पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा

उपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं. मला स्वत:ला डार्विनने भारतीय हिंदू धर्मशास्त्रांची (दशावतार इत्यादी) पुस्तके वाचून वा चित्रे पाहून त्या नुसार संशोधन करून त्याने वरील सिद्धांत मांडला असावा असे उगीचच वाटत होते. (श्री. ईश आपटे यांनी डार्विनची माहिती मिळवून त्याचा सिद्धांत मांडणे हेच कसे खोटे होते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना आधिच्या लेखातून जितका उपहास भोगायला लागला तेवढा लागला नसता. )
हे असे मला एक ब्लॉग वाचून वाटायला लागले आहे.
ब्लॉग"चार्लस् डार्विन व त्याचे सफरचंद"

ह्या दुव्यावरील लेखात श्री. अजित वडाकयील यांनी डार्विन कोण होता? याचा अभ्यास करून त्याच्या सिद्धांत मांडण्याच्या पद्धतीवरच आक्शेप घेतले आहेत. त्यांचे लिखाण सत्याला धरून असेल तर त्यांचे विचार पटण्याजोगे आहे.

Comments

व्यक्तिपुजाच

डार्विनचे चाहते असणे हीच एक अंधश्रद्धा आहे, कारण ती एकप्रकारची व्यक्तिपुजाच होय.

गल्लत

>>डार्विनचे चाहते असणे हीच एक अंधश्रद्धा आहे, कारण ती एकप्रकारची व्यक्तिपुजाच होय.

सहमत आहे. पण चाहते असणे यात फ्यान असणे असे अभिप्रेत असावे. म्हणजे डार्विनसारखी वेशभूषा करणे त्याचे प्रत्येक म्हणणे उचलून धरणे वगैरे.

अशा प्रकारचे डार्विनचे चाहते उपक्रमावर कोणी दिसतात का?

इथे बहुधा त्याच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला उचलून धरले जाते. आणि जो सिद्धांत उचलून धरला जातो तोही डार्विनने मांडलेल्या स्वरूपात तसाच्यातसा नाही. त्यात अनेक बदल झालेले आहेत. मूळ संकल्पना डार्विनची आहे.

उत्क्रांतीच्या सध्याच्या सिद्धांतानुसार जनुकीय बदल अपघाताने (कॉपी बनवण्यातील चुकांमुळे) होतात आणि ते बदल झालेले जीव टिकतात किंवा नष्टही होतात. हे टिकणे नष्ट होणे हे झालेले बदल परिस्थितीत फायदेशीर आहेत की तोट्याचे आहेत यावर ठरते. हा सिद्धांत डार्विनने असाच मांडला होता का याबाबत मला शंका आहे.

राजेश घासकडवी यांनी एक मालिका "सरलतेकडून क्लिष्टतेकडे" उपक्रमावर लिहिली आहे.

या व्यतिरिक्त लॅमार्क नामक अजून एका पाश्चात्याने सजीव असे बदल "घडवून आणतात" आणि पुढील पिढीत संक्रमित करतात असे तत्त्व मांडले होते. ते टिकले नाही.

नितिन थत्ते

भ्रामक समजुतीं आणि प्रपोर्शनेटता

--उत्क्रांतीच्या सध्याच्या सिद्धांतानुसार जनुकीय बदल अपघाताने (कॉपी बनवण्यातील चुकांमुळे) होतात आणि ते बदल झालेले जीव टिकतात किंवा नष्टही होतात. हे टिकणे नष्ट होणे हे झालेले बदल परिस्थितीत फायदेशीर आहेत की तोट्याचे आहेत यावर ठरते. हा सिद्धांत डार्विनने असाच मांडला होता का याबाबत मला शंका आहे. --

मी जेव्हा-जेव्हा अशा भ्रामक समजुतींबद्दल विचार करतो, तेव्हा असा एक (वन ऑफ मेनी) प्रश्न येतो- चुकांमुळे प्रपोर्शनेटता कशी जपली जाते? उदा- स्त्री आणि पुरुष ह्यांचे आवाज त्यांना समर्पक असतात. उलटा-पालट झाली असती तर ते ...? ह्या चुका चुका वाटत नाहीत; नियम वाटतात. डार्विनने ह्याचे काय स्पष्टीकरण दिले आहे?

भ्रामक?

>>चुकांमुळे प्रपोर्शनेटता कशी जपली जाते?

कारण चुका थोड्याच तपशीलाच्या होतात. म्हणून गुणधर्मात फार मोठे बदल होत नाहीत.

>>स्त्री आणि पुरुष ह्यांचे आवाज त्यांना समर्पक असतात. उलटा-पालट झाली असती तर ते ...?

अशी उदाहरणे पाहिली नाहीत का?

राजेश घासकडवींची मालिका वाचण्याचा अनाहूत सल्ला देतो.

नितिन थत्ते

ब्रेनवॉशिंगच

-अशी उदाहरणे पाहिली नाहीत का?-
ती उदाहरणे किती % लोकांमधे असतील? हा प्रश्न तुम्ही विचाराल असे वाटले होतेच.

-कारण चुका थोड्याच तपशीलाच्या होतात. म्हणून गुणधर्मात फार मोठे बदल होत नाहीत.

नाहीफे पटले नाही, हा डार्विन अख्खा माकड माणूस झाला, उडणारे प्राणी सरपटायला लागले असल्या बाता मारतो. त्यामुळे हे बदल खूप मोठे असतात. गुणसुत्रातील बदल हे "त्या मानाने" छोटेच असतात म्हणा.

त्याची पुस्तके महाग असल्यामुळे व खूप मोठी असल्यामुळे ती वाचणा-याची एकंदरीतच खूप मोठी गुंतवणूक होते. त्यामुळे वाचणा-याला इतरांना डार्विन वाचले आहे व समजले आहे हे दाखवण्यासाठी त्याची बाजु घ्यावी लागते. एक प्रकारचे ब्रेनवॉशिंगच आहे ते. कल्ट असेही म्हणता येईल.

काहीही

>>हा डार्विन अख्खा माकड माणूस* झाला, उडणारे प्राणी सरपटायला** लागले असल्या बाता मारतो.

आपण उत्क्रांतीवर वाचन कराच म्हणजे अख्खा माकड माणूस झाला, उडणारे प्राणी सरपटायला लागले असे काहीच्या बाही चित्र तुमच्या डोळ्यापुढे येणार नाही. अख्खा माकड (एका पिढीत जनुकीय बदलाने) माणूस झाला असे (उत्क्रांतीवाद म्हणतो असे) तुम्हाला कोणी सांगितले ? आपल्या शालेय पुस्तकांतही या बदलांमधले टप्पे वर्णन केलेले असतात. तुम्ही शालेय पुस्तकेही वाचली नसतील तर मग काही म्हणणे नाही.

डार्विनची पुस्तके महाग/मोठी आहेत ही देखील अशीच लोणकढी आहे. तरीसुद्धा महाग ही सापेक्ष कल्पना असल्याने ती तक्रार तुमच्या बाबतीत मान्य करून आणि इंग्रजी वाचनाची काही अडचण असेल तर त्यावर उपाय म्हणून घासकडवींच्या लेखनाचा दुवा १ आणि दुवा २ देत आहे. तुम्ही उपक्रमावर लिहिता त्या अर्थी इंटरनेट तुम्हाला महाग वाटत नसावे अशी आशा आहे.

*सदरहू प्रकारची वाक्ये ही उत्क्रांतीचे सोपे सार म्हणून सांगितली जातात. सापेक्षता तत्त्वाचे असेच एक स्पष्टीकरण आईनस्टाईनने सांगितले होते. म्हणजे खरोखर ते सापेक्षतेचे तत्त्व नव्हे.
**इथे बहुधा क्रम उलटा झाला आहे

अवांतर : उत्क्रांतीचे तत्त्व चूक आहे म्हणून अमान्य आहे की पाश्चात्याने मांडले म्हणून अमान्य आहे की आम्हाला ते मांडता आले नाही म्हणून त्या अर्थी ते चूकच असणार म्हणून अमान्य आहे?

नितिन थत्ते

ग्रेट क्वश्चन!

-- उत्क्रांतीचे तत्त्व चूक आहे म्हणून अमान्य आहे की पाश्चात्याने मांडले म्हणून अमान्य आहे की आम्हाला ते मांडता आले नाही म्हणून त्या अर्थी ते चूकच असणार म्हणून अमान्य आहे?--

धिस इज ग्रेट क्वश्चन!

उत्तर- उत्क्रांतीचे तत्त्व चूक आहे म्हणून अमान्य आहे

अमान्य

मजकूर संपादित. कृपया व्यक्तिगत स्वरूपाची टीका करू नये.

प्रपोर्शनेटता

"चुकांमुळे प्रपोर्शनेटता कशी जपली जाते?"- ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्यावेत अशी नम्र विनंती.

प्रश्न स्पष्ट केल्यास उत्तर देण्याचा प्रयत्न करेन

चुकांमुळे प्रपोर्शनेटता कशी जपली जाते?

प्रपोर्शनेटता म्हणजे काय ते कळलं नाही. वेगवेगळी प्रपोर्शन्स, गुणोत्तरं महत्त्वाची असतात. लोकसंख्येमधलं स्त्री-पुरुष संख्येचं गुणोत्तर, स्त्री-पुरुषाच्या आकारांचं गुणोत्तर वगैरे वगैरे.

उदा- स्त्री आणि पुरुष ह्यांचे आवाज त्यांना समर्पक असतात. उलटा-पालट झाली असती तर ते ...? ह्या चुका चुका वाटत नाहीत; नियम वाटतात. डार्विनने ह्याचे काय स्पष्टीकरण दिले आहे

आवाजांची उलटापालट झाली असती म्हणजे काय? (गमतीने विचारायचं झालं, तर ती उलटापालट आधीच झालेली नाही हे कशावरून?... ह. घ्या.) कुठचा समर्पकपणा समजावून घ्यायचा आहे हे उलगडून सांगितलंत तर त्या प्रश्नाला उत्क्रांतीवादाचं उत्तर काय हे तपासून बघता येईल. (व्यक्तिशः डार्विनचं उत्तर असेलच असं नाही. त्याने मांडलेल्या उत्क्रांतीवादाचा पुढे विकास होऊन जी थिअरी तयार झाली आहे तिचं उत्तर.)

जीवसृष्टीत जे 'नियम' किंवा पॅटर्न्स दिसतात ते चुकांमुळे आले असं म्हणणं म्हणजे चूक या शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ - हायड्रोजन व ऑक्सिजन एकत्र आले की स्फोट होतो हे सत्य आहे. यावर जर कोणी म्हटलं की "'एकत्र' आल्यामुळे स्फोट कसा दिसेल? काहीतरी एकमेकांपासून दूर जात असलं पाहिजे." हा तर्क जसा मोडून पडतो तसंच 'चुका' बाबतीत होतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रपोर्शनेटतेची उदाहरणे

प्रपोर्शनेटतेची (प्रमाणबद्धता) अनेक उदाहरणे देता येतील: ही उदाहरणे माझ्या निरीक्षण करण्याच्या मर्यादेवर आधारीत आहेत. अशा चर्चा करतांना विरोधी बाजु असलेली व्यक्ति मॅट्रीक्सच्या कोप-यातील सामान्यत: त्या ग्रुपमधे न बसणारे एखाद-दुसरे उदाहरण दाखवुन मुळ मुद्द्याला भिरकावण्याचा आत्यंतिक प्रयत्न करत असते. तुम्ही तसे करणार नाही अशी खात्री मला नाही. तरीही ही उदाहरणे आता सकाळचा महत्वाचा वेळ फार वाया न घालवता देत आहे.

१. जगात सर्वत्र सजीवांमधे (अगदी सीशेलही सजीव नसला तरी सजीवाने तयार केलेली वस्तू असे मानले तरी) फ़िबोनाची(सी) नंबरच्या प्रमाणात त्यांचे अवयव, फुलांचे आकार, फांद्यांची वाढ दिसुन येते. इंटर्नेटवर असंख्य पुरावे ह्याचे उपलब्ध आहेत ते पहावेत

२. (माझ्या अंदाजे ९९.९९%) प्राण्यांना असलेले हात / पाय नेहमी सम प्रमाणात असतात. पण ज्या प्राण्यांना सम प्रमाणात पाय नाहीत - उदा स्टार फिश- त्यांचे हे पाय समप्रमाणात (पाच असतील तर) ७६ अंश कोनात विभागलेले असतात.

३. स्त्रीचे / पुरुषाचे जे जे अवयव २-२ असतात - डोळे, कान, स्तन, नाकपुड्या, दोन समजागी दातांचा सर्वसाधारण आकार, नितंब, पाय, हात, दोन हातांच्या / पायांच्या समजागी बोटांचा आकार ह्यात निश्चितशी प्रपोर्शनेटता दिसते. मायक्रोस्कोपखाली पाहिले तरच त्यांच्या आकारात फरक दिसेल. ४० पेक्षा जास्त व्यक्तिंच्या शरीरातील एखादे अवयव घेऊन त्यातील फरकाचा रेशो काढला तर त्याचे नॉर्मल डीस्ट्रीब्युशन कसे असेल ह्याचा अंदाज घेण्यासाठी प्रत्यक्ष चार्टींगचीही आवश्यकता शहाण्या माणसाला लागणार नाही. हे बाह्य अवयवांच्या बाबतीत झाले. किडन्या, फुफुसे, धमन्या, रक्ताची घनता, पेशींचा आकार, कवटीची जाडी, हाडांचा आकार अशी असंख्य उदाहरणे आहेत.
ह्या प्रपोर्शनेटतेमुळे निश्चितसे कार्य साधले जाते का?

उत्तरे होय आणि नाही असे देता येईल:
होय: बाह्य अवयवांतील समतोलामुळे सौदर्य (रुढार्थाने नव्हे- तर सुडौलता) लाभते. नितंबे लहानमोठी असती तर आपल्याला नीट बसता आले नसते, कानाच्या पाळीचा आकार लहान-मोठा असता तर स्टीरीओ इफेक्ट गेला असता. त्यामुळे अशा अवयवात प्रपोर्शनेटता असणे "नैसर्गिक"च (डार्विनभाऊची थेरी नव्हे) आहे.
नाही: पण स्तन लहानमोठे असते तर / किंवा एकच असता तर दुधनिर्मितीला अडथळा येऊन मानवजातीच्या एकंदरीतच प्रगतीला बाधा आली असती असे मलातरी वाटत नाही. पण दोन स्तन असल्यामुळे स्त्रीच्या आकाराला प्रपोर्शनेटता येते. (आता पुर्वी एकच असु शकले असते असे म्हणायचे असेल तर, जो काही डार्विनभाऊंचा जनुकीय ऍक्सिडंट झाला, त्यामुळे तीन स्तन का नाही निर्माण झाले?)

इतके पुरे- असलेल्या वेळात इतकीच चर्चा करु शकतोय.

प्रपोर्शन

प्रपोर्शनेटता असते ती ढोबळमानाने असते. अन्यथा माणसात (आणि इतर प्राण्यातही) पायाची, हाताची लांबी, पावलाचा आकार, पंजाचा आकार, स्तनाचा आकार छातीचा घेर, पोटाचा घेर यात भरपूर व्हेरिएशन (प्रपोर्शनेट नसलेले) असलेले आपण पाहतो (एखादे उदाहरण नव्हे). खरे तर एक विशिष्ट ढोबळ प्रपोर्शन/अवयव असलेल्या प्राण्याला आपण अमूक प्राणी असे म्हणतो.

त्याखेरीज हाता पायाला सहा बोटे असलेला माणूस वगैरे व्हेरिएशन कमी प्रमाणात आपण पाहतो. (सहा बोटे असलेल्या माणसाला सहा बोटांचे मूल होते किंवा कसे याबद्दल मला माहिती नाही. तसे होत असेल आणि सहा बोटे असलेल्या मानवास* जगणे सुकर झाले तर त्याचे अधिक वंशज निर्माण होऊन, पुढे सहा बोटांचा मानवसदृश प्राणी दिसूही शकेल. तोच राहून पाच बोटांचा माणूस नष्ट होईल की कसे हे काही सांगता येणार नाही). सध्याही बोटेच नसलेले (हत्ती) पासून ते दोन बोटे (खूर असलेले), चार बोटे असलेले, पाच बोटे असलेले वगैरे प्राणी अस्तित्वात आहेतच.

>>अशा अवयवात प्रपोर्शनेटता असणे "नैसर्गिक"च (डार्विनभाऊची थेरी नव्हे) आहे.
याचा अर्थ कळला नाही. फळ खाली पडते ते नैसर्गिकपणे; न्यूटन सांगतो म्हणून नव्हे असे काहीसे म्हटल्यासारखे वाटत आहे.

नितिन थत्ते

ढोबळमानाने?!

--प्रपोर्शनेटता असते ती ढोबळमानाने .....आपण अमूक प्राणी असे म्हणतो.--

व्हेरीएशन प्रत्येक प्राण्याच्या जातीत आहेच, म्हणून मी रेशोचा विचार मांडला. उदा-
प्राणी: माणूस,
संचः ५० माणसे,
अवयवः कान,
मोजमापः प्रत्येक माणसाचा अ) उजवा कानः उंची, रुंदी, जाडी, ब) डावा कानः उंची, रुंदी, जाडी,
युनिटः मीलीमीटर
डी-हाइव्हड् डाटा: प्रत्येक माणसाचा कान रेशो = अ उंची / ब उंची, अ रुंदी / ब रुंदी, अ जाडी / ब जाडी
अशा पद्धतीने प्रत्येक माणसाचा डी-हाइव्हड् डाटा काढून प्रत्येक रेशोचे नॉर्मल डीस्ट्रीब्युशन कसे येईल ते पहायचे.

वरील मुल्यमापन हे आयसोलेटेड, नॉन-कॉन्टेस्ट आहे. त्या रेशोचा त्या-त्या माणसाच्या आकारमानाशी (इतर अवयवांशी) संबंध तपासला तर आणखी महत्वाची माहिती मिळेल.

ह्यावरुन असे म्हणायला पुरावा उपलब्ध होइल की, "प्रपोर्शनेटताच असते - ती ढोबळमानाने नसते"

मानवी शरीराची प्रमाणबद्धता

या विषयावरील प्रतिवाद वाचताना लिओनार्दो दा विंची (१४५२ - १५१९) यानी मांडलेल्या (Vitruvian man) मानवी शरीरातील अवयवांच्या 'प्रपोर्शनेटते'(?)ची आठवण झाली. त्याने चक्क या विषयीचे गणिती-कोष्टकच मांडले आहे:

चार बोटाइतका तळहात रुंद असतो.
चार तळहातांचा एक पाऊल बनतं.
कोपरापर्यंत सहा तळहात बनतात.
माणसाची उंची चोवीस तळहाताइतकी असते. ताणून धरलेल्या दोन हातांमधल्या अंतराएवढीही ती असते.
चेहरा म्हणजे कपाळ ते हनुवटी हा त्याच्या उंचीचा एक दशांश असतो, टाळू ते हनुवटी एक अष्टमांश भरते, खांद्याची रुंदी एक चतुर्थाश, कोपरा ते बोटांच एक टोक एक पंचमांश, बोट ताणलेला हात एक दशांश, नाक ते हनुवटी चेहऱ्याच्या एक तृतियांश, कानही एक तृतियांश, आणि कपाळही एक तृतियांश.
बेंबी शरीराच्या मधोमध असते. तिला मध्य कल्पून वर्तुळ काढल्यास ते ताणलेल्या हातापायांना स्पर्श करून जातं.
उंची व ताणलेले हात यांची लांबी एकच असल्यानं शरीर चौरसातही अगदी व्यवस्थित बसतं.

संदर्भ: रोमराज्य - ऍमस्टरडॅम ते रोम; ले. डॉ. मीना प्रभू

पुष्टी

धन्यवाद, मी जे म्हणत आहे त्यास पुष्टीच मिळाली.
पण तुम्ही माझ्या समर्थनार्थ वरील प्रतिसाद दिल्यामुळे येथील काही सभासद तुमच्यापासुन दुरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

+१

येथील काही सभासद तुमच्यापासुन दुरावण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सहमत आहे. नानावटींनी लिहिलेली विधाने आक्षेपार्ह नसली तरी तुम्ही गुंजेलाच कोलित समजून नाचत आहात.

बर

--सहमत आहे. नानावटींनी लिहिलेली विधाने आक्षेपार्ह नसली तरी तुम्ही गुंजेलाच कोलित समजून नाचत आहात.--

बsssssर ! लोकांना कशाचा आनंद होइल काही सांगता येत नाही.

?

मी नानावटींना दोष दिला, आनंद व्यक्त केला नाही.

डब्बल स्ट्यांडर्ड

आणखी एक महत्वाची बाजू तुमच्या प्रतिसादात मला दिसते आहे ती म्हणजे, माहितीचा स्रोत. जरी माहिती डॉ. मीना प्रभू ह्यांच्या लेखातील असली तरी ती लिओनार्डोने दिलेली असल्यामुळे येथे कोणी त्यावर अपेक्षेप्रमाणे आक्षेप घेतला नाही. हीच माहिती जर एखाद्या वेद / पुराणात, पोथीत, एखाद्या संताने दिली असती तर त्यास "पुरावा द्या, पुरावा द्या", "कै च्या कै" वगैरे आरडाओरडा करुन फेकुन दिली असती.

?

लिओनार्दोने दिलेली माहिती येथे दुर्लक्षिण्यात आली असे वाटते. कारण ती फारच भोंगळ प्रकारची आहे. (ती तथ्यात्मक आहे असे कोणी क्लेम केले असते तर आक्षेप घेतला असता).

त्यावर प्रथम तुम्हीच कॉमेण्ट दिली कारण ती माहिती तुमच्या सोयीची होती. :-)

नितिन थत्ते

का?

ही प्रपोर्शनेटता का असते? ती नसती तर चालले नसते का? गैरसोय होते, ह मुद्दा पटत नाही. आपल्याला पक्ष्यांप्रमाणे उडावेसे वाटत असताना आपल्याकडे पंख नसतात. ही गैरसोयच नाही का? ती गैरसोय कशी चालवून घेतली जाते?

उत्तर डार्विनकडे

--ही प्रपोर्शनेटता का असते? ती नसती तर चालले नसते का?--

ह्या प्रश्नाचे उत्तर डार्विन आणि डिसायपल्स् ऑफ डार्विनच देऊ शकतील

हे म्हणजे..

आभाळाकडे हात करून एखाद्याने "याचे उत्तर परमेश्वराकडेच" असं म्हटल्यासरखं वाटतय.

असे कसे म्हणता?

-- "याचे उत्तर परमेश्वराकडेच" --

नाही हो, असे कसे म्हणता? भारतात डार्विनचे डीसायपल्स आहेत की, ते अजुन "येथेच" आहेत, (नशीबाने). आणि त्यांनी वेळ आणि पैसे खर्चुन डार्विनची पुस्तके वाचलेली असल्यामुळे त्यांना अशी केस मिळाली तर ते नाही म्हणणार नाहीत हाताळायला.

कुठाय प्रपोर्शनेटता

मुळात अशी प्रपोर्शनेटता (प्रमाणबद्धता) नसतेच असे माझे म्हणणे आहे. त्याचे कारण शोधणे दूरच.
(फिक्स/परफेक्ट प्रमाणबद्धता असती तर काही अवयव वाढवून घेण्यासाठीचे उपाय निघालेच नसते).

काकांना आधी आत्या म्हणायचे आणि मग आत्याला मिशा कशा काय याचे आश्चर्य करत बसण्याचा प्रकार आहे हा.

नितिन थत्ते

अमान्य

--मुळात अशी प्रपोर्शनेटता (प्रमाणबद्धता) नसतेच असे माझे म्हणणे आहे.-

ते अर्थातच अमान्य आहे कारण सगळीकडे प्रपोर्शनेटताच भरलेली आहे. एखादं झाड (वृक्ष नव्हे) प्रपोर्शन नसेल तर उभेच राहू शकणार नाही- इतक्या जबरदस्तपणे त्याचा सीजी आणि ब्यालन्स सांभाळलेला असतो. तो अर्थातच १.६क्ष्क्ष् ह्या गोल्डन रेशोमुळे.

कसला सीजी, कसलं प्रपोर्शन?

>>एखादं झाड (वृक्ष नव्हे) प्रपोर्शन नसेल तर उभेच राहू शकणार नाही- इतक्या जबरदस्तपणे त्याचा सीजी आणि ब्यालन्स सांभाळलेला असतो. तो अर्थातच १.६क्ष्क्ष् ह्या गोल्डन रेशोमुळे.

हे धाडसी विधान उदाहरणे देऊन स्पष्ट करा. आणि सगळी प्रमाणे सगळ्या झाडांमध्ये १.६ च असतात हे दाखवून द्या.

येथे सुद्धा पहावे.

जबरदस्तपणे सीजी आणि बॅलन्स सांभाळलेला असतो हेही स्पष्ट करा.

नितिन थत्ते

"एकाच" पानाच्या आकाराची रचना

खालील पेक्षाही विस्तृत प्रतिसाद देणे आवडले असते पण वेळेअभावी इतकेच-

नारळाच्या झाडाचा तुम्ही फक्त जमीनीच्या वरचा भाग बघत आहात.

पानांचा आकार हा खूप वैशिष्ठ्यपुर्ण असतो- नारळाचे घ्या अथवा, चित्र क्र. १ किंवा २ घ्या, ते शेवटी "एकाच" पानाच्या आकाराची रचना असतात. त्या पानाच्या अंतर्भागात गेलात तर (पिपळाचे वाळलेल्या पानाची जाळी पहा) तेथेही अशिच रचना पहायला मिळेल. प्रत्येक ब्रांच ही १.६ रेशो दाखवते. झाडांची मुळेही अशीच विस्तृत होत गेली असतात

थेरी अनैसर्गिक

--याचा अर्थ कळला नाही. फळ खाली पडते ते नैसर्गिकपणे; न्यूटन सांगतो म्हणून नव्हे असे काहीसे म्हटल्यासारखे वाटत आहे.
--
तसे म्हणण्याचे कारण म्हणजे, डार्विनची थेरी अनैसर्गिक आहे.

अधिक स्पेसिफिक उदाहरण द्यावं...

तुमच्या प्रश्नांचं स्वरूप खूपच व्यापक आहे त्यामुळे त्यांना नेटकं उत्तर देणं मला जमत नाहीये. शक्य तितकी सर्वसाधारण उत्तरं देतो. जर एक विशिष्ट उदाहरण दिलंत तर चर्चा करायला सोपं जाईल.

१. फिबोनाची नंबरच्या प्रमाणाबद्दल - काही विशिष्ट गुणोत्तरं घेऊन ती गोल्डन नंबरशी सुसंगत आहेत असं म्हटलं जातं. हा विशिष्ट आकडा दोन प्रकारे येऊ शकतो. एक तर त्या गणिती प्रमाणांचा शरीर तयार होण्याच्या प्रक्रियेशी संबंध असेल (स्पायरल आकाराचा शंख - त्यात रहाणारा प्राणी मोठा झाला की बाहेर येतो व नवीन कवच तयार करतो, यातून आपोआपच स्पायरल तयार होतं) अथवा काहीतरी जनुकीय फायदा (माशीचे बारीक डोळे षटकोनाकृती असतात) असू शकेल. किंवा दुसरी शक्यता अशी असेल की हे प्रमाण केवळ प्रमादाने आहे. म्हणजे जगात सर्व प्रकारची गुणोत्तरं असतात, जिथे लोकांना १.६१८ सदृश दिसले तिथे त्यांनी ते मांडलं. ही गुणोत्तरं १.६१८ आहेत व १.५७०८ (पाय/२) नाहीत इतकं अचूकपणे सांगण्याइतकी मोजमापं आहेत का? एखादं विशिष्ट उदाहरण सांगा, म्हणजे चर्चा अधिक सुकर होईल.

२. सम प्रमाणात हात पाय - हा विचार करताना खरं तर तुम्ही सिमेट्री असण्याचा जनुकीय फायदा काय, किंवा जीव तयार होण्याच्या प्रक्रियेत हे होणं अनिवार्य आहे का असा प्रश्न विचारत आहात. (स्टारफिशच्या बाबतीत सिमेट्रीचं कारण कळलं की ७६ अंशाचा कोन येईल हे उघड आहे). मला असं वाटतं की सिमेट्री तयार करणं सोपं असतं. पृथ्वीवरच्या सजीवांमध्ये अनेक प्रकारच्या सिमेट्री दिसतात. अनुवांशिकतेने त्यातली बायलॅटरल सिमेट्री शिल्लक आहे. दोन किंवा चार पाय असण्याचे चालताना तोल साधण्याच्या दृष्टीने फायदेही आहेत. दोन कान असण्याचा स्टीरिओ इफेक्ट तुम्ही सांगितलातच

३. अवयवांचं गुणोत्तर साधारण समान आहे - एका विशिष्ट प्रजातीमध्ये हे होतं यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे ते कळलं नाही. 'साडेतीन हाताचा देह' असं आपण म्हणतो. खरं तर अशी काही विशिष्ट गुणोत्तरं असलेला प्राणी म्हणजे मनुष्य अशीच व्याख्या करावी लागेल. ते सर्वच प्रजातींना (वेगवेगळ्या गुणोत्तरांनिशी) लागू होतं. वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्यांना वेगवेगळे अवयव आहेत असं म्हटलं तर काहीतरी गुणोत्तरं येणारच ना?

नाही: पण स्तन लहानमोठे असते तर / किंवा एकच असता तर दुधनिर्मितीला अडथळा येऊन मानवजातीच्या एकंदरीतच प्रगतीला बाधा आली असती असे मलातरी वाटत नाही.

अशी विधानं तपासून बघण्यासाठी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते. त्यावरून दोन स्तन असल्याने डौलदारपणा येतो, व त्यासाठी ते दोनच ठेवले गेले आहेत हा टेलिओलॉजिकल युक्तिवाद झाला. 'विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी अमुक गुणधर्म आहे' असं मानण्यापेक्षा 'काय घडलं ज्यातून हा गुणधर्म निर्माण झाला' असा विचार करणं अधिक योग्य. पहिल्या विचारात विश्वावर हेत्वारोप आहे, तर दुसऱ्यात हेतुपूर्ण व निर्हेतुक या दोन्ही शक्यतांना वाव आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

आश्चर्यच आहे

सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल आभार व मला त्यास उत्तर देण्यास उशीर झाल्याबद्दल माफी असावी.

--अवयवांचं गुणोत्तर साधारण समान आहे - एका विशिष्ट प्रजातीमध्ये हे होतं यात आश्चर्य करण्यासारखं काय आहे ते कळलं नाही.--
खरं म्हणजे त्याचच जास्त आश्चर्य मला वाटतं. जनुकीय बदल अपघाताने झाले आहेत असा प्रवाद आहे. किंवा असं मानण्याची प्रथा आहे की, जे वापरलं जातं ते टिकतं. जर हे नियम असतील तर त्यात प्रपोर्शनेटता टिकवण्याचा गुण क्वालीटेटीव्ह आहे- क्वालीटी वरील नियमात बसत नाही.
दुसरे असे की, गोल्डन रेशो हा ही सगळ्या प्राण्यात, झाडा-फुलात (सजीवात) वापरला गेला आहे, जनुकीय बदल अपघाताने झाले आहेत असे म्हणले तर हे एक आश्चर्यच आहे. कारण अपघात हे अपघात असतात म्हणून त्यास आपण अपघात म्हणतो- जे घडले आहे ते एखाद्या पुर्वनियोजित नियमाप्रमाणे घडतंय असे वाटते.
मुळात ह्यामुद्द्यांवर डार्विनभाउंचे काय म्हणणे आहे ते कळले तर आभारी असेन.
तुमच्या प्रतिसादातील इतर मुद्द्यांचा मी विचार करुन उत्तरे देईल.

अपघात

कारण अपघात हे अपघात असतात म्हणून त्यास आपण अपघात म्हणतो- जे घडले आहे ते एखाद्या पुर्वनियोजित नियमाप्रमाणे घडतंय असे वाटते

अपघातही पुर्वनियोजित नियमाप्रमणे घडत नाहित कशावरून ?

तेच तर

--अपघातही पुर्वनियोजित नियमाप्रमणे घडत नाहित कशावरून ?

तेच तर सिद्ध करावे असे माझे मत मी मांडले आहे.

अतीसंवेदनशील शहाणे!

लिओनार्दो दा विंचीने केलेल्या माणसाच्या शारीरिक प्रमाणबद्धतेतील उल्लेखातून फार फार तर एका प्रकारची संरचना (pattern) यात आहे, असे म्हणता येईल. माझ्या मते यापेक्षा वेगळे यात काही नाही. मुळातच लिओनार्दो हा एक कलावंत -वैज्ञानिक होता व कुठल्याही कलावंताप्रमाणे प्रत्येक गोष्टीत तो संरचना शोधत असावा.

माणसं नेहमीच संरचना, प्रमाणबद्धता यांच्या शोधात असतात व त्यांच्या मते त्यात काही तरी गूढ असते व त्या गूढाचे पर्यावसान परमेश्वर वा अतींद्रिय शक्तीपर्यंत पोचते. काही प्रमाणात असाच प्रकार दा विंचीच्या vitruvian man च्या प्रमाणबद्धतेविषयी झालेला आहे.

या प्रकारच्या संरचनेत वा प्रमाणबद्धतेत काही तरी गूढ, अव्यक्त, आपल्या बुद्धीच्या आवाक्यापलिकडचे आहे अशी समजूत करून घेत त्यासाठी कदाचित दैवीशक्ती, अतींद्रिय शक्ती, आत्मा, पिशाच्च,भूत, पर्‍या, देवता, गंधर्व, परग्रहवासी, conspiracy सिद्धांत अशा गोष्टींचा आधार घेत (बुद्धीवंतासकट!) अनेक आपल्या विधानांचे समर्थन करत असतात. याच गोष्टीचा परामर्श रिचर्ड डॉकिन्स या वैज्ञानिकाने आपल्या एका लेखात घेतला आहे.

डॉकिन्सच्या मते माणसाच्या मेंदूतच या गोष्टी हार्ड वायरिंग केल्यासारखे घर करून बसलेले आहेत व स्वत:च्या अस्तित्वाच्या लढाईत याचा फार मोठा उपयोग त्याला झालेला आहे. मुळात त्याला वाटलेल्या अव्यक्त भीतीतून हे हार्ड वायरिंग झालेले असावे. या अव्यक्त भीतीमुळे त्याच्या मेंदूत दोन प्रकारचे चुकीचे विचार घोळू लागले. वार्‍यामुळे घास जोरजोराने हलू लागल्यास घासच आपल्यावर आक्रमण करणार ही त्याच्या विचारातील एका प्रकारची चूक होती. चूक दोन प्रमाणे वार्‍यामुळे घास जोरजोराने हलत असल्यास आपल्यावर आक्रमण करणारा प्राणी त्यात लपून बसला आहे, अशी समजूत करून घेणे. अशा प्रकारे संरचना, प्रमाणबद्धता इत्यादीमुळे मानवी प्राण्याच्या अस्तित्वाला मदत मिळाली आहे. व याप्रकारची संरचना व प्रमाणबद्धता शोधणे ही एक मानवी प्रवृत्ती आहे. लहान मुलांना रोज उगवणारा व मावळणारा सूर्य ही एक पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारी व्यक्तीच वाटत असते. त्यामुळे सूर्याचे चित्र काढताना त्याला डोळे, नाक, (भरदार मिश्यासकट!) तोंड काढले जातात. प्रौढ व्यक्ती फाशी गेलेल्या खुनी माणसाच्या वस्तूंना हातही लावणार नाही. कारण त्या वस्तूद्वारे खुनी माणूस आपल्याला इजा करेल अशी भीती त्याला वाटते. काहींना तर दुसर्‍यांच्या अवयवाचे रोपण करून घेणे अवघड जाते. कदाचित त्या माणसाचे सर्व दुर्गुण वा रोग आपल्या शरीरात येण्याची शक्यता आहे असे वाटत असावे. आपल्या समाजातील काहींना टोमॅटो खाणे निषिद्ध वाटते. कारण त्याचे रस रक्तासारखे दिसते.

स्वत:ला इतरांपेक्षा शहाणे समजणारेसुद्धा संरचना, ऊर्जा, शक्ती, चेतना इत्यादी संकल्पनांमुळे जगाचे व्यवहार चालतात, यावर विश्वास ठेवतात. याचे कुठलेही पुरावे देणे त्यांना शक्य नाही. म्हणूनच अशा मंडळीना संवेदनशील न म्हणता (sensitive) अतीसंवेदनशील (supersensitive) असे म्हणावे लागेल.

हुश्श

-- त्यांच्या मते त्यात काही तरी गूढ असते व त्या गूढाचे पर्यावसान परमेश्वर वा अतींद्रिय शक्तीपर्यंत पोचते.--

मला वाटते त्यात गुढ वगैरे काही नसुन नियम आहेत जे आपण ओळखायचे आहेत. जनुकीय अपघात आहेत असे म्हणणे म्हणजे ह्या निसर्गाशी प्रतारणा आहे. उद्या हे लोक पाणीही उत्क्रांत झाले असे म्हणायला कमी नाही करणार.

बाकी तुमच्या प्रतिसादाने "गोटात" आनंद पसरलेला असेल.

थे-यांचे फ्यान

--पण चाहते असणे यात फ्यान असणे असे अभिप्रेत असावे. म्हणजे डार्विनसारखी वेशभूषा करणे त्याचे प्रत्येक म्हणणे उचलून धरणे वगैरे.--

होय आणि नाही. त्याचे फ्यान नव्हे पण त्याच्या थे-यांचे फ्यान असणे अभिप्रेत आहे.

--इथे बहुधा त्याच्या उत्क्रांतीच्या सिद्धांताला उचलून धरले जाते. --

ही श्रद्धाच नव्हे काय?

श्रद्धाच आहे. आणि मग एखाद्याला देवाच्या अस्तित्वाला उचलुन धरायचे असेल तर त्यास उपक्रमावर बंदी का आहे?

रावले साहेब

अहो काही अभ्यास केला नाही आहे हो त्या कॅप्टनसाहेबांनी. उगाच नका म्हणू की अभ्यास करुन आक्शेप घेतले.

तुम्हाला खरच रस असेल तर चार्ल्स डार्वीन व ट्री ऑफ् लाईफ हा माहीतीपट पहा. युट्युब वर आहे

आल्फ्रेड वॉलेस व चार्ल्स डार्वीन यांच्यात खुन्नस नव्हती की वॉलेसला संधी न द्यायला आधी पुस्तक प्रसिद्ध केले हे चुकीचे आहे. उलट दोघांचे एकमेकांना नेहमी सहकार्य होते.

पण एकंदर आंतरजालावर कोणीही उठून काहीही लिहतो त्याला चार लोक अभ्यासपूर्ण लेखन म्हणतात व आपल्याला हवा तो मतप्रवाह मांडतात हे आता सर्वत्र अती होताना दिसते. एकीकडे जालामुळे अनेक संदर्भ, माहीती उपलब्ध झाली आहे तसेच वाट्टेल तसे (गैर)समज पसरवायची सोयही झाली आहे. अवघड आहे. बील ओ'रायलीशी मी सहमत असेन असे वाटले नव्हते. :-)

पाश्चात्य विरुद्ध भारतीय

असले काही विज्ञानात नसते. विज्ञानाचा प्रत्येक अभ्यासक त्याला मिळालेली माहिती, सिद्धांत वगैरे त्याच्या बुद्धीनुसार आणि पूर्वाभ्यासाच्या आधारे तपासून पाहतो, त्यातले जेवढे पटण्यासारखे असेल तेवढे ग्रहण करतो, नसेल त्यावर विश्वास ठेवत नाही. अमक्या तमक्या विद्वानाने सांगितलेले सगळे बरोबर किंवा चूक असा पूर्वग्रह धरून चालत नाही. शेकडो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या पाश्चात्य किंवा हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय विद्वानांनी नेमके काय सांगितले यावरच कधी एकमत होत नाही. त्यावर आज वाद घालण्यात काय अर्थ आहे?

सिद्धांत कसा मांडला जातो? त्यांचे पुरावे ठेवले जातात कां?

इथपर्यत आलेल्या प्रतिसादांबद्दल आभारी आहे.

श्री. आनंद घारे यांच्या प्रतिसादातील मतितार्थ जाणून मी हा प्रतिसाद देत आहे. -
विद्न्यानाचा अभ्यासक कोण कसा होतो बुवा? मला शाळेत जे शिकवले तेच सत्य म्हणून मी स्विकारले होते. जस जसा मोठा होत गेलो अवांतर वाचन होवू लागले मग जे आतापर्यंत सत्य मानले त्यातच वेगवेगळ्या छटा दिसू लागल्या.

सिद्धांत कसा मांडायचा? कोणापुढे मांडायचा? त्यासाठी अभ्यास कसा करायचा असतो? हे विद्यार्थी दशेत शिकवले गेले नाही. पण ज्यांनी सिद्धांत मांडला त्यांचा मान राखायचा, त्यांना मोठं मानयचं असतं हे मात्र शाळेत, समाजात मनावर बिंबवले गेले. 'जो अशा प्रस्थापित सिद्धांताला आव्हान देतो त्याची टर उडवायची असते' हा समाजाचा नियम असतो असे मात्र मानून चालायचे असते, हे हि शिकलो.

शाळेत आर्यांच्या टोळ्या वायव्येतून भारतात आले हे शिकवले गेले. शालेय पुस्तकातील काळ्या-पांढर्‍या रंगातील दाढीवाल्या लोकांच्या बकरी, गाय यांच्या सोबत चालणारे चित्र हि मनात ठसलेले आहे. पण जस जसे वाचन वाढत नेता, स्वतः चिंतन करता-करता असे जाणवते कि आर्यांच्या भारतातील आगमनाचा सिद्धांत हि खोटा आहे.

जाणवते

>>स्वतः चिंतन करता-करता असे जाणवते कि आर्यांच्या भारतातील आगमनाचा सिद्धांत हि खोटा आहे.

हे चिंतन करताना "जाणवते" म्हणजे नक्की काय ?

नितिन थत्ते

'उमगू लागतात' अशी शब्दरचना हवी होती.

'उमगू लागतात' अशी शब्दरचना हवी होती.

गुगलवरचे नकाशे तुम्ही पाहिलेत कां? सुरवातीला आपल्याला पृथ्वीवरचा काहि भूभाग दिसतो. तिथे काही ठिकाणी हिरवे दिसते, तर काहि ठिकाणी निळे दिसते. कॉमनसेंस ने आपण हे ओळखतो कि जे हिरवे दिसते ती जमिन आहे, व जे निळे दिसतेय ते पाणी आहे, समुद्र आहे. थोडं झूम केल्यावर ठराविक भुभाग जवळ दिसू लागतो. अजून थोडं झूम केल्यावर त्या भुभागावरच्या असलेल्या विविध गोश्टी वेगवेगळ्या रंगात दिसू लागतात, ह्या वेळी जमिन हिरवी दिसेलच असे नाही. अशाप्रकारेच चिंतन करताना नव-नव्या गोश्टी कळू लागतात, उमगू लागतात.

थोडा असहमत

सिद्धांत कसा मांडायचा? कोणापुढे मांडायचा? त्यासाठी अभ्यास कसा करायचा असतो? हे विद्यार्थी दशेत शिकवले गेले नाही.

शाळेत असताना आपण लहान असतो, तेव्हा आधी काय ज्ञान अस्तित्वात आहे ते समजून घेण्याची गरज असते. त्यामुळे त्या मांडणीचं शिक्षण हे नंतर दिलं जातं. तिसरीतल्या मुलाला 'आपली मुंबई' असं पुस्तक देणंच बरं. 'जा जाऊन मुंबईचा नकाशा तयार करा' असं सांगणं योग्य नाही.

'जो अशा प्रस्थापित सिद्धांताला आव्हान देतो त्याची टर उडवायची असते' हा समाजाचा नियम असतो असे मात्र मानून चालायचे असते, हे हि शिकलो.

या बाबतीत थोडा असहमत. शाळेच्या अभ्यासक्रमात अशी टर उडवण्याचं शिक्षण प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे दिल्याचं आठवत नाही. जसजसे मोठे होतो तसतसे प्रयोग करणे, स्वतः काही तत्वं तपासून पहाणे याच्यावर शाळेतदेखील थोडाफार भर दिलेला असतो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

ठिक आहे, मी तुमची सहमती मिळवण्याचा प्रयत्न करतो.

शाळेत असताना आपण लहान असतो, तेव्हा आधी काय ज्ञान अस्तित्वात आहे ते समजून घेण्याची गरज असते. त्यामुळे त्या मांडणीचं शिक्षण हे नंतर दिलं जातं. तिसरीतल्या मुलाला 'आपली मुंबई' असं पुस्तक देणंच बरं. 'जा जाऊन मुंबईचा नकाशा तयार करा' असं सांगणं योग्य नाही.

भारतीयांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. हे आपण भारतीयांनीच आधी स्विकारायला हवे. पूण्याच्या शाळेत 'पूणे हे विद्येचे माहेरघर आहे.' असे लहानपणी शिकवले जाते. त्यात काहि गैर नाही. पण तेथील मुले मोठी झाल्यानंतर, नव्हे वृद्ध झाल्यानंतरही ते विधान 'अंतिम सत्य' समजून आयुश्यभर वागत राहतात.

मानवी मन लहानपणी जी माहिती स्विकारते, त्यातूनच त्याची मानसिकता घडत जाते.

डार्विनला त्याच्या लहानपणी जे तत्वद्न्यान कळत-नकळत मिळाले, त्यातूनच त्याच्या विचारांची दिशा घडत गेली. त्याच्या निरीक्शण शक्तीतून त्याने जे पाहिले त्याची त्याने नोंद केली. व अशा नोंदी अखेरीस एकत्रित पणे आभ्यासल्या नंतर त्याने जे अनुमान काढले त्याला त्याचा सिद्धांत असे मानले गेले. मुळात त्याने कोणताही मोठा शोध लावला नव्हता. लहानपणापासून त्याला वयाने मोठ्या असलेल्या आसपासच्या मंडळींकडून जी माहिती मिळाली होती त्याच विचारचक्रातून त्याने आपले अनुमान काढले. बालपणी झालेल्या विचारांचाच त्याच्यावर प्रभाव होता. फक्त त्याने धर्म, देव ह्या संकल्पना बाजूला ठेवून आपले अनुमान पुस्तकातून मांडले.


कोणाला, कशी प्रसिद्धी मिळते?, कोण कधी नावारुपाला येतो? हे वेगळेच कोडे असते.
उदा.: श्री. अण्णा हजारेंनी महाराश्ट्रात अनेक आंदोलने केली, उपोशणे केली. परंतु दिल्लीत एक उपोशण काय केले, ते खूप मोठे झाले. श्री. राज ठाकरेंनी घाटकोपरच्या एका अगदी स्थानिक स्तरावरच्या सभेत भाशण काय दिले त्यानंतर ते अगदी मोठे राजकिय नेते म्हणून गणले जावू लागले.

गाडी पुन्हा रूळावर घेवूया!

श्री. गिरीश यांच्या मताचा मी मान राखतो. पण त्यांना, 'मी ठेवलेल्या चर्चेचे स्वरूप वेगळे आहे!' हे नमूद करू इच्छितो.

भारतीयांची काहि मते हि पाश्चात्यांसाठी 'भाबड्या श्रद्धा' असतात, व
पाश्चात्यांची काहि मते हि भारतीयांसाठी 'थापा' असतात. चर्चेचे स्वरूप काहिसे असे होते, आहे. मला ते व्यवस्थित मांडता आले नसल्यास दिलगिरी व्यक्त करतो.

'शास्त्र', 'शास्त्र' म्हणजे तरी काय असते? पाश्चात्य मंडळी त्यांची निरीक्शणे पद्धतशीरपणे नोंदवत व त्या निरीक्शणांचा किचकट शब्दांच्या डोलार्‍यासकट, अखेरीस एक अनुमान काढून ते पुस्तकाच्या (बहुतेकदा) माध्यमातून प्रकाशित करतात. इतर मंडळी त्या पुस्तकातील लिखाण मान्य करत त्याला 'अमुक-तमुकचा सिद्धांत' म्हणून स्विकारतात.

आपल्याकडे मात्र असे होत नाही. असे कसे?

एक उदाहरण घेतो. श्री. शुभानन गांगल यांनी देखिल काहि वर्शापूर्वी जेंव्हा ते समुद्र सफरीवरून परत आले त्यानंतर, भाशेचे ध्वनीशास्त्र असे पुस्तक मराठी भाशेतून स्वत:च्या खर्चाने छापले होते. त्या पुस्तकात ज्याला 'शास्त्र' म्हणतात अशा 'किचकट शब्दांचा भडिमार' होता. पुस्तकाची छपाई उत्तम दर्जाची होती. पण त्यांचे लिखाण या महाराश्ट्रात, भारतात 'शास्त्र' म्हणून स्विकारले गेले नाही, त्यांच्या मतांना 'गांगल यांचे सिद्धांत' असे मानले गेले नाही. कुणीही खूल्या दिलाने त्यावर चर्चा केली नाही. अपवाद केवळ लोकसत्ता या वर्तमान पत्राचा, केवळ त्या वर्तमान पत्रकडून त्यांचे लेख, त्यांच्या पुस्तकाबाबतची माहिती वाचकांना देण्यात आली होती. मनोगत ह्या संकेतस्थळावर ते स्वत: काही लेख लिहीत होते. पण ते स्वत:ही खुल्या दिलाने वाचकांशी, चर्चा करीत नव्हते. 'तुम्ही प्रतिसाद द्या, मी ते वाचून त्यावर दुसरा लेख लिहीन, तो तुम्ही वाचा.' अशी त्यांची मानसिकता होती.

शास्त्र विकसित कशामुळे होतं?
- पद्धतशीरपणे अभ्यास करण्याच्या पद्धतीमुळे?....नाही.
- तो पद्धशीरपणे मांडण्यामुळे?.... नाही.
- पुस्तके, लेख छापण्यामुळे?..... नाही.
शास्त्र विकसित होत असावं, स्वत:शी व इतर जनांशी व्यवस्थित संवाद केल्यानंतर. जे पटलयं ते सगळ्यांनी तोलून धरल्यानंतर, होय नां?

डार्विनचा संवाद लहानपणापासून ज्यांच्याशी होता ते तत्वद्न्यानाची माहिती असलेले होते किंवा / आणि विद्न्यानाचे अभ्यासक होते. त्याने इतरांचे ऐकून घेतले आणि मग त्यानंतर त्याचे मते घडत गेली. त्याने त्याच्या आयुश्यात जीवशास्त्रा विशयी निरीक्शणे नोंदवली व ती अनुमानासहीत इतरांसमोर ठेवली जी इतरांनी मान्य केली. ती मते आधारभूत होवून ती थेअरी म्हणून विकसित झाली.

पाश्चात्यांच्या 'अभ्यास करण्याच्या पद्धतीपेक्शा', 'तो पद्धशीरपणे मांडण्यापेक्शा', त्यांची 'एकमेंकांशी संवाद साधण्याची प्रवृत्ती' भारतीयांच्या 'एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रवृत्ती' पेक्शा नक्कीच सरस आहे, असे वाटू लागलेय.

घरकी मुर्गी दाल बराबर

रावले साहेब माफी असावी, हा धागा हायज्याक करण्याचा हेतू नाही. "पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा" हे टायटलच इतके क्याची आहे की, राहवले नाही.

तुम्ही वेद-पुराणातील एखादे सुभाषित घ्या, त्यास इंग्रजीत कन्व्हर्ट करा व एखाद्या १७-१७ व्या शतकातील इंग्रज माणसाचे नाव शोभेलसे नाव घ्या- उदा- बेंजामिन वुड; नंतर ते सुभाषित फेसबुकावर टाका, पहा त्यास किती भरभरुन कॉमेंटस् येतील, लोकांना ते आवडेल. येथे काय प्रतिक्रिया येतील ह्याचा अंदाज तुम्हास आहेच.
उलट ते सुभाषित तसेच संस्कृतात ठेवुन फेसबुकावर द्या- किती आणि कशा कॉमेंट्स येतात ते पहा.

थोडक्यात, इंग्रज माणसाने काहीही थापा मारल्या तरीही ते बाबावाक्यम् असते.

आँ?

फेसबुकाला एखादी वैज्ञानिक थिअरी स्वीकारण्याचे / नाकारण्याचे योग्य माध्यम कधी पासून समजू लागलात?

फेसबुकाचे काय घेऊन बसलात. काही साईटवर तुम्ही लिहिलेल्याच्या उलटही प्रकार दिसेल.

नितिन थत्ते

काहितरी गैरसमज

--फेसबुकाला एखादी वैज्ञानिक थिअरी स्वीकारण्याचे / नाकारण्याचे योग्य माध्यम कधी पासून समजू लागलात?--

नितिनसाहेब तुमचा काहितरी गैरसमज झालेला आहे. मी सुभाषितांबद्दल बोललो होतो.

नाही

गैरसमज बहुतेक नाही. तुम्ही म्हणालात की काहीतरी इंग्रजीत लिहून पाश्चात्याच्या नावे फेसबुकावर टाकले तर लगेच स्वीकारले जाईल. पण सुभाषित संस्कृतात टाकले तर स्वीकारले जाणार नाही.

सध्या आपण उत्क्रांतीवादाबद्दल चर्चा करीत आहोत. थिअरी फेसबुकावर स्वीकारली जाते/जात नाही याविषयी टिपण्णी केली.

नितिन थत्ते

"काहीतरी" नाही.

--काहीतरी इंग्रजीत--

नाही "काहीतरी" नाही. व्यवश्थित इंग्रजीत भाषांतर करुन एखादे सुभाषित असे मी म्हणालो.

बाकी तुमच्या ह्या मताशी मी सहमत आहे- "काही साईटवर तुम्ही लिहिलेल्याच्या उलटही प्रकार दिसेल."

वाद करायची घाई नडते

(विदेशी विचारकांची) 'एकमेंकांशी संवाद साधण्याची प्रवृत्ती' भारतीयांच्या 'एकमेकांशी संवाद साधण्याच्या प्रवृत्ती' पेक्शा नक्कीच सरस आहे, असे वाटू लागलेय.

प्रवृत्ती किंवा हातोटी वा कसब असे जास्त सयुक्तिक वाटते.

शास्त्र विकसित होत असावं, स्वत:शी व इतर जनांशी व्यवस्थित संवाद केल्यानंतर. जे पटलयं ते सगळ्यांनी तोलून धरल्यानंतर, होय नां?

संवाद करायला लोक तयार आहेत कुठे? कोणी काही म्हटले की त्याचा अभ्यास करायच्या आधीच किंवा न करताच ते खोटे आहे असे म्हणून वाद करायची घाई नडते असे मला नाडी ग्रंथांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवले।

नाड़ी ग्रंथ प्रेमी
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९

 
^ वर