देव,धर्म आणि गाजरचित्रे

देव,धर्म आणि गाजरचित्रे
काठीच्या टोकाला गाजर लटकावून गाढवाला ते सहजपणे मिळणार नाही
अशा बेताने काठी गाढवासमोर धरून चालू लागल्यास गाजर खायला मिळेल या आशेने ते काठीमागून चालू लागते हे बहुतेकांना ठाऊक आहेच.
त्या गाढवाला वाटते की लटकणारे गाजर यदाकदाचित् खाली पडेल किंवा काहीतरी घडून आपल्याला ते खायला मिळेल.त्याची ही अपेक्षा अवास्तव आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.गाजर काल्पनिक नाही.ते खरे आहे. ते खायला मिळण्याची संभवनीयता कमी असली तरी शून्य नाही.गाजर मिळणे अशक्यप्राय नाही.म्हणून गाढवाचे काठीमागून चालणे समर्थनीय आहे.
त्या काठीला खरे गाजर लटकवण्या ऐवजी जर गाजराचे रंगीत चित्र टांगले तर
गाढव काठीमागून चालत येत नाही.कारण जे पुढे दिसते आहे ते आपल्याला माहीत असलेले गाजर नव्हे.खोट्या गोष्टीमागे लागण्यात अर्थ नाही.आपले श्रम आणि वेळ वाया जातील एव्हढे त्या गाढवाला कळते.
पण धार्मिक श्रद्धाळूचे तसे नाही.त्याच्यापुढे स्वर्गाचे केवळ शाब्दिक चित्र असते.ते वेदांत वर्णिले आहे,पुराणात सांगितले आहे म्हणून खरेच असणार अशी त्याची श्रद्धा असते.
स्वर्गात केवळ सुखच सुख आहे.तिथे कल्पतरूंच्या बागा आहेत.कामधेनूंची खिल्लारे आहेत.मनात आणावे ते तत्काळ मिळते.नंदनवनात विहार करावा.गंधर्वांचे गायन ऐकावे.अप्सरांचे नृत्य पहावे.मनसोक्त अमृत प्यावे.आराम करावा. नैसर्गिक आपत्ती,दु:ख,कष्ट काही नाही.श्रद्धाळूला स्वर्गाचे हे वर्णन खरे वाटते.जे मृत्यूनंतर प्राप्त होईल असे सांगतात त्या काल्पनिक स्वर्गसुखप्राप्तीच्या मागे तो आयुष्यभर लागलेला असतो.यज्ञयागादि अनेक कर्मकांडे करतो. तीर्थक्षेत्रांना जातो.तिथे पवित्र दिवशी स्नान करतो. त्याच्या समजुतीप्रमाणे पुण्य जोडतो. व्यवहारात"आज रोख उद्या उधार" असे त्याचे तत्त्व असले तरी देवा धर्माची गोष्ट असली की काहीही पटते. जो झाल्याचे कुणाला कधी आठवत नाही त्या पुढच्या जन्माचा वायदा चालतो.
स्वर्गाचे हे चित्र अगदीच बटबटीत आणि ढोबळ आहे.काही धार्मिक व्यक्तींनाही ते पटत नाही.खरे वाटत नाही.शिवाय "क्षीणे पुण्य़े मर्त्यलोकं विशन्ति।" हे आहेच.म्हणजे स्वर्गसुख शाश्वत नव्हे.म्हणून काही जणांसाठी मोक्षाचे चित्र निर्माण झाले.
प्रत्येक सजीव शरीरात आत्मा असतो.तो आत्मा परमात्म्यात विलीन होणे म्हणजे मोक्ष.तो मिळाला की प्राणी जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाला.अशी आध्यात्मिक कल्पना आहे.हे सर्वश्रुत आहे.
स्वर्ग म्हणजे सुखच सुख तर मोक्ष म्हणजे ब्रह्मानंद, परमानंद,महदानंद, सच्चिदानंद, केवलानंद.सगळा आनंदी आनंद!! मोक्षप्राप्तीचे मार्ग बिकट आहेत.पण"शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोSभिजायते" असे मधाचे बोट लावले आहे्.सर्वसामान्यांसाठी भक्तिमार्गाचे गाजरचित्र आहे. केवळ नामसंकीर्तन करा,विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि मोक्षाचे अधिकारी व्हा.मात्र मृत्यूनंतर ! अशा या भ्रामक मोक्षाच्या गाजरचित्राकडे बघत अनेक आध्यात्मिक लोक आयुष्यभर वाटचाल करत असतात.
देव ,धर्म यांच्या आधारे कसलेही भ्रामक चित्र निर्माण केले,त्याला वेद,शास्त्रे,पुराणे,परंपरा, संस्कृती यांचा आधार आहे असे म्हटले,ते त्रिकालज्ञ ऋषींनी निर्माण केले आहे असे ठोकून दिले,की भोळसट श्रद्धाळू त्या चित्रामागे चालू लागतात. ही मानसिकता लक्षात आल्यावर समाजातील धूर्त,चाणाक्ष,लबाड आणि स्वार्थी लोकांनी अशी अनेकानेक गाजर चित्रे निर्माण केली.त्यांच्याद्वारे भोळसट श्रद्धाळूंची लुबाडणूक चालू आहे.

Comments

हे सर्व कोठून येते?

ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या इथे देतो.

यज्ञयाग करून स्वर्गाची इच्छा करणार्‍या याज्ञिकांबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात. (९वा अध्याय)

३०७ - ३१८ ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर स्वर्गाची इच्छा धरणे हे चुकीचे आहे. यज्ञ वगैरे हे पुण्यात्मक पाप करून स्वर्ग मिळतो तर पापात्मक पापाने नरक मिळतो, स्वर्ग - नरक या दोन्ही चोरांच्या वाटा आहेत, माझे (परमात्म्याचे) स्वरूप दोन्हीपेक्षा वेगळे आहे असे सांगतात.

देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी । विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती ॥ ३०७ ॥
यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके । क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥ ३०८ ॥
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरुप । तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें ॥ ३०९ ॥
जे श्रुतित्रयांते जाणोनि । शतवरी यज्ञ करुनि । यजिलिया मातें चुकोनि । स्वर्गु वरिती ॥ ३१० ॥
जैसें कल्पतरुतळवटीं । बैसोनि झोळिये पाडी गांठी । मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करुं ॥ ३११ ॥
तैसे शतक्रतूं यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें । आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ॥ ३१२ ॥
म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु । ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥ ३१३ ॥
एऱ्हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख । वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरुप माझें ॥ ३१४ ॥
मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा । स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५ ॥
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे । पापात्मकें पापें नरका जाइजे । मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता । तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ॥ ३१७ ॥
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित । यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥

ओव्या क्र. ३१९ ते ३२७ पर्यंत स्वर्गातील ऐश्वर्याचे वर्णन करतात.

मग मी न पविजे ऐसें । जें पापरुप पुण्य असे । तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥ ३१९ ॥
जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥ ३२० ॥
जेथ महासिद्धींची भांडारें । अमृताचीं कोठारें । जियें गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥
जेथ वोळगे देव पाइका । सैघं चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरुंचिया ॥ ३२२ ॥
गंधर्वगान गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी । उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥ ३२३ ॥
मदन वोळगे शेजारे । जेथ चंद्र शिंपे सांबरें । पवना ऐसें म्हणियारें । धांवणें जेथ ॥ ३२४ ॥
पैं बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण । ताटियेचे सुरगण । विकार जेथें ॥ ३२५ ॥
लोकपाळरांगेचे । राउत जिये पदीचे । उचैःश्रवा खांचे । खोलणिये ।। ३२६ ॥
हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे । ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥ ३२७ ॥

ओव्या ३२८ - ३३४ मध्ये घणाघाती टीका करतात.

मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥ ३२८ ॥
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगो ॥ ३२९ ॥

अर्थ - वेश्येचा उपभोग घेणारा मनुष्य पैसा संपल्यावर तिचे दारही चेपू शकत नाही तसे या याज्ञिकांची लाजिरवाणी स्थिती होते.

एवं थितिया मातें चुकले । जीहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥ ३३० ॥
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥
अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥
अर्जुना वेदु जऱ्ही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला । कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३ ॥
म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

तसेच एका ठिकानी ज्ञानेश्वरांनी अनेकदेवतांची उपासना करणार्‍यांवर अशीच घणाघाती टीका केली आहे. (१३ वा अध्याय)

कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी । आदिलाची परवडी । करी तया ॥ ८१२ ॥
तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे । तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे ॥ ८१३ ॥
प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया ॥ ८१४ ॥
माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी । आपण देवो देवी । यात्रे जाय ॥ ८१५ ॥
नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे । पर्वविशेषें कीजे । पूजा आना ॥ ८१६ ॥
माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी । पितृकार्यावसरीं । पितरांचा होय ॥ ८१७ ॥
एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥
चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये । चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥
नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी । आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥
पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे । ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥ ८२१ ॥
ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे उगा क्षणभरी । अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी ॥ ८२२ ॥

अर्थ - असे अखंड भजन करतो, क्षणभरही शांत राहत नाही, गावाच्या वेशीवर पाल ठोकून बसलेली वेश्या जशी सर्व गावाच्या कृपेने सुखी असते तसे याचे असते.

यज्ञात पशुहिंसा करणार्‍या याज्ञिकांबद्दल लिहिले आहे. (१३ वा अध्याय)

तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा । पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला ॥ २२१ ॥
जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें । म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग ॥ २२२ ॥
तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ? ॥ २२३ ॥
पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥ २२४

एकूणात काय थिल्लर पुरोगामी लेखकांपेक्षा ज्यांना श्रद्धाळू धार्मिक म्हणून हिणवतो असे लोकच अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे करू शकतात/केलेले आहे.
(कोणाला कुठल्या ओवीचा/शब्दाचा अर्थ हवा असल्यास सांगावे मी आनंदाने सांगेन, सर्वच ओव्यांचा अर्थ द्यायला आवडले असते, पण विस्तार जास्त होईल, असेही बहुतेक ओव्या सहज समजणार्‍या आहेत)

काका काय कल्लं नाय

ज्ञानेश्वर स्वर्गाची इच्छा धरणे हे चुकीचे आहे. यज्ञ वगैरे हे पुण्यात्मक पाप करून स्वर्ग मिळतो तर पापात्मक पापाने नरक मिळतो, स्वर्ग - नरक या दोन्ही चोरांच्या वाटा आहेत, माझे (परमात्म्याचे) स्वरूप दोन्हीपेक्षा वेगळे आहे असे सांगतात.

काका, 'यज्ञ' करुन पुण्यात्मक पाप कसे होते ? आणि परमात्याम्याचे स्वरुप दोन्हीपेक्षा वेगळे म्हणजे कसे आहे त्यावर जरा निरुपण करा ना....

बाकी, यनासरांचे लेखन 'काही' उपक्रमींसाठी 'गाजरलेखन' आहे असे मला वाटते. :)

- दिलीप बिरुटे
(काकांचा लाडका पुतण्या)

मान्य .... पण

एकूणात काय थिल्लर पुरोगामी लेखकांपेक्षा ज्यांना श्रद्धाळू धार्मिक म्हणून हिणवतो असे लोकच अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे करू शकतात/केलेले आहे.

१.संत ज्ञानेश्वरांना 'श्रद्धाळू धार्मिक' म्हणून हिणवले जात नाही. तत्कालीन परंपरावाद्यांनी त्यांचा छळच केला.
२. सर्व पुरोगामी विचारवंत 'थिल्लर' नसतात.
३. संत ज्ञानेश्वरांच्या वर दिलेल्या विचारांमुळे अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे झाले आहे असे दिसत नाही.

माझे निरीक्षण असे आहे की
मरणानंतर स्वर्ग किंवा नरक मिळण्याचा विचार सामान्य माणसे सहसा करत नाहीत. याच आयुष्यात आपल्याला काही तरी मिळावे एवढ्याच कारणासाठी त्यांचे नवस सायास, तीर्थयात्रा वगैरे चाललेले असतात. त्यांच्यापुढील गाजर (किंवा त्याचे चित्र) इहलोकाशीच संबंधित असते.
जगात देव आहे आणि तो सर्वांचा न्यायनिवाडा करत असतो , त्याच्या काठीला आवाज नसला तरी त्याचा तडाखा कधी ना कधी तरी बसतो अशी एक भीतीसुद्धा मनात असते, त्याला वाटल्यास 'स्टिक' म्हणता येईल

सहमत

मरणानंतर स्वर्ग किंवा नरक मिळण्याचा विचार सामान्य माणसे सहसा करत नाहीत. याच आयुष्यात आपल्याला काही तरी मिळावे एवढ्याच कारणासाठी त्यांचे नवस सायास, तीर्थयात्रा वगैरे चाललेले असतात. त्यांच्यापुढील गाजर (किंवा त्याचे चित्र) इहलोकाशीच संबंधित असते.

+१
यनावालांनी केलेले वर्णन आत्मघातकी धार्मिकांच्या बाबतीत अधिक योग्य वाटते. उदा., रिलिजन्स मिसगायडेड मिसाईल्स

अंदाज खरा!

"रिलिजन्स मिसगायडेड मिसाईल्स"- न बघताही सांगता येईल की, डॉकिन्स"साहेबांचा" लेख असणार.

उत्तरे

१.संत ज्ञानेश्वरांना 'श्रद्धाळू धार्मिक' म्हणून हिणवले जात नाही. तत्कालीन परंपरावाद्यांनी त्यांचा छळच केला.


सर्व श्रद्धा या अंधश्रद्धा असतात असे निर्मूलनवाद्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर, विवेकानंद वगैरे मंडळीसुद्धा "श्रद्धाळू धार्मिक" या कॅटेगरीत येतात

२. सर्व पुरोगामी विचारवंत 'थिल्लर' नसतात.


बरोबर आहे. पण यनावाला म्हणजे कुरुंदकर नाहीत.

३. संत ज्ञानेश्वरांच्या वर दिलेल्या विचारांमुळे अंधश्रद्धानिर्मूलनाचे कार्य प्रभावीपणे झाले आहे असे दिसत नाही.


ज्ञानेश्वरांची जिथे ही अवस्था तिथे यनावाला काय उजेड पाडणार?

संताळे

एक जुनी चर्चा. खिल्जीच्या विजयास भक्तिसंप्रदायाची दैववादी निष्क्रियता (कॅल्विनिस्ट फेटॅलिजम?) (किमान काही अंशी) कारणीभूत आहे असे म्हणता येईल काय? ब्रिगेडला सांगू नका ;)

भावार्थदीपिका हे निरूपण (साधारण १:१४ डायल्यूशन) आहे ना? प्राकृत आणि संस्कृत दोन्ही मला तुटपुंजेच समजतात परंतु "हतो वा प्राप्यसे..." हा श्लोकाला बाजूला सारून ज्ञानेश्वरांनी स्वतःचे घोडे दामटले आहे काय? ज्ञानेश्वरांनी स्वर्ग या संकल्पनेच्या कामनेसच विरोध केला आहे की 'यज्ञ करून स्वर्गप्राप्ती होत नाही' इतकाच संदेश दिला आहे? स्वर्गाची (किंवा मोक्षाची) इच्छा बाळगणेच त्यांना मंजूर नसेल तर त्यांनी 'स्वर्ग (किंवा मोक्ष)' या संकल्पनेची व्याख्याच बदलली असावी, तसे असल्यास ती व्याख्या समजल्यास त्यांचा संदेश समजू शकेल.

खुलासा

खिल्जीच्या विजयास भक्तिसंप्रदायाची दैववादी निष्क्रियता (कॅल्विनिस्ट फेटॅलिजम?) (किमान काही अंशी) कारणीभूत आहे असे म्हणता येईल काय? ब्रिगेडला सांगू नका ;)

राजवाड्यांचे मत असे काहीसे होते. पण अल्लाउद्दीन खिल्जीच्या वेळेस ज्ञानेश्वरी लिहून फक्त ६ वर्षे झाली होती आणि ज्ञानेश्वरांनी नुकतीच समाधी घेतली होती. त्यामुळे भक्तिसंप्रदाय किती प्रभावी होता याबद्दल मला शंका आहे. बाकी हिंदूंमध्ये पूर्वापार चालत असलेली निष्क्रियता कारणीभूत असू शकेल.

भावार्थदीपिका हे निरूपण (साधारण १:१४ डायल्यूशन) आहे ना? प्राकृत आणि संस्कृत दोन्ही मला तुटपुंजेच समजतात परंतु "हतो वा प्राप्यसे..." हा श्लोकाला बाजूला सारून ज्ञानेश्वरांनी स्वतःचे घोडे दामटले आहे काय? ज्ञानेश्वरांनी स्वर्ग या संकल्पनेच्या कामनेसच विरोध केला आहे की 'यज्ञ करून स्वर्गप्राप्ती होत नाही' इतकाच संदेश दिला आहे? स्वर्गाची (किंवा मोक्षाची) इच्छा बाळगणेच त्यांना मंजूर नसेल तर त्यांनी 'स्वर्ग (किंवा मोक्ष)' या संकल्पनेची व्याख्याच बदलली असावी, तसे असल्यास ती व्याख्या समजल्यास त्यांचा संदेश समजू शकेल.


नुसतेच डायल्यूशन नाही. अनेक ठिकाणी भगवद्गीतेला बाजूला ठेवून ज्ञानेश्वरांनी स्वतंत्र प्रतिपादन केले आहे. "हतो वा प्राप्यसी..." ला बाजूला सारलेले आहे. स्वर्ग संकल्पनेच्या कामनेस विरोध केला आहे. ते पुण्यात्मक पाप आहे आणि ते पापात्मक पापाइतकेच वाईट आहे. ज्याने माझी प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य असे सांगितले आहे. स्वर्गप्राप्ती म्हणजे मोक्ष नाही हे तर वरील ओव्यांवरून उघडच आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे मोक्ष असे त्यांना म्हणायचे आहे. स्वर्ग वगैरे त्या मार्गातले अडथळे आहेत, मोक्षार्थी लोकांनी या वाटेस जाऊ नये असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. आता आत्मसाक्षात्कार म्हणजे नेमके काय असे विचारू नका कारण तो स्वतंत्र आणि प्रचंड मोठा विषय होईल.

खुद्द भगवद्गीता हा विसंगतींनी /अनावश्यक गोष्टींनी भरलेला ग्रंथ आहे असे माझे मत झाले आहे (त्यापेक्षा ज्ञानेश्वरी कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे). उदा. "हतो वा प्राप्यसी स्वर्गम्..." हा एक भाग झाला आणि ज्या श्लोकावर ज्ञानेश्वरांनी वरील भाष्य लिहिले आहे त्या "ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं....." या श्लोकाचा अर्थ असा "तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाल्यावर ते मृत्यूलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा धरून, तीने वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून, कर्ममार्ग आचरण करणार्‍यांना, या प्रकारे येणेजाणे प्राप्त होते." आता असे जर आहे तर मला आधी "हतो वा प्राप्यसी स्वर्गम्.." असे का सांगितलेस? असा प्रश्न अर्जुनाने विचारायला हवा होता. पण ज्ञानेश्वरांनी इथे स्पष्टपणे स्वर्गाची कामना करणे चुकीचे आहे असे सांगितले आहे. गीतेमध्ये तितके स्पष्ट सांगितलेले नाही.

धन्यवाद

ज्ञानेश्वरांची जिथे ही अवस्था तिथे यनावाला काय उजेड पाडणार?

ज्ञानेश्वरांची पद्धत यनावालांच्या पद्धतीपेक्षा श्रेष्ठ असल्याचे प्रायोगिक निरीक्षणही नाही आणि तात्त्विक सिद्धताही नाही (कारण ज्ञानेश्वर तर श्रद्धाळू होते). तर मग, यनावालांची पद्धत ज्ञानेश्वरांपेक्षा निरुपयोगी असल्याचे कसे ठरले?
--
स्वर्ग आणि मोक्ष या दोन वेगळ्या अवस्था आहेत हे जुनेच मत आहे, गीतेत आणि ज्ञानेश्वरीतही त्याचीच पुनरूक्ती आहे, नवा विचार नाही. मात्र, भक्तांच्या दृष्टीने दोन्हीही 'प्रमोशने'च आहेत आणि ऐहिक हलाखीपेक्षा दोन्हीही वांछितच आहेत. यनावालांचा युक्तिवाद स्वर्ग आणि मोक्ष या दोन्हींबाबतीत आहे. चिलया बाळ, राजा हरिश्चंद्र, इ. कथांमधील पात्रे मोक्षासाठीच हालअपेष्टा सहन करतात/इतरांना दु:खी करतात.
--

भक्तिसंप्रदाय किती प्रभावी होता याबद्दल मला शंका आहे. बाकी हिंदूंमध्ये पूर्वापार चालत असलेली निष्क्रियता कारणीभूत असू शकेल.

मला वाटते की 'आमच्यात' असे मानतात की बहुतेकदा व्यक्ती निमित्तमात्र असतात, समाजाची दिशा क्वचितच बदलू शकतात. पूर्वापार म्हणजे फार पूर्वी नसावे, बहुतांश हिंदू धर्म, ऍज वी नो इट, सहाव्या शतकानंतरचा आहे ना? आर्थिक, भौगोलिक कारणांमुळे भक्तीसंप्रदाय रुजून समाज निष्क्रिय झाला असावा. समाजाने जशी ज्ञानेश्वरी मागितली तशी ज्यांनी लिहिली ते ज्ञानेश्वर म्हणून समाजात शिरोधार्य ठरले, मानसिकता आधीपासूनच (किमान काही दशके) होती असे स्पष्टीकरण देता येईल असे मला वाटते.

आता असे जर आहे तर मला आधी "हतो वा प्राप्यसी स्वर्गम्.." असे का सांगितलेस? असा प्रश्न अर्जुनाने विचारायला हवा होता.

मूळ आवृत्तीत कदाचित ते विधान तारांकित असेल आणि "ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं..." हे 'अटी लागू' प्रकारचे स्पष्टीकरण असेल ;)

विज्ञाननिष्ठ निबंध

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
अल्लाउद्दिन खिलजीच्या आक्रमणाच्या संदर्भात विज्ञाननिष्ठ निबंध पान १७ वाचावे.

होय

येथे त्याचा उल्लेख आहे म्हणूनच तर मी त्या चर्चेचा दुवा दिला ;)

सफरचंद

सर्व श्रद्धा या अंधश्रद्धा असतात असे निर्मूलनवाद्यांचे म्हणणे आहे

सफरचंद झाडावरून खाली पडतं ते गुरुत्त्वाकर्षणानेच हे मानणारे लोक, आणि हे जग व या जगातील वस्तू चालवण्यासाठि कारणीभूत ऊर्जा पुरविणारा तो जगन्नियंता ईश्वरच आहे असे मानणारे लोक हे दोघेही श्रद्धाळू धार्मिकच आहेत.

इतरांचे काय म्हणणे आहे?

सफरचंद झाडावरून खाली पडतं ते गुरुत्त्वाकर्षणानेच हे मानणारे लोक ......... अर्थातच नगण्य असावेत
ते कशामुळे खाली पडते असे इतरांना वाटते?

विष्णुपत्नी नमस्तुभ्यं

''विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व में'' असा एक श्लोक वाचनात असल्यामुळे पृथ्वी म्हणजे विष्णुपत्नी आहे, आणि अशा पृथ्वी मातेत एक अफाट शक्ती असल्यामुळे असे घडते असे मानणारे लोक असावेत असे वाटते. अर्थात अशा लोकांनी ''गुरुत्वाकर्षण'' नावाचा सुंदर लेख या भाबड्या लोकांनी वाचला असता तर त्यांचे असलेले गैरसमज निघून गेले असते असे वाटते.

सफरचंद झाडावरून खाली पडतं ते गुरुत्त्वाकर्षणानेच हे मानणारे लोक, आणि हे जग व या जगातील वस्तू चालवण्यासाठि कारणीभूत ऊर्जा पुरविणारा तो जगन्नियंता ईश्वरच आहे असे मानणारे लोक हे दोघेही श्रद्धाळू धार्मिकच आहेत.

व्वा.....! क्या बात है.

-दिलीप बिरुटे

गुंडाळ!!

पृथ्वी म्हणजे विष्णुपत्नी आहे, आणि अशा पृथ्वी मातेत एक अफाट शक्ती असल्यामु

इथे तिच्यात अफाट् शक्ती असते आणि त्यामुळे पदार्थ तिच्याकडे खेचले जातात् असे कुठे म्हणले आहे दाखवा ना जरा. अफाट् शक्ती म्हणजे खेचणारीच् शक्ती हा शोध कोठून् लावलात हे ही सांगा.

-Nile

आवरा

>>>अफाट् शक्ती असते आणि त्यामुळे पदार्थ तिच्याकडे खेचले जातात् असे कुठे म्हणले आहे दाखवा ना जरा.
कोणतीही एखादी शक्ती (पॉवर)ही ' वस्तू खेचणारीच' असते असा काही नियम आहे काय ?

-दिलीप बिरुटे

तेच् विचारतोय

नाही आहे म्हणूनच् तुमच्या श्लोकात असे वाचून् लोक असा ग्रह कसे करून् घेतात् हे जाणून् घ्यायचे आहे.

-Nile

उगाच कै च्या कै..

लोकांचा ग्रह अशासाठी होतो की, ती विष्णुपत्नी असल्यामुळे श्लोकात जरी पृथ्वीमातेच्या शक्तीचा उल्लेख आलेला नसला तरी जमिनीवर पाय ठेवल्याने पृथ्वीमातेचा अपमान होतो. अपमान का होतो तर ती विष्णुपत्नी आहे. आणि विष्णुपत्नी असल्यामुळे तिच्या ठिकाणी मोठी शक्ती आहे इतकाच तो अर्थ.(आता असा अर्थ कुठे आहे असे विचारु नका. काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात.) शक्तीबद्दल अधिक अर्थ समजून घेण्यासाठी दुव्याचा उपयोग करावा. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

प्रश्न काय् आहे?

घारे काकांचा प्रश्न होता

ते कशामुळे खाली पडते असे इतरांना वाटते?

त्यावर तुमच्या प्रतिसादात् म्हणल्याप्रमाणे तो श्लोक् कारणीभूत/उजेड् पाडणारा असावा असे तुमचे मत् आहे ना? ते कसे असे मी विचारतो आहे. असो.

-Nile

फटाल येरर. :)

घारेकाकांच्याच प्रश्नाला उत्तर लिहिले आहे की, इतर लोकांना म्हणजे ज्यांना गुरुत्वाकर्षणाची कल्पना नाही अशा लोकांना वाटतं की पृथ्वीत एखादी अशी शक्ती असावी की जिच्यामुळे 'सफरचंद खाली पडते' आता अशी शक्ती म्हणजे कोणती तर मी श्लोकाच्या आधारे असा उजेड पाडू इच्छित होतो की अशी कार्यरत शक्ती म्हणजे (देव,देवी,अजून कोणी इ.) विष्णुपत्नीचे कर्तुत्व असावे. असो, जाऊ दे, फटाल येरर मुळे असा गोंधळ होत आहे. :)

-दिलीप बिरुटे

फुकाची बडबड

कशाचा तरी कुठेतरी बादरायण संबंध लावायचा आणि त्यावर कोणी काही विचारले की फॅटल एरर वगैरे फालतू कारणं द्यायची.
१. बल म्हणजे शक्ती नव्हे.
२. बल म्हणजे आकर्षण करणारेच बल असे नव्हे.
३. त्या श्लोकात कुठेही पृथ्वीकडे असामान्य बल/शक्ती आहे असे दिसत नाही. ती देवी आहे तिला पाय लावल्याबद्दल क्षमा मागून् नमस्कार् करा असा अर्थ दिसतो.

साध्या आणि स्पष्ट श्लोकाचा अर्थ न समजल्याने तुम्हाला माझ्या प्रतिसादाचा अर्थ कळेल याबद्दल मला शंकाच आहे, त्यामुळे अजून् स्पष्टीकरण् देत बसत् नाही. मुळात सुरुवातीलाच् मी प्रतिसाद दिला, तुमच्याबद्दल पुरेशी माहिती असताना, ही माझी चूकच झाली.

-Nile

कळते का काही

>>>> श्लोकात कुठेही पृथ्वीकडे असामान्य बल/शक्ती आहे असे दिसत नाही. ती देवी आहे तिला पाय लावल्याबद्दल क्षमा मागून् नमस्कार् करा असा अर्थ दिसतो.

पृथ्वी ही देवी आहे. पृथ्वी देवता कोण आहे त्याचा पुरेसा दुवा दिल्यानंतरही आपल्याला काही कळले नाही असे दिसते. अर्थात ज्यांना काही कळते अशा लोकांचे वय,ज्ञान, आणि समजून घेण्याची अक्कल पाहून एखादी गोष्ट समजून सांगितली पाहिजे हे मला माहिती असूनही आपल्यासारख्या सन्माननीय सदस्याला उपप्रतिसाद लिहित राहिलो, ही माझीही चूकच झाली. बाकी, जळजळ पोहचली. धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

वेळ का वाया घालवताय?

सर वेळ का वाया घालवताय?
काही हाताला लागेल असे वाटते का?

शंतनुच्या लेखावर (काही) लोक मूग गिळून बसतात. त्यांचे काम कन्स्ट्रक्टीव्ह आहे हे दिसते, पण मदतीला कुणी जात नाही. त्या कंपूतील एक सोडले तर इतर कुणीही लेख लिहित नाहीत. एखादा माहितीपूर्ण लेख आला तर त्यावर चर्चा करायला किंवा आपले अनुभव माहिती द्यायला यांना अचानकपणे वेळ नसतो.
पाहिलेत तर हे सर्व लोक आपापल्या क्षेत्रात तज्ञ आहेत त्यांना मराठी येतेही - पण त्यांना बहुदा काही काम करायचे नाहीये असे मला वाटते!

विचार केला तर करण्यासाठी अनेक कामे आहेत.
शब्दकोश मराठी-इंग्रजी, मराठी-फ्रेंच, मराठी-स्पॅनिश, मराठी- चीनी(पारंपारिक व इतर), मराठी-जपानी, मराठी - तमीळ, , मराठी-ब्राह्मी, मराठी-प्राकृत अशा अनेक आंतरजालीय युनिकोड आधारीत शब्दकोश अजून बनायला हव्या आहेत. त्यांची अभ्यासकांना वानवा आहे.
हे भयंकर अवघड नाही. कारण यातील बहुतेक भाषांचे एक लाख शब्दांपेक्षा मोठे कोश तयारच आहेत. ते एकत्र जोडायचे आहेत.

ऍप्लिकेशन्सवर शब्दकोश निरनिराळ्या ऍप्लिकेशन्सवर यायला हवे आहेत. जसे नोकिया फोनवरील मोफत मराठी-इंग्रजी शब्दकोश, आयपॉडवरील मोफत मराठी-इंग्रजी शब्दकोश वगैरे (हे फार मोठे काम नाही सर, चार जण मिळून झटले तर सहज जमेल.)

उपलब्धी - हे शब्दकोश जालावर मोफत उपलब्ध व्हायला हव्या आहेत.

जोडणी - मराठी शब्दकोश निरनिराळ्या सिस्टीम्सना सहजतेने जोडता येतील असे पॅचेस बनायला हवेत. उदा. ड्रुपलवर मराठी ऑप्शन घेतला तर तेथे आपोआप मराठी स्पेल चेक देणारा हन्स्पेल पॅक. आणि मराठी विकीवर आपोआप मराठी स्पेल चेक देणारा हन्स्पेल पॅक याची अत्यंतीक आवश्यकता आहे!

जी मेलला जोडता येईल असे शब्दकोशांचे ग्याजेटस् (जरी कॉर्पोरेट उत्पादन असले तरी आपल्या भाषेसाठी हे करावे त्यात काय बिघडते?)

इतिहास घटनाकोश - अगदी साधा वर्षांनुसार शोध घेतले तर भारतीय इतिहासातील घटना दाखवणारा आंतरजालीय डेटाबेसही बनवता येईलच ना? तसाच व्यक्तिकोशही बनु शकेल.

मराठी विज्ञान परिभाषा कोश - यांना विज्ञानाची इतकी खाज असेल तर शोध घेण्यासारखा 'मराठी विज्ञान परिभाषा कोश' तरी जालावर आणून दाखवा म्हणा!

भाषांतर - अगदी साधे विकीच्या प्रमुख विज्ञानशाखांच्या पानांचे भाषांतराचे कामही यातले कुणी सातत्याने अंगावर घ्यायला तयार नाहीत.

इंग्रजीतून झालेले विज्ञानावरील लेखन मराठीत यायला हवे आहे. एव्हिएशन सारख्या विषयात तर मराठीतील लेखनाचा अक्षरश: दुष्काळ आहे सर!

हे काम करण्यात प्रत्येकाने झटून खारीचा वाटा उचलला तर अवघड नाही.
तुमच्याशी मतभेदांवर भांडण्यापेक्षा तुमच्याकडे असलेली विद्यार्थ्यांची शक्ती इतिहास घटनाकोश सारख्या प्रकल्पांसाठी कशी वापरता येईल हे पाहणे महत्त्वाचे वाटते मला. या प्रकल्पांद्वारे कदाचित तुमच्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना इतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी जोडताही येईल. त्या प्रकल्पातून, तंत्रज्ञानाच्या शिकण्यातून खरोखर विज्ञान विषयक दृष्टिकोन वास्तवात येऊ शकेल.

अशा रितीने करायला गेले तर अनेक कामे आहेत.

हे सर्व पाहिले की कळते की हा फालतू नॉइज आहे.
म्हणून म्हंटले कशाला वेळ वाया घालवता?

-निनाद
हा प्रतिसाद अवांतर आहे याची मला कल्पना आहे. यातून काही सदस्य दुखावले जाण्याची शक्यता आहे. पण दुखावले जावेतच आणि त्यातून काही तरी खरोखर असे प्रकल्प घडावेत हीच अपेक्षा आहे!

खरं आहे.

सर वेळ का वाया घालवताय?
काही हाताला लागेल असे वाटते का?

खरं आहे. खूप वेळ इथे घालवला आहे. बाकी, आपल्या प्रतिसादाशी सहमत आहे.
तसेही, उगा व्यर्थ वेळ घालविणे सोडलेच आहे.

-दिलीप बिरुटे

सहमत

दोघांशीही सहमत आहे. प्रा. डॉं.ना विनंती आहे की विकीवरती गुरुत्वाकर्षणाचे स्पष्टीकरण् म्हणून् तो श्लोक अपडेट करावा.

-Nile

धन्यवाद.

>>>> प्रा. डॉं.ना विनंती आहे की विकीवरती गुरुत्वाकर्षणाचे स्पष्टीकरण् म्हणून् तो श्लोक अपडेट करावा.
विकीवर गुरुत्वाकर्षणाच्या स्पष्टीकरणासाठी 'समुद्रवसने देवि....' चा श्लोक चालणार नाही. काही लोकांची त्याबाबत काय धारणा आहे, ते लिहिण्याची तिथे गरज नाही. मात्र आपली ट्यांव ट्यांव ची खाज पूर्ण करण्यासाठी विकीवर गुरुत्वाकर्षणाच्या काही संकल्पना लिहिणे बाकी आहे, आपल्या अभ्यासाचा संदर्भासहित लिहिण्याचा दम तर कळू दे. नसेल जमणार तर इतरांना अनाहूत सल्ला देणे बंद करावे.

-दिलीप बिरुटे

अरेरे..वेळ जातोय!

कशाला वेळ घालवताय, विकीचं काय् होईल अशाने?

-Nile

कामे फालतू

तुम्ही सांगितलेली कामे हमालीची आहेत, ती 'कोणीही' करू शकतो. ती करणार्‍याची सुपीरिऑरिटी सिद्ध होत नाही या कारणाने येथील बहुतेकांना त्या कामांमध्ये रस नाही असे मला वाटते.

बिनपाण्याची

--ती करणार्‍याची सुपीरिऑरिटी सिद्ध होत नाही या कारणाने येथील बहुतेकांना त्या कामांमध्ये रस नाही असे मला वाटते.
पण तुम्हीच एकदा म्हणाला होता - "आमचे येथे बिनपाण्याची हजामत करून मिळेल."
[ड्रुपलमधील बग मुळे तो प्रतिसाद दुवा दुस-या पानावर असल्यामुळे डायरेक्ट उघडत नाही. गो टू सेकंड पेज आणि लूक फॉर जैन दाढी]

फरक

बिनपाण्याने हजामत ही काही हमाली नव्हे, त्यासाठी खूप कौशल्य, अक्कल लागते.

सहमत

(असो, तरीही), सहमत १+

आता त्यातील बारकावे तुम्हासच ठावुक.

सहमत.

+ १०० सहमत. विषेशतः खालील टिपा खूप आवडल्या-
--यांना विज्ञानाची इतकी खाज असेल तर शोध घेण्यासारखा 'मराठी विज्ञान परिभाषा कोश' तरी जालावर आणून दाखवा म्हणा!
--अगदी साधा वर्षांनुसार शोध घेतले तर भारतीय इतिहासातील घटना दाखवणारा आंतरजालीय डेटाबेसही बनवता येईलच ना? तसाच व्यक्तिकोशही बनु शकेल.

तुम्ही करा ना

अगदी साधा वर्षांनुसार शोध घेतले तर भारतीय इतिहासातील घटना दाखवणारा आंतरजालीय डेटाबेसही बनवता येईलच ना? तसाच व्यक्तिकोशही बनु शकेल.

तुम्हाला तसा विश्वास असेल तर तुम्हीच करा ना. दुसर्‍यांनी करावे अशी अपेक्षा का बाळगता? स्वतःला करायचे काही नसते, उगीच लोकांना त्रास द्यायचा असतो इतकेच.

वेगळ्या क्रिया

--तुम्हाला तसा विश्वास असेल तर तुम्हीच करा ना.

मी तो प्रतिसाद आवडला असे म्हणालो आहे. "आवडणे" आणि "विश्वास असणे" ह्या वेगळ्या क्रिया आहेत.

नीट वाचा

अगदी साधा वर्षांनुसार शोध घेतले तर भारतीय इतिहासातील घटना दाखवणारा आंतरजालीय डेटाबेसही बनवता येईलच ना? -- असे तुम्ही लिहिता ते तुमचा विश्वास असल्या शिवाय का?

तो मी नव्हेच

तो विचार माझा नव्हे, वरती एका प्रतिसादातील वाक्य आहे.

काड्या करणे

तो तुमचा विचार नसला तरी तो तुम्ही तुमच्या प्रतिसादात त्याचा उपयोग करून त्याला पुष्टी दिलीत तो तुमचा विश्वास असल्याखेरीज का? जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही फक्त काड्या करता आहात असे मानावे लागेल.

उपक्रम प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे ही विनंती.

काही हरकत नाही

तुम्हाला जे सम्जायचे ते समजा, माझी काही हरकत नाही, मी तुम्हाला कसे काय रोखु शकणार? :-)

श्लोक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रा.(डॉ) दिलीप बिरुटे यांनी ज्या श्लोकाचा उत्तरार्ध उद्धृत केला आहे तो पूर्ण श्लोक असा:
.
समुद्रवसने देवि पर्वतस्तनमंडले
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे |

धर्म

बिरुटे सर, आपण धार्मिक का खोडलय?

खाडखोड

धर्माचा सर्वात श्रेष्ठ असा आधार म्हणजे वेद. धर्मामधे धार्मिक विधी,धर्मातील कर्तव्य वगैरे असतात तेव्हा ''जग व या जगातील वस्तू चालवण्यासाठि कारणीभूत ऊर्जा पुरविणारा तो जगन्नियंता ईश्वरच आहे असे मानणारे लोक'' हे धार्मिक असू शकतील पण 'गुरुत्त्वाकर्षण' मानणारे हे धार्मिक नसू शकतील कारण त्यांच्या धर्माचे आधार हे वेगळे आहे आहेत असे वाटल्यामुळे ती खाडखोड केली.

पण, आत्ता मला असं वाटतंय की, धर्म म्हणजे 'आचरणाची निश्चित तत्त्वे' तेव्हा एखाद्या कृतीकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहणा-यांचेही स्वतःची काही तत्त्वे आहेत म्हणून त्यांनाही धार्मिक म्हणायला हरकत नाही असे वाटायला लागले आहे, काय म्हणता ? तुम्ही का वापरला आहे धार्मिक शब्द ?

-दिलीप बिरुटे

एक्झॅक्टली

डोळे मिटून एखाद्या धर्ममार्तंडाने सांगितलेली धर्माचि तत्त्वे पाळणे म्हण्जे धार्मिकता असे माझे मत आहे. त्याचप्रमाणे न्युटनने गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सांगितला कि डोळे झाकून (यात मी पण आहे ;)) त्यावर विश्वास ठेवणे. हे सुद्धा धार्मिक (अंधश्रद्ध) आहे.

यु हिट द नेल

यु हिट द नेल !

ठीक

गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असत्य असल्याचे कबूल करण्यावाचून उपक्रमी श्रद्धाळूंना काहीच पर्याय नाही असे दिसते. उपक्रमवरील, न्यूटनचे श्रद्धाळू इमारतींवरून प्रवास करू शकत नाहीत यास त्यांची बौद्धिक गुलामगिरीच कारणीभूत असावी. कृपया एकदातरी इमारतीवरून खाली उडी मारून उपक्रमींना धीर देऊन उपकृत करावे.
http://www.youtube.com/watch?v=3vlzKaH4mpw

श्रद्धा

ह ह पु.
न्युटनचे श्रद्धाळूच कशाला गाय, बैल, डुक्कर सुद्धा इमारतींवरून प्रवास करू शकत नाहीत.

याची आवश्यकता नाही

गुरुत्त्वाकर्षणाचा नियम सांगितला कि डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवणे
या विषयावर हवी तितकी माहिती सुलभपणे उपलब्ध आहे. सर्वसामान्य माणसाला ती वाचता येणे शक्य आहे. ती वाचण्यासाठी परमेश्वराची कृपा, अनुग्रह, पुण्याई वगैरेंची गरज नाही. बेरीज, वजाबाकी, गुणाकार. भागाकार एवढे गणित समजत असेल तर ते पुरेसे आहे. त्यामुळे डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. इच्छा असेल तर स्वतःची खात्री करुन घेणे शक्य आहे.

धर्मग्रंथ

हिन्दू, मुस्लिम, इ धर्माबद्दल देखिल अनेक पुस्तके( वेद, पुराणे, धर्मग्रन्थ) उपलब्ध आहेत. ते वाचुन तो तो धर्म समजून घेता येऊ शकतो. तरीही लोक डोळे झाकून पुस्तके न वाचता त्यावर विश्वास ठेवतात.

धर्मग्रंथ

हिन्दू, मुस्लिम, इ धर्माबद्दल देखिल अनेक पुस्तके( वेद, पुराणे, धर्मग्रन्थ) उपलब्ध आहेत. ते वाचुन तो तो धर्म समजून घेता येऊ शकतो. तरीही लोक डोळे झाकून पुस्तके न वाचता त्यावर विश्वास ठेवतात.
चुकून पुन्हा प्रतिसाद दिला गेला.

जमल्यास....

हे वाचा असे मी तुम्हास सांगत नाही, पण जमल्यास नजर टाका-

गंडलेला लेख आहे

भयंकर गंडलेला लेख आहे. एस्किमो देव आहेत आणि पेंग्वीन दानव आहेत एवढेच सांगायचे त्या लेखक महाशयांनी मागे ठेवले होते.

 
^ वर