कॆफिन

कॅफिन
कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स चा खप प्रचंड का होतो, हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कोक अथवा पेप्सि या कंपन्यांच्या नफ्याचे आकडे पहिले तर वर्षानुवर्षे या कंपन्या जगातून किती पैसा गोळा करत आले आहेत याची जणिव होते. या कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स चा खप सदैव चढत्या आलेखात कसा ठेवू शकतात? असे काय त्या ड्रिंक्स मध्ये आहे तर पाणी, साखर, कार्बनडाय ऒक्साईड आणी कॅफिन. इथे गोम आहे. या ड्रिंक्समध्ये कॅफिन आहे. बहुतेक सगळ्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये असणाऱ्या कॅफिन चा गुणधर्म हा त्या पदार्थाची चटक वा व्यसन लावण्यासाठी होतो. हा निष्कर्ष मेलबर्न येथील डिकिन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. आर. जे. किस्ट व इतर, या शास्त्रज्ञांचा लेख 'ऍपेटाइट' या जरनल (२००५) मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या प्रयोगा नुसार, असे सिद्ध झाले की, कॅफिन मुळे कोक च्या चवी वर कोणताही परिणाम होत नाही. या प्रयोगात लोकांना कोक आणी कॆफिन नसलेले कोक सारखे पाणी दिले गेले परंतू कोणालाही, चवी मधला ऒळखता आला नाही!

का हे कॅफिन?
मग तरी पण कोक अथवा पेप्सी सारख्या पेयां मध्ये कॅफिन का घातले जाते? याचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात हे सत्य बाहेर आले की, कॅफिन नर्व्हस सिस्टिम वर परिणाम घडवून, मेंदूला परत परत तोच पदार्थ मिळवण्यासाठी उद्युक्त करते. कोक म्हणजेच कॅफिनयुक्त साखर असलेले द्रव्य मिळाल्याने आलेले तरतरी मेंदू लक्षात ठेवतो. आणि त्याच संबंध कोला पेयाशी जोडतो. थोडक्यात व्यसनाची सुरवात घडवून आणली जाते.
लहान मुलांवर तर कॅफिन जबरदस्त परिणाम घडवते. नकळतपणे मुले जास्त जास्त कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स मागू लागतात, आणी या व्यसनाच्या अधीन होतात. हे सगळे तुमच्या नकळत पणे घडवले जाते. या संदर्भात एक जुने दंत-मंजनाचे उदाहरण आठवते. आपलेच दंत मंजन चालावे म्हणून पूर्वी त्यात तंबाखू घातली जात असे. रोजच तंबाखू चे सेवन केल्यामूळे त्याचे व्यसन लागत असे. त्यामुळे रोज सकाळी तास तासभर तोंडात बोट घालून बसलेले अनेक जण दिसत. तसे आता कॅफिन मुळे सवय लागलेले कोक ची बाटली घेतलेले दिसतात!

नक्की परिणाम?
कोक पिण्याची सुरवात झाली की सर्वसाधारण पणे दूध पिणे कमी होते. काही वेळा याचा संबंध 'मी आता मोठा झालो' असाही जोडला जातो. हे आपण थम्प्स-अप विरुद्धं पेप्सी या जाहिरातीतून पाहिले आहेच. दूध कमी करून कॅफिनेटेड कोला घेतला तर काय परिणाम होतो या संदर्भात मेटे क्रिस्तेन्सेन व इतर यांनी एक प्रयोग केला. फक्त दहा दिवस चाललेल्या या प्रयोगात असे सिद्ध झाले की, दुधा ऐवजी कॅफिनेटेड कोला प्यायले असता, हाडांची झीज मोठ्या प्रमाणात होते. अर्थातच सदैव कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक प्यायल्याने ही झीज अनेकदा भरून काढण्याच्या पलीकडे जाते. हाडे ठिसूळ होऊन अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या विकाराला ऒस्टेओपोरोसिस (?) असे नाव आहे.
सदैवच कॅफिन आणि साखर पित राहील्याने पित्ताचे प्रमाण शरिरात वाढते रहाते. त्यामूळे यकॄताला जास्त काम करावे लागते. किडन्यांवर त्याचा ताण येतो. अश्या रीतीने विकरांची मालिकाच सुरु होते. (कुणी काही संदर्भ देवू शकेल काय?)

कोण असे म्हणते?
या शिवाय वूल्फगाँग व इतर यांनी केलेल्या प्रयोगात मानसिक ताण-तणाव कमी जास्त होण्याच संबंध कॅफिनेटेड कोला पेयांशी आहे हे सिद्ध करून दाखवले आहे.
कोक आणि पेप्सी सॉफ्ट ड्रिंक चे युद्ध अमेरिकेत, ऐंशीच्या दशकात जोरात होते, त्यावेळी, कोक ने आपले धोरण बदलले. नवीन धोरणानुसार सॉफ्ट ड्रिंक ने सर्व नैसर्गिक पदार्थांची जागा व्यापली पाहिजे असे निश्चित केले. हे घडवून आणण्यासाठी, अमेरिकेच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यात कोक चे फ्रीजेस बसवले गेले. कॉफी, चहा आणी दूध या सर्वांची जागा कोक ने मिळवण्याचा प्रयत्न केला. यामुळे अर्थातच कंपनी चा सॉफ्ट ड्रिंक खप प्रचंड वाढला. परंतु याचे भयाण परिणाम अमेरिकन जनतेवर झाले. एका बाटली मध्ये सधारण दहा चमचे साखर असते. (संदर्भ?) सदैव साखर पाणी पित राहील्याने जाडपणा वाढला. (संदर्भ?)

तेथे आता डायबेटीस आणी ओबेसिटी अर्थात जाडपणाचा सरळ संबंध कोक शी जोडला जातो आहे.(संदर्भ?) हा संबंध उघड झाल्यावर, आपला खप खाली येऊ नये म्हणून, शुगर फ्री ड्रिंक्सचा उपाय या काढला गेला. पण नैसर्गिक साखर न वापरता आणलेला गोडवा आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम याविषयी संशोधन अजून व्हायचे आहे. एकेकाळी अमेरिकेत कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स पिणे 'कूल' होते, ते आता 'डंब' आहे. आता फ्रेश फ़्रुट ज्युसेस पिणे 'कूल' मानले जात आहे! (संदर्भ?)

कोण घेणार मग?
प्रगत राष्ट्रांमध्ये आरोग्यविषयक सामाजिक जाणिव वाढली आणि या कॅफिनेटेड कोला सॉफ्ट ड्रिंक्स कंपन्यांचा खप खाली आला आहे. त्यामुळे त्यांना भारता सारख्यादेशां मध्ये हे कोला सॉफ्ट ड्रिंक्स खपविण्याशिवाय पर्याय रहिलेला नाही. कारण नफा मिळवणे हा एकमेव उद्देश या कंपन्यांचा आहे. त्यांना तुमच्या आरोग्याची काळजी असण्याचे कारणच नाही. जेंव्हा तुम्ही कोला सॉफ्ट ड्रिंक विकत घेता तेंव्हा या प्रचंड नफ्याचा पैसा कंपन्यांकडे जातोच आणि डॉक्टर ची बिले तुम्ही भरता. म्हणजेच तुम्ही, कंपन्यांना पैसा पुरवता, डॉक्टर, डेंटिस्ट, हॉस्पिटल ची बिले भरता, आणी असेलच तर मेडिकल इन्शुरंस चा वाढलेला हप्ता पण भरता! आणी हे सगळे वारंवार घडत रहावे म्हणून तुमच्या मेंदूवर कॅफिन काम करत रहाते.

वैधानीक इशारा?
कॅफिन वर प्रयोग करणारे डॊ. हेरल्ड आणि आर. जे. किस्ट, या प्रयोगाच्या शास्त्रज्ञांनी तर असे म्हटले आहे की, हे पेय कोणत्याही अठरा वर्षा खालील व्यक्तीस विकू नये. शिवाय 'व्यसन लागू शकते' असा वैधनिक इशारा कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक वर छापला पहिजे!
या या शास्त्रज्ञांचे प्रयोग प्रसिद्ध झाल्या पासून कोणतेही कॅफिनेटेड सॉफ्ट ड्रिंक शाळेत विकण्यावर बंदी घालण्यासाठी अनेक सरकारांवर वर दबाव येतो आहे. भारतातही या सर्व गोष्टींची जाणिव सर्व सामान्य माणसा पर्यंत गेलीच पहिजे. आणी आपण सर्वांनी कॅफिन ला नको म्हंटले पाहीजे.

-निनाद
२७-०९-२००७

याला संदर्भ म्हणता येणार नाही पण या लेखा साठी
http://lib.bioinfo.pl
http://www.21food.com
http://www.newstarget.com/003228.html
http://www.theage.com.au/news/national/coke-in-the-firing-line-as-caffei...
या वेब साईट्स चा उपयोग केला आहे.

Comments

सुंदर माहिती

माहिती सुंदर आहे. यातले काही मुद्दे माहिती होते, पण बरीच माहिती नवी आहे.
अवांतरः शीतपेयांमध्ये रासायनिक कीटकनाशके (?) आढळल्यापासून आणि कॅडबरीमध्ये अळ्या सापडल्यापासून 'आधी कॅडबरी खा, आणि मग कोक/पेप्सी नक्की प्या, म्हणजे कॅडबरीमधून पोटात गेलेले किडे मरतील' हा 'अति झाले नि हसू आले' छाप विनोद सांगितला जाऊ लागला.
पुण्यात हल्ली काही सार्वजनिक ठिकाणी कोक/पेप्सी पेक्षा जास्त गर्दी शहाळेवाला/ज्यूस विकणारा यांच्याकडे पाहिली आहे. हळूहळू का होईना, फसफसत्या वायुपेयांचे वेड कमी होत आहे. अर्थात रस्त्यावरचे ज्यूस पिऊन मिक्सर न धुतल्यामुळे किती बॅक्टेरिया पोटात जातात ही चिंता वाटते. सुदैवाने नारळात अजून भेसळ झाल्याचे ऐकिवात नाही, त्यामुळे 'जय शहाळे!'
ज्यांना शहाळी आसपास सहज मिळू शकतात त्यांनी स्वतःला आणि कुटुंबाला वायुपेयाची तलफ आल्यावर शहाळे पिण्याची सवय लावावी. किंमत सारखीच आहे दोघांची.

शहाळे व ज्यूस

"अति झाले नि हसू आले" हा प्रकार कोणत्याही बाबतीत अयोग्य. शहाळ्याच्या अतिरेकामुळे मूत्रपिंडावर-(किडनीवर) वाईट परिणाम होऊ शकतो असे एक डॉक्टर मित्र सांगतात. शिवाय भारतात मिळणार्‍या कोणत्याही ज्यूसमध्ये इतकी भरमसाट साखर घालतात की ज्यूस सेंटरचा मालक ऊसाच्या कारखान्याचा शेअरहोल्डर आहे की काय याची शंका यावी. त्यापेक्षा (सालीला* लागलेली कीटकनाशके स्वच्छ धुवून) फळे खाणे उत्तम. त्यामुळे फायबरचाही आवश्यक तो पुरवठा शरीराला होतो.

*येथे साल हा मराठी शब्द. साली हा हिंदी शब्द नव्हे.


आम्हाला येथे भेट द्या.

अतिरेक

शहाळ्याच्या अतिरेकामुळे मूत्रपिंडावर-(किडनीवर) वाईट परिणाम होऊ शकतो असे एक डॉक्टर मित्र सांगतात.

खरच कि काय? कोण ते ? बालाजी तांबे तर नाही ना?
प्रकाश घाटपांडे

छान

लेख माहितीपूर्ण आहे. अनु यांनी म्हटल्याप्रमाणे भारतातील शीतपेयांमध्ये कॅफीनसोबत इतर गोष्टींचाही प्रादुर्भाव असतो. पण यामुळे कदाचित शीतपेये न पिण्याकडे कल वाढेल अशी आशा वाटते.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

वय व कोला

वय म्हणे ३० च्या वर (३० च्या आत हाडाची झीज जरा लवकर भरून येते) गेले की हाडाची वाढ / झीज भरून येणे थांबते की मंदावते. म्हणून कॅफिनेटेड कोला पिणे थांबवले पाहीजे.

कोक - चिकन खाल्ले आहे का? नॉट बॅड

सध्या आठवड्यातील एक तरी जेवण हेल्दी शेक म्हणजे गाजर, सेलेरी, सफरचंद, आल, संत्र,मोसंब इ. घटक वेगवेगळ्या प्रमाणात घालून असे आयुर्वेदिक पध्दतीने करायचे असे आमचे नवे वेध आहेत. (त्याकरता आम्ही खास् मेड इन जपान ज्यूसर, ग्राईंडर घेतला बर का) तो कागद जरा गायब झाला आहे मिळाला कि दाखवेन कोणाला इच्छा असल्यास्.

कालच ऍवोकाडो शेक घेतला. हे फळ पण लय भारी असे म्हणतात. नूस्ता पल्प असतो बटरी पण बोअर वाटू शकतो म्हणून थोडेसे नॉन फॅट दूध घातले (बहूतेक चूक केली आयुर्वेद म्हणते फळे व दूध एकत्र करू नका पण महाराष्ट्रात ते तसे पाळले जात नाही, शिक्रण आठवते का? )

शेवटी खाण्याच्या बाबतीत मी एकच तत्व पाळायचा प्रयत्न करतो, सर्व रंग, सर्व चवी, सर्व प्रकार चे वेगवेगळे अन्न जरा आलटून पालटून कमी प्रमाणात बनवून खातो. हो ते भूके पेक्षा चार घास् कमी हे तत्व, जाऊ दे वाया जाईल किंवा अजून दे छान झालय म्हणून् जास्त खाणे होते त्यामूळे स्वयपाकच कमी करायचा त्यामूळे ....

कॅफेनवरून, हेल्दी खाण्यावर गाडी आणली, त्याबद्दल दया क्षमा शांती!

कॅफिन

कॅफिन आणि कॉफी यांचा काही संबंध आहे का?

(भाबडी शंका असलेला चहा व कॉफी प्रेमी) आजानुकर्ण


आम्हाला येथे भेट द्या.

हो / व्हिक्स ऍक्शन ५००

कॅफिन आणि कॉफी यांचा काही संबंध आहे का?

चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये कॅफिन असते. याचे प्रमाण चहा-कॉफीच्या प्रकारावर अवलंबून असते. त्या मानाने चहात प्रमाण थोडे कमी असते. अधिक माहिती इथे.

यावरून आठवले. भारतात सर्दी-पडश्यावर हमखास मिळणार्‍या व्हिक्स ऍक्शन ५०० मध्ये भरमसाठ कॅफीन असते, तेव्हा हे औषध टाळलेले बरे.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कॅफिन

कॅफिन आणि कॉफी यांचा काही संबंध आहे का?

कॉफी या शब्दावरूनच कॅफिन हा शब्द "प्रसवला". चहात बहुधा टॅनिन असते. तसे अनेक भाज्या आणि फळांत कॅफिन असते. योग्य प्रमाणातील कॅफिन शरीराला हानीकारक नसावे. (चू.भू.दे.घे.)

नर्व्हस सिस्टिम वर परिणाम घडवून, मेंदूला परत परत तोच पदार्थ मिळवण्यासाठी उद्युक्त करते.

ही माहिती नवी होती. धन्यवाद!

तसे, कॅफिन हे मेंदूला तरतरी आणते. कोक-पेप्सी प्यायलावर याची अनुभूती येतेच पण चहा कॉफी पिऊनही येते. कॅफिन थकवा आणि झोप तात्पुरती कमी करते म्हणूनच लोक "लाल बैल" प्रीफर करतात. वजन कमी करण्यासाठी जी अनेक औषधे मिळतात त्यातही कॅफिनचे मुबलक प्रमाण याच कारणास्तव आढळते.

एका बाटली मध्ये सधारण दहा चमचे साखर असते. (संदर्भ?)

डाएट पेप्सी किंवा कोकमध्ये साखरेचे प्रमाण ० - शून्य असते. कॅफेन विरहीत कोक व पेप्सी देखील मिळतात. २४० मिली. कोक मध्ये २७ ग्रॅ. साखर असते. (पडताळून पाहिले.)

कॅफिन वर प्रयोग करणारे डॊ. हेरल्ड आणि आर. जे. किस्ट, या प्रयोगाच्या शास्त्रज्ञांनी तर असे म्हटले आहे की, हे पेय कोणत्याही अठरा वर्षा खालील व्यक्तीस विकू नये

लाल बैल तर अजिबात विकू नये. पोरं (१८ची होती की वरची माहित नाही) काय हैदोस घालतात तो पाहिला आहे. :))

असो. लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच. असे संतुलित आहारावरील लेखही यायला हवेत.

 
^ वर