पाश्चात्यांच्या थापा विरुद्ध भारतीयांच्या भाबड्या श्रद्धा
उपक्रमवर या आधी एका लेखातून श्री. ईश आपटे यांनी डार्विन ने मांडलेल्या सिद्धांताला आक्शेप घेण्यात आलेले होते. नेमकं सत्य काय हे कोणीच जाणत नसतं. मला स्वत:ला डार्विनने भारतीय हिंदू धर्मशास्त्रांची (दशावतार इत्यादी) पुस्तके वाचून वा चित्रे पाहून त्या नुसार संशोधन करून त्याने वरील सिद्धांत मांडला असावा असे उगीचच वाटत होते. (श्री. ईश आपटे यांनी डार्विनची माहिती मिळवून त्याचा सिद्धांत मांडणे हेच कसे खोटे होते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना आधिच्या लेखातून जितका उपहास भोगायला लागला तेवढा लागला नसता. )
हे असे मला एक ब्लॉग वाचून वाटायला लागले आहे.
ब्लॉग"चार्लस् डार्विन व त्याचे सफरचंद"
ह्या दुव्यावरील लेखात श्री. अजित वडाकयील यांनी डार्विन कोण होता? याचा अभ्यास करून त्याच्या सिद्धांत मांडण्याच्या पद्धतीवरच आक्शेप घेतले आहेत. त्यांचे लिखाण सत्याला धरून असेल तर त्यांचे विचार पटण्याजोगे आहे.
Comments
योग्यच
वाद करण्याची घाई योग्यच आहे. त्या घाईमुळे आमचा काहीही तोटा झाल्याचे सिद्ध झालेले नाही. हसे होणे टाळले जाण्यास 'नडणे' संबोधू नये.
--
डार्विनने स्वतः पुरावे शोधले आणि मान्यताप्राप्त पुराव्यांच्या आधारे मत मांडले. "ठशांच्या आधारे शोधल्या गेलेल्या नाडीत त्या ठसेधारी व्यक्तीची माहिती असते" हा पुरावा मान्यताप्राप्त नाही. तो पुरावा तुम्ही सिद्ध केलात तर मी नक्कीच नाडी'शास्त्राचा' अभ्यास करेन. नाडी'शास्त्राच्या' समर्थनार्थ पुरावे शोधून देण्याची जवाबदारी तुम्ही स्वीकारलेली नाही.
The Vulcan Science Directorate has determined that Time Travel is impossible.
"नडते" , "नाडी" आणि संवाद
हे शब्द बघुन प्रवेश केला.
इतर एका संस्थळावर दिलेल्या आपल्याच प्रतिसादानुसार नाडी ग्रंथ काय किंवा खुद्द आपली विधाने काय ; ह्यांची विश्वासार्हता ही सत्य साईबाबांच्या चमत्काराइतकीच आहे हे आपणच सांगितलेलं आहे साहेब.
ह्याउप्परही त्या विषयावर तुमच्याशी उपक्रमावर संवाद व्हावा अशी आपली अपेक्षा आहे का?
अवांतरः-
प्रतिसादामध्ये भय-भयंकर फाँट आणि रंगसंगती न वापरल्याबद्दल आपले मनःपूर्वक् आणि जाहिर आभार.
--मनोबा
कसब
--संवाद करायला लोक तयार आहेत कुठे? कोणी काही म्हटले की त्याचा अभ्यास करायच्या आधीच किंवा न करताच ते खोटे आहे असे म्हणून वाद करायची घाई नडते असे मला नाडी ग्रंथांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवले। --
नाडी बद्दल वेस्टर्न जगातील इंग्रज माणासाने लिहिलेले नसल्यामुळे तसे होते.
कसब हा इतका उच्च प्रकार आहे की, पढतमुर्खास त्याचे महत्व स्वतः असे काही कसब मिळवल्याशिवाय समजत नाही.
जो जे..
नुकतीच नाडीची आंतरराष्ट्रीय (की तत्सम) परिषद पश्चिमेतल्या एका देशात् झाली. तुमची इच्छा लवकर पूर्ण होवो, वेस्टर्न जगातील् कोणाही इंग्रजाने लिहले की लोक् त्यावर विश्वास ठेवतात ह्या तुमच्या अंधविश्वासाला नाडिइतकेच आयुष्य लाभो...
-Nile
सहमत
--वेस्टर्न जगातील् कोणाही इंग्रजाने लिहले की लोक् त्यावर विश्वास ठेवतात --
+ १ सहमत आहे. डार्विनवर अशीच (अंध) श्रद्धा असलेले अनेक जण भारतात आहेत. डॉ. रीवर्क हिलरी त्यांत आघाडीवर आहेत.
"आम्ही जे..." स्क्रिप्ट
अक्च्युली, गोरे लोकं भारतीयांसाठी त्यांनी काय इच्छा धराव्यात तेही ठरवतात. त्यामुळे "जो जे..." नव्हे तर, "आम्ही जे..." असे ते म्हणत असावेत. ते लोक स्क्रिप्ट लिहितात जग त्याप्रमाणे वागायला सुरुवात करते.
भारतीयांसाठी !!!
गोरे लोकं भारतीयांसाठी त्यांनी काय इच्छा धराव्यात तेही ठरवतात
ह.ह.पु.वा.झाली. भारतीय लोकांनी कसल्या इच्छा मनात घराव्यात असे ती गोरे लोकं ठरवतात याचे एकादे उदाहरण?
हजारो आहेत
हजारो आहेत. अगदी बेसिक उदाहरणापसुन सुरुवात करु: "सकाळी उठल्यावर पेस्टने दात घासावेत" - मग आपल्या हातात काय राहतं तर एव्हढाच विचार करणं- कोलगेट, मेसवाक, प्रॉमिस घेऊ की विको.
मग
'भारतीयांच्या थापा विरुद्ध पाश्चात्यांच्या भाबड्या श्रद्धा' असा लेखाचा एक नवा विषय ही मिळेल.
थापा मारण्यात तरी पाश्चात्यांची ही मक्तेदारी कशाला?
आणखी एकदा वाचा
माझा प्रश्नः भारतीय लोकांनी कसल्या इच्छा मनात घराव्यात असे ती गोरे लोकं ठरवतात याचे एकादे उदाहरण?
उत्तरः "सकाळी उठल्यावर पेस्टने दात घासावेत"
ही इच्छा खास भारतीयांसाठी आहे का ? इतर गोरे , काळे, पिवळे लोक काय करतात?
काही शहरवासी भारतीयांनी मंजन किंवा मशेरी ऐवजी पेस्ट वापरायला सुरुवात केली ती त्यांना तसे करावे असे वाटले आणि पटले यामुळे त्यांनी केले. यात 'गोरे लोकं ठरवतात ' असे मला कुठेच दिसत नाही.
खोलवर रुजले आहे.
-- यात 'गोरे लोकं ठरवतात ' असे मला कुठेच दिसत नाही.--
बरोबर आहे, असे दिसण्याचे कारण म्हणजे, भारतीय लोकांनी लावलेले नगण्य शोध. 'हे असेच असते' असे स्वीकारले गेले आहे, इतके ते खोलवर रुजले आहे.
ठिक आहे, वरचे उदाहरण नाही पटले तर नाही. दुसरे बघु: "दाढी करण्यासाठी शेव्हींग क्रिम लावावे व ब्लेड वापरावे."
जैन दाढी
तुम्हाला जैन संन्याश्यांच्या पद्धतीने दाढी करण्यापासून गोरेकाकांनी किंवा काळेकाकांनी अडविलेले नाही, पाहिजे तेवढे उपटा.
आमचे येथे बिनपाण्याची हजामत करून मिळेल.
उत्तम विनोद बुद्धी
काय जबरदस्त प्रतिसाद आहे! खरंच मला साक्षात्कार झाला. :-) उत्तम विनोद बुद्धी हे प्रद्न्यावंतांनाच जमते हे पटले.
--आमचे येथे बिनपाण्याची हजामत करून मिळेल.--
हा ते मात्र तुम्हाला जमेलच - त्यात शंकाच नाही.
आणखी २-३ उदाहरणे:
आणखी २-३ उदाहरणे:
१. तुम्ही पदार्थ टिकवण्यासाठी फ्रिज वापरायचा. त्यात सीएफसी वापरायचा. आता आमच्या लक्षात आले आहे की, ओझोनच्या लेयरला भगदाड पाडण्यासाठी सीएफसी कारण आहे. म्हणून तुम्ही आता दुसरा आम्ही सांगू तोच ग्यास वापरायचा.
२. तुम्ही सीआरटी मॉनीटर असलेले टीव्ही वापरुन मनोरंजन करायचे. मग आम्ही नव्या-नव्या टेक्नॉलजीचे टीव्ही आणत राहू ते तुम्ही वापरायचे
३. आम्ही २-स्ट्रोक २-व्हीलर टेक्नॉलजी बनवु. तुम्ही त्याप्रमाणे त्या बनवायच्या. नंतर आम्ही ४-स्ट्रोक आणू तुम्ही तशा गाड्या बनवायच्या.
तुम्ही
डॉक्टरांना का दाखवत नाही?
-Nile
पाश्चात्य
कदाचित बहुतेक डॉक्टरकीचे शोध पाश्चात्य देशांत गोर्यांनी लावल्यामुळे असावे ;)
आयुर्वेद?
--कदाचित बहुतेक डॉक्टरकीचे शोध पाश्चात्य देशांत गोर्यांनी लावल्यामुळे असावे ;)--
आयुर्वेद येथेच जन्मला. त्याबद्दल तरी येथे दुमत नसावे
बाकी तुम्ही म्हणताय त्यात काहीच गैर नाही. अधुन-मधुन काही-काही औषधांवर बंदी घातली जाते ते तुम्ही वाचत असालच. ती का घातली जाते, बंदी घालण्याची वेळ का आली, अशा प्रश्नांचीही उत्तरे बरेच सांगुन जातील
स्वनुभव हाच गुरु
--डॉक्टरांना का दाखवत नाही?--
सॉल्लेड !! काय डायग्नॉसिस आहे. लोकं म्हणतात ते खरे आहे स्वनुभव हाच गुरु !