खरं काय? जीन बौद्रियार्ड एक ओळख

जीन बौद्रियार्ड या आजच्या युगाला समजणार्‍या तत्त्वज्ञावर मराठीत माहिती मिळाली नाही म्हणू हे लिहिण्याच प्रयत्न केला आहे. ही ओळख अतिशय त्रोटक आहे!
Jean Baudrillard (दोन एल आल्यावर त्याचा फ्रेंच उच्चार य असा होतो!)

आपला
गुंडोपंत
------------------------------
खरं काय?
आपण जे काही पाहतो तेच खरं? जे जाणवतं तेच खरं?
जीन बौद्रियार्ड या फ्रेंच तत्त्वज्ञाने या संदर्भात काही विचार मांडले आहेत.
या तत्त्वज्ञाचा जन्म १९२९ साली झाला. १९६० साला पासून त्यांनी विद्यापीठांत शिकवले.
युरोपीय तत्त्वज्ञान क्षेत्रात पोस्ट मॉडर्ननिझम नंतर एक महत्त्वाचे विचार प्रवर्तक म्हणून जीन बौद्रियार्ड यांचा परिचय आहे.
१९६६साली त्यांनी असा विचार मांडला की, माणूस हा वस्तूंभोवती असलेले काल्पनिक आयुष्य जगतो. म्हणजे काही खास गोष्टी एखाद्या कडे असल्या तर (आपल्या) मनात त्या माणसा विषयी ची प्रतिमा बदलते. म्हणजे उद्या गुंडोपंता कडे बि एम डब्यु ११८ मोटार दिसली तर गुंडोपंत हा श्रीमंत आहे अशी प्रतिमा तयार होवू शकते. (तसेच गुंडोपंताच्या बायको कडे असणारे दागिनेही प्रतिमा बदलण्यास हातभार लावू शकतात.) उद्या हाच गुंड्या कुणाला तरी हँडल ला कापडी पिशवी लावून सायकल वर भाजी घ्यायला जाताना दिसला तर प्रतिमा बदलते. म्हणजे माणसाकडे कोणत्या वस्तू आहेत यावर त्याची प्रतिमा ठरते. जीन यांच्या म्हणण्या प्रमाणे, माणूस नुसते वास्तूंभोवती आपले आयुष्य गुंफत नाही तर त्या नादात तो स्वतःच एक वस्तू होवून बसतो. 'जाहिरात, वेष्टन, फॅशन आणी माध्यमे यांनी लैंगिकतेला स्वातंत्र्य दिले' असा विचारही त्यांनी मांडला.

या पुढे जाऊन जीन बौद्रियार्ड च्या म्हणण्यानुसार, 'आपण जे काही पाहतो तेच खरे असले पाहिजे असे काही नसते. किंवा आपण (आपल्या व इतरांच्या) काल्पनिक आयुष्यातच जगत असतो.' आपले म्हणणे विशद करण्यासाठी त्यांनी त्यांनी 'सिम्युलक्रा सिम्युलेशन' हा लेख लिहिला. या मध्ये आपल्याला असलेले 'जगाचे भान हे आपल्या कल्पनेनुसार असते' हा विचार मांडला. कल्पना बदलल्या तर भानही बदलते. हेच आपल्या जीवनशैलीलाही लागू होते. (आठवा 'मॅट्रिक्स' हा इंग्रजी सिनेमा- पण जीन यांनी 'हे' खूप आधी लिहून काढले होते) 'सिम्युलक्रा सिम्युलेशन' नुसार, नवीन तंत्राने मानवाला अनेक प्रकारे एकाच वेळी अनेक कल्पनांमध्ये जगण्याची शक्यता उपलब्ध करून दिली आहे. उदा. उपक्रमावर 'गुंडोपंत' म्हणून वावरता येणे. त्याच वेळी गूगल वर वैद्यबुवा म्हणूनही राहता येणे. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात अजूनच काही असणे.

जीन यांनी अमेरिकेवर जगातली आता शिल्लक असलेली एकमेव अत्यंत 'आदिम' जमात अशी झोंबरी टीका केली होती. शिवाय १९९१ च्या आखाती युद्धाला 'लोकांच्या कल्पनेत लढवलेले युद्ध' अशी संभावना केली होती.

अशा या थोर विचारवंताचा मृत्यू मार्च २००७ मध्ये झाला.
-------------------------

आपला
गुंडोपंत

Comments

या साठी

या लेखा साठी गूगल वरील अनेक लेखांचा वापर केला आहे. मात्र एका कोणत्याही लेखाचा वापर केलेला नाही. जीन यांच्या निबंधांचा वापर कल्पना समजून घेण्यासाठी करणे अपरिहार्य आहे/होते. तारखा, बि.बि.सी. च्या संस्थळावरून घेतल्या आहेत.
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

यात काय विशेष?

सदर लेखातून खालील विचार समजले.

म्हणजे माणसाकडे कोणत्या वस्तू आहेत यावर त्याची प्रतिमा ठरते.

'जाहिरात, वेष्टन, फॅशन आणी माध्यमे यांनी लैंगिकतेला स्वातंत्र्य दिले' असा विचारही त्यांनी मांडला.

'आपण जे काही पाहतो तेच खरे असले पाहिजे असे काही नसते. किंवा आपण (आपल्या व इतरांच्या) काल्पनिक आयुष्यातच जगत असतो.'

या सगळ्या गोष्टी तर आम्हालाही माहीत होत्या. यात काही फारसे मोठे विचार जीन यांनी मांडले आहेत असे आम्हाला वाटत नाही.

आपला,
(तत्वज्ञानी) तात्या.

अरे!

अरे!
खरंच की...
कुठे काय विषेश आहे त्यात असंही?

संत तात्याबांवरच एक लेख लिहिला पाहिजे होता...
असो इतरांनी ते काम केलेलेच आहे तेंव्हा... ;)

आपला
गुंड्या
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

तेच तर म्हणतोय आम्ही!

अरे!
खरंच की...
कुठे काय विषेश आहे त्यात असंही?

तेच तर म्हणतोय आम्ही! जरा काय तरी भारीतलं लिहा की राव! म्हणजे मग आमच्याही ज्ञानात थोडीशी भर पडेल!

:)

आपला,
(बरीचशी तत्वज्ञानं पचवलेला!) तात्या.

हे वाचा!

गुंड्याभाऊ,

आत्ताच आमचा मित्र नंदनचे दिगम्भाशेठच्या लेखाला दिलेल्या प्रतिसादातील,

[अवांतर -ईश्वरता वरून ऐश्वर्य हा शब्द आला आहे का?]

हे वाक्य वाचनात आले ते आम्ही येथे मुद्दामून उद्घृत करत आहोत! आता हे वाक्य नंदनशेठ गंमतीमध्ये लिहून गेले आहेत की त्यांनी ते हेतूपुरस्सर लिहिले आहे हे आम्हाला माहीत नाही. परंतु आम्ही ज्याला 'विचार' म्हणतो असे हे वाक्य आहे! त्यावरून आम्हाला कुठल्या लेव्हलचे विचार आणि तत्वज्ञानं अपेक्षित आहेत याची आपल्याला कल्पना यावी एवढ्यासाठीच हा प्रतिसाद!

असो, बाकी चालू द्या!

आपला,
(वैचारिक) तात्या.

ह्म्म

जीनांची तत्वे अजून थोडी तपशीलात सांगा.
या संकल्पनेवर आता बर्‍याच कादंबर्‍या किंवा चित्रपट निघाल्याने बहुधा लोकांना आता त्यांच्या तत्वात नाविन्य वाटत नसावे.

जीना

'जीनांची' तत्वे वाचल्यावर उडालो...
आता खाली आलो! :)

पाटलांची

पाटलांची, धारपांची, भांडारकरांची,वेलणकरांची याप्रमाणे अ ने अंत होणार्‍या आडनावाला प्रत्यय लावून 'जीनांची' झाले.

जीना?

'जीनांची'

ब्यारिस्टर जीना वाटले कि काय? एकच प्याला मधिल सिंधु सुधाकर यांना म्हणजे सुधाकरांना म्हणते. विभक्ति चतुर्थी स,ला,ते, स,ला,ना,ते आदरार्थी म्हणताना जीनला कसे म्हणायचे? पुलं च्या साहित्यात कुठे तरी या लेखिका या सुप्रसिद्ध् साहित्यिक अमुक अमुक यांच्या 'मुलग्या' आहेत्. असे विद्यार्थीनिने परिचय करुन देताना वाचल्याचे आठवते. एवढ्या मोठ्या लेखिकेला मुलगी असा एकेरि उल्लेख कसा करायचा? हॅ ह हॅ हॅ
प्रकाश घाटपांडे

उच्चार

यांच्या नावाचा उच्चार मराठीत लिहायचा झाल्यास

जाँ बोद्रियार्


असा काहीतरी लिहावा लागेल. (ज आणि र् यांचे फ्रेंच उच्चार मात्र मराठीतल्यापेक्षा कितीतरी वेगळे आहेत.)
डबल-एल् चा य् हा उच्चार गुंडोपंतांनी अचूक पकडला, पणं नुसत्या डबल्-एल् पेक्षाही विशेषेकरून आय्-डबल्-एल् या अक्षरसमूहात असा उच्चार होतो.

अनुताई, "जीन" हे त्यांचे आडनाव नव्हे, स्वतःचे नाव.
आडनावावरून लिहायचे झाल्यास "जीनांच्या" ऐवजी "बोद्रियारांच्या" असे लिहिणे अधिक योग्य.

या तत्वज्ञाचे विचार येथे उद्धृत केल्याबद्दल गुंडोपंतांचे आभार. त्यांनी याचप्रमाणे इतर विचारवंतांचे विचारही सांगत रहावे ही आमची विनंती आहे.

- दिगम्भा

कोणीतरी तरी आहे!

दिगम्भाराव!
हुश्श! कोणी तरी तरी आहे इथे!
मला वाटलं होतं की 'इथे हा लेख टाकणं' चुकलंच की काय! (अजूनही पुर्णपणे बरोबर वाटत नाहीये...!
तरी राजेंद्रांच्या लेखामुलेच हे धाडस केलं होतं. सार्त्र हे जाँ चे गुरु!
(हा त्यांचा काहीसा एकलव्य! :) )
या लेखात तोटक पणामूळे मला वाटतंय की माझा सांगण्याचा काँटेक्स्ट चुकतोय. माणूस फक्त 'कल्पनेतच जगतो' हे विचार १९६० ते ७० दशकात मांडणे हे धाडसी आणी फ्युचरिस्टीक होते.
मॅट्रिक्स, पाहून आल्यावर जाँ ६० साली हे म्हणत होते हा विचार केल्यावर त्यातली गोम मला कळली होती!
या शिवायही जाँ नी आयुष्याच्या इतर कल्पनांचाही चांगला विचार केला आहे.
असो.
आपला
(कल्पनेच्या राज्यातला गरीब बापडा)
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

कार्यबाहुल्य!

कार्यबाहुल्य लवकरच संपेल अशी आशा आहे... (की कार्यबाहुल्य आहे या क्ल्पनेत आहात? ;) )
आपला
गुंड्या
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

असेच

या तत्वज्ञाचे विचार येथे उद्धृत केल्याबद्दल गुंडोपंतांचे आभार. त्यांनी याचप्रमाणे इतर विचारवंतांचे विचारही सांगत रहावे ही आमची विनंती आहे.

असेच वाटते. हा लेख थोडा त्रोटक झाला आहे. सर्व वाचकांपर्यंत हे विचार पोहोचवण्यासाठी थोड्या विस्ताराने इथे किंवा स्वतंत्र लेखात लिहावे अशी विनंती आहे.

आपला
(सूचक) वासुदेव

~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: । ~

असेच...

... मलाही वाटले.

ओळख करून दिल्याबद्दल आभार.

नक्की लिहितो!

वासुदेव आणे एकलव्यराव,
सध्या आम्हालाही कार्यबाहुल्याच्या कल्पनेने झपाटले आहे. इतर मीतींमध्ये जाऊन आपल्याला इतरही उद्योग आहेत या कल्पनेचा चटका बसल्याने, आम्ही लेख त्रोटक का होईना लिहुन काढला इतकेच!
(एकदा लिखाणाची उबळ आली की ते बाहेर पडल्याशिवाय काहे धड वाटत नाही!)
वेळ मिळाला की टाकतोच.
आपला
कल्पनाविलासी
गूंड्या!

असेच

दिगम्भा आणि सूचकरावांच्या सूचनेप्रमाणे करावे (म्हणजे विस्ताराने लिहावे) असेच मलाही वाटते. विस्तृत लेखाच्या प्रतीक्षेत आहे.

सुरेख

गुंडोपंत,
रोचक आणि माहितीपूर्ण लेख. यावर अजून वाचायला आवडेल. भोवतालचे जग खरे की कल्पना हा तत्वज्ञांचा लाडका प्रश्न आहे. यावर सार्त्र* यांनीही विचार मांडले आहेत. बोद्रियार यांचा आपल्याला अनेक कल्पनांच्या जगात राहता येते हा मुद्दा महत्वाचा आहे. बर्‍याच प्रकारच्या मानसशास्त्रांमध्ये कुठल्याही गोष्टीबद्दल आपले विचार काय आहेत याला बरेच महत्व आहे. उदा. स्किझोफ्रेनिया या विकारामध्ये रुग्ण आपल्या कल्पनेच्या विश्वातच वावरत असतो. असो.
लेखाबद्दल धन्यवाद. यावर अजून लिहीत रहावे.

*हल्ली अशी नावे उच्चारल्यावर आम्हाला दचकायला होते.
----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

कल्पना

ह्यावर मानसशास्त्राच्या आपल्यासारख्या अभ्यासकांनी मते नोंदवावीत.

युयुत्सुराव
आपण आमच्यावर टाकलेल्या ह्या प्रचंड जबाबदारीने आमचे धाबे दणाणले आहे. दोन्ही बाजूला क्यान्सलिंग करून सामाइक समीकरणे सोडवायला नुकत्याच शिकलेल्या शाळकरी पोराला सेकंड ऑर्डर नॉनलिनिअर डिफरन्शिअल इक्वेशन सोडवायला सांगावे तसा हा प्रकार आहे. तसेही हल्ली आमच्या वाचन, संगीत, खाणेपिणे यातील आवडींमुळे आम्ही विद्वान लोकांच्या नजरेतून घसरलो आहोत की काय या विचाराने आमची रात्रीची झोप उडाली आहे. असो.

अवांतर : आपल्या प्रतिसादाच्या फॉरम्याटवरून ती कविता आहे असा आमचा समज झाला.

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre

:)

सेही हल्ली आमच्या वाचन, संगीत, खाणेपिणे यातील आवडींमुळे आम्ही

पिणे पण का? :)

आपला,
(निर्व्यसनी!) तात्या.

पिणे

असे म्हणण्याची पद्धत आहे, असे ऐकून आहे..

----
L'enfer, c'est les autres -- Jean-Paul Sartre
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

खाणेपिणे

खाणेपिणे

हा द्वंद्व समास कि तत्पुरुष समास? दवा-दारु हा आमच्या मते तत्पुरुष समासात काम करतो. हॅहॅ हॅ

प्रकाश घाटपांडे

अफू!

(चाराण्याची अफू, सॉरी पाच डॉलरची दारू प्यायल्यावर वाट्टेल तितके तत्वज्ञान सुचते ;-)
हा हा हा! सही!!!
हे अनेक तत्वज्ञांविषयी खरे आहे असे आम्ही ऐकुन आहोत. अभ्यासकांनी खुलास करावा!
मात्र सुचलेले तत्वज्ञान हे आधी कुणी मांडलेले नाही हे शोधुन सिद्ध करणे. शिवाय सुचलेले तत्वज्ञानाचे विचार हे तत्वज्ञानाच्या साच्यात व्यवस्थीतपणे मांडणे, हे फार मोठे काम आहे हे मात्र खात्रीने म्हणेन.
आपला
(इतरांच्या उधार विचारांवर जगणारा)
गुंडो.

नक्की?

जगात जन्माला आलेले बाळ, हे जन्मतः स्किझोफ्रेनिक नसते.

असे म्हणणे धाडसी ठरेल!
या बाबतीत आपण ठाम अहात का?
माझ्या (अर्धवट) माहितीनुसार हा विषय/वाद अजून पुर्णत्वास गेलेला नाही.
(चुकीचे असल्यास सुधारावे)
बाकी आंधळे नि हत्ती वोक्के! मलाही हेच उदा. सुचले होते पण
त्यात 'एकाच वेळी अनेक कल्पनांमध्ये जगणे' हा भाग येत नाही.
म्हणून टाळले होते... पण हरकत नाही.. ;)

आपला
(चिवडाखाऊ)
गुंड्या.
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

छान/अमेरिका

लेख चांगला झालाय. या विषयावर अधिक वाचायला आवडेल.
अवांतर -
जीन यांनी अमेरिकेवर जगातली आता शिल्लक असलेली एकमेव अत्यंत 'आदिम' जमात अशी झोंबरी टीका केली होती.
यावरुन ऑस्कर वाईल्डचे 'अमेरिका इज द ओन्ली कंट्री व्हिच वेन्ट फ्रॉम बार्बरिझम टू डिकॅडन्स विदाऊट सिव्हिलायझेशन इन बिटवीन' हे वाक्य आठवलेअ :)

कळले नाही बुवा?

कारण ह्यांनी सिव्हिलायझेशनची व्याख्या आपल्या भारतातल्या वास्तव्यातून सुंदर व्यक्त केलेली आहे.

हे काही कळले नाही, थोडे समजवा बॉ!

(चिवड्याचा फकाणा मारणारा)
गुंड्या.
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)

पण

आवांतरः
पण जाँ मात्र फ्रेंच होता!
प्रत्येकच संस्कृती स्वतःला लै भारी समजते हो!
इथे अमेरिकनांनी आपले वेगळेपण तरी तयार केले आहे ते येडे ऑस्ट्रेलियन्स मात्र अजूनही राणीच्याच राज्यात गव्हर्नर सकट राहतायत!

तसं ब्रिटिशांनी इजिप्तचे प्राचीनत्व फार वाईट रीतीने लुटले आहे! फ्रेंचांनी पण काहे कमी लुटालुट केली असं नाही, पण स्पॅनिशांनी जे काही शिरकाण द. अमेरिकेत केले ते अभुतपूर्व असेच म्हणायला हरकत नाही.

या सगळयांनाच सुसंस्कृत कसं म्हणायचखा प्रश्नच आहे.

आपला
गुंडोपंत
(सी. इ. ओ. - उल्लासनगर वडापाव आणि बारचिवडा केंद्र)
आणी हो नेहमी प्रमाणेच! माफक गप्पा टप्पा आणि विषयाला धरुन (!) थोडेसे विषयांतर या कोलबेरच्या समर्थनाचे मी समर्थन करतो!

मस्त !

गुंड्याभाऊ
मस्त लिहीले आहे.माहिती आवडली.

माणसाकडे कोणत्या वस्तू आहेत यावर त्याची प्रतिमा(आणि प्रतिभाही ठरते का ? )ठरते ! आपल्याला हा विषय आवडला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वा!छान..

'आपण जे काही पाहतो तेच खरे असले पाहिजे असे काही नसते. किंवा आपण (आपल्या व इतरांच्या) काल्पनिक आयुष्यातच जगत असतो.'

अगदी बरोबर! संकल्पना आवडली.. जाँ बॉद्रियार्ड साहेबांचे लेखन वाचायची उत्सुकता लागली आहे. इथे त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल आभार.

अवांतर - "Normal is relative! "
माझ्या कामाच्या जागेवर मोठ्या अक्षरात मी हे एक ढापलेले वचन लावलेले आहे. बॉद्रियार्ड साहेबांच्या तत्वज्ञानाशी काहिसे मिळते जुळते आहे. कुणाचे आहे माहित नाही.

 
^ वर