ललित/ माहितीप्रधान

आज दिनांक २७-१-२०११ रोजी मी वरिल लेख उपक्रमवर प्रकाशित करण्यासाठी लेख या सदराखालील सामाजिक विचार हे विषय निवडुन पाठवला पण लगेच संपादक मंडळाने पुढिल निरोप पाठवुन माझा लेख अप्रकाशित केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलि. ------>

प्रति: नुस्तीच लुडबुड
विषय: लेखन अप्रकाशित
दिनांक: गुरू, 01/27/2011 - 18:07
नमस्कार,
माहितीप्रधान लेखन, चर्चा आणि समुदाय हे उपक्रमचे स्वरूप टिकून राहावे आणि उपक्रमच्या लेखनविषयक उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन इथे असावे, या लेखनात ललित लेखन, पद्य किंवा कवितांना सध्या स्थान दिलेले नाही याकारणाने तुमचे लेखन अप्रकाशित करण्यात आले आहे याची कृपया नोंद घ्यावी. लेखनविषयक मार्गदर्शन इथे वाचता येईल. आपले लेखन अप्रकाशित करावे लागल्याबद्दल खेद आहे. उपक्रमच्या उद्दिष्टांशी सुसंगत असेच लेखन करून कृपया सहकार्य करावे.
कलोअ,
संपादन मंडळ

मी सदर लेख एक विचार व्यक्त करण्याच्या हेतूनेच दिला होता. तरी त्यांनी उल्लेखिल्याप्रमाणे सदर लेख कोणत्या अंगाने ललित लेखन, पद्य किंवा कविता वाटतो ते कृपया मला सांगावे जेणेकरुन पुढील लेख लिहिताना मला काळजी घेता येइल व लेख अप्रकाशित झाल्याचे दु:ख भोगावे लागू नये.
ललित लेखन म्हणजे नक्कि काय? आणि माहितीप्रधान लेखन म्हणजे तरी काय??
कृपया स्पष्ट करा.

मजकूर संपादित. ललित लेखन म्हणजे काय या विषयावर संकेतस्थळावर चर्चा व्हावी पण विषयांतर होऊ नये म्हणून काही मजकूर संपादित केला आहे. सर्व सदस्यांनी उपक्रमाच्या धोरणांप्रमाणे लेखन करावे ही विनंती.

Comments

ललित आणि ललितेतर

ललित लेखन म्हणजे नक्कि कायब् ? आणि माहितीप्रधान लेखन म्हणजे तरी काय ??

ललित लेखन हे भावनांना आवाहान करतांना दिसते तर शास्त्रीय साहित्य किंवा माहितीपूर्ण लेखन वाचकांच्या विचारांना आवाहन करते. ललित लेखनात भावनांच्या विविध छटा टीपलेल्या असतात तर इतर लेखनात ज्ञानात्मक अशा विचारांची मांडणी केलेली असते. ललित लेखन हे व्यक्तीनिष्ठ असते. व्यक्तिगत अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या साह्याने ललित लेखन केले जाते. माहितीपूर्ण लेखनात तर्कनिष्ठ आणि सुसंगत मांडणी करुन ज्ञानाचे आदानप्रदान होत असते. अजून बरेच काही सांगता येईल तुर्तास थांबतो.

सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणारे किंवा आक्षेपार्ह असे हे लेखन आहे का??

आक्षेपार्ह किंवा सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणाने लेखन नाही याबद्दल दुमत असणार नाही. पण, मराठी संस्थळाची स्वतःची अशी काही ध्येयधोरणे असतात. उपक्रम संस्थळाचे लेखनविषयक मार्गदर्शन पाहता आपले लेखन अप्रकाशित होऊ शकते असे वाटते.

-दिलीप बिरुटे

विचार?????????????????????

ललित लेखन हे भावनांना आवाहान करतांना दिसते तर शास्त्रीय साहित्य किंवा माहितीपूर्ण लेखन वाचकांच्या विचारांना आवाहन करते.
---भवना व विचार यातील फरक स्पष्ट करा.

ललित लेखनात भावनांच्या विविध छटा टीपलेल्या असतात तर इतर लेखनात ज्ञानात्मक अशा विचारांची मांडणी केलेली असते.
----हम्म..... ज्ञानात्मक विचार! विचारांचे इतर प्रकार स्पष्ट करा. किती आहेत्??

ललित लेखन हे व्यक्तीनिष्ठ असते. व्यक्तिगत अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या साह्याने ललित लेखन केले जाते. माहितीपूर्ण लेखनात तर्कनिष्ठ आणि सुसंगत मांडणी करुन ज्ञानाचे आदानप्रदान होत असते.
------व्यक्तीनिष्ठ सुसंगत राहुन व्यक्तिगत अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या साह्याने वैचारीक लेखन करताच येणार नाही का?? का करता येणार नाही?

नुसतीच प्रश्नाची लुडबुड नको राव.

>>> भवना व विचार यातील फरक स्पष्ट करा.
ही भवना कोण ? भावना आणि माहितीपूर्ण विचार यातील फरक नक्कीच स्पष्ट करता येईल
पण आपण नुसतेच प्रश्न विचारत आहात त्यामुळे वरील प्रश्नाबद्दल आपल्याला काय वाटते ते लिहावे असे वाटते.

>>>ज्ञानात्मक विचार! विचारांचे इतर प्रकार स्पष्ट करा. किती आहेत् ??
माहिती नाही.

>>>अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या साह्याने वैचारीक लेखन करताच येणार नाही का??
करता येईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

प्रश्नच् फक्त बाकी काही नाही

पण आपण नुसतेच प्रश्न विचारत आहात त्यामुळे वरील प्रश्नाबद्दल आपल्याला काय वाटते ते लिहावे असे वाटते.
---- स्पष्ट करता येत असेल तर करावे. दुसर्याचे मडके का ठोकुन पहायचे?? अच्छा पक्के असेल तरच सांगणार का?? हा चातुर्वर्ण प्रकार वाटतो मला. अस्पृश्या ला प्रवेश निषिद्ध !!
मला नुस्तेच प्रश्न पडतात त्यामुळे नुस्तीच लुडबुड असते माझी. जास्त प्रश्न विचारलेले का आवडत नाही लोकांना ते काही कळत नाही मला.

>>>ज्ञानात्मक विचार! विचारांचे इतर प्रकार स्पष्ट करा. किती आहेत् ??
माहिती नाही.
--- म्हणजे विचाराचा एकच प्रकार अस्त्तित्वात असावा

>>>अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या साह्याने वैचारीक लेखन करताच येणार नाही का??
करता येईल असे वाटते.
--- तस असेल तर वैचारीक व ललित मधे फ़रकच नाही काही!

हम्म

जे काल्पनिक आहे आणि ज्याच्या सत्यतेविषयी संदेह आहे, जे कथित आहे आणि ज्याचे संदर्भ शोधणे कठिण आहे, जे स्वरचित आहे आणि तर्कनिष्ठ नाही, जे सत्य आहे पण तरीही अलंकारिक भाषेत अतिशयोक्तीचा वापर करून मांडले आहे अशाप्रकारच्या लेखनाला ललित लेखन म्हणणे शक्य आहे.

आपण जो लेख दिलात त्यानंतर त्याची मीमांसा केली असती, लोकांकडून आपल्याला कशाप्रकारचा प्रतिसाद हवा हे सांगितले असते तर बहुधा लेख संपादित झाला नसता असे वाटते. (उदा. नानावटींचा परमेश्वराची करूणा हा लेख)

चू. भू. दे.घे.

अँ???

---जे काल्पनिक आहे आणि ज्याच्या सत्यतेविषयी संदेह आहे, जे कथित आहे आणि ज्याचे संदर्भ शोधणे कठिण आहे, जे स्वरचित आहे आणि तर्कनिष्ठ नाही, जे सत्य आहे पण तरीही अलंकारिक भाषेत अतिशयोक्तीचा वापर करून मांडले आहे अशाप्रकारच्या लेखनाला ललित लेखन म्हणणे शक्य आहे.
डोक्यावरून जेट विमाने गेली. जास्त विस्तारीत करून सांगाल काय सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत एवढी हाय लेव्हलची भाषा कळत नाही. प्रा. बिरूटेंप्रमाणे भाषा का नाही आपली??

मजकूर संपादित.

:-)

जास्त विस्तारीत करून सांगाल काय सामान्य माणसाला कळेल अशा भाषेत एवढी हाय लेव्हलची भाषा कळत नाही.

जवळपास माझ्याच प्रतिसादासारखा प्रतिसाद धनंजय यांचा आहे आणि तो विस्तृतही आहे. आपण अवश्य वाचावा.

प्रा. बिरूटेंप्रमाणे भाषा का नाही आपली??

कारण मी प्राध्यापक नाही, बिरुटेही नाही आणि बिरुट्यांसारखीच माझी भाषाशैली असावी अशी माझी प्रबळ इच्छाही नाही, तेव्हा दोन वेगळ्या व्यक्तींची भाषा सारखी नसणारच. :-)

:|

जवळपास माझ्याच प्रतिसादासारखा प्रतिसाद धनंजय यांचा आहे आणि तो विस्तृतही आहे. आपण अवश्य वाचावा.
--- त्यात मला स्वजाहिरातीचा वास आला म्हणुन ओलांडुन पुढे जावे लागले. आता तुम्ही संगितले म्हणुन वाचल तर काहीच हाती लागले नाही. हे बघा ते बघा ...... आणि ते.. ते तेसुद्धा बघा! अरे एकवेळि नक्कि काय काय बघा. उगाच गोल गोल फ़िरवत आहेत असे वाटले. विस्तारित प्रतिसाद असला तरी सामान्य माणसाला कळावा असे मी अपेक्षिले होते आपणाकडे!

कारण मी प्राध्यापक नाही, बिरुटेही नाही आणि बिरुट्यांसारखीच माझी भाषाशैली असावी अशी माझी प्रबळ इच्छाही नाही, तेव्हा दोन वेगळ्या व्यक्तींची भाषा सारखी नसणारच. :-)
--- एवढे बोलण्यापेक्षा आपण "मला ती भाषा येत नाही" असे ही म्हणु शकला असता थोडक्यात सामान्य माणसाला समजेल असं.

तेच ते..

हा प्रस्ताव इथे टाकायचे काय कारण? तुमचा मूळ लेख काय आहे माहित नाही. तो ललित आहे की नाही हे ठरवण्याचा हक्क संपादक मंडळाचा आहे. उपक्रम हे १००% खाजगी स्थळ आहे तेव्हा तुम्हाला ज्या काय शंका असतील त्यांचे फक्त मालक किंवा संपादकच निवारण करू शकतील. इथे चर्चा करणे निष्फळ आहे.

१००% सही

सहमत्---इथे चर्चा करणे निष्फळ आहे.
एकदम बरोबर बोललात राव! नुस्तीच लुडबूड यांनी अपमानाने व्यथित होउन असला प्रकार केला आहे असेच मलाहि वाटतय्...
ऑल राइट्स् मस्ट् बी रिझर्व्हड टू मॅनेजमेंट् टीम!!
इथे उगाचच् हा अर्थहीन धागा अठवतोय्--अंकुश

२००% सहमत

ऑल राइटस् रिझर्व्हड् टु मॅनेजमेंट् टीम.

खुलासा

--हा प्रस्ताव इथे टाकायचे काय कारण?
काहीही नाही. टैमपास्स फक्त. किंवा ज्ञानात भर दुसर्यांच्या!! :)

---तुमचा मूळ लेख काय आहे माहित नाही.
ही मुळात माझी चुक नाही आहे. मी प्रस्तावात संपूर्ण लेख त्याच्यावर आलेल्या प्रतिसादासकट दिला होता. पण संपदकांनीच उडवल्यास त्याबाबतीत मी काहीही मदत करु शकत नाही.

---तो ललित आहे की नाही हे ठरवण्याचा हक्क संपादक मंडळाचा आहे. उपक्रम हे १००% खाजगी स्थळ आहे तेव्हा तुम्हाला ज्या काय शंका असतील त्यांचे फक्त मालक किंवा संपादकच निवारण करू शकतील. .
संपादक मंडळाला वरील अर्थाचाच व्यनी पाठवला होता आधिच. पण काहीच प्रतिसाद नाही मिळाला.

---- इथे चर्चा करणे निष्फळ आहे.
असं का वाटतय?? :(

लेख ब्लॉगवर प्रकाशित करून दुवा देणे

लेख तुमच्या ब्लॉगवर प्रकाशित करून दुवा द्यावा, ही विनंती. (ब्लॉग अल्प प्रयासाने, फक्त या लेखापुरता स्थापता येईल.)

नाहीतर चर्चा निष्फळ होईल.

टोकाच्या परिस्थितीत ललित आणि बिगरललित असा फरक असतो, असे बहुतेकांना जाणवेल.

म्हणजे "पंचतंत्रातल्या कथा" या ललित आहेत - त्यांच्यात शेवटी "बोध" हा विचार सांगितला असला तरी त्या ललित आहेत - याबद्दल बहुतेक लोकांची सहमती प्राप्त होईल.

मात्र "मित्रांचा विश्वासघात करू नये, केल्यास तोटे, न-केल्यास फायदे" अशा प्रकारचा निबंध बिगरललित आहे याबद्दल बहुतेक लोकांची सहमती प्राप्त होईल. मग त्या निबंधात कुठेतरी पंचतंत्रातील उद्धरण असले तरी चालेल.

या काळ्या-पांढर्‍या टोकांच्या मध्ये करडे क्षेत्र सापडेलच. उदाहरणार्थ आजच श्री. प्रभाकर नानावटी यांनी येथे दिलेला "परमेश्वराची करुणा" हा लेख बघावा.
यात बोधकथा आधी दिलेली आहे, आणि त्या बोधाबद्दल चर्चा त्यानंतर केलेली आहे. शब्दसंख्येच्या दृष्टीने ~४०% कथा, ~६०% मंथन असे आहे. सामान्यपणे ललित बोधकथेत बोधाबद्दल एखादे वाक्य-एखादा परिच्छेद असतो, तोच इथे लांबवला आहे काय? असे असल्यास याला ललित-बोधकथा का न म्हणावे?
याउलट बघावे, निबंधांत कथेचे उद्धरण असते, ते असेच एखादे वाक्य-एखादा परिच्छेद असे असते. त्याचेच मोठे रूप श्री. नानावटींच्या निबंधांत आहे. तर याला कथेचे उद्धरण करणारा बिगर-ललित निबंध का न म्हणा?

या करड्या क्षेत्रात काहीतरी वर्गीकरण उपक्रमाचे संपादकमंडळ करते. उदाहरणार्थ श्री. नानावटी यांच्या लेखाच्या बाबतीत "बिगरललित" असा निर्णय केला.

किंवा माझा स्वतःचा एक लेख घ्या : "पन्नूमावशीचे बाळ (मुलांसाठी सिगारेटविषयी वैद्यकीय माहीती)" किंवा श्री. ऋषिकेश यांची मालिका घ्या - "आजी-आजोबांच्या वस्तू". या दोन्ही ठिकाणी "बालसाहित्य" हा हेतू होता. माझा तो लेख उघड-उघड नाट्यछटेच्या मुशीतून घडवला होता. श्री. ऋषिकेश यांचे लेख "एका कुटुंबातील सुखसंवाद" अशा प्रकारे लिहिलेले आहेत. या दोन्ही प्रकारात लालित्य अबाधित राखण्याचा कसून प्रयत्न केला आहे. असे असून त्यात ललितलेखन प्राथमिक नसून माहिती देणे हा प्राथमिक हेतू आहे, असे लेखकांसह संपादकमंडळानेही मान्य केले. बालसाहित्यासाठी लालित्याबद्दल निकष थोडे शिथिल आहेत.

बहुधा संकेतस्थळ चालकांना आणि संपादकमंडळाला "संकेतस्थळ कसे दिसावे" याबद्दल काही ढोबळ कल्पना आहे. पण काळ्यापांढर्‍या टोकांमध्ये करडे क्षेत्र अपरिहार्य आहे, हेसुद्धा त्यांना ठाऊक आहे. ही अपरिहार्यता जाणून "ललित आणि बिगरललित यांच्यात जळजळीत अग्निरेखा" चितारण्याचा त्यांचा मानस नसेल.

- - -
बिरुटेसरांनी दिलेले वर्णन

"ललित लेखन हे ...व्यक्तिनिष्ठ... कल्पनाशक्तीच्या साह्याने ... भावनांना आवाहन करताना दिसते तर (बिगरललित लेखन यावेगळे असते)"

हे काळ्यापांढर्‍या टोकांचे सुयोग्य वर्णन करते असे वाटते. परंतु कुठल्याही विवक्षित पाठ्यात कमीअधिक प्रमाणात काळे-पांढरे मिसळलेले असू शकते.

सहमत

ललित लेखन हे भावनांना आवाहान ( आवाहन) करतांना दिसते तर शास्त्रीय साहित्य किंवा माहितीपूर्ण लेखन वाचकांच्या विचारांना आवाहन करते. ललित लेखनात भावनांच्या विविध छटा टीपलेल्या (टिपलेल्या) असतात तर इतर लेखनात ज्ञानात्मक अशा विचारांची मांडणी केलेली असते. ललित लेखन हे व्यक्तीनिष्ठ (व्यक्तिनिष्ठ) असते. व्यक्तिगत अनुभव आणि कल्पनाशक्तीच्या साह्याने ललित लेखन केले जाते. माहितीपूर्ण लेखनात तर्कनिष्ठ आणि सुसंगत मांडणी करुन ज्ञानाचे आदानप्रदान होत असते. अजून बरेच काही सांगता येईल तुर्तास (तूर्तास) थांबतो.
आक्षेपार्ह किंवा सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन करणाने (करणारे) लेखन नाही याबद्दल दुमत असणार नाही. पण, मराठी संस्थळाची स्वतःची अशी काही ध्येयधोरणे असतात. उपक्रम संस्थळाचे लेखनविषयक मार्गदर्शन पाहता आपले लेखन अप्रकाशित होऊ शकते असे वाटते.

तंतोतंत सहमत आहे.

सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

धन्यवाद

शब्दांना प्रतिशब्द सुचवल्याबद्दल!
आवाहान = आवाहन
टीपलेल्या = टिपलेल्या
व्यक्तीनिष्ठ = व्यक्तिनिष्ठ
तुर्तास = तूर्तास
करणाने = करणारे
हे कळुन चुकले.

आभार

शुद्ध शब्द अधोरेखित करण्यासाठी लॉगीन करण्याची तसदी घेतल्याबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

तसदीबद्दल क्षमस्व

प्रस्तुत प्रतिसादात मला तरी अधोरेखित काहीच दिसून आले नाही.
तुम्हाला दिसले असेल तर प्लीज माझे डोळे उघडा.

-लुडबुड लुडबुड आणि लुडबुड फक्त

थोडं सेटल, स्थिर व्हा की!

बिरुटे सरांना बी फॉर (इंग्रजी: बोल्ड लेटर) 'बटबटीत' म्हणायचे होते त्याऐवजी ते अधोरेखित म्हणाले.

लुडबुड, जस्ट चील बेबी.

ललित आणि माहिती प्रधान

ललित आणि माहिती प्रधान हे दोघे भावा-बहिणी सारखे आहेत.

१ --?

यातील भाउ कोणता
व बहीण कोणती??
स्पष्ट करा.

आणि तसे आपल्याला का वाटते?
तर्कशुद्ध विचार अपेक्षित आहे,
भावना नको,
तर्क+ शुद्ध+विचार म्हणजे तरी काय?
शुद्धतेच्या कोणकोणत्या कसोट्या अस्तीत्त्वात आहेत?
विचारांचे किती प्रकार असु शकतात? हे सुद्धा संगितलेत तर उत्तम!

प्रधान कुटुम्बीय्

मला वाटतं, ललित हा भाऊ तर् माहिती ही त्याची बहीण्. आणि दोघांचेही आडनाव प्रधान् असावे.
जर इतरांना वेगावेगळी आहेत असं माहित असेल तर् कृपया कळवा.
आइ बाबा पण् शोधुया चला!

 
^ वर