उत्तरे द्यावीत असेही वाटते!
त्यामुळे तुमची भुमीका स्पष्ट होईल.

हे वर्तमान पत्र नाही!!! एक इंटरॅक्टीव माध्याम आहे. इथे वर्तमानपत्राचे नियम लागू होत नाहीत, हे मी तुम्हाला सांगणे म्हणजे चौथीच्या पोराने एम ए च्या थेसीस ला काय रिडिंग करावे हे सांगण्यासारखे आहे.

तुमच्या लेखांत संवाद कुठे होतो आहे?

आपला
चौथीतला
गुंडोपंत

(तुकडी फ)

उत्तरं द्या

उगीच आरोप करण्यापेक्षा उत्तरं द्या शिल्पाताई. मी ही बहुतेकांशी सहमत आहे.

- राजीव.

डेविल्स ऍडवोकेट

शिल्पाताई

आपले लेखन मी आवर्जून वाचतो. मला ते अतिशय आवडते. माझ्या प्रतिसादानंतर उगीच वादंग उठते, लोक कंपूबाजीचा आरोप करतात म्हणून मी प्रतिसाद देत नाही. आपल्या लेखनाबद्दल माझे विचार असे आहेत.

आपले लेखन गंभीर असते, माहितीपूर्ण असते आणि समाजसुधारणा/ ग्रामसुधारणांचे जे कार्य समाजात चालले आहे त्याची माहिती देणारे असते. असे व्रती लेखक कमी असतात. अशा लेखनाला साधारणपणे प्रतिसाद कमी येतात हे खरे आहे. पण टिंगलटवाळी करणारे प्रतिसाद यावेत, त्याहीपेक्षा ते तिथे अजूनही दिसावेत हे लक्षण संपादक/उपसंपादकमंडळींची या सर्व प्रकाराला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष संमती असल्याचे दर्शवते. तेव्हा आपण या विषयावर इथे काही न लिहिण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असे वाटते.

या निर्णयाच्या विरुद्ध बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. या मंडळींचा एक मुद्दा असा की आपण संदर्भ देत नाही. मजा म्हणजे आपण यापुढे इथे न लिहिण्याचा निर्णय घेतल्यावरच या मंडळींना हा मुद्दा सुचला. या आधी कोणी हा मुद्दा उपस्थित केल्याचे आठवत नाही. बहुधा आपण काल्पनिक गोष्टी लिहिता असे या मंडळींना सुचवायचे असावे.

दुसरे म्हणजे आपण इतर कोणत्याही लेखाला प्रतिसाद देत नाही असा आरोप आहे. पण या मंडळींनी पण आपल्या लेखांना प्रतिसाद न देता गप्प राहिले तर काय बिघडेल का? पण नाही, विषय गंभीर असो वा हलका, आपल्याला कळो वा न कळो जिथे तिथे तोंड घालून दुसर्‍याची टवाळी करण्यात धन्यता मानायची असा इथल्या बर्‍याच लोकांचा खाक्या आहे.

हे सार्वजनिक ठिकाण आहे. इथे सर्व प्रकारचे लोक येणार, लिहिणार. तेव्हा फार सेन्सिटिव राहून चालत नाही हा युक्तिवाद जोपर्यंत आपल्यावर पाळी येत नाही तोपर्यंतच, दुसर्‍याला उपदेश म्हणून ठीक असतो

आपला सर्वात वादग्रस्त ठरलेला मुद्दा "स्त्रीत्वाचा अपमान" असा आहे. हा मुद्दा सिद्ध करणे अवघड असले तरी तुम्ही तसेच माझी एक मैत्रीण यांना आलेल्या अनुभवावरून ही गोष्ट खरी असावे असे वाटते. इथेच नाही तर दुसर्‍याही एका संकेतस्थळावर स्त्रियांच्या लेखनाची टवाळी करण्याचे प्रकार होऊन अनेक मुली , स्त्रिया ते संकेतस्थळ सोडून गेल्या.

शेवटी आपले पत्र, माझ्या मते संपादकांसाठी धोक्याचा इशारा आहे. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

विनायक

मजकूर संपादित. कृपया, इतर सदस्यांवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करू नयेत तसेच सार्वजनिक संकेतस्थळाचे शिष्टाचार पाळण्याकडेही लक्ष द्यावे.

गप्प बसून काय करू?

आपले लेखन मी आवर्जून वाचतो. मला ते अतिशय आवडते. माझ्या प्रतिसादानंतर उगीच वादंग उठते, लोक कंपूबाजीचा आरोप करतात म्हणून मी प्रतिसाद देत नाही.
खोटा, खरा? काय घेणंदेणं येथे?

आपले लेखन गंभीर असते, माहितीपूर्ण असते आणि समाजसुधारणा/ ग्रामसुधारणांचे जे कार्य समाजात चालले आहे त्याची माहिती देणारे असते. असे व्रती लेखक कमी असतात. अशा लेखनाला साधारणपणे प्रतिसाद कमी येतात हे खरे आहे.
हे बाकी खरयं

पण टिंगलटवाळी करणारे प्रतिसाद यावेत, त्याहीपेक्षा ते तिथे अजूनही दिसावेत हे लक्षण संपादक/उपसंपादकमंडळींची या सर्व प्रकाराला प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष संमती असल्याचे दर्शवते.
ह्म्म्म् काहीतरीच

तेव्हा आपण या विषयावर इथे काही न लिहिण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असे वाटते.
काय तर्क? वडाची साल पिंपळाला

या निर्णयाच्या विरुद्ध बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. या मंडळींचा एक मुद्दा असा की आपण संदर्भ देत नाही. मजा म्हणजे आपण यापुढे इथे न लिहिण्याचा निर्णय घेतल्यावरच या मंडळींना हा मुद्दा सुचला. या आधी कोणी हा मुद्दा उपस्थित केल्याचे आठवत नाही.
सोयीस्करपणे?
http://mr.upakram.org/node/452#comment-6280
http://mr.upakram.org/node/452#comment-6281
http://mr.upakram.org/node/452#comment-6306
http://mr.upakram.org/node/452#comment-6459

बहुधा आपण काल्पनिक गोष्टी लिहिता असे या मंडळींना सुचवायचे असावे.
या मंडळींना की तुम्हाला?

दुसरे म्हणजे आपण इतर कोणत्याही लेखाला प्रतिसाद देत नाही असा आरोप आहे.
आहे पण जबरदस्ती नाही.
http://mr.upakram.org/node/521#comment-7541
http://mr.upakram.org/node/521#comment-7543

पण या मंडळींनी पण आपल्या लेखांना प्रतिसाद न देता गप्प राहिले तर काय बिघडेल का?
ऑ? काय म्हणालात?

पण नाही, विषय गंभीर असो वा हलका, आपल्याला कळो वा न कळो जिथे तिथे तोंड घालून दुसर्‍याची टवाळी करण्यात धन्यता मानायची असा इथल्या बर्‍याच लोकांचा खाक्या आहे.
बर्‍याच की मोजक्याच? आवरा!

हे सार्वजनिक ठिकाण आहे. इथे सर्व प्रकारचे लोक येणार, लिहिणार. तेव्हा फार सेन्सिटिव राहून चालत नाही हा युक्तिवाद जोपर्यंत आपल्यावर पाळी येत नाही तोपर्यंतच, दुसर्‍याला उपदेश म्हणून ठीक असतो
कोण म्हणते? जरा वाचा
http://mr.upakram.org/node/527#comment-7550
http://mr.upakram.org/node/527#comment-7553
http://mr.upakram.org/node/527#comment-7554

आपला सर्वात वादग्रस्त ठरलेला मुद्दा "स्त्रीत्वाचा अपमान" असा आहे. हा मुद्दा सिद्ध करणे अवघड असले तरी तुम्ही तसेच माझी एक मैत्रीण यांना आलेल्या अनुभवावरून ही गोष्ट खरी असावे असे वाटते. इथेच नाही तर दुसर्‍याही एका संकेतस्थळावर स्त्रियांच्या लेखनाची टवाळी करण्याचे प्रकार होऊन अनेक मुली , स्त्रिया ते संकेतस्थळ सोडून गेल्या.
उगा बोंबाबोंब नसलेल्या राईचा पर्वत पेटवा आग.

शेवटी आपले पत्र, माझ्या मते संपादकांसाठी धोक्याचा इशारा आहे.
कसा काय? उगाचच.

झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.
१००% बराब्बर. पण सोंग कोण काढतय बरं? चार बोटे कोणाकडे

मजकूर संपादित. कृपया, इतर सदस्यांवर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करू नयेत तसेच सार्वजनिक संकेतस्थळाचे शिष्टाचार पाळण्याकडेही लक्ष द्यावे.
उत्तर ओक्के हाय. नो काटछाट.

विनायकराव,

आपले लेखन मी आवर्जून वाचतो. मला ते अतिशय आवडते.

विनायकराव, बहुधा आपल्याला सुरस आणि रम्य कथांची मूलतः आवड असावी असे वाटते! :)

बाय द वे, आपल्याला काय आवडावं आणि काय नाही हा आपला व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु एकही संदर्भ, दुवा, किंवा वर्तमानपत्रातील एखाद्या बातमीचा उल्लेख नसणार्‍या ग्रामसुधारणेच्या कथा आपल्याला कश्या काय आवडतात हा एक प्रश्नच आहे! असो..

आपले लेखन गंभीर असते, माहितीपूर्ण असते आणि समाजसुधारणा/ ग्रामसुधारणांचे जे कार्य समाजात चालले आहे त्याची माहिती देणारे असते.

हो, पण त्या लेखनाला काही पुरावा? काही संदर्भ? असावा असं आपल्याला वाटत नाही का?

या निर्णयाच्या विरुद्ध बर्‍याच लोकांनी आगपाखड केली आहे. या मंडळींचा एक मुद्दा असा की आपण संदर्भ देत नाही.

मग संदर्भ द्यायला नको का?

मजा म्हणजे आपण यापुढे इथे न लिहिण्याचा निर्णय घेतल्यावरच या मंडळींना हा मुद्दा सुचला. या आधी कोणी हा मुद्दा उपस्थित केल्याचे आठवत नाही.

गुंडोपंतांनी पुराव्यादाखल,

http://mr.upakram.org/node/452#comment-6280
http://mr.upakram.org/node/452#comment-6281
http://mr.upakram.org/node/452#comment-6306
http://mr.upakram.org/node/452#comment-6459

हे चार दुवे दिले आहेत विनायकराव! त्यावर आपलं काय म्हणणं आहे विनायकराव?? आणि वरील एकाही उपप्रतिसादाला शिल्पाताईंचं साधं एका शब्दानेही उत्तर नाही याला आपण कुठली मानसिकता म्हणाल विनायकराव? निदान आम्ही तरी याला 'उर्मटपणा' म्हणू! आपण काय म्हणाल हे जाणण्यास उत्सुक आहे!

पण या मंडळींनी पण आपल्या लेखांना प्रतिसाद न देता गप्प राहिले तर काय बिघडेल का?

तसं असेल तर मग शिल्पाताईंनी तरी इथे लेखन कशाला करावे? हे काही वर्तमानपत्र नव्हे विनायकराव. इथे संवादही चालणारच!

पण नाही, विषय गंभीर असो वा हलका, आपल्याला कळो वा न कळो जिथे तिथे तोंड घालून दुसर्‍याची टवाळी करण्यात धन्यता मानायची असा इथल्या बर्‍याच लोकांचा खाक्या आहे.

हा आरोप बिनबुडाचा असून शिल्पाताईंच्या बिनपुराव्यांच्या, बिनदुव्यांच्या, आणि विनासंदर्भाच्या लेखांचे बाष्कळ समर्थन करणारा आहे असे वाटते!

शेवटी आपले पत्र, माझ्या मते संपादकांसाठी धोक्याचा इशारा आहे. झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.

अहो कसला आलाय धोक्याचा इशारा वगैरे? उपक्रमीय संपादक, उपसंपादक धोक्याचे इशारे आणि पातळ्या ओळखण्याइतपत समर्थ आहेत! एक फुकाचं त्रागा करणारं पत्र हा काही धोक्याचा इशारा आहे असं मला वाटत नाही!

तात्या.

अरेरे...

आपल्याकडून विनायकराव चांगल्या/सभ्य भाषेची अपेक्षा होती. या चर्चेतला उपक्रमींचा टिकेचा रोख हा व्यक्तीगत नव्हता तर फक्त केवळ ससंदर्भ लेखनपद्धतीच्या अभावावर होता. आपण मात्र तो व्यक्तीगत केलात. आणि त्रागा प्रतिक्रीयेतून काढला तरी खरडवहीत ठेवला. त्यात प्रियालींनी म्हंट्ल्याप्रमाणे स्त्रीत्वाचा अपमान वाटून तो शिल्पाजी काढतील अशी आशा करतो. यात कंपूबाजी नाही. माझे पण इतरांशी वाद झालेत, आणि अजूनही होतील, कधी पटले नाही तसेच कधी माझे ही पटले नसेल पण म्हणून् गोष्टी दोनही बाजूंनी वैयक्तीक केल्या नाहीत कारण इथे कोणी नकारात्मक दृष्टिकोन घेऊन वेळ आणि शक्ती खर्च करायला येत असेल असे वाटत नाही.

असो. आता आपल्या नेहेमीच्या दर्जेदार लेखनाची इच्छा करतो.

अजून एकः आपली प्रतिक्रीया ही शिल्पाताईंची बाजू घेणारी होती म्हणजेच त्यांची वकीली करणारी होती. आणि ती प्रामाणिकपणे आपल्याला जे काही वाटते ते सांगणारी पण होती. पण मथळा मात्र "डेविल्स ऍडवोकेट" हा! म्हणूनच अजून एक आशा करतो की शिल्पाताई, तुम्ही त्यांनाच "डेव्हील" म्हणालात असा गैरसमज करून घेणार नाहीत! (हे मात्र नक्कीच ह. घ्या.!)

न्यायाची बाजु

विनायकभाऊ न्यायाची बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद.

शिल्पा व पंकज

यात काय चुकले?

एका महाभागाने तर इथल्या टिंगल टवाळीचे रॅगिंगशी साम्य दाखवून समर्थनही केले आहे. धन्य आहे अशा महाभागांची! हे सार्वजनिक ठिकाण आहे.

माझ्या आधीच्या प्रतिसादातले हे वाक्य संपादनाने गाळले. यात काय चुकले कोणी सांगेल का? इथे रॅगिंगशी साम्य दाखवून एका महाभागाने झाल्या प्रकाराचे समर्थन केले त्याचा मी निषेध केला तर यात "व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप आणि सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग" कुठे आला?
विनायक

असंपादित

माझा असंपादित प्रतिसाद शिल्पाताईंच्या खरडवहीत वाचता येईल.
विनायक

उपक्रमपंत

ती भलामोट्ठी खरड वाचली बरं का काका........पन पटली प्रियालीताईंची.

उपकरमपंत्

आवं आवर घाला असल्या लोकास्नी. खरडव्हय समद्या पब्लिकसाटी खुल्ली असते हे यास्नी म्हाईत न्हाई का? त्वांडाला येईल ते बोलत सुटन्यासाटी दिली हाये का ती? उपक्रमाचं वाट्टुळ कोनामुळे व्हईल ते कळतंय हा!

- राजीव.

म्या खेडुताचा फ्यान हाय.

अजून तरी कुठे आहे?

हे बरंय तुमचं!

अजून तरी कुठे आहे आपला प्रतिसाद?
यातल्या एकाला तर उत्तर द्या हो!
तात्यांनी प्रश्न विचारले आहेत, दिलदार पणे माफी ही मागितली, पण त्यावर तरी तुम्ही कुठे काय उत्तर दिले?
तुम्ही एकतर्फी संवाद ठेवता आणी सगळ्यांनी त्याला माना डोलवाव्यात अशी अपेक्षा करता?

इथे चर्चा सोडाच लेख टाकणार्‍यानेही प्रतिसाद द्यावेत अशी सदस्यांचे अपेक्षा आहे. एक उदाहरण देतो.

आपण राधिका यांचा अभ्यासपुर्ण लेख वाचल्यास नि त्यांना आलेली उत्तरे पाहिल्यास आपला हा भ्रम नक्कीच दूर होईल!

तेंव्हा सांगण्याचा उद्देश असा की 'इमोशनल ब्लॅकमेल' करू नका!

आपला
(ब्लॅक 'मेल')
गुंडोपंत

सहमत...

तुम्ही एकतर्फी संवाद ठेवता आणी सगळ्यांनी त्याला माना डोलवाव्यात अशी अपेक्षा करता?

हेच म्हणतो. गुंड्याशी सहमत आहे!

तात्या.

कालचा गोंधळ बरा होता

... लेटस् होप सेन्स् प्रीव्हेल्स्!

लिहीत रहा

शिल्पाताई,
प्रत्येक संकेतस्थळ किंवा समाज म्हटला की तिथे हौशे गवशे आणि नवशे हे असणारच. तुमच्या काही लेखांवरचे काही प्रतिसाद मलाही आवडले नव्हते. पण ते केवळ 'एका स्त्रीने लेखन केले आहे' म्हणून नसावेत कदाचित.मद्य हा विषयच असा आहे. आणि आम्ही इथे संगणकावर बसून तुमच्या लेखांची स्तुती/टवाळी करणार. प्रत्यक्ष जी गावे व्यसनमुक्त झाली त्यांनाच कळणार की 'गाव व्यसनमुक्त झाले' या आमच्यासाठी केवळ एक वाक्य असलेल्या शब्दसमूहात त्या गावकर्‍यांचे, त्यांच्या बायकामुलांचे किती सुटकेचे निश्वास दडले आहेत ते.
अंधश्रद्धेने म्हणा किंवा कोणत्याही उपायाने म्हणा, एखाद्या गावातले बहुतांश लोक व्यसनमुक्त होत असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे. आपले लिखाण वाचून मद्यमुक्तीच्या संदर्भात स्वाध्याय परीवाराने केलेली काही यशस्वी कामे आठवली.
एखादे लिखाण होते तेव्हा ते काहीना आवडते, काही आवडत नाही. शिवाय प्रत्येकाला काय प्रकारच्या माहितीत जास्त रुची आहे हाही एक मुद्दा आहेच. लिखाण आवडणारे सर्व जण आवर्जून तसा प्रतिसाद वेळेअभावी देतीलच असे नाही. तसेच लिखाण न आवडलेले सर्व जण तसे प्रतिसाद देऊन लिखाणात नक्की काय आवडले नाही ते सांगतीलच असे नाही. सारांश, आपल्याला आलेले काही २-३ जणांचे अनेक नकारात्मक प्रतिसाद पूर्ण उपक्रम आणि उपक्रमी वाचकांचे प्रतिनीधीत्व करत नाहीत. आपण लिहीत रहावे. आम्हाला अशा कार्यांची माहिती देत रहावी. शिवाय वर कोणीतरी लिहीले तसे आणखी तपशीलात माहिती, नावे , छायाचित्रे आणि प्रतिसादातील प्रश्नांची आपण दखल घेणे याने अशा कामांत सहभाग देऊ इच्छिणार्‍याना प्रोत्साहनही मिळेल.

माझे मत

शिल्पा
येथे प्रत्येकाने आपल्यापरिने आणि आपापल्या पद्धतीने प्रतिसाद लिहिले आहेत. यात बहुतेक सदस्यांचे स्वभाव वैशिष्ठ्य सुद्धा आले आहे. आपण काय करायचे हा आपला प्रश्न आहे. पण काही **** प्रतिसांदामुळे आपण जर येथे लिहिणे थांबवणार असलात तर तुम्ही तुमच्याच कार्याचा अपमान करत आहात असे मी म्हणेन.

येथे मी जातो म्हणून दवंडी पिटणारे आणि नंतर गप्प पणे मान खाली घालून परत येणारे आहेत. आणि तेच पुन्हा असा मी असामी असे मिरवणारे सुद्धा आहेत. आपण काय करायचे हा आपला प्रश्न आहे. उपक्रमावर नियमीत लिहिणारे, वाचणारे आणि त्यावर आपापल्या स्वभाव वैशिष्ठ्यांनी प्रतिसाद देणारे आहेत. तुम्ही काही निवडक लोकांसाठी त्यांच्या प्रमाणेच स्टंटबाजी करणार असाल तर आम्हाला नक्किच खेद होइल. तसेच अशा लोकांसाठी तुम्ही तुमचे लेखन थांबणार असाल आणि त्यांच्या प्रतिसादांवरून इतर सर्वांना स्त्रित्वाचा अपमान करणारे असा गंभीर आरोप करत असाल तर तो इतर उपक्रमींचा काहीही कारण नसताना केलेला अपमान आहे असे मी म्हणेन.

तसेच, आपण अनेकदा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलेली नाहीत हे सुद्धा सत्य आहे. तुम्ही जेंव्हा एखादी गोष्ट सार्वजनीक करता त्यावेळी समाजाला तुम्हाला उत्तर द्यायचे आहे हे खरे नाही का?

आपण जर नुसतीच स्टंटबाजी करणार असाल तर वृत्त आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्या बद्दलची विश्वासार्हता तुम्ही कमी करत आहात जी मुळातच कमी होत चालली आहे. असो.

लेखन करायचे कि नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. तुम्ही चर्चा सुरू केलीत म्हणून हे प्रतिसाद आले.





मराठीत लिहा. वापरा.

क्या बात है!

आपण जर नुसतीच स्टंटबाजी करणार असाल तर वृत्त आणि प्रसिद्धी माध्यमे यांच्या बद्दलची विश्वासार्हता तुम्ही कमी करत आहात जी मुळातच कमी होत चालली आहे. असो.
वा क्या बात है!!! जोरदार टिप्पणी चाणक्यराव आज जोरात दिसत आहेत!!

उपक्रमावर नियमीत लिहिणारे, वाचणारे आणि त्यावर आपापल्या स्वभाव वैशिष्ठ्यांनी प्रतिसाद देणारे आहेत.

की हे पण असे वैशिष्ट्य आहे की काय ??

पण काही **** प्रतिसांदामुळे

हे ४ स्टार प्रतिसाद म्हणजे कोणते बॉ?

आपला
गुंडोपंत

लिहीत रहा

शिल्पाजी ,

लिहीत रहा

नीलकांत

केवळ स्त्रीत्वाचा अपमान

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शिल्पा दातार जोशी यांच्या लेखावरील सर्व प्रतिसाद वाचले. पुन्हा एकदा वाचले. आणि मी थक्क झालो. प्रभावित झालो.प्रत्येकाने अगदी विषयाला धरून बिनतोड लिहिले आहे.त्याच बरोबर अत्यंत समंजसपणे आणि संयमपूर्ण रीतीने लिहिले आहे.उपक्रमाच्या या सदस्यांचे विचार किती प्रगल्भ आणि परिपक्व आहेत याची प्रचीती हे प्रतिसाद वाचून येते. शिल्पा दातार जोशी यांनाही ती यावी अशी अपेक्षा आहे.(मला असे बिंदुगामी--टु द पॉइंट--लेखन इतक्या सहजतेने करता येत् नाही. ते असो.) "हा केवळ स्त्रीत्वाचा अपमान आहे" हे शिल्पा दातार जोशी यांचे विधान पूर्णतया चुकीचे आहे. त्याचे समर्थन होऊच शकत नाही.
.......आजानुकर्ण,मिसळपाव,गुंडोपंत यांच्या नांवांवर जाऊ नका.ते प्रसंगी कसे खणखणित लिहितात ते वाचा.एकलव्य,,प्रमोदकाका,विसुनाना,विकास,प्रकाश,राजीव,विनायक,चाणक्य हे सगळे एकापेक्षा आहेत. (एकसे बढकर एक).त्यानी लिहिलेल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अनु यांनी आपल्या स्वभावानुसार सौम्य लिहिले आहे.
......पण खरा भेदक आणि मर्मग्राही प्रतिसाद लिहिला आहे तो प्रियाली यांनी.तो वाचताना भीतीच वाटावी!त्यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रतिवाद संभवतच नाही.इतके ते मूलगामी आणि निरुत्तर करणारे आहेत. "...... परंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल." यावर कोण काय उत्तरणार?"चुकले माझे .क्षमा करा " एवढेच लिहिणे शिल्पा दातार जोशी यांच्या हाती राहाते.(याज्ञवल्क्य आणि गार्गी यांच्या संवादाविषयी तुम्ही वाचले असेल. निरुत्तर करून टाकणारा गार्गीचा युक्तिवाद ऐकून याज्ञवल्क्य म्हणतो "गार्गी,चूप बैस. नाहीतर तुझे डोके धडावेगळे केले जाईल."काही जणांना हे विधान पुरुषप्रधानतेचे द्योतक वाटते.मला तसे वाटत नाही.उत्तरच देता येईना तर तो तरी म्हणणार काय?"........ [असो. उपरोल्लेखित प्रतिसादां सारखे बिंदुगामी लेखन सोपे नाही हे खरे.])

»

बिंदुगामी

टू द पॉईंट साठी हा शब्द अतिशय आवडला.

सही है भिडू! :)

परंतु ज्या ग्रामस्थांनी कोणतीही मदत नसताना खडतर प्रश्नांवर त्यांनी तोडगे काढले यावर आपण विविध लेख लिहिता त्या लेखांतून आपण स्वतः काहीही शिकला नाहीत असे म्हणावे लागेल."

सही है भिडू! :)

.(मला असे बिंदुगामी--टु द पॉइंट--लेखन इतक्या सहजतेने करता येत् नाही. ते असो.)

बिंदुगामी हा शब्द मस्त आहे!

......पण खरा भेदक आणि मर्मग्राही प्रतिसाद लिहिला आहे तो प्रियाली यांनी.तो वाचताना भीतीच वाटावी!त्यांनी मांडलेल्या मुद्यांवर प्रतिवाद संभवतच नाही.इतके ते मूलगामी आणि निरुत्तर करणारे आहेत. "......

प्रियालीभाभी की जय हो! :)

आपला,
(प्रियालीचा दोस्त!) तात्या अभ्यंकर.

जन पळभर म्हणतील हाय हाय.

उपक्रमपंतानी एक विचारपीठ दिले आहे.ते माहितीची देवाण घेवाण व्हावी म्हणून. माझ्यासहीत अनेकांची आपल्या लेखाला आपल्या दृष्टीने काही प्रतिसाद टवाळक्या म्हणून आले असतील. पण विचारांची देवाण घेवाण होत नव्हती,मग आमच्या प्रतिभेला पंख फूटले तर त्यात नवल ते काय ? खरे या वादळाची सुरुवात मीच केलीय असे वाटते.काल दिलेल्या प्रतिसादाला आपण पहिल्यांदा उत्तर दिले. तेव्हाच वादळाला सुरुवात झाली होती.
अहो,स्त्रीत्वाचा अपमान म्हणून आपण जो डांगोरा पीटत आहात तो विश्वसनीय नाही.या अगोदर ज्यांचा उल्लेख झाला आहे.त्या महिला सदस्यांचे अभ्यासपूर्ण लेख पहा,इतके चांगले लिहूनही त्या लेखांवर(माझ्यासारख्यांचा) खवचट प्रतिसादानंतरही त्यांचा संयम वाखाणण्याजोगा आहे.त्यांना तर माझा नमस्कारच आहे.त्या ज्या संयमाने उपक्रमवर लिहितात ना त्याचे महत्व आपल्या संतापानंतर कळते आहे.त्यांनी कधीही महिला म्हणून किंवा स्त्रीत्वाची ढाल पूढे केल्याचे माझ्या तर वाचनात नाही.
असो खरे तर आपण इथेच लिहित राहावे असे माझे मत आहे.पण आपण जर आपल्या विचारावर ठाम असाल तर "जन पळ भर म्हणतील हाय हाय" इतकेच इथे होईल असे वाटते, किंवा ग्रामविकासाच्या बातम्यांसाठी वेगवेगळ्या दुव्यांवर जावे लागेल इतकेच.या पेक्षा अधिक काय.
असो,आपल्या पूढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !

अवांतर ;) मी जाण्याची घोषणा करून माझ्यासाठी इतके एकापेक्षा एक सरस(अपवाद आहेत इथेही)प्रतिसाद आले असते का ? नसतेच आले.पण आपल्याइतके प्रतिसाद मला बोलते करण्यासाठी आले असते तर मी आजीवन सदस्य म्हणून इथे लिहित राहिलो असतो;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंटेन्ट इज किंग

या चर्चेत मला एकच सुचवावेसे वाटते ते म्हणजे उपक्रम हे चर्चेचे व्यासपीठ असले तरी त्यातून निर्माण होणारी माहिती ही खुपच मौल्यवान आहे. इथल्या प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी खासियत आहे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, व्यासंग आहे. त्याचा फायदा एकमेकांना होत असतो. मुळातच इंटरनेट हे मुक्त विचारांचे माध्यम आहे. त्याला कुणी रोखू शकत नाही. उपक्रम वरील आजच्या माहितीचे पुढल्या काळात मोठे संदर्भमूल्य असू शकते. प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे लिहू द्या. शिल्पा जोशी यांचे लिखाण हे लेख या प्रवर्गात असते. चर्चेच्या प्रस्तावात प्रतिसादांना उत्तर देणे आवश्यक आहे. कारण त्याचा हेतूच चर्चा घडवून आणणे हा असतो. लेख हा माहितीपर प्रकार आहे, त्यामुळे त्यावर उत्तर दिलेच पाहिजे अशी कोणी अपेक्षा ठेवू नये. परंतु लेखनाला संदर्भ दिल्यास उत्तमच.

मुक्त व्यासपीठ या प्रकारामध्ये कोणी कोणाला चालते व्हा असे सांगणे औचित्याला धरून होणार नाही. कुणी गेल्यास नुकसान फक्त उपक्रमचे नाही तर आपल्या सर्वांचेच आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक माहितीचे मूल्य आहे. संकेतस्थळाची किंमत ही त्यावर असलेल्या मौल्यवान माहितीवर अवलंबून आहे. कारण Content is King.
आता उगाचच वाद वाढवू नये. आपण सर्व् सुजाण आहोत. भांडण्यात काय हशील!
-जयेश्

सहमत - असहमत.

कंटेन्ट इज किंग,या चर्चेत मला एकच सुचवावेसे वाटते ते म्हणजे उपक्रम हे चर्चेचे व्यासपीठ असले तरी त्यातून निर्माण होणारी माहिती ही खुपच मौल्यवान आहे. इथल्या प्रत्येक सदस्याची स्वत:ची अशी खासियत आहे. प्रत्येकाचा वेगवेगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे, व्यासंग आहे. त्याचा फायदा एकमेकांना होत असतो. मुळातच इंटरनेट हे मुक्त विचारांचे माध्यम आहे. त्याला कुणी रोखू शकत नाही. उपक्रम वरील आजच्या माहितीचे पुढल्या काळात मोठे संदर्भमूल्य असू शकते. प्रत्येकाला त्याच्या मनाप्रमाणे लिहू द्या. शिल्पा जोशी यांचे लिखाण हे लेख या प्रवर्गात असते.

या परिच्छेदाशी पूर्ण सहमत. शिल्पाताईंना ग्रामविकासावरील लेख सोडून चित्रपट परीक्षण लिहा असे सांगितलेले मी तरी कोठे वाचले नाही.

लेख हा माहितीपर प्रकार आहे, त्यामुळे त्यावर उत्तर दिलेच पाहिजे अशी कोणी अपेक्षा ठेवू नये. परंतु लेखनाला संदर्भ दिल्यास उत्तमच.

उपक्रम म्हणजे मराठी विकिपीडीया नाही. येथील लेख त्यांतील सभासदांनी वाचावेत, त्यावर शंका विचाराव्यात इ. हेतूंनी लिहिले असतात. येथे ललित लेखन नाही त्यामुळे माझ्या कथेचा शेवट मला हवा तसाच मी ठेवणार असे लेखक म्हणतो, ते येथे होणे योग्य नाही. आपली विश्वासार्हता कशी वाढवायची हे लेखकाच्या हातात असते. (लेखांवर चर्चा विकिवरही होतात. तेथेही डोळे झाकून लेख स्वीकारले जात नाहीत.) लेखांना संदर्भ किंवा उत्तरे द्यायला हवीत अशी जबरदस्ती कोणीच करू शकत नाही, त्याचप्रमाणे लेख आवडला नाही, त्यातील विचार पटले नाहीत म्हणून उपहासाने केलेली टिंगलही रोखू शकत नाही. तसे होऊ द्यायचे नसेल तर लेखकाने तशी ताकिद वाचकांना द्यावी किंवा त्यांच्या शंकांचे निरसन करावे. शंकानिरसनातूनही कंटेंट मिळेल आणि तो वाचकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल असे नाही का वाटत?

मुक्त व्यासपीठ या प्रकारामध्ये कोणी कोणाला चालते व्हा असे सांगणे औचित्याला धरून होणार नाही.

जाण्याचा निर्णय चर्चा लेखिकेचा स्वतःचा आहे, त्या प्रौढ आणि सज्ञान असाव्यात. त्यांना 'चालते व्हा' असे सांगितलेले मला तरी दिसले नाही. फक्त एका प्रतिसादात त्यांच्या निर्णयाला योग्य ठरवून त्यांनी येथे लिहू नये असे सांगितले आहे. आपल्याला चालते व्हा असे कोठे दिसले कळले नाही.

आता उगाचच वाद वाढवू नये.

हे बाकी खरंच! प्रतिसाद देताना सत्यासत्यता पडताळून पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. बेफाम विधाने आणि आरोप कोणाच्याच पथ्यावर पडत नाहीत.

आशयाला प्राधान्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
छान,उत्तम जयेश.भले,भले.साधु,साधु. तुमचा प्रतिसाद मौलिक आहे. तो वाचून त्यावर सर्वांनीच मनन करावे,असा आहे. किती समंजसपणे लिहिले आहे! वा! लेखनातील आशयालाच प्राधान्य द्यायला हवे.आपण सर्वजण परस्परांकडून खूप काही शिकू शकतो हे अगदी खरे आहे.मला कोणाची स्तुती करायचे कारण नाही.वाचल्यावर जे वाटते तेच लिहिण्याचा प्रयत्‍न करतो.

माझा अनुभव

"उपक्रम" सारख्या संस्थळांवर बरेचशे सदस्य माझ्यासारखे "निष्क्रिय सदस्य" असतात. ज्यांना वाचनाची आवड असते परंतु लिहिण्यासारखे त्यांच्याकडे काही नसते किंवा त्यांना लिहिण्यात रस नसतो.

तुमच्या लेखांच्या वाचनाची संख्या हि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादांपेक्षा जास्त आहे, यावरून तुम्हाला "निष्क्रिय सदस्यांचा" अंदाज येईल.

असो. उपक्रमाकडून तुम्ही बाळगलेल्या अपेक्षा पूर्णं झाल्या नाहीत. इतर कोणत्याही संस्थळाकडून त्या पूर्णं होतील असे मला वाटत नाही. ब्लॉग लिहून त्या पूर्णं होतील असेही वाटत नाही. कारण तुम्ही या लेखात ब्लॉगचा पत्ता दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या लेखाचे वाचन होईल व चुकून एखाद्याकडून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जे तुम्हाला अनपेक्षित असेल. मग कालांतराने तुम्ही ब्लॉग लिहिणे बंद कराल.

हा संभाव्य धोका डायरी/रोजनिशी लिहिण्यामध्ये नसतो असा माझा अनुभव आहे. यामध्ये आपल्याला सामाजिक लेखन केल्याचा आनंद मिळतो आणि चांगल्या गोष्टींची कदर करणाऱ्यांना आपल्या मर्जीतल्यांना आपण आपले लिखाण वाचनासाठी देऊ शकतो. त्यामुळे विनाकारण वाद घालून वेळ जाण्याची शक्यता कमी असते.

मुझे कुछ कहना है.

वाचन करीत जावे.हा मार्ग चांगला आहे.

चर्चेच्या निमित्ताने

या चर्चेच्या निमित्ताने सर्व सदस्यांना उपक्रमवरील लेखनविषयक मार्गदर्शक तत्त्वांची आठवण करून द्यावी या उद्देशाने हा प्रतिसाद,

उपक्रमवर सदस्यांना विषयानुरूप अनुकूल वा प्रतिकूल मते मांडण्याची संधी आहे, पण आपली मते, आग्रह, आक्षेप व्यक्त करताना भाषा सौम्य आणि शिष्टसंमत असावी. जाळ्यावर नव्या असणार्‍या सदस्यांना अनुभवी सदस्यांनी संयमपूर्वक आपले म्हणणे कळवावे. हेतुपूर्वक उपहासात्मक, टिंगलटवाळी करणारे आणि/किंवा असंबद्ध, व्यक्तिगत पातळीवर जाणारे प्रतिसाद देऊ नयेत अश्या सूचना वेळोवेळी दिल्या गेलेल्या आहेत. या अनेक सूचनांनतरही जर जाणीवपूर्वक त्यांचे उल्लंघन केले जात असेल तर अश्या सदस्यांच्या लेखनावर काही मर्यादा/बंधने आणावी लागणे आवश्यक होऊ शकते याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रतिसादाव्यतिरिक्त खरडवह्यांतील नोंदी, व्यक्तिगत निरोप यातही काही आक्षेपार्ह, व्यक्तिगत निंदानालस्ती करणारे लेखन आढळल्यास निरोपातून कळवावे.

शंका, सूचना, प्रश्न निरोपातून कळवावेत.

अलविदा

उपक्रमराव

माझे सदस्यत्व रद्द करून माझे लेखन काढून टाकावे. हा त्रागा नाही. कोणावरही राग नाही. इथे आपले जमणार नाही असे लक्षात आल्याने अतिशय थंड डोक्याने व नशापाणी न करता घेतलेला हा निर्णय आहे.

धन्यवाद

विनायक

अलविदा!

अलविदा विनायकराव!

तुम्ही आपले आमच्या मिसळपाव वरच या आता डायरेक्ट. तिथेच तुमचं जमेल! :)

अरे माझा विनायक उपक्रम सोडून गेला हो..... :((

तात्या.

अरे काय तात्या?

अरे जात्या माणसाला ये म्हणायचं सोडून जा म्हणताय!??!!
बरं बॉ यातला तुमचा 'अनुभव' मोठा... आमचा छोटा

आपला
तात्या भजनी लागलेला
गुंडोपंत

उपक्रम सोडून गेला हो.....

तात्या तुमीबी येका टायमाला सोडून जानार व्हता.. हित तुमासनी कुत्र्यावानी वागवत्यात इथपत्तुर म्हनाला व्हतात..इसरलासा?.. तवा आमी जर.."आरारारा आमचा तात्या ग्येला वो सोडून" असा गळा काडला असता तर आमच्या नावानं फ आनि झ नं सुरु व्हनार्‍या किती शिव्या दिल्या असत्या?

आत्मपरिक्षण

माझे सदस्यत्व रद्द करून माझे लेखन काढून टाकावे. हा त्रागा नाही. कोणावरही राग नाही. इथे आपले जमणार नाही असे लक्षात आल्याने अतिशय थंड डोक्याने व नशापाणी न करता घेतलेला हा निर्णय आहे

.
विनायक राव हाच प्रश्न स्वत: च्या मनाला विचारा. बघा १००% सहमतीचे उत्तर मिळते का? तुमच्याच मनात द्वंद्व झालेले तुम्हाला दिसेल. फार तर काही काळ अज्ञातवासात जा. फक्त वाचक म्हणून या.
आपलाच आपण जाउ नये असे मनातून वाटणारा

( महाभाग)
प्रकाश घाटपांडे

विनायकराव

चार टाळकी एकत्र आली आणि जर प्रत्येकाचे प्रत्येकच बाबतीत पटले तर त्याचा अर्थ ते यंत्रमानवच असणार कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या असणारच. इथे माझ्यावरतीपण टवाळकी केली आहे, मी पण इतरांशी वाद घातला आहे आणि तेव्हढ्या मर्यादीत संदर्भात एव्ह्ढे नक्की म्हणीन की त्यामुळे मी इतरांना कमी लेखले नाही अथवा मला पण कोणी कमी लेखले असे वाटले नाही. आणि लेखले असले तर who cares! तात्यापण चिडतात, चिडवतात आणि जरा भांडलो की उगाच वाद न घालता दिलखुलासपणे माघार घेतात. ते गुंडोपंत, त्यांना बिचार्‍यांना मी "धोंडोपंत" म्हणालो तरी ते काही रागावले नाही! :-)

कदाचीत अवांतरः तुम्ही ज्ञानेश्वरी जालावर मिळण्याची व्यवस्था केलीत. ती वाचली तर नक्कीच असेल. मी वाचली नाही पण ज्ञानेश्वरांना ज्यावरून ती लिहीण्याचे सुचले त्या भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला लढ (अर्थात कर्म कर) म्हणून सर्वप्रकारचे जीवनातील तत्वज्ञानाचे संदर्भ देऊन सांगतो आणि शेवटी एव्हढे करून म्हणतो की , (गीताई:) "असे गुढाहुनी गुढ बोलिलो ज्ञान मी तुज, ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी ||" जीवनाकडे बघण्याच्या मूळ तत्वज्ञानातील हा हिंदू आणि इतर धर्मातला फरक आहे. माझेच खरे मानून तसेच वागले पाहीजे असे कृष्णाने अर्जूनाला सांगीतले नाही, पण विचारांती योग्य निर्णय घेण्यास सांगीतले...

थोडक्यात, आम्ही पण तुम्हाला काय किंवा अजून कुणाला काय फार गुढ नाही पण व्यावहारीक गोष्ट सांगण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला, आता "ध्यानी घेऊनी ते सारे स्वेच्छेने योग्य ते कराल अशी आशा करतो...

अतर्क्य

ते गुंडोपंत, त्यांना बिचार्‍यांना मी "धोंडोपंत" म्हणालो तरी ते काही रागावले नाही! :-)

काय करणार?
येत असतात 'अतर्क्य अनुभव' असेही!! ;)

आपला
अतर्क्य
गुंडोपंत

माझाही अनुभव!

मी देखिल एकदा गुंडोपंतांचा धोंडोपंत केलाय. पण नशीब माझे दोघांपैकी कुणीही त्यावर आक्षेप घेतला नाही! नशीब माझे!सगळी सज्जन माणसे इथे आहेत! नाहीतर...नकोच! कल्पनाही करवत नाही(कल्पना ही 'करवत' कशी असेल?)!
तुमचा बुवा नको तिथे विनोद!

===========================
मराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.
===========================

अरे वा मी?

सगळी सज्जन माणसे इथे आहेत!
अरे वा मी पण सज्जन?
गुदगुल्या झाल्या... अजुनही होतायत!
एकदम उपक्रम पंताने माझी प्रतिक्रीया एकदा लेख मह्णून (चुकुन?) चढवली होती तसेच वाटतेय... जड जड!!! ;)
(परत काही त्यांनी तसे केले नाही बरं का!!)

धन्यवाद!
आपला
सज्जन
गुंडोपंत

उद्वेग समजण्यासारखा

शिल्पाताईंचा उद्वेग समजण्यासारखा आहे. त्यांची बाजू समजून घेण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही हे अधिकच क्लेशकारक आहे. त्यांच्या प्रत्येक लेखातील फक्त दारुबंदी या शब्दाला लक्ष्य करून प्रतिसाद दिले गेले. एक दोनदा गंमत म्हणून मानले तरी प्रत्येक लेखाला तसे प्रतिसाद देण्यामागे केवळ टर उडवण्याचा हेतू आहे हे स्पष्ट होते. काही लेखात दारुबंदीचा उल्लेख नसतानाही "कुठल्या गावात किती दारुचे गुत्ते बंद पाडले हे न सांगणारा लागोपाठ दुसरा लेख. अभिनंदन! :)" अश्या प्रतिसादामागे टिंगल करण्याशिवाय इतर कोणताही उद्देश नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे.
त्याहीपुढे एका प्रतिसादात "आता जरा दोनचार दिवस तरी ब्रेक घ्या बुवा! " असे म्हणणे (आपल्याला आवडत नसेल तर न वाचण्याचा पर्याय असताना) आणि इतर सदस्यांना तुम्हीही तसेच प्रतिसाद द्या म्हणून सांगणे जाणूनबुजून अपमान करणेच आहे.
काही लोकांची गंमत होते पण त्यामुळे चांगले लेखन करणारे लोक नाउमेद होतात. असे वर्तन करणार्‍यांवर आवश्यक ती कारवाई करावी अशी आग्रहाची विनंती आहे.
आपला
(स्पष्टवक्ता) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

 
^ वर